गाभा:
नादखुळा..!! ७१ हजारांच्या स्कूटीसाठी विकत घेतला १५.४ लाखांचा VIP नंबर, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण
Vodafone युजर्सचा नंबर बंद केला, आता भरावा लागणार ५० हजारांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
जाणून घ्या कोण देत आहे ग्राहकांना सुपरफास्ट ४जी इंटरनेट? Airtel, Jio की Vi?
वृषभ राशीमध्ये बुध विराजमान, जाणून घ्या कोणत्या राशीसाठी शुभ ठरेल हे मार्गक्रमण
साबण कोणत्याही रंगाचा असो पण, त्याचा फेस फक्त पांढराच येतो? जाणून घ्या
वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
स्वप्नील जोशी-शिल्पा तुळसकरने ‘तू तेव्हा तशी’पूर्वीही केलंय एकत्र काम, साकारलीय चक्क मायलेकाची भूमिका, जाणून घ्या कधी
असे "जाणून घ्या" वाले १०- मथळे दररोज वाचले की मी "जाणता राजा" होईन की काय असं वाटायला लागतं !
प्रतिक्रिया
19 Apr 2022 - 6:33 pm | मुक्त विहारि
नक्कीच, होऊ शकाल....
पण, कुठे मिळते? ते शोधत आहे ...
19 Apr 2022 - 6:34 pm | चिक्कु
अगदी मनातलं बोललात बुवा. पंखा होईन अशाने मी आपला!
19 Apr 2022 - 6:49 pm | ॲबसेंट माइंडेड ...
लोकसत्ता वाचता काय :)
19 Apr 2022 - 8:02 pm | धर्मराजमुटके
अजून जास्त जाणते व्हायचे असेल तर मटा..पत्र नव्हे .त्र वाचा. तुमचे मराठी पण एकदम चांगले होईल. खाली काही निवडक शीर्षके देत आहे.
actresses Beauty Tips : माधुरीपासून ऐश्वर्यापर्यंत व मलायकापासून कियारापर्यंत सर्व अभिनेत्रींची ब्युटी सीक्रेट्स झाली उघड, सकाळी सकाळी करतात..!
Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीर कपूरच्या लग्नात होती एक आगळीवेगळी खासियत, जी तुम्हीही केली का नोटिस?
केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय; गर्मीतही राहतील सिल्की आणि शायनी केस
Vastu Tips About Tijori : तिजोरीत या गोष्टी ठेवणे असते शुभ, होते सुख समृद्धी आणि धनवृद्धी
19 Apr 2022 - 8:04 pm | गवि
हा हा हा
इतकेही तपशिलात लिहीलेले नसते त्या क्लिकबेट हेडलायनीत.
...पर्सची किंमत ऐकून थक्क व्हाल. (आत वीस वेळा काहीतरी क्षुल्लक तपशील रिपिट करुन करुन शेवटी जागतिक रहस्य उलगडावे तशी पर्सची किंमत. इतक्या वातावरणनिर्मितीनंतर ती किंमत तशी किरकोळच निघते.
...उष्ट्या पावासाठी मोजले इतके रुपये..(थेट इंग्रजी टू मराठी वाट्टेल तश्या भाषांतराच्या चिंध्या करुन परदेशातली बातमी)
...अभिनेत्री म्हणाली "माझ्या बेडमधे तो.." (.. अधिक तपशील पाहू जाता काहीतरी फुस्स प्रसंग)
जेम्स लेन म्हणाला "पुरंदरेंनी मला.." (वास्तविक त्यांनी काहीही संदर्भ पुरवले नाहीत असं असतं)
एकूण काय तर बाहेर गळ टाकलेला आणि आत अत्यंत वेगळे किंवा असंबद्ध किंवा फालतू काहीतरी असते.
19 Apr 2022 - 8:08 pm | विजुभाऊ
हल्ली मटा आणि लोकसत्ता वाले बहुतेक सामना वाचून झाल्यानंतर हिंदी न्यूज चॅनल बघतात असे वाटते
20 Apr 2022 - 11:05 am | अमरेंद्र बाहुबली
म्हातार्यांचा आलडता “तरूण भारत” वाचत असावेत.
