रविवार भटकंती - सायकल वर तिकोना पेठ - एक तिडंबन

Yogesh Sawant's picture
Yogesh Sawant in भटकंती
27 Sep 2022 - 9:48 am

पेरणा - उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची (पण यावेळी एनफिल्ड वर)

माझी जुनी सायकल अजूनही चांगली चालते तरीसुद्धा मला डोंगरात चालवता येईल अशी मरीन सॅन क्यूएनटिन १ सायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोरच्या डोंगरावर चालवून आलो.

Mountain Biking
हा फोटो त्या दिवशीच काढलेला आहे. तुम्ही आज बघताय.

Mountain Biking
हा फोटो आधी कधीतरी काढलेला आहे. तुम्ही आज बघताय.

Mountain Biking
घोरावडेश्वर डोंगरावर सायकल चालवत गेलो एकदा. हा फोटो आधी काढलेला आहे.

नवीन घेतली म्हणून जुनी विकली नाही. जुनी मी जवळपास छोट्या मोठ्या कामांना जाण्यासाठी वापरतो. भाजी किराणा वगैरे. तशी माझ्याकडे आणखी एक सायकल आहे. म्हणजे आता सगळ्या मिळून तीन आहेत. मागच्या वर्षी ह्या बिल्डिंग मध्ये राहायला आल्यावर माझी एक सायकल मी ह्या बिल्डिंगच्या वॉचमनला दिली. दान द्यायचेच असेल तर योग्य ठिकाणी द्यावे.

वृथा वृष्टि: समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम् ।
वृथा दानम् धनाढ्येषु वृथा दीपो दिवाऽपि च ॥

हि नवीन सायकल मी सहज चक्कर मारायला वगैरे रोज वापरत नाही. सुट्टीच्या दिवशी कुठेतरी घेऊन जातो. ह्या रविवारी तपन बरोबर प्लॅन ठरला होता. पण काही अपरिहार्य कारणामुळे तपन येऊ शकला नाही. एक लॉन्ग राईड तिकोना पेठ पर्यंत करून येऊ असं ठरवून घरातून सकाळी सात वाजता बाहेर पडलो. साधारण एक तासानी हॉटेल श्रीपाद इथे पोहोचलो. पोटात इंधन भरलं. मुळशी रस्त्याने पुढे निघालो. पुढचं पौड गाव आल्यावर खात्या हाताला वळण घेऊन कोळवण रस्ता घेतला. हा मुख्य रस्ता नसल्याने वर्दळ कमी. आज रविवार असल्याने बायकर्स होते.

Mountain Biking

हडशी गावातून पुढे गेल्यावर छोटं धरण आहे तिथे थांबलो. एका BMW मधून तीन जण आले होते. धरणाच्या भिंतीवर बसले होते. त्यातल्या एकाला म्हटलं माझा फोटो काढा. त्याने माझा फोटो काढल्यानंतर माझ्या सायकल वर बसून स्वतःच्या फोन मध्ये स्वतः चे फोटो काढून घेतले. मग इतर दोघांनीही माझ्या सायकल वर बसून आपापले फोटो काढून घेतले. हे मला नवीन नाही. पण त्यानंतर त्या पाहिल्याने माझ्या आणि सायकल च्या बाजूला उभा राहून माझा हात हातात धरून फोटो काढून घेतला. त्या तिघांचा निरोप घेऊन पुढे गेलो. धरणाच्या भिंतीवर एक फेरी मारली.

Mountain Biking

थोडा वेळ बसून पुढे निघालो. इथून पुढे तिकोना पेठ येईपर्यंत रस्त्याला तीन चढ आहेत. प्रत्येक चढ पार केल्यावर एक छोटी विश्रांती. तिकोना पेठ पासून पुढे डोंगर उतरून जाणारा मोठ्या उताराचा रस्ता आहे. त्याचसाठी मी इथे सायकल चालवतो. पवना धरणाच्या बाजूने पुढे जाऊन पवना नगर सोडल्यावर "हॉटेल चहा आणि बरंच काही" हि टपरी आल्यावर खात्या हाताला वळण घेतले. इथून पुढे छोटा रस्ता अर्डव शिवणे परंदवाडी ह्या गावातून एक्सप्रेस वे ओलांडून जुन्या मुंबई पुणे रस्त्याला लागतो. ह्या रस्त्याला वर्दळ अगदी कमी. सायकल अशा आतल्या वर्दळ नसलेल्या रस्त्यांनी चालवायची.

