कुठला टॅबलेट घेऊ?

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
13 May 2022 - 5:30 pm
गाभा: 

मी माझ्या कन्येसाठी व वडिलांसाठी टॅबलेट घ्यायचा विचार करत आहे.
बजेट साधारण पणे २० ते २५ हजारांमध्ये आहे.
वापर युट्युब व ओटीटी स्ट्रीमिंग पाहणे ,माफक गेमिंग व वर्तमान पत्रे विशेषतः मराठी वाचणे ह्यासारख्या गोष्टींसाठी प्रामुख्याने केला जाईल.
मिपांकरांच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत.

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

13 May 2022 - 6:21 pm | कर्नलतपस्वी

जास्त काही कळत नाही पण सॅमसंग वापरतो.नातीची शाळा व माझ्याकरता षुष्कळ आहे. ब्लू टुथ ने कीबोर्ड आणी माऊस जोडून मीनी लॅपटॉप होतो.

कानडाऊ योगेशु's picture

13 May 2022 - 6:54 pm | कानडाऊ योगेशु

सॅमसंगचा नक्की कुठला वापरता तुम्ही?
स्पेसिफिकेशन्स काय आहेत.?
नेट वर वाचलेल्या /पाहिलेल्या रिव्युज नुसार टॅबलेट कमीत कमी ४जीबी/६४ जीबी व बॅटरी ७००० एमेच इतका असावा.

कंजूस's picture

13 May 2022 - 7:35 pm | कंजूस

घेण्याच्या विचारात होतो.

कंजूस's picture

13 May 2022 - 7:43 pm | कंजूस

मोटो लेनोवोचाच आहे.
https://www.motorola.in/moto-tab-g70/p

कानडाऊ योगेशु's picture

13 May 2022 - 8:21 pm | कानडाऊ योगेशु

मी ही हाच घ्यायचा विचार करतोय. पण ओवरप्राईस्ड वाटतोय म्हणुन थोडा गोंधळ होतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2022 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॅमसंग ए८ घेतला २० हजार रु फक्त. ३२ जीबी. मस्त आहे. सर्चींग, मिपा, युट्यूब, टीपी.
मल्टीपल विंडो उघडल्यातरी हँग होत नाही. बॅट्री बॅकप चांगला आहे.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

13 May 2022 - 8:50 pm | कर्नलतपस्वी

+1

श्रीरंग_जोशी's picture

13 May 2022 - 8:56 pm | श्रीरंग_जोशी

आम्ही आयपॅड २ (२०११ चे मॉडेल) सात वर्षे वापरले त्यानंतर घेतलेले २०१८ सालचे आयपॅड व्यवस्थित चालू आहे.
भारतात माझ्या वडिलांनी आयपॅड मिनी २ (२०१३ सालचे मॉडेल) पाच वर्षे वापरले अन आता २०१९ चे आयपॅड वापरत आहेत.
या अनुभवाच्या आधारावर आयपॅड घ्यावे हे सुचवतो.

सोत्रि's picture

13 May 2022 - 9:03 pm | सोत्रि

आयपॅड बेस्ट!

- (अ‍ॅप्पलचा लॉयल कस्टमर) सोकाजी

धर्मराजमुटके's picture

13 May 2022 - 9:12 pm | धर्मराजमुटके

तुमचे सफरचंदाचे प्रेम माहित आहे पण ते २०-२५००० च्या बजेटमधे येतात हे माहित नव्हते.
असो :)
मला घ्यायचा असता तर मी नोकिया टि२० घेतला असता. नोकियाप्रेम. दुसरे काही कारण नाही.

श्रीरंग_जोशी's picture

13 May 2022 - 10:27 pm | श्रीरंग_जोशी

सफरचंदापेक्षा माझे प्रेम करवंदावर अधिक होते, आहे आणि राहील ;-).

