येऊर - सोपी पावसाळी भटकंती
आपण यूट्यूबवर पावसाळी भटकंती, धबधबे याचे विडिओ पाहतो ते सर्व बहुतेक मोठ्या लोकांसाठी असतात. दहा वर्षांखालील लहान मुलांना नेण्यासाठी एखादी सोपी भटकंती करायची असेल तर ठाण्यातला येऊर/येवूर डोंगर म्हणता येईल. बरेच जण एखाद्या रिझॉटला किंवा वॉटरपार्कात जातात. तिथे सर्व कृत्रिम सोयी असतात पाण्यात खेळायच्या. पण खरेखुरे डोंगर,रान,पायवाट,झरे,आणि अधुनमधून येणारा पाऊस याची मजा थोडक्यात ,स्वस्तात घ्यायची असेल तर येवूरचा नक्की विचार करा.
कसे जावे
ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिमेला बस असतात. त्यापैकी ५६ नं ठाणे ते कोकणीपाडा बसने शेवटचा स्टॉप 'टिकुजीनी वाडी' येथे उतरावे.( याच्या अगोदरचा स्टॉप कोकणीपाडा.)
फोटो १
बस रूट नं ५६ . ठाणे पश्चिम ते कोकणीपाडा. शेवटचा स्टॉप
स्टॉपजवळच एकमेव वडा चहा मिसळ टपरी आहे. तिथे पोटोबा करून डावीकडे वळल्यावर दिसेल खाजगी रिझॉट टिकुजीनी वाडी.
फोटो २
टिकुजीनी वाडी, खासगी रिझॉट
फोटो ३
टिकुजीनी वाडी फलक
इथे सर्व सोयी आहेतच. बसने न येता स्वत:च्या वाहनाने आलात तर रस्त्यावर पार्किंगची भरपूर जागा आहे. एक महादेवाचे देऊळ आहे.या रिझॉटच्या बाजुलाच दिसेल येवूर - संजय गांधी उद्यान - प्रवेशद्वार.
फोटो ४
संजय गांधी उद्यान प्रवेश
फोटो ५
संजय गांधी उद्यान फलक
इथून रीतसर तिकिट ( अडनाडी किंमतीची ) काढून
आतल्या छोट्याशा पायवाटेने एक तासात चढून वर गेले की एक पठारासारखा टप्पा लागेल.
तिथे दिसतील भातशेती करणाऱ्या ठाकरांच्या झोपड्या.
फोटो ६
ठाकरांची शेत झोपडी
वरती जाण्यासाठी मागच्या कोकणीपाडा स्टॉपला येऊन गावातूनही वर जाता येते. मुख्य गेटवरून येणारी वाट मध्येच जोडते.
फोटो ८
झरा
फोटो ९
वाटेवरून दिसणारी ठाणे वस्ती
फोटो १०
रान काकडी?/फुले
फोटो ११
रान आले किंवा इन्सुलिनचे झाड?
फोटो १२
रान तेरडा
फोटो १३
रानहळद फूल
( बरेच ठाकर आता खाली कोकणीपाड्यात राहतात.) या ठिकाणची उंची आहे फक्त १३५ मिटर्स. समोर खाली ठाण्यातील तीसमजली ऊंच इमारतींची उंची ९० मिटरस. मुलांसाठी हा टप्पा गाठणे आनंदाचे आणि सोपे ठरेल. अजून साहस हवे असेल तर यापुढे (१) टायगर पॉईंट, आणि (२) सिक्रेट वॉटरफॉल या जागा आहेत. नकाशात दिसतील.
परतीसाठी याच वाटेने परत येताना डावीकडे न वळता पुढे गेल्यास दोन झरे ओलांडून कोकणीपाडा गावातून बस स्टॉपजवळ पोहोचता येते. रूट नकाशा पाहा.
फोटो १४
येताना रूट
(गावात दोन तीन टॉयलेट्स आहेत ती वापरता येतील.)ही सर्व
भटकंती तीन तासांत आटपेल. वाटेत भन्नाट वारा,दोन तीन झरे,रानफुले आणि फुलपाखरे,गाणारे पक्षी हे अनुभवता येईल.
