महाराष्ट्र कंगाल करण्याचं षडयंत्र?

पॉल पॉट's picture
पॉल पॉट in राजकारण
31 Oct 2022 - 1:51 am

गेल्या दोन महीन्यात ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. त्यातील जास्तीत जास्त बेसीक सुविधाही नसलेल्या गुजरातला हलवण्यात आले आहेत. गुजराती पंतप्रधान असल्याने महाराष्ट्राचे प्रकल्प जबरजस्तीने गुजरातला नेले जात आहेत का?
१. वेदांताफोक्सकोन.
२. टाटा एअरबस.
३.बल्क ड्रग प्रोजेक्ट (औरंगाबादला येनार होता)
४. सॅफ्रोन
हे चार प्रकल्प अवघ्या दोन महीण्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले आहेत. ह्या चारही प्रकल्पांची किंमत १ लाख ऐंशी हजार करोड आहे तसेच ह्या चार प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कमीतकमी दोन लाख मराठी तरूणांना नोकर्या मिळनार होत्या. वेदांता प्रकल्प ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातच होनार होता त्यासाठी पुण्या
जवळील तळेगावची जमीनही निश्चीत करण्यात आली होती, स्किल्ड लेबर, मूबलक पाणी, कच्चा माल, इंजीनीअर्स, ट्रांसपोर्टेशन, व्यवस्थपान हे सर्व महाराष्ट्रात पुण्याजवळ कंपनीला ऊपलब्ध होते. गुजरातमधील ढोलेराला ह्या गोष्टी ऊपलब्ध नाहीत.
ज्यावेळी वेदांता प्रकल्प गुजरातला पळवण्याचं षडयंत्र रचलं जात होतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गणपती मंडंळांना भेटी देण्यात व्यस्त होते. आधीही केंद्राने आयएफएससी सेंटर जे बीकेसी,मुंबईला येनार होते ते गुजरातला हलवले.
नंतर सेंट्रल बोर्ड फोर वर्कर एज्युकेशन जे नागपूर ला येनार होते ते दिल्लीत हलवले.
एमआयएएल ओफीस मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
एअर ईंडीयाचेओफीस मुंबईतून दिल्लीत हलवण्यात आले.
जहाज बांधनी/तोडणी चे कामही मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
ट्रेडमार्क पेटंट ओफीस मुंबईतून दिल्लीला हलवण्यात आले.
आणखी एक नॅशनल सेक्युरीटी गार्ड आणी नॅशनल मरीन पोलीस एकेडमी पालघरमधून गुजरातला द्वारकाला हलवण्यात आली.

हे सर्व पाहील्यानर काही प्रश्न पडतात.
१)महाराष्ट्रावर केंद्राचा/मोदीशहींचा राग का?
२)इतर देशही विकसीत व्हावा असं वाटत असेल कर प्रकल्प गुजरातलाच का हवलवे जाताहेत? पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे?
३)१९६० साली मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याच्या रागातून हे केले जातेय का? मोदी हे आधुनीक मोरारजी आहेत का?
४)त्या साठीच शिवसेनेत फूट पाडण्यात आली का? कारण विधानसभेत शिंदेंनी फडणवीसांकडे बोट दाखवून सांगीतले की कर्तेकरवते हेच आहेत. तसेच हिमालयात पळून जाईन फेम चंद्रकांत दादा पाटलांनीही आमदार कसे पळवावे लागले हे एका जाहीर सभेत सांगीतले होते. शिवसेना मराठी/महाराष्ट्र/मुंबई ह्या प्रश्नांवर जागृत असते.
५. शिंदेंना बळीचा बकरा बनवन्यात आलंय का? ह्या सर्वाचं खापर शिंदेंवर फोडून भाजप नाम निराळी राहील? पु्र्वी ज्या बोकडाचा बळी द्यायचा असेल त्याला मोकळं सोडलं जायचं गाव त्याला खाऊ पिऊ घालायचं तसं शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन करण्यात आलंय का?
६)फडणवीस बोलले की गुजरात पाकीस्तान आहे का? मग महाराष्ट्रही पाकीस्तान नाही. तरी मराठी तरूणांच्या नोकर्यां का खाल्ल्या जाताहेत? शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे?
७)फडणवीसांच्या १०० टक्के राजकारण करून पदं मिळवण्याच्या लालसेपायी ते मोदीशहांना मिळून महाराष्ट्राचा बळी देताहेत का?
८)महाराष्ट्राने २१४०३ करोड तर गुजरात ने ९०४० करोड जीएसटी सप्टेंबर २०२२ ला भरलाय. गुजरात महाराष्ट्राच्या तूलनेत जवळपास निम्म्याने मागेय. ह्या मुळेच मोदीशहांचा महाराष्ट्रावर राग आहे का?
९)सर्वात महत्वाचं, भाजपला मत देऊन मराठी माणसाने स्वतःची स्वतःच्या हाताने कबर खोदलीय का? ह्यापुढे मराठी माणसाने भाजपला मत द्यावे का?

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 6:31 am | चौकस२१२

पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे?

राजकीय आरडाओरड्याला अर्थ नाही
यातील काही प्रकल्प दिल्ली ला गेले आहेत गुजराथ ला नाही ते आधी यादीतून बाहेर काढा ... दिल्ली ला नेण्यामागे काही तांत्रिक कारण किंवा इतर कारण असु शकते याचा विचार तरी करा !

आता मुंबई पुण्यात जरी प्रचंड प्रमाणात शिकलेलं मनुष्यबळ उपलब्ध असले तरी "जमिनीची किंमत " आणि त्या "मनुष्यबळाची किंमत" हे दोन मुद्दे लक्षात घ्यावे लागतात

किती तरी पूर्वी आठवतंय वरळी- लोवर परेल सारखया जागी असलेलं उत्पादन कारखाने नाशिक . औरंगाबाद वैगरे सारखया त्यामानाने स्वस्त ठिकाणी नाही तर एकदम गोव्यायला हलवली होती
शेवटी धंद्याला काय पाहिजे ते आपल्यसाखरख्याला कळेल काय ?

भाजपने सेना फोडली याचा राग म्हणून सतत "राजय अस्मित " हा झेंडा काही लोक सतत नाचवू लागले आहेत .. त्यांना असे विचारावेसे वाटते कि आज जर मोदी शहा ऐवजी गडकरी / फडणवीस किंवा मुढे / महाजन केन्द्रात असते तर अशी टीका झाली असती का? कारण ते सर्वच महारास्त्राचेच कि हो !

आशियातीळ टायगर इकिनोमी हळू हळू एका एक महाग होत चालल्या .. सिंगापोरे - मग मलेशिया- मग थायलंड - मग इंडोनेशिया - मग आटा व्हिएतनाम आणि कंबोडिया इकडे उद्योग जात आहेत . पण धोरणात्मक म्हणून आशियायी मुख्य कार्यालये महाग जमीन असलेल्या सिंगापुर मधेय ठेवतात ... का?
सगळ्या गोष्टी भावनेने आणि उर बडवून होत नाहीत ..

(आता असेल काही बोललेलं कि " भाजप अंधभक्त गुजराथ प्रेमी मराठी " असे बिरुद लागणार याची कल्पना आहे .. असो )

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 6:46 am | चौकस२१२

पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे?

राजकीय आरडाओरड्याला अर्थ नाही
यातील काही प्रकल्प दिल्ली ला गेले आहेत गुजराथ ला नाही ते आधी यादीतून बाहेर काढा ... दिल्ली ला नेण्यामागे काही तांत्रिक कारण किंवा इतर कारण असु शकते याचा विचार तरी करा !

आता मुंबई पुण्यात जरी प्रचंड प्रमाणात शिकलेलं मनुष्यबळ उपलब्ध असले तरी "जमिनीची किंमत " आणि त्या "मनुष्यबळाची किंमत" हे दोन मुद्दे लक्षात घ्यावे लागतात

किती तरी पूर्वी आठवतंय वरळी- लोवर परेल सारखया जागी असलेलं उत्पादन कारखाने नाशिक . औरंगाबाद वैगरे सारखया त्यामानाने स्वस्त ठिकाणी नाही तर एकदम गोव्यायला हलवली होती
शेवटी धंद्याला काय पाहिजे ते आपल्यसाखरख्याला कळेल काय ?

भाजपने सेना फोडली याचा राग म्हणून सतत "राजय अस्मित " हा झेंडा काही लोक सतत नाचवू लागले आहेत .. त्यांना असे विचारावेसे वाटते कि आज जर मोदी शहा ऐवजी गडकरी / फडणवीस किंवा मुढे / महाजन केन्द्रात असते तर अशी टीका झाली असती का? कारण ते सर्वच महारास्त्राचेच कि हो !

