खुप चांगले मिपा सदस्य असे अकाली का सोडुन गेले?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in काथ्याकूट
7 Dec 2022 - 9:43 pm
गाभा: 

नमस्कार,
मी शानबा५१२, माझा सदस्यकाळ १२ वर्ष १० महीने. हे संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट हा पर्यायी शब्द मला ईधेच समजला व हे संकेतस्थळ एवढे वेगळे का आहे हे अजुन नाही समजले. ह्या संकेतस्थळावरचे सर्वात पहीले व कदाचित ते संपादक होते, मला पुर्ण कल्पना नाही ते 'विसोबा खेचर' अकाली मृत्युने मिपाने गमवले. त्यानंतर काही दीवसांपुर्वी वाचले 'आझम-ए-बोका' हे वारुन ४ वर्षे झाली. त्या आधी ईतर सदस्यांच्या मृत्युंबद्दल वाचले होते, ते एका मोठ्या (ट्रेन) ईन्जिंअरींग संबधित कंपनीबरोबर काम करत होते. त्यांचाही अकाली मृत्यु झाला.
ही फक्त तीन उदाहरणे आहेत, अजुन कीतीतरी सदस्यांची नावे आठवत आहेत. ते सदस्यसुध्दा आता ईथे नसतात. एका सदस्यांच्या लेटरमुळे मला मुंबईच्या एका नामाकींत कॉलेजमध्ये नोकरी मिळाली होती, कॉन्ट्राक्टवरती. मला पगार दीला गेला नाही. मी सोडुन दीले. ते सदस्य 'गोल्डन ४० ऑफ ईंडिया' ((आता मला भेटत नाहिये सर्चमध्ये) अशा काहीश्या बक्षिसाने सम्मानित झाले. ते 'बहुगुणी'.
ईथे मी ह्या अगोदर नावे बदलुन खुप व्ययक्तिक लिहले आहे. कोरोनमधली माझी फसवणुक मी नवीन जागी असल्याने, एकटा असल्याने झाली, पण तरीही :-) काम पुर्ण केले. ते असो.
चांगले कर्म स्वर्गात जावो ही देवादेवीला प्रार्थना! ह्या चांगल्या संकेतस्थंळाला खुप खुप शुभेच्छा!

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

7 Dec 2022 - 9:49 pm | शानबा५१२

ईथे मी ह्या अगोदर नावे बदलुन खुप व्ययक्तिक लिहले आहे.

- लेखातली नावे बदलुन माझे सदस्यनाव अजुन तेच आहे. आणि 'निलकांत' हे सदस्यनाव जे 'तात्या' बोलायचे ते आता नाही आहे कीत्येक दीवसांपासुन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2022 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आणि 'निलकांत' हे सदस्यनाव जे 'तात्या' बोलायचे ते आता नाही आहे कीत्येक दीवसांपासुन!

निलकांत हे मिपा मालक चालक पालक आणि सबकुछ आहेत ते अजुनही आहेत. जवाबदारीची नौकरी आहे, व्यस्त असूनही त्यांचं मिपावर लक्ष असतं. अधुन-मधुन मिपावर येत असतात.

निलकांत शेठ, वरील आयडीने काय लिहिलय बघा. नोंद घ्यावी. =))

-दिलीप बिरुटे

-

कंजूस's picture

9 Dec 2022 - 5:06 pm | कंजूस

नीलकांत ज्यांचा उल्लेख 'तात्या' असा करायचे ते तात्या हल्ली दिसत नाहीत असे म्हटले आहे.

मला तेच बोलायचे होते जे डॉ. बिरुटे समजले, मी कदाचित लिहण्यात गोंधळलो.

