मागच्या काही काळापासून काही सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतातील उजव्या गटांकडून / हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडून होताना दिसते.
हिंदुत्ववादी सामान्य नागरिक, समर्थक, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री इ. अशा सिनेमांविरोधात बहिष्कारचे आवाहन करताना दिसून येतात.
सध्या अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पक्षाची सरकारे आहेत. असे असतानात असे केवळ बहिष्काराचे आवाहन तार्किक आहे का?
दोन पर्याय आहेत -
पर्याय १:
केंद्रीय सेन्सर बोर्डाद्वारे परवानगी देऊन कायदेशीर रीतीने सिनेमा प्रदर्शित होऊ देणे पण, "लोकहो हा सिनेमा थिएटर उपलब्ध आहे पण तुम्ही तो पाहायला जाऊ नका बरं का" असे म्हणत राहणे आणि लोक ते ऐकतील अशी अपेक्षा करणे.
पर्याय २:
स्वतःच्या सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सेन्सर बोर्डाद्वारे त्या विशिष्ट सिनेमाला प्रदर्शित करण्याची परवानगी न देणे. जेणेकरून लोकांना तो सिनेमा पाहण्याची / न पाहण्याची संधीच मिळु न देणे.
वरीलपैकी कोणता पर्याय जास्त तार्किक, प्रभावी आणि व्यवहारिक ठरेल? तुम्हाला काय वाटतं?
---
तुलनेसाठी साठी संदर्भ:
१९८८ मध्ये, तत्कालीन हिंदुत्ववादी नसलेल्या सरकारने सलमान रश्दींच्या "सैतानाची वचने" या पुस्तकावर बंदी घातली होती. तसे करणारा भारत हा पहिलाच देश होता.
त्या विचारसरणीच्या लोकांनी, "लोकहो, पुस्तक बाजार उपलब्ध आहे पण तुम्ही ते पुस्तक वाचू नका बरं का" असा आवाहन करण्याच्या प्रयत्न केला नाही; पुस्तक बाजारात उपलब्ध होण्यावरच बंदी घातली. परिणामी ते पुस्तक बाजारात आलेच नाही आणि लोक ते पुस्तक वाचूच शिकले नाही.
---
इथे, एखाद्या सिनेमावर बहिष्कार घालावा किंवा बंदी घालावी किंवा घालू नये ही चर्चा अपेक्षित नाही.
एखादा सिनेमा काही कारणांमुळे लोकांपर्यंत पोहचू देऊ नये असे वाटत असेल तर वरील दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय जास्त तार्किक, व्यावहारीक आणि प्रभावी ठरेल यावर मत अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
17 Dec 2022 - 7:51 am | श्रीगुरुजी
एका विशिष्ट चित्रपटावर बहिकार करा असे सांगणारे फक्त हिंदुत्ववादी नाहीत. हर हर महादेव, वेडात दौडले वीर मराठे सात या चित्रपटांवर बहिष्कार करा असे सांगणारे हिंदुत्ववादी आहेत का? त्यांनी तर चित्रपट दाखवू नये यासाठी दमदाटी, मारहाण, चित्रपट बंद पाडणे, तोडफोड हे सुद्धा केले आहे.
आपण बिनडोक रिकामटेकड्यांची टोळी घेऊन आपल्याला पाहिजे ती गुंडगिरी करू आणि सर्वसामान्य जनता, पोलिस, सरकार व न्यायव्यवस्था आपला केसही वाकडा करू शकते नाही हा यांना आत्मविश्वास आहे व तो आत्मविश्वास अनुभवातून आला आहे.
17 Dec 2022 - 8:31 am | कुमार१
हे प्रश्नाचे उत्तर मला योग्य वाटते.
17 Dec 2022 - 9:29 am | धर्मराजमुटके
मी पहिला पर्याय निवडीन. दुसर्या पर्यायात सरकार विरुद्ध दडपशाहीचा /दमनशाहीचा आरोप करायला वाव मिळतो.
