गाभा:
मध्यंतरी सहज मी एकाला म्हटले, तू आमच्या दोघींच्या मैत्रीत उत्प्रेरक होतास तर त्याला मजा वाटली. म्हणाला, "शाळा संपल्यावर पहिल्यांदाच हा शब्द ऐकला".
.
.
परवा मिपा वर कोणी तरी अभिप्रायात "गृहितक" लिहिले आणि परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....
को-बा-को,
पुंकेसर,
बेरी बेरी,
पडताळा,
हरितद्रव्य,
प्रकाश संश्लेषण,
समलंब त्रिकोण,
मूलद्रव्ये,
म.सा.वि.
.
.
.
.
जणू मराठी माध्यम गणित, विज्ञान विषयाच्या पा.पु.म.नि. पुस्तकातील शब्दांची पोतडीच उघडली...
प्रतिक्रिया
21 Feb 2008 - 8:02 am | बेसनलाडू
हा कसा असतो बॉ?
समलंब चौकोन म्हणायचे असावे कदाचित. आणि समभुज किंवा समद्विभुज त्रिकोण
(स्मरणशील)बेसनलाडू
21 Feb 2008 - 8:33 am | भडकमकर मास्तर
सिद्धता
ग्रसनी-मध्यकर्ण नलिका
डिंभक
अपृष्ठवंशीय
सरिसृप
तारामासा
बाओबाब वृक्ष
विषुववृत्तीय घनदाट अरण्याचा प्रदेश
मोसमी हवामानाचा प्रदेश
21 Feb 2008 - 9:03 am | बेसनलाडू
फोर्स = बल
विस्थापन = डिस्प्लेसमेन्ट
वेलॉसिटी = वेग
स्पीड = चाल
ऍक्सलरेशन = त्वरण
डिसलरेशन = अवत्वरण
मोमेन्टम = संवेग (?)
इम्पल्स = आवेग
पोटेन्शिअल एनर्जी = स्थितिज ऊर्जा/स्थैतिक ऊर्जा
कायनेटिक एनर्जी = गतिज ऊर्जा
रेजिस्टर = विद्युतरोध
ट्रान्सफॉर्मर = रोहित्र (?)
जनरेटर = जनित्र
(स्मरणशील)बेसनलाडू
21 Feb 2008 - 9:34 am | सृष्टीलावण्या
पुस्तकांची चवड आहे की काय... शब्द धबाधबा लिहिताय म्हणून विचारतेय...
21 Feb 2008 - 9:53 am | बेसनलाडू
नाही हो. बरेच खूप चांगले लक्षात राहिलेत. तशी स्मरणशक्ती बरीच चांगली म्हणायला हवी / आहे.
हे बघा रसायनशास्त्रातले काही -
१. ब्लास्ट फर्नेस = झोतभट्टी
२. फ्लास्क = चंबू
३. बीकर = चंचुपात्र
४. बेस = आम्लारी
५. आम्ल = ऍसिड
६. सॉल्टस् = क्षार
७. आयन = मूलक (ऍनायन = धन मूलक, कॅटायन = ऋण मूलक)
८. वॅलन्सी = संयुजा
९. आयनिक बॉन्ड = मूलकीय बंध, कोवॅलन्ट बॉन्ड = सहसंयुज बंध
:)
(स्मरणशील!)बेसनलाडू
21 Feb 2008 - 9:14 am | नंदन
मज्जारज्जू = मेड्युला ऑब्लान्गाटा (बहुधा)
तंतुकणिका = मायटोकॉन्ड्रिया
संयुग
नत्र वायू
बाकी बालभारतीचे ते चित्र आवडले :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
22 Feb 2008 - 12:53 am | एक
वाटतं. पण तिचा उगम "मेड्युला ऑब्लान्गाटा"" मधून होतो.
29 Feb 2008 - 12:18 pm | सर्किट (not verified)
मिसळपावावर आणिबाणी असून्देखील असे अश्लील शब्द लिहिण्याची परवानगीआहे, असे दिसते आहे ;-)- सर्किट
21 Feb 2008 - 11:13 am | अनिला
सार्वाची स्मरणशक्ती बरीच चांगली आहे. बाल भारतीचे चित्र पाहून कल्प ना आली शअळेचे बिल्ले असतील तर छापा, मज्जा येइइल. आपल्या जवळ मराथी यन्त्रालयाच कोश आहे. ह्व्वे तेवड्।ऍ शब्द लिहू!
