एक धुंद, गुलाबी सकाळ!

Bhakti's picture
Bhakti in भटकंती
22 Jan 2023 - 4:20 pm

खुप दिवसांपासुन ग्रुप ट्रेक करायचा विचार होता.आज जरा योग जुळवून आणला.शहरातच जवळ २० किमी.वरचा छोटासा ट्रेक करायच ठरवलं.नवर्याला म्हटलं उठ पहाटेचे ४.३० वाजलेत.म्हणाला काय गरज आहे थंडीच,८.३०,ला जाऊ.मी म्हटलं "ठीक आहे माझं आवरत १५मिनिटात जाते एकटी"
एकटी शब्द ऐकून स्वारी १० मिनिटांत रेडी आणि चहापण रेडी झाला ..वार बरोबर झाला तर ;)

कुट्ट अंधारच होता.बाईकवर निघालो.उड्डाणपुलाची तिरंगा रंगातील रोषणाई म्हणजे एक आकर्षणाचा विषय आहे हल्ली.त्याचा व्हिडिओ काढत .सगळे जमणार त्या ठिकाणी पोहचलो.जास्तप्रमाणात महाविद्यालयीन युवक होते.विशालदादा आला त्याने सर्वांना शेनुडी ट्रेकची माहिती दिली.अंधार आहे, औरंगाबाद हायवे खुप वाहता आहे काळजी करत ड्राईव्ह करा.२० किमी नंतर एक साथी उभा असेल ,तिथून उजवीकडे वळायचे..ट्रेक इज ओन.

सुचना मिळाल्यावर सगळे पांगले , आपापल्या वाहनातून मार्गस्थ झाले.अर्ध्यातासात डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो.पुन्हा सगळ्यांना एकत्र केलं एका मोठ्या गोलाकारात.पुन्हा सूचना कोण पुढे असणारं हे सांगितलं आणखिन एक महत्त्वाची सूचना मिळाली...गावकर्यांकडून समजलं की काल इथे बिबट्याचा वावर होता.. तेव्हा सर्वांनी जपून! हम्म हसावे का रडावे ही अवस्था क्षणापुरतीच पण.कारण मग सुरू झाला झुम्बा वार्म अप..झुम्बा म्हणजे माझा प्लस पॉइंट :)धमाल केली.

सुरु झाला ट्रेक.अजूनही सूर्योदय झाला नव्हता.
खुप दिवसांनी त्या तारे जमीन पर ईशान सारखं,एकटंच भल्या पहाटे, सगळं जग साखरझोपेत असताना निघाव .सर्वात आधी निसर्गाची किमया हलकासा सूर्योदय ,दवात भिजलेली पान,अलवार भिरभिरणारा गार वारा,तळ्यातले कोवळे रंग टिपावे.. असं जे वाटतं होतं ते घडलं.

वाळलेल्या गवताच्या रांगांमधून चालताना,दोन्ही बाजूंनी हिरव्या गर्भगिरीच्या रांगा,खोल दरीसदृश्य उतार!
मी आणि हे वाटाड्याच्या मागेच सगळ्यात पुढे,हे वेगळे सांगायला नको :)

Q

पूर्व दिशेला त्याच्या पहिल्या दर्शनाची आस ठेवत पुढे पुढे चाललो होतो.गवतात बिबट्या लपला काय असं वाटायचं.हास्यविनोदात पूर्वला भास्कराने दर्शन दिले.सगळ्या जगात सत्य जे आहे तो हा ... त्याचं आकाश..त्याच अस्तित्व!

T

Q

आता संपला डोंगर असं वाटायचं तर समोर आणखिन डोंगर लपला असायचा.एक सुंदर ससा किरमिजी रंगाच जोरात धावताना दिसला.लहान मुलांनी "ससा रे ससा"कविता सुरू केली.आम्हीही लहान होत ताल धरला.

सेल्फी क्लिकाकिक झाल्या.तेवढ्यात एक चिमुकली आली ती म्हणाली बघा मला काय सापडलंय.एक कवटी होती,दादाने सांगितले की ती 'शेळीची असावी'.

R

A

आता ट्रेक एका बाजूने पुर्ण झाला.ओळखीचे,नवे चेहरे दिसले.पूर्व चर्चेनुसार बर्याच जणांनी भेळेचे साहित्य,दुधाची सोय केली होती.पूर्वीपासून कम्पमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्यांनी पुढाकाराने भेळ आणि coffee बनवली.आपपला वेळ निसर्गाच्या सानिध्यात देत ती भेळ काफी अमृतापेक्षा कमी नव्हती.
A

ग्रुप सेल्फी ,ड्रोन फोटो घेतं.एक सुंदर, धुंद, गुलाबी सकाळ अनुभवली.
Q

प्रतिक्रिया

सुखी's picture

22 Jan 2023 - 9:54 pm | सुखी

भारी

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jan 2023 - 12:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटोही सुंदर!!

टर्मीनेटर's picture

23 Jan 2023 - 12:29 pm | टर्मीनेटर

वाह! छान भटकंती 👍
कालच आमचाही (साडे सहा मिपाकरांचा 😀) भाजे लेण्यांचा अचानक एक मिनी ट्रेक झाला. बऱ्याच दिवसांच्या अंतराने डोंगर चढणे झाल्याने आज दुखरे पाय (मांड्या आणि पोटऱ्या) घेऊन कोणीतरी भला मनुष्य त्याचा वृत्तांत लिहील ह्याची वाट बघत बसलो असताना हा धागा वाचायला मिळाला!

Bhakti's picture

23 Jan 2023 - 12:50 pm | Bhakti

काय सांगता, मस्तच! वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

धन्यवाद सुखी, राजेंद्र,संजय.

श्वेता व्यास's picture

23 Jan 2023 - 3:50 pm | श्वेता व्यास

छान झालेला दिसतो ट्रेक :)

Bhakti's picture

23 Jan 2023 - 6:51 pm | Bhakti

होय श्वेता :)
आता एकदा काजवे पहायचा ट्रेक करायचा आहे.

श्वेता व्यास's picture

24 Jan 2023 - 3:24 pm | श्वेता व्यास

शुभेच्छा :)

गोरगावलेकर's picture

24 Jan 2023 - 7:46 am | गोरगावलेकर

आवडला ट्रेक

Bhakti's picture

24 Jan 2023 - 11:17 am | Bhakti

धन्यवाद ताई!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2023 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी.. सकाळची भटकंती भारी. फोटो पण मस्त आलेत. फक्त सकाळी सकाळी भेळ. :/कॉफी. चहा प्राधान्य. पण फिरते राहा आणि लिहिते राहा. पुलेशु.

बाय द वे सकाळी सकाळी अशी एखादी डोंगर गड किल्ले मिपाकरांची भटकंती असेल तर कळवा. येईन म्हणतो. माझ्या गावापासून एक तास लागेल नव्या नगर पुलावर यायला.

-दिलीप बिरुटे

करूया करूया डोंगर गड किल्ले भटकंती!

चित्रगुप्त's picture

24 Jan 2023 - 10:23 am | चित्रगुप्त

पहाटेची भटकंती फार आनंददायक. त्यावेळचे आकाश - फोटो वा चित्रात पकडले तर मिळणार रंग अद्भुत असतात आणि त्या रंगछटा चित्रात नेमक्या उतरवणे हे मोठेच आव्हान असते.
अश्याच फिरत रहा आणि लिहीत रहा. पुलेअशु.
(सध्या 'धुंद गुलाबी सकाळ' तीन वेगवेगळ्या धाग्यांच्या शीर्षकात आहे)

चित्रफित-ड्रोनने खुपचं काम सोपं केलंय.
शेनुडी इन्स्टा
मिपा ट्रेडिंग :)
(सध्या 'धुंद गुलाबी सकाळ' तीन वेगवेगळ्या धाग्यांच्या शीर्षकात आहे)

चित्रगुप्त's picture

24 Jan 2023 - 3:57 pm | चित्रगुप्त

ड्रोन-चित्रफीत खूपच छान आहे. ती इथे चोप्य पस्ते करता येते का?
ड्रोन चित्रिकरणाविषयी काही उपयुक्त माहिती द्यावी ही विनंती. उदा. हे साधन कसे वापरतात, किंमत किती असते, वापरण्याबद्दल काही कायदे वा नियम, अडचणी वगैरे असतात का ? उपकरण सुरक्षित कसे ठेवतात ? काही मोडतोड वगैरे होते का ? वगैरे.
अनेक आभार.

मी नाही, ग्रुप हेडने ड्रोन वापरले आहे.त्यामुळे माहिती सांगता नाही येणार.

प्राची अश्विनी's picture

24 Jan 2023 - 11:26 am | प्राची अश्विनी

वाह! वाचून fresh वाटलं.

प्रचेतस's picture

25 Jan 2023 - 7:00 am | प्रचेतस

छोटेखानी मस्त ट्रेक.

कर्नलतपस्वी's picture

25 Jan 2023 - 12:04 pm | कर्नलतपस्वी

केव्हाही लाभदायक.

गेली तीन वर्षात सकाळचे फिरणे क्वचितच चुकले.

दिसणारा निसर्ग, भेटणारे प्राणी पक्षी आणी येणारे अनुभव अप्रतिम असतात. विचार करतोय काही लिहावे.

तुमचा लेख नेहमीच वाचनीय असतो.

Bhakti's picture

25 Jan 2023 - 6:13 pm | Bhakti

सर्वांना धन्यवाद!