आशियातीळ टायगर इकिनोमी हळू हळू एका एक महाग होत चालल्या .. सिंगापोरे - मग मलेशिया- मग थायलंड - मग इंडोनेशिया - मग आटा व्हिएतनाम आणि कंबोडिया इकडे उद्योग जात आहेत . पण धोरणात्मक म्हणून आशियायी मुख्य कार्यालये महाग जमीन असलेल्या सिंगापुर मधेय ठेवतात ... का?
सगळ्या गोष्टी भावनेने आणि उर बडवून होत नाहीत ..

(आता असेल काही बोललेलं कि " भाजप अंधभक्त गुजराथ प्रेमी मराठी " असे बिरुद लागणार याची कल्पना आहे .. असो )

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Oct 2022 - 7:05 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मुंबई/पुणे परिसर देशातील ईतर जागांच्या तुलनेत खूप महाग आहे रे पोल पॉट्या.साधारण २०१० पर्यंत मोठे उद्योग ह्या परिसरात येत होते पण नंतर अनेक् राज्यांची परिस्थिती सुधारली आहे. मोदींनी सांगितले आणि टाटा-एयरबसने मान डोलावली असे होणार नाही. काही सोयी सुविधा नक्कीच जास्त मिळाल्या असणार.
विश्वास बसणार नाही पण दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील अनेक पदवीधर कर्नाटकात/तेलंगणात अनेक वर्षे नोकर्या/धंदे करत आहेत. त्यांच्याशी बोलताना हेच दिसले की तुलनेने ही राज्ये स्वस्त आहेत, राहणीमानाचा दर्जा चांगला आहे. गुजरातमध्ये जर मोठे उद्योगधंदे जात असतील तर त्यात राजकारण न करता राज्यात काय सुधारणा करता येतील ह्याचा अभ्यास व्हायला हवा.

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 10:04 am | चौकस२१२

गुजरातमध्ये जर मोठे उद्योगधंदे जात असतील तर त्यात राजकारण न करता राज्यात काय सुधारणा करता येतील ह्याचा अभ्यास व्हायला हवा.
ते होणे नाही .. फुटलेली सेना पूर्ववाट आणण्यासाठी असे " भाजप म्हणजे गुजराथी बनिया हे दाखवणे जरुरीचे आहे "
कांग्रेस हा सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची पण हाय कमांड दिल्लीला असते ( आणि ती सुद्धा एकाच कुटुंबाकडे) हे दिसत असून ना दिसत असल्यासारखे करा असे टूल किटात लिहिलेलं आहे ...

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 10:09 am | चौकस२१२

मोदींनी सांगितले आणि टाटा-एयरबसने ऐकेले
छे हो , टाटा आणि एअर बस चे मालक मोदींकडे पाणी भरायालाच असतात .. त्यामुळे त्यांना ऐकवेच लागत असणार

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 10:19 am | चौकस२१२

मोदींनी सांगितले आणि टाटा-एयरबसने ऐकेले
छे हो , टाटा आणि एअर बस चे मालक मोदींकडे पाणी भरायालाच असतात .. त्यामुळे त्यांना ऐकवेच लागत असणार

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 11:19 am | चौकस२१२

गुजरातमध्ये जर मोठे उद्योगधंदे जात असतील तर त्यात राजकारण न करता राज्यात काय सुधारणा करता येतील ह्याचा अभ्यास व्हायला हवा.
ते होणे नाही .. फुटलेली सेना पूर्ववाट आणण्यासाठी असे " भाजप म्हणजे गुजराथी बनिया हे दाखवणे जरुरीचे आहे "
कांग्रेस हा सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची पण हाय कमांड दिल्लीला असते ( आणि ती सुद्धा एकाच कुटुंबाकडे) हे दिसत असून ना दिसत असल्यासारखे करा असे टूल किटात लिहिलेलं आहे ...

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 11:28 am | चौकस२१२

गुजरातमध्ये जर मोठे उद्योगधंदे जात असतील तर त्यात राजकारण न करता राज्यात काय सुधारणा करता येतील ह्याचा अभ्यास व्हायला हवा.
ते होणे नाही .. फुटलेली सेना पूर्ववाट आणण्यासाठी असे " भाजप म्हणजे गुजराथी बनिया हे दाखवणे जरुरीचे आहे "
कांग्रेस हा सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची पण हाय कमांड दिल्लीला असते ( आणि ती सुद्धा एकाच कुटुंबाकडे) हे दिसत असून ना दिसत असल्यासारखे करा असे टूल किटात लिहिलेलं आहे ...