21 Feb 2008 - 2:11 pm | स्वाती दिनेश
अरे वा,एकदम शाळेतल्या बाकावर जाऊन बसल्यासारखे वाटते आहे..
आणखी काही-
कोबाको बरोबरचे आणखी ३ बाबाबा,बाकोबा,बाकोको
प्रमेय,व्यत्यास,
साध्य,सिध्दता
प्रतल,एकप्रतलीय ,नैकप्रतलीय,समांतर
बिंदू,रेषाखंड,किरण,रेषा,कंस,वर्तुळकंस
संच- नैसर्गिक संख्या संच,पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच,परीमेय संख्या संच,अपरिमेय संख्या संच,वास्तव संख्या संच
सांत आणि अनंत संच
विभक्त संच,उपसंच
23 Feb 2008 - 12:06 am | स्वाती दिनेश
त्रिकोण- समभुज,समद्विभुज,विषमभुज,काटकोन,लघुकोन,विशालकोन त्रिकोण
चौकोन-चौरस,आयत,समभुज,समांतरभुज,समलंब,पतंग
21 Feb 2008 - 3:02 pm | विसोबा खेचर
शाळेत जीवशास्त्र शिकताना बेडकांच्या संदर्भात 'मिलन फुगवटा' हा शब्द ऐकला होता. बेडकांना म्हणे हा मिलन फुगवटा असतो आणि नरमादीच्या (नरमादीच्याच ना? कारण बेडकात कुणी लेस्बि किंवा होमो असल्याचे ऐकले नाही! ;) मिलनाच्या वेळी म्हणे हा मिलन फुगवटा चांगला टरारून फुगतो म्हणे!
अवांतर - हा मिलन फुगवटा हा नराला असतो किंवा मादीला असतो की दोघांना असतो या संदर्भात मला फारशी माहिती नाही! :)
आपला,
(मिलनोत्सुक!) तात्या.
बालभारतीचं चित्र खूप वर्षांनी पाहिलं आणि खूप बरं वाटलं!
आपला
(हळवा) तात्या.
21 Feb 2008 - 3:03 pm | विजुभाऊ
इयत्त १० वी पर्यन्त तुम्ही करटक कशासाठी वापरला होता....
फार तर त्याने बेन्च वर नावे किन्वा इनामदार मास्तर= खडूस असले कहितरि खरड्णे हाच त्याचा उपयोग असतो..असेच मला वाटत होते.
( अजुनही त्याचा नेमका शालेय जिवनात उपयोग काय हे कळाले नाही)
एक ढ विजुभाऊ
21 Feb 2008 - 3:56 pm | धमाल मुलगा
आम्ही कर्कटक वापरण्याच॑ मुख्य कारण असायच॑ ते बे॑चवर मध्य शोधून एक खोल रेघ मारायची अन् त्या बे॑चची फाळणी करायची. मग?? भा॑डायला काही कारण नको का? तू माझ्या हद्दीत आलास अन् मी तुझ्या अशी काहीबाही कारण॑ काढायची :)
(फकस्त "मुला॑चे विद्यालय" असल्याने अस॑ जीवावर उठल्यासारख॑ भा॑डायला मनसोक्त मिळायच॑.)
ह्या शिवाय ज्याच्याशी खुन्नस असेल त्याच्या दप्तराला भोक॑ पाडणे, वॉटर-बॉटलला भोक॑ पाडणे, तो बसला असताना कर्कटकाच॑ एक टोक त्याच्या चड्डीत / पॅ॑टमध्ये अन् दुसर॑ बे॑चच्या फटीत अडकवून ठेवायच॑...उठला की फाटली...बसु दे बो॑बलत :))
आणखी एक... बे॑चच्या फटीत ब्लेड अडकवायच॑ आणि बोटाने वाजवायच॑..लै भारी वाजत॑. मास्तरलोक लै उचकतात ह॑.
21 Feb 2008 - 7:33 pm | मनस्वी
कर्कटकचा स्क्रू सैल्-गट्ट करण्यासाठी १ छोटा चपटा ड्रायव्हर मिळायचा. त्याची त्या काळी खूप मजा वाटायची. मैत्रिणींच्या कंपासचे स्क्रू सैल (किंवा एक्कद्दम घट्ट!) करून ठेवायला!
