भारतीय शिक्षा बोर्ड

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
23 Jul 2022 - 4:32 pm
गाभा: 

भारतीय शिक्षा बोर्डाची स्थापना गेल्या काही वर्षांपूर्वी झाली. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आधुनिक शिक्षासोबत भारतीय परंपरेला ही अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्‍या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही राहू शकते. मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले गेले आहे. गणित विज्ञान इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले गेले आहे. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले गेले आहे. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. भारतीय शिक्षा बोर्डच्या श्री एन पी सिंह यांची एक पूर्वीची मुलाकात बोर्डाच उद्देश्य समजण्यास मदत होईल.
https://www.youtube.com/watch?v=xKT4ng4Orao&t=475s

आता शिक्षा बोर्ड वास्तविकतेत उतरणार आहे. सर्वांचे प्रतिसाद अपेक्षित

प्रतिक्रिया

शिक्षा लिहु नका. मराठी मध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो.
बरोबर शब्द आहे: शिक्षण

चामुंडराय's picture

24 Jul 2022 - 12:38 am | चामुंडराय

+ १
धाग्याचे शीर्षक वाचल्यावर हीच शंका आली.

सरकारी शिक्षण आणि शिक्षा ह्यांतील फरक दिवसेंदिवस कमी होत आहे.

जेम्स वांड's picture

24 Jul 2022 - 8:41 am | जेम्स वांड

भारतीय शिक्षा बोर्डाची स्थापना गेल्या काही वर्षांपूर्वी झाली. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य पूर्ण केले आहे.

ही सुरुवातच अर्धवट वाटली मला तरी. शिक्षा बोर्डाची स्थापना काही वर्षे झाली, ओके, कोणी केली ? सरकारी आहे का गैरसरकारी संस्था आहे ? सरकारी असल्यास मनुष्यबळ विकास खात्याने केली आहे का ? हिचा अन न्यू एज्युकेशन पॉलिसीचा संबंध आहे का ? ते काहीच कळत नाहीये.

३०० प्राध्यापक अन २००० शिक्षाविद कुठं एकत्र आले होते, स्वयंसेवक म्हणून आले होते का पगारी, पाठ्यपुस्तक निर्मिती झाली पण ती कुठल्या बोर्डाला लागली आहेत ?

ह्यांचं काही सविस्तर नाही, एकीकडे तुम्ही म्हणताय की पुढील वर्षी शिक्षा कार्य सुरू होईल अन दुसरीकडे म्हणताय का लवकरच शिक्षाबोर्ड कार्यरत होईल, आधी बोर्ड कार्यरत होऊन सिलेबस ठरवून मग शिक्षा कार्यरत होईल का कसे ?

भारतीय शिक्षा बोर्ड हा CBSE प्रमाणे नवीन राष्ट्रीय बोर्ड आहे. बाबा रामदेव ह्यांना वेदिक बोर्ड निर्माण करायचा होता त्याला भारतीय बाबू मंडळींनी कडाडून विरोध केला होता. पण मोदी सरकारने आता विविध क्लुप्त्या वापरून हा बोर्ड प्रत्यक्षांत आणायची तयारी केली आहे असे वाटते. (ह्याला माझा १००% पाठिंबा आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या वर्षांत खरे तर ह्याला परवानगी द्यायला पाहिजे होती).

> In fact, at a meeting chaired by Prime Minister Narendra Modi on April 13, 2016, the then school education secretary S C Khuntia red-flagged the proposal on the grounds that the state’s sanction for a private board would open the doors for similar requests from other unrecognised school boards.

आता बोर्ड मध्ये नक्की कुठले विद्वान होते, बोर्ड चा पाठ्यक्रम अश्याच प्रकारे का आहे, तश्या प्रकारे का नाही ? संस्कृत कशाला आहे वगैरे प्रश्न नगण्य आहेत कारण तुमच्या मुलांना ह्याच बोर्ड च्या शाळेत जायची सक्ती कुणीच केली नाही. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सरकारी शाळांत मुलांना पाठवू शकता.

