महाराष्ट्राने पसायदान हे सर्वानाच ठाऊक आहे पण पोसायडन हे काय प्रकरण आहे ? तर कोल्हापूर पंचगंगा नदीच्या मध्ये उत्खननात एक पेटी सापडली ह्यां सातवाहनकालीन गोष्टी होत्या आणि त्यांत होती खालील अत्यंत सुरेख अशी पोसायडन मूर्ती होती. [१] हा त्रिशूलधारी समुद्राचा देव.
ह्या पेटीला आता ब्रम्हपुरी खजिना म्हणून ओळखले जाते. सातवाहन काळांत भारताने नाविक क्षमतेत प्रचंड प्रगती केली आणि संपुन अरबी समुद्रांत त्यांचीच मक्तेदारी होती. मॉन्सून च्या वाऱ्याने थेट इजिप्त मधून भारत पर्यंत त्यांची जहाजे वेगाने येत. हि कला इतरांना साध्य झाली नव्हती.
जहाजबांधणीत भारत आघाडीवर तर होताच पण काही महत्वाचे शोध भारतीयांनी लावले होते. पहिली म्हणजे भारतीय जहाजे आपल्या जॉइंट्स साठी धातूच्या पट्ट्या वापरात नसत तर १००% लाकडी साधेच वापरत असत आणि पाण्याने फुगून हे सांधे आपोआप चांगले दणकट बनत. त्याशिवाय बोटीच्या समतोलासाठी किल हि जी यंत्रणा होती त्याचा शोध सुद्धा भारतीयांचाच. मलबार टिक वूड हे विदेशी ओक पेक्षा जहाजबांधणीत जास्त चांगले मानले जायचे.
अमेरिकन राष्ट्रीय गीत स्टार sprangled बॅनर HMS मिंडेन ह्या जहाजावरुन लिहिले गेले होते. मिंडेन हे महत्वाचे ब्रिटिश जहाज होते जे वाडिया ग्रुप ने मुंबईत बनवले होते. कवी स्कॉट ह्या जहाजावर बंदी म्हणून होता आणि तिथेच त्याने हि कविता लिहिली. ह्या कवितेचा इतिहास चांगला असला तरी तो ठाऊक असल्याशिवाय ह्या गीताचे महत्व लक्षांत येत नाही.
ज्या पद्धतीने पोसायडन कोल्हापुरात पोचला त्याच प्रमाणे आपली लक्ष्मी सुद्धा पॉम्पेई मध्ये पोचली. तेथील ज्वालामुखी दुर्घटनेत पॉम्पेई लक्ष्मीची मूर्ती शाबूत राहिली आणि सुप्रसिद्ध आहे.
[१] https://www.livehistoryindia.com/story/eras/kolhapur-poseidon
प्रतिक्रिया
10 May 2022 - 4:43 am | साहना
https://pbs.twimg.com/media/En1zDyqUwAE-jM2?format=jpg&name=medium
10 May 2022 - 6:54 am | कंजूस
आणि पाताळ ही कल्पना होती तशी ग्रीक कथांमध्ये समुद्रतळ होता ना?
10 May 2022 - 7:14 am | कॉमी
नाही, अंडरवर्ल्ड वेगळे होते. तिथे स्टीक्स नावाची नदी वाहते. हेडीस नावाचा देव राज्य करतो. मेलेल्यांचे आत्मे तिथे राहतात.
10 May 2022 - 7:43 am | तुषार काळभोर
शशी थरुर यांनी त्यांच्या ऍन एरा ऑफ डार्कनेस या पुस्तकात युरोपियन वसाहती होण्याआधी भारताची तांत्रिक प्रगती किती होती, नंतर कसे पद्धतशीरपणे त्याचे खच्चीकरण करण्यात आले याचा विस्तृत उहापोह केला आहे. त्यात जहाज बांधणी हा मोठा मुद्दा आहे.
10 May 2022 - 9:29 am | जेम्स वांड
उत्तम लेख आहे साहना जी
फ्रान्सिस स्कॉट की हा पेशाने वकील होता, star spangled Banner मधील स्टार ही प्रेरणा त्याला टिपूने श्रीरंगपट्टणच्या युद्धात वापरलेल्या "मिसाईल्स" मधून निघणाऱ्या ताऱ्या सारख्या चमचम करणाऱ्या ठिणग्यावरून मिळाली असे वाचनात आले होते, दुर्दैवाने मी रेफरन्स बुक विसरलो :(
10 May 2022 - 10:08 am | साहना
फ्रान्सिस स्कॉट हा वकील होता आणि ब्रिटिशांचा कैदी होता. ब्रिटिशांनी त्याला अमेरिकेत पाठवायला तत्वतः मंजुरी दिली असली तरी बाल्टिमोर वर ब्रिटिशांचा हल्ला करण्याचा प्लॅन त्याला ठाऊक असल्याने त्याला युद्ध संपेपर्यंत मिडेन जहाजावरच ठरवण्याचा निर्णय घेतला गेला. ब्रिटिशांनी फोर्ट मेकहेन्री वर हल्ला केला तो फ्रान्सिस स्कॉट दुरून जहाजावरुन पाहत होता. विविध युद्धनौकांनी ह्या ठाण्यावर तुफानी गोळेबाजी केली, दुरून त्याला फक्त अमेरिकन ध्वज तेव्हडा दिसत होता. हळू हळू रात्र झाली अन इआकाशांत फक्त तोफांचे स्फोट आणि तोफगोळे दिसत होते आणि सर्वत्र धूर. नक्की कोण जिंकतोय हे फ्रान्सिस स्कॉट ला समाजात नव्हते नि तो अस्वस्थ होत होता. रात्रभर युद्ध सुरुच होते आणि सकाळी जेंव्हा पहिली किरणे आले तेंव्हा त्याला तो अमेरिकन ध्वज फडकत असलेला दिसत होता. म्हणजे अमेरिकन सैनिकांनी हार मानली नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याने हि कविता लिहिली आणि नंतर बलिटिमोर मध्ये त्याला सोडल्यानंतर पूर्ण केली.