तास चालू असताना बाई फळ्याकडे वळल्या की बाकाखाली जायचे आणि पुढच्या मुलीच्या पायावर कर्कटक टोचायचे.. की ती जोरात बोंबलायची!
(असूरी) मनस्वी
22 Feb 2008 - 12:59 am | एक
वापरायचो.
ट्रॅक म्हणजे कंपासपेटीतल्या मिळतील त्या वस्तु आणि बाकाचा नैसर्गिक उतार याचा वापर करून बॉलबेअरींग साठी वेगवेगळे ट्रॅक करायचे..जाम मजा यायची.
हे ट्रॅक आणि रबर बॅण्ड + कागदाची पुंगळी यात बोअर तास कसा जात असे काही कळायचं नाही.
21 Feb 2008 - 6:04 pm | मनस्वी
जोड्या लावा (अंदाजपंचे)
गाळलेल्या जागा भरा (डोक्यात येइल ते)
एका वाक्यात उत्तरे द्या (वाट्टेल ते)
वाक्यात उपयोग करा (मनात येइल तसा)
सविस्तर उत्तरे द्या (तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा लिहा)
संदर्भासहित स्पष्टीकरण (काहीच्या काही)
शास्त्रीय कारणे द्या (झाली गोची :( )
घटना ओळखा / साले द्या (आता आली पंचाईत.. ५ मार्क गेले..)
चाचणी परीक्षा
तोंडी परीक्षा
सुडोपोडीआ, अमिबा, रंगद्रव्य, मुडदूस, गलगंड, रातांधळेपणा
इग्लू, पश्मिना, खरीप आणि रब्बी पिके, पठार, समशितोष्ण, खनिज पदार्थ
लिटमस कागद, आकुंचन आणि प्रसरण, लंबकाची दोलने, प्रज्वलन, प्रात्यक्षिक
द्रवरूप, वायूरूप, घनरूप, आल्मली, अल्कली, मेदाम्ले
सुभाषितमाला, रुपे द्या, रुपे ओळखा
समांतर, काटकोनात छेदतो, त्रिज्या, प्रमेय, गुणोत्तर, सूत्र, घनफळ, भाज्य, भाजक
वर्तन पत्रिका - ३ लाल सह्या झाल्यावर आमचे परीक्षेत २ मार्क कमी करायचे! (आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मांस!)
ठरलेले सुविचार:
नेहेमी खरे बोलावे.
प्रयत्नांच्या वेलीवर यशाची फळे.
21 Feb 2008 - 7:44 pm | छोटा डॉन
जोड्या लावा (अंदाजपंचे)
गाळलेल्या जागा भरा (डोक्यात येइल ते)
..... किंवा समोरच्याच्या , मागच्या , शेजाराच्या बाकड्यावरील पोराच्या ज्या असतील त्या .............
एका वाक्यात उत्तरे द्या (वाट्टेल ते)
हा हा हा ...........
वाक्यात उपयोग करा (मनात येइल तसा)
खरच काहीच्या काही लिहायचो आम्ही ...........
सविस्तर उत्तरे द्या (तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा लिहा)
परफेक्ट ..........
संदर्भासहित स्पष्टीकरण (काहीच्या काही)
डोंबल माझं , तिथ आम्हाला संदर्भच आठवत नसे आणि म्हणे संदर्भासहीत स्पष्टीकरण ...........
शास्त्रीय कारणे द्या (झाली गोची :( )
घटना ओळखा / साले द्या (आता आली पंचाईत.. ५ मार्क गेले..)
शप्पत सांगतो , साल आणि घटना याचा मेळ कधीच बसला नाही ....
मग आपलं आहेच ....समोरच्याच्या , मागच्या , शेजाराच्या बाकड्यावरील पोराच्या ज्या असतील त्या .............
21 Feb 2008 - 8:41 pm | लिखाळ
वाचून मजा आली.
बालभारतीचे चित्र तर फार छान वाटले पाहून.