एकदा रामदेव ह्यांच्या बोर्डला परवानगी मिळाली तर आपसूक अंबानी, अदानी, bayju इत्यादींना सुद्धा ह्या क्षेत्रांत घुसायला मिळेल. एकदा अनेक बोर्ड्स निर्माण झाले कि साधायचा CBSE वगैरेची अवस्था BSNL/Air इंडिया प्रमाणे होईल. आणि देशासाठी हि चांगली गोष्ट ठरेल.

वरील मुलाखतीत ह्या बोर्डला परवानगी मिळाली आहे असे ती व्यक्ती सांगते पण मला तरी अजून अशी माहिती मिळाली नाही. मोदी सरकार जर ह्या विषयावर गुपचूप मार्गक्रमण करत असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्या गोष्टी अश्याच केल्या पाहिजेत त्यामुळे आंदोलनजीवी लोकांना जास्त संधी मिळत नाही.

विजुभाऊ's picture

24 Jul 2022 - 11:06 am | विजुभाऊ

खरेतर त्रिभाषा सूत्र या अगोदरच आस्तित्वात होते मात्रूभषा , इंग्रजी आणि भारतातील इतर कोणतीही एक भाषा असे शिकावी असे ते सूत्र होते.
उत्तरभारतीयांना दक्षीणी भाषा , आणि दक्षीण भारतीयांना हिंदी यावी हा त्यामागचा हेतू होता.
दक्षीण भारतात हे सूत्र पाळले गेले. मात्र हिंदी भाषीक राज्यानी मूळ हेतूला सुरूंग लावला. आणि हिंदीला खोटे खोटेच राष्ट्रभाषा ठरवले आणि सर्वांवर लादले.
ज्या दिवशी हिंदीभाषीक राज्यांतील लोक इतर राज्यातील भाषांचा आदर करायला लागतील तेंव्हाच भारतात खर्‍या अर्थाने एकात्मता अवतरेल.

जेम्स वांड's picture

24 Jul 2022 - 11:11 am | जेम्स वांड

१००००% सहमत,

हिंदी तो आनी हो चाहीए

असं म्हणतात, सांगितलंय कोणी ?

त्यातही नुसतं हिंदी शिकणे वेगळे, आम्ही तुमच्या राज्यात आलो तरी हिंदीच बोलणार हा कुठला आग्रह !

ह्या सगळ्यात महाराष्ट्राने केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे मोडी लिपी त्यागून देवनागरी लिपी अंगिकारणे, फुकट हिंदी लोकांना

"मराठी क्या अलग है" म्हणायचा मौका आणि दाक्षिणात्य म्हणणार

"वो तुमारा मराटी तो हिंदीच है ना!"

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2022 - 11:12 am | धर्मराजमुटके

मला वाटते की हिंदी भाषा आता महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामधून काढून टाकावी. अगदी ५ वर्षाचे मराठी बालक देखील हिंदी बोलू शकते. चित्रपट, दुरचित्रवाणी पाहून हिंदी भाषा सहजरित्या आत्मसात करता येते.
त्याऐवजी अभ्यासक्रमात दुसर्‍या एखाद्या भाषेचा अंतर्भाव करावा.

जेम्स वांड's picture

24 Jul 2022 - 11:51 am | जेम्स वांड

कश्याला हवी दुसरी अजून मराठी अन इंग्रजी बस झाल्या

तुषार काळभोर's picture

24 Jul 2022 - 9:22 pm | तुषार काळभोर

हिंदी पट्ट्यात त्रिभाषा सूत्र कसे पाळले जात असेल?
आता कदाचित नसेलच. जर कधी पाळले गेले असेल तर कसे?

