ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
21 Aug 2022 - 9:01 pm
गाभा: 

आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे.
कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ? याची उत्तरे येत्या काळातच मिळेलच.

जाता जाता :- मैने कहा था न, एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे. :- इति चतुर रामलिंगम :)))

मदनबाण.....

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Aug 2022 - 9:33 pm | कंजूस

पण हिंदी सिनेमाचे हिरो कुणाला करायचं हे दुबईतले प्रड्युसर ठरवतात असं ऐकून आहे.

धर्मराजमुटके's picture

21 Aug 2022 - 9:52 pm | धर्मराजमुटके

आपण सर्वसामान्य लोक छोट्या छोट्या गोष्टींत किती आनंद शोधतो नाही काय ? असो.
बॉलीवूड चे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत याचे कारण हिंदू / मुस्लीम, बॉयकॉट यापेक्षा
पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) एकच उत्तर- ‘न फिरविल्यानें’ हे आहे असे मला व्यक्तीशः वाटते.

आपण सर्वसामान्य लोक छोट्या छोट्या गोष्टींत किती आनंद शोधतो नाही काय ?
सामान्य माणसातच असामान्य गोष्टी घडवुन आणण्याची शक्ती असते. :) दु:ख शोधण्या पेक्षा आनंद शोधणे उत्तम ! :)

पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) एकच उत्तर- ‘न फिरविल्यानें’ हे आहे असे मला व्यक्तीशः वाटते.
कावळ्याचा शाप आणि गाय मेली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV Ramakrishnan

मदनबाण's picture

21 Aug 2022 - 10:17 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV Ramakrishnan

विजुभाऊ's picture

22 Aug 2022 - 12:04 pm | विजुभाऊ

हिंदी सिनेमाचे इस्लामिकरण याचे मला नेहमी नवल वाटते.
हीरो हीरोईन व्हिलन यातील कोणीच मुस्लीम नाही. तरीही गाण्यात सगळे जण इन्शाअल्ला असे ओरडतात ( चित्रपट वेलकम)
हीरो हीरोईन व्हिलन यातील कोणीच मुस्लीम नाही. तरीही गाण्यात हीरॉईन मुझे प्यार हुवा अल्लामिया असे म्हणते ( चित्रपट जुदाई)
हे अर्थात आजचे नाहिय्ये. अगदी दीवार चित्रपटात देखील आहे.
देवाला प्रसंगी जाब विचारणारा ,पूर्णपणे नास्तिक असणारा नायक ७८६चा बिल्ला खिशात जपत असतो.
एखाद्या सिनेमाततरी बिगरहिंदू हीरो हीरोईन ने गणपतीला , शंकराला साकडे घातल्याचे कधीच दिसत नाही.
हल्ली तर कपाळाला कुंकू / टिकली लावलेली हीरॉईन दिसतच नाही. हिजाब , जाळीदार टोप्या, पठाणी ड्रेस असलेले लोक सिनेमात बरेच वेळा दिसतात.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

22 Aug 2022 - 12:41 pm | ॲबसेंट माइंडेड ...

एक गाणे आठवले. शिर्डीवाले साईबाबा. चित्रपट अमर अकबर ॲंथनी.

या असल्या भगव्या आतंकवाद्यांच्याया प्रपोगंडाला ला भुलून जाऊ नका भाऊ
छ्या छ्या .. असल काही नाही हो
आम्ही हिंदू फार म्हणजे फार प्रेमळ आहोत ...
आम्हाला जगाला दाखवून द्यायचं कि आम्ही किती "आ बैल मुझे मार" या तत्वावर जगतो ....
आमच्य्या किनई राष्ट्रपित्यानी आम्हाला लहानपणी पाजलंय ( न्नानामृत ) कि एकदा डाव्या गालावर थप्पड खाल्ली कि उजवा पुढे करावा ! आणि इंग्रजीत म्हणतात तसे रिपीट अँड रिंनझ वॉशिंग मशिन सारखे चालू .. खा थपडा

विजुभाऊ's picture

22 Aug 2022 - 12:11 pm | विजुभाऊ

आज टीव्हीवर बातमी ऐकली
" समोरून जर तयारी दाखवली तर आम्ही टाळीद्यायला तयार आहोत " हे शर्मिला ठाकरेंनी एका मुलाख्कतीत सांगितले.
मनसे या क्षणी तरी उद्धव सेनेसोबत युती करेल असे वाटत नाहिय्ये. उद्धव सेना या वेळेस सेनेच्या इतिहासात सर्वात अप्रिय बनलेली आहे.
अशा वेळेस पवार आणि सोनीयांच्या सोबत असलेल्या उद्धव सेनेशी युती करणे ही मनसे साठी सर्वात मोठी चूक होईल.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2022 - 1:30 pm | श्रीगुरुजी

शून्य कोणत्याही संख्येत मिळविले किंवा कोणत्याही संख्येतून वजा केले तरी मूळ संख्येत बदल होत नाही. मनसे शून्य आहे.

पण एखाद्या संख्येला शून्याने गुणले तर ते त्या सम्ख्येला शून्याला मिळवते.
मनसे मते खाणारी पार्टी होऊ शकते.
शरदपवारांनी हा खेळ खेळला होता.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2022 - 6:34 pm | श्रीगुरुजी

१ पेक्षा कमी मूल्य असलेल्या संख्येने कोणत्याही दुसऱ्या संख्येला गुणले तर दुसऱ्या संख्येचे मूल्य कमी होते.

भाजपने हा वाईट अनुभव महाराष्ट्रात अनेकदा घेतलाय. तरीही अक्कल येत नाही.

एका शेतकर्‍याच्या हातावर सतरा पिशव्या फ्लॉवरसाठी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका व्यापार्‍याने साडेनऊ रूपये टेकवले आहेत अशी बातमी आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmer-in-pune-spendi...

पूर्वी असल्या बातम्या आल्या की वाईट वाटायचे. पण आता काहीही वाटत नाही. एपीएमसी मधील दलालांचे वर्चस्व मोडून काढायला कृषी कायदे आणले होते त्याला त्या दलालांनी विरोध केला तेव्हा सगळे विरोधक 'मोदी अडचणीत सापडले आहेत' म्हणून टाळ्या पिटत होते. शेतकर्‍यांनीही कुठेही आम्हाला कृषी कायदे हवे आहेत अशी मागणी केल्याचे फारसे कुठे वाचले नाही. समजा अगदी कृषी कायद्यांचा उपयोग झाला नसता तरी साडेनऊ रूपयांपेक्षा आणखी किती रक्कम मिळणार होती? मिळाली असती तर ती किमान तेवढी किंवा जास्तच असती ना? मग कृषी कायदे राहिले असते तर काय बिघडणार होते? अशा लोकांसाठी अश्रू ढाळायची अजिबात गरज नाही.

आग्या१९९०'s picture

22 Aug 2022 - 1:41 pm | आग्या१९९०

कृषी कायद्यात कृषी उत्पादनाला हमीभावाचे संरक्षण नव्हतेच, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच नसते किंवा कमी झाले असते अशी खात्री देऊ शकत नाही. खूप पळवाटा आहेत शेतकऱ्यांना लुटायला, खासकरून नाशवंत मालाच्या बाबतीत.

शेतकऱ्यांना फक्त दलालच फसवतात असे नाही, सरकारही फसवते. जे सरकार कांद्याला जीवनावश्यक वस्तूमधून वगळते आणि महिन्याभरात कांद्याचे भाव वाढल्यावर कांदा निर्यातबंदी आणि कांद्याचे भाव पडायला मदत करते अशा सरकारने आणलेले कृषी कायदे काय शेतकऱ्यांचे भले करणार?

राज्य सरकारही अपवाद नाही.महाराष्ट्राच्या नवीन सरकारने पावसाची आकडेवारी
शेतकऱ्यांसाठी बंद केली आहे. हे सगळे विमा कंपन्यांसाठी केले आहे. अशी हिम्मत महाराष्ट्र सरकार कसे करू शकले? दिल्ली वाऱ्या फुकट नाही केल्या.

रात्रीचे चांदणे's picture

22 Aug 2022 - 6:14 pm | रात्रीचे चांदणे

कांद्याच्या बाबतीत सहमत. केंद्र सरकारनें लय धरसोड वृत्ती दाखवली आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांचा विरोधामुळे नाहीतर पंजाब निवडणुकीमुळे रद्द केले असतील. पावसाच्या आकडेवारीच माहिती नव्हतं. गेल्या वर्षी आम्हालातरी भरपूर विमा मिळाला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना दुष्काळ पडला असताना पेट्रोलवर्ती काहीतरी टॅक्स लावला होता दुष्काळ संपूण २-३ महिने झालेतरी फडणवीसांनी काढला नव्हता. पावसाची आकडेवारी ची बतमी खरी असेल तर विमा कंपन्या फायदा उचलणार

आग्या१९९०'s picture

22 Aug 2022 - 7:46 pm | आग्या१९९०
रात्रीचे चांदणे's picture

22 Aug 2022 - 6:06 pm | रात्रीचे चांदणे

भारताने नागरिकत्व न दिल्यामुळे १५०० पाकिस्तानी हिंदू नागरिकांनी परत पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकत्व द्यायचंच नव्हते तर एवढा विरोध करून कायदा कशाला केला काय माहिती.

त्यांच्यातील काही पूर्ण धर्माचे नाव मातीत घालतात

पाकिस्तानी हिंदू आहे हा, २०१६ साली ह्याला नागरिकत्व दिलं आहे आणि ह्या बहाद्दर बुवाने असे पांग फेडले आहेत.

आयतं कोलीत विरोधकांच्या हाती.

भारतीय नागरिकत्व देण्यासाठी काही निकष असतील, काही तपासण्या करत असतील ना ...

Nitin Palkar's picture

22 Aug 2022 - 7:19 pm | Nitin Palkar

खानावळीला आणि एकूणच बॉलीवूडला चांगलाच झटका मिळालेला आहे. हिंदू धृवीकरण होत आहे हे नक्कीच सुचीन्ह आहे.

आग्या१९९०'s picture

22 Aug 2022 - 7:35 pm | आग्या१९९०

हिंदू धृवीकरण होत आहे हे नक्कीच सुचीन्ह आहे
धर्माचे ध्रुवीकरण झाले की पुढे जातींचे ध्रुवीकरण सुरू होते, ते थांबवणे अशक्य होऊन जाते.

"जातींचे ध्रुवीकरण सुरू होते," या भीती पोटी हिंदू म्हणून एकत्र यायचं नाही का?

अगदी धार्मिक म्हणून नको, पण एक "सामाजिक समूह" म्हणून तरी एकत्र आले आणि त्यायोगे "दुसऱ्यांनी गृहीत धरून सतत टपली मारणे" या प्रवृत्तीला आळा बसला तर काय हरकत आहे ?

अनेक हिंदूंना तुम्ही विचार त्यांना टोकाची धार्मिकता नकोच आहे एवढेच काय भारत हा हिंदुराष्ट्र सुद्धा व्हावा असे सुद्धा वाटतं नाहीये ..
पण हिंदूंना योग्य तो मान देणारे राष्ट्र हवे आहे .... खरा सर्वधर्मसमभाव हवा आहे . , सामान कायदा हवा आहे ,
कांग्रेस ने हे केले असते तरी चालले असते ... त्यासाठी संघ आणि भाजप सत्तेत यायची वाट पाहण्याची जरुरीचं नवहती
मी एक हिंदू म्हणून " आधी देश मग धर्म" हे कधीही मान्य कार्याला तयार आहे

बघा लक्षात येत का काय म्हणतोय ते

(हिंदूंचा असा बुद्धिभेद आधीच करायचा हे हि एक टूल किट मधील टूल दिसतंय त्यामुळे या म्हण्यायचा कितपत परिणाम होणार आहे हे कोण जाणे )

जेम्स वांड's picture

23 Aug 2022 - 7:30 pm | जेम्स वांड

तुम्हाला हिंदू धर्म, बिगर हिंदू धर्म, हिंदुत्ववादी राजकारण, तुष्टीकरण इत्यादी इत्यादी कशाचा सर्वाधिक राग येतो त्याची एक जंत्री करून त्याला एकदमच टूलकिट मधील विविध टूल्स, एक संकीर्ण सूची ह्या नावाने ती प्रसिद्ध करता येतील का सर ??

