गेल्या दोन महीन्यात ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. त्यातील जास्तीत जास्त बेसीक सुविधाही नसलेल्या गुजरातला हलवण्यात आले आहेत. गुजराती पंतप्रधान असल्याने महाराष्ट्राचे प्रकल्प जबरजस्तीने गुजरातला नेले जात आहेत का?
१. वेदांताफोक्सकोन.
२. टाटा एअरबस.
३.बल्क ड्रग प्रोजेक्ट (औरंगाबादला येनार होता)
४. सॅफ्रोन
हे चार प्रकल्प अवघ्या दोन महीण्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले आहेत. ह्या चारही प्रकल्पांची किंमत १ लाख ऐंशी हजार करोड आहे तसेच ह्या चार प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कमीतकमी दोन लाख मराठी तरूणांना नोकर्या मिळनार होत्या. वेदांता प्रकल्प ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातच होनार होता त्यासाठी पुण्या
जवळील तळेगावची जमीनही निश्चीत करण्यात आली होती, स्किल्ड लेबर, मूबलक पाणी, कच्चा माल, इंजीनीअर्स, ट्रांसपोर्टेशन, व्यवस्थपान हे सर्व महाराष्ट्रात पुण्याजवळ कंपनीला ऊपलब्ध होते. गुजरातमधील ढोलेराला ह्या गोष्टी ऊपलब्ध नाहीत.
ज्यावेळी वेदांता प्रकल्प गुजरातला पळवण्याचं षडयंत्र रचलं जात होतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गणपती मंडंळांना भेटी देण्यात व्यस्त होते. आधीही केंद्राने आयएफएससी सेंटर जे बीकेसी,मुंबईला येनार होते ते गुजरातला हलवले.
नंतर सेंट्रल बोर्ड फोर वर्कर एज्युकेशन जे नागपूर ला येनार होते ते दिल्लीत हलवले.
एमआयएएल ओफीस मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
एअर ईंडीयाचेओफीस मुंबईतून दिल्लीत हलवण्यात आले.
जहाज बांधनी/तोडणी चे कामही मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
ट्रेडमार्क पेटंट ओफीस मुंबईतून दिल्लीला हलवण्यात आले.
आणखी एक नॅशनल सेक्युरीटी गार्ड आणी नॅशनल मरीन पोलीस एकेडमी पालघरमधून गुजरातला द्वारकाला हलवण्यात आली.
हे सर्व पाहील्यानर काही प्रश्न पडतात.
१)महाराष्ट्रावर केंद्राचा/मोदीशहींचा राग का?
२)इतर देशही विकसीत व्हावा असं वाटत असेल कर प्रकल्प गुजरातलाच का हवलवे जाताहेत? पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे?
३)१९६० साली मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याच्या रागातून हे केले जातेय का? मोदी हे आधुनीक मोरारजी आहेत का?
४)त्या साठीच शिवसेनेत फूट पाडण्यात आली का? कारण विधानसभेत शिंदेंनी फडणवीसांकडे बोट दाखवून सांगीतले की कर्तेकरवते हेच आहेत. तसेच हिमालयात पळून जाईन फेम चंद्रकांत दादा पाटलांनीही आमदार कसे पळवावे लागले हे एका जाहीर सभेत सांगीतले होते. शिवसेना मराठी/महाराष्ट्र/मुंबई ह्या प्रश्नांवर जागृत असते.
५. शिंदेंना बळीचा बकरा बनवन्यात आलंय का? ह्या सर्वाचं खापर शिंदेंवर फोडून भाजप नाम निराळी राहील? पु्र्वी ज्या बोकडाचा बळी द्यायचा असेल त्याला मोकळं सोडलं जायचं गाव त्याला खाऊ पिऊ घालायचं तसं शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन करण्यात आलंय का?
६)फडणवीस बोलले की गुजरात पाकीस्तान आहे का? मग महाराष्ट्रही पाकीस्तान नाही. तरी मराठी तरूणांच्या नोकर्यां का खाल्ल्या जाताहेत? शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे?
७)फडणवीसांच्या १०० टक्के राजकारण करून पदं मिळवण्याच्या लालसेपायी ते मोदीशहांना मिळून महाराष्ट्राचा बळी देताहेत का?
