पुणे कट्टा

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in काथ्याकूट
4 May 2023 - 9:41 am
गाभा: 

मिपा बंद होते. कायप्पावर काही मोजक्याच महाभागांची आभासी भेट होत होती.
गाठभेट व्हावी म्हणून कायप्पा वर आवाज दिला.

रविवार, दिनांक सात मे तेवीस रोजी साडेदहा वाजता भेटायचे ठरले आहे.

जे येतील त्यांच्या संगे व जे येवू शकणार नाही त्यांच्या आठवणीत.

आता मिपा सुरू झाले आहे म्हणून जे कायप्पावर नाहीत त्यांच्यासाठी ही साद.

मिपा सुरू झाले म्हणून पुण्यातली मिसळ खाऊन तोंड गोड करूयात.

क. लो. आ.

ता. क. मिपा पुन्हा सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी रक्त आटवले त्यांना धन्यवाद. त्यांची उपस्थित वाछंनिय आहे. श्रमपरीहार्थ निशुल्क मिसळ पाव देउन सन्मान करण्यात येईल.

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

4 May 2023 - 9:50 am | कर्नलतपस्वी

भेटण्याची जागा-संभाजी उद्यान मुख्य प्रवेशद्वार

वेळ - सकाळी साडेदहा

दिनांक-७-५-२०२२

जंगली महाराज रस्त्यावर, बालगंधर्व रंगमंदिराच्या शेजारी. पुणे

किंवा मार्कर.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 May 2023 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

GRCW+5H Pune, Maharashtra

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 May 2023 - 12:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

///dolphin.shame.printing

a

शानबा५१२'s picture

4 May 2023 - 11:38 am | शानबा५१२

कट्ट्यासाठी शुभेच्छा! मिसळपाववर एखादी नवीन सुविधा, सर्वरला ताण न देता टाकता आली कींवा एखादी स्पर्धा, एखादी वाचनमालिका नवीन स्वरुपाची असे काहीतरी ठरवा, कींवा त्यावर चर्चा करा, असे सुचवेन.

कर्नलतपस्वी's picture

4 May 2023 - 12:17 pm | कर्नलतपस्वी

उत्साहवर्धक सुचना.

कट्ट्यासाठी पुण्यात दुसरी ठिकाणे नाहीत काय ?

गवि's picture

4 May 2023 - 12:30 pm | गवि

सहमत.

मागे मी म किंवा कदाचित मिपाचाच एक कट्टा स्पाइस की काहीतरी जागी झाला होता. तिथे अशी गृपसाठी एकत्र बसण्याची आणि छोटेखानी खान पान व्यवस्था उत्तम होऊ शकली होती. चुभू द्याघ्या. बरीच वर्षे झाली. नाव नीट आठवत नसेलही. म्हात्रे पुलावरून पलीकडे एका निवांत रस्त्याला होते. लग्न वगैरेसाठी लॉन असतात तशा आजूबाजूला दिसल्या. पार्किंगची सोय होती. स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट, मोकळा बगीचा असे सर्व.

कर्नलतपस्वी's picture

4 May 2023 - 12:44 pm | कर्नलतपस्वी

कोथरूड, डि पी रोडवर मल्टी स्पाईस किंवा विष्णूजी की रसोई सुद्धा चांगली ठिकाणे आहेत.

दोन्ही ठिकाणी दुपारच्या जेवणाची चांगली सोय आहे.

आता कायप्पावर ठरले,मोजक्याच लोकांचा होकार आला आहे.

मिपा सुरू झाल्यामुळेच साद घातली. कदाचित पुढे मोठ्ठा कट्टा आयोजित करताना सर्व सूचनांची दखल घेतली जाईल.

कर्नलतपस्वी's picture

4 May 2023 - 12:34 pm | कर्नलतपस्वी

त्याचं काय आहे ना,

-पाताळेश्वरला बसू देत नाही.
-गुडघे पर्वती चढायला साथ देत नाहीत.
-सारसबागेत जोशी अभ्यंकर, जक्कल, प्रकाश हेगडे आठवतात.
-शनिवारवाड्यावर गेलो की पुतण्याच्या 'काका मला वाचवा',आशा किंकाळ्या ऐकू येतात.
- संभाजी पार्क मधे जुन्या आठवणी,खुणा आजूनही पुसटश्या का होईना दिसतात.

वसंत बापटांची ती कवीता आठवते,

आजून त्या झुडपांच्या मागे
सदाफुली ग गाली हसते
आजून आपुल्या आठवणींनी
शेवंती लाजवंती होते

म्हणून संभाजी पार्क. छान गारवा आहे , जवळच बेडेकर मिसळही आहे.