विडिओ १
लहान ओढे, रानहळदीची फुले ( 00:02:00 )18 MB
विडिओ २
सोपी पायवाट. (00:03:00) 33MB
https://youtu.be/U8UZ-5I4is8
___________________
प्रतिक्रिया
16 Aug 2022 - 12:36 pm | कॅलक्यूलेटर
सोप्पी सहज आणि साधी भटकंती आवडली
16 Aug 2022 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो भटकंती भारी.
-दिलीप बिरुटे
16 Aug 2022 - 2:52 pm | प्रमोद देर्देकर
काका तुम्ही जिथून भटकंती सुरु केली तो बोरिवली नॅशनल पा. ची ठाण्यातील बाजू. इकडे कधी कधी वाघ दर्शन होतं.
किंबहुना १९८० पर्यंत जेव्हा घोडबंदर रस्ता एकपदरी होता तेव्हा हमखास वाघ खाली रस्ता ओलंडून पातलीपडा, मानपाडा, कासार वडवली इकडे यायचे.
दुसरा रस्ता येऊरसाठी जायचा उपवनमार्गे आहे पण नगरसेवक यांनी अनधिकृत बांधकाम करून रया घालवली आहे. आम्ही एकदाच तिथल्या तळ्यात पोहायला न्हणुन सायकल रपेट करत गेलेलो.
आता वर जाऊ देत नाहीत.
16 Aug 2022 - 4:26 pm | कंजूस
नंतर कायमचा बंद केला. आठ वर्षांपूर्वी गेलो होतो.
२०१६ मध्ये भींत घातली.
16 Aug 2022 - 5:10 pm | मुक्त विहारि
एकदा जायला हरकत नाही ...
16 Aug 2022 - 10:00 pm | चौथा कोनाडा
16 Aug 2022 - 10:00 pm | चौथा कोनाडा
.. मस्त धागा आहे, नकाशा आणि इतर तपशिलामुळे अतिशय उपयुक्त. पाच पाखडीला खुप वेळा जाणं झालंय, पण येऊर टेकडी चढण्याच्या योग आला नाही मला जायला नक्की उपयोगी पडेल. धन्यु कंजूस सर !
16 Aug 2022 - 11:56 pm | गामा पैलवान
प्रमोद देर्देकर,
नवी माहिती ( माझ्यासाठी ). धन्यवाद! पण मग बंगलेवाले कसे जात असतील वर?
आ.न.,
-गा.पै.
17 Aug 2022 - 6:35 am | प्रमोद देर्देकर
त्याच्या रोजच्या गाड्या माहीतीच्या शिवाय सगळे नगरसेवक तेव्हा त्यांना जावू द्यावेच लगते.
तुम्ही नुसते पायी जावू शाकतो. काही अडवत नाही. गाडी न्यायला देत नाहीत. रोज सकाळचे फिरणारे प्रभातफेरीवाले वर जातातच की.
17 Aug 2022 - 4:59 pm | गामा पैलवान
माहितीबद्दल आभार! :-)
-गा.पै.
17 Aug 2022 - 9:02 am | प्रचेतस
मस्त भटकंती. अगदी शहराजवळच आक्रसत चाललेली निसर्गाची फुफुसे अजून टिकून आहेत हे तसे एक भाग्यच आहे.
17 Aug 2022 - 9:02 am | कर्नलतपस्वी
आसपासच खुप चांगल्या बघण्यासारखी ठिकाणे असतात.
व्हिडीओ छान आहे.
21 Aug 2022 - 6:12 pm | धर्मराजमुटके
छान भटकंती ! २००७-०८ चे दिवस आठवले. इथे गेटवर मोटरसायकल पार्क करुन आतमधे जायचे तिथे जाऊन निवांत बसायचो. तेव्हा मोबाईलचे नेटवर्क मिळत नसायचे आतमधे. मजा यायची. फोन कॉल टाळायचे असतील तर फोन चालूच ठेवायचा आणि आतमधे जाऊन निवांत झोपायचो. तिथे गेट मधून आत डाव्या बाजूला प्राणी निरिक्षणासाठी एक मचाण होते आता आहे की नाही कोणास ठाऊक. एखादे दिवशी परत चक्कर मारावी लागेल.