सेम विरोधक पण बोंबलत असतात, काहीही केलं तरी त्याला टूलकिट म्हणणे ही भाजपने त्यांच्या समर्थकांना शिकवलेली टूलकिट आहे म्हणतात, नेमकं काय ह्यावर आम्हा सामान्यजन लोकांची फारच गैरसोय होते समजायला राव.

काहीही केलं तरी त्याला टूलकिट म्हणणे

प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत आहे टूलकिट.. ठराविक हास्यस्पद/ मगरीचे अश्रू अश्या पद्धतीचं गोष्टींना म्हणले जाते

सूची करू कि त्यात काय अवघड आहे
कुठून सुरु करू
मिया खलिफा ( मी भाजी खाते म्हणून मी शेतकरी आंदोलनाशी जोडलेली)
मल्लाला युसूफ
- ३०३ आले हे नाकारत येत नाही मग घाला काड्या - मोदींपेक्षा वाजपेयी कसे चांगले
- पगडी नको पागोटे ( महाराष्ट्र्र स्पेशल )
- - हिंदू धर्मातील अंधश्रद्धा फक्त दिसणे , (वेचक ( सिलेक्टिव्ह ) इतर धर्मातील वाईट गोष्टीं बद्दल मौन

वांड साहेब करा तुम्ही चेष्टा माझ्य मुद्याची पण मूळ मुद्दा बघा... आणि त्याचे उत्तर द्या कि
धर्मांधता ना करता जर एखाद्याच्या धर्माचे आनुयायी एकत्र आले तर काय बिघडले ?
का फक्त ख्रस्ती आणि मुस्लिमांनाच तो अधिकार आहे

भारतात हिंदूंना गृहीत धरून किती तरी वेळा अन्याय केला गेला आणि जातोय हे उघडकीला आले आहे आणि जनतेने ते दाखवून दिले आहे
त्याकडे दुर्लक्ष तुमच्यासारखी करीत राहतात

जेम्स वांड's picture

25 Aug 2022 - 12:26 pm | जेम्स वांड

एक मिनिट, मी तुमची चेष्टा वगैरे अजिबातच करत नाहीये किंवा

धर्मांधता ना करता जर एखाद्याच्या धर्माचे आनुयायी एकत्र आले तर काय बिघडले ?
का फक्त ख्रस्ती आणि मुस्लिमांनाच तो अधिकार आहे

असेही मी अजिबातच म्हणत नाहीये, किंबहुना हिंदूंनी एकत्र यायला हवे हे मला पण पटते, फक्त सतत अन्याय झाला हो म्हणत बसलो तर एकत्र यायला काँक्रिट बेस काय तयार होतोय ते मला कळत नाहीये, एकत्र येणे ह्याबद्दल काही स्पेसिफिक पॉइंट्स असतील तर ते सांगा की, म्हणजे आंतरजातीय विवाह, जाती अंत इत्यादी काही तरी, हे झालं एक, दुसरं म्हणजे

भारतात हिंदूंना गृहीत धरून किती तरी वेळा अन्याय केला गेला आणि जातोय हे उघडकीला आले आहे आणि जनतेने ते दाखवून दिले आहे
त्याकडे दुर्लक्ष तुमच्यासारखी करीत राहतात

जनतेने दाखवून दिल्यावरही आमच्यासारख्या दुर्लक्ष करतात म्हणजे काय ? मी जनता नाही का मी अमान्य आहे जनता म्हणून आपणांस ? उगाच काहीही काय राव बोलता!

चौकस२१२'s picture

25 Aug 2022 - 3:30 pm | चौकस२१२

एकत्र येणे ह्याबद्दल काही स्पेसिफिक पॉइंट्स असतील तर ते सांगा

हे एकत्र येणं जे मी म्हणत आहे ते काही हिंदुत्व कसा श्रेष्ठ आहे/ धर्माचा प्रसार या साठी नाहीये हे आधी स्पष्ट करतो
स्पेसिफिक पॉइंट्स
१) समूह म्हणून आपणास कोणी उगीच ढकलत नाहीये ना आणि असले तर एकत्र आल्याने तसे होण्यावर आळा बसेल म्हणून
२) हलाल खद्य सारखया गोष्टींची ची सक्ती अप्रत्यक्ष पणॅ होते अश्या गोष्टींना आळा घालने ( अर्थात " हलालचं प्रसारामागे काही हेतू नाहीये" असे कोणाचे म्हणणे असले तर प्रश मिटला ) उदाहरण म्हणून मी आणि माझे मीत्र येथील भारतीय दुकानात जाऊन मुद्डमून विचारतो कि आम्हाला हलाल नसलेल्या गोष्टी पाहिजेत .. हा प्रसार करताना आम्ही कोणाला सांगायला जात नाही कि तुम्ही घेऊ नका , आम्ही फक्त ग्राहक म्हणून आमचे मत मांडतो
३) एक धर्म म्हणून या या प्रसारामध्ये हे गृहीत आहे कि " जातीतील भांडणे टाळा आणि जातिभावं कमी करा" ( मला वाटते यात आपले एकमत असावे )
मी स्वतः संघात कधी गेलो नाही पण मीत्रान्चातून ऐकले आहे कि तिथेही फक्त धर्म / राष्ट्र आणि समाज याबद्दल बोलले जाते - ना भाषा ना जात ( असो संघ हा काय कसा हा विषय येथे नाही )
तुम्हाला फक्त तोच मुद्दा दिसतो असे मला वाटते ... मला त्याबरोबर अनेक इतर हि मुद्दे दिसतात (चला हे मान्य हि करतो कि तुम्हाला हि दिसत असतील पण तुम्हीं लिहितांना फक्त "मग जातीचे ध्रुवीकरण होयील " असे लिहिलेत म्हणून हे सगळे पुढे
४) हिंदू धर्माबद्दल ( विशेषसा करून पाश्चिमात्य देशात) जो चुकीचा प्रसार केला जातो त्याला थांबवणे आपले मुल्य वाढवणे

किंबहुना हिंदूंनी एकत्र यायला हवे हे मला पण पटते,

पटते ना मग यात "जात" यावरच का बोललात म्हणून मी प्रतिसाद दिला ...

जेव्हा आपण हिंदू आणि इतर धर्म या बाबत बोलतो तेवहा हिंदू धर्मातील जात विवाद हे सतत उकरून जर कोणी काढत असले तर कोण्ही विचारणारच कि "काय रे बाबा तुला तेवढेच दिसते का ???"

जनतेने दाखवून दिल्यावरही आमच्यासारख्या दुर्लक्ष करतात म्हणजे काय ?

म्हणजे आज जो हिंदू उघड्पणे एकत्र येऊन म्हणतोय " कि आमच्या चांगुलपणाचा फायदा घेणं बस झाल" ते तुमचं सारखया "जनतेला " दिसत नाही का?

जेम्स वांड's picture

25 Aug 2022 - 3:49 pm | जेम्स वांड

तर जाती अंतावर का बोलू नये ??

तुम्हाला मी जातीवर बोललेले दिसते पण तुम्ही स्वतः अतिशय docile पॉइंट्स ते पण दरवेळी पाश्चिमात्य देशांतील परिस्थितीला अनुसरून मांडत बसता असेही म्हणायला स्कोप आहेच ना ?

कसं आहे चौकस जी, लोकल ग्रोसरिज मध्ये जाऊन नॉन - हलाल प्रमाणित वस्तू मागणे हे तुमच्या इको सिस्टम मध्ये नक्कीच स्तुत्य असेल किंवा परिणामकारक असेल,

इथे भारतात तो सीन नाही, हलाल हराम पेक्षा मोठे प्रश्न आहेत इथे, आणि मी टीपिकल भूक गरिबी वगैरे डावे प्रश्नच मोजत नाहीये तर शिस्तीत जातीचा उल्लेख करतोय, का करतोय ? हे पण explain करतो.

एकत्र कोणाला आणायचं आहे ? हिंदूंना ? बरोबर ? मग जगातील सर्वाधिक नंबर्स मध्ये हिंदू कुठे राहतात ?? भारतात बरोबर ?? भारतात हिंदू एकतेला बाधा कोण आणतोय ? तथाकथित हलाल समर्थक का जात ?? माझ्यामते दोन्हीही तुल्यबळ आहेत हिंदूंच्या एकीला बाधा आणण्यात. तुमच्या ऑस्ट्रेलियन हिंदू perspective मध्ये जात महत्वाची फॅक्टर नाही म्हणून सर्वाधिक हिंदू असणाऱ्या भारतात आम्ही ती दुर्लक्षित का करावी ?

इथं जरा काही झालं का जातीनिहाय गट, दबावगट, वगैरे कामाला लागतात, तेव्हा कोणाच्या डोक्यात हिंदुत्व नसते, मला वाटते पहिले ते ओक्के केले तर नंतर ते एकत्र येणे अन् हलाल हराम ला विरोध शक्य होईल सुलभपणे.

फक्त तुमचं परसपेक्टिव मी अमान्य करतो म्हणून मला तुमच्यासारखे लोक वगैरे बोलण्याची आपणांस काही खास गरज नाही इतके बोलून रजा घेतो

जाता जाता - जात अंत करण्याची सगळ्यात पहिली गरज सावरकरांनी बघितली होती, आता फक्त त्यांना कायम जात जात करत म्हणून दोष तितका देऊ नका. धन्यवाद.

चौकस२१२'s picture

25 Aug 2022 - 7:29 pm | चौकस२१२

इथं जरा काही झालं का जातीनिहाय गट, दबावगट, वगैरे कामाला लागतात,
भारतात हिंदू एकतेला बाधा कोण आणतोय ? तथाकथित हलाल समर्थक का जात ??
हलाल विरोधी भूमिकेचा भारतातील हिंदू एकत्रीकरनांशी कुठे तसा असंबंध जोडला मी फक्त एक लांबचा फायदा सांगितला
मी ऑस्ट्रेलियातील संधर्भ दिला त्याचा अर्थ तो भारताला लागू होतो असे कुठे म्हणलय ? ...

जात विवाद निश्चितच या एकीकरणामध्ये आड येतो हे खरे पण याचा अर्थ
हिंदू एक होऊ द्या म्हणले कि लगेच त्याचे रूपांतर "जातीचे ध्रुवीकरण" हेच का बर सुचत ?
एवढच मला विचारायच होत
तुम्ही तो सन्धर्भ लावलात म्हणून मला तुम्ही "हिंदू एकतर व्हावा" या कल्पनेचं विरोधात आहात असे वाटले म्हणून

जात अंत करण्याची सगळ्यात पहिली गरज सावरकरांनी बघितली होती
हे तर मनातलं बोललात

जाता जाता " तुम्ही स्वतः अतिशय docile पॉइंट्स ते पण दरवेळी पाश्चिमात्य देशांतील परिस्थितीला अनुसरून मांडत बसता "
अ सयुक्तिक किंवा दर्पोक्ती असले तर दाखवा !
मी खूप काळजी पूर्वक उल्लेख करतो प्रत्येक ठिकाणी इथे असे आहे म्हणून भारतात असे वैगरे म्हणत नाही
आणि मिपाकर जगभरातील आहेत जिथे संबंध आहे एकाद्या चर्चेत आंतरराष्ट्रीय गोष्टींचा तेव्हा उल्लेख केलं तर काय बिघडले ?

