गाभा:
मी न्यू यॉर्क राज्यातल्या बफैलो शहरात राहतो. इथे बहुतेक अमेरिकन लोकांमध्ये स्वाईन फ्लू बद्दल भिती जाणवली. आमच्या क्लायंट ने कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर १० दिवसांची बंदी घातली आहे. त्या मानाने भारतीय लोकांमध्ये तेवढी भीती वा उत्सुकता जाणवली नाही.
भारतात या रोगाबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
प्रतिक्रिया
4 May 2009 - 6:39 am | दवबिन्दु
आमी लोक डुकराच खात नाई. आनी मुस्सलमान बी खात नाईत. किरीस्ताव खातात. वसईकड ते लोकच डुकर पालतात बी. तेंच ते पाहुन घेतील.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
4 May 2009 - 7:19 am | सहज
दवबिन्दुसाहेब बहुतेक आपल्याला माहीती असेल तरीही लिहतो की डुकर न खाणे किंवा न पाळणे इतके पुरेसे नाही. हा (Influenza A - H1N1) संसर्गजन्य रोग आहे. मेक्सिकोमधे सध्या ह्या रोगाचा उगम झाला असला तरी जवळजवळ सर्व खंडात आता पसरला आहे.
अर्थात असेही ऐकले आहे की एव्हियन फ्लु पेक्षा कमी घातक सरासरी आहे ह्या इन्फ्लुएन्झा ए ची. कोणी मिपावरील जाणकार आधीक माहीती देउ शकतील.
4 May 2009 - 7:32 am | यन्ना _रास्कला
डुकर शहानी आहेत. गपगुमान पडुन राहातात / डायरेक्ट मरतात काय झाल तर. इश्नुचा अवतार आहेत ती काय झाल तरी :) :)
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
4 May 2009 - 11:09 am | सुहास
अहो पण दंवबिन्दु शेठ कुणी स्वाईन फ्लू झालेला तुमच्या शेजारी बसला तुम्ही प्रवासात असताना (किंवा कुठेही) आणि शिंकला किंवा खोकला तरी सुध्दा हा रोग तुम्हाला व इतरांना लागू शकतो त्याचे काय? मग कसले डुक्कर आणि कसले काय?
4 May 2009 - 12:36 pm | वेताळ
तुम्ही डुकराच काय खात नाही ? काय म्हणायच तुला?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
4 May 2009 - 7:19 am | चित्रा
नक्की कळले नाही. भारतात स्थित लोकांपर्यंत बातमी (निदान शहरांमध्ये) पोचली आहे असे आलेल्या फोन/इमेलवरून कळले.
इथल्या भारतीयांनाही भिती/काळजी जाणवली नाही असे नसावे. आमच्याकडे (मॅसॅचुसेटसमध्ये) सगळे बर्यापैकी काळजी घेऊन आहेत.
मला गेले काही आठवडे बरे नव्हते. त्यापाठोपाठ ताप, सर्दी मागच्याच आठवड्यात झाले, एरवी झाले आहे काहीतरी म्हणून सहज सोडून दिले असते पण यावेळी लगेच डॉक्टरांकडे गेले. अर्थात माझ्या डॉक्टरांनी खूप टेस्ट केल्या असे काही नाही. तिच्या मते व्हायरल काही असले (पठ्ठी फ्लू असेल (साधाही) असे काही म्हणायला तयार नाही!) तर त्याला जेवढा वेळ द्यायचा तेवढा द्यावाच लागणार. तिने मला सर्दीचे औषध दिले आहे त्या औषधामुळेच मी सध्या बेजार आहे.
4 May 2009 - 8:11 am | भाग्यश्री
मी चांगलीच घाबरले होते! विमानप्रवास करणार होते तोही पुढे ढकलला.. :)
आता बराच स्टेबल झाला आहे तो व्हायरस असे ऐकले..
www.bhagyashree.co.cc
4 May 2009 - 11:52 am | सुहास
इजिप्त सरकारने देशातील सर्व डुक्करांची कत्तल करण्याचे हुकूम दिलेत म्हणे.. अर्थात त्यामुळे तिथे दगडफेक झाली म्हणे... असो..
