रुग्णालय व्यवस्थापन: १ - समुद्र

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in काथ्याकूट
8 Jul 2023 - 4:15 pm
गाभा: 

एका दशकाहून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात काम करत असताना जो अनुभव मिळाला त्यात खूप काही शिकलो. स्वतः अनुभवाने मिळवलेली माहिती इथे सार्वजनिक केली तर ज्याला या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याला तसेच इतर संबंधितांना मदत मिळावी या हेतूने हि लेखमाला. मी काही अनुभवी लेखक नाही तसेच हे लेख माहितीपर असल्याने यात व्याकरणाच्या चुका होऊ शकतात (शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करेनच). अनुभवाला जोड म्हणून इंटरनेट वरून काही आकडेवारी मदतीसाठी वापरलेली आहे.
नमस्कार, माझे नाव महेश सिताराम कांबळे. २०१२-१३ साली अपघातानेच आरोग्य क्षेत्रात 'नोकरी' मिळाली. कायमच कम्प्युटर जीव कि प्राण असल्याने व इतरांच्या तुलनेत लेखी तसेच बोली इंग्रजी बरी असल्याने वरच्या पदांवर लौकर जाऊ शकलो. अर्थात मेहनतीची जोड होतीच. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांत काम करत असताना आरोग्य क्षेत्राच्या असीमित कक्षांविषयी माहिती मिळायला लागली. आज, इतक्या वर्षानंतर देखील या समुद्रातील केवळ ओंजळभर किंवा कमीच माझ्या कडे आहे असे स्वीकारताना कसलाही कमीपणा नाही.
२०२० च्या एका अभ्यासानुसार भारतात, नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची संख्या ४५,००० (पंचेचाळीस हजार) च्या आसपास आहे, तर सरकारी रुग्णालयांची संख्या २५,०००(पंचवीस हजार) च्या घरात. खाजगी रुग्णालये एकूण भाराच्या जवळपास ६५% भार पेलतात. देशातील काही भागात खाजगी रुग्णालयांची क्षमता सरकारी रुग्णालयांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात देखील खाजगी रुग्णालयातील खाटा, I. C. U., व्हेंटीलेटर्स च्या संख्येचा विचार करता खाजगी रुग्णालयांची क्षमता अधिकच म्हणावी लागेल. आंध्र प्रदेश, बिहार, दादरा नगर हवेली, दमण दिऊ, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या १५ राज्यांत देशातील लोकांच्या आरोग्याचा जवळ जवळ ७५% भार विभागला गेलाय. उत्तर प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र मिळून देशाच्या लोकसंख्येच्या ३१% लोक सरकारी यंत्रणेपेक्षा खाजगी रुग्णालयांवर जास्त विश्वास ठेवताना दिसतात.
देश झाला, आता राज्य समजून घेताना राज्यात सरकारी रुग्णालयांची टक्केवारी १९८६-८७ साली जिथे ४६% हुन जास्त होती तिथे २०१७-१८ साली २६% पेक्षा कमी झालेली पाहायला मिळते. देश जिथे आरोग्यावर अर्थसंकल्पात ३.८% तरतूद करतो तिथे आपले राज्य भरमसाट अशी २.९% तरतूद करते. २०२० साली झालेल्या OXFAM Survey नुसार भारताचं आरोग्य सेवेचे बजेट जगातील खालून चौथ्या क्रमांकाचे आहे. आपल्या प्राथमिकता बल्ले बल्ले!!
रुग्णालय किंवा आरोग्य क्षेत्र म्हंटल कि डॉक्टर आणि रुग्ण एवढेच घटक न राहता स्थानिक प्रशासन ते जागतिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक-राजकीय उलाढाली अशा बहुआयामी क्षेत्राबद्दल सर्वसामान्यांत कमालीचे औदासिन्य (/अडाणीपण) दिसते. पैकी खाजगी रुग्णालये व त्यातील संधी केवळ इथपर्यंतच सांगायचे जरी म्हंटले तरी बरच काही आहे, जे पुढील भागांत येत राहील.
क्रमशः

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

8 Jul 2023 - 4:53 pm | तुषार काळभोर

पुढील भागांची उत्सुकता आहे.

म्हया बिलंदर's picture

8 Jul 2023 - 9:04 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद

कंजूस's picture

8 Jul 2023 - 5:30 pm | कंजूस

स्वानुभव भारी.
उत्सुकता वाढली.

म्हया बिलंदर's picture

8 Jul 2023 - 9:04 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद

धन्यवाद.. वेगळा विषय वाचायला मिळत आहे. नियमितपणे आणि थोडे मोठे लेख येऊद्यात..

पुभाप्र.

