हाणामारीला सुरवात - सुरतेच्या मोहिमेतील मिळलेला ऐवज नेताना... भाग ७

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
31 May 2023 - 1:57 am
गाभा: 

१

७-०

भाग ७
१६७० साली शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीच्या मोहिमेला सादर करत आहे. या मोहिम मालिकेतील आधीचे भाग २०१९ मधे सादर केले होते. त्याचा पुढील भाग रेंगाळत पडले होते. आता भाग ७ व पुढील भाग पुन्हा लिहून नकाशे भरून मिपाकरांना सादर करत आहे.
वाक्य रचना "असे असावेत" अशी ठेवण्यामागे त्या गोष्टीत फेरफार असू शकतो असे दर्शवले आहे.

 ७-१

कळवणहून पुढे सातबारी ओलांडायला महाराजांना ३ पर्याय होते -
१. वणीकडून, २. कांचनबारीतून ३. देवळामार्गे खेळदरीकडून

७-२

७-३

७-४

७-५

हाणामारीला सुरवात - सुरतेच्या मोहिमेतील मिळलेला ऐवज नेताना...
रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे. (अवांतर माहिती - मिलिटरी कमांडर म्हणून दाऊदखान चतुर आणि शत्रूपक्षाच्या चाली काय असू शकतील याचा अचुक अंदाज घेणारा असावा असे त्याच्या हालचालीवरून लक्षात येते. कदाचित म्हणूनच इतर मुगल सरदारांचा हडेलहप्पी कारभार, सैन्याच्या गलथान हालचाली, आपापसातील हेवेदावे बढतीची शक्यता नसणे याशिवाय सेनापती महाबतखानाशी, दिलेरखानाशी न पटल्याने १६७१ नंतर तो उत्तरेत परत गेला असावा.) इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती सिद्दीखान पुर्वी आदिलशाहीतून मुगलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला १४ किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.

७-६

सिवाच्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपुर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो १६ ऑक्टोबरच्या उत्तर रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.
वरील प्रातिनिधिक व्यूहरचनेतील तोफखाना इखलासखान याच्या नेतृत्वाखाली आधी पोहोचला असावा. त्याने कांचनबारीत एका उंचवट्यावरून दूरवर सिवाचे सैन्याचा पडाव पाहिला असावा.

७-७

७-८

मुगल सैन्याची वाट पहाणारे कांचनखिंडीच्या पायथ्यापाशी जमवाजमव करून राहिलेले महाराजांच्या सैन्यावर तोफा डागून हलकल्लोळ माजवला तर अर्धेकाम फत्ते होईल असे वाटून आपल्या तोफा खेचून आणत लावल्या असाव्यात. त्या कमीतकमी ४ तरी असाव्यात. दारू ठासून, गोळे भरून वात बाहेर काढून गोलंदाजांची तयारी पाहून ‘फायर’ ची आज्ञा दिली असावी…

७-९

७-१०

थांबत थांबत तोफगोळे उडत राहिले असावेत. मराठे फौजांची पांगापाग झाली. काही जखमी तर काही त्यात मारले गेले. असे तोफांचे सुरवातीचे आक्रमण सहन करावे लागेल याची जाणीव महाराजांना होती. कारण इखलासखान चांदवड बाजूने येताना त्यांच्या टेहळ्यांनी टिपला होता.

७-१२

इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती सिद्दीखान पुर्वी आदिलशाहीतून मुगलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून

७-१३

७-१४
रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे.
दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला १४ किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.

७-१५

सिवाच्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपूर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो १६ ऑक्टोबरच्या रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.

प्रतिक्रिया

ओकसाहेब, अत्यंत अभ्यासपूर्ण, तपशीलवार सादरीकरण करण्यात तुमचा हातखंडा झालेला आहे.
मात्र फाँट निवडताना वाचायला अगदी सोपा निवडावा. सुलभतेने वाचता येणे हाच निकष असावा, बाकीचे 'नाचकाम' इथे अप्रस्तुत मानावे. सदर सादरीकरणात फक्त 'तेच टेकाड जवळून आजकाल असे दिसते' हाच मजकूर सुलभतेने वाचता येतो आहे. पुढील भागात ही सुधारणा करता आली तर उत्तमच.

बाकीचे 'नाचकाम' इथे अप्रस्तुत मानावे.

मान्य आहे...या भागात नकाशे जास्त आणि मजकूर कमी असे झाले आहे खरे...
बदल करायचा प्रयत्न करतो....

शशिकांत ओक's picture

31 May 2023 - 10:56 pm | शशिकांत ओक

मिपाकरांना विनंती की सादर केलेले मजकूराला वाचायला सोईचे वाटते की नाही यावर मत व्यक्त करावे.

1

२

३

@ओक- आता चांगले वाचता येते आहे, अक्षरांचा आकार किंचित कमी केला तरी चालेल, म्हणजे 'सिवा खेळदरीच्या मार्गाने' मधील 'सि', 'री' 'र्गा' च्या वेलांट्या, रफार वगैरे कापले जाणार नाहीत( बहुतेक)
नकाशा वगैरे पार्श्वभूमि गडद असेल तिथे पांढरी अक्षरे आणि हलकी असेल तिथे काळ्या अक्षरांची योजना करावी. अक्षरांच्या लहानमोठेपणापेक्षाही त्यातला 'साधेपणा' (दुसर्‍या रंगाची महिरप, सावलीचा आभास, चित्रविचित्र आकार वगैरे 'नाचकाम' नसले तर वाचणे सुलभ असते)

