येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19)
----------
सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्यांचा वावर आहे.
बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ फिरतो. दुपारी आपल्या जबाबदारीवर जाऊ शकतो.
ज्या पाटोणपाडा (येऊर) भागातून जाणार आहोत तिथे दोन मार्ग संजय गांधी उद्यानात जातात. एक मार्ग पश्चिमेला बोरिवली कान्हेरी गुंफा डोंगराकडे जातो (साधारणपणे १६ किमी. )तो आता (२०१६) पूर्ण बंद केला आहे. दुसरा एक मार्ग पाटोणपाडा वस्तीतून पुढे जातो. सुरवातीचा पाचशे मिटरसचा डांबरी रस्ता संपून वस्ती विरळ होत साधी मातीची पायवाट संजय गांधी उद्यानातून पुढे उत्तरेकडे जाते. या मार्गावर तुरळक ठाकरांची घरे आहेत आणि येजा असते. ही वाट पुढे हावरेसिटी या ठिकाणी बाहेर हमरस्त्याला ( घोडबंदर रोडला) मिळते. त्या अगोदर एक छोटासा सुंदर धबधबा येतो. जवळच्या चिरमादेवी मंदिरामुळे या धबधब्याचे नावही चिरमादेवी धबधबा पडले आहे. तर आताची भटकंती या मार्गावरची फक्त चार किमीटरसची लहान आहे. वाटेत भेटलेल्या गावकऱ्यांनी सांगितले की रात्री इथे बिबटे वावरतात पण त्यांची त्यांना सवय झाली आहे. दिवसा /दुपारी माणसांचा खूप वावर,येजा असल्याने तसा धोका नाही. .
करोना प्रतिबंध कमी होऊन वावर हल्लीच सैल झाल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने इकडे १९ ओगस्टला गोपाळकाल्यादिवशी गेलो होतो.सुटीमुळे रेल्वे बस रिकाम्या होत्या.
मी गेलेलो ठाणे रेल्वे स्टेशनहून बस मार्ग दिला आहे पण इतर कार, ओटो,विमान, साधनांचाही उपयोग करू शकता.
मुंबई एरपोर्टहून taxiने हावरेसिटीजवळ चिरमादेवी मंदीरला येऊन तिथून एंट्री करणे सोपे पडेल.
स्वत:च्या वाहनाने इथे आल्यास तिथे पार्किंग आहे. पण वाहन तिथे ठेवल्याने परत तिथेच जावे लागेल.
स्वत:च्या वाहनाने/ओटोने उपवनमार्गे पाटोणपाडा आल्यास वाटेत 'भूकेंद्र' या ठिकाणी संजय गांधी उद्यान गेटवर ४१/७१/रु प्रतिव्यक्ती आणि वाहनाचे वेगळे शुल्क द्यावे लागते. (२६०?)
मी ठाणे स्टेशनकडून १६ नं बसने पाटोणपाडा येथे उतरलो. चालत हावरेसिटी इथे बाहेर पडलो आणि ६१ नं बसने रेल्वे स्टेशनला परत आलो.
फोटो १
Thane stn. west to Yeoor Patonpada. 9 km. bus route no. 16.(2022_08_19)
फोटो २
येऊर पाटोणपाडा ते हावरे सिटी भटकंती. ४ किमी पायी. (2022_08_19)
फोटो ३
Haware City to Thane stn. west. 11 km. bus route no. 61.
विडिओ
---------
येऊर पाटोणपाडा ते हवारे सिटी ,संजय गांधी उद्यानातून भटकंती, फोटो स्लाइडशो. २०२२_०८_१९
https://youtu.be/DDD9nT5WJUc
----------------
Video clips (1)
Yeoor Patonpada to Haware city walk through Sanjay Gandhi park. 2022_08_19
चिरमादेवी धबधबा (2)
https://youtu.be/2eSXe8oae6A
(3) झरा, येऊर पाटोणपाडा ते हवारे सिटी ,संजय गांधी उद्यानातून भटकंती वाटेवर. याचाच पुढे धबधबा होतो.
https://youtu.be/7Ssmf2AlCkI
प्रतिक्रिया
21 Aug 2022 - 6:05 pm | धर्मराजमुटके
अरे वा ! तुम्ही तर आमच्या अगदी बाजूलाच येऊन गेलात. अगोदर माहित असते तर एक मिपा कट्टा केला असता.
ओवळेकर वाडीत फुलपाखरू उद्यान आहे पण त्याची वेळ माहित करुन घ्यावी लागेल.
सुचना : पुढील वेळेस टिएमटी च्या ६१ क्रमांक बस ने जाण्यापेक्षा एसटी ने प्रवास करावा. जवळपास २५-३०% खर्च कमी येतो. आपण जेष्ठ नागरीक सदरात मोडत असाल तर एसटी ने अर्ध्या तिकिटात देखील जाऊ शकता.
21 Aug 2022 - 8:08 pm | कंजूस
आणि एकवीस रुपयांत अगदी जवळ नेऊन ( धबधबा अर्ध्या तासावर) सोडते. आणखी काय हवं!
ओवळेकर वाडीत फुलपाखरू उद्यान आहे पण त्याची वेळ माहित करुन घ्यावी लागेल. तिथे दोनदा गेलो आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर रविवारी सकाळी सातला जावे. साडेनऊनंतर फुलपाखरे फार चपळ होतात ( टायगर जातीची सोडून) फोटोला सापडत नाहीत.
शुल्क ५० -१५० झाले होते. आता माहिती नाही.
वसई बसने 'सातिवली नाका किंवा अधिक चांगले म्हणजे विरार,अर्नाळा बसने 'तुंगारेश्वर' नाका उतरावे. हमरस्त्यावरून आत दोन किमीवर अभयारण्य गेट आहे. तिथे ओढ्याच्या आसपास खूप फुलपाखरे,पक्षी,झाडे पाहता येतात.
नालासोपारा बसने हमरस्त्यावर उतरल्यावर आतमध्ये चालत गेल्यावर 'पेल्हार' धरणाकडे जावे. 'इवनिंग ब्राउन' प्रकारची फुलपाखरे अधिक दिसतात. कारण गोठे आणि शेण.
बाकी मिपाकट्टा कल्पना आवडली.
21 Aug 2022 - 7:00 pm | प्रचेतस
ही भटकंती देखील आवडली. चिरमादेवी धबधबा सुरक्षित दिसतोय. डोह खोल दिसत नाहीये.
21 Aug 2022 - 7:53 pm | कंजूस
कुणी मुलं नसतानाचा फोटो काढणार होतो पण मुलांच्यामुळे खोली कळली. मग मीही आंघोळ केली ( चि.वि.जोशी विनोद). मुलांनी फोटो काढून दिला. एवढी चांगली जागा इतक्या जवळ असताना उगाचच राजमाची,पळसदरी फिरत होतो.