रानडुकराचं मटण

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
8 Jan 2023 - 1:28 pm

काही वर्षापूर्वी डुकराच्या किंवा सशाच्या मटणाची पाककृती हवी असल्याचे वाचलं होतं. तो धागा जरा उशिराच वाचनात आला होता.आणि रानडुकराचं मटण मिळणं म्हणजे मणिकांचन योगच म्हणायला हवा.तेव्हा चोखंदळ मिपाकरांसाठी खास रानडुकराचं मटण.
ज्यांनी आधी चाखलंय त्यांना तेआठवणींमुळे अजून चवदार लागेल.

रानडुक्कर आणि त्याच्या शिकारीविषयी लहानपणापासून खूप ऐकलं आहे,अनुभवलं आहे.श्री बाबा कदम यांच्या पुस्तकातून वाचलेही आहे.लहानपणी बरेच वेळा हे मटण खाण्याचा योग लहानपणी ,आजोळी असताना येत असे.तिथे असताना बरेचदा शिकारीचं मटण खायला मिळत असे.वेगवेगळ्या प्रकारचं आणि चवीचं मटण तेव्हा खाल्लं आहे.कोकणात वानर आणि रानडुकरं यांचा बराच त्रास कोकणातल्या शेतकऱ्यांना होत असतो.रानडुकरांच्या शिकारीवर बंदी आल्या पासूम अशा रानडुकरांना मारायला विशेष परवानगी घ्यावी लागते.

शेतात रानडुकरांच्या धुडगूस सुरू झाला की,शिकारीचे बेत ठरत असे.बऱ्याच प्रकारच्या शिकारीचे मटण मी लहानपणी खाल्लं आहे. हरीण,भेकर,चितळ,लांडोर,ससा,
रानडुक्करअसं सर्व प्रकारचं.त्यावेळी शिकारीला गेलेले लोक उशिरा परतत,तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवलेली असायची.मटण कापून,धुवून,निथळून आधी आधणाच्या पातेल्यावर चाळणीत ठेवून त्याची अतिरिक्त चरबी उतरवली जायची. थंड झाली की ही चरबी सांधेदुखीवर औषध म्हणून वापरली जायची.मग या अर्ध वाफल्या मरटणाला तेल,हळदपूड,भंडारी मसाला,ठेचलेला भरपूर लसूण ,बारीक चिरलेले कांदे,ताजं खवलेलं खोबरं आणि मीठ मिसळून थोडा आराम करायला म्हणजेच मुरायला ठेवलं जाय असे. साधारण अर्ध्या तासाने ते टोपात घालून चूलीवर चढवलं जात असे,थोडा वेळ परतून वाफ यायला लागली की,वर पाण्याची परात ठेवून चुलीतला विस्तव कमी केला जात असे.उरलेली रात्र चुलीमधल्या निखऱ्ययांवर मंद शिजत असे.त्या मटणाची स्मोकी चव अजून जिभेवरून उतरत नाही.

आता मात्र परवानगी घेतल्याशिवाय रानडुक्कर मारता येत नाहीत.पण अजूनही कधी कधी असा शिकारीचा बेत ठरलाच तर हा योग येतो.शिकार झाली की प्रत्येक घरात ,अर्थात मांसाहार करणाऱ्या प्रत्येक घरात याचे वाटे पोचवले जातात.शिवाय पै पाहुण्यांनाही दिल्याशिवाय घास गळ्याखाली उतरत नाही,
म्हणून ते सगळ्यांकडे शक्य होईल तसं पोचवलं जातं. कधी पाणी न घालतावर सांगितलेल्या पद्ध्तीने पूर्ण शिजवून किंवा नुसतं हळद हिंग घालून उकडून,फ्रीजरमध्ये ठेवून हे कवतिक पोचवलं जातं. लहानपणी जवळजवळ प्रत्येक सुट्टीत चाखलेली रानडुकराच्या मटणाची वारंवारिता मोठे झाल्यावर कमी कमी झाली. याआधी तीनदा योग बआला होता,एकदा रत्नागिरीत,एकदा गुहागरला आणि एकदा मुंबईतच मामाकडे गुहागरहून आलेलं मटण खायला मिळालं होतं,पण तिन्ही वेळी पूर्ण शिजवलेलं म्हणे रेडी टू इट असं, डबा उघडताच दरवळलेल्या वासासह फोड तोंडात टाकत येईल असं.

आजोळहून हे मटण बरेचदा येत असे,रात्रभर शिजकेआता हा योग जवळजवळ 1998 नंतर आलाय.माझा भाचा शिरीष याचा फोन आला,"आत्या,डुकराचं मटण आणलं तर चालेल का?"

"अरे,पळेल,तू सुध्दा पळत पळत आलास तरी चालेल."मी खुषीने.

तर शिरीष आणि श्रध्धा,श्रद्धाच्या माहेरच्या गावाहून आलेला , रानडुकराच्या मटणाचा फ्रीजरमध्ये ठेवलेला डबा घेऊन आले आणि तो मी माझ्या फ्रीजरमध्ये ढकलला.त्याना माझ्या घरी यायला जास्ती जास्त दहा मिनिटं लागतात,त्यामुळे त्याचं तपमान फारसं बदलेलं नव्हतं.

