गाभा:
आदीपुरुष च्या निमित्ताने
दोन दिवसांपूर्वी रामयणावर आधारित आदीपुरुष हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. यात हिंदू धर्माची विटंबना झालीये, संवाद खराब आहेत, रावण आणि हनुमान यांना मुसलमानांसारखं दाखवलंय, असं ऐकू येतंय. IMDB वर या चित्रपटाला 1 स्टार द्या, बहिष्कार घाला, असे मेसेज येत आहेत. युट्युब वर या चित्रपटाला शिव्या देणारे अनेक व्हिडीओ आलेत.
तर या सगळ्या विषयी मिपाकरांचे काय मत? कुणी चित्रपट पाहिला आहे का?
(मिपा वर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. अनेक वर्षे वाचनमात्र राहिल्यावर सदस्यत्व घेतलं आहे. सांभाळून घ्या)
प्रतिक्रिया
18 Jun 2023 - 12:41 am | रंगीला रतन
चित्रपट बघायच्या आधी अशे फालतु धागे काढायला दुसरी वेबसाइट आहे तिकडे जा.
18 Jun 2023 - 8:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'आदिपुरुष' चित्रपट पाहिला नाही. पण त्यावर एक कार्टून कोणी तरी ट्वीटरला टाकलं त्यामुळे पोलिसांकडून धरपकड झाली, असे काही तरी वाचले त्यामुळे चित्रपट जरी विषय असला तरी या विषयावर काहीही बोलणार नाही.
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही.
आयडी नवाच आहे असे समजतो. लिहिते राहा. स्वागत.
-दिलीप बिरुटे
18 Jun 2023 - 5:17 pm | विवेकपटाईत
सिनेमातील गाणी उत्तम आहे. हनुमानाच्या गळ्यात जानवे आहे. दाढी वाढवल्याने कुणी मुसलमान होत नाही. रामायणवर आधारित शेकडो भाषांत हजारो कथा आहे. एवढेच काय मूळ गाभा सोडल्यास वाल्मिकी आणि तुलसी रामायणात कथा वेगळी आहे. विरोधाचे मुख्य कारण हा राम बाहुबली आहे. रावणाची चरित्र एक मुसलमान साकार करीत आहे. मी दिल्लीत गल्लीतल्या रामलीला बघितल्या आहे. त्यामुळे काही टपोरी संवादांचे आश्चर्य वाटले नाही. बहुतेक विरोधाचा प्रकार ही एक प्रकारची पब्लिसिटी असते. विरोधामुळे सिनेमा हिट होणार.
19 Jun 2023 - 1:24 am | साहना
चित्रपटाच्या प्रमोशन साठी सोशल मीडिया वर ९५०० ते २५००० देत आहेत असे ऐकले आहे. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काहीही लिहिणार नाही.
19 Jun 2023 - 9:40 am | विवेकपटाईत
अधिकांश सीने समीक्षा या चित्रपटाच्या विरोधातच लिहीत आहे. विरोधासाठी पैसा दिला जात आहे असेही होऊ शकते. बाकी सोशल मिडियात व्यक्त होणारे बिना सिनेमा पाहतात आपली मत नोंदवू लागतात. यालाच अलतकिया म्हणतात
19 Jun 2023 - 11:35 am | कॉमी
सिनेमा फालतू आहे. हे काही आश्चर्यकारक नाही. तानाजी हा सिनेमा सुद्धा माझ्या मते ऐतिहासिक सिनेमा म्हणून संपूर्ण फसलेला होता. त्या दिग्दर्शकाचाच हा सिनेमा आहे.
प्रभासचा अभिनय चांगला नाही. ट्रेलर मध्ये बाहुबली टाईप अभिनय वाटत होता आणि अगदी तसाच अभिनय आहे. कोठेही भावनिक अभिनय नाही. मक्ख चेहऱ्याने वावरला आहे. कुठेकुठे त्याचा चेहरा आणि शरीर सुद्धा VFX आहेत असे वाटते. प्रभास रोल साठी खूप वयस्कर आहे आणि बघताना हे प्रत्येक फ्रेम मध्ये खटकते.