८)महाराष्ट्राने २१४०३ करोड तर गुजरात ने ९०४० करोड जीएसटी सप्टेंबर २०२२ ला भरलाय. गुजरात महाराष्ट्राच्या तूलनेत जवळपास निम्म्याने मागेय. ह्या मुळेच मोदीशहांचा महाराष्ट्रावर राग आहे का?
९)सर्वात महत्वाचं, भाजपला मत देऊन मराठी माणसाने स्वतःची स्वतःच्या हाताने कबर खोदलीय का? ह्यापुढे मराठी माणसाने भाजपला मत द्यावे का?
प्रतिक्रिया
3 Nov 2022 - 9:30 pm | अमर विश्वास
तू एकटाच शहाणा आहेस
4 Nov 2022 - 3:00 pm | पॉल पॉट
अंगावर गायीचं शेण फासा मन:शांती मिळेल.
4 Nov 2022 - 8:33 am | रात्रीचे चांदणे
लोकसत्तेच्या ह्या लेखानुसार निवडणूक आयोगाने गुजरात निवडणूक जाहीर करण्यास दोन आठवडे उशीर केला. ह्या वेळात मोदींनी दोन दिवसाचा गुजरात दौरा केला. ह्या दौऱ्यात त्यांनी एका हवाईतळाचे उद्घाटन झाले, जुनागड येथे ३५८० कोटींच्या प्रकल्पांची घोषणा झाली, राजकोटला ७७१० कोटींचे प्रकल्प जाहीर झाले आणि गुजरातेतील गरिबांसाठी ११०० गृहबांधणी योजनांची घोषणा झाली. खरं तर दोन्ही राज्याच्या तारखा एकाच वेळी जाहीर करण्यास हरकत नव्हती परंतु आयोगाने पंतप्रधानांना पुरेपूर वेळ दिला. निवडणुकीच्या आदी प्रकल्प जाहीर करून मते मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
वेदांता प्रकल्पही असाच महाराष्ट्राबाहेर गेलेला असणार. गुजरात निवडणूक आहे तर गुजराती लोकांना खुश करण्यासाठी प्रकल्प गुजरातला गेला. प्रकल्प गुजरातला होणार हे जाहीर होण्याआधी काही दिवसांपुर्वी वेदांताच्या मालकांनी मोदींची भेट घेतली होती हे विशेष आहे.
4 Nov 2022 - 1:26 pm | पॉल पॉट
लोकसत्ता, गिरीश कुबेर, कुमार केतकर देशद्रोही आहेत. नेहमी खर्या बातम्या छापतात. मोदींनी ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग बटीक बनवलाय. देशात लोकशाही औषधालाही शिल्लक नाहीये. ह्याचे परिणाम देशाला भोगावे लागनार.
कावळ्याच्या हातात दिला कारभार त्याने हगून भरवला दरबार.
4 Nov 2022 - 3:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
त्या अग्रलेख 'मागे' घेणार्या गिरीश कुबेराबद्दल बोलुच नकोस रे पॉट्या. मराठी वाचकांना 'जागतिक अर्थशास्त्र/तेलाचे राजकारण' समजावुन सांगण्याच्या नादात अनेक वेळा ह्याचे (अ)ज्ञान दिसलय वाचकांना. रघुराम राजनचे वारेमाप कौतुक केले पण खुद्द राजन ह्यांचेच अनेक अंदाज सपशेल फसले आहेत. अर्थखात्याचा प्रत्येक निर्णय कसा चुकीचा असतो ह्यावर लेख लिहित बसतो. म्हणजे आर बी आय्/अर्थखात्यातल्या आय ए एस अधिकार्यापेक्षा ह्या संपादकाला जास्त कळते.! ह्यांच्या मुलाखती पहा- पुर्वी एकत्र कुटुंबात सासू टोमणे मारत फिरायची तसे हा बोलत असतो.
