उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.
प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.
पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.
प्रतिक्रिया
10 Mar 2022 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरुवातीचे कौल पाहता, उत्तरप्रदेशात भाजपा, गोव्यात काँग्रेस तर उत्तराखंडात भाजपने मुख्यमंत्रीपदाचे जे खेळ केले तरीही भाजपने चांगली झेप घेतली तिथे काँग्रेस पुढे आहे, अर्थात काटे की टक्कर आहे. पंजाब मधे आपने आघाडी घेतली आहे, काँग्रेस आणि अकाली दल त्यांना सरकार बनवण्यापासून रोखते का ते पाहणे रोचक आहे, भाजपचा तिथे सूपड़ा साफ़ आहे. एकूण सर्वत्र समिश्र राजकारण दिसत आहे.
लॉकडाऊनमुळे झालेले जनतेचे झालेले हाल, वाहती प्रेते, वाढती महागाई, याचा म्हणावा तसा तितका फटका भाजपाला बसलाच नाही,असे निकाल पाहता म्हणता येत नाही.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2022 - 9:39 am | प्रसाद गोडबोले
सर , महत्वाचा मुद्दा राहिलाच की
EVM Hacking !
=))))
10 Mar 2022 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो तो मुद्दा आता जो पर्यन्त निवडणुका असतील तो पर्यन्त कायम राहील.
बाकी, आपापली सर्वांसाठी म्हणतोय. जी मतं असतील ती व्यक्तिगत न होता मांडावी. मतं पटतील, न पटतील. शेपुट वाढवू नये असे वाटते.
-दिलीप
10 Mar 2022 - 9:59 am | प्रसाद गोडबोले
हां , आता कसें प्रतिसाद एकदम परीपुर्ण जाहला ! उत्तरप्रदेश मध्ये ईव्हीएम हॅकिंग , पंजाब मध्ये जनतेचा न्याय अन भाजपचा सुप्डा साफ !
साठां उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सफळ संपुर्ण !
बाकी आपली मते मांडा म्हणालात म्हणुन मांडतो कि आम्ही कोणत्याही प्रकारच्या सरकारी सवलतींचा , सबसींडींचा , सुविधांचा लाभ घेत नाही , त्यामुळे सत्तेत कोणीही आलं तरीही आम्हाला काहीही फरक पडत नाही. आपण आपलं मान वाकवुन टॅक्स भरत राहु , मग सरकार ने त्या पैशाने आगी लावल्या तरी आमची काहीही हरकत नाही !
=))))
10 Mar 2022 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इव्हीएम हॅकिंग, हा विषय कोणताही पराभूत पक्ष जो पर्यंत निवडणूका असतील तो पर्यंत, असे काही पक्ष अशी टीका करीत राहतील, अशा अर्थाने. तो मुद्दा माझ्या प्रतिसादात नाही. आणि तो माझा मुद्दाही नाही.
विविध निवडणुकांमधे निवडणूक झोनल अधिकारी पासून केंद्रप्रमुख म्हणून काम केलेले आहे. मतदारांचे प्रबोधन, ट्रेनिंग दिलेले आहे, त्यामुळे तो मुद्दा गैरलागू. आपला नव्हे, इतरांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा.
बाकी, चालू द्या.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2022 - 11:33 am | Trump
नमस्कार सर,
एव्हीएमचा मुद्दा, तुम्ही केलेल्या कामामुळे अध्यायत नाही, हे पाहुन छान वाटले. विरोधात मते किती असु द्यात, आरोप - प्रत्यारोप चालुच राहतील.
पण आपला आपल्या व्यवस्थेवर विश्वास हवा.
10 Mar 2022 - 7:28 pm | कॉमी
तुम्ही नक्की ट्रम्पच का ? आमचा डॉनी असा नव्हता हो !
😔
10 Mar 2022 - 11:41 am | प्रसाद गोडबोले
कठीण ह्या साठी आहे की ....