टॅब्लेट प्रकारात आयपॅडला तोड नाही. अ‍ॅमेझॉनवर हे मॉडेल ₹२९,३९० दिसत आहे. अनेक वर्षे (बरेचदा ५+) ओएस अपडेट्स अन सातत्यपूर्ण कामगिरी बघता हे मूल्य मला तरी ठिक वाटते. तसेच कृष्णजुम्म्यासारखे दिवस अधून मधून येतात तेव्हा सूट मिळून अधिक स्वस्तात मिळू शकतंच.

सुक्या's picture

14 May 2022 - 12:03 am | सुक्या

कृष्णजुम्मा

पंत .. नमस्कार घ्यावा . .
सर्वधर्म समभाव तो हाच :-)

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2022 - 12:49 am | श्रीरंग_जोशी

मिपाकर रेवतीतै यांच्या मिश्रभाषिक रोचक शब्दनिर्मितीकौशल्यापासून प्रेरित होऊन मला हा शब्द सुचला आहे :-).

गेली अनेक वर्षे कृष्णजुम्मा, अ‍ॅमेझॉन प्राइम डे अशा दिवशी उपलब्ध होणार्‍या ऑफर्स वर मी डोमकावळ्यासारखे लक्ष ठेवून असतो अन गरज असणार्‍या उपकरणांची खरेदी करतो. इतर वेळी पूर्ण किंंमत देवून उपकरणांची खरेदी जमेल तेवढी टाळतो.

सुक्या's picture

14 May 2022 - 12:07 am | सुक्या

आयपॅड बेस्ट . .
मी अजुनही दुसर्‍या पिढिचा आयपॅड वापरतो आहे. वयामाना नुसार थोडा स्लो झाला आहे पण कामाला अजुनही ठिक आहे. बरेच अ‍ॅप चालत नाहीत पण ब्राउसिंग अजुनही उत्तम आहे.

तुषार काळभोर's picture

13 May 2022 - 8:59 pm | तुषार काळभोर

१. सॅमसंग S६ लाईट
याच्यासोबत पेनसुद्धा मिळतो.

२. लेनोवो योगा अँड्रॉइड टॅब
याला एक टेकू आहे, ज्याने हा एका कुशीवर उभा राहू शकतो.

हे दोन उत्तम मॉडेल आहेत. मला वैयक्तिक Samsung ची अँड्रॉइड os आवडत नाही. माझं प्राधान्य मोटो, असुस आणि लेनोवो यांना असतं.

कंजूस's picture

14 May 2022 - 7:34 am | कंजूस

अन्यथा कितीतरी मॉडेल्स आहेत.
१) साइज
Tab चा खरा उपयोग पीडीएफ पुस्तकं वाचणे. नेटवर शोधलं त्यात लिहिले आहे की त्यासाठी साईज दहा इंची असावी.

पीडीएफ चे रपांतर epub/mobi मध्ये केलं तर मोबाईलमध्येही वाचता येतात. पण मल्टीकॉलम अधिक चित्रे पीडीएफ रूपांतरीत होत नाहीत. म्हणजे Tab मोफखच हवा.

२) स्क्रीन
बराच वेळ पुस्तक वाचायचं तर डोळ्यांना त्रास न होणारा स्क्रीन हवा.

३) tab हा laptop सारखा वापरता येणे -
याबद्दल समजलं की तशी सोय असणे चांगले असले तरी तसा काही उपयोग नाही. "Laptop is for creation, tab is for content viewing. Tablet cannot replace power of a laptop. "
Tab मध्ये androidची सर्वच apps मोबाइलात फुल फोर्सनी चालतात तशी tab मध्ये चालतीलच असं नाही. काही apps tab साठी compromise केलेली असतात.

(( नेट माहितीवर आधारित.))

