शशक'२०२२- सामना

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 12:37 pm

विश्वचषकाचा अंतिम सामना ऐन रंगात आला होता. ह्याच्या संघाने मागील विश्वचषकात अंतिम सामन्यातच माती खाल्ली होती. समोरचा संघ पण खूपच चिवट होता, त्यांनी कधीच विषवचशक जिंकला न्हवता हा सामना त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण होता.

आत्तापर्यंत सगळ्याच फलंदाजांनी गुढगे टेकले होते आणि धावांचा तर डोंगर पार करायचा होता. पण कप्तानाला साजेल असाच खेळ करून त्याने धावफलक सतत हलता ठेवला होता. आता केवळ ३ धावा १ चेंडूत हव्या होत्या.

पण हाय देवा...

जे व्हायचं तेच झालं, शेवटच्या चेंडूत हा झेलबाद झाला.

तंबूत परतताना त्याच्या तोंडावर निराशा होती तरी त्याच्या बुकीला अंगठा दाखवायला तो विसरला न्हवता. धावफलका प्रमाणेच त्याने सट्टाबाजार सुद्धा हलता ठेवला होता.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

13 May 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा

+१

शशक आवडली !

मोहन's picture

13 May 2022 - 5:27 pm | मोहन

+१

डाम्बिस बोका's picture

13 May 2022 - 6:23 pm | डाम्बिस बोका

+१

एमी's picture

13 May 2022 - 7:16 pm | एमी

+१

सुक्या's picture

13 May 2022 - 9:34 pm | सुक्या

+१

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 8:03 am | तुषार काळभोर

आयपीएल हे डब्ल्यूडब्ल्यूई सारखं वाटतं!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 8:13 pm | अमरेंद्र बाहुबली

हे तर मी कितीतरी वेळा सांगीतलंय. आयुीएल ना ईतर मॅचेस फिक्स नसतात असा दावा करनारे बाॅब वूल्मर कसा मेला? कोणा मारला? किती सापडले? कितीना शिक्षा झाली?? ह्याचे ऊत्तर मागीतले की पळत सूटतात.
डब्ल्यू डब्ल्यू ई तरी लहान मुले पहायचे. क्रिकेट तर थोराड मुर्ख पाहतात.

सिरुसेरि's picture

14 May 2022 - 4:50 pm | सिरुसेरि

कथा वाचुन हॅन्सी क्रोनीए ( क्रोन्जे ) आठवला . एक चांगला खेळाडु बुकीच्या नादाने आपला खेळ गमावुन बसला .

सौंदाळा's picture

18 May 2022 - 8:28 pm | सौंदाळा

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 9:45 pm | चेतन सुभाष गुगळे

आवडली. क्रिकेटचं वास्तव हेच आहे.