कुमारबद्दल काय बोलणार? महाराष्ट्र टाईम्सचा संपादक झाला-१९९६ साली आणि म.टा.चा 'स्मार्ट काँग्रेस मित्र' करुन टाकला. नंतर लोक्सत्ताचा संपादक झाला आणि परत तोच कित्ता गिरवला. काही मनाविरुद्ध घडले की ह्याला "व्यापक कट' दिसतो. मोदी २०१९ मध्ये निवडुन आले.. व्यापक कट. शिवसेना फुटली- व्यापक कट. गंमत म्हणजे गेली २० वर्षे शिवसेनेला 'कम्युनल'म्हणुन हिणवणार्या ह्या सेक्युलर संपादकास आता शिवसेनेची बाजु घ्यायला जराही लाज वाटत नाही. शेवटी राज्यसभेत काँग्रेसचा खासदार झाला हे बरे झाले म्हणायचे!
4 Nov 2022 - 4:26 pm | पॉल पॉट
ते ठिकाय गं माई. पण मोदीनी निवडणूक आयोगाला बटीक बनवलंय हे वरील ऊदाहरणावरून दिसतंय ना?? त्याबद्दल ही बोल काही. कुबेर नी केतकरचंच तूनतूनं किती वाजवायच?
4 Nov 2022 - 6:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कसले बटीक आणी फटिक? हे निवडणुक अधिकारी ३०-३५ वर्षे सरकारी सेवेत आहेत ना? मग २०१४ पासुन अचानक बटिक झाले का ? ह्यांच्यातल्या निवृत्त अधिकार्यांने टी.व्हि.वर यावे आणि सांगावे की मोदी/शहा नक्की काय दडपण आणतात ते. नसेल तर लिहा आत्मचरित्र आणी सांगा काय आहे ते. तेवढेही जमत नसेल तर सरकारी गुलाम म्हणूनच त्यांच्याकडे आपण पाहायचे.
4 Nov 2022 - 6:52 pm | रात्रीचे चांदणे
कॉग्रेसच्या काळात निवडणूक आयोग किंवा सरकारी अधिकारी निपक्ष होते आणि आत्ता पक्षपाती झालेत आस कोणीही म्हणणार नाही. पण सध्याचा निवडणूक आयोग भाजपला सोयीचे निर्णय घेतोय हे मान्य करायला काय हरकत आहे?
आणि कोणताही सरकारी अधिकारी मोदी शहाणा सहजासहजी विरोध करणार नाही, नाहीतर ED, CBI आहेच माघे.
13 Nov 2022 - 2:03 am | कपिलमुनी
आज आयडी भाड्याने दिलाय वाटत
4 Nov 2022 - 8:38 am | मुक्त विहारि
राजापूरमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पविरोधकांना तडीपारीच्या नोटिसा ; स्थानिकांचा विरोध कायम
https://www.loksatta.com/maharashtra/police-issued-tadipaar-notice-to-th...
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा....
5 Nov 2022 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादातील एरर...
-दिलीप बिरुटे
5 Nov 2022 - 10:26 pm | चामुंडराय
आत्ताच एक कायप्पा फॉरवर्ड मिळाले -
१९९o सालापासून सुरू असलेला महाराष्ट्राचा पंतप्रधान पद मिळवण्याचा प्रकल्प
८ वर्षांपूर्वी गुजरातने पळविला...
मात्र याबाबत कुणीच बोलत नाही.
7 Nov 2022 - 11:14 pm | पॉल पॉट
ह्या पीजेवर हसायचंय का?
12 Nov 2022 - 8:23 pm | पॉल पॉट
मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन राज्याच्या हातून गेला https://www.lokmat.com/maharashtra/another-project-outside-maharashtra-e...
महाराष्ट्र कंगाल करण्याच्या षडयंत्रात आणखी एक मैलाचा दगड
13 Nov 2022 - 10:17 pm | ॲबसेंट माइंडेड ...
हे पहीले ज्यांचामुळे मिपावर यावेसे वाटत नाही.
18 Nov 2022 - 8:22 pm | सुबोध खरे
हे (पॉल पॉट) पहीले ज्यांचामुळे मिपावर यावेसे वाटत नाही.
कसं बोललात?
24 Nov 2022 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्राचं कंगाल होणे कुठंपर्यंत आलं ? काही नवे अपडेट ?
गुजराती खुश आहेत म्हणे इकडचे रोजगार तिकडे गेले म्हणून.
-दिलीप बिरुटे