स्तोत्र-मंत्रपठण

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
6 May 2009 - 11:23 pm
गाभा: 

नुकत्याच एका धाग्यावर स्वाइन फ्लूची चर्चा चालू असताना एका मिपाकर बंधूंनी स्वाइन फ्लू सारख्या रोगावर उपयुक्त (हमखास असे बहुधा म्हटले नव्हते) असा एक मंत्र सांगितला होता. मी लगेचच तो मंत्रोपचार नक्की कसा वापरायचा या विषयी चौकशी केली. त्याचे 'समाधानकारक @) ' उत्तरही मिळाले.
त्यानिमित्ताने एका जुन्या शंकेचा किडा डोक्यात पुन्हा वळवळू लागला. त्या किड्याला मारण्यासाठी हा काथ्याकूट.

बहुतेक स्तोत्राचे किंवा मंत्रांचे दोन भाग असतात.
पहिल्या भागात मुख्य स्तोत्र आणि दुसर्‍या भागात त्याची फलश्रुती असते.
उदा. अथर्वशीर्षात - श्री वरदमूर्तये नमः पर्यंत स्तोत्र आणि त्यानंतर एतदथर्वशीर्षं यो ऽ धीते पासून अथर्वशीर्षाचे पठण करण्याने होणारे लाभ हे असतात.
गणपती स्तोत्रात प्रणम्य शिरसा देवं पासून द्वादशं तु विनायकम् पर्यंत स्तोत्र आणि द्वादशैतानि नामानि पासून त्या स्तोत्राचे फायदे असे असते.

माझी शंका अशी. स्तोत्र म्हणताना फलश्रुती म्हणावी की नाही. पूर्वी जेव्हा लिहिण्याची सोय नव्हती तेव्हा पुढील पिढ्यांकडे सर्वच्या सर्व संक्रमित होण्याच्या दृष्टीने सर्व पाठ करणे योग्य असले तरी आज स्तोत्र म्हणताना त्या स्तोत्राचे फायदे म्हणण्याची काय गरज.
की स्तोत्र आणि फलश्रुती असे दोन्ही म्हटले तरच लाभ होतो?
आज ही शंका येण्याचे कारण म्हणजे स्वाईन फ्लू वर गुणकारी खालील श्लोक व त्याचा अर्थ.

|| दद्रुस्फोटक कुष्ठादी, महामारी विषुचिका | नश्यन्त्यनेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं ||
संगजा देशकालोत्था, अपिसांक्रमिका गदा: | शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तं ||

अंगावर उठणारे फोड, चट्टे, त्वचारोग हे दत्तस्मरणाने दुर होतात, त्याचप्रमाणे परस्पर संपर्काने, इतर देशातुन येणारे व साथिचे विकारही दत्ताचे नामस्मरण केल्याने दुर होतात असा मंत्राचा अर्थ आहे.

या मंत्रात सगळा भाग फलश्रुतीच आहे म्हणजे कोणत्या मंत्राच्या (१०८ वेळा) पठणाने स्वाइन फ्लू बरा होईल ते कळलेच नाही.
म्हणजे 'दत्तात्रेयं नमामि तम्' एवढाच मंत्र म्हणावा की सगळा श्लोक म्हणावा?

ज्यांनी हा मंत्र मिपाकरांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिला त्यांनी तसेच इतर जाणकारानीसुद्धा खुलासा करावा. म्हणजे मिपावरील सर्वांनाच या गोष्टीची माहिती होईल.
सूचना: हा काथ्याकूट या विशिष्ट मंत्राविषयी नसून फलश्रूती म्हणावी की नाही या विषयी आहे.

(मी एरवी मंत्र तंत्रादि प्रकारांची टवाळी करीत असलो तरी ही शंका मी गंभीरपणे विचारीत आहे) :|

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

6 May 2009 - 11:39 pm | घाटावरचे भट

अवग्रह a~ असा लिहितात.

नितिन थत्ते's picture

6 May 2009 - 11:41 pm | नितिन थत्ते

धन्यवाद. बदल केला आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

6 May 2009 - 11:56 pm | विकास

मी काही या विषयात माहीतगार नाही (तसा इतरात आहे असा माझा क्लेम नाही, पण तरी देखील आधीच सांगतो!)

आमच्याकडे शक्यतोवर गणपतीत (जर जमले नाहीतर नंतर कधीतरी), श्रीगणपत्यर्थवशिर्षमचे सहस्त्रावर्तन होत असे. त्यात फक्त शेवटच्या स्तोत्रातच फलश्रूती म्हणली जायची. का ते मला माहीत नाही... पण मला त्याचे कारण भटजींचे "टाइम मॅनेजमेंट" वाटायचे. फक्त स्तोत्र म्हणायला साधारण दीड मिनिट वेळ लागतो. संपूर्ण म्हणले तर तो वेळ दुप्पट होऊ शकतो!

बीजमंत्राक्षर महत्त्वाचं असतं..
फलशृती आवर्तन करताना म्हणत नसावेत. कदाचित एखादं स्तोत्र आपण का म्हणत आहोत याच स्मरण ठेवण्यासाठी म्हणत असावेत.

केदार's picture

7 May 2009 - 5:37 am | केदार

पठणाने स्वाइन फ्लू बरा होईल ते कळलेच नाही >> मंत्र पठणाने रोग बरा होतो ह्यावर माझा विश्वास नाही. :)

पण फलशृती नेहमी व खास करुन आवर्तनात तर नेहमी म्हणायची गरज नाही. कारण त्यात त्या मंत्राची स्तुती असते. जसे अर्थवशिर्ष सकाळी म्हणल्यावर हे होते, सकाळी व संध्याकाळी म्हणल्यावर हे होते वगैरे, वगैरे. ते एकदा आले तरी पुरे.