मला ४ थीचा इतिहास फार आवडायचा..शिवाजी महाराज विशेष असे ते पुस्तक होते..त्यात मी सातार्यात अश्या शाळेत होतो की जेथे भिंती कूडाच्या..जूना ऐतिहासिक वाडा होता तो. त्यामुळे इतिहास शिकायला पार्श्वभूमी जोरात आणि त्यात शिवरायांचा इतिहास. विचारु नका..ते कान्होजी आंग्रे आणि इतर सर्व पात्रे फार आवडायची.
आणि ६ वी चा भूगोल.. जगातील निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशांचे वरणन..वाहवा... फळफळावळांचा देश..इत्यादी..मस्त !
मराठीचे पुस्तक तर काय प्रत्येक वर्षाचेच आवडायचे. ८वी मध्ये कोकणातले दिवस म्हणून रविंद्र पिंग्यांचा धडा होता फार आवडला होता. आणि डोह या दिलीप कुलकर्णींच्या संग्रहातला 'उन्हातले दिवस' फार मस्त वाटायचे ते धडे वाचताना...
शिवाय... स्वामिंच्या मांडीवर उसे वगैरे आहेच..३ लाख बांगडी फुटली..वगैरे..
(प्रतिसाद थोडा 'अवांतरच' आहे असे दिसते..कारण शब्दांची पोतडी म्हणता म्हणता मी वेगळेच काही लिहिले..पण आठवणी जाग्या झाल्या म्हणून..असो.)
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
21 Feb 2008 - 8:55 pm | सृष्टीलावण्या
पण वाचून बरे वाटले...
आणि काही जणांसारखा तुमचा वळू मोकाट सुटलेला नाही हे पाहून चांगले वाटले...
जुन्या आठवणींनी मन भरून येणे कधी ही छान.
22 Feb 2008 - 12:27 am | नंदन
>>> डोह या दिलीप कुलकर्णींच्या संग्रहातला...
छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व, पण डोह हा श्रीनिवास विनायक कुलकर्णींचा संग्रह आहे. अर्थात, तुम्ही आठवण करून दिलेली कथा (आणि त्यातले ऊन खायला वर येणारे कासव इ.) अजून आठवते. तेव्हा त्याबाबत अगदी भा. पो. :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
22 Feb 2008 - 12:51 am | लिखाळ
नंदन,
अगदी बरोबर.. मी दिलीप कुलकर्णी या पर्यावरण विषयक लेखकाच्या नावात आणि श्रीनिवास वि. कुलकर्णींच्या नावात गोंधळ केला.
आभार.
चिंगु आजी गुंडीतून दूध घेवून यायची आणि तिच्या त्या कळशीमध्ये ते दूध चमकायचे असे काहि वर्णन त्या कथेत होते...
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
21 Feb 2008 - 10:04 pm | llपुण्याचे पेशवेll
मी सेमीइंग्लिश मधून शिकलो असल्याने तसे बरेच मराठी शब्द पण माहीत आहेत.
महत्वाचे काही.
वर्तुळ.
त्रिज्या,
व्यास,
परिमिती(ही न काढता येण्याची परीणती गणिताच्या पेपरात तांबड्या भोपळ्याने झाली)
कर्ण्(महाभारतातला नव्हे गणितातला. यानेच आमच्या गणिताच्या पेपरात आमचे वस्त्रहरण केले)
भुजा,
पायथागोरसचे प्रमेयः काटकोन त्रिकोणात काटकोना समोरील बाजूची लांबी इतर दोन बाजूंच्या लांबीच्यावर्गाच्या बेरजेच्या वर्गमूळाइतकी असते(आम्ही याला 'पायथागोरसच्या' प्रमेय म्हणत असू . जरी मी ते इंग्रजी मधून शिकलो असलो तरीही.)