बहुतांश राज्यात भाजप सरळ सरळ बहुमत घेईल असे दिसत असुनही सुशिक्शित लोकं मात्र पंजाब मध्ये भाजपाचा सुपडा साफ अशी शब्दांची निवड करतात !
पंजाब मध्ये भाजप जिंकेल अशी कधीच कोणालाच आशा नव्हती !
उर्वरीत देशात मोटाभाई च्या "काँग्रेसमुक्त भारत" ह्या ध्येय्याकडे हळु वाटचाल चालु आहे ते मात्र कोणालाही दिसत नाहीये !
गोव्यात पर्रीकर सुपुत्र हरतील अशी चिन्हे आहेत , त्यामुळे व्यक्ती पेक्षा पक्ष आणि पक्ष विचारधारा महत्वाची असे मानणार्या लोकांना अन पक्षांना हा सुखद धक्का असेल.
एवढे होऊनही
हे असे विधान करायला जी निष्ठा पाहिजे ती अतियल्प लोकां मध्ये शिल्लक आहे . तुम्ही एकटेच नाही असे अनेक मित्र आहेत आमचे की जे युक्रेन मधुन अमीरजाद्यांना विमानाने भारतात आणण्यात दिरंगाई केली म्हणुन मोदीच्या नावाने शिमगा करतात , इथे गेले ६ महिने बसेस बंद आहेत त्यावर मात्र मिठाच्या गुळण्या धरुन गप्प !
राजकारण हे असेच असते , आज भाजप वरचढ आहे , उद्या अन्य कोणता तरी पक्ष वरचढ असेल . हे जोवर लोकांच्या लक्षात येत नाही तोवर सारेच कठीण आहे
10 Mar 2022 - 5:08 pm | कॉमी
ईव्हीएम घोटाळा नाही. ओपिनियन पोलशी जुळनारे रिझल्ट ईव्हीएम घोटाळ्याने कसे येतील ?
10 Mar 2022 - 7:17 pm | प्रदीप
ह्या तुमच्या- आमच्या मताला कुठेही, काहीही किंमत नाही. कचुरे काय म्हणतात, ते महत्वाचे. आणि त्यांनी ई-व्ही-एमचे खेळ होत आहेत, असे अखिलेशच्या पक्षाचा हवाला देऊन सांंगितले आहे, म्हणजे ते तसे असणारच!!
आता, जेव्हा जेव्हा भाजप मार खाते, (दिल्ली, प. बंगाल, आता, पंजाब....) तिथे हा घोटाळा का नसतो? असले क्षुल्लक प्रश्न कचुरेंना विचारायचे नाहीत, बरं का.
10 Mar 2022 - 1:07 pm | sunil kachure
Evm मशीन मध्ये घोटाळा ,किंवा बाकी घोटाळे शक्य आहेत समाजवादी पार्टी नी तसे व्हिडिओ टाकले आहेत
इतिहास च्या paper मध्ये कॉपी न करणारा भूगोलाच्या paper madhye कॉपी करू शकतो
त्या मुळे इतिहास च्या paper मध्ये कॉपी झाली नाही म्हणजे पूर्ण परीक्षेत च कॉपी झाली नाही.
हा फालतू युक्तिवाद झाला
फक्त अडाणी लोक च विश्वास ठेवतील अशा युक्तिवाद वर
10 Mar 2022 - 10:02 am | रावसाहेब चिंगभूतकर
अजं कजं सर, अजं कजं? रडारड तर सुरू व्हायलाच पाहिजे.
थोडक्यात आता जोपर्यंत निवडणुका होतील तोपर्यंत काँग्रेस कधीच निवडून येणार नाही तर! सो सॅड.
