माननीय उद्धव ठाकरे यांनी दसर्याआधी शिवसेनेच्या गट नेत्यांची बैठक घेऊन शक्ति प्रदर्शन केले. पहिल्यांदाच त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण मराठी समाचार वाहिनीवर पाहिले. त्यांच्या भाषणातील पहिला महत्वपूर्ण मुद्दा महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वात करोना काळात केलेल्या गौरवास्पद (?) कामगिरीचा होता. त्यांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची तुलना केली. आपल्या सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्र, करोंना मुळे सर्वाधिक मृत्यू झाल्या. महाराष्ट्रात उपचाराबाबतीत सावळा-गोंधळ होता. महाराष्ट्रातील कोविड केंद्रांची व्यथा मलाही अनेक नातेवाईकांकडून कळली. दुसरीकडे उत्तर प्रदेशात मा. योगी आदित्यनाथ यांनी प्रदेशातील सर्व हॉस्पिटल्स आणि कोविड केंद्रांचा दौरा करून तेथील व्यवस्था ठीक केल्या. त्यांच्या वडिलांचे निधन झाले तरी ते अन्त्यसंस्कारासाठी गेले नाही. परिणाम उत्तर प्रदेशात मृत्यू दर कमी होता. बाकी लूटियन मीडियाने उत्तर प्रदेश बाबतीत भरपूर खोटा प्रचार केला. पण ते विसरून गेले कोविन एपमुळे मृत्यू लपविणे कुणालाही ही शक्य नव्हते. याशिवाय कोविन एपमुळे "मुआवजा" मिळणार या आशेने इतर मृत्यू ही करोना मृत्यू दाखविणे संभव नव्हते. तसे असते तर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांनी प्रथम दोन स्थान निश्चित गाठले असते. मा. योगी प्रमाणे ठाकरेंनी जातीने लक्ष दिले असते तर महाराष्ट्रात मृत्यू कमी झाले असते.
दूसरा मुद्दा वेदान्त प्रकल्पाचा. शिंदे सरकारमुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला, असे ते म्हणाले. ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणण्याचा निश्चित प्रयत्न केला असेल. पण प्रकल्पाला लागणारी 1000 एकर जमीन तळेगांव किंवा इतर जागी राज्य सरकारच्या ताब्यात होती का? जमीन अधिगृहीत करण्याचा प्रयत्न माझ्या माहितीत नाही. महाराष्ट्रात वन विभागाची जमीन, पर्यावरणवादी सहजासहजी अधिगृहीत करू देतील का? आरे प्रकल्प ही अडीच वर्ष वर्ष का रखडला, याचीही माहिती सर्वांना आहे. या सर्वांची कल्पना वेदांताच्या मालकांना निश्चित असेल. या प्रकल्पात प्रशिक्षित कर्मचार्यांची गरज असल्याने स्थानिकांना किती नोकऱ्या मिळाल्या असत्या हाही मोठा प्रश्न? दुसरीकडे गुजरात सरकार दोन महिन्यात सर्व सुविधा पुरवू शकते असा पूर्व अनुभव टाटा मोटरच्या बाबतीत आहे. गुजरातची नापीक आणि वाळवंटी जमीन सहज अधिकृत करता येते. मोठ्या प्रमाणावर झाडे इत्यादि कापावी लागत नाही. त्यामुळे कोर्ट कचेर्या होण्याची संभावना कमीच. शिवाय तिथले विरोधी राजनेता ही राज्याचे हित प्रथम पाहतात. सारांश कुणाचीही सरकार असती तरी हा प्रकल्प महाराष्ट्रात येणे शक्य नव्हते.
याशिवाय मा. ठाकरे अनेक मुद्यांवर बोलले, दंग्यांच्या वेळी शिवसेनाने अल्पसंख्यक समुदायला सुरक्षा प्रदान केली होती. त्यांचे म्हणणे 100 टक्के बरोबर असेलच. बाकी मा. उप मुख्यमंत्री यांची शेवटची निवडणूक, गद्दार, गोचिड, रक्त इत्यादि ज्वलंत मुद्यांवर चर्चा करणे व्यर्थ.
प्रतिक्रिया
23 Sep 2022 - 2:46 pm | श्रीगुरुजी
ठाकरे, राऊत, सामना, त्यांचा चिल्लर पक्ष हे दुर्लक्षणीय आहेत. त्यांचं भाषण, त्यांच्यासंबंधीच्या बातम्या वगैरे मी बघत किंवा वाचत नाही. एखादा वृत्तवाहिनीवर यांच्यापैकी कोणीही दिसले तरी मी तात्काळ दुसऱ्या वाहिनीकडे वळतो. अजूनही काही जण असलं काहीतरी फालतू पाहतात हे वाचून धक्का बसला.
23 Sep 2022 - 2:52 pm | अमर विश्वास
त्यांच्या भाषणात फारस महत्व देण्यासारखे काहीच नसते त्यामुळे पास
23 Sep 2022 - 3:42 pm | कानडाऊ योगेशु
ते काहीही असले तरी त्यांच्या भाषणात कोट्या श्लेष वगैरेंची भरपूर रेलचेल असते.
उदा.