सुक्या's picture

31 Oct 2022 - 9:43 am | सुक्या

४. सॅफ्रोन
या प्रकल्पाला नागपुरात मिहान मधे जागा मिळणार होती. ती वेळेत न मिळाल्यामुळे तो प्रकल्प आता हैद्राबाद इथे गेला आहे.

नवीन प्रकल्प येण्यात जमीन अधीग्रहण मधे होणारी ही दिरंगाई हा मोठा अडथळा आहे. लाल फीत शाही तर विचारु नका.

बाकी रुदन चालु द्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Oct 2022 - 10:59 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ही बातमी आहे डिसेंबर २०२१ मधील-
France's Safran shortlists Jewar, Nagpur, Hyderabad for MRO unit
https://www.business-standard.com/article/companies/france-s-safran-shor...
आणी ही बातमी आहे जुलै २०२२ मधील-
Safran To Set Up Largest MRO Facility For Commercial Aircraft Engines In Hyderabad By 2025: CEO
https://news.abplive.com/business/safran-to-set-up-largest-mro-facility-...
ह्या काळातल्या बातम्या पाहिल्यात तर तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव व मुख्यमंत्री के सी राव अनेक कंपन्यांच्या सी ई ओज बरोबर बोलताना/आमंत्रण देताना दिसतात. तर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'गद्दार्/मावळे/खंजीर्/अयोध्या' ह्या पलिकडे जात नाहीत. "प्रकल्प बाहेर जातातच कसे?" असे आता विचारणारे विद्वान पत्रकार तेव्हा संजय राउतांचे शेरे/टोमणे/कोपरखळ्या लोकांना दाखवण्यात मग्न होते.

चौकस, माई आणी सुक्या. तुम्ही जे सांगताय ह्यात काहीच तथ्य नाही. मूळात महाराष्ट्रात आधीपासून अनेक प्रकल्प आहेत ते पोषक वातावरण होतं म्हणूनच. पण राज्य आणी केंद्रात भाजप सरकार आल्यापासून जाणून बूजून नहाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जाताहेत हे नजरेआड करू नका.

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 11:36 am | चौकस२१२

लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का

(भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Oct 2022 - 11:46 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मग हा सॅफ्रान प्रकल्प गुजरातला का गेला नाही? कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री तर मोदी/शहांविरुद्ध सारखे बोलतच असतात. तामिळनाडुतील द्रमुकचे राजकारणी तर मोदी/शहांना पाण्यात पाहतात मग तरीही तामिळ्नाडुतील विदेशी गुण्तवणूक वाढते कशी?
FDI flow into Tamil Nadu increases 30.1% in 2021-22
https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/fdi-flow-into-tamil-na...
हा सॅफ्रान प्रकल्प तेलंगणात यावा म्हणून तेथील प्रशासनाने घेतलेली मेहनत पहा-
Telangana held 35 meetings with officials of Safran in Hyderabad, Delhi and Paris. There have been more than 400 plus exchanges on mails and other communication channels to make the landing smooth for Safran. Our first dialogue started in 2018 and it was followed up by an MoU between Safran and the Telangana State Government,” he said
https://telanganatoday.com/telangana-beats-stiff-competition-to-get-safr...
महाराष्ट्र प्रशासकिय अधिकार्यानी काय मेहनत घेतली होती ते वाचायला आवडेल.
स्मरणरंजनाचे दिवस आता संपले आहेत.आमच्याकडे आर्थिक राजधानी आहे/विद्येचे माहेरघर आहे असल्या वाक्याना आताच्या काळात फार अर्थ नाही.

पॉल पॉट's picture

31 Oct 2022 - 11:59 am | पॉल पॉट

महाराष्ट्र प्रशासकिय अधिकार्यानी काय मेहनत घेतली होती ते वाचायला आवडेल.
त्यांच्या मेहनतीमुळेच प्रकल्प नागपूर नी पुण्यात येण्याचे पक्के झाले होते.
आमच्याकडे आर्थिक राजधानी आहे/विद्येचे माहेरघर आहे असल्या वाक्याना आताच्या काळात फार अर्थ नाही. बरोबर. आपला माणूस पंतप्रधानपदी बसवा नी त्याच्या करवी लायकी नसलेल्या आपल्या राज्यात ऊद्योजकांना त्रास देऊन प्रकल्प आणा.