पण हे मटण नुसतं हळद,मीठ आणि हिंग घालून शिजवून आलंय.आता हा योग जवळजवळ 1998 नंतर आलाय. तेव्हा आता आज पाककृती मी पूर्ण करतेय.यासाठी माझ्या आजोळी वापरली जाणारी पाककृतीच मी वापरणार आहे.ती निखाऱ्यांवर शिजणारीच, पण आता निखाऱ्यांवर न करता येणारी.पण ती धुराचा स्वाद म्हणजे स्मोकी फ्लेवर हवी असणारी. त्यासाठीआधी गॅसवर करून मग तिला धुरी द्यायला हवी.

शिजवून आणलेलं असल्याने त्याच्या शिजण्याच्या वेळेपर्यंत कांदे खोबरं ,मसाले नि तेल परतलं की मिसळून शिजवायचं की झालं हवं तसं. वर धुरी द्यायची की झालंच हव्या त्या चवीचं.

वि सू:-इतर साहित्य मात्र मटण किती असेल त्यावर अवलंबून असतं.साधारण किलोला दोन कांदे आणि एक कवड नारळाची पुरे. नसले,मीठ ,तेल तुम्हाला हवं तसं.तेलाचा हात जरा कमी धरायचा.पण लक्ष मात्र ठेवा नीट आणि मध्ये मध्ये परतत रहा.खाली लागू देऊ नका.यासाठी जाड बुडाचे आणि नाईलाज असेल तर नॉनस्टिक भांडे वापरा.

(स्टेप बाय स्टेप फोटो नाहीत,फक्त फायनल प्रॉडक्ट्चा फोटो आहे. तर घ्या आस्वाद.

.

प्रतिक्रिया

तुम्ही इमेज पाथ जसा दिला आहे त्यानुसार इथे इमेज लोड होणार नाही.

img src="Image_20230108_131354jpg2.imp" width="600" alt="."

१. हा लोकल पाथ आहे (तुमच्या लॅपटॉप, पीसी अथवा फोनमधल्या फाईलचा)
२. .imp हा फॉरमॅट इमेजचा नसतो जनरली.

मूळ jpg इमेज कुठल्या तरी आंतरजालीय अल्बममध्ये अपलोड करून त्याची लिंक इथे src= च्या पुढे द्यावी.

बाकी बहुतांश प्राण्यांची शिकार आता कायदेशीर नाही. तसा उल्लेख लेखात आलाच आहे.

बाकी पोर्क मटण म्हणजे उत्तमच. कोंकणात लहानपणी (जेव्हा रानडुकराची शिकार बेकायदेशीर नव्हती तेव्हा) अश्या जंगी मेजवान्या घडत असत, त्या आठवल्या.

चौकस२१२'s picture

24 Jan 2023 - 6:33 am | चौकस२१२

बाकी पोर्क म्हणजे उत्तमच.
सहमत... कधी संधी मिळाली तर त्याचे खालील प्रकार पण नक्की खाऊन पहा
१) पोर्क ची ( फक्त पोर्क ची ) सलामी ( चिकन ची सलामी म्हणून भारतात मिळते पण जसे पुरणपोळीहि गुळाची हवी साखरेची म्हणे डाँ नसलेली तसेच सलामी चे आहे / हंगेरियन तिखट / स्पेन चे चोरीझो सॉसेज
२) पुर्याती पद्धितीचे पोर्क क्रकलिंग ( पोर्क त्वचेचे तळेले मुरूम मुरूम पापड जणू )
३) चिनी पद्धतीचे BARBEQ पोर्क

पदार्थ शिफारसीसाठी धन्यवाद. पोर्क सलामी भारतात मिळते. बाकी गोव्यात गेल्यावर गोवन सॉसेजेस मुबलक मिळतात. तीही पोर्कचीच असतात.

इतर पदार्थ बघावे लागतील. परदेश प्रवासात असे अनेक अनामिक पदार्थ ट्राय करतच असतो. मागील युरोप दौऱ्यात पोर्क रिब्जवर ताव मारल्याचे स्मरते.

नूतन सावंत's picture

8 Jan 2023 - 2:54 pm | नूतन सावंत

गुगल फोटोची लिंक दिली होती.

कंजूस's picture

8 Jan 2023 - 3:57 pm | कंजूस

तिन्ही डुकरं (गावठी,रानं,पांढरी परदेशी) खाल्ली जातात पण चवीत फरक असतो का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2023 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, मागच्या वर्षी अजिंठ्याच्या पायथ्याशी असे रानडुक्कराचे योग आले होते पण माझी हिम्मत झाली नाही. मित्र लै भारी, खोब-या सारखं लागतंय वगैरे आणि चखना म्हणूनही उकडलेल्या पीसवर ताव मारत होते. मला मात्र खावे वाटले नाही. रानडुकराचं नाव बदलून दुसरं काही तरी ठेवलं पाहिजे. इतकंच.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

8 Jan 2023 - 4:59 pm | सस्नेह

मटण तर खात नाही. पण मटणाचं आख्यान भारी सांगितलं आहेस.
आवडले.... :)
फोटो दिसत नाही

आंद्रे वडापाव's picture

9 Jan 2023 - 8:29 pm | आंद्रे वडापाव

लेख छान...

पण एक सुचवणी , "मटण" म्हणजे मेंढी चे मांस...
त्यामुळे , "मटण" ऐवजी "मांस" शब्द वापरला असता, तर अजुनच चार चांद लागले असते एव्हडच...