९९ वर्ष्यानंतरसुद्धा

आंद्रे वडापाव's picture
आंद्रे वडापाव in काथ्याकूट
17 May 2023 - 11:36 am
गाभा: 

माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)

आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..

तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.

९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु

ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.

बाकी तुमचं चालू द्यात...

National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml

##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

17 May 2023 - 12:38 pm | सुबोध खरे

बेसिक मध्ये लोच्या आहे.

गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते

लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे.

लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते.

कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते

दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

आंद्रे वडापाव's picture

17 May 2023 - 1:22 pm | आंद्रे वडापाव

लोकसंख्या अमर नाही आअणि मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे's picture

17 May 2023 - 6:19 pm | सुबोध खरे

समर्थन असे होत नाही.

एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते.

गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

आंद्रे वडापाव's picture

17 May 2023 - 6:30 pm | आंद्रे वडापाव

दोन्ही CAGR कमी होत आहेत (केंद्र सरकारच्या मोजमापानुसार).

आंद्रे वडापाव's picture

17 May 2023 - 6:32 pm | आंद्रे वडापाव

आणि हा दर घसरणीचा उतरता ट्रेंड मागील अनेक वर्षे आहे.

सुबोध खरे's picture

17 May 2023 - 6:36 pm | सुबोध खरे

२१ आणि १९ मधील

आणि

+१ आणि - १ यातील गुणोत्तर यात जबरदस्त फरक पडत जातो.

आंद्रे वडापाव's picture

17 May 2023 - 6:49 pm | आंद्रे वडापाव

पण दोन्ही वार्षिक विकास दर हे अधिक आहेतच..
'हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%