अल्ला देवे ,अल्ला दिलावे , अल्ला दारू (दाता) अल्ला खिलावे|अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय |

srahul's picture
srahul in काथ्याकूट
6 May 2022 - 9:33 am
गाभा: 

खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे ,
त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे.
.
कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर
अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत.
.
"३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥"
.
"३९३७. कौडीकौडीसाठी फोडीताती शीर । काढूनी रुधीर मलंग ते ॥ १ ॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारती आरोळी धैर्यबळें ॥ २ ॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचे ॥ ३ ॥"
.
"३९८७. देवाचिये पायी वेचू सर्व शक्ती । होतील विपत्ति ज्याज्या कांही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नेघे माझी वाचा पुढें कांही वाव । आणी दुजे भाव बोलायाचे ॥ ॥ [त. दे. मनािे.] मनाची वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥ २ ॥ तुका ह्मणे घेईं विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥ ३ ॥"
.
"३९८८. पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्ती भय वाटे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाही आइकलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भेडसाविलें [दे. भडसाचवलें.] ॥ ॥ विष्णुदासां गती नाही तरावया । [पां. ह्मणतील वांयां.] ह्मणती गेले वांयां [त. पां. कष्टत ही ॥ २ ॥ धिक्कारती मज करीतां कीर्तन । काय सांगों शीण ते काळीचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥ ४ ॥"
.
संदर्भासाठी फोटो अधिकृत प्रतीचे फोटो जोडत आहे. (आणि नवगाथेचे पण जोडत आहे)
.
आता संतांचे अभंग सुद्धा आपल्या मतलबासाठी बदलून खपवणारे हे "नवईतिहासकार " हे सर्व कशासाठी करत आहेत हे सर्व सुज्ञ जाणतात.
.
आता असा बदल करून ते पुस्तक प्रकाशित करणे याला कायद्यात काय शिक्षा आहे माहीत नाही .........परंतु मिठाच्या पाण्यात भिजवलेला पोकळ बांबू किंवा ओला फोक ........आणि त्यांचा मऊ पार्श्वभाग यांची गाठभेट होणे हेच उत्तम असं निदान मला तरी वाटतं. बाकीचं तुम्ही ठरवा.
.
.
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/33482559...
गाथा
गाथा
गाथा
गाथा
गाथा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2022 - 10:17 am | प्रसाद गोडबोले

माफ करा पण येथे आपण चुकलेला आहात , आपली भावना समजु शकतो पण जे आहे ते आहे. हे दोन्ही अभंग तुकोबांनी लिहिलेले आहेत :

दरवेस -अभंग १

४४३

अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥
ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥

वैद्यगोळी - अभंग १

४४४

अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥
मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥
सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥३॥
सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥
मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥
बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥६॥

https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...

आपल्या भावना समजु शकतो पण जे आहे ते आहे :
तुकोबा कधीही देहु आळंदी अन पंढरपुरच्या वेशीच्या बाहेर गेलेले नव्हते , त्यामुळे त्यांना इस्लामचे स्वरुप माहीत असण्याची शक्यता नाही. अफजलखानाने घणाचे घाव घालुन तुळजापुर ला भवानी मातेची मुर्ती फोडली ही बातमी तुकोबांपर्यंत पोहचली होती की नाही ह्यावर काही ऐतिहासिक साधने उपलब्ध नाहीत. तसेच ज्ञानेश्वर माऊलींनीही खिलजी पाहिला नव्हता , नाहीतर कृष्णदेवराय यादवाचे मुंडके देवगिरीच्या वेशीवर टांगलेले पाहिल्या नंतर त्यांना "जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत " असलं काही सुचणे अशक्य आहे . ह्याबाबतीत तुम्हाला मते पहायची असतील तर ज्या माणासाने भारत भ्रमण करुन मोगलाई जवळुन पाहिली आहे त्या समर्थ रामदास स्वामींचे "अस्मानी सुलतानी" नावाचे एक काव्य आहे ते पहा. "बुडाला औरंग्या पापी | म्लेंछ संहार जाहला | मोडलीं मांडली छेत्रें । आनंदवनभुवनीं । " हे समर्थांनी औरंगजेब मरायच्या वीसवर्षांआधी लिहुन ठेवले आहे , इतके पुरेसे आहे अनुमान काढायला !!

