बीट आणि नारळाची कोसांबरी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
28 Aug 2022 - 1:26 pm

दिवाळीची तयारी सुरू झाली,म्हणजे इट क्लीन :)
मागे इथेच कोसांबरीची रेसिपी कोसांबरी वाचली होती.साधी सोपी आवडली होती.
भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर यात होतो.मी बीट आणि ओल्या नारळाचा वापर केलाय.
प्रोटीन आणि आयर्न यांचा चांगला मेळ यात मिळतो.
साहित्य-
एक किसलेले बीट,काकडी,सफरचंद
एक वाटी किसलेले ओले नारळ
एक वाटी भिजवलेली मुगडाळ
एका लिंबाचा रस
चवीनुसार चिरलेली मिरची,मीठ,चाट मसाला,साखरदाणे
W
सर्व किसलेले बीट,नारळ,काकडी,सफरचंद,
भिजलेली मुगडाळ एकत्र करायची.
चवीनुसार लिंबाचा रस टाकावा किंवा दही.
मिरची कोथिंबीर,चाट मसाला,साखरदाणे टाकून एकत्र करावे.
आवड असल्यास मोहरी कढीपत्ता फोडणी द्यावी.
S
आजचा मेनू डोक्यात फिक्स होता.बीट कोसांबरी, कोथिंबीर थालीपीठ,कटाची आमटी आणि गरमगरम भात :)
T
-भक्ती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2022 - 2:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक.

-दिलीप बिरुटे

कटाची आमटी म्हणजे जीव की प्राण. कोशिंबीरही छान दिसतेय. तुम्ही कोसांबरी असे म्हटले आहे. गोव्यात किसमूर म्हणतात. म्हणजे त्यात जवळा वगैरेही असतो. चुभूद्याघ्या.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2022 - 6:11 pm | तुषार काळभोर

शेवटचं ताट. भरलेलं. साधं. सरळ. भूक जागवणारं आणि भूक भागवणारं.
उत्तम!!

अवांतर: कोसांबरीचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे भिजवलेली (हरभरा) डाळ. आण्णा प्रदेशात राहत होतो तेव्हा ऐकलं होतं. पण पहिल्यांदा खाल्लं ते लग्नानंतर एका पुणेरी तमिळ मित्राच्या घरी सपत्नीक जेवायला आमंत्रण होतं तेव्हा.

मदनबाण's picture

28 Aug 2022 - 6:58 pm | मदनबाण

भारी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

यश राज's picture

28 Aug 2022 - 7:13 pm | यश राज

वाह, खूप छान वेरिएशन..
दिसायला पण सुंदर

Bhakti's picture

28 Aug 2022 - 7:28 pm | Bhakti

धन्यवाद यशराज |
तुमच्या रेसिपीमुळेच ही रेसिपी शोधली.

बिरूटे सर|तुषार|मदनबाण धन्यवाद|
गवि,
होय गोव्यात सुकट पासून करतात हा पदार्थ.कोसांबरी दक्षिणेकडे म्हणतात.विशेष करून त्यात कैरी असेल तर असे म्हणतात असे दिसतेय.
बाकी कोसांबरी-डाळ असल्यास म्हणत असावे हा कयास.
अशाप्रकारची रेसिपी आणि नाव या ठिकाणी दिसतेय बीट कोसांबरी

मस्त 👍 ह्याच रेसिपीत सफरचंदाच्या ऐवजी 'मुळा' असा छोटासा बदल आणि 'दाण्याचे कूट' ह्या एका पदार्थाची भर घालून "बीट आणि नारळाची कोसांबरी" बनवण्यात येणार आहे!

होय होय मुळा वापरायला पाहिजे.मला आधी मुळा फारसा आवडत नाही.आता आवडतो.
धन्यवाद संजय|