पारपत्रावर लग्नानंतर नाव कसे बदलावे?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
1 Aug 2022 - 5:56 pm
गाभा: 

एका प्रश्नासाठी मार्गदर्शन हवे आहे.

एका भारतातील मुलीचे हॉलंडमधील भारतीय पारपत्रधारक मुलाशी लग्न झाले आहे. लग्नानंतर तिला हॉलंडमध्ये नवऱ्याकडे जाण्यासाठी spouse visa घेणे आवश्यक आहे.

१) त्यासाठी तिने आपल्या पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक आहे का?

२) मुलीचे लग्नानंतर नाव अजिबात न बदलता फक्त विवाह प्रमाणपत्राधारे लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळू शकतो का?

३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?

४) समजा पारपत्रावर लग्नानंतरचे नाव हवे असल्यास ते कसे बदलता येईल?

५) पारपत्रावर नवीन नाव हवे असल्यास ते आधी आधारपत्र, PAN card, वेगवेगळी बँक खाती, भविष्य निर्वाह निधी खाते, DMAT खाते अश्या ठिकाणी आधी बदलावे लागेल व नंतरच पारपत्रावर बदलता येईल असे पारपत्र केंद्रात सांगण्यात आले आहे. किमान आधारपत्र व PAN CARD हे तरी नवीन नावाने असले पाहिजे कारण Identification proof, Address proof यासाठी ही कागदपत्रे लागतात.

ही माहिती बरोबर आहे का?

६) समजा लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळून मुलगी नवऱ्याकडे हॉलंडला गेली व काही वर्षांनंतर पारपत्राची मुदत संपल्यानंतर त्यावेळी नवीन नावाने हॉलंड वकीलातीतून नवीन भारतीय पारपत्र मिळू शकते का? त्यासाठी नवीन नावाने आधारपत्र, PAN card वगैरे लागेल का? तसे असल्यास ते हॉलंडमध्ये राहून बदलता येते का?

मार्गदर्शनासाठी आगाऊ धन्यवाद! _/\_

प्रतिक्रिया

एखाद्या धाग्यात सापडेल माहिती.

कपिलमुनी's picture

1 Aug 2022 - 6:30 pm | कपिलमुनी

) त्यासाठी तिने आपल्या पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक आहे का?

२) मुलीचे लग्नानंतर नाव अजिबात न बदलता फक्त विवाह प्रमाणपत्राधारे लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळू शकतो का?

३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?

या तिन्ही प्रश्नांना हो असे उत्तर आहे.

बाकी विवाह प्रमाणपत्र म्हणजे नाव बदलण्यासाठी पुरावा नसतो नाव बदल ची सरकारी प्रोसेस करावी लागते गॅझेट मध्ये छपणे , पेपर मध्ये देणे वगैरे. ते गॅझेट नंतर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

कानडाऊ योगेशु's picture

1 Aug 2022 - 8:13 pm | कानडाऊ योगेशु

माझ्यामते विवाहानंतर परदेशात जाण्यासाठी व तत्सम विसा मिळविण्यासाठी जास्तीत जास्त मॅरेज सर्टिफिकेट ची आवश्यकता लागावी. विवाहानंतर नाव बदलणे भारतात तरी ऐच्छिक आहे.

कपिलमुनी's picture

1 Aug 2022 - 8:21 pm | कपिलमुनी

नाव बदलणे ऐच्छिक आहे.
बदलताना मात्र सर्वत्र बदलून घेणे श्रेयस्कर

सरिता बांदेकर's picture

1 Aug 2022 - 9:20 pm | सरिता बांदेकर

मॅरेज सर्चीफिकेट वरून स्पॅाऊझ व्हिसा मिळू शकतो.
त्यासाठी पासपोर्टवर नांव बदलण्याची गरज असते की नाही हे त्या, त्या देशाच्या नियमावर अवलंबून असतं.
माझ्या मुलीनी लग्नानंतर नांव बदलले नाहीय. ती लग्न झालं तेव्हा ॲास्ट्रेलियाची नागरीक होती.आणि तिचा नवरा भारतीय नागरीक,त्याला व्हिसा मिळायला अडचण आली नाही. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष झालीत, अजून ती माहेरचंच नांव लावते.
हॅालंडचा व्हिसा शेंन्जेन व्हिसा मोडतो.
त्याचं सेंटर बीकेसी मध्ये आहे.
त्यांचं एक हेल्प डेस्क आहे त्यांना विचारलं तर व्यवस्थित माहिती मिळेल.
मॅरेज सर्टीफिरेट मात्र महत्वाचं असतं. बाकी पासपोर्टवर नांव बदलणे आणि इतर ठिकाणी नांव बदलणे तसं सोपं आहे फक्त वेळ खाऊ आहे.
तिला व्हिसा मिळायला तोपर्यंत वेळ लागेल.