सध्याचेच
मिंधे सरकार
खोके हराम.
भाजपा ला अॅपटावले
तडफडणवीस
वगैरे वगैरे..
उध्दव ठाकरे साहित्यिक झाले असते तर जरा जास्त लोकप्रिय झाले असते असे वाटते.
23 Sep 2022 - 4:06 pm | कपिलमुनी
पुर्वग्रह , अर्धवट माहिती त्यामुळे या उंटावरून शेळ्या हाकणार्या लेखाला पास !
उठाचे भाषण आणि हा लेख सारखेच आहेत
23 Sep 2022 - 6:05 pm | विवेकपटाईत
कपिल मुनी मी कधीच उंटावरून शेळ्या हाकत नाही. वेदांत आणि इतर उद्योग बाहेर जातात त्याचे कारण इथली नकारात्मक राजनीतिक संस्कृती आणि लाल फिताशlही. येणाऱ्या प्रोजेक्ट्सला कसे हतोत्सहित हे पाहण्यासाठी नुकतेच गूगल केले आणि बातमी वाचून धक्काच बसला खालील लिंक मध्ये. कदाचित आपल्याला माहीत असेल नागपूर सर्व सुविधा असलेल्या शहरातआणि आसाम अगदी जंगलात दोन ठिकाणी फूड पार्कचे भूमिपूजन झाले होते. आसाम मध्ये वर्षाच्या आत 2017 मध्ये पार्क सुरू झाला . रस्ते वीज तिथे पोहचली. आज तिथे हजारो लोग काम करतात आणि लाखाचा वर शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दुसरीकडे आपला वीज विभाग फक्त १५ mw पुढील दोन वर्ष वीज पुरवठा करू शकत नाही. बाबांना आता पश्चात्ताप होत असेल. उगाच मा.गडकरींच्या नादी लागले.
https://www.nagpurtoday.in/flour-mill-project-stuck-patanjali-receives-j...
23 Sep 2022 - 6:29 pm | मुक्त विहारि
विशेषतः, कला आणि शास्त्र, यांची सांगड घातल्या पासून, मी तरी जमेल तेंव्हा ह्यांची भाषणे ऐकतो ...
भाषण करणे ही एक कला असली तरी, टोमणे मारणे, हे एक शास्त्र आहे...
24 Sep 2022 - 7:28 am | भीमराव
मृतदेह गंगेत वाहत होते गोदावरी किंवा चंद्रभागेत नाही. आणि मनुष्य बळ गुजरात पेक्षा महाराष्ट्रात कमी कुशल आहे हे कशावरून? ठाकरे, बिष्ट किंवा फडणवीस कोणीही आमचे पाहुणे रावळे नाहीत. पण गुजरात निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी खुप प्रयत्न करत महाराष्ट्रात आणलेल्या गुंतवणुकीचे पाय केंद्रीय सरकारांचे आशिर्वादाने गुजरात मध्ये वळवण्यात आले. यात केंद्रीय सरकाराने फडणवीस आणि महाराष्ट्र दोन्ही चे महत्व कमी केले हा छुपा फायदा सुद्धा झाला. एकंदरीत महाराष्ट्राने गुंतवणूक, नोकर्या, कर, नवीन स्टार्टअप हे तर गमावलेली पण फडणवीस कधी तरी पंतप्रधान होतीलच हि शक्यता सुद्धा गमावली. बाकी तुमचे एकांगी विचार ऐकून फार बरं वाटलं. कुणी कितीही टिका करुदे, तुमचा विचार मार्ग सोडु नका कारण अशा मराठी लोकांची केंदाच्या सरकारला फार गरज आहे. ्
3 Oct 2022 - 10:50 pm | पॉल पॉट
+१
1 Oct 2022 - 3:02 pm | सामान्यनागरिक
दखल सुद्धा घेऊ नये असे भाषण. मिपा वरील माननीय लोकांनी या वर आपला वेळ व्यर्थ घालवु नये हेच उत्तम. अनुल्लेखाने मारावे
3 Oct 2022 - 12:01 pm | विनोदपुनेकर
असे रोज विचारात बसलात तरी ठाकरे कोण हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही
शिवसेना हा संपलेला पक्ष आहे असे कितीही पब्लिक बोलत राहिली तरी कोण न कोण आयात केलेला प्राणी रोज पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्यावर बोलतच असतो.
बाकी जेवढ ठाकरेच भाषण नको वाटत तितकाच ते बेंबी च्या देढपासून किंचाळत भाषण केलेले आम्हास कुठल्या जन्माची शिक्षा असे वाटत राहते.
बाकी कोरोंना काळात आम्ही आमच्या महाराष्ट्रा मधे होतो हे आमचे नशीब, तिकडे असतो तर कुठे आमचा अंत्यविधी केला गेला असतं की सोडला असतं नदी मधे मधे देव जानो .
स्वतच्या कानाने एकलेले अनुभव : जागा मिळेल तिथे अंत्यविधी केले गेले आहेत उत्तर प्रदेश मधे कुठेही नोंद नाही त्यांची हे App वगैरे तिकडे चालत नाही
3 Oct 2022 - 10:50 pm | पॉल पॉट
+१