19 Apr 2022 - 8:13 pm | गवि
https://www.loksatta.com/trending/viral-video-a-person-fell-down-from-10...
बेन पिजन नावाचा व्यक्ती कोसळता कोसळता बेन कबूतर होत गेला. वाचा आणि हास्योपचार घ्या.
20 Apr 2022 - 2:33 pm | चौथा कोनाडा
बेन कबुतर .....
😂
ज्याम हसलो हे वाचून !
20 Apr 2022 - 4:22 pm | गवि
मराठी भाषा आणि वाक्यरचना यांचे तर मातृभगिन्यद्वैत केलेले असते ऑनलाइन आवृत्तींमधे. कागदावरील प्रत वाचणे पूर्वीच बंद केले आहे. तिथे अजून टिकून असेल अशी आशा.
20 Apr 2022 - 4:22 pm | गवि
मराठी भाषा आणि वाक्यरचना यांचे तर मातृभगिन्यद्वैत केलेले असते ऑनलाइन आवृत्तींमधे. कागदावरील प्रत वाचणे पूर्वीच बंद केले आहे. तिथे अजून टिकून असेल अशी आशा.
19 Apr 2022 - 8:22 pm | कर्नलतपस्वी
बागुल बुवा चा चुलत भाऊ गुगल बुवा. मोबाईल वर गुगल शोधंत्र उघडले की आसेच मथळे दिसतात.याच बरोबर ऑप्टिकल इलूजन, माकड शोधा,ससे मोजा, पहिल्यांदाच काय दिसले तुमचे व्यक्तीमत्व समजेल वगैरे.काही नाही येडा बनवतात.
19 Apr 2022 - 9:17 pm | सुरिया
अजून क्लिकबेटी गमती.
आयफोन १२ घ्या अमेझॉन वर फक्त ३५०० ला.
(पूर्ण बातमी वाचल्यावर कळते ३५०० हा महिन्याचा हप्ता आहे.)
मारुतीची सगळ्यात जास्त अवरेज वाली कार फक्त १.५० लाखात.
(ही सेकंड हॅण्ड कार्स विकणारे पोर्टल आहे)
हिरो ची सगळ्यात जास्त खपणारी बाईक मिळवा फक्त १५ हजारात.
(१५ हजार ही डाऊन पेमेंट रक्कम आहे.)
ओप्पो चां १०८ मेगा पिक्सेल नवीन फोन फक्त २२ हजारात.
( त्यावर असलेल्या सगळ्या म्हणजे झाडून सगळ्या ऑफर ची बेरीज करून ती मूळ किमतीत वजा करतात. खरे पाहता त्या सगळ्या ऑफर्स एकाचवेळी कधीही ॲपलिकॅब्ल नसतात.)
19 Apr 2022 - 10:09 pm | सुक्या
काल परवा एक बातमी वाचली "अमक्या अमक्या अभिनेत्रीला सेट वर झाली गंभीर दुखापत" जरा खोलात जाउन वाचले तर अभिनेत्री चा अंगठा मुरगाळला होता व नखातुन रक्त आले होते. काय ती गंभीर दुखापत ..
मटा यात फार वाहवत गेला आहे हे मात्र खरे ...
20 Apr 2022 - 12:03 pm | टर्मीनेटर
😀
बातमीदारीचा दर्जा खालावत चाललाय!
20 Apr 2022 - 1:11 pm | मुक्त विहारि
त्यामुळे आता फक्त बातम्या वाचायच्या, अग्रलेख म्हणजे एक प्रकारची पक्षीय धोरणेच असतात ....
समुद्रात बुडत असलेली Enron आणि संजय दत्त, यांच्या वरती लिहून आलेले पक्षीय अग्रलेख, नंतर जादूने बदलल्या गेले....
अग्रलेख वाचून, मते बनवणे, मी तरी कधीच सोडून दिले आहे ....
गडया आपली, एक रूपयाची झुणकाभाकर गेली आणि जलेबी-फाफडा पोस्टरवर आले ....