10 Mar 2022 - 10:17 am | सौंदाळा
नीच आणि निर्लज्ज भाजपा उमेदवार बाबुश मान्सेरोत पेक्षा अपक्ष उत्पल पर्रीकर पणजी मधून पुढे अशी बातमी मगाशी पाहिली आणि बरं वाटलं
10 Mar 2022 - 10:28 am | जेम्स वांड
बाबुश मोन्सराट हे नाव ऐकले अन आजची त्याची आघाडी बघितली का समार्थाघरचे श्वान म्हण आठवते.
10 Mar 2022 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही वेळापूर्वी उत्पल पर्रीकर पणजीमधून मागे अशीही बातमी होती, त्यामुळे ते धक्कादायक वाटत होते.
उत्तरप्रदेश भाजपा आघाडी २४३. सपा. १११ बसपा ०५. काँग्रेस ०६.
यात पश्चिम उत्तरप्रदेशातही जिथे शेतकरी आंदोलन होते तिथेही भाजपाने आघाडी घेतली.
गोव्यात पुन्हा भाजपाने मुसंडी मारलेली दिसते आहे. भाजपा १८, काँगेस १३ मगोप ०५ इतर ०४
इथे अजूनही चित्र अस्पष्ट दिसत आहे.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2022 - 10:51 am | प्रचेतस
पंजाबात मात्र भाजप नगण्य स्थान मिळताना दिसतयंय. येथे आपने जोरदार मुसंडी मारलेली दिसतेय. पुढेमागे भगवंत मान आणि केजरीवाल ह्यांच्यात सर्वोच्च नेतेपदावरुन संघर्ष उद्भवला तर नवल वाटायला नको.
10 Mar 2022 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'आप' जर पंजाबात सरकार स्थापन करीत आहे असे वाटते. आपचं मनःपूर्वक अभिनंदन. दिल्लीत केजरीवाल सरकारने जे विकासाचे स्वप्न दाखवले, प्रत्यक्षात आणले आणि जनतेच्या विकासाची पाऊलवाट पाडली (याबद्दल मतभेद असू शकतील) पण ते पाहून जर पंजाबने 'आपला' स्वीकारले असेल तर पंजाबी जनतेचं अभिनंदन करायला पाहिजे. जात-धर्म आणि पारंपरिक पक्षांना दूर करुन विकासाच्या मुद्द्याला पंजाबी जनतेने महत्व दिले असेल तर जनतेचंही अभिनंदन.
बाकी, आपमधील सर्वोच्च पदावरुन संघर्ष होऊ शकतो, पद आणि महत्व याचा सोस कोणाला नसतो ? त्यामुळे भविष्यात होणारा संघर्ष नाकारता येत नाही.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2022 - 12:35 pm | रावसाहेब चिंगभूतकर
खो खो खो..
10 Mar 2022 - 10:31 am | प्रचेतस
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात भाजप आणि पंजाबात आप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. कॉंग्रेसची स्थिती सर्वत्रच दयनीय दिसतेय.
10 Mar 2022 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तराखंडात, काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे, इथे त्यांना प्लस ११ जांगांवर फायदा दिसतो आहे. अर्थात उत्तराखंडात मताधिक्य मिळून सरकार स्थापनेची संधी होती. पण शेवटच्या काधी दिवसात भाजपाने तिथे प्रचारात आघाडी घेतली. आणि आता कौलातही ते पुढे दिसत आहेत.
उत्तराखंड, १४ उत्तरप्रदेश, ०३, पंजाब १५, मनीपूर ०७, आणि गोवा १४, यात दयनीय स्थिती दिसते आहे, पण अजूनही पक्षात धुगधुगी दिसत आहे. एक मोठा पक्ष सत्तेत नाही पण अजूनही वेगवेगळ्या लहरीत पक्ष टीकून आहे, ही काँग्रेससपक्षासाठी अस्तित्व असल्याचं एक समाधान म्हणावे लागेल.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2022 - 1:51 pm | सामान्यनागरिक
खान्ग्रेस ची बातच कशाला करताहात? अनुल्लेखाने मारा.
