गाभा:
मला खालील धार्मिक पुस्तके मराठीतून विकत घ्यायची आहेत. कृपया सर्वमान्य आणि अचूक भाषांतरे असलेली मराठी पुस्तके सुचवावीत. पुस्तकाचे पूर्ण नाव आणि लेखक दिल्यास फारच मदत होईल.
१. उपनिषदे (१० किंवा ११ प्रमुख. शंकरभाष्यासहित असल्यास उत्तमच).
२. दासबोध
३. तुकारामांची गाथा अर्थासहित
४. भागवतपुराण
५. वाल्मिकी रामायण
६. महाभारत (व्यासरचित)
प्रतिक्रिया
20 Aug 2022 - 5:06 am | प्रचेतस
वाल्मिकीरामायण, व्यासरचित महाभारत विदर्भ मराठवाडा बुक कम्पनी आणि वरदा प्रकाशन अशा दोन वेगवेगळ्या प्रकाशनांनी प्रसिद्ध केले आहे. दोन्ही उत्तम आहेत, मात्र वरदाचा टाईप बारीक आहे, विदर्भ मराठवाडा वाचायला जास्त सुलभ आहे. भागवत महापुराण देखील विदर्भ मराठवाड्याचे उपलब्ध आहे.
चार वेद आणि उपनिषदे यांचा अनुवाद बहुधा प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.
20 Aug 2022 - 7:01 am | शाम भागवत
दासबोध पू. बाबा बेलसरे
20 Aug 2022 - 11:48 am | प्रसाद गोडबोले
विकत घेण्या आधी इन्टरनेट्वर विशेषतः https://archive.org/ ह्या वेबसाईट वर शोध घेऊन सॉफ्ट कॉपी डाऊनलोड कराव्यात व वाच्याव्यात असे विनम्रपणे सुचवु इच्छितो. कारण आपण दिलेले जवळपास सर्वच ग्रंथ हे अवाढव्य आहेत , खर्चिक प्रकार आहे, शिवाय विकत घेऊन पुस्तक वाचले न जाणे हे फार दुखद असते. ब्रह्मसुत्रशांकरभाष्याचे तीन खंड आवर्जुन विकत घेतले अन पहिलेच प्रकरण वाचल्यावर लक्षात आले की , संसारात असताना , चिल्लर प्रापंचिक कटकटीनीं आयुष्य व्यापले असताना इतक्या गहन विषयावर चिंतन करायला वेळच देता येणार नाहीये :(
तुर्तास तीन्ही खंड मस्त कव्हर घालुन आमच्या पुस्तकांच्या कपाटात विराजमान आहेत मुहुर्ताची वाट पहात... :(
१. उपनिषदे (१० किंवा ११ प्रमुख. शंकरभाष्यासहित असल्यास उत्तमच). https://fdocuments.in/document/subodh-upanishad-sangraha-part-1of-4-mara...
२. दासबोध https://satsangdhara.net/db/das01.htm
३. तुकारामांची गाथा अर्थासहित https://archive.org/details/sant-tukaram-gatha/Tukaram%20gatha%20origina...
४. भागवतपुराण https://satsangdhara.net/bhp/bhsk01.htm
५. वाल्मिकी रामायण https://satsangdhara.net/vara/k1s001.htm
६. महाभारत (व्यासरचित) https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/mahabharata-bori.html (मराठी अनुवादाच्या लिन्क्स वल्लीसर देऊ शकतील.)
20 Aug 2022 - 7:05 pm | Trump
स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह
https://www.maayboli.com/node/13468
20 Aug 2022 - 9:27 pm | कर्नलतपस्वी
आजकाल अंतरजालावर भरपुर चकटफू पि डी एफ अवृत्या उपलब्ध आहेत.
वरील दिलेल्या लिंक बद्दल धन्यवाद.