उपयोजक's picture

7 May 2022 - 2:41 pm | उपयोजक

सणसणीत विश्लेषण
जाम आवडलं.
संतांची मर्यादा दाखवून दिल्याबद्दल आभार. ही बाजू फार कमी वेळा उजेडात येते

सर टोबी's picture

8 May 2022 - 10:29 am | सर टोबी

आणि त्याला सणसणीत म्हणणाऱ्या हुजर्यांची पण एक गंमत आहे.

सातवाहन वगैरे राजवटीचा उल्लेख आला की भारत दूर दूरच्या देशांशी व्यापार उदिम करणारा प्रगत देश असतो. तर त्या नंतर येणाऱ्या काळात इतका खोल गर्तेत गेलेला असतो की तुळजापूरचं मंदिर फोडलं ही गोष्ट फक्त शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी अशा थोड्याच लोकांना माहीत असतं. चालू द्या.

उपयोजक's picture

8 May 2022 - 11:27 am | उपयोजक

मार्कस सरांना पुरावे देऊन ते चुकीचे लिहितात हे सिद्ध करा. मग मी तुम्हाला सणसणीत देईन. प्रतिसाद बरं का! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2022 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संत तुकाराम इतर संतांपेक्षा वेगळे ठरतात कारण त्यांनी कोणा एका जातीचा विचार केला नाही, त्यांचा विचार संकुचित नव्हता. संत तुकारामांनी ख-या भक्तीच्या विकासासाठी दांभिक लोकांची कडक हजेरी घेतली. संत तुकाराम देहुच्या बाहेर गेले नाहीत त्याचं कारण त्यांचं अन्य देवतांच्या तिर्थावर विश्वास नव्हता, ते केवळ विठठल भक्त होते. म्हणून पंढरपुर, त्र्यंबकेश्वर, पैठण, पुणतांबा इत्यादी क्षेत्री ते जात असायचे त्याचबरोबर आणि पुणे आजुबाजुच्या परिसरात ते किर्तनासाठीही जात असत त्यातून सामाजिक प्रबोधन-जनजागृती ते करीत असायचे.

बाकी चालु द्या..!

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2022 - 12:27 pm | प्रसाद गोडबोले

पुरावे ??

म्हणून पंढरपुर, त्र्यंबकेश्वर, पैठण, पुणतांबा इत्यादी क्षेत्री ते जात असायचे त्याचबरोबर आणि पुणे आजुबाजुच्या परिसरात ते किर्तनासाठीही जात असत त्यातून सामाजिक प्रबोधन-जनजागृती ते करीत असायचे.

हे असले विषयांतर करुन काहीही उपयोग नाही.

मी साधासा प्रश्न विचारला आहे की तुळजापुर भवानी मुर्ती अफजलखानाने स्वहस्ते फोडली , अक्षरशः चुरा चुरा केला ही घटना तुकोबांना ठाऊक होती का ? त्यावर तुकोबांची काय प्रतिक्रिया होती ? ह्याबाबत तुकोबांनी काही निषेध वगैरे केल्याचा पुरावा आहे का ? इस्लाम मुळातच बुतशिकन आहे अर्थात काफिरांच्या बुतपरस्त लोकांच्या सर्व मुर्ती (त्यात पंढरपुरची पांडुरंगाची मुर्ती ही आली) उध्वस्त करणे हे इस्लामच्या लेखी पुण्यकर्म आहे , ह्याची तुकोबांना माहीती होती का ?
ह्या अर्थाचे तुमच्याकडे पुरावे अस्तील तर जरुर सादर करा.

