टोमॅटो -मुळा-बीट सूप

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
23 Mar 2023 - 6:08 pm

संध्याकाळी कार्ब बंद नको वाटतात तेव्हा सूप या प्रांताकडे वळाले.
ष
तीन पिकलेले टोमॅटो
तीन मध्यम आकाराचे मुळा
अर्धे बीट
मसाला- ५-६ मिरी
एक चमचा धने(किंवा धने पावडर)
दालचिनी
एक तमालपत्र
पाच सहा पाकळ्या लसूण
तीन हिरव्या मिरच्या
एक चमचा किसलेले आल
चिरलेली कोथिंबीर
एक चमचा तेल
हळद ,हिंग जिरे (१/२ चमचे)

कृती-
१.छोट्या कुकरमध्ये तेल तापल्यावर वरील फोडणीचे मसाल्याचे जिन्नस परतून घ्या.
२.चिरलेले टोमॅटो,मुळा,बीट फोडणीत टाकून परतून घ्या.
३.दोन ते तीन कप पाणी टाकावे.
४.तीन -चार शिट्ट्या होऊ द्याव्या.
५.शिट्ट्या झाल्यावर पुन्हा तीन-चार कप पाणी टाकून १५ मिनिटे उकळी येऊ द्यावी.
६.नंतर हे मिश्रण गाळून घेऊन चाळणीवरील मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या.
७.पुन्हा चाळणीतून गाळून घ्या.
८.पहिले गाळलेले पाणी हे मिश्रण एकत्र करून वाटल्यास आणखिन पाणी,मीठ, आवश्यक असेल तर तिखट टाकून उकळून घ्यावे.
९.गरमा गरम सुप कोथिंबीर किंवा तुळशीची पाने वापरून निवांत प्यावे.
प

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Mar 2023 - 6:13 am | प्रचेतस

सूप मस्तच झालेले दिसतेय, मात्र मुळ्यामुळे ह्याची चव उग्र लागत असेल ना?

कंजूस's picture

24 Mar 2023 - 9:44 am | कंजूस

मुलेच काय मोठेही मुळा घातलेले सूप घेतील असं वाटतं नाही.
बाकीचे ओके.

सौंदाळा's picture

24 Mar 2023 - 11:44 am | सौंदाळा

प्रचेतस आणि कंजूसकाकांशी बाडीस
डाळीची आमटी प्रमाणात मुळ्याच्या चकत्या घालून आवडते पण मुळा जास्त झाला तर मला अगदीच खायली जात नाही. मुळ्याची कोशिंबर पण तेच मात्र मुळ्याच्या पाल्याची भाजी बरी लागते. असो
सुप कलर बघून मस्तच वाटतय, पौष्टीक तर आहेच. आवडेल त्याप्रमाणात मुळा घातला तर छानच लागेल. घरी करायला सांगेन.

टर्मीनेटर's picture

24 Mar 2023 - 12:27 pm | टर्मीनेटर

आमच्याघरी टोमॅटो-गाजर-बीट सूप बनते, मुळ्याचे नव्हते ऐकले कधी!
मला तामिळ लोकांच्या घरी बनणारा मुळ्याचा सांबार, पीठ पेरून बनवलेली मुळ्याची पालेभाजी (ज्यात सौंदाळा ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे त्याच्या पांढऱ्या कंदाच्या चकत्या पण असतात), उत्तरभारतात मिळणारा मुली का पराठा आणि मुळा किसून त्यात दाण्याचे कूट, मिरची आणि दही घातलेली कोशिंबीर खूप आवडते, पण सूप मध्ये मुळा घातल्यास ते कसे लागेल ह्याविषयी मनात शंका आहे त्याचे कारण अर्थात वरती मान्यवरांनी उल्लेख केलेला मुळ्याचा 'उग्र वास' हेच आहे 😀

तरी कधीतरी बनवुन बघायला हरकत नाही!

कंजूस's picture

24 Mar 2023 - 2:51 pm | कंजूस

सफरचंदापेक्षा मुळा खायला चांगला लागतो. विनिगरमध्ये मुरलेला मुळा भारी लागतो(जपानी लोणचे.)मूली के पराठेही चांगले लागतात (पण त्यांचे शंभर रुपये का घेतात? वरच्या अमूल लोण्याचे एवढे?)