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 May 2022 - 7:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

ऑफिससाठी टॅब घ्यायच्या विचारात होतो. पण नंतर त्याची मर्यादा लक्षात आली (की बोर्ड /माउस सुटसुटीत नसणे, छोटा स्क्रीन) आणि विचार बारगळला.
आता २०२० मध्ये कोविड मुळे घरात माणशी १ असे लॅपटॉप झाले आणि जरा पैसे वाचवण्यासाठी लहान मुलाच्या शाळेसाठी सॅम्संग ए८ टॅब घेतला (अंदाजे २०,०००/-)

ऑनलाईन शाळा/क्लासेस, तुनळी बघणे, पेपर वाचन, माफक गेमिंग यासाठी चांगला आहे. पण लॅपटॉपच्या स्क्रीन्शी तुलना करु शकत नाही. डोळ्यांचा नंबर वाढणार सतत बघितल्यावर.

कंजूस's picture

14 May 2022 - 7:57 pm | कंजूस

हे पाहण्यासाठी vijay sales, reliance digital, digi 1, इथे गेलो तर ते मोटो'ची मॉडेल्स डिस्प्लेसाठी ठेवत नाहीत. लेनोवोवालेही फक्त बंद बॉक्स दाखवतात. त्यामुळे
स्क्रीन कसा आहे बघता आले नाही.

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2022 - 8:39 pm | कानडाऊ योगेशु

मोटो टॅब जी ७० फ्लिपकार्ट ऑर्डर केला आहे.

कंजूस's picture

27 May 2022 - 9:52 am | कंजूस

कसा वाटला?

कानडाऊ योगेशु's picture

27 May 2022 - 6:39 pm | कानडाऊ योगेशु

आला. चांगला वाटतोय.
वडिल वापरतात. त्यांच्या सिरियल्स वगैरे पाहत असतात.
गेमिंग साठी अजुन एक्प्लोअर केला नाहीये.
थोडा महागडा वाटला. पण ठिक आहे.

विजुभाऊ's picture

27 May 2022 - 10:20 am | विजुभाऊ

मला काही मराथीत लिहीणे
आणि प्रेझेन्टेशन्स करणे
आणि वाचणे इतकी कामे आहेत.
लॅपटॉप बरा की टॅब?

कानडाऊ योगेशु's picture

27 May 2022 - 6:51 pm | कानडाऊ योगेशु

मी उज्जैनला असतो आणि माझे वडिल सध्या माझ्याकडे आले आहेत.उज्जैन च्या उन्हामुळे घरातच बसावे लागते आणि सध्याच्या न्युक्लिअर कुटुंबाच्या कल्चर अनुसार टीवी तर आमच्यापैकी कोणीच पाहत नाही. सगळ्या गोष्टी एकतर लॅपटॉप अथवा मोबाईल मुळे उपलब्ध होत असल्याने टीवीची गरजच नाही. सध्या कुठल्याश्या मराठी चॅनेलवर चालणार्या ज्ञानेश्वर माऊली,नवनाथ,ताराबाई सिरियल्स हा वडिलांसाठी विरंगुळा होता आणि तोच न राहिल्यामुळे वडिलांना जाम कंटाळा येत होता आणि दोन आठवड्यातच जातो रे बाबा इथुन म्हणु लागले.त्यामुळे टॅब घ्यायचा विचार केला व त्यामध्ये फार चोखंदळ न राहता जो साधारण योग्य वाटेल तो मागवला नाहीतर त्यातच जास्त वेळ जायचा आणि वडिलांचे मत अजुन पक्के व्हायचे. ऑर्डर दिल्यापासुन दोन तीन दिवसांतच टॅब आला आणि वडिलांना लागणार्या चॅनेलचे सबस्क्रिप्शन घेतलेय.
वडिलांनी ह्या सिरियल्सच सगळा बॅकलॉग भरुन काढला आणि त्यांचाही एकुण टाईमपास मस्त होतोय. एकुण टीवी सारखे एका ठिकाणी न बसुन राहता कुठेही पाहता येते व केव्हाही पाहता येतेय ह्यामुळे वडिल खुश आहेत.