रिक्षा चालकांचे अभिनंदन

हरकाम्या's picture
हरकाम्या in काथ्याकूट
2 May 2009 - 5:39 pm
गाभा: 

पुण्यातील सर्व रिक्षाचालक आणि मालक संपावर गेले आहेत कारण त्यांचे भाडे १ रुपयाने कमी करण्यात आलेले आहे.
मी या सर्व मंडळींचे खालिल गोष्टींसाठि अभिनंदन करु ईच्छितो.
१) संप करुन पेट्रोलचा खप कमी करुन देशाच्या बहुमोल अशा परकिय चलनाची बचत चालु केल्याबद्दल.
२) हवेचे प्रदुषण कमी करण्याला हातभार लावल्याबद्दल.
३) गेले दोन दिवस कुठलेही वादविवाद नसल्याने शांत झोप लागते त्याबद्दल.
४) आम्ही मुठभर लोक तुम्हाला वेठीला धरु शकतो ही जाणीव करुन दिल्याबद्दल.
तरी यासर्व मंडळींचे परत एकदा मनापासुन अभिनंदन या सर्व मंडळींची आम्हा जनतेवर अशीच क्रुपा रहावी.
ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया

अनंता's picture

2 May 2009 - 5:42 pm | अनंता

आमचेपण अभिनंदन पोचवा भाऊ त्यांच्यापर्यंत.
=))

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन ;)

सागर's picture

2 May 2009 - 5:56 pm | सागर

पेट्रोल च्या किंमती दोन वेळा कमी झाल्या तेव्हा यांचे भाडे तेवढेच होते याची सर्व रिक्षाचालकांना कल्पना नव्हती असे दिसते ;)

पेट्रोल कमी करताना ५ रुपये आणी रिक्षा भाडे कमी करताना फक्त १ रुपया?
बहुत नाईन्साफी है .....

रुपयाला रुपया कमी झाला तर कसे? रिक्षा ही लक्झरी नव्हे तर सोय आहे हे समस्त रिक्षा चालकांनी लक्षात घ्यावे..

एअरपोर्ट पासून माझ्या घरापर्यंत यायला पुण्यात १३० रुपये घेतात.... एवढ्याच पैशात मी संगमनेर - अहमदनगर अशा ठिकाणी एसटी ने जाऊ शकतो... हे गणित कोण आणि कधी जुळवेल? :(

संपाला शुभेच्छा.... पोटाला चिमटा बसल्यावर आपोआप ब्रम्हांड आठवेल.... पण सामान्य नागरिक यात भरडला गेला यात शंका नाही....

उमेश__'s picture

2 May 2009 - 7:04 pm | उमेश__

सहमत.....

माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता?
कोणत्या काळात सांगा सभ्य होती माणसे?

मराठमोळा's picture

2 May 2009 - 8:06 pm | मराठमोळा

त्याच काय आहे. मी जरी रिक्षावाल्यांच्या या मुद्द्याचे समर्थन करत नसलो तरी काही मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेतच.

१. सर्वच रिक्षावाले नालायक नाहीत (बहुतांशी आहेत.)
२. काही रिक्षावाले संपुर्ण घराचा खर्च रिक्षा चालवुन भागवतात. मुलांची शाळा, किराणा, दवाखाना ई. सर्व.
३. कोणाच्याही (आपल्यासुद्धा) बाबतीत पगारवाढ झालेली चालते, पगारकपात कोणालाच मान्य नसते कारण येणार्‍या उत्पन्नावर माणसाचे खर्च ठरतात. उदा. घराच्या कर्जाचा हफ्ता.
४. कमी मेहनतीत जास्त पैसा कोणाला नको असतो? त्यात पुण्यातली बरीचशी (पुणेकर) जनता २-३ किमी साठीसुद्धा बसने प्रवास करण्यात धन्यता मानते. मुंबईसारखी टॅक्सी सुरु झाली पाहिजे पुण्यात (सी एन जी वर चालणारी)

असो. तुमच्याही सर्व मुद्यांशी सहमत. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

तिमा's picture

2 May 2009 - 10:07 pm | तिमा

आम्हा मुंबईकरांना पुण्याच्या रिक्शात बसायला भीतिच वाटते. मीटर हा अक्षरशः पळतो. 'पडोसन सिनेमामधे ओमप्रकाश ज्या पध्दतीने काढलेले जोर मोजत असतो(१०-२०-३०-) त्याहीपेक्षा वेगाने म्हणजे २०-४०-६०- या वेगानेच आकडे पळत असतात. त्यामुळे मुंबईत साधारणपणे एखादे अंतर जायला जेवढे बिल होते त्याच्या दुप्पट पुण्यात होत, आणि यात जराही अतिशयोक्ति नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

लक्ष्मणसुत's picture

5 May 2009 - 4:22 pm | लक्ष्मणसुत

लक्ष्मणसुत उवाच्
ज्यांना खरंच पोटाची खळगी भरायची आहेत व जे खरोखरीच इमानदार आहेत, अशा रिक्षावाल्यांवर हा संप म्हणजे खरंच अन्याय आहे. तेव्हा त्यांनीच विचार करून मूठभर लोकांची अरेरावी झुगारून बिनधास्तपणे व्यवसाय करावा. भाडेकपात झाली तरी फायद्यात फारसा काहीच फरक पडत नाही, हे ध्यानात ठेवावे. काही तथाकथित पुढारी या गरिबांच्या जिवावर ऐश करतात हे त्यांना कळले पाहिजे.