नमस्कार,
आज युट्युब बघता बघता सहज एक चित्रफीत समोर आली. युट्युब वर अनेक लोक वेगवेगळे विषय घेऊन चित्रफिती बनवितात. कोणाला कशी प्रसिद्धी मिळेल ते सांगता येत नाही. मात्र आजची ही चित्रफीत बघीतल्यावर माझी मती गुंग झाली. ह्या चित्रफितीला तब्बल 249,018 वेळा भेट दिली गेली आहे. नक्की काय आहे यात ? एव्हढे बघण्यासारखे काय आहे यात ? अधिक खोदाखोद केला असता ह्या व्यक्तीचे युट्यूबवर काहि चॅनेल आहेत त्यांना धावती भेट दिली. एवढ्या Views मागील गणित अनाकलनीय आहे.
चित्रफितींखालील बर्याच प्रतिक्रिया वाचल्यावर भारतीय पुरुष अजून स्त्रियांच्या शरीरापलीकडे जाऊन पाहू शकत नाही ही महत्वाची बाब अधोरेखीत झाली. कधी कधी मुळ चित्रफितींपेक्षा प्रतिक्रिया बोलक्या असतात.
असो. काय बोलावं सुचेना !
चित्रफितीचा दुवा
युट्यूब चॅनेलचा दुवा
अवांतर :
मला वकिली पेशाचे फार आकर्षण होते व अजूनही आहे. न्यायालयाचे काम कंटाळवाणे असते हे मान्य मात्र न्यायालये आजपर्यंत फक्त चित्रपटांत किंवा कादंबर्यांतच पाहिली होती. एक दोन वेळा जमिनिच्या कामानिमित्त दिवाणी न्यायालयात जाण्याचा योग आला मात्र तिथे केवळ पुढील तारीख घेण्याचा योग आला त्यामुळे युक्तीवाद ऐकता आला नाही. युट्युब वर म. प्र. आणि बिहार येथील काही न्यायालयात चालणार्या केसेसचे चित्रिकरण पाहण्याचा योग आला. काही चित्रफिती बघणे उद्बोधक आणि रोचक वाटल्या. ज्यांना न्यायालयीन कामकाजात रस आहे अशा व्यक्तींनी जरुर भेट द्यावी.
युट्यूब चॅनेलचा दुवा
मी पाहिलेली चित्रफीत
अवांतर :
सगळ्या चित्रफिती संथ आहेत.
ही कोणत्याही युट्यूब चॅनेलची जाहिरात नाही.
यांच्याकडून मला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहित.
प्रतिक्रिया
18 Jul 2022 - 9:07 pm | अमरेंद्र बाहुबली
टायटल वाचून “काय बोलावं ते सुचेना“ फेम काका आठवले. आता त्यांच्या आवडीचं सरकार आलंय तेव्हा पासून त्यांना काय बालावे हे सुचेल ही अपेक्षा.
18 Jul 2022 - 10:13 pm | धर्मराजमुटके
काय बोलावं ते सुचेना अशी अवस्था माणसाची दोनदा होते.
१. जेव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडते तेव्हा आणि
२. जेव्हा सगळे त्याच्या मनासारखे घडते तेव्हा.
काकांच्या मनातील सरकार आल्यामुळे आनंदातिरेकाने काय बोलावे ते सुचेना अशी अवस्था होऊ शकते. त्यामुळे तुमची अपेक्षा पुर्ण होण्याची शक्यता कमीच वाटते. :)
18 Jul 2022 - 11:21 pm | अमरेंद्र बाहुबली
मला वाटतेय त्यांच्या आवडीचे सरकार आलेय पण आवडीचा मुख्यमंत्री आलेला नाही. अजूनही शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहून त्यांना ऊचक्या लागत असाव्यात. सरकार आपलं मग मामू आपला का नाही? हे पाहून त्यांना काय बोलावे हे सुचेना झाले असावे. :)
19 Jul 2022 - 12:06 pm | सुबोध खरे
@अमरेंद्र बाहुबली
जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुम्हाला राजकारणच दिसतंय का?
मूळ विषय काय आणि आपण काय लिहिताय?
19 Jul 2022 - 12:19 pm | अमरेंद्र बाहुबली
विषयाशी संलग्न प्रतिसाद खाली दिलाय. वाचत चला.