उपयोजक's picture

12 Dec 2022 - 9:49 pm | उपयोजक

'व्यग्र'. व्यस्त म्हणजे उलटा

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2022 - 9:01 am | ज्ञानोबाचे पैजार

नमस्कार,
मी ज्ञानोबाचे पैजार, माझा सदस्यकाळ १४ वर्ष १ महीना ३ दिवस १५ तास २५ मिनिटे आणि २७.४५६७४८९८७४८७६२७८७६२ सेकंद. चपला घाला म्हणजे चालते व्हा हा पर्यायी शब्द मला ईथेच समजला व हे संकेतस्थळ एवढे वेगळे का आहे हे लगेच समजले. ह्या संकेतस्थळावर, मला पुर्ण कल्पना नाही, पण अनेक डु आयडींना अकाली हौतात्म्य मिळाले आहे यात मिपाने काय गमवले ते ही मला माहित नाही. त्यानंतर काही दीवसांपुर्वी वाचले इथल्या एका स्वयंघोषीत, स्वयंप्रकाशित आध्यात्मिक गुरुवर्यांना चपला घालून ४ वर्षे झाली. त्या आधी ईतर काही डु आयडींच्या अकाली मृत्युंबद्दल वाचले होते, ते आरोग्य सेवेत एका मोठ्या जबाबदारीचे काम करत होते. त्यांनी तर किती वेळा चपला घातल्या होत्या याची गणतीच नसेल.
ही फक्त उदाहरणे आहेत, अजुन कीतीतरी डु आयडींची नावे आठवत आहेत. ते आयडी सुध्दा हकालपट्टी झाली तरी लोचट पणे इथे वारंवार नवे डु आयडी घेउन येत असतात किंवा वामा राहुन जालावर इतर ठिकाणी मिपा आणि मिपाकरांवर तोंडसुख घेत असतात . मला माझी नोकरी मात्र कोणाच्या शिफारसी ने मिळाली नाही, पण एका मिपा सदस्याला मात्र मी जांभुळगाव बुद्रुक येथील एका जगप्रसिध्द विश्वविद्यालयात सिक्युरीटी गार्डना तंबाखु मळुन देण्याची ड्युटी लावली होती. त्या सदस्याने नोकरीच्या काळात चुन्याच्या अनेक पुड्या लंपास केल्या, इतक्या की त्या विश्वविद्यालयाला प्राध्यापकांचे पगार करायला जागतिक बँकेकडे कर्ज मागावे लागले. "मल्या ऑफ जांभुळगाव बुद्रुक" ((आता मला भेटत नाहिये सर्चमध्ये) अशा काहीश्या बक्षिसाने सम्मानित झाले होते ते सदस्स्स्स्स्स्य.
ईथे मी ह्या अगोदर लै म्हणजे लैच विडंबने लिहिली आहेत पूर्वी मी सदस्यांच्या नावांची ही तोडफोड करायचो त्याने एक सदस्य लैच दुखावले गेले मग मात्र नावांची तोडफोड करणे थांबवले. कोरोना काळात मी २४ तास घरात डांबला गेलो असल्याने माझे वजन १२,४३४.४७५७९८७९४७६५२७३४९२७६३३०८५६३ ग्रॅमने वाढले, पण तरीही :-) मी वचावचा खाणे काही सोडले नाही. ते असो.
चांगले खाणे पोटात जावो ही देवादेवीला प्रार्थना! ह्या चांगल्या संकेतस्थंळाला खुप खुप शुभेच्छा!
पैजारबुवा,

शानबा५१२'s picture

8 Dec 2022 - 9:31 am | शानबा५१२

कुणाला दगड मारलेलात माहीती नाही पण मलाच लागला. :-) खरोखर सिरीयसली लिहलेले साहेब!