म्हया बिलंदर's picture

8 Jul 2023 - 9:10 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

8 Jul 2023 - 6:57 pm | कर्नलतपस्वी

वाचतो आहे.

म्हया बिलंदर's picture

8 Jul 2023 - 9:10 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद

वामन देशमुख's picture

8 Jul 2023 - 7:06 pm | वामन देशमुख

लिहीत रहा...
वाचत रहातो...

म्हया बिलंदर's picture

8 Jul 2023 - 9:10 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

8 Jul 2023 - 8:22 pm | मुक्त विहारि

लिहीत रहा

म्हया बिलंदर's picture

8 Jul 2023 - 9:11 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद

तिता's picture

8 Jul 2023 - 9:31 pm | तिता

उत्सुकता वाढली. पुभाप्र.

म्हया बिलंदर's picture

9 Jul 2023 - 6:46 am | म्हया बिलंदर

धन्यवाद

विवेकपटाईत's picture

9 Jul 2023 - 7:48 am | विवेकपटाईत

लेख आवडला।

विषय रोचक आहे. सुरुवात छान झालीय. पु भा प्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2023 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन माहितीपूर्ण आहे, वाचतोय. पुढील भागाची वाट पाहतोय.
प्रतिसाद देणा-यांचे सर्वात शेवटी एखाद्या प्रतिसादात आभार मानले तरी चालतील.

-दिलीप बिरुटॅ

उत्तम लेख. अशीच माहिती येऊ द्या !

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2023 - 11:57 am | राजेंद्र मेहेंदळे

हॉस्पिटलचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालत असावे असे नेहमी वाटते, मार्केटिंग्,खरेदी/विक्री,वसुली तसेच ईलेक्ट्रिकल्,सिव्हिल वगैरे मेन्टेनन्स हे एक वेगळेच समांतर जग आहे. वाचायला आवडेल. पुभाप्र.

रच्याकने- २०१६ नंतर लेखक एकदम २०२३ मध्ये उगवलाय.

म्हया बिलंदर's picture

12 Jul 2023 - 12:36 pm | म्हया बिलंदर

'समांतर जग' हे अगदी खरे.
२०१६-२३ मिपावरचा वावर आपोआप कमी झाला, बाकीची साधनं पुढे आली, वेळ कमी पडायला लागला. आता पुन्हा जमेल तितकं सक्रिय राहण्याचा प्रयत्न करेन. प्रतिसादाकरिता धन्यवाद.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

10 Jul 2023 - 4:33 pm | हणमंतअण्णा शंकर...

कोवाई मेडिकल आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीच्या अभ्यासाच्या निमित्ताने मलाही हा विषय जरासा खोलवर जाऊन समजावून घ्यावासा वाटला.

तुमच्या पोतडीतून काय बाहेर पडतंय याची उत्सुकता आहे.

विजुभाऊ's picture

10 Jul 2023 - 8:23 pm | विजुभाऊ

मह्याभाऊ ..... प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देण्यापेक्षा सर्वश्री प्रमाणे एकदाच दोनतीन दिवसांनी सर्वाना धन्यवाद द्या.
तुमच्या प्रत्येक धन्यवादामुळे प्रतिसादांची संख्या दुप्पट दिसते.

आणि मार्केटींग स्टाफ पाहीलेला आहे. मोठ मोठ्या कंपन्यांबरोबर सांमजस्य करार विकणे असं स्वरूप असतं जे ३१ वर्षापूर्वी अकल्पित वाटायचं. आता खास वृद्धांसाठी असलेल्या रहीवासी संकुलांचं हॅास्पिटल्स बरोबर असा करार असल्यामुळे ही कल्पना नविन राहीली नाही.

वैद्यकिय व्यवसाय आरोग्याशी निगडीत असल्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी थोडासा माणुसकीचा स्पर्श असल्याशिवाय रूग्णाला बरे वाटू शकत नाही. कुणी तरी कोरडेपणाने उपचार केले तर आपण ओझं आहोत या भावनेने रूग्ण बरं होण्याची ऊभारीच घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सबब, हॅास्पिटल हा व्यवसायच आहे आणि नफा तोट्याची गणितं सांभाळली जातात अशा चर्चेकडे धाग्याची मालिका जाणार नाही अशी आशा बाळगतो

म्हया बिलंदर's picture

12 Jul 2023 - 12:38 pm | म्हया बिलंदर

प्रतिसादाकरिता सर्वांचे आभार. 'नवशिक्याचे लेखनप्रयोग' सांभाळून घ्या.

म्हया बिलंदर's picture

18 Jul 2023 - 9:30 am | म्हया बिलंदर

प्रतिसादाकरिता सर्वांचे आभार.