19 Jul 2022 - 3:20 pm | विजुभाऊ
सहमत आहे
19 Jul 2022 - 3:21 pm | विजुभाऊ
डॉ . सुबोध खरे च्या मताशी सहमत आहे
18 Jul 2022 - 9:16 pm | वामन देशमुख
या वाक्यातून भारतीय हा शब्द वगळला तर या धाग्याच्या विषयावर चर्चा करता येईल.
18 Jul 2022 - 10:10 pm | धर्मराजमुटके
दुर्दैवाने माझ्याकडे मुळ लेखनात बदल करण्याची जादूई शक्ती नाहीये. तेव्हा तुम्ही तिथे भारतीय शब्द तिथे नाहीच असे समजून चर्चा करु शकता.
18 Jul 2022 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली
मूळात चित्रफीतींचे टायटल वाचले तेव्हाच लक्षात येतं काय प्रकार आहे. त्या पुर्ण चित्रफीतीत काहीही माहीतीपुर्ण नाही. नेमका ऊद्देश काय आहे बनवायचा??
18 Jul 2022 - 9:20 pm | आग्या१९९०
स्त्रियांचे शरीर बघण्यात काय वाईट असते?
18 Jul 2022 - 10:44 pm | Trump
बहुसंख्य स्त्रीयांना जोपर्यंत पुरुष त्यांच्या सुंदरतेची मयादेत राहुन दाद देतात तेव्हा त्यांना काहीच हरकत नसते, किंबहुना आंनदच होतो. प्रत्येक स्त्रीची मर्यादा वेगळी असते.
18 Jul 2022 - 9:23 pm | आग्या१९९०
नेमका ऊद्देश काय आहे बनवायचा??
व्हिडिओ हिटचे पैसे मिळतात व्हिडिओ बनवऱ्याला.
18 Jul 2022 - 9:25 pm | कंजूस
नवरा -बायको, घटस्फोट,कौटुंबिक तक्रारी आहेत. गाववाल्यांना यात फार रस असतो.
Subscriber आकडा पाहिला आणि त्यांचे विडिओ पाहिले तर चक्रावून जातो. काही मोबाईल रिव्यु चानेलचे सबस्क्राइबर शंभर लाखांवर आहेत पण त्यात काही नाही.
MostlySane या घरगुती गप्पा चानेलचे साठ लाखांवर आहेत.
18 Jul 2022 - 9:51 pm | सुक्या
गंम्मत अशी आहे की असल्या फालतु व्लॉग बघणारे पण फालतुच असतात. त्यांना काही कामधंदा नसतो.
त्यामुळे कमेंट पण तशाच असतात. व्लॉगर ला त्याचा काही फरक पडत नाही. त्या मार्गे येणारा पैसा जास्त महत्वाचा ..
25 Jul 2022 - 8:06 pm | धर्मराजमुटके
असे किती पैसे मिळतात युट्यूब व्हिडीओ बनविणार्याला ? काहीच मुल्य नसणारे चॅनेल जर पैसे कमवत असतील तर मुल्य असणारे नक्कीच त्यापेक्षा जास्त कमवू शकतील.
26 Jul 2022 - 3:26 am | सुक्या
असे किती पैसे मिळतात युट्यूब व्हिडीओ बनविणार्याला ?
नक्की माहीत नाही. परंतु जितके जास्त लोक एखादा व्हिडीओ पाहतील त्या प्रमाणात त्या व्हिडीओ आधी जाहीराती दाखवल्या जातात. त्यावर व्हिडीओ बनविणार्याला त्यात हिस्सा मिळतो.
त्यामुळे मुल्य असणे हा दुय्यम भाग झाला. व्हुय वाढवण्यासाठी मग चवचाल पणा करणे / शरीर प्रदर्शन / द्व्यर्थी संवाद वगेरे वगेरे करतात. रिकाम टेकडे मग ते बघत बसतात.
26 Jul 2022 - 7:04 am | अमरेंद्र बाहुबली
१००० विव्ज ला १ डाॅलर रेट होता. आता बदलला की तसाच आहे माहीत नाही, सबस्क्रासबर्स ना जाहीरात दार ह्यांवरही कमाई अवलंबून असते.
26 Jul 2022 - 8:56 am | धर्मराजमुटके
पैसे नक्की कसे मिळतात ?