मी स्वतः तुकाराम गाथा वाचली आहे आणि त्यानंतर तुकोबा इस्लामच्या मुर्तीभंजनबाबत , काफीरांचे शिरकाण करण्याबाबत अनभिज्ञ होते असे माझे मत बनले आहे . माझे मत चुकीचे आहे असे तुम्ही पुराव्याने शाबित केल्यास मला माझे मत बदलण्यात काहीही लाज वाटणार नाही !

|| सत्य असत्यासी मन केले ग्वाही | मानियले नाही बहुमतां ||

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2022 - 1:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुर्ती भंजनाबद्दल त्यांनी लिहिले नाही म्हणजे त्यांना माहिती नव्हतेच असे म्हणनार नाही. पण, यवनांच्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. कारण यवनांच्या नादी लागुन येथील ब्राह्मण ब्रम्हकर्म सोडून, रुढ आचार सोडून, पीराचे स्मरण करतात, निळे वस्त्र घालतात, मुसलमानांचा वेषही धारण करतात त्यावर त्यांनी लिहिले आहे, अशा गोष्टींचा त्यांनी निषेध केला आहे.

हाती होन दावी बेना
सोडिले आचार | द्विज चाहाड झाले चोर
टीळे लपविती पातडी | लेती विजारा कातडी
बैसोनिया तक्तां | अन्नेविण पिडिती लोकां
अवघे बाह्य रंग । आत हिरवे
वरी सोंग .
तुका ह्मणे देवा । काय निद्रा केली धावा.

(तु.गा.अभंग २६७)

आणि

ऐसें कलियुगाच्या मुळें। झाले धर्माचें वाटोळें।।
सांडूनिया रामराम। ब्राह्मण म्हणती दोम दोम।।
शिवों नये ती निळीं। वस्त्रें पांघरती काळीं।।
तुका म्हणे वृत्ति। सांडूनि गदा मागत जाती।।

(तुकोबा गाथा अभंग ७९३)

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2022 - 1:39 pm | प्रसाद गोडबोले

२६७

हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥

>>> हा अभंग कोणत्या अर्थाने ईस्लाम विषयी आहे ? मला तरी ह्यात काहीही संबंध वाटत नाही .

तुम्ही लिहिलेला दुसरा अभंग मी विकीसोर्स वर शोधुन पाहिला त्याच्या क्रमांक ९८७ असा दाखवत आहे पण तिथे तो अभंग नसुन दुसराच अभंग आहे . पण तुम्ही दिलेला अभंग सत्य आहे असे मानुन चालु , पण त्यात तरी तुकोबांना ईस्लामविषयी माहीती आहे असे कुठे दिसुन येते ? अफहलखानाने जशी तुळजापुर येथील मुर्ती भंग केली तसेच पंढरपुरयेथे विठोबाला देखील उपद्रव केल्याचे माझ्य ऐकीवात आहे पण पुरावा नसल्याने मी ते बोलत नाही.

तुकोबांच्या गाथेत " मुसलमान काफरांच्या मुर्ती भंग करतात , काफिरांना बाटवतात , काफीरांचा सर्वनाश करणे हाच त्यांचा हेतु आहे " अशा अर्थाचा एक जरी अभंग सापडला तर जरुर कळवा !

तुकोबांना इस्लामविषयी , त्यांनी उत्तरेत हिंदुस्थानात केलेल्या क्रौर्याबद्दल माहीती नव्हती आंइ म्हणुनच त्यांनी तो धागा लेखकाने उधृत केलेला अभंग लिहिला असावा असे माझे हायपॉथेसिस आहे .

तुकोबांना इस्लामविषयी मुर्तीभंजनाविषयी , काफीरांच्या कत्तलींविषयी, धर्मांतराविषयी माहीती होती आणि असे असुनही त्यांनी अल्ला देवे हा वरील अभंग लिहिलेला आहे असे सिध्द झाल्यास मजाच येईल !!!

हा अभंग तुकोबारायांनी लिहिणे , अल्ला चे नाव घेणे हा मुद्दा नाही , अधिकृत प्रत असताना आपल्या मनाने संदर्भ घेऊन वेगवेगळे अभंग क्रमांक देऊन ते अभंग कसेही प्रकाशित करणे हा मुद्दा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 May 2022 - 12:57 pm | प्रसाद गोडबोले

असं आहे होय ! मग जाऊ द्या .