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2022 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

वर्गात मित्रांना कागदाचे बोळे करुन मारताना सुध्दा आमचे हात थरथरायचे, त्या हाताने दगड उचलणे होणारच नाही. आम्ही सुध्दा मोकळे झालो इतकेच.
पैजारबुवा,

ते गेल्याने मिपा ला शष्प (हा पर्यायी शब्द मला ईथेच समजला) फरक पडत नाही म्हणून.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 8:25 pm | श्रीगुरुजी

जे निर्वतले त्यातील काही जण वृद्धापकाळाने गेले, काही जण तरूण वयात गंभीर आजाराने गेले, काही जण तरूण वयात व्यसनामुळे गेले, तर काही जण काही वैयक्तिक कारणांमुळे अकाली गेले.

मिपा सोडून गेलेले बहुसंख्य सदस्य अजून हयात आहेत. कदाचित कंटाळा आल्याने किंवा ट्रोलिंग सहन न झाल्याने किंवा काहींना बंदी घातल्याने किंवा काही वैयक्तिक कारणाने ते आता मिपावर नसतात.

शानबा५१२'s picture

8 Dec 2022 - 9:25 pm | शानबा५१२

खर म्हणजे तुम्ही माझ्या ह्या लेखाचा खरा उद्देश व अर्थ समजालात. खुप वर्षांनी आपण बोलत आहोत. मी खुप सिरीयसली लिहले आहे. मिपा थोर तुझे उपकार, सर्वांना तुझी सोबत सारखी असु दे.

चौथा कोनाडा's picture

8 Dec 2022 - 10:20 pm | चौथा कोनाडा

यकुंनी आत्महत्या करून अचानक एक्झीट घेतली हे आठवलं.
,,(चू भु दे घे)

मुक्त विहारि's picture

8 Dec 2022 - 10:47 pm | मुक्त विहारि

तात्या अभ्यंकर

यशवंत कुलकर्णी

बोका ए आझम

चौकट राजा

गजानन कागलकर

वरूण मोहिते

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 11:09 pm | श्रीगुरुजी

अकु म्हणून एक सदस्य होते ना जे अंदाजे २ वर्षांपूर्वी गेले.

सौंदाळा's picture

9 Dec 2022 - 11:16 am | सौंदाळा

हो
अविनाश कुलकर्णी
भोचक
श्रावण मोडक
सक्रीय सदस्यांच्या मृत्युनंतर समजले तरी पण बरेच वाचनमात्र, कधी कधीच लॉगिन करणारे सदस्य पण गेले असतील त्याची काही माहिती नाही.

मिसळपावमधे खेळीमेळीचे, एकमेकांची फिरकी घेण्याचे, तिखट (वैयक्तीक किंवा अश्लील नाही) प्रतिसाद देण्याचे प्रमाण खूप होते. त्यामुळे वातावरण घरगुती वाटायचे. आता एकदम औपचारीक वाटते. काही जुने सदस्य अजून पण खोड्या करतात पण असे खूपच कमी सदस्य आहेत. त्यामुळे मिसळीतली तर्री कमी झालीय असे वाटते.

शानबा५१२'s picture

9 Dec 2022 - 5:08 pm | शानबा५१२

ही नावे वाचुन खरच धक्का बसला.ईतक्या सुशिक्षित व माहीतीगार लोकांना अकाली मृत्यु यावा ह्याचे आश्चर्य वाटतं.

विंजिनेर's picture

10 Dec 2022 - 11:50 pm | विंजिनेर

अत्यंत आचरट प्रतिसाद आहे हा!
फक्त अशिक्षित आणि माहिती नसलेल्या लोकांनाच अकाली मृत्यु येतो असं म्हणायचंय का?

लेखाबद्दल तर क्या कहने! लेखकाचा सामूहिक श्रद्धांजली वाहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे का किती सदस्य अजून जिवंत आहेत ह्याचा हिशोब मांडणं चालू आहे?

वाह्यात लेकाचे!

फक्त अशिक्षित आणि माहिती नसलेल्या लोकांनाच अकाली मृत्यु येतो असं म्हणायचंय का?

