राजगड -फोटोवारी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
31 Dec 2022 - 2:14 pm

नमस्कार मंडळी
डिसेंबरची फुरसत आहे, पण मुलांचे आणि आमचे टाईमटेबल जुळेना, सकाळी हा क्लास, संध्याकाळी तो क्लास असे काय काय. शेवटी आज जाउ, उद्या जाउ करता करता एक दिवस आम्ही म्हातारा-म्हातारी दोघेच जायचे ठरवले आणि सकाळी १०.१५ ला निघालो. बरोबर पोळी भाजीचा डबा आणि भरपुर पाणी असल्याने चिंता नव्हती. गाडी सरळ कात्रज कडे वळवली आणि खेड शिवापुर टोल पार करुन चेलाडी फाट्याला वळलो. बनेश्वर पार करुन साखर,मार्गासनी,केळद,विंझर, मढे घाट असे जुन्या ओळखीचे बोर्ड बघत बघत गुंजवण्यात ११.३० ला पोचलो. गाडी पार्क करुन एक चहा मारला आणि चढाईला सुरुवात केली.
a

a

थोडे वर आलो आणि गडमाथ्याने पहीले दर्शन दिले
a

डावीकडे सुवेळा माचीचे नेढे दिसु लागले

a

मधेच चढाचा रस्ता, कधी उन तर कधी सावली.

a

a

a

a

नेढे अजुन जवळ दिसु लागले

a

किल्लाही जरा जरा टप्प्यात येउ लागला. पण मागच्या वर्षी झालेल्या करोनामुळे दमसास पार गेला असल्याची जाणीवही होत होती. दोघे हाश हुश करत एकमेकांचा हात धरुन चालत होतो.

a

सुर्य तळपु लागला. आणि सरबत, पाणी, काकडी, गोळ्या असे थांबे वाढत गेले.

a

आता उजवीकडे तोरणा दिसु लागला.

a

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला, शाळेतली कविता आठवली.

a

a

a

a

a

a

आता रेलिंगचा टप्पा सुरु झाला
a

वाट तटाला भिडली आणि कारवीचा सुखद गारवा अंगाला झोंबु लागला. सुर्य पलीकडे होता त्यामुळे गार सावली होती.

a

a

शेवटचा कठीण टप्पा रेलिंगला धरुन पार केला आणि चोरदरवाज्यात आलो. उंबर्‍यावर डोके टेकले आणि आत शिरलो.
a

मागे वळुन कुठुन आलोय त्याचा अदमास घेतला.
a

जिना चढुन पद्मावती माचीवर प्रवेश केला आणि एका काकांकडे ताक प्यायलो. थोडे लिंबु सरबत करुन बाटलीत भरुन घेतले.
a

मागे मावळतीकडे तोरणा, बुधला माची,झुंजारमाची असा आडवा पसारा सुंदर दिसत होता.

a

तटावरुन खालचा मुलुख सुरेख दिसत होता.
a

तळ्यात हातपाय धुवुन फ्रेश झालो आणि मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेतले. दुपारचा एक वाजला होता. म्हणजे दिड तासात बरी मजल मारली की.
a

a

मंदिराजवळ कुठे पिठले भाकरी किवा काही मिळे का याची चौकशी केली, पण ती सोय फक्त विकांतालाच होते असे समजले. त्यामुळे घरुन डबा आणल्याबद्दल बायकोची पाठ थोपटली आणि मंदिरातच एका कोपर्‍यात डबे उघडुन जेवलो.
a

थोडा आराम करुन ताजेतवाने झालो. आता दोन पर्याय होते. ईथुनच परत निघायचे किवा बालेकिल्ला नाहितर सुवेळा माची पैकी एक बघुन यायचे. आम्ही बालेकिल्ल्याची निवड केली.
a
राजसदरेवरुन पुढे जाउन एक रस्ता वर बालेकिल्ल्याकडे तर दिसरा डावीकडे खाली सुवेळा माचीकडे जात होता. आम्ही वरची दिशा धरली.

डावीकडे सुवेळा माचीची तटबंदी सुरेख दिसत होती.
a

लवकरच सरळ रस्ता संपला आनि खडी चढण सुरु झाली. या टप्प्यावर रेलिंग आहेत म्हणुन बरे नाहीतर रोपशिवाय जाताच आले नसते.
a

a

माकडे रेलिंगवरुन शिवाशिवीचा खेळ खेळत होती, पण त्यांचे मुख्य लक्ष कोणाकडे काही खायला आहे का याकडेच होते. मात्र ही माकडे त्रासदायक नाहीत, उलट भूकेमुळे आलेली असहायताच त्यांच्या नजरेत दिसते.
a

बालेकिल्ल्याच्या चढणीवरुन मागे दिसणारी पद्मावती माची
a

खड्या पायर्‍यांचा टप्पा
a

बालेकिल्ल्याच्या बुलंद दरवाज्याचे प्रथम दर्शन
a

डावीकडे सुवेळा आणि पाठिमागे दिसणारे भुतोंडे गाव आणि भाटघरचा परीसर
a

बालेकिल्ल्याचा दरवाजा
a

दरवाजातुन समोर दिसणारी सुवेळा माची
a

वरुन दिसणारी पद्मावती माची
a

मागे दिसणारी संजीवनी माची
a

पाली दरवाज्याच्या बाजुची तटबंदी
a

माथ्यावर जाणारा जिना
a

काही अवशेष

a

a

एक स्वच्छ पाण्याचे टाके
a

सर्वात वर राजसदरेवर जाउन डोके टेकले. थोडावेळ आसपासचा नजारा नजरेत साठवला. ३ वाजले होते. वेळेचे भान ठेवुन परतीच्या वाटेला लागलो. ५ पर्यंत खाली गुंजवण्यात पोचलो आणि माहेरच्या आठवणी मनात घोळवत गाडी घराकडे वळवली. (समाप्त)

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Dec 2022 - 2:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

भटकंती विभागात एरर येत असल्याने धागा ईकडे टाकला आहे. सं मं ना विनंती की धागा भटकंती सदरात हलवावा.