"त्या" लोकांना आम्ही पुरते ओळखुन चुकलो आहोत. ही अशी पुस्तके लिहिणार्‍यांचे ना तुकोबांशी घेणे देणे आहे ना वारकरी भागवत संप्रदायाशी.

त्यांना रामदासस्वामींना शिव्या घालयच्या आहेत अन ज्ञानेश्वर माऊलींनाही , (एकनाथ वाचलेत तुर्तास पण ते सुपात आहेत, तेही जात्यात येतील लवकरच.)
पण त्यां नव इतिहासकारांचे तुकोबांच्या विषयीचे , नामदेवांच्या विषयींचे , गोरा कुंभारांच्या , सर्वच संतांच्याविषयीचे प्रेम तेवढेच बेगडी आहे ! त्यांचे एखाद दुसरा अभंग ओढुन ताणुन त्याचा सोयीस्कर अर्थ लावणे , तुकोबा कसे विद्रोही होते , त्यांनी कशी हिंदु धर्मावर टीका केली आहे हे दाखवणे असला काहीतरी बाष्कळ अजेंडा !

इन जनरल घाऊक ब्राह्मणद्वेष अन त्या आडुन हिंदु द्वेष हाच त्यांचा उघड उद्देश आहे !

जाउ दे. आपल्याला त्यांच्याशी घेणे देणे नाही. आमच्या घरी ज्ञानोबा माऊली , तुकाराम , समर्थ रामदास , आद्य शंकराचार्य असे सर्वांचे फोटो आहेत , आमच्या घरी आजही जितक्या प्रेमाने आदराने भक्तीभावाने दासबोध वाचला जातो तितक्याच प्रेमाने तुकोबांची गाथाही वाचली जाते !

ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले ।
अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ३१ । - समर्थ रामदास

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !!१!!
आईकाजी तुम्ही भक्त भागवत ! कराल ते हित सत्य करा !!२!!
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ! वर्म सर्वेश्वर पूजनाचे !!३!!
तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुखदुःख जीव भोगे !!४!! - तुकाराम महाराज

ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलं चिन्मात्रविस्तारितं
सर्वं चैतदविद्यया त्रिगुणयाशेषं मया कल्पितम् ।
इत्थं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले
चण्डालोस्तु स तु द्विजोस्तु गुरुरित्येषा मनीषा मम ॥ २ ॥ मनीषापंचक - श्रीमदाद्य शंकराचार्य

ही आपली संस्कृती आहे , हा आपला धर्म आहे . आपण आपली परंपरा , आपला संप्रदाय जपु .

|| राम कृष्ण हरी ||

जय जय रघुवीर समर्थ

कर्नलतपस्वी's picture

9 May 2022 - 5:24 pm | कर्नलतपस्वी

काहीच आधार, लायकी नसताना बोलतात, सतरंजी उचले त्याला उचलून धरतात. मग दंगा फसाद. मिडीया खतपाणी घालते.
संतरजी उचल्यांच मानू शकतो पण उच्चशिक्षित काय

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

9 May 2022 - 6:28 pm | हणमंतअण्णा शंकर...

नुकतेच सदानंद मोर्‍यांचे हे भाष्य ऐकले.

मी मोर्‍यांची पुस्तके वाचलेली नाहीत त्यामुळे त्यांच्या विषयी माझे खूप गैरसमज होते. परंतु महाराष्ट्राचा अर्वाचिन इतिहास जाणायचा असेल आता आतापर्यंतचे समग्र मोरे वाचणे क्रमप्राप्त आहे हे मला जाणवले. मी त्यांच्या वरच्या भाष्याने जवळ जवळ उडालोच आहे. कारण इतक्या थोडक्या अवधीत त्यांनी खूप काही नीट एकापुढे एक मांडून ठेवले आहे. आणि हे करून झाल्यावर आधुनिक भारतापुढे पर्यायाने महाराष्ट्रापुढे कोण शत्रू आहेत याचीही एक लहान पुस्ती जोडली आहे.

