साहित्यः
७ कप मैदा
७ ग्रॅम यिस्ट
१ मोठा चमचा साखर
३.५ कप कोमट पाणी
७ लहान चमचे वितळवलेले बटर
चवी नुसार मिठ
१ कप दुध किंवा १ अंडं
कृती:
१) एका वाडग्या त पाणी घेऊन त्यात साखर + यिस्ट एकत्र करून घ्यावे. या मिश्रणा ला ५-१० मिनटं ठेवा. नंतर मिठ पण मिसळुन घ्यावे.
२) एका ताटा त किंवा मोठ्या भांड्या त मैदा घेऊन त्यात वरील मिश्रण टाकून एकत्र करावे व नीट मळून घ्यावे.
३) या मिश्रणा त वितळवलेले बटर टाकुन नीट मळून घ्यावे. नीट पंच करावे. साधारण पणे १०-१५ मि.
४) हे मिश्रण झाकून उबदार जागेवर १ तास ठेवून द्या, हे दुप्पट फुगुन येते.
५)एका तासा ने परत या मिश्रणा ला बाहेर काढून ४-५ पंच मारावे.
६) आता या मिश्रणा चे गोळे करुन greased कुकी ट्रे वर ठेवावे. २०-२१ गोळे होतात.
७) या गोळ्यां ना परत १/२ तास उबदार जागेवर ठेवावे. हे पुन्हा दुप्पट फुगुन येतात.
८) ओव्हन ३७५ फॅ. वर गरम करुन घ्या.
९) या वेळा त गोळ्यां वरुन दुध किंवा फेटलेले अंडे (egg wash)लावावे.
१०) ओव्हन मधे ३७५ फॅ. वर २०-२५ मि. सगळ्या त वरच्या रॅक मधे बेक करुन घ्या.
११) बाहेर काढल्या वर बटर स्टिक किंवा तुप लावावे.
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 2:15 am | नाटक्या
चला पुढच्या कट्ट्याच्या वेळेस मिसळ-पावा पैकी पावाची सोय झाली..
- नाटक्या
17 Apr 2009 - 2:20 am | दिपाली पाटिल
नक्कि
17 Apr 2009 - 2:50 am | बेसनलाडू
नाटक्याशेठशी सहमत १००%
फोटोत तर इतका छान ताजा पाव दिसतो आहे; बेकरीतून सकाळी सकाळी आणला तरच इतका ताजा मिळे. उशीर झाला की संपले :(
(पाववाला)बेसनलाडू
17 Apr 2009 - 2:28 am | समिधा
बघायला पाहिजे करुन.पण ब्रेड साठी वेगळ पीठ इथल्या दुकानात बघीतल आहे ते वापरल तर चालत का?
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
17 Apr 2009 - 2:35 am | दिपाली पाटिल
समिधा , मी तरि अजुन मैदा पासून च बनवले आहे. तसा काहि फरक पडला नाहि पाहिजे..
17 Apr 2009 - 3:02 am | चित्रादेव
मस्तच! काय टेम्प्टींग आहे.
हे ब्रेड जरा वरून आणखी कडक असे हवे असल्यास ओवनच्या तळाला बर्फ टाकायचे शेवटी शेवटी. आणि वरून चमकदार व्हायला अंड्याचे पिवळे मिश्रीत पाणी ब्रशने लावावे अवन मध्ये ठेवायच्या आधी.
17 Apr 2009 - 3:11 am | प्राजु
असतात ते हेच ब्रेड ना.
इथले ब्रेड भिजकट असतात..
भारतीय पद्धतीचे होतात का हे ब्रेड??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Apr 2009 - 3:14 am | भाग्यश्री
वाह.. लवकरच करून पाहीन असं दिसतंय..
(पावभाजीची मेज्जर फॅन) भाग्यश्री.
www.bhagyashree.co.cc
17 Apr 2009 - 3:29 am | रेवती
आईग्ग!
मस्त ताजे ताजे दिसतायत पाव.
आपल्या पावभाजीला हेच पाव हवेत.
इथले बर्गरचे बन्स वापरले की पचका होतो.
आता करून बघीन असे पाव.
रेवती
17 Apr 2009 - 3:48 am | चित्रा
फारच मस्त पाव दिसतायत.