तुम्ही म्हणताय म्हनुन तथ्य नाही असे नसते हो. पुरावे द्या आधी. आधीपासुन जे प्रकल्प आहेत ते त्या त्या सरकार ची मेहेनत. आताचे बोला. गेल्या अडीच वर्षात किती नवीन गुंतवणुक झाली ? कोरोना चे कारण पुढे करु नका. साधी मुंबै ची मेट्रो पुर्ण करता आली नाही. नाणार / जैतापुर ला विरोध चालु आहे. अजुन ते प्रकल्प कुठे होणार ते ही नक्की नाही. बुलेट ट्रेन साठी जमीन अधीग्रहण झालेले नाही.

मग आपले नाकर्ते पण लपवण्यासाठी भोकाड का पसरता नेहेमी?? साधा शिवाजी महाराजांचा पुतळा अजुन बनवता आला नाही. तिकडे पटेलांचा पुतळा बनुन वर्षे होउन गेली.

भाजप महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का पळवून नेतंय ह्यावर बोला. विषय भरकटवू नका. मोदी महाराष्ट्राचा द्वेष का करतात?

सुक्या's picture

31 Oct 2022 - 10:23 pm | सुक्या

भाजप काय ह्या सार्‍या कंपण्यांची मालक आहे काय? गुजरात / तेलंगाना ही राज्ये जर उद्योजकांना जास्त सोई देत असेल तर महाराष्ट्राने त्या सवलती द्यायला कुणी आडकाठी आणली आहे काय? जा त्या कंपण्यांकडे परत .. बोलणी करा .. कुणी अडवले आहे. आता ज्या प्रकल्पांना विरोध केला होता तो थांबवा. होउ द्या जैतापुर. बुलेट ट्रेन, मेट्रो. बघा जमतय का ?

नाचता येईना अंगण वाकडे म्हण माहीत आहे ना?

भाजप सरकार आल्यापासून गेलेत. मविआ आल्यापासून नाही ऊगाच कळत नसल्याचा आव आणू नका

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 11:32 am | चौकस२१२

लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का

(भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )

आग्या१९९०'s picture

31 Oct 2022 - 11:57 am | आग्या१९९०

गुजराथ इतके दिवस उद्योगांसाठी पोषक नसावा त्यामुळे मोठे प्रकल्प भारतात इतर राज्यांमध्ये जात होते. आता परिस्थिती बदलली असल्याने यापुढे कदाचीत मागासलेल्या महाराष्ट्रात गुजराथमधून बुलेट ट्रेनने येणे जाणेही बंद होईल.

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 12:16 pm | चौकस२१२

लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का

(भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )

पॉल पॉट's picture

31 Oct 2022 - 12:25 pm | पॉल पॉट

लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का

(भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )
इतके प्रकल्प गुजरातला पाठवूनही भाजप म्हणजे गुजरात नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे.

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 12:18 pm | चौकस२१२

लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का

(भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 12:19 pm | चौकस२१२

लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का

(भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )

पलिकडे पोहोचलेले उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. तुमच्या मानसिक स्थितीला निरागसता देखिल म्हणता येत नाहीय.

अमर विश्वास's picture

31 Oct 2022 - 6:37 pm | अमर विश्वास

खूप दिवसांनी मस्त विनोदी लेख वाचला

असेच लिहीत रहा

महाराष्ट्राची GDP growth कायमच भारताच्या GDP growth पेक्षा जास्त राहिली आहे ते नवीन प्रोजेक्ट आल्यामुळेच ना ?

पुन्हा महाराष्ट्राने भाजपला नते देऊ नये.