20 Apr 2022 - 5:30 pm | पुंबा
पाहिलात का ह्या अभिनेत्रीचा 'हॉट' अंदाज
या अभिनेत्रीचा नवरा करतोय ह्या अभिनेत्रीला...
या अभिनेत्याची बायको इतकी सुंदर आहे, जाणून व्हाल थक्क
21 Apr 2022 - 5:58 pm | चौथा कोनाडा
हा "जाणून व्हाल थक्क" प्रकार भारी अस्सतो, बातमी उघडून वाचली की हसावं की रडावं ते कळत नाही !
21 Apr 2022 - 6:01 pm | चेतन सुभाष गुगळे
दोन्हीपैकी काय करावं हेच कळत नाही म्हणजेच तुम्ही थक्क झालेले असता.
2 Jun 2022 - 8:31 pm | चौथा कोनाडा
आणखी एक थक्क ....
ही २४ वर्षीय तरुणी स्वतःशीच करतीये लग्न; कारण वाचून थक्क व्हाल
20 Apr 2022 - 5:40 pm | बबन ताम्बे
सगळ्या ऑनलाईन पेप्रात असल्याच फाल्तू हेडलाइन्स आणि बातम्या असतात. सगळे ऑनलाईन बातमीदार एकाच युनिव्हर्सिटीतून शि़कून आलेत की काय अशी शंका येते. कधी कधी मराठीचा असा चुथडा करतात , वाक्यरचना इतकी भयानक किंवा अर्थहीन असते की उगाचच बातमीवर टीचकी मारली असे वाटते.
उदा. काल एका बातमीचा मथळा होता, लिना चंदावरकर यांनी किशोरकुमार यांना पहिल्यांदा दिला होता नकार.जाणुन घ्या कारण. मथळा वाचतानाच असे वाटते कि लिहावे आम्हाला नाही घ्यायचं कारण जाणून, झक मार तुझी तू :-)
तर त्या बातमीत लिहिले होते, वडीलांनी तिचा त्रास सांगितला म्हणुन घर सोडायचा निर्णय घेतला आणि किशोर कुमारांना होकार कळविला .
तिचा त्रास सांगितला म्हणजे काय? धन्य तो बातमीदार !!
चौ को, तुम्ही जाणते राजे झाल्यावर तुमची पण एक ई आवृत्ती काढा. आणि हेडलाईन द्या, मिपावर घमासान, जाणुन घ्या. आणि आतमध्ये काहीतरी फुसका मजकूर टाका :-)
21 Apr 2022 - 5:57 pm | चौथा कोनाडा
😜
भारी आयडिया .....
22 Apr 2022 - 6:00 am | वामन देशमुख
भन्नाट विनोद, भन्नाट आयडिया, भन्नाट गुपित, भन्नाट अजून काहीतरी...
एकेकाळी, "भन्नाट रानवारा" हे गाणं ऐकायला आवडायचं पण असल्या इ आवृत्त्यांमुळे भन्नाट या शब्दाचाच आजकाल तिटकारा येतो.
22 Apr 2022 - 2:54 pm | इरसाल
जसा की सामुहिक ऐकुन.
22 Apr 2022 - 9:26 am | भीमराव
बातमीपेक्षा कमेंट वाचत जा भारी करमणूक असते.
26 Apr 2022 - 11:20 am | चलत मुसाफिर
मी आता मिपावरील प्रत्येक नवीन पोस्टच्या खाली कॉमेंट लिहिणार: "हा भन्नाट लेख वाचलात का? वाचकांच्या पडतायत उड्या..! जाणून घ्या.." आणि पुढे माझ्या जुन्याजुन्या पोस्टींचे दुवे डकवणार.
26 Apr 2022 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले
सासऱ्यांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी फॉलो करा या ६ टिप्स, नातं अधिक खुलेल
https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/6-tips-how-to-...
कालच् महाराष्ट्र टाइम्स ला ही "बातमी" वाचुन बेक्कर हदरलो होतो =))))
29 Apr 2022 - 10:39 pm | चौथा कोनाडा
खतरनाकच आहे राव !