सम प्रमाण आणि व्यस्त प्रमाण( याचे उदाहरण म्हणजे माझे गणितातील मार्क "गणितात मिळणारे मार्क पेपर लिहीणार्याच्या आकाराच्या व्यस्त प्रमाणात असतात." याला कारण म्हणजे मी माझे बालपणापासून राखून असलेले "वजन")
पुण्याचे पेशवे
21 Feb 2008 - 11:01 pm | चतुरंग
अतिशीत हवामानाचे प्रदेश (ह्यावरची आचरट कोटी करुन आम्ही वर्गात हसत असू! आणि मास्तरांना कळले की मग डोळ्यात आसू!!:)
समशीतोष्ण कटिबंधातले प्रदेश
विषुववृत्तीय घनदाट अरण्याचे प्रदेश = ट्रॉपिकल
भूशिर
सामुद्र्धुनी
उपसागर = बे
समुद्र = सी
महासागर = ओशन
आखात = गल्फ
तळे = पाँड
सरोवर = लेक
नदी
नद (असाही एक शब्द ऐकल्याचे आठवते - अतिशय मोठ्या नदीला म्हणतात बहुधा 'ब्रम्हपुत्रा' हा नद आहे?)
कर्कवृत्त = ट्रॉपिक ऑफ कॅन्सर
विषुववृत्त = इक्वेटर
मकरवृत्त = ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न
खग्रास
खंडग्रास
मराठी व्याकरणात
प्रत्यय - स, ला, ते, स, ला, ना, ते
वृत्ते - शार्दूलविक्रीडित, वसंततिलका (गाई वसंततिलका तमजाजगागी = १४ मात्रा) (त्याकाळी शिकवण्याची पध्दत इतकी छान होती की कित्येक गोष्टी फारसा प्रयास न करताही चांगल्या लक्षात राहू शकल्या ह्याचं बरचसं श्रेय मी तरी शिक्षकांना देईन)
समास - बहुव्रीही
काळ - भूत, भविष्य, वर्तमान (आम्ही वर्गात असताना एकदा वर्तमानकाळाशी फारकत झाल्यामुळे एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो नव्हतो (मुदलात प्रश्नच ऐकला नव्हता!) तेव्हा मास्तर चांगलेच कर्दनकाळ झालेले आठवतात!)
इतिहासात - आग्र्याहून सुटका ह्या धड्यावरील एक प्रश्न होता -
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कसे वागवले? - सविस्तर उत्तर द्या -
एकाने फक्त एका शब्दात लिहिले होते "वाईट". (त्यानंतर औरंगजेबाने महाराजांना वागवले नसेल इतके वाईट त्या महाभागाला मास्तरांनी वागवले!:)
चतुरंग
21 Feb 2008 - 11:42 pm | धनंजय
माझ्या आजीच्या मते "नद" (तिच्या गावाकडचे तरी) लहान असत, नद्या मोठ्या असत.
पण तुम्ही म्हणता तेही खरे.ब्रह्मपुत्र हा नद जगातल्या मोठ्या प्रवाहांपैकी एक आहे. आणखी एक प्रसिद्ध "शोणभद्र" नद आहे. तो अमरकंटकच्या आसपास उगम पावतो, पण जवळूनच उगम पावणार्या नर्मदेशी त्याचा संगम न होता तो उत्तरेकडे जाऊन गंगेला मिळतो. त्याविषयी प्रेमभंगाची कथा सांगतात.
त्यामुळे माझ्या आजीचे म्हणणे तिच्या गावच्या बोलीशी संबंधित असावे.
21 Feb 2008 - 11:55 pm | लिखाळ
मी तर नद पाच आहे असे ऐकून आहे. मोठ्या नद्यांना ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, नर्मदा आणि कवेरी (अंदाजपंचे) नद म्हणत असावेत. नदी स्त्रिलिंगी तर नद पुल्लींगी असतो. इत्यादी.
ग्रीक हुण शक-यवन ....... .भूमीपर
हार .............. पंच नद के तीर पर
पता नही कहां है वे अतीत में समा गये
काल के प्रवाह में निज को वे मिटा गये
भव्य दीव्य लक्ष्य की प्राप्ति ही विराम है..
जन्मभूमी कर्मभूमी स्वर्ग से महान है ..
असे एक काव्य माझ्या लक्षात आहे...जसे आठवले तले लिहिले. पण त्यात ते पाच नद असा उल्लेख आहे या उल्लेखवर आधारित माझा वरिल प्रतिसाद आहे. चूभूदेघे
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
22 Feb 2008 - 12:56 pm | स्वाती दिनेश
जन्मभूमी कर्मभूमी स्वर्ग से महान है ..
जननी जन्मभूमी स्वर्गसे महान है।
असे आहे ना बहुदा?एकेकाळी ते सारे पाठ होते,आता आठवतच नाहीत ओळी,:(
स्वाती
22 Feb 2008 - 1:54 pm | मनस्वी
आई आणि जन्मभूमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.