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jul 2022 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली

वरील सर्वांशी सहमत. हिंदी ला हकलायची वेळ आलीय.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jul 2022 - 8:21 pm | अमरेंद्र बाहुबली

संस्कृत भाषा अनिवार्य राहणार.
ही कालबाह्य, वेयवहारात ० ऊपयोग असलेली भाषा विद्यार्थ्यांवर का लादताहेत??

कॉमी's picture

24 Jul 2022 - 10:11 pm | कॉमी

अगदी सहमत. काडीचा उपयोग नाही.

हिंदी , मराठी , संस्कृत या आवड नसताना किंवा गरज नसताना सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकाव्या ?

संस्कृत या भाषेचा काय उपयोग होतो ?निरुपयोगी होती म्हणून संपली ना ?

बरे आठवीनंतर उपयोगी मराठी किती लोकांनी शिकले आहे ? अनेकदा शिकल्याने नावड निर्माण होते.
काही उपयोगी पडेल असे कधी शिकवायला लागणार ?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 12:50 am | अमरेंद्र बाहुबली

मराठी मातृभाषा असल्याने शिकायलाच हवी. हिंदी , संस्कृत ह्या भाषांबद्दल सहमत.

चौकस२१२'s picture

25 Jul 2022 - 6:47 pm | चौकस२१२

बरे आठवीनंतर उपयोगी मराठी किती लोकांनी शिकले आहे ?
उत्तर = अनेकांनी आणि त्यानंतर अनेक दशके इतर भाषिक देशात राहून सुद्धा उत्तम मराठी लिहितात बोलतात ते आणि तेथील भाषा सुद्धा
इंग्रजी अन इतर भाषा या जागतिक भाषा आहेत आणि त्या यायला पाहिजेत पण त्यासाठी मराठी ( मातृभाषा) सोडायची काहीच गरज नाही

सुक्या's picture

25 Jul 2022 - 7:16 pm | सुक्या

काही उपयोगी पडेल असे कधी शिकवायला लागणार ?
तसं बघितले तर जे शिक्षण शाळेत / कॉलेजात घेतो त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे बघा पार जीव तोडुन फोर्ट्रोन शिकलो. काय उपयोग झाला. साईन ठेटा / कॉस ठेटा जीवनात कधी वापरले नाही. उगा शिकलो. खरं म्हणजे सारे शाळा कालेजे बंद करायला हवे ..

मुलगा १५ वर्षाचा झाला की डायरेक्ट कामाला लावायचे ... शालेय शिक्षण काय कामाचे नाही ...
हाय काय अन नाय काय.

ढवळ्या मागे बांधला पवळ्या कालचा गोधंळ बरा होता.

सुरसंगम's picture

25 Jul 2022 - 1:50 pm | सुरसंगम

अजून उपयोजक आयडी ने या धाग्यावर उडी घेतलेली नाहीते जेव्हा येतील मग बघा धागा १०० री गाठतो की नाही ते.
गेले दोन महिने कुठलीनवीन भाषा शिकताहेत कोण जाणे?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 2:29 pm | अमरेंद्र बाहुबली

तमीळचं रिवीजन करताहेत.
एपडी ईरकिंगा ऊपयोजकपा?

उपयोजक's picture

28 Jul 2022 - 9:37 pm | उपयोजक

गावची पंचाईत करु नका

उपयोजक's picture

28 Jul 2022 - 9:38 pm | उपयोजक

सूरसंगम यांच्यासाठी

असं कसं ?
चित्रपटात हिरो व्हिलनची ठासतो तेव्हा , हिरो हिरॉईनची शादी होते तेव्हा बॅकग्राऊंडला संस्कृत श्लोकच तर वाजत असतात. केव्हढं भारी वाटतं ते ऐकायला आणि पाहायला :)

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 3:03 pm | अमरेंद्र बाहुबली

असं कसं ?
चित्रपटात हिरो व्हिलनची ठासतो तेव्हा , हिरो हिरॉईनची शादी होते तेव्हा बॅकग्राऊंडला संस्कृत श्लोकच तर वाजत असतात. केव्हढं भारी वाटतं ते ऐकायला आणि पाहायला :)

म्हणून काय लहान मुलांवर लादनार का? ऊर्दू शायर्या, मूशावरे नी गझली ही कानांना गोड वाटतात, मग तुम्ही म्हणाल मूलांवर ऊर्दू ही लादा.