अनन्त अवधुत's picture

1 Aug 2022 - 10:05 pm | अनन्त अवधुत

१) त्यासाठी तिने आपल्या पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक आहे का?
नाही. लग्नानंतर पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक नाही.

२) मुलीचे लग्नानंतर नाव अजिबात न बदलता फक्त विवाह प्रमाणपत्राधारे लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळू शकतो का?
हॉलंडच्या व्हिसासाठी तशी मागणी असल्यास कल्पना नाही. पण इतर देशांत (अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ई.) विवाह प्रमाणपत्राधारे व्हीसा मिळतो.

३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?
हो. अगदी पारपत्राची मुदत संपल्यानंतर त्यावेळी जुन्याच नावाने पारपत्र काढून त्यात नवर्‍याचे (जोडीदाराचे) नाव शेवटच्या पानावर, मुद्रित केल्या जाते.

४) समजा पारपत्रावर लग्नानंतरचे नाव हवे असल्यास ते कसे बदलता येईल?
पारपत्र री-इश्यु करुन हवा तो बदल करुन घेता येइल.

५) पारपत्रावर नवीन नाव हवे असल्यास ते आधी आधारपत्र, PAN card, वेगवेगळी बँक खाती, भविष्य निर्वाह निधी खाते, DMAT खाते अश्या ठिकाणी आधी बदलावे लागेल व नंतरच पारपत्रावर बदलता येईल असे पारपत्र केंद्रात सांगण्यात आले आहे. किमान आधारपत्र व PAN CARD हे तरी नवीन नावाने असले पाहिजे कारण Identification proof, Address proof यासाठी ही कागदपत्रे लागतात.

ही माहिती बरोबर आहे का?

नाही. मी वर दिलेली लिंक पहा त्यात त्यांनी असे काहीही सांगितले नाही.
अवांतरः आधारपत्र व PAN CARD एकाच नावाने असावे, त्याशिवाय ते लिंक करता येत नाहीत.

६) समजा लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळून मुलगी नवऱ्याकडे हॉलंडला गेली व काही वर्षांनंतर पारपत्राची मुदत संपल्यानंतर त्यावेळी नवीन नावाने हॉलंड वकीलातीतून नवीन भारतीय पारपत्र मिळू शकते का? त्यासाठी नवीन नावाने आधारपत्र, PAN card वगैरे लागेल का? तसे असल्यास ते हॉलंडमध्ये राहून बदलता येते का?
हो नविन नावाने पारपत्र मिळेल.
Q47: What documents are required when there is a change in surname on account of marriage/divorce?
A: No additional document is required for change of surname of female application on account of marriage/divorce.

To check the complete list of documents to be submitted along with the application form, please click on "Documents Advisor" link on Home page.

ही लिंक बघा त्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत.

पारपत्रावर लग्नानंतर नाव कसे बदलावे?
ह्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच पुढे गाभ्यात

५) पारपत्रावर नवीन नाव हवे असल्यास ते आधी आधारपत्र, PAN card, वेगवेगळी बँक खाती, भविष्य निर्वाह निधी खाते, DMAT खाते अश्या ठिकाणी आधी बदलावे लागेल व नंतरच पारपत्रावर बदलता येईल असे पारपत्र केंद्रात सांगण्यात आले आहे. किमान आधारपत्र व PAN CARD हे तरी नवीन नावाने असले पाहिजे कारण Identification proof, Address proof यासाठी ही कागदपत्रे लागतात.