आता प्रियंका गांधी फक्त हळदी कुंक्वा पुरत्या उरल्या आहेत. बाकी सगळं ईतिहास जमा झालंय.
10 Mar 2022 - 1:51 pm | सामान्यनागरिक
खान्ग्रेस ची बातच कशाला करताहात? अनुल्लेखाने मारा.
आता प्रियंका गांधी फक्त हळदी कुंक्वा पुरत्या उरल्या आहेत. बाकी सगळं ईतिहास जमा झालंय.
10 Mar 2022 - 10:58 am | जेम्स वांड
भाजपला दमदार लीड, सपा ट्रेलिंग बिहाइंड लीड परत दोन आकडी आली सपाची
10 Mar 2022 - 10:59 am | जेम्स वांड
भाजप काट्याने पुढे, काँग्रेस ने इथेही ट्रेल धरली आहे
11 Mar 2022 - 8:50 am | निनाद
भाजपने मणिपूरमध्ये बहुमताचा आकडा पार केला. ६० सदस्यांच्या विधानसभेत ३२ जागा जिंकून बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. भाजप पक्षाने प्रथमच ईशान्येकडील राज्यात बाहेरील पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन केले आहे. काँग्रेसला फक्त पाच जागा जिंकता आल्या.
कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ने सरकारमधील त्याचा भागीदार असलेल्या भाजपपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि भाजप आणि काँग्रेसला पर्याय असलेला पक्ष म्हणून स्वत:ला उभे केले. पक्षाने मणिपूरमध्ये नऊच्या तुलनेत यावेळी ६० पैकी ३८ विधानसभा जागा लढवून आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे.
पक्षाची स्थापना १९८९ मध्ये झाली आणि ब्रजमोहन देव शर्मा मंडपाने उरीपोक येथे बोलावलेल्या बैठकीत नॉन्गथोम्बम इबोमचा सिंग यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याची स्थापना झाल्यानंतर फक्त एक वर्षानंतर, एनपीपीने मणिपूरमध्ये पाच जागा लढल्या आणि चुराचंदपूरमध्ये विजय मिळवला, व्ही. हांगखालियन हे एनपीपीचे पहिले आमदार आणि आरके रणबीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री बनले होते.
--
सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (AFSPA), १९८५ या वादग्रस्त कायद्याच्या विरोधात राज्यातील लोकांमध्ये तीव्र भावना असूनही, इतर पक्षांना त्याचे भांडवल करता आले नाही. सशस्त्र दलांना विशेष अधिकार देणारा कायदा ईशान्येकडील राज्यांमध्ये लागू आहे.
10 Mar 2022 - 11:04 am | जेम्स वांड
हे लोक महाराष्ट्रात आढळणाऱ्या महानुभाव पंथाप्रमाणे फक्त कृष्णभक्ती आधारित पूजपद्धतीचे पालन करतात, शिवाय त्याच्यासोबत पुरातन स्थानिक निसर्गपूजक परंपरा पाळतात. एन बीरेन सिंग हे बहुतेक ह्याच समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मणिपुरी नृत्यकला (भारतीय अभिजात नृत्यशैली पैकी एक) ही ह्याच समाजाची देणगी आहे.
हे सगळे फॅक्टर्स भाजपने खुबीने वापरुन घेतलेले दिसतात, सोबत पूर्वोत्तर भारतात आक्रमक कार्यक्षमतेने हाती घेतलेले पायाभूत सुविधांचे विस्तार प्रकल्प, रेल्वेचे जाळे पसरणे इत्यादी पण भाजपला अधिकचे ब्राऊनी पॉईंट्स देऊन जातील असे वाटते आहे.
10 Mar 2022 - 7:21 pm | प्रदीप
ई. व्ही. एम. तुम्ही विसरलात, किंवा, तुम्हाला तो फॅक्टर वाटतच नाही. कचुरेंना विचारा, तुमच्या डोळ्यांत ते अंजन घालतील.