+१

शानबा५१२'s picture

11 Dec 2022 - 9:50 am | शानबा५१२

लेखाचा आशय काय समजुन घ्या!
मी एक खुप लाजरा व्यक्ती आहे, लाज विकुन खाल्ली तर खरच फायद्यात येईन पण ईतर खुपजणांनी ती कधीच विकुन खाल्लेय अस काही वेळा निर्दशनास येत हेसुध्दा खरे आहे.
नमस्कार (?).

शानबा५१२'s picture

9 Dec 2022 - 5:13 pm | शानबा५१२

मला ह्यातले पहीले व शेवटचे नाव आहे, त्यांबद्दल ताबडतोब कळले होते. जर मि चुकत नसेन तर हे मोहीते होते ट्रेन रीलेटेड इंजिअरींग कंपनीत.
ही नावे वाचुन खरच धक्का बसला.ईतक्या सुशिक्षित व माहीतीगार लोकांना अकाली मृत्यु यावा ह्याचे आश्चर्य वाटतं.

ईतक्या सुशिक्षित व माहीतीगार लोकांना अकाली मृत्यु यावा ह्याचे आश्चर्य वाटतं. - मला ह्या वाक्याचा नक्की अर्थ समजला नाही. सुशिक्षित व माहितगार लोकांना अकाली मृत्यू येत नसतो का ?

सौन्दर्य's picture

8 Dec 2022 - 11:52 pm | सौन्दर्य

मी हाय बा आजून हिथच. रोजरोज नाय येत, पन येळ गावला की येतो न वाचतो.

श्वेता व्यास's picture

9 Dec 2022 - 11:22 am | श्वेता व्यास

चांगले लेखक कदाचित त्यांच्या वैयक्तिक कार्यबाहुल्यामुळे आता लिहायचे बंद झाले आहेत, कमतरता नक्कीच जाणवते.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2022 - 12:01 pm | प्रकाश घाटपांडे

मी प्रकाश घाटपांडे
15 years 3 months
बिल्ला क्रं 27
मिपावर आयुष्याचा बराच काळ सुखाचा गेला. पारदर्शकता बाळगली. पारदर्शकतेचे भय वाटले नाही. कटु अनुभव अगदी एखादा. पण चिलखत घातले की अडचण येत नाही. आपल क्वाश्चुम आपणच डिझाईन कराव. काळानुसार आपल्यात फरक पडतच असतो. कालसुसंगत राहाव . हल्ली इथे लिहिण्याचा उत्साह वाटत नाही. उत्साह तरी किती टिकणार ना? सर्व विचार ऐकावे व आपल्याला झेपेल ते करावे. ते च करतो सध्या.

तर मागे पडले आहेत आणि मिपा फार पुढे गेलं म्हणायचं.

हे जरा सकारात्मक आहे :)
आमच्याकडे म्हणतात ज्याचा जेवढा शेर(गुंतवणूक)तो तेवढच घेऊन जातो.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2022 - 4:42 pm | प्रसाद गोडबोले

हे बघा ,
जो जन्माला आला तो कधी ना कधी मरणारच , त्यात कसले सुख दु:ख मानायचे ? ग्रीफ हॅज नो इव्होल्युशनरी पर्पज !

ह्यापेक्षा खरा जास्त महत्वाचा प्रश्न म्हणजे : चांगले मिपाकर लेखक अकाली मिपा सोडून का गेले ? हा आहे ! त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते पण प्रतिसाद ऊडवल्या जाण्याचा दहशतीमुळे सविस्तर लिहिणे टाळत आहे. बाकी उत्तराची जवळपास सर्वांनाच थोडीबहुत कल्पना आहे !