दिले आहे, आणि माझ्यामते हे बरोबरही आहे! आम्हालाही थोडीफार अशीच माहिती पारपत्र केंद्राकडून देण्यात आली होती.
अर्थात त्यात "वेगवेगळी बँक खाती, भविष्य निर्वाह निधी खाते, DMAT खाते" ह्यांचा समावेश नव्हता. पण आधार आणि पॅन कार्ड वर नाव बदलले की ह्या सर्वच ठिकाणची KYC अपडेट करावी लागते ज्याचा पारपत्रावरील नाव बदलण्याशी थेट संबंध नाही पण अशाप्रकारे पारपत्रावरील नावात बदल केल्यावर लगेच परदेशवारीला जायचे असल्यास आणि त्या देशाच्या Visa साठी जर ३ ते ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट देणे आवश्यक असल्यास किमान तेवढा कालावधी तरी आधी बँक खात्यावरचे नाव बदलण्याची प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे.

Spouse visa विषयक माझा UK साठीचा २०१४-१५ सालचा अनुभव सांगतो, ज्याचा हॉलंडच्या spouse visa विषयीच्या प्रश्नाला उत्तर म्हणुन किती उपयोग होइल त्याबद्दल साशंक आहे पण त्यावेळी समजलेली एक गोष्ट बहुतेक सार्वत्रिक असावी असा माझा कयास आहे, आणि आता ज्यांच्या पारपत्राचे नूतनीकरण करण्याची वेळ येणार असेल त्यांच्यासाठी तो उपयुक्त ठरु शकेल.

आता आमच्या सौभाग्यवतींना वर्षातुन फार तर एक -दोन वेळा अल्पावधी साठी त्यांच्या कंपनीच्या UK स्थित हेड ऑफिस मध्ये जायची वेळ येत असली तरी २०१४-२०१५ मध्ये दीर्घाकाळ वास्तव्य करावे लागणार होते. त्यावेळी कंपनीच्या इन्विटेशन लेटरमध्ये spouse म्हणुन माझाही नामोल्लेख होता पण आम्हा दोघांपैकी एकाच्याही पासपोर्टवर Spouse Name कॉलम मध्ये एकमेकांच्या नावाची नोंद नव्हती. आणि नावात बदल वगैरे करण्याच्या प्रक्रियेसाठी वेळही हातात नव्हता. त्यामुळे तीच्या कंपनीने दिलेल्या इन्विटेशन लेटरमुळे visa मिळण्याची प्रक्रिया खूपच सुलभ होण्याची जी सुविधा मिळणार होती ती मला मिळू शकली नाही आणि UK visa साठीची नेहमीची त्रासदायक प्रक्रिया पार पाडून मला मागाहून 'टुरिस्ट व्हिसावर' जावे लागले होते.
२०१६ मध्ये जेव्हा माझा जुना पासपोर्ट रीन्यू करण्याची वेळ आली तेव्हा मात्र मी त्यावेळी मिळालेल्या सल्ल्यानुसार माझ्या पासपोर्ट वर Spouse Name च्या रकान्यात तिचे नाव नोंदवून घेतले आहे आणि आता मला वाटतं येत्या एक दोन वर्षांत तिचा पासपोर्ट रीन्यू करण्याची वेळ येईल तेव्हा तीच्या पासपोर्टवर Spouse Name च्या रकान्यात माझे नाव नोंदवून घेणार आहोत. ह्यातून एक अधिकृत दास्तावेज तयार होतो.

बाकी

३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?

ह्याचे उत्तर हो असे आहे.
आणि नाव अधिकृतपणे बदलायचे झाल्यास वर कपिलमुनी म्हणाल्याप्रमाणे प्रोसिजर आहे. थोडे पैसे देऊन एजन्ट मार्फत ती करून घेता येऊ शकते पण त्यात थोडासा वेळ जातो.

Marathi_Mulgi's picture

1 Aug 2022 - 11:51 pm | Marathi_Mulgi

१) त्यासाठी तिने आपल्या पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक आहे का?
- अजिबात गरज नाही.

२) मुलीचे लग्नानंतर नाव अजिबात न बदलता फक्त विवाह प्रमाणपत्राधारे लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळू शकतो का?
- शेंगेन विजा विवाह प्रमाणपत्राच्या आधारे मिळतो. पण विवाह प्रमाणपत्र इंग्लिशमधे असणे अत्यंत गरजेचे. नाहीतर ट्रान्सलेशन करून नोटराईज्ड करावे लागते, व्याप होतो. एका नातेवाईक मुलीचा झाला होता.