कृती सनोन सिनेमात मोजून ५_१० मिनिटे फारतर असेल. तिच्या अभिनयाचे सुध्दा प्रभाससारखेच. एकतर सीता हे पात्र म्हणून फुलवण्यासाठी काहीही वेळ दिलेला नाही. त्यात कृतीचा अभिनय मापाचा. प्रफुल्ल चेहरा करणे तिला जमते आणि बघायला सुद्धा छान वाटते. पण नंतर दुःखाचा विरहाचा अभिनय जमला नाहीये. शेष अथवा लक्ष्मण हे पात्र सुद्धा तसेच. त्या पात्राची स्वतःची काहीही ओळख दाखवली नाहीये. त्याला वनवासात सोबत येण्याची गरज नसतानासुद्धा रामाप्रती प्रेम आणि श्रद्धा असल्याने तो येतो ही अत्यंत साधी बाब सुद्धा अधोरेखित करायचे कष्ट घेतले नाहीयेत. मुळात, सिनेमा चालू होतो तो वनात. आधीची गोष्ट केवळ दोन तीन चित्रांमधून दाखवली आहे. त्यामुळे कथेचा भावनिक पाया तयारच होत नाही. अनेक उत्तम क्षण गाळले आहेत. भरत - राम भेट, वाली राम संवाद, रावण - कुंभकर्ण ह्यांचे संबंध इत्यादी. टपोरी संवाद तर व्हायरल झाले आहेतच, पण एकूण संवाद खूपच वरवरचे टाळ्या खेचण्यासाठी आहेत. सिनेमात संवाद कमी वेळ आहेत. जास्त वेळ बॅकग्राऊंड म्युसिक दणादण वाजत असते. ते सततच वाजत असल्याने महत्वाच्या क्षणी त्या संगीताचे महत्व वाटत नाही.
सिनेमा सुपरहिरो सिनेमा सारखा वाटतो. सिनेमाच्या सुरुवातीला एक अँक्शन सीन आहे जो पूर्णपणे असंबद्ध आहे. अनेक हॉलिवूड सिनेमांतून उचलेगिरी केली आहे. लंकेचे दार सेम मोर्डोर सारखे घेतले आहे. इंद्रजित हा द फ्लॅश वरून उचलला आहे. वानर सेना प्लॅनेट ऑफ द एप्स वरून घेतली आहे.
सैफ अली खानने रावण म्हणून पुरेसा अभिनय केला आहे. इतर पात्रांच्या तुलनेत त्यानेच काय ते बरे काम केले आहे. पण रावणाचे पात्र रामायणाच्या रावणासारखे लिहिले नाहीये. गिटार सारखी रूद्र वीणा वाजवणे काय, अजगराच्या स्पा मध्ये पहुडणे काय, ड्रॅगन आणि वटवाघूळ सेना काय. एक मात्र चांगला क्षण म्हणता येईल तो म्हणजे शिवोहम शिवोहं गाणे. त्यातच तो रूद्र विणा वाला सीन आहे. तो सोडला, तर वातावरणनिर्मिती त्या गाण्याने मस्त केली आहे. रावणाची आत्यंतिक शिवभक्ती गाण्याच्या शब्दांनी उत्तम उभी केली आहे. सोबतचे त्याचेच पुतळे सोबत गातात ह्याने रावणाची शक्ती आणि अहंकार दिसतो.
< के तू है की मैं हूं, या मैं हू की तू हैं, कहां कोई अंतर, शिवोहम, शिवोहम
पण हे सोडले तर इतर सर्व काहीच्या काही आहे रावणाबाबत. त्यामुळे सैफचा ठीकठाक अभिनय काही कामाचा नाही. दिग्दर्शन आणि कॅमेरा वर्क सुद्धा भयंकर आहे. काही वेळेस पूर्ण स्क्रीन थरथरते आहे असे वाटते विनाकारण. काही वेळेस दोन पात्र समोरासमोर उभी असली की त्यांचे पोष्चर विचित्र वाटते.