10 Mar 2022 - 11:12 am | जेम्स वांड
पण ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी इथं लाईव्ह स्ट्रीमिंग एम्बेड करतोय निकालांचे
10 Mar 2022 - 11:17 am | प्रचेतस
आगाऊपणा कसला हो, बिनधास्त एम्बेड करा, ताजे निकाल आणि त्यांच्यावर चर्चा होण्यासाठीच धागा आहे,
चर्चा खुलेपणाने होऊ द्या, कुणीही व्यक्तिगत होऊ नका इतकेच.
10 Mar 2022 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> कुणीही व्यक्तिगत होऊ नका इतकेच.
सहमत. आपला धागा पाहुन वेळात वेळ काढून प्रतिसादाचं दळन दळतोय. ;)
-दिलीप बिरुटे
10 Mar 2022 - 11:35 am | टर्मीनेटर
निकालांवर लक्ष ठेऊन आहे!
सगळ्या साईट्सवर दाखवल्या जाणाऱ्या लाईव्ह अपडेट्स मध्ये तफावत दिसत आहे पण एकंदरीत कल पहाता पंजाब सोडून अन्य चार राज्यांमध्ये भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळेल असा माझा प्राथमिक अंदाज, बाकी संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईलच 🙂
10 Mar 2022 - 11:37 am | सुबोध खरे
लोकसता बातमी देतेय की युपी ने प्रियंका गांधींना नाकारलं..
अरे स्वीकारलं कधी होतं??
10 Mar 2022 - 1:15 pm | जेम्स वांड
वरील तक्ता हा काँग्रेसचा उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांतला परफॉर्मन्स आहे. काँग्रेसने १९५१,१९५७, १९६२, १९६९, १९७४, १९८०, १९८५ इतक्या निवडणुकांत ऍबसोल्युट मेजोरीटी प्राप्त केली होती.
आता वरील निवडणुकींत प्रियांका गांधी ह्यांचं सुतराम काही घेणे देणे नाही काही निवडणुकांत त्या बाल्यावस्थेत असतील तर काहींत त्या राजकारणात उतरण्याचे स्वतः देखील ठरवू शकल्या नसतील.
काँग्रेस संपली ती पण प्रियांका गांधी मार्केटमध्ये
एक ब्रँड म्हणून यायच्या अगोदर, ती थेट मंडल मंदिर राजकारण सुरू झाल्यापासून आजतागायत घसरगुंडीच आहे, त्यामुळे यूपीत प्रियंकांना नाकारले वगैरे होगवॉश आहेच अन दरबारी कुटुंबकेंद्रित राजकारणाचेच द्योतक आहे.
10 Mar 2022 - 11:38 am | सुबोध खरे
इंडिया today वर राजदीप, सारखे भाजपा 300 क्रॉस करणार नाही म्हणून सारखे सांगतोय आणि शासन कसे सुशासन नव्हते ते सांगतोय
10 Mar 2022 - 11:43 am | सुबोध खरे
आज भाजप वाले पेढे आणणार
आणि
फुरोगामी पण पेढे आणणार
पंजाब मध्ये आप जिंकले म्हणून
विन विन सिच्युएशन
10 Mar 2022 - 11:50 am | टर्मीनेटर
त्यांनाही 'नैतिक' विजय साजरा करूद्यात हो 😀
10 Mar 2022 - 11:56 am | sunil kachure
तिसऱ्याच राज्यातील लोक काळजी करत आहेत.हे बघून गहिवरून आलें
10 Mar 2022 - 12:07 pm | प्रसाद गोडबोले
कारण ते लोकं भारताला एक देश भारत मानत असावेत अन विधानसभा निवडणुकातील निकांचे परिणाम लोकसभा निवडाणुकांवर पडणार इतका साधा सोप्पा तर्क समजण्याची त्यांची बौध्दिक कुवत असावी !