महाराष्ट्राची एक पिढी मुंबई महाराष्ट्रा पासुन तोडण्याचा डाव आहे अशी भंपक गोष्ट ऐकुन मोठी झाली आहे ! मुंबई गुजरात मध्ये गेल्याचे कोणाला कळले असेल तर मला नक्की सांगा ! :)))
हाच प्रकार सध्याचा महाराष्ट्रद्रोही मिडिया महाराष्ट्रातील उध्योगांच्या बाबतीत करत आहे. महावसुली सरकार मध्ये वाझे नक्की कोणता "उद्योग" करण्यासाठी कोणी परत आणला हे अख्या महाराष्ट्राला ठावूक आहे. माझ्या माहिती प्रमाणे [ चूक असल्यास नक्की सांगा ] मागच्या सरकारच्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्व प्रकारच्या गुंतवणुकीत महाराष्ट्र १ ल्या क्रमांकावर होता.मग महाराष्ट्रातील लोकांशी गद्दारी करुन केलेली युती मोडुन केवळ खुर्चीच्या हव्यासासाठीच मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसुन उबाठा यांनी संपूर्ण कार्यकाळात महाराष्ट्राला ५ व्या स्थानावर आणुन ठेवले.मागच्या सरकारने मेट्रो पासुन इतर सगळ्या कामांना स्थगिती देण्याचे काम केले [ १० हजार कोटी अधिकचे भरुन मेट्रोचे ते काम आता पूर्ण करावे लागणार आहे म्हणे, हे मुंबई-महाराष्ट्राचे केले गेलेले आर्थिक नुकसान भरून द्यायला यांना कोणी सांगेल का ? ] हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचे होते का ? असा प्रश्न तुम्हाला कोणताही पत्रकार आणि मिडिया विचारताना दिसला का हो ? उंटावरुन शेळ्या हाकणे त्याच प्रमाणे घरात बसुन फेसबुक लाईव्ह हाकणे या पलिकडे मागच्या सरकारचे कर्तुत्व कोणते ? लोकांच्या घरी जाऊन मारझोड करणारे, मंत्र्यांच्या बंगल्यावर उचलुन आणुन मारझोड करणारे, पत्रकाराला घरातुन उचलुन आणणारे आणि अंबानीच्या घरा बाहेर स्फोटक ठेवण्याचा कट शिजवणारे जिथे मोकाट होते तेव्हा या राज्यात कोणता उध्योग आला ? उध्योग गेले ते यांच्या काळात तर त्याचे खापर केवळ काही महिनेच पूर्ण करणार्‍या सरकारच्या माथी का फोडले जाते ?
असो... महाराष्ट्राच्या जनतेला मराठी मिडियाचा हा ढोंगीपणा दिसतोच आहे, पण त्यांच्या मनात हा मिडिया महाराष्ट्राच्याच मूळावर उठतोय ही भावना देखील घट्ट करतो आहे.
हा सगळा तमाशा संपला आणि धुरळा खाली बसला की कोणा कोणाची वरात निघेल हे देखील कळेलच ! तो पर्यंत संयमाने मराठी मिडियाचा हौदोस पाहण्या पलिकडे आपल्या हातात दुसरे काहीच नाही.

जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “In a time of deceit telling the truth is a revolutionary act.” :- George Orwell

महाराष्ट्रद्वेष नी ऊबाठांवरील खोटे आरोप ह्याशिवाय ह्या प्रतिक्रीयेत काहीही नाही. महाराष्ट्र, मराठी, मुंबई, शिवसेना, मराठी मिडीया ह्यांचा ईतकाच द्वेष असेल तर गुजरातलाच का जाऊन राहत नाही?? महाराष्ट्रातच का रहायचं असतं?

सहाण आणून देऊ का बस उगाळत ...

मुक्त विहारि's picture

1 Nov 2022 - 9:35 pm | मुक्त विहारि

खालील व्हिडियो जरूर बघा ....

https://youtu.be/OiYsUQ2LEWg

विश्लेषण उत्तम केले आहे ....

वरील प्रतिसाद हा मदनबाण यांनाच आहे .... इतरांना चोंबडेपणा करायची गरज नाही ....

हे म्हणजे ऊघड्यावर हगनखडीत जाऊन हगायचं नी हगनदारीमूक्त गाववाल्यांना चोमडेपणा करू नका म्हणून सांगायचं.

पंतप्रधान देशाचे की गुजरातचे?- राज ठाकरे.
राज ठाकरेंच्या भूमीकेचे स्वागत, महाराष्ट्रविरोधी शक्तिंविरोधात महाराष्ट्र एक होतोय हे कौतूकास्पद आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला महाराष्ट्राच्या भल्यासाठी संपवावे

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/raj-thackeray-on-in...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Oct 2022 - 11:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आपले मराठी राजकीय नेत्यांची मजल ह्या पलिकडे नाही रे पॉट्या. मग १०५ हुतात्मे/मोरारजी वगैरे. अजुन 'मुंबई तोडण्याचा डाव' कोणी आपला नेता बोलला कसा नाही? मुद्द्याचे बोलुया.
In September of 2021, Airbus signed a contract to deliver the first 16 aircraft in ‘flyaway’ condition from its final assembly line in Seville, Spain, while the remaining 40 aircraft will be manufactured and assembled by Tata Advanced Systems (TASL), the defence arm of Tatas, in India.