सिनेमात पात्रांचा पेहराव सपशेल फसला आहे. सरळ सरळ खादी ग्रामोद्योग मधला स्लिव्हलेस टीशर्ट आणि खांद्यावर चामडी चीलखतासारखे दिसणारे काहीतरी चिकटवले आहे. रावणाचे ५×२ ग्रीड डोके सगळ्यांनी बघितले असतीलच. देवदत्त नागे बजरंग ह्या भूमिकेत तोंडात हवा भरल्यासारखा वाटतो. सैफची व्हायकिंग हेअरस्टाईल खूप विचित्र वाटते.
Vfx बद्दल खूप बोलले गेले आहे. माझ्या मते VFX खूप वाईट आहेत असे नाही. केवळ वाईट VFX असणे हा प्रॉब्लेम नाही. तर इतक्या जास्त प्रमाणात VFX वर अवलंबून राहणे हा मुख्य प्रॉब्लेम आहे. संपूर्ण सिनेमा स्टुडिओ मध्ये शूट केला आहे. एकही समुद्र, जंगल खरे नाही. आणि ते खरे नाही हे अर्थातच जाणवत राहते. त्यामुळे पूर्ण सिनेमा ANIMATED आहे असे भासत राहते.
कोणतेही उत्तम एपिक सिनेमे घ्या. लॉर्ड ऑफ द रिंगस बघा. त्यात खरोखर न्यू झीलंड मध्ये उत्तमोत्तम ठिकाणी चित्रीकरण केले त्यामुळे सिनेमा पाहताना इतका उत्तम दिसतो. हेच जर सगळे स्टुडिओ मध्ये केले असते तर इतके चांगले दिसते का ? ६००-७०० करोड रुपये ठीकठाक VFX वर खर्च करण्याऐवजी चांगल्या सुरेख जागा शोधून त्यावर चित्रीकरण का नाही केले हा प्रश्न पडतो.
अर्थात इतके सगळे असेल तरी सिनेमा भावना दुखावणारा आजिबात नाहीये. उलट ज्यांच्या भावना दुखावतायत खास त्यांच्यासाठीच सिनेमा काढला आहे. "रावणाची हेअर स्टाईल अल्लाउद्दीन खिलजी सारखी का केली" असे संवादलेखक सेलिब्रिटी कवी मनोज मुंतशिर ह्यांना विचारले असता ते म्हणतात "प्रत्येक युगाचा एक खलनायक असतो. खिलजी हा आजच्या युगाचा खलनायक आहे. त्यामुळे रावण खिलजी सारखा दिसला तर बिघडले काय ?"
19 Jun 2023 - 3:05 pm | हणमंतअण्णा शंकर...
हा चित्रपट पाहा.
आणि मला सांगा आदिपुरुष का ANIMATED वाटतो.
साला भारतीय लोकांना स्वतःची गोष्ट सुद्धा नीट सांगता येत नाही. जपानी माणूस ज्या प्रतिभेने ती सांगतो ते सुद्धा जसेच्या तसे कॉपी करणे देखील जमत नाही ह्या गांडुळांना.
19 Jun 2023 - 3:06 pm | हणमंतअण्णा शंकर...
https://youtu.be/gKcOjnDJfzk
19 Jun 2023 - 5:04 pm | आनन्दा
पण एक गोष्ट मात्र नक्की मान्य करावी लागेल.
अडीपुरूष पाहू नये यावर डाव्यांच आणि उजव्यांचे एकमत झाले आहे
21 Jun 2023 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्क्रीन मीरर करुन लॅपटॉपवर बघीतला. वेगवेगळे रामायण आहेत तसं आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार झालेलं नवं तंत्रज्ञानाचं रामायण. नव्या पिढीला काय भावेल असा विचार करुन आलेलं असं हे रामायण. सिनेमा भावना दुखावणारा अजिबात नाही. बाकी चित्रपटाविषयी आपण लिहिलंय ते सर्व तंतोतंत मान्य.