😫
26 Apr 2022 - 2:15 pm | बिपीन सुरेश सांगळे
चौको
हाहाहा
लै भारी
26 Apr 2022 - 2:16 pm | बिपीन सुरेश सांगळे
मार्कस
मीही ते वाचलं अन उडालो हादरलो
अगदी सहमत
26 Apr 2022 - 2:22 pm | कुमार१
हे काय कमी आहे ?
अरे बापरे !
काय खरं नाही आयुष्याचं .....
29 Apr 2022 - 7:38 pm | सुबोध खरे
हे ग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल आणि पहाटे ०४.०८ पर्यंत राहील.
सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये कारण यावेळी बाहेर पडणारी हानिकारक किरणे त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.
आणि हा लेख लोकसत्तेत आला आहे.
अरे कुठे नेऊन ठेवला आहे आपला शा फु आ चा महाराष्ट्र
29 Apr 2022 - 11:41 pm | सुक्या
लोकसत्ता वाले तर दारु / गांजा मारुन बातम्या लिहिता की काय असा मला नेहेमी संशय येतो.
30 Apr 2022 - 12:04 am | श्रीगुरुजी
आजची कचरा टाईम्समधील बातमी -
मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, भारताचा मॅचविनर गोलंदाज नवव्या सामन्यासाठी मैदानात उतरणार
बातमीत नाव आहे धवल कुलकर्णी या गोलंदाचाचे. हा अतिसामान्य गोलंदाज भारतासाठी फक्त १२ एकदिवसीय व २ ट-२० सामने खेळला व तो एकाही सामन्यात मॅन ऑफ द मॅच नव्हता. १२ एकदिवसीय सामन्यात त्याने जेमतेम १४ फलंदाज बाद केलेत. भारतासाठी तो शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला. ज्याला संघात फारच क्वचित स्थान मिळाले व मिळालेल्या सामन्यात ज्याची कामगिरी सर्वसाधारण आहे तो भारताचा मॅचविनर कधी झाला?
https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/good-news-for-mu...
1 May 2022 - 1:18 pm | चौथा कोनाडा
केवढी ती उत्सुकता ताणलीय ... म्हणे ..
भारताचा हा मॅचविनर गोलंदाज आहे तरी कोण, पाहा...
😄
30 Apr 2022 - 12:32 am | अमीबा
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजच्या कामांच्या प्रगतीसाठी JIRA हे सॉफ्टवेअर अगदीच ओळखीचे असेल. ट्विटरवर एक धागा JIRA clickbait titles बद्दल: https://twitter.com/amdev/status/1499374242755919878
एन्जॉय :)
21 Jun 2022 - 5:51 am | निनाद
कसला भारी आहे आहे हे!
हसवल्याबद्दल अनेक धन्यवाद.
14 Jun 2022 - 6:59 am | सुक्या
https://www.loksatta.com/auto/second-hand-maruti-alto-in-70-thousand-kno...
२००८ मॉडेल : ७० हजार
२००९ मॉडेल : ८५ हजार ..
आम्ही २०२१ - २०२२ चे मॉडेल बघत होतो .. फुगा फुटला ...
19 Jun 2022 - 11:04 pm | चलत मुसाफिर
परवा एका संकेतस्थळावर "अमक्या तमक्या नटीला बेडरूममध्ये 'हे' करायला आवडते... असा हिट अँड हॉट मथळा होता. मी अतीव उत्कंठेने प्रवेश केला व 'जाणून घेतले'. तिथे '..वाचन करायला आवडते' असे लिहिले होते.
20 Jun 2022 - 8:21 pm | चौथा कोनाडा
... आणि हे पण ..
महिलांच्या शरीराच्या `या` भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
20 Jun 2022 - 6:14 am | कंजूस
जाणून घ्या काय प्लान आहे आणि कोण तो.
20 Jun 2022 - 8:15 pm | चौथा कोनाडा
20 Jun 2022 - 8:15 pm | चौथा कोनाडा
20 Jun 2022 - 8:18 pm | चौथा कोनाडा
21 Jun 2022 - 5:59 am | निनाद
होते आहे ऑनलाईन बातम्यात फसवणूक, जाणून घ्या कशी!
:)