३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?
हो. काहीही प्रॉब्लेम नाही. भविष्यातल्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावरही मुलीचे जुने नाव व नवर्याचे नाव लिहीता येते. वेगवेगळी आडनावे असल्यामुळे काहीही प्रॉब्लेम येत नाही.
पारपत्रावर स्पाऊस कॉलममधे एकमेकांचे नाव मॅरिज सर्टिफिकेटच्या आधारे घालून घेणे श्रेयस्कर. पण केले नाही तरी काही अडत नाही. जेव्हा पारपत्र रिन्यू करायची वेळ येईल तेव्हा करावे.

४) समजा पारपत्रावर लग्नानंतरचे नाव हवे असल्यास ते कसे बदलता येईल?
गॅझेटमधे नाव चेंज करून, वर्तमानपत्रात प्रकाशित करून मग पॅन, आधार, व्होटर कार्ड सर्वत्र बदलावे लागेल.

पॉईंट १-३ स्वानुभव आहे.

चित्रगुप्त's picture

2 Aug 2022 - 12:04 am | चित्रगुप्त

लग्न-नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे - नवरदेवाच्या पासपोर्टावर हॉलंडातील भारतीय एम्बसीतून (किंवा भारतातून) Spouse Name अंकित करवून घेणे, एवढेच गरजेचे आहे. युरोपमधे बायकोचे नाव बदलून घेणे हेच पुढे अडचणीचे ठरू शकते. (- मुलांचे पासपोर्ट बनवताना वगैरे) तिने मूळ पासपोर्टावर असलेले नावच राहू द्यावे. (हे पाश्चात्य लोक अनेकदा नवरे/बायका बदलत असल्याने त्यांनी आडनाव बदलणे वगैरे भानगडच ठेवलेली नसावी.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2022 - 12:29 am | श्रीगुरुजी

धन्यवाद चित्रगुप्त सर!

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2022 - 12:27 am | श्रीगुरुजी

कपिलमुनी, कानडाऊ योगेशु, सरिता बांदेकर, अनन्त अवधुत, टर्मीनेटर, मराठी मुलगी -

आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून खूपच मोलाची माहिती मिळाली.

थोडक्यात सांगायचे तर नाव बदलून घेण्याची (सध्या तरी) तशी काहीही आवश्यकता नाही. मात्र दोघांच्याही पारपत्रात spouse चे नाव अंतर्भूत करणे आवश्यक आहे. अर्थात ते सुद्धा लगेच न करता पारपत्र नूतनीकरण करताना spouse च्या नावाचा समावेश करता येईल. विवाह प्रमाणपत्र हेच परदेशी व्हिसासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. जर मूळ पारपत्रावर नवीन नाव हवे असेल तर आधी आधारपत्र व PAN Card मध्ये तो बदल करून नंतरच पारपत्रावरील नाव बदलण्यासाठी अर्ज करता येईल. परंतु एकदा आधारपत्र व PAN Card वर नाव बदलले तर बँका, इतर खाती, कंपनी अशा सर्व ठिकाणी ते लवकरात लवकर बदलून घ्यावे लागेल.

पुन्हा एकदा सर्वांचे मन:पूर्वक आभार. _/\_

माझ्यामते स्पोउस नेम टाकणे हे ताबडतोब केले पाहिजे..
जर दोघांच्याही पासपोर्ट वरती स्पोउस नेम असेल तर मुलांचे पासपोर्ट खूप सहज बनतात

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2022 - 5:00 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! दोघांचेही पारपत्र नूतनीकरण २०२४ मध्ये करायचे आहे. तेव्हा स्पाऊसचे नाव टाकता येईल.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2022 - 10:14 am | श्रीगुरुजी

अजून एक प्रश्न आहे.

समजा मुलीने पारपत्रावरील नावात कोणताही बदल केला नाही व जुन्या नावानेच नेदररलँड्सचा spouse dependent visa मिळाला, तर त्यानंतर परदेशी प्रस्थान ठेवण्यापूर्वी आधारपत्र, PAN card व बँक खाती अश्या ठिकाणी लग्नानंतरचे नाव बदलून घेतले तर तो visa किंवा तिच्या परदेशी जाण्यात अडथळे येतील का? म्हणजे परदेशी जाताना मुंबई विमानतळावर immigration तपासणी किंवा check in करताना आधारपत्र दाखवावे लागते. पारपत्रावर जुने नाव व आधारपत्रावर नवीन नाव यातून अडथळे निर्माण होतील असं वाटतंय. तसेच विमानतिकीट घेताना सुद्धा आधारपत्र लागते. तिकीट जुन्या नावाने व आधारपत्र नवीन नावाने अश्या परिस्थितीत तिकीट मिळेल का?