म्हणजे एखाद्या चित्रफित पुर्ण पाहिली गेली तरच मिळतात की नुसते चित्रफीत उघडली आणि ५-१० सेकंद बघीतली तरी मिळतात ? मधे येणार्या जाहिराती स्कीप करुन बघीतल्या तरी पुर्ण पैसे मिळतात काय ?
26 Jul 2022 - 3:09 pm | टर्मीनेटर
हा एक प्रचंड गुंतागुंतीचा आणि अपारदर्शक व्यवहार आहे
तुमच्या प्रश्नांची उत्तरे लिहायला घेतली पण प्रतिसाद लेखा एवढा मोठा होऊ लागलाय म्हणुन इथे एका वाक्यात उत्तरे देतो आणि अधिकची माहिती स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात प्रकाशित करतो!
चित्रफित पुर्ण पाहिली जाण्यापेक्षा तीच्या सुरुवातीला येणारी (आणि मोठा व्हिडीओ असल्यास मध्ये येणारी /येणाऱ्या) जाहिरात/जाहिराती पाहिल्या गेल्या की नाही ह्यावर तो View मॉनेटायझेशनसाठी पात्र आहे की नाही हे ठरते, सबब ५-१० सेकंद बघीतलेल्या चित्रफितीसाठी पैसे मिळणार नाहीत.
जाहिरात बघितली गेली तरच तो View मॉनेटायझेशनसाठी पात्र ठरतो त्यामुळे जाहिराती स्किप केल्यास पैसे मिळणार नाहीत!
26 Jul 2022 - 9:04 am | जेम्स वांड
ह्याचे भारत स्पेसिफिक ठोकताळे इथे वाचा
व्युज साठी सध्या $०.५ मिळतात दर १००० व्युजला, ह्या एनलिटिक्सनुसार भारतीय युट्युबर्सचे मुख्य इन्कम हे गूगल ऍड सेन्स थ्रू येते. बाकी डिटेल्स लिंकवर वाचता येतील.
26 Jul 2022 - 3:27 pm | टर्मीनेटर
वांड भाऊ,
मॉनेटायझेशनचे निकष खूप गुंतागुंतीचे आहेत त्यामुळे १००० Views साठी किती रक्कम मिळेल हे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही!
त्यावर लवकरच एक लेख पाडतोय 😀
खरंतर प्रतिसादच लिहायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती मोठी असल्याने तो स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात प्रकाशित करतो!
26 Jul 2022 - 9:45 am | आग्या१९९०
वर्षभरात तुमचे युट्यूब अपलोड व्हिडिओ कमीतकमी १००० मिनिटे बघितली गेली तरच तुम्ही पैसे मिळण्यास पात्र होता.
26 Jul 2022 - 3:18 pm | जेम्स वांड
ह्याचा नेक्स्ट फॉलोअप कधी घ्यायचा ?
🤣 🤣 🤣 🤣
26 Jul 2022 - 3:32 pm | टर्मीनेटर
😀 😀 😀
नाही.... फॉलोअप घ्यावा नाही लागणार, प्रतिसाद म्हणुन लिहायला घेतला त्यातच जवळजवळ अर्धा ऐवज टंकून झालाय.... शक्यतो आजच पूर्ण करतो!
26 Jul 2022 - 5:04 pm | धर्मराजमुटके
लेख आलेला नक्कीच आवडेल.
वर प्रतिसादात जेम्स वांड यांनी दिलेला दुवा देखील वाचला. रोचक माहिती आहे. मात्र अमेरिकेमधून पाहण्यात येणार्या चित्रफितींना जास्त पैसे का देतात हे समजले नाही.
बाकी प्रश्न तुमचा लेख आल्यावर विचारीन.
26 Jul 2022 - 6:15 pm | जेम्स वांड
रे-शिष्ट आहे का काय मेले हे
26 Jul 2022 - 6:40 pm | धर्मराजमुटके
आम्रविकेतील लोक्स पाहत असतील तर कंटेंट भारीच असणार असा बहुधा (गैर्)समज असावा.
26 Jul 2022 - 6:52 pm | अमरेंद्र बाहुबली
मला वाटतं देशाप्रमाणे वेगळा रेट ाहे. स्काॅटलंंडचा टूरास्ट आहे डेल म्हणून तोही लै कमवतो.