रेल्वे च्या धाग्यवर रेल्वे संबंधित उयेथील माहिती दिली तर चुकलं का ?
किंवा चुकून कधी पाकक्रियांत येथील उप लब्ध पदारथाचा उल्लेख केला ते चुकलं का ?
अरे बापरे ,, माझ्य कधी कधी बाहेरील जगातील संधर्भ देण्याचा एवढा त्रास होत असेल तर काय बोलणार

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 6:51 am | जेम्स वांड

माझ्य कधी कधी बाहेरील जगातील संधर्भ देण्याचा एवढा त्रास होत असेल तर काय बोलणार

माझ्या बोलण्याचा तिसराच अर्थ काढण्याचे आपले ठरले असेल तर माझा खरेच नाईलाज आहे पण स्पष्ट करतो की संदर्भ देण्याचा त्रास मुळीच नाही, फक्त तुमचा अन् माझा परस्पेक्टिव हा अतिशय वेगळ्या कोनातून एकच मुद्दा पाहणे आहे, असे असते बऱ्याचवेळा, एकमेकांचे दृष्टिकोन कमजून घेणे उत्तम नसल्यास जर आपले म्हणणेच "My way or the Highway" असेल तर मला नाही वाटत बोलायला काही उरेल.

- (लेखन सीमा) वांड

जेम्स वांड's picture

23 Aug 2022 - 7:25 pm | जेम्स वांड

पाकिस्तानात चुकून मिसाईल फायर करण्याच्या घटनेत ३ वायुसेना अधिकाऱ्यांवर ठपका ठेऊन त्यांची सेवा समाप्त करण्याचा (Termination) निर्णय घेतला आहे.

सदर ०३ अधिकाऱ्यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे नीट पालन न केल्यामुळे त्यांना बडतर्फ करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे असे समजते.

निनाद's picture

26 Aug 2022 - 5:32 am | निनाद

स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे नीट पालन न केल्यामुळे त्यांना बडतर्फ करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे हे बरोबर केले आहे.
बाँब न बसवता मिसाईल फायर करणे अगदी चुकीचे आहे.

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 6:53 am | जेम्स वांड

उद्या अहमदनगरच्या के के रेंजेस वर लोडेड मिसाईल वापरून "शत्रूला टार्गेट करा" म्हणाल तुम्ही सर.

थंड घ्या जरा.

तर्कवादी's picture

24 Aug 2022 - 12:28 am | तर्कवादी

नुपूर शर्मा प्रकरणासंबंधीचा धागा वाचनमात्र झाला !!

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 7:00 am | जेम्स वांड

का हो ?

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 8:46 am | शाम भागवत

व्हायलाच पाहिजे होता.
नुपूर शर्माला उसकवणारा खरा गुन्हेगार आहे. असे अस्तिनितले निखारे शोधून बाजूला करणे आवश्यक असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी अशा प्रकारच्या धाग्यांची काय जरूरी?
इथे नुपूर शर्माचेही चुकलेच. समोरचा उचकवतोय म्हटल्यावर आणखी थंड डोक्याने उत्तरे द्यायला पाहिजे होती. तीचे पद तिला ती जबाबदारी घ्यायला लावत होती.

किसान आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक मेला म्हणणारे घरभेदे शोधले पाहिजेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे लोकांच्या लक्षात यायला लागलेय. आज ना उद्या जनता हे करणारच आहे. मग मात्र चित्र वेगाने बदलायला लागेल. तोपर्यंत वाट पाहणे आले.
_/\_

वामन देशमुख's picture

24 Aug 2022 - 5:43 pm | वामन देशमुख

नुपूर शर्माला उसकवणारा खरा गुन्हेगार आहे. असे अस्तिनितले निखारे शोधून बाजूला करणे आवश्यक असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी अशा प्रकारच्या धाग्यांची काय जरूरी?

अगदी बरोबर आहे. गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?

आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी

अगदी बरोबर आहे. मोदींनी, त्या टीव्ही शोमध्ये ज्या इसमाने श्री शंकराबद्धल अपमानजनक वक्तव्य केले त्याला इसमाला सोडून दिले, आणि त्या इसमाला प्रत्युत्तर देणाऱ्या नुपूर शर्मांना मात्र सर-तन-से-जुदा होण्याच्या मार्गावर पाठवले.

किसान आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक मेला म्हणणारे घरभेदे शोधले पाहिजेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे लोकांच्या लक्षात यायला लागलेय. आज ना उद्या जनता हे करणारच आहे. मग मात्र चित्र वेगाने बदलायला लागेल. तोपर्यंत वाट पाहणे आले.

तुम्ही राजदीप सरदेसाईंबद्धल बोलताय का? ते जर गुन्हेगार असतील तर गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?

आज ना उद्या जनता हे करणारच आहे.

बंदोबस्त जर जनताच करणार असेल तर मोदींचे काय काम आहे? मला वाटलं होतं की शासन चालवण्यासाठी जनतेने मोदींना निवडून दिलेलं आहे!

---

स्पष्टीकरणे

मोदी = केंद्र सरकारची यंत्रणा वगैरे
मिपा = सामान्य नागरिक वगैरे

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 8:15 pm | शाम भागवत

धन्यवाद.

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 8:16 pm | शाम भागवत

धन्यवाद.

अहो का म्हणून काय विचारताय.. त्या CSMT चौकात जशी पोलिसांची हाणामारी झाली तशीच तगड्या मिपाकरांची हाणामारी टळावी म्हणून चौक म्हणजे धागाच बंद केला असावा गृहमंत्र्यांनी बोले तो संपादकांनी. ..ना रहेगा बास ना लडेगी लाठी (बासूरी तर दूर राहिली आता !!)

टीप : प्रतिसाद उगाच गांभीर्याने घेवून माझ्या डोक्यात कुणी लाठी हाणू नये विनंती !! नाहीतर मी आपला शिरस्त्रण घालून बसतो
🪖

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 8:17 am | जेम्स वांड

घ्या हो महाराजा

CSMT चौकात आराम वडापाव सिग्नलला ऑन ड्युटी आणि ऑफ ड्युटी पोलीसच एकमेकांत भिडले, फुल चौकातच लठ्ठा लठ्ठी झाली, नंतर पूर्ण वरात पोलीस स्टेशनला पोचली, FIR नाही का दंगा करणाऱ्या ५ पोलिसांची मेडिकल नाही फक्त दोन हवालदार कंट्रोल रूमला attach केले ट्रान्स्फर करून.

कसं म्हणतात बरं ते, हां!

ह्या राज्यात पोलीसच असे वागू लागले तिथे जनतेकडे कोण बघणार असे काहीसे, नाही का ?

गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य काय म्हणतील इकडे लक्ष लागून आहे, कुठल्यातरी अविकसित राज्याच्या पोलिसांसारखे राजधानीच्या मुख्य चौकात पोलीस आपापसात मारामाऱ्या करून राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर टांगतायत तिथे सदनात पावसाळी अधिवेशन अनायासे सुरू आहेच त्यामुळे सदर प्रकरणावर गृहमंत्र्यांचे निवेदन अपेक्षित आहे असे वाटते मला तरी.

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 8:37 am | शाम भागवत

मविआच्या सरकारात असे कधी झालेच नाही. त्यामुळे असं कधी लिहिण्याची वेळच आली नव्हती. हे नवीन सरकार आले आणि काय काय सुरू झाले.
अबा तुम्ही कुठे आहात?
लवकर या. अशी संधी सोडू नका. तुमची जागा कोणीतरी बळकावील बर का.?
:))
कृ.ह.घ्या.

माविआ गेले हे एक बरे झाले बुवा. आता सगळ्यांचेच मेंदू अधिक कार्यक्षम होऊन काय बोलावं हे वेळोवेळी सुचेल.

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 11:20 am | शाम भागवत

अरे बापरे
वांडोबा.
सॉरी बरका.
माझे काम झालंय.
:)
पुन्हा एकदा क्षमस्व.

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 12:02 pm | शाम भागवत

फक्त अबांबद्दलच्या तुमच्या टिपणीबाबत असहमत.
त्यांच्यामुळे मला बराच फायदा झालेला आहे.
त्यांची मते खोडून काढण्याच्या नादात इतरांनी बरीच महत्वाची व अधिकृत माहिती टेबलावर आणली. जी मला सहजगत्या उपलब्ध झाली नसती.
त्यांचे बाबत मी एकदा कृतज्ञताही व्यक्त केली होती.
फक्त त्यासाठी मिपावरून काय घ्यायचे व काय इथेच ठेवायचे हे कळले की झाले. :))
असो.
माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाल्या असल्यास परत एकदा मनापासून क्षमस्व.
_/\_

तुम्ही मला ज्या सभासदांची जागा घेऊन तसे व्हायला (हलक्यात घ्या म्हणत) सांगता आहात ते व्हायला अंगभूत उद्धटपणा, बिना वाचनाचा अतिरेकी आत्मविश्वास लागतो, ते काही जमणार नाही, त्यामुळे हलक्यात पण यापुढे असले काही सुचवू नका

जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...

Trump's picture

24 Aug 2022 - 12:06 pm | Trump

जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...

करा.

यात गृहमंत्र्यांचे काय निवेदन अपेक्षित आहे?

जे काही आहे ते वृत्तपत्रात आले आहे यावर गृहमंत्री फार तर खात्यांतर्गत चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आला कि सविस्तर निवेदन करण्यात येईल असे सांगतील.

कोणेतेही सरकार आले तरी हीच स्थिती असेल. पाच पोलिसांनी मारामारी केली म्हणून म वि आ सरकारचा गृहमंत्री असता तरी काय केले असते? यामुळे राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर कशी काय टांगली जाते हे समजले नाही.

त्यांना मारामारी करायला गृह मंत्री/ गृह खात्याने किंवा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले नव्हते

दोन चार पोलिसांची आपापसात मारामारी होणे हे काही नवीन नाही. पोलीस लाईन मध्ये या गोष्टी सहज होत असतात. माणसे अत्यंत तणावाखाली असतात त्यामुळे ठिणगी पडली तरी आग लागण्यास वेळ लागत नाही.

प्रत्येक गोष्ट कागदोपत्री आणायची ठरवली तर सरकारी कामे करणे अशक्य होऊन बसेल.

थर्ड डिग्री लावली जाते हे सर्वाना माहिती आहे परंतु कोणता पोलीस अधिकारी हे कागदोपत्री मान्य करेल? असे करायला लागलात तर निम्म्या गुन्ह्यांचा तपस अशक्य होईल.

ज्या दोन शिपायांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे तेथे त्यांची कसून चौकशी होईल. चौकशी याची होईल कि हे पोलीस रस्त्यावर नक्की काय करत होते आणि जेथे ते होते तो त्यांच्या कार्यकक्षेचा विभाग होता कि नाही

हप्ता गोळा करत होते कि सेटिंग लावत होते अशा गोष्टी उघड गुपिते आहेत.

बाकी चालू द्या

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 10:20 am | जेम्स वांड

नक्की ना ?

तुमचं पण चालू द्या मग, प्रतिसाद संग्राह्य ठेवायला उत्तम आहेत आपले !

=))

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 10:59 am | जेम्स वांड

जे काही आहे ते वृत्तपत्रात आले आहे यावर गृहमंत्री फार तर खात्यांतर्गत चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आला कि सविस्तर निवेदन करण्यात येईल असे सांगतील.

तुमचं त्यांचं काही तसं ठरलं आहे का आपापसात ? नसल्यास त्यांना तितकं तरी सांगू देत इतकी नम्र विनंती करतो.

यामुळे राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर कशी काय टांगली जाते हे समजले नाही.

थोडा चष्मा बाजूला सारून अभ्यास वाढवा, कळेल.