-दिलीप बिरुटे
19 Jun 2023 - 5:04 pm | तर्कवादी
मी आदिपुरुष चित्रपट पाहिला नाही. त्यामुळे तो चांगला की वाईट हे मी सांगू शकत नाही. पण चित्रपट काय पातळीवरचा आहे हे समजण्याकरिता कदाचित हे एक दृश्य पुरेसे असावे.
https://youtube.com/shorts/Gv5ybZvxLNA?feature=share
19 Jun 2023 - 6:41 pm | कर्नलतपस्वी
सदस्य कलाक्षेत्रातले दिग्गज. असले चित्रपट पास करण्या आगोदर बघत नाहीत का? वर्क फ्राम होम तर नाही करत. का डोळ्यावर पट्टी आणी डोक्यात.....
शेम शेम.
विषयवास्तूशी करोडो लोकांच्या भावना,विश्वास, आदर जोडलेला आहे त्याची जाणीव आहे की नाही.
डिवचायचे आणी मग दंगे केले म्हणून बोंब मारायची.
हे फक्त हिन्दू धर्म, देवी देवता बद्दल च होते. इतर धर्मात बद्दल ब्र सुद्धा काढू शकत नाही.
पहिला खटला सेन्सॉर बोर्ड वर केला पाहीजे.
19 Jun 2023 - 7:23 pm | कॉमी
सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारावी असे सिनेमात काहीही नाही. लोकांनी दंगे करण्यासारखे सुद्धा काहीही नाही. सिनेमा वाईट (भंकस ह्या अर्थी वाईट) असला तरी भावना दुखवणारा आजिबात नाहीये.
21 Jun 2023 - 12:12 pm | उन्मेष दिक्षीत
भंकस असल्यामुळेच भावना दुखावल्या असतील.
20 Jun 2023 - 10:01 am | साहना
सेन्सर बोर्ड हीच ब्रिटिश संकल्पना आहे. आपल्या पालन कर्त्या साहेबांचे रक्षण हे त्यांचे काम. चित्रपटाच्या दर्जाशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. एखाद्या चित्रपटाने देशांत दंगा वगैरे माजला किंवा विश्वगुरूच्या सन्मानास तडा जाऊन ह्या पावन भूमीने नैतिकतेचे शिखर गाठले आहे त्यावर किंचिंत शी सावली वगैसे पडली असे काहीही ह्यापूर्वी घडलेले नाही. विमानतळावर जसे विनाकारण ६ वेळा आपला बोर्डिंग पास आणि ID तपासतात तसलाच हा प्रकार आहे.
भिकार दर्जाचे ऐतिहासिक किंवा धार्मिक चित्रपट करणे हा बॉलिवूड चा स्वभावधर्मच आहे. ह्या हिंदी चित्रपट क्षेत्रांतील बहुतेक लोकांना हिंदीच येत नाही. येते ते अत्यंत जुजबी. ह्या क्षेत्रातील लोकांनी फार तर देवदत्त पट्टनाईक ह्यांचे एखादे पुस्तके वाचले असेल. ह्यांच्याकडून काय दर्जाची अपेक्षा ठेवायची ?
> डिवचायचे आणी मग दंगे केले म्हणून बोंब मारायची.
दंगे घडावेत असे ह्यांत काहीच नाही.
21 Jun 2023 - 6:01 am | सर टोबी
हिंदू देवतांची खिल्ली उडवण्याचं पातक हिंदूकडूनच घडलं आहे. जेव्हा ‘इतर’ धर्मीय आपल्या श्रद्धेची खिल्ली उडवतात ना तेव्हा म्हणायचं वाक्य आहे ते (“ इतर धर्मात बद्दल ब्र सुद्धा काढू शकत नाही”).
बाकी वस्त्रहरण आणि जाने भी दो यारों अशा कलाकृतींचं आत्ताच्या काळात काय मूल्यमापन झालं असतं कुणास ठाऊक.
19 Jun 2023 - 6:56 pm | प्रचेतस
20 Jun 2023 - 7:34 am | आनन्दा
एव्हढा फोटो काढून झाल्यावर बंद केला असेल. :P
बघताना एखादा फोटो आहे का?