पहिल्या पर्यायात लोकशाहीत लोकांच्या भावनांचा कल तपासणे, समर्थक व विरोधक या दोन्ही बाजूंची वैचारिक पातळी तपासणॅ (अर्थात अशा बाबतींमधे ती रसातळाला गेलेलीच दिसली आहे म्हणा ) हे शक्य होते.
मी वैयक्तिक रित्या कोणत्याही प्रकारच्या बहिष्काराच्या आवाहनांचा निषेध करतो मात्र बहिष्काराची मागणी करणार्यांच्या हक्कांचा आदर करतो.
बहिष्कार अंमलात आणण्याच्या हिंसक आणि चुकीच्या पर्यायांचा निषेध करतो.
१००% सहमत. याला राजकीय पाठबळ असते आणि हा आत्मविश्वास त्यातूनच येतो. यात डावे / उजवे भेदभाव करण्यास फारसा वाव नाही.
17 Dec 2022 - 10:09 am | कर्नलतपस्वी
यात डावे उजवे... असे काही नाही. सारेच संधी साधू. देश ,देशाची संपत्ती आणी सामान्य जनता जाये भाXX
17 Dec 2022 - 6:59 pm | सुबोध खरे
किती मुसलमानांनी "काश्मीर फाइल्स " सिनेमा पाहिला याची सांख्यिकी उपलब्ध झाली तर ती पाहणे मनोरंजक ठरेल.
त्याच न्यायाने किती हिंदूंनी पठाण सिनेमा पाहायाला हवा/ त्यावर बंदी आणावी हेही माहिती करणे उद्बोधक ठरेल.
हा एक मनोवृत्तीतील फरक आहे असे माझे मत आहे.
17 Dec 2022 - 11:06 pm | कपिलमुनी
भगवी बिकिनी घातल्याने म्हणे हिंदू धर्माचा अपमान होतो ..
या कारणामुळे बॉयकॉट करा म्हणत आहेत .
चांगला पिक्चर असेल तर तो चालतोच.. बॉयकॉट वाल्यांना कोणी भीक घालत नाहीत
17 Dec 2022 - 11:49 pm | शानबा५१२
आपण एवढे निरीक्षण केलेत? पण मी,
मला शाहरुखानची बॉडी अशी कशाने झाली एवढाच प्रश्न पडला. गांजा व ड्रग्स कुठेच चालायाला नको अस पण वाटल आणि नंतर बातम्या आठवल्या.
बिकीनी वगैरे मी बघणार ह्या! बिल्कुल नाही मी पिवळी, हीरवी बिकीनी बघितली आणि नंतर हे शाहरुख ..वाले आले.
बिकीनी वगैरे घाण पोषाख आहेत, चांगले पोषाख घायायला तस असाव लागतय! मग बघायला मजा येतेय रंगात काय ठेवलय, कपड्याचे असो वा माणसाचे?
आता सलमान खान, अर्बाज खान, मलायका अरोरा, सिदार्ध्द कपुर् व करन जोहर ते सर्व वेगळे! आणि हे पण.
ह्या अभिनेत्यां/त्रींचे चारीत्र्य काय आहे? चारीत्र्य?
17 Dec 2022 - 11:28 pm | शानबा५१२
लेखकाने व प्रतिसादांत ऊल्लेख केलेल्या, लिहलेल्या सर्वांना पचासपेक्षा जास्त पगड्या आहेत. म्हणुन काहीही चाललंय. मी कधीच टी.व्ही बघत नाही, खराब रॅडीएशन, थिएटर म्हणजे अजुन खराब रॅडीएशन हे रॅडीएशन बंद करा, चित्रपटाचा विषय माझ्यासाठी लांबची गोष्ट आहे. कोणीही हे बंद केले व मला खात्री पटली तर मी स्व:ता येउन पाया पडेन, पण पहीले करुन दाखवा. ५जी येऊन देऊ नका.
हे लोक रॅडीएशन्स नाही बंद करु शकत, मला माहीतीतेय, मी पाया पडायचा प्रश्नच नाही. मग कमीत कमी आयुर्वेदाचा प्रचार करा ते लोकांच्या हीताचे काम आहे, मी जमेल तेवढे स्वःता करतो. ह्यां सर्वांमधल दुसर कोण करतय का मला पाहीजे तस? नाही.