जातींकडे पाहण्याचा कुरुंदकरांचा आणि मोरे यांचा नजरिया मला जास्तीत जास्त सत्याच्या आणि समग्रतेच्या जवळ जाणारा वाटतो. जातींकडे पाहताना केवळ शोषित-शोषक या बायनरी मांडणीत आणि सध्याच्या अघोरी ब्राह्मण ब्राह्मणेतर या पुन्हा बायनरीच मांडणीत अडकून आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. जातींकडे
- आर्थिक आणि रोटीबेटी व्यवहार,
- काही जातींची तंत्रकुशलता त्यायोगे भारताची पूर्वीची आणि आत्ताची उत्पादन क्षमता
- ब्रिटिशांनी केलेल्या पॉलिसी आणि भारतावरती बळेच कृषिप्रधानतेचा मारलेला शिक्का
- स्वातंत्र्यचळवळ, आधुनिक संवैधानिक मूल्यांची पायाभरणी
- जातींना डिफाईन करून त्या आधुनिक चौकटींतून उलथवून टाकण्याचे सगळे प्रयत्न ( एक उदा. सत्यशोधक चळवळ)
- जातींची वर्गांशी घातलेली सांगड
- बहुजन या शब्दाखाली गोळा करत आणलेला अक्राळविक्राळ जटील भारतीय समाज आणि त्यायोगे उभारलेल्या सामाजिक चळवळी
- मंडल आयोग
- उदारीकरण
- सांस्कृतिक उतरंडी
- सामाजिक-> जातींची निर्मिती, लय आणि त्यांचे उन्नयन. जातींची रिजिडिटी आणि लवचिकता.
- सध्या सगळ्याच जातींमध्ये आलेले संघटन, समूहजाणीव, अस्मिता आणि आशा-आकांक्षा
- कला आणि सर्जन

अशा अनेक बाजूंनी पाहायला पाहिजे. अशी वैचारिक कुवत आणि शिस्त आताच्या कुठल्याच भारतीय विचारवंतांमध्ये नाही. या सगळ्या आडव्या प्रतलांना सध्या फसफसून आलेला राष्ट्रवाद आणि गेले काही शतके प्रचंड मोठी उलथापालथ घालत घडवत विविध रूपांत प्रकट होणारी भारतीय धर्मजाणीव हे छेद देणारे उभे प्रतल.
मग या सगळ्यांतून केलेली लिंगाधारित मांडणी. हे सगळं सविस्तर समजून घ्यायची, मांडायची आणि मग त्यावर खल करायची कुवत कोणाकडे आहे?

त्यापेक्षा त्या निर्वस्त्र फाटक्या रामदास स्वामींना धरा. सोप्पय ते.

हे लोक ज्ञानेश्वरमाऊलींवर पण घसरलेत हे ऐकून तर किळस वाटते या झुरळांची. जणू काही जगातल्या सगळ्या समस्या सोडवायची युक्ती थॅनोसच्या चुटकी सारखी माऊलींपाशी होती आणि ते उगाच 'भूतां परस्परे जडो..' असलं बंडल मारून अंगठा दाखवून गेले यांना. फोकलीच्यांनो सुधरा.

करोनाचा विषाणू पृथ्वी २०२१ मध्ये निबहुजन करायला ब्राह्मणांनीच तयार केलाय एवढंच म्हणायचं बाकी ठेवलंय.

आणि हे सगळं सगळ्या बाजूंनी समजून जरी घेतले तरी या सगळ्याचा आत्ताचे निकडीचे मानवी प्रश्न सोडवायला काय झाट्याची तरी मदत होणार का कोणास ठाऊक.. दरसाल दर शेकडा १० टक्के दराने बांगला देशी निर्वासित समुद्रात बुडलेल्या जमिनी टाकून भारतात स्थलांतर करायला लागले तर काय करणार? मुंबई, चेन्नई सारख्या अगडबंब शहरांची पर्यावरणीय बदलांनी जी अभूतपूर्व वाट लागेल त्याचे काय करणार? वातावरणबदल आणि शेती ? टोकाची आर्थिक विषमता? तंत्रज्ञानाच्या अधीन झालेल्या मानवी प्रेरणा आणि सर्जन ? भंजाळून जायला होते. कदाचित निबहुजन झालो असतो तर ही ब्यादही टळली असती.