(श्रावणबाळ) मनस्वी
22 Feb 2008 - 2:07 pm | रिकामा न्हावी
जननी जन्मभूमी स्वर्गसे महान है।
ईस की रक्षा में तन है, मन है,और प्राण है ।।
*ये सुवर्णधाम है सदा ईसे प्रणाम है ।
मुकाबला करेंगे जबतक जान मे ये जान है ।।
;) असं काहीस...पण पुढे ??
*मधेच ... हुतात्मों के रुधिरसे भुमी सश्यसाम है (?)
रिकामा न्हावी
------------------------------------------------------------
हजामत करणे हा आमुचा धंदा .... हजामत झालेली पहाणे हा छंद...
23 Feb 2008 - 12:38 am | चतुरंग
पंजाब = पंच + दुआब, म्हणजे रावी, चिनाब, सतलज, बिआस आणि झेलम ह्या पाच नद्यांच्या दुआबाच्या प्रदेशाचे वर्णन असावे असे वाटते; कारण ग्रीक, हूण, शक ह्यांचे राज्य त्यापुढे सरकू शकले नाही.
त्यातला 'नद' शब्द हा नदी ह्या शब्दाचे अनेकवचन असावा (?)
चतुरंग
29 Feb 2008 - 1:25 pm | प्रभाकर पेठकर
पंजाब = पंच + दुआब
ही संधी चुकीची आहे. खरी अशी आहे, पंज + आब. पंज म्हणजे पांच आणि आब म्हणजे पाणी. इथे आब चा निर्देश हा नद्यांकडे आहे. पांच नद्यांचा प्रदेश तो पंजाब.
दुआब म्हणजे दु + आब. दु म्हणजे दोन आणि आब म्हणजे पाणी (इथे नद्या) दोन नद्यांच्या बेचक्यातील प्रदेशाला दुआब म्हणतात.
22 Feb 2008 - 12:18 am | ब्रिटिश टिंग्या
प्रत्येक पाठ्य-पुस्तकाच्या पहिल्या पानवर असायची....
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
-(भारतीय) छोटी टिंगी
22 Feb 2008 - 3:32 am | बेसनलाडू
प्रतिज्ञा झाल्यावर जय हिन्द जय महाराष्ट्र म्हणायचे विसरलात बघा!
(स्मरणशील)बेसनलाडू
22 Feb 2008 - 12:46 am | सुनील
मूडदूस हा रोग कसा असतो आणि तो झालेला रोगी कसा दिसतो याची मला आजतागायत कल्पना नाही. परंतु, मूडदूस हा शब्द जेव्हा प्रथम शाळेत ऐकला तेव्हा मला मुडदूशा ह्या माश्याची आठवण झाल्याचे अजून आठवते!!!
टीप - मूडदुशा हा एक माश्याचा चविष्ट प्रकार आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Feb 2008 - 12:55 am | लिखाळ
हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा..म्हणजे मुडदुसाचे लक्षण... असे दूरशनवरच्या पुन्हा पुन्हा दाखवल्या जाणार्या आणि विशिष्ट लकबीत समालोचन करणार्या एका ध्वनिफितीतले वाक्य आठवते :) (ड जीवनसत्व युक्त अश्या कोवळ्या उन्हात बसणे हा उपाय सुद्धा आठवतोय :)
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
22 Feb 2008 - 8:42 am | विसोबा खेचर
आणि विशिष्ट लकबीत समालोचन करणार्या एका ध्वनिफितीतले वाक्य आठवते :)
येस्स्स! विशिष्ठ लकबीत समालोचन करणार्या त्या समालोचकचं नांव 'भाई भगत' बरं का लिखाळराव! :)
भाई भगत मस्तच बोलायचे बाकी!
मला अजूनही आठवतंय, कुष्ठरोगावरच्या एका चित्रफितीतदेखील भाई भगतांचाच आवाज आहे..
"यांना आपलं म्हणा!"........
असो..
तात्या.
22 Feb 2008 - 8:48 pm | सुधीर कांदळकर
शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांचा वेताळ (फँटम),
नाना फ्डणिसांचा देव आनंद
इ.इ.