शिवाय महाराष्ट्रात बसुन अगदी दुसर्या टोकाला असलेल्या बंगाल /असमची चिंता करण्याची आमची फार जुनाट संस्कृती आहे
10 Mar 2022 - 12:50 pm | इरसाल
उत्तरप्रदेशातील होणार्या निवडणुकीत भाजप "करणार" असणार्या "इव्हीएम हॅकिंग" पासुन मिडीयाला दुर ठेवण्यासाठी....रशियाला युक्रेनवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
बघा....परिणाम समोर आहेत.
अनिल तु चरे
10 Mar 2022 - 1:20 pm | sunil kachure
निवडणूक आयोगाची पुनर्रचना करून .विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत
संबंधित सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक आयोग मध्ये असावे.फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यानं वर विश्वास ठेवणे अशक्य आहे
त्या साठी घटनेत बदल करावा
निवडणूक आयोग मध्ये सर्व राजकीय पक्षाचे सदस्य पण असेलच पाहिजेत
T N शेषन नंतर कोणावर विश्वास ठेवणे शक्य नाहीं
10 Mar 2022 - 3:07 pm | कोण
हेमन्त ३३ तुम्हिच का?
<<<<निवडणूक पद्धती मध्ये कुठे तरी घोटाळा नक्की आहे.
निवडणूक आयोग ची व्याप्ती वाढवून देशातील सर्व राजकीय पक्षांचे सदस्य निवडणूक आयोगात असावेत
फक्त प्रशासनिक अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणे अयोग्य आहे.
Submitted by Hemant 33 on 10 March, 2022 - 02:45
>>>>
10 Mar 2022 - 3:12 pm | Trump
दुवा द्या बरे तिकडचा.
श्री कचुरे यांचा आयडी एकापेक्षा जास्त लोक वापरतात असे मला कधी कधी वाटते.
10 Mar 2022 - 3:33 pm | कोण
https://www.maayboli.com/node/81247
10 Mar 2022 - 7:07 pm | चौकस२१२
मला तरी असा वाटतंय कि संजय राऊत यांचा हा अवतार असावा
11 Mar 2022 - 10:48 am | Trump
श्री कचुरे ज्या प्रकारे कोणलाही न जुमानता ज्या पध्दतीचे प्रतिसाद देतात आणि प्रतिवाद करतात त्याप्रमाणे, त्यांना इतराकडुन शिकण्याची इच्छा आहे असे वाटत नाही.
बरेचदा ते एकाच पध्दतीने लिहीतात, फक्त कधी कधी गल्ली चुकतात म्हणुन शंका येते.
11 Mar 2022 - 10:56 am | रात्रीचे चांदणे
कचुरेला प्रतिसाद दिला की त्याचा हेतू साध्य होत असेल. जसा अत्ता झाला.
11 Mar 2022 - 10:58 am | Trump
तुम्हाला ट्रोलींग म्हणायचे आहे का?
11 Mar 2022 - 11:06 am | रात्रीचे चांदणे
नाही, कचुरेच्या प्रतिसादकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. त्याला प्रतिसाद केला की तो आणखीणच असबंध प्रतिसाद टाकतो.
11 Mar 2022 - 11:19 am | Trump
श्री कचुरेंचे मुद्दे समजुन घ्यायला आवडतील, पण त्यांनी संदर्भ द्यायला हवेत. त्यांची विचारसरणी समजावुन सांगणारे लेख लिहायला हवेत.
दुर्देवाने ते होत नाही, त्यामुळे सगळे प्रतिसाद एकसुरी वाटतात.
11 Mar 2022 - 11:12 am | सुबोध खरे
, फक्त कधी कधी गल्ली चुकतात
कधी कधी ?
आणि
गल्लीच काय शहरहि काय राज्यच चुकलेलं आहे