प्रसाद गोडबोले's picture

10 May 2022 - 1:50 pm | प्रसाद गोडबोले

सदानंद मोरें ह्यांचा व्हिडीओ पाहिला.

अतिषय उत्तम विवेचन केलेले आहे . मनापासुन आवडले !

नगरी's picture

6 May 2022 - 12:42 pm | नगरी

सर्व फोटो गायब, मिपा चा प्रॉब्लेम आहे का?

सुनील's picture

8 May 2022 - 8:43 am | सुनील

ऐसीवरील 'न'वी बाजू यांची पोस्ट सणसणीत आहे.

कॉमी's picture

8 May 2022 - 9:00 am | कॉमी

एकदम.

srahul's picture

9 May 2022 - 9:26 am | srahul

धन्यवाद

नगरी's picture

6 May 2022 - 1:16 pm | नगरी

मुळात आपल्याला त्या वेळची परिस्थिती तपासून पहिली पाहिजे.बाकी कोणाच्या पार्श्वभागावर मारायची असेल तर तेल लावून फोक माझ्या हाती द्यावा.
असो, मी एक पुस्तक वाचले होते 'शिवाजी खरा कोण होता',लेखकाचा खून झाला हे सांगणे न लगे.
तो काळ असा होता की जात पात धर्म वगैरे गोष्टी नव्हत्या. राज्यकर्ता कोणीही असो आपल्याला सारा (tax) द्याचाच आहे.
त्यामुळे मुस्लिम जरी आले तरी सरसकट सर्व मुस्लिम झाले असे दिसत नाही.
आणि सर्वात महत्वाचे हिंदू सहिष्णू असल्यामुळे सर्वच धर्मांचा आणि भाषेचा आदर करत होते आणि करतात.त्यात काही गैर नाही.

तुम्ही तर उदाहरण दिले आहे पण हिंदू संस्कृती,हिंदू राजे,हिंदू धर्मग्रंथ,.
ह्या विषयी सर्रास खोटे ,कोणतेच प्रमाण नसताना.
सर्व इतिहास विकृत प्रस्तुत करणारी महा नालायक लोक खूप आहेत.
आणि असे साहित्य पण खूप आहे.
फक्त ते त्यांच्याच टोळक्यात फिरवत, आणि फिरत असते.
आणि सर्वात आश्चर्य ह्याचे आहे की ही विकृत लोक.
मुस्लिम नाहीत,परदेशी लोक नाहीत .
आहेत इथलीच पुरोगामी चा बुरखा (बुरखा हा शब्द ठरवून वापरला आहे) घेतलेली.

nanaba's picture

6 May 2022 - 4:58 pm | nanaba

अल्ला देवे ,अल्ला दिलावे , अल्ला दारू (दाता) अल्ला खिलावे|अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय
>> असुदेत.. खरेच आहे .
स्वामी अल्ला है! ;)
स्वामी राम, स्वामी श्याम, स्वामी रहीम है, स्वामी अल्ला रहिमतुल्ला परवरदिगार है
(कमलाकर तपस्वी भजन)

वामन देशमुख's picture

6 May 2022 - 5:16 pm | वामन देशमुख

संत तुकारामांनी लिहिलेले अभंग आणि त्यांचा आशय यावर काही लिहिण्याची पात्रता माझ्यात नाही आणि माझ्यात एवढी अभ्यासही नाही.

पण माझ्या मते, हिंदू समाज, धर्म यांना नष्ट करणाऱ्या, बलात्कारी, लुटालूट करणाऱ्या विचारसरणीला डोक्यावर घेऊन नाचण्याची खोड (साध्या शब्दात परधर्मसहिष्णुता) हिंदूंना आधीपासूनच आहे.