पण सीरीयसली, अगदी जवळचे मित्र झालेले काही मिपाकर जेंव्हा ओफलाईन भेटतात तेव्हा आधीचे जुने लेखन , तिथे झलेल्या गमजा , हे सर्व नॉस्टेलिजिक करुन जाते !
त्यांच्याशी बोलताना जाणवतं की आजही ह्यांच्याकडे कसला क्लासिक कंटेंट आहे लिहिण्यासाठी !
पण आता काही मोजके अफवाद वगळता कोणाला इथे फिरकायची इच्छाही होत नाही , रादर "तु अजुनही मिपावर जाऊन येतोस ?! " हे कुत्सितपणे हसुन माझीच मस्करी केली जाते =))))

असो.

शानबा५१२'s picture

10 Dec 2022 - 5:23 pm | शानबा५१२

आजही चांगले ली़खाण होत आहे पहिल्यासारखे नाही पण काही धागे छान असतात. अकाली मृत्युने गेलेले मिपाकर लेखक म्हणुन खुप अव्वल होते.यकु ह्या सदस्यनावाने आत्महत्या करावी हे माझ्यासाठी खुपच धक्कादायक आहे. त्यांनी मला आपुलकीने लिहलेल्या खरड आजही माझ्या खरडवहीत पहिल्या पानावर आहेत.
पण मला आजही आठवते असे जे सदस्य होते जे बोलण्यात खुपच तिरकट होते, त्यांचे बोलणे सर्वांनाच लागायचे, राग आणायचे असे सदस्य ईथुन काढुन टाकले गेलेत तेही बरेच आहे. मिपा व्यवस्थापनाने हे चांगल्यारीत्या हाताळले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2022 - 7:01 pm | प्रसाद गोडबोले

अज्ञानात सुख असतं हेच खरे :)

शानबा५१२'s picture

10 Dec 2022 - 7:37 pm | शानबा५१२

Ignorance is a bliss!

स्त्रोतः https://www.merriam-webster.com/dictionary/ignorance%20is%20bliss ईथे खुप चांगली व्याख्या दीली आहे.

पण ही गोष्ट ना अज्ञान आहे ना दुर्लक्ष करण्यासारखी, जग तर नीच आहेच पण एवढी चांगली माणसं अकाली का गेली हे मला कळल तर मी त्या चुका नाही करणार. म्हणुन हा त्रागा/त्रास लिहण्याचा.

Like many people want, I want long life.

आनन्दा's picture

11 Dec 2022 - 8:56 am | आनन्दा

शुभेच्छा!!

तिथे हजारोंनी टिच्चून पाडलेल्या प्रतिसादातून अनेक नावांची उजळणी झाली...
काही गुप्त झाले, काही लुप्त. काहींची दमछाक झाली तर काहींचा उत्साह मावळला.
नाविन्य संपले म्हणून कि काय खाद्यपदार्थाच्या नावाने सुरू संस्थळावर आता खाऊ-पिऊचे धागे तुरळक दिसतात. संगीताची, काव्याची आवड असलेले आपला आब राखून आहेत. पर्यटन स्थळे, गड किल्ले, याना बरा प्रतिसाद मिळतो.
बदलत्या काळानुसार संपादक मंडळात नवीन मंडळींच्या कलेचे आविष्कार, नवी सदरे यातून जाणवतात.
हजारोंनी सदस्य असून काही ठराविक सदस्य चर्चा व मतप्रदर्शन करायला उतरतात.
मराठीतील इतर संस्थळापेक्षा इथला वावर मला मनमोकळा वाटतो.

कर्नलतपस्वी's picture

15 Dec 2022 - 9:31 am | कर्नलतपस्वी

सर, तुमचे निरीक्षण बरोबर वाटते. कालमानानुसार समाजात होणाऱ्या बदला॔चा नियम इथे पण लागू पडतो.

पंधरा वर्ष खुप मोठा कालावधी आहे. जुने लिखाण चांगले आता गुणवत्ता घसरली असा सुर ऐकू येणे यात काही नवल नाही.

कुमार१,प्रचेतस,संजोपराव सारखे लंबी रेस वाले आजही वाचकांना अकर्षीत करतात.

