"अहो, शुकशुक , अहो लाल शर्टवाले, हां इकडे इकडे वर वर…"
"जरा वरती या ना; मदत पाहिजे मी अडकलोय इथे, दरवाजाला बाहेरुन कडी लावली आहे कोणीतरी ती काढा ना."
" इथुन मागे या, तिकडेच जीना आहे."
धापा टाकत तो शेवटच्या मजल्यावर आला, अंधरवजा बोळात एक शिसवी लाकडाचा प्रचंड दरवाजा दिसत होता, कडी नव्हतीच त्याला.
हँडलला जोर लावुन त्याने तो ढकलला तसा करर्र आवाज करत तो उघडला, आत काहीच दिसत नव्हतं बर्याच दिवस खोली बंद असली तर जसा कुबट वास येतो तसा भपकरा आला. त्याच्या हाताला हिसडा बसला आणि तो आत ओढला गेला..
----------------------------------------------------------------------------------
"अहो शुक शुक , अहो सायकवाले मामा हां इकडे इकडे वर…"
प्रतिक्रिया
19 May 2022 - 8:36 am | वामन देशमुख
+१
19 May 2022 - 8:40 am | निनाद
अपेक्षित शेवट, जरा कलाटणी देऊन अनपेक्षित परिणाम साधता आला असतात. पण ठीक +१
19 May 2022 - 9:25 am | भागो
+१
19 May 2022 - 10:11 am | सौंदाळा
+१
19 May 2022 - 11:07 am | श्वेता२४
+१
19 May 2022 - 12:06 pm | चौथा कोनाडा
+१
19 May 2022 - 12:06 pm | चौथा कोनाडा
19 May 2022 - 1:13 pm | तुषार काळभोर
भारी आहे, आवडली.
19 May 2022 - 2:01 pm | Bhakti
+१
अपेक्षित शेवट!पण लेखनाचे छान टप्पे!
19 May 2022 - 3:33 pm | एमी
मस्त :-D
+१
19 May 2022 - 7:17 pm | तुषार काळभोर
दारातून ओढून घरात घेणारी दुसरी गोष्ट :D
19 May 2022 - 7:32 pm | Nitin Palkar
+१
20 May 2022 - 11:16 am | राजाभाउ
+१
21 May 2022 - 9:04 pm | भागो
+१
22 May 2022 - 4:36 pm | स्मिताके
+१
22 May 2022 - 4:52 pm | सुरसंगम
+१
25 May 2022 - 7:38 pm | चेतन सुभाष गुगळे
विहिरीपाशी आकडे मोजणार्या वेड्याचा विनोद मी पस्तीस वर्षांपूर्वीच ऐकला होता. त्यालाच इथे कथेचे स्वरुप दिले आहे.
26 May 2022 - 7:40 am | सुरसंगम
तो विनोद इथं जरा सांगा ना आमचीही करमणूक होईल.
26 May 2022 - 8:18 am | भागो
सुरसंगम शेठ ,
पहा
शशक काय आणि प्रतिसाद काय.
छान जमलीय.
+१
26 May 2022 - 8:46 am | चेतन सुभाष गुगळे
विहिरीपाशी एक माणूस एकटाच बडबडत होता - "एकतीस, एकतीस, एकतीस ...."
काही वेळाने एक वाटसरु तिथे आला आणि विहीरीजवळच्याला विचारु लागला, "काय झालं? एकतीस काय?"
विहिरीजवळचा उत्तर न देता फक्त विहिरीकडे बोट दाखवून पुन्हा एकतीसचाच जप करीत राहिला.
याला मदतीची गरज असावी असा विचार करीत वाटसरु त्याच्या जवळ गेला तर विहिरीजवळच्या इसमाने त्याला विहिरीतच ढकलून दिले आणि आता त्याचा नवा जप सुरु झाला, "बत्तीस, बत्तीस, बत्तीस...."
26 May 2022 - 8:45 pm | सुखी
+१