Sources aware of the development said that the places considered for establishing the final assembly line for C295 aircraft are Dholera near Ahmedabad and Vadodara, reported business line.
https://knnindia.co.in/news/newsdetails/state/gujarat-to-soon-get-its-fi...
ही २० ऑक्टोबरची बातमी आहे. वरच्या प्रतिसादात तेलंगणा सरकारने काय प्रयत्न केले होते त्याची लिंक दिली आहे. टाटाने २०२१ मध्येच गुजरातमध्ये जात आहोत हे सांगितले होते. मग आता रडुन काय उपयोग आहे? टाटा-एयरबस्/सफ्रान ह्यांनी कुणी "आमचे महाराष्ट्रात जायचे नक्की झाले आहे" अशी बातमी कुठे आहे का? मराठी पुढारी हवेत गोळ्या मारणार तेव्हा त्यांच्या विधानांना महत्व् द्यायचे कारण नाही.

चौकस२१२'s picture

1 Nov 2022 - 11:41 am | चौकस२१२

मनसेचं इंजिनाचा काही भरोसा नाही , कधी भलत्याच रुळावरून तर कधी रूळ नसला तरी चालते ( रखडत )
जमेल तशी पोळी भाजायची सवय झालेली दिसती आहे
आणि हे काय "जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं"
जर महाराष्ट्रावर अन्याय होतो असे त्यांचे म्हणणे असेल तर मग तो गुजराथ ने केला काय कि आसाम ने केला काय ... भूमिका ठाम नको का !
इंजिन कश्यावर चालत कोळसा कि डिझेल कि वीज !

चौकस२१२'s picture

1 Nov 2022 - 11:48 am | चौकस२१२

मनसेचं इंजिनाचा काही भरोसा नाही , कधी भलत्याच रुळावरून तर कधी रूळ नसला तरी चालते ( रखडत )
जमेल तशी पोळी भाजायची सवय झालेली दिसती आहे
आणि हे काय "जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं"
जर महाराष्ट्रावर अन्याय होतो असे त्यांचे म्हणणे असेल तर मग तो गुजराथ ने केला काय कि आसाम ने केला काय ... भूमिका ठाम नको का !
इंजिन कश्यावर चालत कोळसा कि डिझेल कि वीज !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2022 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकल्प गुजरातला जात असतील तर जाऊ द्यावे. पन्नास खोक्याच्या नव्या महामार्गाने सर्व प्रकल्प गुहाटी-सूरत मार्गे गुजरातला जाणारच आहेत. मतदारांना भुलवण्यासाठी धार्मिक द्वेष उभे करून मतदान होईल पण काही मतं पळवून आणलेल्या
प्रकल्पावरही मिळतील. शेठचं प्लॅनिंग भारी असतं.

बाकी, महाराष्ट्राला गटारीतुन गॅस निर्माण करायचे प्रकल्प शेठनी द्यावे आणि त्यावर बेकार पदवी पदव्युत्तर युवकांनी पकोडे करायचं नवं तंत्रज्ञान विकसित करावे आणि आत्मनिर्भर व्हावे,असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(मिसळपाववाला)

वामन देशमुख's picture

1 Nov 2022 - 3:55 pm | वामन देशमुख

पन्नास खोक्याच्या नव्या महामार्गाने

हे काही कळलं नाही.

भारी बिरूटे सर. शेवटी आम्हा भक्तांची पॅढरी गुजरात विकसीत झाला पाहीजे. पवारांचा महाराष्ट्र बकाल झालाच पाहीजे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Nov 2022 - 6:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

महाराष्ट्र बकाल करण्याच्या ह्या षडयंत्रात शरद पवारांचे नातु रोहित पवारही सामील आहेत का?
rohit
जून २०२२ मध्ये गौतम अदानीना विमानतळावर आणायला जाउन आणी मग त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्यार्या रोहित पवारांना काय म्हणायचे?
https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/rohit-pawar-welcomed-gautam-...