Traffic Jam

तळेगाव ते देहूरोड आणि पुढे रावेत एवढ्या अंतराला जुन्या मुंबई पुणे रस्त्याला चालवावी लागते. रावेतला हायवे सोडून ताथवडे रस्ता धरायचा. सरळ जात पुढे औंध बाणेर पाषाण मार्गे बावधनला परत. ५ च्या दरम्यान घरी पोहोचलो. ११० किमी आणि ९ तास अशा वेळात हि सायकल भटकंती पूर्ण झाली.

सायकल चालवत असताना मनातल्या मनात माझी जुनी माँट्रा आणि ही मरीन ची सॅन क्यूएनटिन १ सायकल यात मनातल्या मनात तुलना सुरु होती.
१. किंमत - माँट्रा पेक्षा मरीन सॅन क्यूएनटिन १ फारच महाग. दुपटीपेक्षा जास्त.
२. माँट्रा हि एन्ट्री लेवल माउंटन बाईक म्हणता येईल. मरीन सॅन क्यूएनटिन १ - खऱ्याखुऱ्या डोंगरात फिरवायची असेल तर हि एक उत्तम सायकल आहे
३. माँट्रा चालवताना माझी कधी पाठ दुखली नाही आणि मरीन सॅन क्यूएनटिन १ चालवताना पण नाही. स्वतःची उंची जितकी आहे त्यानुसार फ्रेम टायर इत्यादी ठरवून सायकल खरेदी करावी.
४. ऑफ रोड - मरीन सॅन क्यूएनटिन १ हि सायकल मी कसल्याही डोंगरात बिनधास्त चालवली आहे पण माँट्रा चालवताना तितकी ग्रीप येत नाही. घसाऱ्याच्या खडबडीत रस्त्यावर मरीन हातात असेल तर जास्त आत्मविश्वास वाटतो.
५. माँट्रा कि मरीन अशी जेव्हा द्विधा मनस्थिती असेल आणि ज्यांना वाटत असेल आपण सायकलिंग सुरु करतोय पण पुढची ग्यारंटी नाही त्यांनी माँट्रा सायकल घ्यावी कारण सुरुवात साध्या सायकलने करावी. तिची किंमत वसूल झाली तर मग पुढची घेण्याचा विचार करावा.
अर्थात हि सगळी माझी मते आहेत ज्याला जे आवडेल आणि पटेल अशी सायकल घ्यावी.

आदरणीय प्रचेतस यांची माफी मागून आणि त्यांना अभिवादन करून हे तिडंबन संपवतो. तसेच कॅलक्युलेटर भाऊंना फुकटचा सल्ला - कोण काय बोललं म्हणून स्वतःचा धागा कशाला उडवता. बिनधास्त राहा. काय वाट्टेल ते लिहा. कशाची पर्वा करू नका.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Sep 2022 - 9:55 am | मुक्त विहारि

आता कुणी कार, ट्रक ह्याच्यावर पण लिहील ....

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2022 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार

माझा गणेशा झालाय,

पण मूळ लेख लैच मिस करतोय

पैजारबुवा,

कंजूस's picture

27 Sep 2022 - 10:38 am | कंजूस

काय आहे एकदा सुरुवात झाली की रांगच लागते.

श्वेता व्यास's picture

27 Sep 2022 - 10:40 am | श्वेता व्यास

छान तिडंबन आहे पण फोटो दिसत नाहीयेत.

प्रचेतस's picture

27 Sep 2022 - 1:05 pm | प्रचेतस

लैच भारी =))
पण गणेशा झालाय.

पण त्यानंतर त्या पाहिल्याने माझ्या आणि सायकल च्या बाजूला उभा राहून माझा हात हातात धरून फोटो काढून घेतला

हे कहर आहे =))

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2022 - 1:09 pm | कर्नलतपस्वी

आजकाल डेटा रिडंडसी च्या जमान्यात हा लेख कमीत कमी शब्दांत कसा लिहावा ,कुणी सांगेल का?

कृ ह घ्या

माउंटन बाईक आहे पण तशी वर जाण्याची सायकल वाट आहे का?

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 8:30 pm | सिरुसेरि

मस्त . हाटीलाचे फोटो असते तर लेख वाचायला अजुन मजा आली असती .