या वेळेस इथे भेटू पुढील कट्ट्या साठी तुम्ही ठिकाण सुचवा.

वर सुचवलेले ठिकाण, (नाव कोणी स्थायिक पुणेकर कदाचित नेमके सांगतील) येथे:
१. बसू देतात, स्वागतही करतात
२. एकही पायरी चढावे लागत नाही.
३. कोणीही कोणास ठार मारले नाही. किंकाळ्या नाहीत.
४. झुडपे आहेत. सदाफुली शेवंती शक्यता नाकारता येत नाही.
५. बेडेकर नाही, पण इतर मिसळ आणि अन्य पदार्थ उपलब्ध असल्याचे आठवते.

शुभेच्छा. कुठेही कट्टा झाला तरी फोटो वृत्तान्त येऊ द्या.

कर्नलतपस्वी's picture

4 May 2023 - 12:45 pm | कर्नलतपस्वी

वर प्रतिसाद दिला आहे.

आणि परत जाणे हे जंगली महाराज रोडवरील पाताळेश्र्वर फार सोपे ठिकाण वाटल्याने तीनदा येऊन गेलो. आताचे संभाजी उद्यान ही थोडेसेच पुढे आहे. ( दिलेला प्लस कोड पाहिला.) ओके.

इंद्रायणी एक्स्प्रेसने साडे नावाला पोहोचता येते. आणि परत अकराला निघालो की भुसावळ एक्स्प्रेस मिळते. दीड तास कट्ट्यासाठी भरपूर होतो. कारण लेखी ओळख झालेल्या मिपाकरांना प्रत्यक्ष भेटणं एवढाच उद्देश असतो. जेवण, हॉटेलिंग यात मला रस नसतो.
पण या वेळी येत नाही कारण वसईत जाणार आहे.

पुढे कधीतरी मेट्रो सुरू झाल्यावर एक मोबाईल कट्ट्याला नक्की येईन. एक रिटन तिकीट काढून एक तास मेट्रोत फिरायचे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

4 May 2023 - 5:41 pm | हणमंतअण्णा शंकर...

परगावी असल्याने येणे शक्य नाहीत तरी मी ही ठिकाणे सुचवू शकतो

१. संगीतकार श्रीकांत ठाकरे रस्ता, कुमार परिसर रोड, कोथरूड (खाण्याची ठिकाणे - मुक्ताई कॅफे, माऊली पान शॉप, उसाचा रस वगैरे मिळेल, इतर हॉटेलं ही याच रस्त्यावर आहेत, जरासं चालायची इच्छा असल्यास गांधीभवन जवळच). सध्या बहावा फुलला असावा या रस्त्यावर. वेळ : संध्याकाळ. दुपारी खूप ऊन असेल. खूप लकी असाल तर संजोपराव हेडफोन घालून ट्रॅक सुटमध्ये युट्यूबवर विडिओ पाहत महात्मा सोसायटीकडे चालताना दिसतील.

२. जिजाई कॅफे, मुळशी रस्ता. - कट्ट्यासाठी खूप चांगले ठिकाण. पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही. रिक्षा किंवा खाजगी वाहने असतात, मॅनेज होते. पण मस्त जागा.

३. शासकीय तंत्रनिकेतन मैदाना च्या कोपर्‍यावर, खाऊगल्ली शेजारीच आहे. झाडे भरपूर आहेत. मैदानाच्या बाजूला, आत बसायलाही जागा असावी.

४. महात्मा फुले संग्रहालय

५. यशदा ओपन एअर थिएटर जाताना रजिस्टर करावे लागते. यशदामध्ये नेहमी कोणताना कोणता कार्यक्रम, कार्यशाला सुरु असते. फक्त प्रिटेंड करायचे आणि निमूट नाव लिहून आत जायचे. अतिशय शांत जागा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2023 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>खूप लकी असाल तर संजोपराव हेडफोन घालून ट्रॅक सुटमध्ये युट्यूबवर विडिओ पाहत महात्मा सोसायटीकडे चालताना दिसतील

अरे वाह ! लेखन आणि शैली पाहता. बाय द वे, संजोपराव दिसले तर आमचाही नमस्कार सांगा.

-दिलीप बिरुटे

अरे वाह ! लेखन आणि शैली पाहता

फार वाक्ये अर्धवट राहतात तुमची आजकाल. शब्दकोडी सोडवत चला.

बाकी उरलेले वाक्य बोलला नाहीत तरी कळलेच. वस्ताद आहात हो तुम्ही मिपाचे. अर्थात तुम्ही जुने जाणते. मिपाचे बारसे जेवलेले.. तुमच्या जाणकार नजरेतून काय सुटेल?