21 Jun 2023 - 3:02 am | चित्रगुप्त
आपण विनोदी चित्रपट म्हणून हा बघावा असे मुलगा-सून यांचे मत आहे. विशेषतः "कपडा तेरे बाप का" वगैरे डायलाग आहेत तोपर्यंत. परंतु सगळे शो हाऊसफुल्ल आहेत.
यापूर्वी असे काही प्रसिद्ध सिनेमे विनोदी म्हणून बघितले, तर काहीतून उठून घरी परतलो.
21 Jun 2023 - 3:03 am | चित्रगुप्त
आपण विनोदी चित्रपट म्हणून हा बघावा असे मुलगा-सून यांचे मत आहे. विशेषतः "कपडा तेरे बाप का" वगैरे डायलाग आहेत तोपर्यंत. परंतु सगळे शो हाऊसफुल्ल आहेत.
यापूर्वी असे काही प्रसिद्ध सिनेमे विनोदी म्हणून बघितले, तर काहीतून उठून घरी परतलो.
21 Jun 2023 - 12:00 pm | कर्नलतपस्वी
प्रथम दर्शनी गल्ली चुकल्या सारखेच वाटेल.
हिंदू देवतांची खिल्ली उडवण्याचं पातक हिंदूकडूनच घडलं आहे.
१००% सहमत.
यांनाच मला विचारायचे आहे की असाच चित्रपट इतर धर्म, मान्यतांवर काढू शकाल काय?
जर लेखक स्वतःच मुतंशिर (विखुरलेला) असेल त्याच्या कडून काय अपेक्षा करणार.
वस्त्रहरण आणि जाने भी दो यारों अशा कलाकृतींचं आत्ताच्या काळात काय मूल्यमापन झालं असतं कुणास ठाऊक
हे त्या त्या काळातल्या प्रेक्षकांवर अवलंबून असते. समांतर चित्रपटाच्या काळात किती तरी अशा कला कृती आल्या पण त्या वेळेच्या प्रेक्षकांनी त्या डोक्यावर घेतल्या.
किस्सा कुर्सी का हा चित्रपट एकच दिवस चालला. दुसर्या दिवसापासून पुर्ण देशात कुठेच दिसला नाही.
इतर विषय संपलेत का? पुन्हा रामायण आणी त्यावर महाभारत ....
जाऊ द्या, मला काय करायचंय, पन्नास वर्षात फारच क्वचित म्हणजे दोन पाच वेळेसच थेटरात चित्रपट पाहीला.
21 Jun 2023 - 12:37 pm | कर्नलतपस्वी
क्षमस्व.
21 Jun 2023 - 3:05 pm | Bhakti
छ्या बाई!आदिपुरुष मधला प्लास्टिक प्रभास बघून (छोट्या छोट्या क्लिप मधला)
All टाईम फेवरेट बाहूबली सिनेमा आता पाहताना मजा येणार नाही.(प्रभासने लवकर प्रायश्चित्त घ्यावं)
आपला अल्लु पुष्पाच बरा.
-पुष्पा २ ची वाट बघते.
28 Jun 2023 - 1:58 pm | वेडा बेडूक
तिला आवडला. मलाही ठीक वाटला. ३ड इफेक्ट्स चांगले आहेत.
28 Jun 2023 - 4:14 pm | श्रीगणेशा
इतका गदारोळ सुरू असूनही चित्रपट पाहिला. थोडक्यात, चित्रपटगृहात जाऊन वेळ वाया घालवू नये.
----
सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी फक्त "जय श्रीराम" चा आधार घेतला आहे. त्या ऐवजी एखादी काल्पनिक कथा तयार केली असती (बाहुबली सारखी) तर एखादा चांगला चित्रपट तयार करता आला असता.
बॉलिवूड मधून एखादा चांगल्या दर्जाचा चित्रपट तयार होऊ शकतो यावर आता विश्वास राहिला नाही.
28 Jun 2023 - 4:40 pm | इपित्तर इतिहासकार
सिनेमा वर अलाहाबाद हायकोर्टचे ताशेरे, नेहमी हिंदूंच्या भावनाच का टेस्ट केल्या जातात