त्यांना मारामारी करायला गृह मंत्री/ गृह खात्याने किंवा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले नव्हते

अतिशय बाळबोध प्रतिवाद न करण्यालयाक वाक्य, गृहमंत्री तर हाय प्रोफाईल केसमध्ये पण कोणाला गुन्हा करा सांगत नाही, शीना बोरा मर्डर करायला गृहमंत्र्यांनी सांगितले नव्हते टाईप अतार्किक विधान करताय तुम्ही, पोलीस रक्षक असावेत ही अपेक्षा आहे, असे होणे अन् त्याचा प्रेस रिपोर्ट येणे ह्याने optics खराब होतात सरकार अन् प्रशासनाचे, लक्षात आले तर बघा पण हे मारामारी प्रकरण कुठंतरी एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द मध्ये घडलेली नाही तर मुंबईत एका मोठ्या ठिकाणी घडली आहे.

दोन चार पोलिसांची आपापसात मारामारी होणे हे काही नवीन नाही. पोलीस लाईन मध्ये या गोष्टी सहज होत असतात. माणसे अत्यंत तणावाखाली असतात त्यामुळे ठिणगी पडली तरी आग लागण्यास वेळ लागत नाही.

पोलिस लायनीत आणि सी एस एम टी चौकात आपल्याला फरक कळत नसेल तर खरेच चष्मा काढण्याची किंवा नंबर तरी तपासण्याची गरज आहे.

प्रत्येक गोष्ट कागदोपत्री आणायची ठरवली तर सरकारी कामे करणे अशक्य होऊन बसेल.

हो का ? मग काय करायला हवं तितकं बोला, हे तेच पोलीस आहेत ज्यांच्यावर सरकार बदलेपर्यंत सकाळ ते संध्याकाळ आगपाखड होत होती.

थर्ड डिग्री लावली जाते हे सर्वाना माहिती आहे परंतु कोणता पोलीस अधिकारी हे कागदोपत्री मान्य करेल? असे करायला लागलात तर निम्म्या गुन्ह्यांचा तपस अशक्य होईल.

म्हणून झाल्या प्रकारावर एक नागरिक म्हणून अपेक्षा पण व्यक्त करू नयेत असं ?

ज्या दोन शिपायांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे तेथे त्यांची कसून चौकशी होईल. चौकशी याची होईल कि हे पोलीस रस्त्यावर नक्की काय करत होते आणि जेथे ते होते तो त्यांच्या कार्यकक्षेचा विभाग होता कि नाही

जर तर मंडीत असल्यामुळे जरतारी वाक्य फाट्यावर

हप्ता गोळा करत होते कि सेटिंग लावत होते अशा गोष्टी उघड गुपिते आहेत.

मिपावर चर्चा होणाऱ्या विषयांत बहुसंख्य विषय अशी उघड गुपिते असतात, करतो का मग मेगा बायटी बंद तुम्ही आम्ही ? राजकीय चर्चा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता अलिप्त राहून करता येतात बुआ आम्हाला तरी, कारण शेवटी मवीआ येऊ का भाजप का ई. डी. सरकार लटकणार आम्ही लोकलमध्ये आहेच रोज, हे आमचं तरी क्लिअर आहे.

बाकी चालू द्या

हे पालुपद दरेक प्रतिसादात न लावले तरी चालेल अशी नम्र सूचना सर, एव्हाना, तुम्ही स्वतः सोडून पूर्ण जगाला अन् खासकरून थोडं विरोधी बोलणाऱ्या मिपाकर जनतेला तुच्छ समजता हे बऱ्यापैकी क्लिअर आहे, त्यामुळे लेखन कष्ट नाही घेतलेत तरी चालेल, तुमच्यालेखी आम्ही तुच्छ आहोत हे कळले आहे आम्हाला नीट. धन्यवाद.

सर टोबी's picture

24 Aug 2022 - 11:20 am | सर टोबी

तो आय डी जी जी विशेषणं दुसऱ्यांसाठी वापरतात आणि ज्या प्रकारे इतरांची संभावना करतात ते सर्व त्यांनाच चपखल लागू पडते. त्यांची आवडती पालुपदं अशी: या बोटावरची थुंकी त्या बोटावर घेणे, आपण हसे दुसऱ्याला शेम्बुड आपल्या नाकाला वगैरे. यांचे पंतप्रधान महागाईला जबाबदार नसतात, चीनी आक्रमणाला जबाबदार नसतात, स्त्रियांवरील अत्याचाराला जबाबदार नसतात, धार्मिक विद्वेषाला जबाबदार नसतात, यांचे राज्यातील गृहमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार नसतात. आणि रामराज्य चालवण्याची जबाबदारी फक्त भूतपूर्व अथवा विद्यमान नावडत्या पक्षाच्या नेत्यांची असते.

सुबोध खरे's picture

24 Aug 2022 - 7:11 pm | सुबोध खरे

@सर टोबी

घाव वर्मी लागलेला दिसतोय.

संबध नसताना येथे दुसरीकडचं सगळं धुणं धुवायला काढलंय

उगी उगी

सुबोध खरे's picture

24 Aug 2022 - 7:09 pm | सुबोध खरे

अरे हो हो एवढे संतापायला काय झालं ?

हायला

हे काही पोलिसांनी पाच निर्बल सामान्य नागरिकांना बेदम मारलेलं नाही.

तसं असतं तर सामान्य माणसांना ज्यांना प्रतिकार करता येत नाही त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाद्द्ल वादंग झाला म्हणता येईल.

पाच तुल्यबळ नागरिकांनी आपापसात मारामाऱ्या केल्यावर लगेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाला म्हणता का?

दोनात काही तरी फरक आहे ते समजून घ्या.

खात्यांतर्गत चौकशी नावाचे काही असते याबद्दल आपल्याला माहिती आहे का?

आणि अशा चौकशीबद्दल सगळं छापून येतं का?

आणि गृहमंत्री यांनी अंतर्गत कलह किंवा ताणतणाव असे चव्हाट्यावर मांडावेत असं आपला म्हणणं आहे का?

तसं असेल तर मग काहीच म्हणायचं नाही.

त्यामुळे लेखन कष्ट नाही घेतलेत तरी चालेल,

जसे माझे प्रतिसाद न वाचता फाट्यावर मारण्याचे आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य आहे.

तसेच आपली हि सूचना फाट्यावर मारण्यात आलेली आहे.

तुमचंच बरोबर.

कपिलमुनी's picture

24 Aug 2022 - 10:29 am | कपिलमुनी

युती सरकार आल्यापासून आता सगळे छान चालू आहे त्यामुळे अधिकाऱ्याला राणेकडून मारहाण , पोलिसांची हाणामारी, शेतकऱ्याची अधिवेशनादरम्यान मारहाण वगैरे घटना भक्तपुजारी यांना दिसत नाहीत त्यामुळे ते गायब मोड मध्ये आहेत

कपिलमुनी's picture

24 Aug 2022 - 10:30 am | कपिलमुनी

युती सरकार आल्यापासून आता सगळे छान चालू आहे त्यामुळे अधिकाऱ्याला राणेकडून मारहाण , पोलिसांची हाणामारी, शेतकऱ्याची अधिवेशनादरम्यान आत्महत्या वगैरे घटना भक्तपुजारी यांना दिसत नाहीत त्यामुळे ते गायब मोड मध्ये आहेत

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2022 - 1:35 pm | श्रीगुरुजी

पोलिसांना दरमहा १०० कोटी खंडणी वसुलीचे लक्ष्य देणे, एका पोलिस अधिकाऱ्याने दुसऱ्याची गाडी चोरून त्यात स्फोटके ठेवून अंबानींच्या घरासमोर ठेवणे, ज्याची गाडी चोरली त्याचा त्या पोलिस अधिकाऱ्याने खून करणे, त्या पोलिस अधिकाऱ्याची प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याने पाठराखण करणे या घटना दिसल्या होत्या का? द्वेषाची पट्टी नेत्रांवरून उतरवली असती तर दिसल्या असत्या कदाचित.

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 11:28 am | शाम भागवत

आता धागा योग्य मार्गावर आल्यासारखा वाटतोय.
माझे काम झाले.
हुश्श्
:)

प्रसाद_१९८२'s picture

24 Aug 2022 - 11:34 am | प्रसाद_१९८२

ब्रम्हांडातील सर्वात इमानदार, केजरीवालची नवीन दारु पॉलिसी.
--

डँबिस००७'s picture

24 Aug 2022 - 9:08 pm | डँबिस००७

सांबित पात्रा का प्रेस कॉंफेरेंस ,
मनिष सिसोदीयाको चॅलेंज !!

https://youtu.be/iYnduXp2kVU

आम्ही संस्कृती जपणारी लोक, आणि पवारांची शिकवणुक जपणारी लोक आहोत अश्या तक्रारी श्री अमोल मिटकरी यांच्याकडुन बघुन अम्मळ गंमत वाटली.

Amol Mitkari Reaction : आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ झाली : अमोल मिटकरी

महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल

विधानभवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी-महेश शिंदेंमध्ये धक्काबुक्की

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 12:06 pm | जेम्स वांड

म्याव म्याव (ड्रग नाही आवाज) काढण्यापासून सुरुवात झाली असावी का ?

असा प्रश्न पडतोय.

विजुभाऊ's picture

24 Aug 2022 - 12:11 pm | विजुभाऊ

महाराष्ट्र , मविआ , शिंदे गट हे सोडून जगात इतरही काही घडामोडी घडतात.
रशियाला अजूनही युक्रेन चा सोक्षमोक्ष लावता आलेला नाही.
तैवान आणि चीन दरम्यान नवीन तणाव निर्माण झालेला आहे
पाकिस्तानात इम्रान खान यांच्यावर अटकेची कारवाई होउ घातली आहे.
श्रीलंकेतली परिस्थिती अजूनही तशीच आहे.

या सर्वात घडा पेक्षा मोडी च जास्त झालेल्या आहेत.
एकच वेगळी बातमी आहे ती म्हणजे james webb telescope ने गुरूच्या चंद्राचे काढलेले नवे फोटो

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 12:16 pm | जेम्स वांड

मला ज्या विषयांत रस असेल मी तोच बोलणार, अन् जोवर मी मिसळपाव मालकांनी आखून दिलेल्या मर्यादेत लिहितोय तोवर मला माझ्या आवडीच्या विषयावर लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. असे मला वाटते, उगाच वर्तमानपत्रात आलेले विज्ञान तंत्रज्ञान अन् जागतिक राजकारण विषयात रस नसलेल्या माणसाने वाचकांचा पत्रव्यवहार करू नये त्या विषयात इतके सिंपल आहे ते, तुम्ही सोडवा रशिया युक्रेन तिढा, कोणी हरकत घेत नाही बघा.

मला ज्या विषयांत रस असेल मी तोच बोलणार, अन् जोवर मी मिसळपाव मालकांनी आखून दिलेल्या मर्यादेत लिहितोय तोवर मला माझ्या आवडीच्या विषयावर लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. असे मला वाटते

धन्यवाद श्री जेम्स वांड.
हेच स्वातंत्र्य श्री विजुभाऊ आणि इतरांनाही आहे. तुमचे हा प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळले नाही.

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 12:32 pm | जेम्स वांड

वाचले तर कळेल की ते स्पष्टीकरण आहे विजुभौंसाठी, किंबहुना विजुभौंना आवडेल त्या विषयात त्यांनी लिहावे असेही आहे त्यात नमूद, पण

Selective वाचन करून कोण्या एकाला टार्गेट करण्याचा आपला मानस असल्यास माझा आपणांस आदरपूर्वक पास राहील कायम.

Trump's picture

24 Aug 2022 - 12:38 pm | Trump

वाचले तर कळेल की ते स्पष्टीकरण आहे विजुभौंसाठी, किंबहुना विजुभौंना आवडेल त्या विषयात त्यांनी लिहावे असेही आहे त्यात नमूद, पण
श्री विजुभाऊ ना तर तुमचे नाव त्यांच्या प्रतिसादात लिहीले होते, ना तो प्रतिसाद इतर कोणत्याही प्रतिसादाला उपप्रतिसाद होता. त्यामुळे तुम्ही इतक्या तत्परतेने स्वतःवर विनाकारण ओढुन घेउन, मनाला लाऊन घेउन त्यावर त्यांना उपदेश केला यांचे विशेष वाटले.