मला एक दुवा मिळालाय जो म्हणतो की आपण स्वाईन फ्लूची गरजेपे़क्शा जास्त काळजी करु नये..
http://www.webmd.com/cold-and-flu/news/20090501/putting-swine-flu-in-per...
सुहास
4 May 2009 - 12:00 pm | सागर
जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले आहे की हा रोग लवकरच सगळीकडे पसरणार आहे
स्त्रोतः http://beta.esakal.com/2009/05/01142021/international-swine-flu-india.html
भारतात जरी हा रोग आला तरी उष्ण तापमानामुळे आला तसा लगेच जाईन.. शिवाय सिप्ला कंपनीकडे यावरील औषधाचे पेटंट असल्यामुळे भारतात तरी ह्यावरील औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...
देशा-विदेशातील सर्व लोकांनी काळजी घ्यावी....
लवकरच हेही संकट टळेल...
- सागर
5 May 2009 - 4:21 pm | येडा खवीस
...आता विश्वास ठेवावा की नाही हे तुम्ही ठरवा, पण एक द्रष्टे संत आणि उच्च दर्जाला पोहोचलेले सदगुरु श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी अनेक वर्षापुर्वी एक मंत्र लिहिलेला आहे तो स्वाईन फ्ल्यु सारख्या इंपोर्टेड आजारावर अत्यंत गुणकारी असावा असं माझं मत आहे...मंत्रातले शब्दच पहा कसे अर्थपुर्ण आहेत...
|| संगजा देशकालोत्था अपिसांक्रमिका गदा, नश्यन्तेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं ||
या मंत्राचा उच्चार श्रीदत्तस्मरण करुन रोज करावा
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
5 May 2009 - 10:55 pm | नितिन थत्ते
मंत्राचा पूर्ण अर्थ सांगावा. मला दुसर्या भागाचाच अर्थ लागला
म्हणताना आंघोळ करून म्हणायचा की तसाच?
सकाळी म्हणायचा की संध्याकाळी?
एका वेळी किती वेळा?
उपाशी पोटी की जेवून?
याचे साईड इफेक्ट काय?
स्वतः म्हणायचा की रेकॉर्डेड ऐकला तर चालतो?
स्वतः म्हणायचा असेल तर मनातल्या मनात म्हणून चालेल की मोठ्याने म्हणायला पाहिजे?
अवांतरः क्षयरोग वगैरे देशी आजारांवर चालतो का?
तुम्हाला साधा फ्लू झाल्यावर क्रोसीन न घेता हाच मंत्र म्हणता की काय?
खराटा
(येथे उत्तम मंत्र म्हणून मिळेल)
6 May 2009 - 9:10 am | येडा खवीस
साथीजन्य आजार दुर होण्यासाठी:
|| दद्रुस्फोटक कुष्ठादी, महामारी विषुचिका | नश्यन्त्यनेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं ||
संगजा देशकालोत्था, अपिसांक्रमिका गदा: | शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तं ||
अंगावर उठणारे फोड, चट्टे, त्वचारोग हे दत्तस्मरणाने दुर होतात, त्याचप्रमाणे परस्पर संपर्काने, इतर देशातुन येणारे व साथिचे विकारही दत्ताचे नामस्मरण केल्याने दुर होतात असा मंत्राचा अर्थ आहे.
मंत्रपुरश्चरणः वरील मंत्र रोज स्नानोपरांत श्रीदत्तस्मरण करुन १०८ वेळा जप करणे त्याचप्रमाणे सातत्याने जप केल्यासही चालु शकेल
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
6 May 2009 - 9:21 am | पिवळा डांबिस
एकदम सोपा आणि बिनखर्चाचा उपाय सुचवलांत...
उद्याच तुमचा हा मंत्र असलेला मेसेज श्री. ओबामांना इ-मेल करत आहे...
(भविष्यात सी आय ए तुमचा पत्ता शोधत घरी आलं तर आश्चर्य वाटु देऊ नकात....)
:)