या कट्ट्याच्या निमित्ताने संजोपराव उपस्थित होतील आणि तेच हणमंत अण्णा आहेत असे जाहीर करतील असे वाटले होते. पण परगावी असल्याने योग नाही. ;-)

ह घ्या.

कर्नलतपस्वी's picture

4 May 2023 - 7:31 pm | कर्नलतपस्वी

मिपा बद्दल काहीच बातमी नसल्यामुळेच कायप्पावर ठरले. आपली भेट झाली असती तर.... आसो परत कधीतरी.

कंजूस's picture

5 May 2023 - 4:46 am | कंजूस

आर्मीचे लोक निवृत्तीनंतर बंदूक ठेवून शकतात का? किंवा त्यांचे शस्त्रास्त्रे बाळगण्याचे लायसन आपोआपच रद्द होते. कट्ट्याला हा विषय काढणार होतो.
(दुसरे एक आर्मी/डिफेन्सवाले मिपाकर हल्ली दिसत नाहीत मिपावर. )

चलत मुसाफिर's picture

5 May 2023 - 7:12 am | चलत मुसाफिर

खाजगी बंदूक बाळगण्यासाठी लायसन हे काढावेच लागते. तुम्ही सैनिक असलात तरीही. किंबहुना, तळावर तैनात असणारे सैनिक तर खाजगी बंदूक घरी ठेवूच शकत नाहीत, त्यांना ती सरकारी शस्त्रागारात जमा करावी लागते.

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 10:36 am | कर्नलतपस्वी

शस्त्रास्त्र कायदा सर्वांना सारखाच लागू आहे. सैन्यात असताना सुद्धा दुनळी खरेदी करण्यासाठी परवाना लागतो. तैनात असताना ती दुनळी शस्त्रागारात जमा करावी लागते. सुट्टीवर जाताना बरोबर घेऊन जाऊ शकतात. गावी गेल्यावर जवळच्या पोलीस ठाण्यात सांगावे लागते.

निवृत्तीनंतर शस्त्र बाळगण्यासाठी परवाना लागतो.

तैनात असताना सरकारी शस्त्रे वापरण्यासाठी परवाना लागत नाही.

सैनिक म्हणून कुठल्याच प्रकारची कायद्यात सुट नाही.

कट्ट्याला आहेच. फक्त गडबडीत असल्याने थोडे लवकर निघावे लागेल.

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 10:38 am | कर्नलतपस्वी

मिसळी माझ्यातर्फे. पोटात जागा असू द्यात.
&#128512

संभाजी उद्यान म्हणजे जवळपास मिसळीचं असं ठिकाण नाहीच, त्यातल्या त्यात जवळ म्हणजे अहिल्यादेवीनजीकचं रामदास किंवा फर्ग्युसन कॉलेज रोडवरील सरमिसळ.

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 11:26 am | राजेंद्र मेहेंदळे

सेम हियर, भेटीगाठी घेउन निघेन

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 12:25 pm | कर्नलतपस्वी

बेडेकर आहेत ना. मला वाटते आपण तीन चारजण असू. तरी बघू आणखी कोण येतंय ते.

रविवार म्हणजे बेडेकरला प्रचंड गर्दी. शिवाय बेडेकर म्हणजे लव्ह-हेट :)

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 1:10 pm | कर्नलतपस्वी

तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं
हा हा तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं.

भेटूयात तर खरं.

प्रचेतस's picture

5 May 2023 - 1:17 pm | प्रचेतस

=))
भेटुयात तर नक्कीच. खाणं हा दुय्यम भाग.

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 1:12 pm | कर्नलतपस्वी

मला बेडेकर नुसतेच नाव माहिती, सत्तरी आली पण अजून नाही खाल्ली.

विजुभाऊ's picture

5 May 2023 - 7:01 pm | विजुभाऊ

मागे आम्ही सगळे शांग्रीला हॉटेलला भेटलो होतो.
पण तो कट्टा अर्थातच सम्ध्याकाळचा होता.

श्रीगणेशा's picture

7 May 2023 - 9:20 am | श्रीगणेशा

पहिलाच कट्टा असेल, माझ्यासाठी!
मिपाच्या भाषेत -- रुमाल टाकून ठेवतो. (थोडासा उशीर होईल, आणि PMPML बस मधेच बंद पडू नये, म्हणजे मिळवलं :-))

खेडूत's picture

7 May 2023 - 6:55 pm | खेडूत

अरे वा!
.
.
.

पण फुडं काय झालं? कळवावे.

वृत्तांत मिळाला.. धन्यवाद! :)