Selective वाचन करून कोण्या एकाला टार्गेट करण्याचा आपला मानस असल्यास माझा आपणांस आदरपूर्वक पास राहील कायम.

कृपया व्यक्तिगत टिप्पणी टाळावी.

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 1:07 pm | जेम्स वांड

अती झालं अन् हसू आलं, तुमचे मानस आता स्पष्ट झाल्यामुळे यापुढे तुम्हाला आमचा पास.

त्यामुळे तुम्ही इतक्या तत्परतेने स्वतःवर विनाकारण ओढुन घेउन, मनाला लाऊन घेउन त्यावर त्यांना उपदेश केला यांचे विशेष वाटले.

परत LoL.

श्री विजुभाऊ ना तर तुमचे नाव त्यांच्या प्रतिसादात लिहीले होते, ना तो प्रतिसाद इतर कोणत्याही प्रतिसादाला उपप्रतिसाद होता.

LoL, मिपावर कोणी कोणत्या प्रतिसादाला प्रत्युत्तर द्यायचे ह्याचे कायदे असल्यास इथे मांडा, असे काही कायदे नसल्यास मला नाही वाटत मी कुठलेही मिपा धोरण तोडतो आहे, बाकी अजूनही काही खदखद असल्यास सरळ संपादक मालक वगैरेंना तक्रार करून टाका आमची.

व्यक्तिगत टिप्पणी टाळा म्हणत एखाद्याला टार्गेट करून त्याच्यामगे हात धुवून लागण्याची वृत्ती पण विकृतच म्हणायला हवी असे वाटते. गामा सॉरी trump जी, सावरा स्वतःला.

गामा सॉरी trump जी, सावरा स्वतःला.

कृपया खोटी माहिती पसरवणे टाळावे.

LoL, मिपावर कोणी कोणत्या प्रतिसादाला प्रत्युत्तर द्यायचे ह्याचे कायदे असल्यास इथे मांडा, असे काही कायदे नसल्यास मला नाही वाटत मी कुठलेही मिपा धोरण तोडतो आहे, बाकी अजूनही काही खदखद असल्यास सरळ संपादक मालक वगैरेंना तक्रार करून टाका आमची.

बर असु द्यात. मुद्दे संपले की असले प्रतिसाद येतात.

ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”

https://www.loksatta.com/mumbai/raj-thackeray-slams-owaisi-brothers-over...

राज यांनी ओवेसी बंधूंपैकी एकाने गणपती आणि लक्ष्मीचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केल्याचा संदर्भ आपल्या भाषणात दिला.

जेम्स वांड's picture

25 Aug 2022 - 10:21 am | जेम्स वांड

संघ नेतृत्वाच्या होकारा नंतरच नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय कार्यसमिती मधून डच्चू देण्यात आला असे हा रिपोर्ट म्हणतो आहे. अर्थात पेपर टाईमस् ऑफ इंडिया असल्यामुळे रिपोर्ट वर किती भरवसा ठेवावा हा यक्षप्रश्न असतोच कायम तरीही

हे विधान गडकरींना भोवले असण्याचा किती चांस असू शकेल ??

ज्या संस्थेमार्फत आपल्याला पदे मिळाली त्याच संस्था संघटनांना अडचणीत आणणे ते तसेही फारसे शहाणपणाचे नाही.
गडकरींनी सिन्हा किंवा पंकजाताई यांच्या दिशेने वाटचाल करू नये इतकीच इच्छा आहे...

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 8:30 am | जेम्स वांड

प्रश्न दुसरा आहे, असे जर भाजपने केले तरी त्याला राजकीय अधिष्ठान असल्याचे मानले जाऊ शकते, पण संघ ?

एक म्हणजे संघ ही राजकीय संघटना नाही हे संघ कायम सांगत असतो,

संघाची ताकद ही संघाचे कॅडर बेस्ड structure आहे, गडकरी स्वतः ह्या कॅडर मधून विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा वगैरे इत्यादी करत वर चढले आहेत. गडकरी नवखे भाजप कॅडर नसून ओरिजिनल संघाचं कॅडर आहे.

हेच करायचं तर काँग्रेस अन् भाजप (दुर्दैवाने आता संघ) फरक काय, त्यांनी जे काही पी व्ही नरसिंह राव ते हल्ली नटवर सिंह सोबत केले तेच जर इकडे रिपीट होणार असेल तर काय अर्थ आहे ?

बॉटम लाईन - ह्यामुळे विरोधक भाजपवरील जे पक्षांतर्गत विचार वैविध्याला थारा न देण्याचा आरोप करतात तो संस्थात्मक पातळीवर जातो इतकेच म्हणणे आहे.

तुम्ही चुकीच्या दिशेला चालला आहात.
गडकरी जाऊ नयेत अशी इच्छा आहे, गेलेत असे म्हटलेले नाही.

बाकी इतर माध्यमे जे करतायत तेच तुम्ही पण केलेत शेवटी.

पंकजा मुंडे - जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 11:43 am | जेम्स वांड

गडकरी जाऊ नयेत अशी इच्छा आहे, गेलेत असे म्हटलेले नाही.

गडकरी गेलेत असे कुठे म्हणले आहे ? पण एकंदरीत गडकरी साईड लाईन झालेत हे नाकारण्यात काही पॉइंट नाही.

.

वरील फोटो पासून, संसदीय कार्य समिती बाहेर फेकला गेलेला माणूस होय गडकरी..

मला वाटतं एक चित्र १००० शब्दांपेक्षा जास्त बोलके असते, म्हणून इथेच थांबतो.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2022 - 8:50 am | श्रीगुरुजी

गडकरींना हटविण्याची तयारी सुरू, गडकरींचे पंख कापले इ. फक्त बिनडोक वाचाळ मूर्ख माध्यमांचे जावईशोध आहेत.

मागील वर्षी विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नेमण्यात आले, पंकजा मुंडेंना कोणत्या तरी केंद्रीय समितीत घेतले तेव्हा याच मूर्ख माध्यमांनी गवगवा केला होता की या दोघांचे पुनर्वसन झाले. परंतु हे दोघे राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील राजकारणात क्वचितच दिसतात. परंतु ते राजकारणातून जवळपास अदृश्य झाले आहेत. खरं त्यांना योजनाबद्ध पद्धतीने संपविण्यात आले आहे. परंतु मूर्ख माध्यमांना हे कळतच नाही. गडकरींच्या संदर्भात माध्यमांचा तोच मूर्खपणा सुरू आहे.

आनन्दा's picture

26 Aug 2022 - 10:44 am | आनन्दा

https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-nitin-gadkari-delhi-srivinas-mu...

ही बातमी पहा, शीर्षक काय आणि बातमी काय याचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

याला अजेंडा पत्रकारिता नाहीतर काय म्हणायचे? आणि अश्या गोष्टींच्या आधारावर गडकरी नाराज वगैरे ओरड चालू आहे..

शाम भागवत's picture

26 Aug 2022 - 11:12 am | शाम भागवत

शिंदेंची शिवसेना पाहिजेच.
🦁🦁🦁🦁
फडणवीस वाईट्ट!!!
🏃🏃🏃🏃🏃

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 11:48 am | जेम्स वांड

१. कितीही स्मायली टाकल्या तरीही तुमचा सात्विक संताप लपत नाहीये.

२. फडणवीस वाईट्ट आहेतच असा तुमचा आग्रह असेल तर मान्य बुआ , तुमचा मान राखायचा म्हणून.

तेही ताबडतोब.
😀

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 12:04 pm | जेम्स वांड

काँग्रेस नेते आणि हल्लीच काँग्रेस ग्रुप ऑफ २३ ह्या नाराज काँग्रेस नेत्यांच्या गटातील महत्वाचे नेते गुलाम नबी आझाद ह्यांचा काँग्रेस सभासदत्व आणि सर्व पार्टी पदावरून राजीनामा

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2022 - 2:37 pm | श्रीगुरुजी

कॉंग्रेसला अखेरची घरघर लागली आहे आणि हे ओळखूनच ३-४ दिवसांपूर्वीच सोनिया, राहुल व प्रियांका भारतातून कोठेतरी बाहेरच्या देशात गेले आहेत. ते अमेरिकेला रवाना झाले आहेत असे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. सोनिया गांधीची नियमित तपासणी हे सांगण्याचे कारण ( भारतात तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक नसल्याने अत्यंत नाईलाजाने त्यांना अमेरिकेत जाऊन तपासणी करावी लागते). प्रत्यक्षात ते नक्की कशासाठी व कोणत्या देशात गेले आहेत परमेश्वर जाणे.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2022 - 2:05 pm | श्रीगुरुजी

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-uddhav-thackeray-sambhaji-...

चंद्रकांत पाटलांची निराशा. संभाजी ब्रिगेडने भाजपऐवजी सेनेच्या गळ्यात वरमाला घातली. काही महिन्यांपूर्वी पुरूषोत्तम खेडेकरने भाजपशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर, अश्या अत्यंत जातीयवादी संघटनेशी आम्ही अजिबात युती करणार नाही, असे थेट सांगण्याएवजी, आधी त्यांचा अधिकृत प्रस्ताव येऊ दे, मग विचार करू असे सांगून अश्या जातीयवादी संघटनेशी युती करण्यास आम्ही तयार आहोत असे प्रतिध्वनित केले होते.

परंतु आता ब्रिगेडने सेनेची निवड केल्याने चंद्रकांत पाटील नक्की निराश झाले असणार.

मुस्लिम लीग, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या तद्दन कट्टर जातीयवादी पक्षांशी युती केल्यानंतर आता ब्रिगेडशी युती करून शिवसेनेने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.

जातपात न पाळणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे अश्या भ्रमात असणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असेल. ज्यांचे १८ पैकी १४ खासदार एकाच जातीचे आहेत, तो पक्ष जातीनिरपेक्ष असूच शकत नाही. ब्रिगेडशी युती करून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकंच.

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 2:28 pm | जेम्स वांड

असंगाशी संग अन् प्राणाशी गाठ

आणि

विनाशकाले विपरीत बुद्धी

ह्या दोन म्हणी प्रकर्षाने जाणवल्या.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2022 - 2:31 pm | श्रीगुरुजी

बुडत्याला काडीचा आधार ही म्हण जास्त संयुक्तिक वाटते.

चौकस२१२'s picture

27 Aug 2022 - 8:54 am | चौकस२१२

शेकाप = कट्टर जातीयवादी?
काय? त्यांचे नेते एक शरद जोशी म्हणून होते ना ?
असो ब्रिगेड ला ठाकरे कसे चालतात? ठाकरे म्हणजे पाठारे प्रभू म्हणजे ब्रिगेड च्या दृष्टीने "शोषण करणारे सवर्ण"
त्यात जखमेवर मीठ म्हणजे ठाकरेंची होम मिनिस्टर "पाटणकर"

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 10:15 am | श्रीगुरुजी

शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा कट्टर जातीयवादी पक्ष होता. यांचे एक जुने नेते जेधे जाहीर सभेत एका विशिष्ट जातीला लक्ष्य करायचे. मुळात या पक्षाची स्थापनाच एका विशिष्ट जातीच्या द्वेषातून झाली होती.

शरद जोशींचा व शेकापचा कणभरही संबंध नाही. शरद जोशी हे शेतकरी नेता. त्यांनी एक शेतकरी संघटना स्थापन करून सुरूवातीला कांद्याला भाव मिळण्यासाठी रस्ता रोको हे अभिनव आंदोलन सुरू केले होते ज्याची व्याप्ती नंतर खूप वाढली. ते उजव्या विचारांचे होते. शेतकऱ्यांवर, शेतमाल उत्पादनावर कोणतीही सरकारी बंधने नसावीत, सरकारने शेती या विषयात अजिबात लक्ष घालू नये, सरकारने किमान भाव वगैरे ठरवू नये, शेतकऱ्यांना स्वतःच भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य असावे, डंकेल आणि गॅट हे करार शेतकऱ्यांना उपयुक्त आहेत असे त्यांचे मत होते. मोदींनी आणलेल्या कृषी कायद्यांचे त्यांनी स्वागत केले असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2022 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांनी शेकापची स्थापना का केली ते एकदा जालावर वाचून यायला पाहिजे. उगाच आपल्या शेठसारखी फेकाफेकी थापाथापी करु नये असे वाटते.