होय,मंडळींनो सूप जरा उग्र झाला.पण गरमा गरम पितांना विशेष जाणवला नाही.तेच मी तमीळ का तेलुगू रेसिपी पाहत होते मुळा टोमॅटो भाजी होती,तेव्हा सूप करुन पाहिला.मुळा अजिबात आवडत नव्हता.पण आता मुळा पराठा, कोशिंबीर हे प्रकार करते.भाजी अजूनही नाही आवडत तेव्हा सूप हा पर्याय निवडला.
हं तो विनेगारमधला मुळा ही पुढली पाकृ करणार आहे.

उन्हाळ्या पाठी येतो पावसाळा
बीटा बरोबर नक्की खा मुळा ;)

प्रचेतस's picture

24 Mar 2023 - 7:37 pm | प्रचेतस

हं तो विनेगारमधला मुळा ही पुढली पाकृ करणार आहे.

नको हो :)

गवि's picture

24 Mar 2023 - 7:48 pm | गवि

काय हे?
तुमचे प्रतिसाद अधिक सकारात्मक देत चला. प्रोत्साहन सोडा, उलट विरजण घालण्यात तुम्ही नंबर एक..

ही पाककृती अंडे घालून करता येईल का?* उकळत्या कोणत्याही सुपात अंडे फोडून थेट टाकले की त्याचे उत्तम श्रेडेड रूप मिसळून येते.

* तळटीप: तुम्ही अंडे घालून किती वेळ झाला आहे त्यावर ते अवलंबून आहे, असा जुना मिपा फेमस पीजे मारल्यास दुर्लक्ष केल्या जाईल

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 Mar 2023 - 8:58 pm | हणमंतअण्णा शंकर...

पौष्टिक दिसतेय! मी आधी मुळ्याशिवाय करून पाहतो.

मुळ्याचे शेपूसारखे आहे. काहीजणांना आवडतो, काहींना नाही.

मला वाटते, मोठे जपानी डाइकोन मुळे किंवा लहानलहान गुलाबी गेंदमुळे वापरून सूप जरा सहनीय होऊ शकेल.

तुम्ही मसाले जरा जास्तच वापरले आहेत!

त्याऐवजी सूप साधे ठेऊन त्यात खालीपैकी कोणत्याही दोन किंवा तीन किंवा एका वनस्पतीची पाने बारीक कापून भुरभुरावीत -

१. कोथिंबिर
२. शेपू
३. बेझिल/तुळस ( बेझिलची चव आणि वास अप्रतिम असतो. मला प्रचंड आवडते. तुळशीसारखाच प्रकार असला तरी भारतात का लोकप्रिय नाही हे मला समजत नाही)
४. सेज ( बेझिल आणि सेज या दोघांचा योग स्वर्गीय. मी कोणत्याही साध्या वरणात कोथिंबिरीऐवजी बेझिल आणि सेज बारीक कापून भुरभुरतो)
५. थाईम
४. रोजमेरी
३. पार्सली - कोथिंबिरीसारखी असते तरी चवीला भिन्न.
२. पुदिना - हा उपलब्ध आहे सगळी कडे
१. गवती चहा
२. हिरवी तमालपत्रे
३. मार्जोराम

कधी कधी लिंबाऐवजी लिंबाची साल किसून टाकावी.

गाजर आणि रताळे शिजवून त्यांचे गोडसर सूप करता येते. तुपा-लोण्यावर फार राग नसेल तर तूप, क्रीम मिसळून छान लागते. नुकतीच बारीक चेचलेली वा भरडलेली काळीमिरी, किंचित दालचिनी आणि साखर, किंवा साखर नको असेल तर मध.

विनेगर हे उग्रपणा घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे. मी मटणाला, मोड आलेल्या कडधान्यांना विनेगराच्या पाण्यात हमखास बुडवून ठेवून धुवून घेतो. उग्र, नकोसे वास निघून जातात असा अनुभव आहे.