गोरगावलेकर's picture

31 Dec 2022 - 3:17 pm | गोरगावलेकर

मस्त भटकंती. भरपूर फोटो आणि त्यात दिसणाऱ्या माची वगैरेची नावासहित ओळख खूप आवडली.

कर्नलतपस्वी's picture

31 Dec 2022 - 6:43 pm | कर्नलतपस्वी

फोटो मस्तच व विचारपूर्वक टाकलेले आहेत.

या वर्षात करोना,डेंगू आणी दोनदा व्हायरल झाल्याने गड किल्ले चढण्यास हिम्मत होत नाही.

नाशिक ला गेलो होतो ब्रह्मगीरी चढू शकलो नाही. कधी अमरनाथ उडीवर चढलो होतो.
वणीला ट्राॅली चालू असल्याने दर्शन झाले.

कालाय तस्मै नमः

Bhakti's picture

31 Dec 2022 - 9:11 pm | Bhakti

छान आहे.

कंजूस's picture

31 Dec 2022 - 9:11 pm | कंजूस

फोटोशॉप चांगलं केलंय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jan 2023 - 2:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

@कंजुसकाका-- फोटोशॉप केले नाहीये कुठेच, फोनवर जसे फोटो आले आहेत, तसेच अपलोड केलेत. काहीही प्रोसेसिंग न करता.

कंजूस's picture

2 Jan 2023 - 6:04 am | कंजूस

एक दिवस आम्ही म्हातारा-म्हातारी दोघेच जायचे ठरवले

आणि फोटोतले तरुणच दिसताहेत!!

चित्रगुप्त's picture

1 Jan 2023 - 8:47 pm | चित्रगुप्त

खूप छान. फोटोंमधली विविधता विशेषत्वाने आवडली.
मी एकूण दोनदाच राजगडावर गेलेलो आहे. पहिल्यांदा वयाच्या पंचविसाव्या वर्षी आणि नंतर सत्तराव्या. दोन्ही वेळच्या सफरींची आठवण ताजी झाली.
(अवांतरः फोटो इथे डकवण्यापूर्वी हल्ली कुठे चढवणे योग्य असते ? माझे पूर्वीचे फ्लिकर वगैरेवरून इथे डकवलेले फोटो आता मिपावर दिसेनासे झालेले आहेत)

फ्लिकर वगैरेवरून इथे डकवलेले फोटो दिसत नाहीयेत

कारण 'फ्लिकर' photo sharing site SmugMug या कंपनीने घेतल्यावर त्यांचे अगोदरचे अनलिमिटेड हाई रेंज. फोटो, शेअरिंग यांचे नियम बदलून टाकले आहेत. म्हणजे ते फ्री अकाउंटला नाही,तर पेड अकाउंटला चालू आहेत.

२)फोटो इथे डकवण्यापूर्वी हल्ली कुठे चढवणे योग्य असते ??

दोनतीन पर्याय आहेत.
१)गूगल फोटोज
२)गूगल ड्राईव
३)postimages
4)imgbb
5) Facebook
6)Imgur
7)Dropbox

प्रत्येकाचे नियम,अटी आणि फायदे तोटे आहेत. फक्त स्टोरेजसाठी all media - mediafire 15 gb free.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2023 - 11:01 am | राजेंद्र मेहेंदळे

कारण फोनवर अ‍ॅप असल्याने त्यावर काढलेले फोटो जास्त खटपट न करता सरळ अपलोड करता येतात.

जाहिरात-- काही वर्षापुर्वी गूगल फोटोज वापरुन लिहिलेला धागा(फोटो अजुनही नीट दिसतायेत)

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2023 - 11:01 am | राजेंद्र मेहेंदळे

कारण फोनवर अ‍ॅप असल्याने त्यावर काढलेले फोटो जास्त खटपट न करता सरळ अपलोड करता येतात.

जाहिरात-- काही वर्षापुर्वी गूगल फोटोज वापरुन लिहिलेला धागा(फोटो अजुनही नीट दिसतायेत)

पन्हाळगड -विशाळगड एका दिवसात?

प्रचेतस's picture

2 Jan 2023 - 9:23 am | प्रचेतस

लेखन आणि फोटो एकदम मस्त. राजगड पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहेच.

श्वेता२४'s picture

2 Jan 2023 - 10:51 am | श्वेता२४

राजगड ला जायचं आहे. फोटो खूपच सुंदर आले आहेत. वर्णनही सुरेख.

फोटो व लेखन सोबत असल्याने स्वत गेल्याचा फील आला

टर्मीनेटर's picture

9 Jan 2023 - 2:07 am | टर्मीनेटर

राजगड -फोटोवारी आवडली 👍
सगळे फोटोज मस्त आहेत!