कामगार वर्गाला, शेतक-याला, श्रमजीवी जो जो असेल त्या माणसाला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन करुन सरळ अश्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करुन खेड्यापाड्यात कॉंग्रेसच्या भांडवलदारी पुढारपणाला खाली खेचून श्रमजीवी वर्गला मार्क्सवादी विचारांच्या छावणीत आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या सिध्दहस्त लेखणीने व जुगलबंद वक्तृत्वाने शंकरराव मोरे यांनी पार पाडले. आजही मार्क्सवाद व लालबावटा खेड्या-पाड्यात दिसून येतो त्याचे कारण ते 'शेकाप' काम आहे. पहिल्याचे निवडणुकीत अठ्ठावीस आमदार निवडून आले. शंकरराव मोरे लोकसभेवर निवडून गेले. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी नेमकी या पक्षात फ़ाटाफ़ूट झाली. सर्वाधिक विरोधी पक्षनेतेपद यांच्याकडेच राहीले तो रेकॉर्ड आजही अबाधित असावा. कॉंग्रेसच्या ध्येय धोरणाला विरोध केला म्हणून जातीयवादीपक्ष म्हणुन काँग्रेसने त्यावेळी टिका केलेली दिसते, तसा तो नव्हता ते स्पष्ट करण्याची गरज नाही.

दुसरे नेते, केशवराव जेधे हे ब्राम्हणेतर चळवळीचे नेते होते, त्यामुळे 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' या त्या काळाच्या वादात जेथे-जवळकरांच्या वकृत्वाने जे चटके दिले ते त्या काळच्या परिप्रेक्ष्यातून आज त्याची चर्चा करुन वाद वाढविण्यात अर्थ नाही. म्हणून थांबतो. बाकी चालू द्या.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 11:33 am | श्रीगुरुजी

अपेक्षित सदस्याकडून असत्य लिहून अपेक्षित समर्थन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2022 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतत असत्य लिहुन लिहुन, कोणतेही सत्य हे असत्यच असते.
असे समजून लिहिलेला आपला अपेक्षित प्रतिसाद.

चालु द्या.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 1:30 pm | श्रीगुरुजी

हे तुम्हालाच लागू आहे, मला नाही.

शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा कट्टर जातीयवादी पक्ष होता. यांचे एक जुने नेते जेधे जाहीर सभेत एका विशिष्ट जातीला लक्ष्य करायचे. मुळात या पक्षाची स्थापनाच एका विशिष्ट जातीच्या द्वेषातून झाली होती.

शेकाप हा जातीयवादी पक्ष असल्याचे मी प्रथमच वाचतो आहे. एक नेता जातीयवादी वक्तव्य करायचा म्हणुन पुर्ण पक्ष जातीयवादी असे असेल तर किती पक्ष चांगले म्हणुन शिल्लक राहतील.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 2:00 pm | श्रीगुरुजी

शेकापच्या एका दुसऱ्या आमदाराने "शंबुकाचा खुनी राम व त्याची वानरसेना" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते. या पक्षाची विचारसरणी आणि तामिळनाडूतील रामस्वामी नायकरच्या द्रविड कळघम या पक्षाच्या विचारसरणीत बरेच साम्य आहे. हिंदूविरोध, एका विशिष्ट जातीचा द्वेष हा समान पाया. द्रविड कळघमने तामिळ अस्मिता, द्रविड संस्कृती, आर्य अनार्य या अतिरिक्त गोष्टी वापरल्या.

हे वाचा.

शेकाप विचारसरणी

संभाजी ब्रिगेडचा नेता प्रवीण गायकवाड काही वर्षांपूर्वी समविचारी शेकाप मध्ये गेला होता हे पुरेसे सूचक आहे.

Photos : आदित्य ठाकरेंनंतर शरद पवारांची नात आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार देशाचं प्रतिनिधित्व; जाणून घ्या देवयानी पवार आहेत तरी कोण?
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3093715/ncp-sharad-pawa...

शिवसेनेप्रमाणे आता राकॉचीपण आता राजकुमारी रिंगणात. इतरांच्या पोरांनी उचला सतरंज्या.

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 2:46 pm | जेम्स वांड

ताजी घडामोड : गुलाम नबी आझाद ह्यांचे सोनिया गांधींना लिहिलेले ०५ पानांचे स्फोटक राजीनामा पत्र

.
(पान क्र. १)

.
(पान क्र. २)

.
(पान क्र. ३)

.
(पान क्र. ४)

.
(पान क्र. ५)

कपिलमुनी's picture

26 Aug 2022 - 3:09 pm | कपिलमुनी

पत्र लिहिण्याएवढे स्वातंत्र्य आहे हे बघून बरे वाटले, नैतर गडकरी सारखे व्हायचे , आपलीच मोरी आणि मुतायची चोरी

जेम्स वांड's picture

26 Aug 2022 - 3:47 pm | जेम्स वांड

विरोध ठीक आहे, पण आझाद गडकरींच्या पलीकडे गेलाय हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यानं स्वातंत्र्य आहे म्हणून नाही तर ते असो/ नसो फरक पडत नाही ह्या फ्रस्ट्रेशन मधून ते पत्र लिहिले आहे.

गडकरी अजून तिथवर पोचलेले नाहीत अन् कदाचित मानसिकतेचा व्यावहारिक पिंड असल्यामुळे पोचणार सुद्धा नाहीत असे वाटते.

डँबिस००७'s picture

26 Aug 2022 - 8:36 pm | डँबिस००७

बातम्यातली ठळक बातमी
NDTV ला अडानीने विकत घेतल. NDTV चे २९% शेअर अडानीने विकत घेतलेले आहेत. त्याच्या पुढे अजुन २६% शेअर हस्तांतरीत करुन NDTV ला पुर्ण आपल्या कब्ज्यात करायचा मानस आहे. अश्या प्रकारे पुरोगामी लिबरल लोकांचे मुखपत्र हरवले आहे.
ह्या अपसेटींग घडामोडीची काहीच कल्पना NDTV च्या मालकांना म्हणजे प्रणय रॉय , राधिका रॉय ह्यांना नव्हती असा दावा उभयतांनी केलेला आहे. अडानी NDTV च शेअर खरेदी करणार ह्याची चर्चा गेले वर्षभर मिडीयातुन होत होती.
ह्या बातमीच्या निमित्याने मिडीयात आलेल्या लिबरल पुरोगामी लोकांचे व्यक्तव्य !!
रविश कुमार : "NDTV मधुन मी ( रविश कुमार ) राजिनामा देणार" ही बातमी
"रविश कुमार कडुन घेतल्या जाणार्या मुलाखतीला मोदीजी तयार झाले आहेत" ह्या बातमी ईतकीच खरी आहे.

https://youtu.be/Fqx4txHP4xQ
ईशकरण सिंग

मुक्त विहारि's picture

26 Aug 2022 - 8:39 pm | मुक्त विहारि

आठवला ...

रात्रीचे चांदणे's picture

26 Aug 2022 - 9:25 pm | रात्रीचे चांदणे

आदनींनी थेट समभाग विकत घेतले नाहीत. ज्या कंपनीने ndtv ला समभागावर कर्ज दिले होते ती कंपनी विकत आहे. पूर्वी तीच कंपनी अंबाणी कडे होती. म्हणजेच ndtv चे समभाग आंबनिकडून अडणीकडे आलेत.

टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’, भाजपा आमदाराचं विधान, जीभ कापून टाकण्याची धमकी

https://www.loksatta.com/desh-videsh/karnataka-bjp-ks-eshwarappa-tipu-su...

ईश्वरप्पा यांनी आपण सर्व मुस्लीम गुंड असल्याचं म्हटलेलं नसून, आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचं सांगितलं आहे.

डँबिस००७'s picture

26 Aug 2022 - 8:51 pm | डँबिस००७

NDTV नंतर मेल्ट डाउन

https://youtu.be/1ySSrophys0

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

26 Aug 2022 - 9:29 pm | ॲबसेंट माइंडेड ...

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती.
https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-news-live-latest-marath...

आनन्दा's picture

26 Aug 2022 - 9:58 pm | आनन्दा

कॉलिंग अबा :)

इरसाल's picture

26 Aug 2022 - 10:24 pm | इरसाल

अबाना मिपावर कोणीतरी जाम सणकवलेलं दिसतय. ते सध्या माबोवर असुन मिपावर आणी माबोवर कॉमन असणार्‍या काही लोकांवर वड्याचं तेल काढत आहेत.

इरसाल's picture

26 Aug 2022 - 10:41 pm | इरसाल

बरोबर, कारण तुम्ही दोन्हीकडे एकाच आयडीने वावरता म्हणुन पटकन उठुन दिसता. अबाना सोपं गेल तुमच्यावर शरसंधान करणं. असो. काही मुद्दे योग्य असायचे पण जिथे तिथे चिडीला येण सगळीकडेच चालत नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आंजावर एक से एक धुरंधर आहेत. त्यात आपली मेणबत्ती आपण नीट सांभाळली नाही तर विझते वर मेणाचा चटका आपल्यालाच.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2022 - 10:48 pm | श्रीगुरुजी

कोणत्या धाग्यावर?

इरसाल's picture

27 Aug 2022 - 12:27 pm | इरसाल

मे बी अमेरिकेतील भारतीय आणी वर्णद्वेष या धाग्यावर पण आता त्यांचा प्रतिसाद दिसत नाहीये.

श्री राजेश उर्फ श्री सुनिल कचुरे पण आहेत तिथे.
तिथे ठरविक आयडी लिहायला लागले की बाकीचे कोणी लिहित नाही.
असो येथे मी त्याविषयी जास्त लिहीत नाही, उगाचच हा धागा भलतीकडे जायचा.

चौकस२१२'s picture

27 Aug 2022 - 5:19 am | चौकस२१२

विनाशकाले विपरीत बुद्धी कि बारामतीच्य्या काकांची करामत !
असो ब्रिगेड काहीतरी "कनश्रक्टिव्ह " शिकवेल उद्धवसेनेला .. मोडेन पण वाकणार नाही ( मोडेनच )

असे ऐकिवात होते कि भाजप मित्रपक्षांना संपवावयाला बसलेली असते पण हाय्ला इथे तर काका पण हाच उद्योग करीत आहेत

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 8:18 am | श्रीगुरुजी

ही युती होण्यामागे काकांचा हात दिसत नाही. आपल्या पक्षाला अखेरची घरघर लागली आहे हे ठाकरेंनी ओळखले आहे (खरं तर २०१७ मध्येच अखेरची घरघर लागली होती व २०१९ मध्ये कारभार आटोपला असता.). त्यामुळे अखेरची धडपड सुरू आहे.

जेम्स वांड's picture

27 Aug 2022 - 8:42 am | जेम्स वांड

काकांनी यशस्वी रित्या हात वर केलेले दिसतायत नेहमीप्रमाणे...