कोणत्यातरी मध्ययुगीन पाकक्रियेच्या पुस्तकात भारतीय लोक वास घालवण्यासाठी हिंगाच्या पाण्याने मांस, विशेषतः मोठ्या प्राण्यांचे, प्रामुख्याने गोमांस धुत असे वाचल्याचे स्मरते. तपशील आठवत नाही.

मला प्रयोग करायला खूप आवडते. खूपदा प्रयोग गंडतात. पण कधी कधी जमूनही जातात. त्यामुळे तुमचे सूप मुळ्यासाहित नक्कीच करून पाहणार.

एकदम झकास प्रतिसाद!
तुम्ही मसाले जरा जास्तच वापरले आहेत!

त्याऐवजी सूप साधे ठेऊन त्यात खालीपैकी कोणत्याही दोन किंवा तीन किंवा एका वनस्पतीची पाने बारीक कापून भुरभुरावीत -
खुप उपयोगी माहिती! धन्यवादच!

मुळ्याची कोशींबीर ओले खोबरे खवलेले दही मीठ साखर ( थोडी गोडसरच ठेवल्यास) खूप सुंदर लागते , ओल्या खोबरयामुळे मुळ्यचा उग्र वास बहुतेक सर्व जातो , पण मुळ्याची कोशींबीर दही वमुळ्यामुळे पोटाला इतके छान वाटते मला तर पटापट पोळ्या जातात . पोटाला छान वाटते, पचन चांगले होते व पोटात ऊन्हाळ्यात खूप गारेगार वाटते. तसेच काकडीची कोशींबीर , भरपूर दाण्याचे कूट वआयत्यावेळी दही घालून खाल्यावर पोटाला गार पचनाला छान उन्हाळ्यात तब्येतीला छान।

खोबरं नक्की वापरून पाहते.धन्स.

मुळ्याची कोशींबीर ओले खोबरे खवलेले दही मीठ साखर ( थोडी गोडसरच ठेवल्यास) खूप सुंदर लागते , ओल्या खोबरयामुळे मुळ्यचा उग्र वास बहुतेक सर्व जातो , पण मुळ्याची कोशींबीर दही वमुळ्यामुळे पोटाला इतके छान वाटते मला तर पटापट पोळ्या जातात . पोटाला छान वाटते, पचन चांगले होते व पोटात ऊन्हाळ्यात खूप गारेगार वाटते. तसेच काकडीची कोशींबीर , भरपूर दाण्याचे कूट वआयत्यावेळी दही घालून खाल्यावर पोटाला गार पचनाला छान उन्हाळ्यात तब्येतीला छान।

विवेकपटाईत's picture

25 Mar 2023 - 8:29 am | विवेकपटाईत

मस्त रेसिपी. दिल्लीत हिवाळ्यात ठेल्यावर मुळा लिंबू आणि चाट मसाला लावून विकतात. मुळ्याचे पराठे किंवा मुळा गाजर मिक्स पराठे मार्च एप्रिल पर्यंत आमच्या घरात बनतात. मक्याची रोटी आणि सरसोचा साग असेल तर साग वर मुळा किसून टाकतो. बाकी तुरीच्या डाळीत मुळा मस्त लागतो. उत्तर भारतात सॅलड मध्ये ही हिवाळ्यात मुळा हा असतोच. राम लड्डू वर हिरव्या चटणी सोबत मुळ्याचा किस असतो.

उत्तर भारतातील मुळा पराठे खायलाच पाहिजे तर!

तुषार काळभोर's picture

25 Mar 2023 - 1:44 pm | तुषार काळभोर

टोमॅटो, टोमॅटो-गाजर, टोमॅटो-फोडलेलं अंडं अशी सुपे ट्राय केलीत. मसाले थोडे जास्त वाटताहेत, पण कदाचित मुळ्याच्या वास आणि चवीला झाकण्यासाठी गरज असावी.
फिनिश्ड प्रॉडक्ट मात्र एकदम सुंदर दिसतेय.

Bhakti's picture

30 Mar 2023 - 9:37 am | Bhakti

सर्वांना धन्यवाद!