---

असली ब्रिगेडी वृत्ती नष्ट करण्यासाठी मागच्या आठ वर्षात केंद्र सरकारने काय केले आहे?

चौकस२१२'s picture

10 May 2022 - 9:48 am | चौकस२१२

असली ब्रिगेडी वृत्ती नष्ट करण्यासाठी मागच्या आठ वर्षात केंद्र सरकारने काय केले आहे?
ते काही करायला गेले कि कि लगेच लोक बॉम्ब मारणार " बघा हे मनुवादी" वैगरे शशी पासून शरद पर्यंत !

जणू मोदी , योगी आणि शहा ह्यांची खरी आडनावे , गोडसे, जोशी आणि कुलकर्णी आहेत

sunil kachure's picture

10 May 2022 - 12:36 pm | sunil kachure

सामान्य लोक कुठेच स्वतः कोणती च प्रचार पॉलिसी ठरवत नाहीत आणि तसा agenda पण त्यांच्या कडे नसतो.
काही घटना सांगतो.
2014 चा काळ असेल बाजूला राजकारणात काही तरी वेगळं बदल घडत आहे असे जाणवत होते.
समाज मध्यम असतील किंवा राजकारणात सहभागी असणारे गट .
ह्यांच्यात बदल होत होता.
हिंदू वर टीका करणारे ,त्यांच्या श्रद्धा स्थानावर टीका करणारे उगवले होते.
पण ह्याचे एक खास वैशिष्ट होते.
हिंदू च ह्या गटांचे प्रमुख होते आणि कार्यकर्ते brigedi .
ह्या वर तेव्हा राजकारणात असणाऱ्या मित्र शी पण चर्चा केली पण ह्याचा नक्की अर्थ लावता आला नाही.
ही चाल नक्की कशासाठी हे काही ध्यानात असेल नाही.
आता पर्यंत कधीच जातीचे मोठे मोर्चे निघाले नाहीत.
ह्याच काही वर्षात .
मराठा,धनगर ,आणि बाकी सर्व जातींचे मोर्चे निघाले.
का?
ह्या का चे पण योग्य उत्तर आपल्याला देता येणार नाही.
राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर च असे मोर्चे निघू शकतात .अन्यथा नाही.
मग कोण असेल ह्याचा करता करविता.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 May 2022 - 5:46 pm | हणमंतअण्णा शंकर...

अभंगांचे क्रमांक तुकोबांनी दिलेले नाहीत!

सगळ्या गाथा-संपादकांनी ते ठरविले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गाथांमध्ये हे क्रमांक पुढे मागे होणारच. इयत्ता पहिलीच्या बाळासही समजू शकते हे.

म्हणे कुतुहल म्हणून शासकीय प्रत काढून पाहिली!

ही घ्या सरकारी अधिकृत गाथा.

अल्ला शब्द अकरा वेळेस आला आहे. ( ही गाथा युनिकोडात नाही. त्यामुळे शब्द शोधण्याला मर्यादा आहेत.)

मी पीर हा शब्दही शोधून पाहिला.

तर मात्र काही जणांच्या भावना प्रचंड म्हणजे प्रचंडच दुखु शकतात असे अभंग सापडले.

महाराज ब्रह्मकर्म वगैरे सोडून दावलपीर स्मरणार्‍या द्विजवरांचे बाभाडे काढताना दिसताहेत!

विकिसोर्सच्या लिंकमधला अभंग ३०२५ आणि शासकीय गाथेतला ३०३५:

पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥1॥
ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।
केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥
थोर या युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ।
सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥2॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ ।...

पुढचे अभंग आपापल्या रिस्कवर वाचावेत.

थोडासा ड्यु डिलिजन्स केला असता तर हा धागा काढण्याची वेळ आली नसती.

भीमराव's picture

7 May 2022 - 8:02 pm | भीमराव

सर्व सेक्युलर लोकांना कुराण वाचण्याची नितांत गरज आहे. तुर्तास सुरा ९ कलमा ५ वाचावे, पवित्र महिना आताच उलटुन गेला आहे.