यन्ना _रास्कला's picture

7 May 2009 - 2:51 pm | यन्ना _रास्कला

पठणाने स्वाइन फ्लू बरा होईल ते कळलेच नाही >> मंत्र पठणाने रोग बरा होतो ह्यावर माझा विश्वास नाही.

मंत्रपटनान नुस्ते रोग बरे होतात अस नाय तर कर्ज बी फिटत अस आम्ही वाचुन आहोत.

ह्ये पाहा - http://misalpav.com/node/1218
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

प्राजु's picture

7 May 2009 - 8:09 am | प्राजु

माझ्या मते स्तोत्र आणि श्लोक या मध्ये फरक आहे.
आपण लिहिलेला श्लोक आहे आणि श्लोकाला फलशृती नसते. स्तोत्राला असते.
मलाही या विषयातली फार माहिती नाही. पण माझ्या थोड्याफार माहितीनुसार हे असं असावं.
गणेशाथर्वशिर्ष हे स्तोत्र आहे, श्रीसूक्त , पुरूषसूक्त ही सुद्धा स्तोत्रे आहेत त्यामुळे त्यांना फलशृती आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

7 May 2009 - 10:41 am | नितिन थत्ते

श्लोकाला फलशृती नसते.

अहो तो सगळा श्लोक हीच फलश्रुती आहे. अमुक तमुक ज्याच्या नामस्मरणाने बरे होते त्या दत्तात्रयाला मी नमस्कार करतो असा श्लोकाचा अर्थ आहे. नामस्मरण कसे करायचे याचा किंवा मूळ श्लोकाचा उल्लेखच नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

आनंद घारे's picture

7 May 2009 - 9:08 am | आनंद घारे

"संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशय:।" असे आयुष्यभर रोज म्हणणारी माणसे दिसतात, पण त्यांना कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे ते मात्र कळत नाही. मग त्यावर विष्वास कसा ठेवणार?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

अर्चिस's picture

7 May 2009 - 11:22 am | अर्चिस

बापरे मंत्र वाचायला अर्धा तास लागला......बाउंसर गेला हे वेगळे सांगायला नको.

स्प्राईट प्राशनाने देखिल स्वाइन फ्लू बरा होतो असे वाचले. हे जास्त सोपे - हो की नाही?

वाईन (D) फ्लू झालेला

अर्चिस

राघव's picture

7 May 2009 - 2:57 pm | राघव

फलश्रुती महत्वाची आहे किंवा नाही हा वेगळाच विषय झाला. तज्ञ लोकं नीट मार्गदर्शन करू शकतील. मला नाही त्यातलं जास्त काही कळत.

पण आपण स्तोत्रं कशाकरता म्हणतोय/स्तोत्रं का म्हणतात हे मला वाटतं जास्त महत्वाचे असतं.
देवळात जातो, देवाला नमस्कार करतो हे सगळे आपण "का" करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. वैयक्तीक/सामाजिक असा काही व्यावहारीक/अध्यात्मिक फायदा व्हावा, म्हणून आपण स्तोत्र पठण करतोय का?
शेवटी आपल्या मनोभूमिकेवर सगळे अवलंबून असतं.

राघव

मेथांबा's picture

7 May 2009 - 5:04 pm | मेथांबा

धर्म हि अफुची गोळी आहे हे माझं ठाम मत आहे. संस्कृत हि जनतेला न कळणारी भाषा
असुन त्यातुन बडबड करणे आणि लोकांना नरकाची भीती दाखवुन फसवणे हा चावटपणा आहे. हे थोतांड आहे.

गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा

हरकाम्या's picture

7 May 2009 - 6:20 pm | हरकाम्या

या मंत्रांवर माझा विश्वास नाही. मंत्रांमुळे जर रोग बरे होत असतील तर. आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमात या मंत्रांचा
समावेश करायला हवा. आणि त्या विभागाचे मुख्यपद श्री. खराटा यांना द्यायला हवे. असे मला वाटते. त्यांच्या चेल्यांमध्ये
सध्याचे सर्व अध्यात्मिक गुरु येतील असे मला वाटते.

लिखाळ's picture

8 May 2009 - 7:11 pm | लिखाळ

सूचना: हा काथ्याकूट या विशिष्ट मंत्राविषयी नसून फलश्रूती म्हणावी की नाही या विषयी आहे.

अनेक स्तोत्रे काही विशिष्ट हेतूने रचलेली असतात आणि तो हेतू काय हे फलश्रूतीमध्ये सांगितलेले असते. स्तोत्र पठणाने हेतू साध्य होईल (होईल न होईल तो प्रश्न वेगळा); पण हेतू काय आहे ते पठणकर्त्यला कसे समजणार? या साठी ती पुस्ती असणार. तसेच हेतू दर वेळी मनाशी घोकल्याने मनावर त्याचा परिणाम होऊन हेतू साध्य व्हायला अजून मदत मिळणार. असा माझा तर्क. त्यामुळे स्वतःच्या मनावर बिंबवण्यासाठी फलश्रूती एकदा तरी म्हणावी असे मला वाटते.
-- लिखाळ.

मंत्रालाच जोडून ठेवले की वेगळे शोधायचे कष्ट नाहीत! (संगणकावरच्या वेगवेगळ्या फाईल्सच्या एक्स्टेंशन्सवरुन वर्ड, पीडीएफ, एक्सेल अशा फाईल्स जशा चटकन हुडकता येतात तसेच काहीसे..)

चतुरंग