ह्या कवितेतील स्टार्स म्हणजे अमेरिकन ध्वजावर जे तारे आहेत ते. तुम्ही जो लेख वाचला असेल त्यांत त्यांना कदाचित "रॉकेट्स ग्लेर" ह्या शब्दांविषयी म्हणायचे असेल. ह्या युद्धांत ब्रिटिशांनी रॉकेट्स वापरली होती त्यांचा ब्रिटिश शोध साधारण १० वर्षे आधीच्या ब्रिटिश आर्टिलरी मधील एका सैनिकाने लावला होता. आणि नेपोलियन विरुद्ध अतिशय प्रभावशाली पद्धतीने हि रॉकेट्स वापरली गेली होती.. ह्यांना Congreve rocket म्हणतात. खरे तर ब्रिटिशांनी अनेक वर्षे हि रॉकेट्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना ते शक्य झाले नव्हते. शेवटी टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्यांना हि मैसूर रॉकेट्स सापडली आणि त्यापासून त्यांनी Congreve rocket निर्माण केली. नेहमीप्रमाणे ह्याचे कुठलेही श्रेय त्यांनी भारतीयांना दिले नाही. टिपू सुलतान आणि फ्रान्सिस स्कॉट्स चे रॉकेट्स ग्लेर हे शब्द त्यामुळे कदाचित मैसूर रॉकेट्स शी संबंधित आहेत.
त्याच्या दृष्टिकोनातून सर्व घटना तुम्ही तिचे पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=iiVryYnzmdI
10 May 2022 - 5:04 pm | कर्नलतपस्वी
आसे धागे वाचून जगण्याच्या जांगडगुत्त्या मधे बरेच काही वाचले नाही,वेचले नाही,जमवले नाही याची खंत जरूर वाटते.
सहाना जी आपले लेखन खुप माहितीपूर्ण आसते. त्यावर काही सदस्य अर्थ पुर्ण भर टाकतात.
धन्यवाद.
11 May 2022 - 1:36 am | गामा पैलवान
साहन,
लेख माहितीपूर्ण व रोचक आहे. लक्ष्मीची मूर्ती हॉंगकॉंगमध्येही सापडली होती असं ऐकलंय. संदर्भ आठवत नाही.
आ.न.,
-गा.पै.
11 May 2022 - 2:32 am | श्रीरंग_जोशी
या लेखामुळे ही रोचक अन ऐतिहासिक माहिती प्रथमच कळली. या लेखनासाठी धन्यवाद.
11 May 2022 - 5:47 am | कंजूस
मी दोन वर्षे वाचतो आहे. त्यात बरीच माहिती फोटोसह येते.
पण . . ...
महाराष्ट्रात लोकांना ठराविक घटना/राज्यकर्ते यांचा इतिहासच वाचायला आवडतो. त्यामुळे तीच पुस्तके छापली जातात अथवा तीच भाषांतरीत होतात.
जगण्याच्या जांगडगुत्त्या मधे बरेच काही वाचले नाही,वेचले नाही, याचे कारण हेच असेल.
11 May 2022 - 8:04 am | कर्नलतपस्वी
कारणे बरीच आहेत. आता संगणकावर माहितीचा अथांग सागर पसरलाय. ही सोय आम्हांला उपलब्ध नव्हती.
11 May 2022 - 8:05 am | कर्नलतपस्वी
कारणे बरीच आहेत. आता संगणकावर माहितीचा अथांग सागर पसरलाय. ही सोय आम्हांला उपलब्ध नव्हती.
11 May 2022 - 6:04 am | नगरी
पाताळाचा देव,स्मशानाचा देव,त्रिशूळ सिमीलेरिटी वाटतेय
11 May 2022 - 6:44 am | प्रचेतस
लेख अगदीच त्रोटक आहे.
12 May 2022 - 12:27 pm | साहना
लेख नव्हता. चर्चा सुरु करण्यासाठी धागा होता. भरपूर लिहायला इथे माझे स्वतःचे असे काही विचार नव्हते. अनेक वेळा अश्या काही छोट्या पोस्ट वर इतर जाणकार बरेच भाष्य करतात.
11 May 2022 - 10:36 am | चेतन
छान माहिती.
पॉम्पेई लक्ष्मीची मूर्ती यक्षिणीची असावी