17 Apr 2009 - 6:00 am | स्वामि
शेवटी पुन्हा दुप्पट फुगणार नाही ना,नाहीतर ओवन मधून निघता निघणार नाही,पाव म्हणतोय.
17 Apr 2009 - 6:54 am | चकली
छान पाककृती.
चकली
http://chakali.blogspot.com
17 Apr 2009 - 10:17 am | मदनबाण
ह्म्म्म...ताई तुम्ही अजुन काय काय बनवता हे वाचायला नक्कीच आवडेल. :)
या वेळा त गोळ्यां वरुन दुध किंवा फेटलेले अंडे (egg wash)लावावे.
हे केल्यानेच पावाला तांबुस रंग येतो का ?
अवांतर :-- कोल्हापुरच्या हिंदूस्थान बेकरीची आठवण आली.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
17 Apr 2009 - 12:48 pm | स्वाती दिनेश
आता हे पाव करायलाच हवेत.
(मिसळपावचा बेत लवकरच होणार फ्राफुत..)
स्वाती
17 Apr 2009 - 7:10 pm | क्रान्ति
मस्त आहे पाकृ आणि फोटू पण.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
18 Apr 2009 - 1:16 am | नंदन
सुरेख आला आहे. एनपीआरवर भटकताना ही नवीन रेसिपी दिसली - न मळता केलेला पाव
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Apr 2009 - 10:36 am | अरुण वडुलेकर
मी ही पाककृति बर्याच काळापासून शोधीत होतो. आपण ती दिलीत याबद्धल धन्यवाद.
पण एक शंका आहे. सात कप मैद्याला जे ३.५ कप पाण्याचे प्रमाण सांगितले आहे ,
त्यात गरजेप्रमाणे कमीजास्त करावे लागेल कां? आणि यीस्ट सगळ्या पाण्यां त मिसळायचे कां?
कृपया खुलासा व्हावा
18 Apr 2009 - 9:42 pm | दिपाली पाटिल
प्राजु , रेवती ... हे पाव अगदी भारतीय पावां सारखे होतात. पावभाजी आणी मिसळपाव मध्ये वापरता येतात. इथले पाव अगदी च भिजकट असतात, म्हणून च मी पण हे करून पाहिले. :)
मदनबाण... गोळ्यां वरुन दुध किंवा फेटलेले अंडे (egg wash)लावावे. हे केल्यानेच पावाला तांबुस रंग येतो का ?
हे केल्यानेच पावाला तांबुस रंग व चमकदार पणा येतो.
अरुण वडुलेकर ... पण एक शंका आहे. सात कप मैद्याला जे ३.५ कप पाण्याचे प्रमाण सांगितले आहे ,
त्यात गरजेप्रमाणे कमीजास्त करावे लागेल कां? आणि यीस्ट सगळ्या पाण्यां त मिसळायचे कां?
साधरणपणे, मैद्या च्या ५५% पाणी असावे. Trial and Error करण्यास काहि हरकत नाहि. पण यीस्ट सगळ्या पाण्या त मिसळायचे पण पाणी कोमट च असले पाहिजे.
स्वामि...शेवटी पुन्हा दुप्पट फुगणार नाही ना,नाहीतर ओवन मधून निघता निघणार नाही,पाव म्हणतोय.
नाहि कोणी ही फुगणार नाहि हो.. पाव म्हणतेय. :D
19 Apr 2009 - 1:16 am | सखी
वा, मस्त ताजे दिसतायत पाव. आता करुन बघायलाच पाहीजेत.
19 Apr 2009 - 4:55 am | संदीप चित्रे
पाकृसाठी धन्स दीपाली....
आता मिसळ-पाव, वडा-पाव, पाव-भाजी आणि मटण-पाव अजून रंगतील :)
19 Apr 2009 - 6:02 am | मितालि
मित्रानो आणि मैत्रिणिनो, ही रेसिपि वाचुन मी ब्रेड बनवायला घेतलाय.. पाणी जास्त झाले..
मैदा घालुन कसे तरी एकदाचा गोळा बनवला...
खुप वेळ लागतो... अजुन १ तास तरि लागेल... चांगला झाला तर फोटो लावेन इथे..
पीठ फुगेपर्यन्त १ सिनेमा पण संपला बघुन... (बरोबर.. ईन्गजि सिनेमा होता.. म्हणुन एका तासात सम्पला...