शशिकांत ओक's picture

1 Jun 2023 - 11:33 am | शशिकांत ओक

या धाग्यावर त्यात सादर केलेल्या मोहिमांवर काय अभिप्राय आहे? शिवाजी महाराजांचा व्यक्तिपरिचय चलाख आणि समोरच्या सेनापतींच्या लष्करी कारवाईची जाण राखणारा कसा असावा ?
गोलाकार वेढा देऊन रसद पुरवठा तोडणे, तोफांचा गोळेमार एकदा झाल्यावर त्या पुन्हा वापरायला लागणारा अवधी यात प्रतिहल्ला करून तो नाकाम करायची शक्ती, टेहळणी करायला माणसे पाठवून दाऊद खानाच्या सैन्य हालचालींवर पाळत ठेवली होती. समोरच्या सेनापतींच्या विचारांच्या कुवतीपेक्षा जास्त चतुर, पुढच्या २ चालीचे आडाखे बांधत धूर्तपणे खेळी करून नामोहरम करत याचा प्रत्यय या भागातील घटनांत दाखवला आहे.
यावर विचार व्यक्त करायला अपेक्षित आहे. जेव्हा ही हातघाईवर चालू होती तेव्हा महाराजांना समोरचा सेनापती कोण? नाव काय वगैरे माहिती नसण्याची शक्यता असावी.
गिरीभ्रमण प्रेमी, ऐतिहासिक घटनांची गोडी असणाऱ्या मित्रांना विनंती की ज्यांना शक्य असेल त्यांनी या मोहिमेत दर्शवलेल्या भागात जाऊन आपला अहवाल सादर करावा ही विनंती करतो.
वणी आणि दिंडोरी रस्त्यावरील हल्ले, नंतर कुंजीरगडा पर्यंतचा प्रदेश यावर काही जण बाईकवरून करून फेरफटका मारायला विनंती करतो. अशा मोहिमात कदाचित माझ्या घरचे एन फिल्ड बाईक रायडर्स - मुलगी - जावई, मुलगा-सून यांना जायची प्रेरणा मिळेल.

नमस्कार श्री शशिकांत ओक, आता काही सुधारणा आहे. धन्यवाद

साहना's picture

31 May 2023 - 12:25 pm | साहना

शिफारस भागांत चिकटवा हि संपादक मंडळाला विनंती. चर्चेच्या इतर धुराळ्यात हे मोती अदृश्य होता कामा नये.

शशिकांत ओक's picture

31 May 2023 - 11:04 pm | शशिकांत ओक

खुलासा करावा ही विनंती...

साहना's picture

31 May 2023 - 11:20 pm | साहना

sifaras

नमस्कार. तुमचा उपक्रम चांगला आहे. पण मला ती चित्रे बघायला, वाचायला आणि तात्पर्याने समजायला अवघड पडत आहेत. कदाचित बाकीच्या लोकांनाही तो त्रास असावा.
तेथे काही उपयुक्त माहीती आहे.
त्याच्या साह्याने तुम्ही गुगल नकाश्यात तुमचे नकाशे तयार करु शकता, नावे देऊ शकता. शेवटी हवे तर त्याचे स्क्रीनशॉट्स घ्या.

गुगल : https://wp.nyu.edu/digitalgallatin/portfolio/how-to-customize-collaborat...

शशिकांत ओक's picture

31 May 2023 - 1:40 pm | शशिकांत ओक

नकाशा वाचनाला त्रास होतो ही तक्रार योग्य आहे.
कारण ज्या भागातील या घटना घडत आहेत त्याचे वर्णन मला वेगळे करायला लागतेच. ते समोरासमोर असेल तर ते प्रेझेंटेशन मधून जास्त सुलभ होते. शाळा कॉलेजाच्या विद्यार्थ्यांसमोर किंवा उत्सुक पहाणार्‍यांकडून प्रदर्शनात तशी विचारणा केली जाते.
गूगल मॅप्स पेक्षा गूगल ३डी नकाशे मला वापरायला सोपे जातात. शिवाय पीपीटीच्या सीमा आहेत.

तुम्ही गुगल नकाशे दोन्ही द्वीमिती (२डी) आणि त्रिमिती (३डी) मध्ये बघु शकता.
https://www.groovypost.com/howto/make-google-maps-3d/

शशिकांत ओक's picture

31 May 2023 - 11:02 pm | शशिकांत ओक

गूगल अर्थ प्रो वरून बरीच माहिती मिळवता येते. अंतर, उंची, विविध वाहनांतून लागणारा वेळ, जुन्या काळातील तोच प्रदेश कसा दिसत असे वगैरे समजून येते.

मला तरी स्वतःला त्रीमितीमध्ये जाऊन अभ्यास करायला आवडेल.

http://www.misalpav.com/node/44001 ( भाग 1... भारवाहक - सूरतवरून मौल्यवान सामान घेऊन परताना… )

http://www.misalpav.com/node/44004 ( भाग 2 ...सूरत शहरातून निघाल्यावर...)

http://www.misalpav.com/node/44013 (भाग ३...अवजड सामानाची रवानगी बोटीवरून…!)

http://www.misalpav.com/node/44017 ( भाग ४ - मुल्हेरच्या वाटेवर… मुगलांच्या प्रदेशात प्रवेश…)

http://www.misalpav.com/node/44095 ( भाग 5 - कळवणवरून भराभर सरकता तांडा )

http://www.misalpav.com/node/44111 ( भाग - 6 कांचन बारीतील संघर्षानंतर …)

मधल्या काळात ई बुकच्या माध्यमातून काही भाग सादर केले होते.