पॉल पॉट's picture

1 Nov 2022 - 8:17 pm | पॉल पॉट

अदानींचा काय संबंधं?? काल तुमच्या ह्यांच्या सोबत एक ग्लास तुम्हीही घेतलात का माई? :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Nov 2022 - 8:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे, अदानी हा मोदींचाच माणूस ना? बरीच गुंतवणूक अदानीची गुजरातमध्येच आहे ना? अनेक विमानतळही आता घेतले आहेत चालवायला. हीच गुंतवणूक महाराष्ट्रात करायला काय धाड भरली होती मेल्याला? मला तर हा सगळा प्रकार अदानी/मोदींचा कट वाटतो महाराष्ट्र संपवण्याचा. तो रोहित पवार त्यांच्यासोबत दिसला म्हणून वाट्ले की हा रोहितही सामील दिसतोय कटात.

अरे, अदानी हा मोदींचाच माणूस ना?
तुम्ही म्हणताय ना मग असेल असेल :)

नवे प्रकल्प सोडा पण जे चालु होते आणि बंद पडले आणि ते पुन्हा चालू केले तरी बरे होईल
उदा सातारचा महाराष्ट्र स्कूटर कारखाना गेली पंचवीस वर्षे तरी बंद आहे
या काळात सेना भाजप , काँग्रेस ,सेना भाजप , सेना काँग्रेस आणि सेना भाजप सरकारे सरकारे येऊन गेली कोणीच यासाठी पुढाकार घेतला नाही.
दुसरे म्हणजे हे की नाणार प्रकल्पाला सेनेनेच विरोध केला. अनथा तो आत्तापार्यंत थोड्याफार प्रमाणात सुरूही झाला असता.
अगोदर विरोध करायचा आणि नंतर प्रकल्प इतरत्र गेला की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे हे सेनेने नेहमीच केले आहे.
दाभोळ वीज प्रकल्प समुद्रात बुडवायला निघलेले होते तोच प्रकल्प पक्ष प्रमुखांची गाठ पडल्यानंतर इथे सुरू झाला.
कारखानदार व्यावसाय करण्यासाठी येतात. स्थानीक राजकारन हे त्यांच्यासाठी दुय्यम तिय्यम बाब असते.
आणि मुख्य म्हणजे त्यांना कारखाना नीट चालावा यातच स्वारस्य असते.
रोजगार निर्मीती . स्थानीक विकास हे सगळे राजकारन्यांचे प्रश्न आहेत.
टाटा नॅनो चा प्रकल्प सिंगूर मधे वेळेत सुरू झाला असता तर भारताची झेप वेगळ्याच दिशेने गेली असते.
सिंगरूर मधे ममता बाईनी थयथयात घातल्या नंतर टाटा ना हक्काची अशी महाराष्ट्रात जागा होती पण त्या वेळेस गुजरात सरकारने त्यांचे स्वागत केले.
ते महारष्ट्र सरकारला जमले नाही

वेदांता फोक्सकोन, टाटा एअरबस ह्यांना शिवसेनेने विरोध केलेला नव्हता तरी भाजपने ते महाराष्ट्राशी गद्दारी करून गुजरातला पळवले.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Nov 2022 - 6:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे पळवण्यासाठी ते आधी महाराष्ट्रात येणार आहेत असे त्यांनी(वेदांता/टाटा) अधिकृतरित्या सांगितले होते का?
ह्यांना मधुबालाबरोबर विवाह करायचा होता पण किशोर कुमारने तिला पळवुन नेले.. त्यानंतर ह्यांना वैजयंतीमाला बरोबर विवाह करायचा होता पण त्या डॉक्टर बाली ह्यांनी तिला पळवुन नेले.

पॉल पॉट's picture

2 Nov 2022 - 7:46 pm | पॉल पॉट

माई बातमी नीट वाच. त्यात सांगीतलेय की कंपनीचे अधिकारी येऊन जमीन पाहून गेले होते. सर्व काही ठरलं होतं. बैठकाही झाल्या होत्या पण मोदींचं गुजरातप्रेम आडवं आलं नी फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवला गुजरात जायला.

रायगड : बल्क ड्रग पार्क विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

https://www.loksatta.com/maharashtra/farmers-protested-against-proposed-...

पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

https://www.loksatta.com/maharashtra/pm-narendra-modi-announce-2-lakh-cr...

पॉल पॉट's picture

3 Nov 2022 - 5:48 pm | पॉल पॉट

मोदी खोटं बोलतात.