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 9:19 am | कानडाऊ योगेशु

ह्या बिग्रेड व शिवसेना युतीवरुन कोला वॉर आठवले.
पेप्सी व कोक तेव्हा भारताची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करत होते. पेप्सी कंपनी आधी आली होती व कोकाकोला नंतर आले. तर पेप्सीने कोकाकोलाच्या कोकलाच थेट टारगेट केले. आम्ची पेप्सी विरूद्ध त्यांचा कोला असा डायरेक्ट सामना असल्याचे भासविले त्यावर कोकाकोला ने स्प्राईट हे शीतपेय लॉन्च केले. आणि स्प्राईटच्या सगळ्या जाहीरातीत पेप्सीला टारगेट केले गेले म्हणजे पेप्सीची स्पर्धा आमच्या मुख्य कोलाशी नसुन नुकत्याच आलेल्या लिंबुटिंबु स्प्राईटशी आहे असे काहीसे बिंबवले गेले. इथे ही काकांनी शिवसेनेला पहिल्या रांगेतल्या राष्ट्रवादीसोबत न बसवता फक्त उप्द्रव मुल्य व कार्यकर्त्या पातळीवरच्या संभाजी बिग्रेड सोबत पाट लावुन दिला आहे.उद्या राष्ट्रवादीच्या वरातीत बिग्रेडबरोबरच आता शिवसेनेचे कार्यकर्तेही नाचताना दिसले तर फार आश्चर्य वाटायला नको.

चौकस२१२'s picture

27 Aug 2022 - 8:58 am | चौकस२१२

युतीच करायची तर प्रकाश आंबेडकरांबरोबर करायची होती मग
किंवा रामदास भाऊ आठवलेंना भाजप पासून फोडता आले तर बघायायचे होते

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 10:17 am | श्रीगुरुजी

प्रकाश आंबेडकर, आठवले, कवाडे इ. ना कणभरही जनाधार नाही.

चौकस२१२'s picture

29 Aug 2022 - 11:30 am | चौकस२१२

प्रकाश आंबेडकर ना कणभरही जनाधार नाही.????
आ ! मागे प्रकाश राव आणि कोल्हापुरचे वंशज भेटले होते, तेव्हा "महाराष्ट्राचे राजकारण हादरनार होतेना" ! दोन दिग्गजांची ना भूतो ना भविष्यात्त भेट वैगरे बराच काही कल्पनाविलास झाला होत त्यावरून वाटले कि प्रत्यक्ष नातवाला आणि १३ व्या वंशजांना खूपच मोठा जनाधार आहे म्हणून ! नुसतीच हवा कि काय

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2022 - 1:10 pm | श्रीगुरुजी

प्रकाश आंबेडकर १९९०-९६ या काळात राज्यसभेत राष्ट्रपतीनियुक्त खासदार होते. १९९८ व १९९९ मध्ये ते कॉंग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभेत निवडून आले. २००४ मध्ये कॉंग्रेसने पाठिंबा न दिल्याने पराभव झाला. २०१९ मध्ये एम आय एम बरोबर युती करूनही सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला.

निष्कर्ष - जनाधार नसल्याने ते स्वबळावर निवडून येऊ शकत नाहीत.

संभाजीराव भोसले २००९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर असूनही अपक्ष सदाशिव मंडलिकांविरूद्ध पराभव झाला. २००९ विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू कोल्हापुरात हरले. संभाजीराव २०१६-२०२२ या काळात राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. जनाधार नसल्याने त्यांनी सर्वपक्षीय पाठिंबा मागून अपक्ष म्हणून बिनविरोध राज्यसभेत जायचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पवारांनी पाठिंबा दिला नाही व शिवसेनेत आला तरच खासदारकीला पाठिंबा देऊ अशी उद्धव ठाकरेंनी अट घातल्याने त्यांनी खासदारकीचा नाद सोडला.

भारतात सगळ्यात जास्त पादखरेदीकर्ते, कधी याची कल्पना नव्हती केली.

शाम भागवत's picture

27 Aug 2022 - 11:22 am | शाम भागवत

कोणी कोणाशीही युती करो.
शिंदे + फडणवीस युती बुलंद होत जाणार.
कारण?
दोघांचे विरोधकांना एकच म्हणणे आहे. आम्ही चिरेबंदी वाड्यात राहतो. यास्तव काचेच्या घरात राहणा-यांनी आमच्या घरावर दगडं मारू नयेत.
शिंदे फडणवीसांबरोबर पृथ्विराज आलेले चालतील. पण तो योग नाही.
:)

अजित पवार आले तर सोन्याहुन पिवळे.

शाम भागवत's picture

27 Aug 2022 - 12:14 pm | शाम भागवत

उठांना पर्याय शोधणे सुरू होते. आता शिंदेसारखा आस्तिक, हिदुत्ववादी भक्कम पर्याय मिळालाय. त्यामुळे भाजपाची यापुढची वाटचाल खूपच सुकर होईल असं दिसतंय. अपांची आता भाजपाला जरूरी नाही. भाजपाची मतदान टक्केवारीची मर्यादा आता ३५ च्या पुढे जाणार हे आता नक्की झालंय.
"दीड दिवसाचे सरकार हाच योग्य पर्याय होता हे तुम्हाला आता कळून चुकेल" अस वक्तव्य फडणवीसांनी विधानसभेत दादांना उद्देशून केलं. त्यातला गर्भीत इशारा योग्य ठिकाणी गेला नसेल असे वाटत नाही.
बाकी पाय ओढाओढीच्या पक्षीय राजकारणात मला रस नाही. महाराष्ट्राच्या भल्यात मला रस आहे. सध्या तरी शिंदे+फडणवीस यांच्यापेक्षा चांगला पर्याय दिसत नाहीये.
:)
शिव्याशाप देण्यात मला कणभरही एनर्जी वाया घालवायची नसल्याने मी चांगले जे काही आहे तेच शोधण्याचा प्रयत्न करणार.
असो.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 2:32 pm | श्रीगुरुजी

भाजपाची मतदान टक्केवारीची मर्यादा आता ३५ च्या पुढे जाणार हे आता नक्की झालंय.

😀 😁 😂 😃 😄 😅 😆

शाम भागवत's picture

27 Aug 2022 - 4:53 pm | शाम भागवत

:)

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 11:32 am | श्रीगुरुजी

ब्रिगेडशी युती केल्याने आपल्या तोंडचा घास ठाकरेंनी पळविल्याने भाजपला संताप अनावर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिगेडच्या खेडकरांनी भाजपशी युती करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर चंद्रकांत पाटलांनी युती करणार नाही असे न म्हणता ब्रिगेडने युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू असे सकारात्मक उत्तर दिले होते. तेव्हा ब्रिगेडने स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे, पेशवे, ब्राह्मण इ. विषयी अर्वाच्य लेखनातून व आरोपातून जे विष पसरविले होते, कोकाटेकडून नव्याने द्वेषी इतिहास लिहिला होता इ. गोष्टींचा सोयिस्कर विसर पडला होता.

आता ठाकरेंनी युती केल्यानंतर बाळ ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा वगैरे भाजपने बोलून बाळ ठाकरेंचे दाखले देणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट.

मेटेना घेतलेच होते यांनी जवळ.. त्यांचा इतिहास काय वेगळा होता?

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 2:03 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्र भाजपला युतीसाठी तालिबान, एम आय एम सुद्धा चालतील. मेटे तर त्यांच्या जवळपास सुद्धा नव्हते.

सुबोध खरे's picture

27 Aug 2022 - 12:09 pm | सुबोध खरे

गुरुजी

याला सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणता येईल.

किंवा

पाहुण्याच्या हातून साप मारला जातोय.

पाहुणा मरतोय की साप? आपल्याला काय घेणे देणे आहे?

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 12:51 pm | कानडाऊ योगेशु

हेच म्हणतोय.
उघड उघड नकार देऊन बिग्रेड ला नाराज करु शकत नव्हते व होकार दिला असता तर नसती ब्याद गळ्यात पाडुन घेतल्यासारखे झाले असते.
थोडक्यात नरो वा कुंजरो वा असा पवित्रा घेतला भाजपाने.
बिग्रेडच्या ब्राह्मणद्वेषी अजेंड्याला शिवसेना कशा पध्दतीने हाताळते हे पाहण्यासारखे होणार आता.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 2:06 pm | श्रीगुरुजी

ब्रिगेड हा साप आहे किंवा खोकला आहे असे भाजपला वाटत होते का? भाजपने सुद्धा ब्रिगेडबरोबर युती केली असती.

शेवटी शिवसेना (सेक्युलर) आणि शिवसेना (हिंदुत्ववादी) असे भाग झालेत. जय हो बारामतीचे काका.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 2:08 pm | श्रीगुरुजी

ब्रिगेड हा साप आहे किंवा खोकला आहे असे भाजपला वाटत होते का? भाजपने सुद्धा ब्रिगेडबरोबर युती केली असती.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 2:38 pm | श्रीगुरुजी

संभाजी ब्रिगेडच्या पुरूषोत्तम खेडेकरांनी भाजपशी युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता तर दरेकरांनी प्रस्तावाचे स्वागत केले होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “No one is more hated than he who speaks the truth.” :- Plato

जेम्स वांड's picture

27 Aug 2022 - 10:53 pm | जेम्स वांड

कैदी हे convict झाले २००८ साली, १४ वर्षे त्यांनी शिक्षा भोगली, त्यांनी अगोदर प्ली टाकली ती रेमिशन पॉलिसी १९९२ बेसिस वर, ते बेसिस अन् ती रेमिशन पॉलिसी सरकारने २०१४ मध्ये स्क्रॅप केली आहे, आता कैद्यांकडून हा प्रतिवाद आला की त्यांना शिक्षा झाली तेव्हा रेमिशन पॉलिसी ऑफ १९९२ चलनात असल्यामुळे त्यांना ती पॉलिसी वापरून रेमिशन द्यावे.

इथून legal प्रश्न सुरू होतो , तांत्रिक का मानवतावादी ? तांत्रिक दृष्टीने १९९२ पॉलिसी वापरली जाऊ शकेल कदाचित, पण गुन्ह्याचे स्वरूप पाहून २०१४ पॉलिसी उपलब्ध असताना अपलाय करता आली असती असाही एक मतप्रवाह आहे (मला वैयक्तिक हा पटतो)

तरीही ह्यात आपण बिल्कीसचे तीन वर्षीय पोर आपटून मारणे, त्या आरोपींचा स्थानिक विहीप कार्यालयात सत्कार होणे, भाजपचे स्थानिक आमदार सी के राऊलजी ह्यांनी त्यांची "ते संस्कार असणारे संस्कराशिल ब्राह्मण आहेत" छाप भलामण करणे इत्यादी मुद्दे घेतलेले नाहीत.

बॉस, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमच्यापाशी, पण बिल्कीस बलात्कारी बाहेर सोडणे हे मला वैयक्तिक, हिंदू अन् भारतीय अश्या तिन्ही प्लेंस वर निषेधार्ह वाटते.

गंमत म्हणजे सी के राऊलजी हे भाजप आमदार २०१७ मध्ये तिकिटाच्या अपेक्षेने भाजपचे सभासद झाले असून ते मूळचे जुन्या पठडीतले काँग्रेसी नेता होते, २०१२ निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून जिंकली आहे असे समजते, त्या अगोदर अर्थातच "२००२ बद्दल" मोदींच्या विरुद्ध शंख केला होता पण त्याबद्दल त्यांचा पक्षप्रवेश पण थांबला नाही किंवा पवित्र करून घेऊन आमदारकी देणे पण असे एकंदरीत दिसते आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2022 - 11:38 pm | श्रीगुरुजी

जो येईल त्याला पक्षात घेऊन पावन करणे भाजपला भविष्यात महागात जाईल. महाराष्ट्रात या प्रकाराचा अतिरेक झाला आहे. कालांतराने पक्षाची मूळ ओळख पूर्णपणे पुसली जाईल.

१००% सहमत आहे.
पक्षात येऊ द्यावे पण कमीत कमी ५ वर्षे कुठलेही महत्त्वाचे पद, उमेदवारी देऊ नये. ५ वर्षे पक्षात टिकला तर नंतर विचार करावा.
अवांतर : भारतीय जनता पक्षाचे नाव भारतीय पतितपावन पक्ष (बीपीपी) असे करावे असा ठराव करावा काय ?