चुकले ते .. हिन्दी पाहिला असता तर ब्रेड आणि सिनेमा एकाच वेळी संपला असता..)
सोबत चा चिकन रस्सा बनवुन पण झाला... आता ब्रेड नाहि बनला तर...........
22 Apr 2009 - 1:54 am | हुप्प्या
मैद्याऐवजी जास्त फायबर असणारे होल व्हीट पीठ वापरले तर वरील पाककृतीत काय बदल करावा लागेल?
अंडे वा लोणी न वापरता जरा जास्त हेल्दी पद्धतीने हा पाव बनवता आला तर आवडेल.
22 Apr 2009 - 3:42 am | दिपाली पाटिल
मैद्याऐवजी जास्त फायबर असणारे होल व्हीट पीठ वापरले तर वरील पाककृतीत काय बदल करावा लागेल?
मी ही तोच प्रयत्न करते आहे. अजुन काहि जमले नाहि. पाव खुप च पुठ्ठया सारखा लागत होता.
अंडे वा लोणी न वापरता जरा जास्त हेल्दी पद्धतीने हा पाव बनवता आला तर आवडेल.
अंडे तर असेहि नाहिये या त..
लोणी कमी करता येइल. पण त्याने पाव तेव्हढा सॉफ्ट होणार नाही.
27 Apr 2009 - 6:44 am | लवंगी
खूपच छान झाला होता. आता माझ्या घरी नेहेमी होत रहाणार. मुलांनापण जाम बरोबर खूप आवडला..
27 Apr 2009 - 7:23 am | विसोबा खेचर
वा पाटील मॅडम!
पाव तर एकदम ताजा आणि झकास दिसतो आहे! :)
तात्या.
27 Apr 2009 - 8:33 am | प्राजु
जियो!!
आजच केला होता. सगळे प्रमाण अर्धे घेऊन केला. पावभाजीसाठी केला. १२ पाव झाले त्यात.
अफलातून झाला होता. माझ्या मैत्रीणीने भाजी केली आणि मी गरमा गरम पाव घेऊन गेले. माझ्या मैत्रीणीच्या कुटुंबातही खूप आवडले हे पाव. अगदी भारतात असल्यासारखे वाटले. इथले भिजके आणि बटर लावून भाजल्यावर चपटे होणारे पाव खाऊन फारच वैताग आला होता.
खूप खूप धन्यवाद. आता नेहमीच होत राहील. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Apr 2009 - 9:04 am | लवंगी
इथले पाव खावेसे वाटतच नाही. म्हणून आजचा पावाचा बेत इतका झकास झाला कि माझ्या नवरोबांनी पण दिपालीला धन्यवाद दिले.
27 Apr 2009 - 11:21 am | भाग्यश्री
प्राजु, तू अल्बर्टसन्स मधला पाव आणलायस का? एकदम सेम आहे भारतातल्या सारखा.. !
www.bhagyashree.co.cc
27 Apr 2009 - 11:57 am | ऋषिकेश
"देवा मला पाव.. देवा मला पाव" म्हणत असतानाच देवाने हा पाव दिला वाटतं ;)
बाकी ओव्हन नसेल तर मायक्रोवेव्हचा ओव्हन/बेक मोड वापरून कसं करावं ते सांगाल का प्लिज
ऋषिकेश
12 May 2009 - 2:03 am | योगी९००
माझ्या परिवारातर्फे दिपालीस धन्यवाद..
माझ्या पत्नीने ही पाककृती बघून पाव बनवले...आणि मस्त झाले होते...सोबत अंडाकरीपण होती..
खादाडमाऊ
12 May 2009 - 7:09 am | सहज
अतिशय सुंदर!
20 May 2009 - 12:11 pm | काजुकतली
एका तासा ने परत या मिश्रणा ला बाहेर काढून ४-५ पंच मारावे.
दिपाली, मी कुठेतरी वाचलेले की परत पंच करताना, मिश्रणातली सगळी हवा काढुन टाकायची, मिश्रण परत फ्लॅट झाले पाहिजे. मग परत तु लिहिल्याप्रमाणे फुगायला ठेवायचे.
हे खरे काय?? विब्जसारखा चौकोनी ब्रेड पण ह्याच कृतीने करता येईल ना??
साधना
7 Dec 2012 - 4:43 pm | रश्मि दाते
छान