संकेतस्थळामधे सुद्धा काही बदल हवेत जेणेकरून जुन्या,नव्या सदस्यांना टोकाला येणार नाही व दर्जेदार साहित्य वाचायला मिळेल.

कवीते कडे वाचक खुप कमी लक्ष देतात. पाककला दालनात आता खमंग वास कधीतरीच येतो. कलादालन तर बहुतेक बंदच आहे. अनिकेत कवठेकर यांचे दमदार, कसदार तंत्रज्ञानावरील लेख सुद्धा कधीतरीच, शेअर्स मार्केटवर लिखाण पण जवळपास बंदच झालयं.

लेखकांनी सुद्धा या गोष्टीवर विचार केला पाहीजे.

मिपा एक खरोखरच दर्जेदार संकेतस्थळ आहे ते तसेच रहावे या साठी प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहीजे.

मी वयोमानानुसार मिपावर बाल्यावस्थेत पण प्रेमापोटी माझे मत लिहीत आहे.

कर्नलतपस्वी's picture

15 Dec 2022 - 9:43 am | कर्नलतपस्वी

सर्वांचा नामनिर्देश करणे शक्य नाही.

सर टोबी's picture

15 Dec 2022 - 11:18 am | सर टोबी

हे मिपावरील चर्चेत एक परवलिचे वाक्य बनले आहे. बहुदा मुळ मालकांचा “चपला घालून चालू पडा“ याचा पगडा अजून टिकून असावा. त्यामुळे, सदस्यांमध्ये एक प्रकारची ऊपक्रुत असल्याची भावना असते की काय अशी शंका येते. अजून एक परवलीचे वाक्य म्हणजे “मिपा ने मला भरभरून दिले“. बहुदा असे म्हटले नाही तर सदस्यत्व खंडीत होते किंवा आपण सामान्य सदस्य आहोत असे दिसते असा समज होत असावा.

सध्या ईतपतंच. नंतर काही आठवले की भर घालीनच.

उपाशी बोका's picture

25 Dec 2022 - 10:45 am | उपाशी बोका

मी उपाशी बोका.
बिल्ला क्रमांक ७ (आधीचे ६ तात्याकडे होते, म्हणजे मी पहिल्या दिवसापासूनच सदस्य).
मिपावर फारसा लिहीत नाही, पण वाचनमात्र असतो.
हॉटेलात सर्व प्रकारचे लोक येतात, वेगवेगळ्या गप्पा होतात. जुन्या सदस्यांची आठवण येतेच, पण जग आणि आपण स्वतः पण पुढे जातच असतो. या प्रवासात चांगले काय ते घ्यायचे, चांगले ते द्यायचे. बस्स, अजून काही अपेक्षा नाही.

चित्रगुप्त's picture

25 Dec 2022 - 1:37 pm | चित्रगुप्त

कधीकाळी मिपावर खूप उत्साहाने, झपाटून लिखाण केले, प्रतिसादांच्या फैरी झाडल्या ... बॅटमॅन, चौकटराजा वगैरेंबरोबर प्रतिसादांची धमाल केली, विंग कमांडरांचा 'नाडी' वर एकादा लेख, किंवा संक्षिंचा कोणताही नवीन लेख आला की प्रतिसादांचा खच पडायचा.... पण आता ते सगळे निवळल्यासारखे झालेले वाटते. त्या काळी लिहायला बसले की झरझरा कसे सुचत जायचे, एकाहून एक अद्भुत कल्पना मनात कशाकाय येत जायच्या, याचे आता नवल वाटते.
नवनवीन लेखक उत्तम लेखन करत असले तरी जुन्यांची उणीव जाणवत रहाते. रेवती, पैसा, यशोधरा, चित्रा आणि अन्य अनेक 'मिपाबायका' कुठे गायबल्यात कुणास ठाऊक.
तरीपण आपण लेखन करत आणि प्रतिसाद देत रहायला हवे, हे जाणवते.