अतिअवांतर : आम्ही भाजपाचे निष्ठावान मतदार असून तुमच्या पतितपावन प्रकारामुळे आम्ही नाराज आहोत आणि असेच चालू राहिले तर पुढील निवडणूकीत तुम्हाला मत देणार नाही हे कळविण्यासाठी भाजपाचा अधिकृत विरोपाचा पत्ता असेल तर त्यावर एखादे पाच पन्नास सह्यांचे निवेदन पाठवावे म्हणतो.

अति अति अवांतर : संघाच्या रिमोट मधील बॅटरी संपली की काय ? अजिबात चालतच नाही असे दिसतयं.

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2022 - 8:53 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्र विधानसभा व स्थानिक निवडणुकीत मी भाजपला मत देणे २०१७ पासून थांबवलंय. स्वतःच्या खुर्चीसाठी अत्यंत भ्रष्ट, जातीयवादी कंडम नेत्यांना पायघड्या घालून पक्षात आणून पावन करून ३०-३० वर्षे पक्षात असणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने युतीची इच्छा व्यक्त केल्यावर थेट नाही म्हणण्याऐवजी त्या करंट्या नेत्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले होते. आता शिवसेनेने युती केल्यावर मत्सर वाटून विनाशकाले विपरीत बुद्धी अशी कुजकट प्रतिक्रिया देत आहेत. मला हे अजिबात मान्य नाही. त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते मी करतोय.

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2022 - 9:28 am | धर्मराजमुटके

त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते मी करतोय.

तुम्ही जे करता आहात ते बरोबरच आहे. पण भारतीय पतितपावन पक्षाला आपण चुकतोय याची जाणिव करुन देण्याची वेळ आली आहे आणि ही जाणिव केवळ मतदानाच्या दिवशी होऊन फायदा नाही. त्यांना ते अगोदरच सांगीतले पाहिजे आणि मतदाराने देखील सांगीतले पाहिजे असे मला वाटते.

रात्रीचे चांदणे's picture

28 Aug 2022 - 9:23 am | रात्रीचे चांदणे

सध्या ताकतवाण विरोधी पक्ष नाही त्यामुळे लोकं आपल्यालाच मतं देणारं हा समज भाजपचा झालेला आहे. याबरोबरच ed , cbi यांचा पुरेपूर गैरवापर करून घायला आहेतच. ह्याचा फायदा केजरीवालांनी घायला पाहिजे, फक्त त्यांना २०२४ लाच पंतप्रधानांची स्वप्नं नको पडायला.

जेम्स वांड's picture

28 Aug 2022 - 10:03 am | जेम्स वांड

केजरीवाल ह्यांना अजून परिपक्व होण्याची गरज आहे, प्रवास त्यांचा नीट सुरू आहे पण अजूनही पल्ला गाठावा लागणार आहे त्यांना. आधी त्यांनी सुरुवात वावदुक विधाने करून केली, पंतप्रधान मोदींना सायकोप्याथ वगैरे म्हणून झाले त्यांचे नंतर आंतरराष्ट्रीय परिसंवादात अन् diplomatic meetings मध्ये चपला घालून जाणे झाले, पण नंतर त्यांना कळले (अशी अपेक्षा तरी आहे) की मोदींना जितक्या शिव्या देतील ते तितके मोदीच मोठे होतील, रेटिंग वाढतील त्यांची, त्यामुळे तूर्तास वैयक्तिक मोदींना टार्गेट करण्याचे सोडून त्यांनी भाजपला एक पक्ष म्हणून टार्गेट करणे सुरू केले आहे, उत्तम आहे अन् राजकीय पठडीतले आहे हे चेंजेस, पुढे बघायचे काय काय होईल ते.

धर्मराजमुटके's picture

27 Aug 2022 - 10:56 pm | धर्मराजमुटके

नेतेमंडळी जर खोके, डब्बे घेऊन विकली जात असतील तर मतदारांनीच काय घोडं मारलय ? पहिल्यांदा झोपडपट्टीवाले पैसे घेऊन मतदान करतात असे ऐकले की राग यायचा (फक्त ऐकले आहे, पाहिले नाही) पण आता मागे वळून पाहिलं की तेच आपल्यापेक्षा जास्त शहाणे आहेत असे वाटते.

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2022 - 10:02 pm | धर्मराजमुटके

“मला गोमांस खायला आवडतं” ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’ दरम्यान रणबीर कपूरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत
बॉलीवूडवाले शेखचिल्ली बन रहेल्ले है, जिस फांदी पे बैठेले, उसी को च काट रेले, लगता अपनी कबर अपने हातो खुदवाके ही दम लेंगे !

मदनबाण's picture

28 Aug 2022 - 11:42 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

मदनबाण's picture

28 Aug 2022 - 10:57 pm | मदनबाण

चायनीज स्पाय शीप Yuan Wang 5 श्रीलंकेत नांगर टाकुन होते, ते शेपटी घालुन पळाले ! या जाहजाच्या श्रीलंकेत येण्याच्या आधी पासुन ते जाण्या पर्यंत ते आपल्याच नव्हे तर जागतिक मिडियाच्या चर्चेत राहिले. या स्पायशिप विषयावर ज्या बातम्या आणि व्हिडियो पाहण्यात आले ते इथे देऊन ठेवतो.
India's unique named military satellites acts as shield against Chinese spy ships
India's challenge to China: India creates Signal Shield against Chinese Spy Ship Yuan Wang 5 docked at Hambantota port in Sri Lanka

याच घटनाक्रमा बरोबर एका विशेष टेस्ट्ची बातमी :-

India successfully test-fires VL-SRSAM

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2022 - 11:13 pm | श्रीगुरुजी

श्रीलंका कृतघ्न देश आहे. भीक मागताहेत पण भीक घालणाऱ्यांची किंमत नाही.

झारखंडमधील धुमका येथे शाहरुख हुसैन नावाच्या शेजाऱ्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याने झारखंडमधील अंकिता कुमारीचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला.
१२वीत शिकणाऱ्या अंकिता कुमारीला एकतर्फी प्रेमामुळे शाहरुख हुसैनने अंकितावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले आहे. अंकिताने गंभीर अवस्थेत पोलिसांना सांगितले होते की, तिचा शेजारी शाहरुख तिला रोज त्रास देत असे. अंकिता कुमारीला यात रस नव्हता. तसे तिने स्पष्ट सांगितले होते. मंगळवारी सकाळी शाहरुख अंकिताच्या घरी गेला, अंकितावर झोपेत असताना खिडकीतून पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

वामन देशमुख's picture

29 Aug 2022 - 9:28 pm | वामन देशमुख

याआधी अशा रीतीने मारण्यात आलेल्या अगणित हिंदू स्त्रियांच्या यादीत अजून एकीची भर.

मदनबाण's picture

30 Aug 2022 - 5:33 pm | मदनबाण

यावर इथे एक प्रतिसाद वरील २न्ही प्रतिसांपूर्वी दिला होता, पण त्याला पंख लागले !
आपल्या देशातील महामाचो मिडिया :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)

नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले महाकाय ट्विन टॉवर्स अवघ्या १० सेकंदांमध्ये जमीनदोस्त करण्यात आले आहेत. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आले आहेत. ‘एपेक्स’ ही इमारत ३२ मजली तर ‘सेयान’ २९ मजल्यांची इमारत होती.

https://twitter.com/ani_digital/status/1563815405059055616

शिवसेनेबद्दल(उद्धवसेना) माझे काही मत .. हे मी काही दिवसांपुर्वी लिहिले होते. आता उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केली. माझ्या मते ठाकरेंची ही मोठी चूक आहे. ठाकरेंनी काँग्रेस हा एकमेव साथीदार घेवून महाराष्ट्रात पुन्हा शक्ती वाढवली पाहिजे. फक्त जमल्यास भाजप व राष्ट्रवादीतील काही (जे तितकेसे जातियवादी नाहीत) असे नेते फोडण्याचा प्रयत्न करावा.

सुमारे दीड महिन्यांपुर्वी केलेले लेखन खाली जसेच्या तसे पेस्ट करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिवसेना हे नाव वा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडून पळवले जाईल याची भीती बाळगून त्याबद्दल हळवे होण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी स्वतःहूनच पक्षाचे नाव व चिन्ह शिंदे गटाला देवू करावे. यामुळे शिंदेगट हा शिवसेना म्हणून ओळखला जाईल व भाजपत विलीन होणार नाही. यामुळे सत्तेत असूनही शिंदेगटाचे म्हणजेच नव्या शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिल्याने युती असूनही भाजपवर नव्या शिवसेनेचा दबाव राहील. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे किंवा अन्य कुणीही या नव्या शिवसेनेचे पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहतील तेव्हा त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या समस्या, भाजपसोबत जुळवून घेताना नेत्यांना येणार्‍या अडचणी , पुन्हा कधी पक्ष फुटण्याची भीती या व अशाप्रकारच्या पक्षांतर्गत आव्हानांना तोंड द्यावे लागेल.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी नवे नाव , नवे निवडणूक चिन्ह व नवे ब्रीदवाक्य घेवून पक्षाची नव्याने उभारणी करावी. तसेही उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंचे व्यक्तिमत्व हे शिवसेनेच्या जुन्या राडा , तोडफोड वा आक्रमक प्रतिमेशी फारसे जुळणारे कधीच नव्हते. त्यामुळे या पितापुत्रांनी संकुचित अर्थाचे विद्वेषावर आधारित हिंदुत्व सोडून नव्या पक्ष उभारणीत अधिक व्यापक , जाती-धर्माच्या बाबतीत सर्वसमावेशक भूमिका घ्यावी पण त्याच वेळी मराठी हिताचा मुद्दा कायम ठेवून त्या मुद्द्यावर शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा नेहमीच दोन पावले पुढे रहावे. तसेच पक्षवृद्धी करताना भाजपतले पंकजा मुंडे , विनोद तावडे या नेत्यांना आपलेसे करावे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेलेत हा उद्धव ठाकरेंचा बेसावधपणा म्हणावा लागेल. पण वेळ पाहून झालेली चुक सुधारावी आणि एकनाथ खडसें बरोबरच रक्षा खडसेंनाही आपल्या नवीन पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पुढे सत्तेचे राजकारण करताना काँग्रेस या सर्वसमावेशक पक्षाची साथ घ्यावी. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस कितीही शक्तिहीन झालेली असली तरी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आजही पृथ्वीराज चव्हाण , अशोक चव्हाण , प्रणिती शिंदे , अमित देशमुख यांसारखे जनाधार असलेले नेते आहेत. काँग्रेसला योग्य प्रमाणात बळकटी देवून भाजपला राज्याच्या व देशाच्या राजकारणातही काही प्रमाणात शह देता येईल.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा एककलमी कार्यक्रम असलेला पक्ष आहे ,त्यासोबत जाणे टाळावे. तसेच काँग्रेसशी युती करुन जरी भविष्यात सत्ता मिळाली तरी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद टाळावे व आदित्य ठाकरेंनीही या पदासाठी कोणतीही घाई करु नये.

कपिलमुनी's picture

30 Aug 2022 - 5:57 am | कपिलमुनी

राज असो किंवा उद्धव ..
ठाकरे बंधूंना कष्ट करायची सवय अजिबात नाहीये.. त्यातून उठा ची तब्येत तोळा मासा... त्याला हे झेपणार सुधा नाही..

नवीन पक्ष काढायचे सोपे नाही, गावोगाव , प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा फिरावे लागते..आंदोलने करावी लागतात. अजेंडा लागतो .. दुसरी फळी. तिसरी फळी निर्माण करावी लागते..

एवढे मागच्या १४-१५ वर्षात राज ठाकरे ला सहानुभूती , करिश्मा असून जमले नाही... उठा साठी अशक्यप्राय आहे..

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 7:58 am | शाम भागवत

देव करो व तर्कवादी यांचे म्हणणे उठा यांनी ऐकावे अशी प्रार्थना करून मी खाली बसतो.
_/\_
(भाजपा व शिंदे यांना "न मागता देव देतो दोन डोळे" असं काहीसं वाटेल.)
:)