कृपया मार्गदर्शन करावे.

मी गेल्या बरेच वर्षां पासून Netherlands मधेच आहे. खालील उत्तरं माझ्या स्वानुभावर आधारित आहेत :

१) त्यासाठी तिने आपल्या पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक आहे का?
नाही . पारपत्रावर name of spouse मध्ये update करावे . लग्न प्रमाणपत्र लागेल. हे पासपोर्ट नूतनीकरण करताना पण होते. लगेच करण्याची गरज नाही .

२) मुलीचे लग्नानंतर नाव अजिबात न बदलता फक्त विवाह प्रमाणपत्राधारे लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळू शकतो का?
हो . इथे लग्न प्रमाणपत्र आणि जन्म दाखल्याची apostille केलं कि झालं.

३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?
हो . The Netherlands मध्ये फक्त नाव चालते. Mrs. पण लावण्याची गरज नाही .

४) समजा पारपत्रावर लग्नानंतरचे नाव हवे असल्यास ते कसे बदलता येईल?
माहिती नाही. पण आम्ही नाव बदलले नाही . Renew करताना काही प्रॉब्लेम आला नाही.

५) पारपत्रावर नवीन नाव हवे असल्यास ते आधी आधारपत्र, PAN card, वेगवेगळी बँक खाती, भविष्य निर्वाह निधी खाते, DMAT खाते अश्या ठिकाणी आधी बदलावे लागेल व नंतरच पारपत्रावर बदलता येईल असे पारपत्र केंद्रात सांगण्यात आले आहे. किमान आधारपत्र व PAN CARD हे तरी नवीन नावाने असले पाहिजे कारण Identification proof, Address proof यासाठी ही कागदपत्रे लागतात.

ही माहिती बरोबर आहे का?

फुकट चा सल्ला देतो : नाव change करू नका . मला गेल्या १० वर्षात कुठेही प्रॉब्लेम आला नाही . Netherlands ला तर नाहीच नाही.

६) समजा लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळून मुलगी नवऱ्याकडे हॉलंडला गेली व काही वर्षांनंतर पारपत्राची मुदत संपल्यानंतर त्यावेळी नवीन नावाने हॉलंड वकीलातीतून नवीन भारतीय पारपत्र मिळू शकते का? त्यासाठी नवीन नावाने आधारपत्र, PAN card वगैरे लागेल का? तसे असल्यास ते हॉलंडमध्ये राहून बदलता येते का?

नूतनीकरण करताना फक्त date change होते . बाकी काहीही बदलल्यास documents लागतात .

काही गरज असल्यास सांगा , व्हाट्सअँप वर बोलू.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2022 - 2:12 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! Whatsapp साठी व्यक्तीगत संदेश व क्रमांक पाठवतो.

निपा's picture

2 Aug 2022 - 3:25 pm | निपा

चालेल

श्रीरंग_जोशी's picture

3 Aug 2022 - 10:33 pm | श्रीरंग_जोशी

निपा साहेबांचा स्वानुभवावर आधारीत माहितीपूर्ण प्रतिसाद पटला.
माझ्या पत्नीने विवाहानंतर कुठेही नाव व आडनाव बदलले नाही व त्यामुळे भारतात व अमेरिकेत आजवर कधीही कुठलीही समस्या आलेली नाही.

विहानंतर नाव व आडनाव बदलणार्‍यांच्या समस्यांबद्दल काही वेळा वाचले आहे.

मी देखील काही वर्षे हॉलंड देशाची रहिवासी होते . जाताना जुन्याच नावाने गेले. तिकडे भारतीय एम्बसी मध्ये माझं नाव बदलून घेतले . नंतर हॉलंड च्या लोकल मुनसिपाल हॉल मध्ये देखील ते बदल करून घेतले . लगेचच एम्बसी मधून पासपोर्ट नवीन नावाने घेतला . (त्यावेळी माझ्या आधारकार्ड , पॅन कार्ड वर नाव माहेरचं पण पत्ता मात्र सासरचा होता. तिथे त्यामुळे काहीच फरक पडला नाही कारण काहीच दाखवायला लागलं नाही . ) फक्त legalized marriage certificate लागेल .

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2022 - 9:00 am | श्रीगुरुजी

धन्यवाद! उपयुक्त माहिती आहे.