तुम्हाला हिंदी चालेना तर आमची काय बिशाद उर्दू लादायची.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 6:58 pm | अमरेंद्र बाहुबली

हहह, ख्याख्याख्या, फिदी फिदी फिदी.

हिंदी विरोधात मराठी लोकांनी पुढे यायला हवे

मी सातवी मध्ये उत्तमरीत्या शिव्या देत होतो - आणि यातल्या कोणत्याही मी शाळेत शिकलो नव्हतो
आणि याचा मला बर्याचदा उपयोग झाला
पाचवी - सहावी मध्येच मी मोटो मोठी पुस्तके वाचू शकत होतो
आठवीत मी माझया गुरूला ( ज्याने मला पाचवीत शिव्या शिकवल्या ) एक स्वरचित शिवी दिले वर गुर्जी गदगदले आणि खूप शिव्या देऊन त्यांनी मला शिकवण्यासारखे काही नाही हे सांगितले

त्यानंतर मराठी काही शिकल्याचे आठवत नाही

कॉमी's picture

25 Jul 2022 - 3:36 pm | कॉमी

लॉल

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 7:00 pm | अमरेंद्र बाहुबली

रेड्याने वेद म्हटलेले होते १२ व्या शतकात. २१ वेया शतकातला रेडा तर शिव्या द्यायला लागलाय. :)

मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ?

झालाय ... माझा एक वर्गमित्र होता "घोष बाबु". अगदी मिळमिळीत बंगाली शिव्या द्यायचा ... बोका बोका म्हणायचा ..
मग त्याला माय मराठी शिकवली ..
आख्या कालेजात फेमस झाला बाबु. कुणाची टाप त्याला शिव्या द्यायची ... अस्सल मराठी शिव्या ... बंगाली शिव्यात दम नाही हे तोच नंतर सांगायचा ....

आता तर त्याची बायको पण मराठी आहे ... मस्त मराठीत भांडतात ..

विवेकपटाईत's picture

4 Aug 2022 - 11:18 am | विवेकपटाईत

सर्व प्रतिसाद वाचले. जेम्स वांड आणि साहना सोडून कुणीही विषयावर प्रतिसाद दिला नाही. या शिक्षा बोर्डचे कार्य तीन वर्षांपासून सुरू आहे. केंद्र सरकारने बोर्डाचे गठन केले. उत्तराखंड राज्याने आधीच मान्यता दिलेली आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झालेली आहे. बाकी पतंजलि नफ्याच्या 80 टक्के अनुसंधान आणि शिक्षणावर खर्च करते. त्यामुळे पैश्यांची समस्या नाही. याशिवाय अनेक विद्वानांनी निशुल्क सेवा दिली आहे. बाकी पतंजलिच्या कार्‍यांचे स्वरूप किती विराट आहे. हे फक्त पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूटच्या वेब साईट वर जाऊन कल्पना येईल.

ते मराठीत नाही. उगाच शिक्षा शब्दावरून कीस पाडला जातोय.

आता हा बोर्ड किंवा उपक्रम काढला आहे तर इतके वर्ष कोणता बोर्ड होता? का नव्हताच?
राज्य सरकारची पाठ्यपुस्तक मंडळे तसाच केंद्रीय शिक्षा बोर्ड असावा.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2022 - 8:33 pm | श्रीगुरुजी

फक्त मराठी व इंग्लिश सक्तीची असावी. हिंदी ऐच्छिक विषयात ठेवावी. हिंदीला पर्याय इतर कोणतीही भारतीय किंवा परदेशी भाषा असावी किंवा चित्रकला, गायन, माहिती तंत्रज्ञान असे विषय असावे.