फिनिक्ससाठी मराठी शब्द सुचवता येईल?

क्रान्ति's picture
क्रान्ति in काथ्याकूट
29 Apr 2009 - 9:29 pm
गाभा: 

फिनिक्स हा आपल्याच राखेतून जन्माला येणारा पक्षी आहे, असं ऐकलं आहे. मला फिनिक्स या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द हवा आहे. मला सुचलेले काही शब्द इथे देतेय, ते योग्य आहेत का, हेही सुचवावं.
मला सुचलेले शब्द :- अग्निपाखी, अंगारपक्षी, भस्मजन्मा.
आणखी नव्या शब्दांचं स्वागत आहे.

प्रतिक्रिया

एक's picture

29 Apr 2009 - 9:37 pm | एक

.

अनंता's picture

30 Apr 2009 - 10:27 am | अनंता

कसे वाटते?

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

जृंभणश्वान's picture

29 Apr 2009 - 9:41 pm | जृंभणश्वान

ऍश्+वर+या :)

याहून चांगला सुचला की सांगतो.

अजय भागवत's picture

29 Apr 2009 - 9:51 pm | अजय भागवत

चांगला प्रतिशब्द आहे. :-)

भाग्यश्री's picture

30 Apr 2009 - 2:43 am | भाग्यश्री

=))
अशक्य !!

www.bhagyashree.co.cc

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2009 - 2:44 am | मुक्तसुनीत

च्या मारी यॉनिंग डॉग.... लय भारी पी जे !

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2009 - 9:26 pm | मेघना भुस्कुटे

=))

खतरनाक दादा! मानला!

अविनाशकुलकर्णी's picture

29 Apr 2009 - 9:54 pm | अविनाशकुलकर्णी

राखखग

प्राजु's picture

29 Apr 2009 - 9:57 pm | प्राजु

अग्निपंखच चांगलं वाटतं. किंवा रक्षाविहग,..रक्षापक्षी...

ऍश्-वर-या.. हे ही छान आहे. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिता's picture

30 Apr 2009 - 1:24 am | अनिता

अग्निपंख हेच नाव छान वाट्ते...

ऋषिकेश's picture

29 Apr 2009 - 10:28 pm | ऋषिकेश

मृत्युज कसे वाटते?

मृत्युतून न्माला येणारा मृत्युज

ऋषिकेश

टारझन's picture

29 Apr 2009 - 10:32 pm | टारझन

हे म्हणजे हल्ली विकलं जाणारं सॉफ्टड्रिंक... निंबूज ... निंबू पासून निर्माण झालेला =))

ऋषिकेश's picture

29 Apr 2009 - 10:34 pm | ऋषिकेश

=))

ऋषिकेश

दशानन's picture

29 Apr 2009 - 10:34 pm | दशानन
नितिन थत्ते's picture

29 Apr 2009 - 10:36 pm | नितिन थत्ते

भस्मज
अवांतरः फिनिक्सच म्हणायला काय हरकत आहे?

खराटा

प्राजु's picture

29 Apr 2009 - 10:44 pm | प्राजु

फिनिक्स म्हणायला काय हरकत आहे?
तसंही ते विशेष नाम आहे. काहीच हरकत नाही खरंतर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Apr 2009 - 8:38 am | llपुण्याचे पेशवेll

मलाही भस्मज हेच नाव आवडले....

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2009 - 10:26 am | प्रकाश घाटपांडे

सहमत
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अजय भागवत's picture

29 Apr 2009 - 11:05 pm | अजय भागवत

आख्यायिकेनुसार हा पक्षी ज्वाळांमध्ये झेप घेऊन युवा बनुन झेप घेत असे- एक प्रकारचा अवतारच हा. मराठी नाव हवेच असेल तर ह्या पक्षाच्या ह्या पुनर्जन्म घेण्याच्या विषेश गुणावरुन त्याचे नांव असणे योग्य वाटेल. जसे युवावतारी, किंवा अवतारी पक्षी.

मराठमोळा's picture

29 Apr 2009 - 11:40 pm | मराठमोळा

विश्वनाथ नाव द्या. मला एक हिंदी सिनेमा आठवतो आहे या नावाचा. त्यात शत्रुघन सिन्हा "विश्वनाथ" या नावाच्या वकिलाचा अभिनय करतो आणी त्यातच एक डायलॉग आहे.

जली को आग कहते है, बुझी को राख कहते है. और राख से जो बारुद उभरता है उसे विश्वनाथ कहते है.

=)) =)) =)) =)) =)) =))

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

संदीप चित्रे's picture

30 Apr 2009 - 1:20 am | संदीप चित्रे

=D> =D> =D>
अवांतर - फिनिक्सच म्हणावं (असं मला तरी वाटतं -- उगाच ओढून ताणून मराठी शब्दात कशाला बसवायच ?)
'टाय'ला टायच म्हणावं -- उगाच 'कंठ लंगोट' कशाला? :)

हरकाम्या's picture

30 Apr 2009 - 2:19 am | हरकाम्या

हा मध्येच कंठलंगोट कसा आला तो फिनिक्स काय कंठलंगोट घालतोय का ?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2009 - 2:38 am | बिपिन कार्यकर्ते

राखुंड्या!!! :)

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

30 Apr 2009 - 3:13 am | शितल

=))
चिडवल्या सारखे वाटते.

क्रान्ति's picture

30 Apr 2009 - 9:59 am | क्रान्ति

सहज बोलता बोलता बन्धुराजांनी आव्हान केलं, "शब्द जमवण्याचा तुझा छंद आहे, तर फिनिक्सला मराठी प्रतिशब्द शोध". त्या निमित्ताने ही चर्चा! [चुकुन्माकुन कधीकाळी काव्यासंग्रह वगैरे काढला, तर त्यासाठी नावं ठेवणं सुरू होतं.] माझ्या कविता या अक्षरशः राखेतून पुन्हा उमललेल्या असल्याने फिनिक्स सुचला. अग्निपंख हे डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर असल्याने ते थोडं बाजूला राहिलं. भस्मज किंवा मृत्युज हे नाव छानच आहे.
बाकीची विनोदी नावंही मजेदार आहेत.
अवांतर :- या पक्ष्याची खरी आख्यायिका नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2009 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार

मृत्युंजय ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

यन्ना _रास्कला's picture

30 Apr 2009 - 9:18 pm | यन्ना _रास्कला

फणिश म्हटला तर. पटत का.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !