आपण खरोखरच मतदान करायला लायक आहोत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
8 Mar 2022 - 8:25 am
गाभा: 

गेली कित्येक दशके, म्हणजे साधारण पणे, 1980 च्या सुमारा पासून ते आत्ता पर्यंत, राजकारणी लोकांवर गुन्हे दाखल होण्याचे किंवा गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या कुटुंबातील सदस्य, राजकारणात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे

फुलनदेवी, हे असेच एक आठवलेले उदाहरण ...

नुकतीच एक बातमी वाचली.... राज्यातील आमदार-खासदारांविरुद्ध पाचशे खटले प्रलंबित (https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/500-cases-pending-a...)

महाराष्ट्र सारख्या, तथाकथित पुरोगामी राज्यात, जर ही परिस्थिति असेल तर, आपण खरोखरच सुशिक्षित मतदार म्हणून लायक आहोत का?

मी तरी, ज्या नेत्यावर खटले दाखल केले आहेत, त्या नेत्याला मतदान करत नाही...आणि करणारही नाही ...

ज्या नेत्यांवर खटले दाखल केले आहेत, ते कुठल्या पक्षाचे आहेत? हे न बघणेच उत्तम ...

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 8:56 am | कुमार१

ज्या नेत्यांवर खटले दाखल केले आहेत, ते कुठल्या पक्षाचे आहेत? हे न बघणेच उत्तम ...

+११११

जेम्स वांड's picture

8 Mar 2022 - 9:03 am | जेम्स वांड

मुविंना आवडेल असे(च) बोलायचे का आपला तर्क मांडायचा इथून प्रश्न सुरू होतो.

कित्येक नेत्यांवर तर जमावबंदी झुगारणे, आंदोलने (मतदारसंघात असलेल्या प्रश्नांसाठी म्हणे) करणे, इत्यादीही कलमे लागलेली असतात,

पण आमच्या मुविंना रडायला आवडते, आता मुविंनी एक बयाजवार अभ्यास करावा की बुआ किती आमदारांवर गुन्हे आहेत एकूण, त्यातील किती आमदारांवर कॉग्नीझेबल ऑफेन्स उदाहरणार्थ खून (कलम ३०२), बलात्कार (कलम ३७६) वगैरे आहेत, किती लोकांवर कॉग्नीझेबल पण बेलेबल केसी आहेत , किती लोकांवर नॉन कॉग्नीझेबल केसेस आहेत, किती लोकांवर आरटीओ फाईन्स आहेत असा

मग बघू तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय निघते, बाकी तुमचे रडारड करत बसण्याचे निश्चित असले तर मात्र शुभेच्छा.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2022 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

लिंकमधील बातमी देखील उथळ वाटली. गुन्ह्यांची वर्गवारी करुन विश्लेषण केलेला अभ्यास हा आपल्याला हवा आहे. शिवाय काही वेळा राजकारणी लोकांची दहशत इतकी असते की गुन्हे नोंदच होत नाहीत. या बद्दल एकदा आबा गृहमंत्री असताना म्हणाले होते कि जास्त गुन्ह्याची नोंद म्हणजे कायदा व सुव्यवस्था ढिसाळ हा निकष असेल तर बिहार यूपी मधे कायदा व सुव्यवस्था उत्तम नांदते आहे असे म्हणावे लागेल. तरी इथे आपण कव्हिक्शन रेटचा विचार केलेला नाही. आरोप सिद्ध होई पर्यंत तो दोषी नसतोच असे कायदा मानतो. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती असणार्‍या लोकांना निवडून देउ नये. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोण हे सुज्ञ मतदारांना समजते. योग्य उमेदवार मिळाला नाही तर सरळ नोटा वापरावा. लोकशाही प्रक्रियेचे मूल्यमापन व उत्क्रांती यातूनच होणार आहे.

तेच तर अपेक्षित आहे ...

कायदेशीर मार्गाने केलेले ठिय्या आंदोलन किंवा उपोषण, करणारा नेता निवडायचा की चिखलफेक करणारा, नेता निवडायचा? इतपत तारतम्यता हवीच ...

कारण, हातात कायदा घेणारा नेता, नंतर देखील तेच करण्याची शक्यता जास्त आहे.

हो सहमत सध्यातरी यांचे मागील काही धागे बघता असेच वाटते की आतांचे धागे नकारघंटा वाजवाणारे असतात.

मतदारांना सुशिक्षित केले की तेच उत्तम नेते निवडून देतील, अशा आशयाचा एक लेख वाचनांत आला होता ...

आपण सुशिक्षित झालो तरी, नेते निवडतांना आपण सगळेच जण त्यांचे चारित्र्य पडताळून बघतो का?

सामान्यनागरिक's picture

8 Mar 2022 - 12:07 pm | सामान्यनागरिक

जर एखाद्या नेत्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल झाला असेल आणि कोर्टाने सकृतदर्शनी पुरावे बघुन तो मान्य केला असेल ( एफ आय आर दाखल करायला सांगीतले असेल ) तर अश्या उमेदवाराला निवड्णुकीत उभे रहाण्यास अपात्र ठरविण्यासाठी कायदा बनवावा.

एकदा असा गुन्हा सिद्ध होउन तो जेल मधे गल्यास ( भलेही एखाद महिना का असेना ) तो आयुष्यभर कुठल्याही निवडणूकीस उभे रहाण्यास अपात्र असावा.

सार्वजनिक जीवनातील मंडळींनी :
१. कुठलाही कर ( स्थानिक नगरपालिकेचा कर सुद्धा - पाणी पट्टी सुद्धा) भरायला उशीर केला तर त्याला दहापट दंड करावा.
२. वाहतुकीचे नियमांचे पालन न केल्यास दहापट दंड करावा.
३. बाकी ईतर गुन्ह्यांमधे ईतरांना जी शिक्षा असेल त्याच्या दुप्पट यांना करावी.
४. नेत्याच्या गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रयाक कोर्ट स्थापन करावीत. तिथे दाखल झालेल्या केस मधे ४८ तासात समन्स/ वारण्ट जारी करावे. ६० दिवसांत खटला निकाली काढावा.
असे कायदे केल्याशिवाय हे सुधारणार नाहीत.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2022 - 12:47 pm | मुक्त विहारि

सरकार कायदे बनवेल, तेंव्हा बनवेल

पण, तोपर्य॔त अशा नेत्यांना मतदान न करणे, हे तर आपल्या हातात नक्कीच आहे ....

एक वैयक्तिक उदाहरण देतो ..

आमचाच एक कौटुंबिक मित्र, नगरसेवक झाल्या नंतर, मारहाणीच्या प्रकरणात सापडला. वैयक्तिक पातळीवर, त्याचे आणि माझे कितीही घनिष्ठ संबंध असले तरी, ह्यापुढे मी त्याला कधीच मतदान करणार नाही आणि ही गोष्ट मी त्याला बोलून पण दाखवली.

त्याने केलेले आंदोलन, शांतपणे देखील करता आले असते, त्यासाठी कायदा हातात घ्यायची काहीच गरज न्हवती.

कर्नलतपस्वी's picture

8 Mar 2022 - 5:44 pm | कर्नलतपस्वी

सुचवलेले कायदे जरूरी आहेत पण बनवणार कोण?मानधन ,वेतन अनुदान वाढीचे कायदे त्वरीत पास होतात.

स्वतः देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री
ह्यांच्या वर केसेस आहेत
लोकसभेत किती तरी सभासद असे आहेत ते क्रिमिनल आहेत .
त्या मध्ये सत्ता धारी पक्षाचेच जास्त आहेत.
भारतीय शिक्षित असू नाही तर अशिक्षित .
भारतीय लोकांना अक्कल नाही.
म्हणून मुघल पासून ब्रिटिश लोक
पर्यंत सर्वांनी ह्या देशावर राज्य केले.
सुशिक्षित लोक तर जास्त मूर्ख आहेत.
त्या पेक्षा अडाणी लोक हुशार आहेत त्यांना.
देशाची खरी स्थिती चांगली माहीत आहे.

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा

आपण खरोखरच मतदान करायला लायक आहोत का?

असे प्रश्न पडणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे !

पण, ही लोकशाही कायम असाहाय्य आणि लोळागोळा असल्याची जाणीव असणे हे पक्वतेचे लक्षण आहे !

तेच तर होत आहे ....

गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना, मतदान न करणे, इतपत पथ्य जरी पाळल्या गेले तरी, कुठलाही पक्ष, असे उमेदवार जनतेवर लादणार नाही...

अर्थात, अशा गोष्टी एका रात्रीत होत नाहीत ... पण, सुरूवात जरी झाली तरी आज नाही तर उद्या, हा सकारात्मक बदल नक्कीच होऊ शकतो ...

1857 मध्ये सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचे फलित 1947 साली मिळालेच की ...

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2022 - 11:04 pm | चौथा कोनाडा

सुरूवात जरी झाली तरी आज नाही तर उद्या, हा सकारात्मक बदल नक्कीच होऊ शकतो ...

आशावाद आवडला या पेक्षा जास्त काही म्हणु शकत नाही.

आज विधानसभेत माजी मुख्यमंत्र्यांनी नबाब मलिक यांच्या संबधीचे भाषण ऐकून आपण किती किरकोळ आणि असहाय्य हे जाणवले !

मुक्त विहारि's picture

9 Mar 2022 - 5:08 am | मुक्त विहारि

मग , निदान सकारात्मक आशा ठेवायला काय हरकत आहे?

उत्तम काम व्हायला, वेळ हा लागणारच ..

चंदन, नारळा सारखी दीर्घ कालीन परतावा देणारी झाडे, एका दिवसांत वाढत नाहीत ...

सुबोध खरे's picture

8 Mar 2022 - 6:55 pm | सुबोध खरे

कोणावर केवळ खटला भरला म्हणून त्याला निवडणुकीसाठी अपात्र ठरवणे हे चूक आहे.

निवडणुकीला उभा राहतो आहे म्हटल्यावर कोणी त्याच्या विरुद्ध मला मारहाण केली माझ्या मैत्रिणीशी गैर वागला किंवा माझ्या बायकोला पाहून शिट्टी मारली आणि तिचा विनयभंग झाला सारखी तक्रार करून खटला भरू शकेल

कारण जोवर त्याच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर तो निर्दोष आहे असेच कायदा मानतो

त्यामुळे निर्दोष असलेल्या व्यक्तीला निवडणुकीसाठी अपात्र ठरवणे हे घटनाबाह्य असल्याने त्याबद्दल कितीही चर्चा करा निष्पन्न काहीही होणार नाही.

राहिली गोष्ट हे खटले किमान कालावधीत निकाली काढणे हे आवश्यक आहे. तसे झाले आणि उमेदवार दोषी किंवा निर्दोषी ठरला कि त्याप्रमाणे कार्यवाही होईलच. पण सध्या न्यायालयात प्रलंबित असलेले खटले आणि ते तसे प्रलंबित ठेवण्यासाठी राजकीय पक्षांकडे असलेली वकिलांची फौज पहिली तर तसे होईल का याबद्दल शंका वाटते.

बाकी चालू द्या.

कॉमी's picture

8 Mar 2022 - 7:09 pm | कॉमी

सहमत

मुक्त विहारि's picture

8 Mar 2022 - 7:34 pm | मुक्त विहारि

हे त्या प्रभागातली मतदार मंडळी ओळखून असतात ...

अनैतिक कामे करायला प्रतिबंध केला, तर अशा उमेदवारा विरूद्ध देखील, जाणूनबूजून खटले दाखल होऊ शकतात. त्या प्रभागातली मतदारांनी,
अशा निर्दोष उमेदवाराच्या मागे नक्कीच उभे रहायला हवे...

पण, आपल्या प्रभागातला उमेदवार, अनैतिक कामे करत असेल तर, अशा उमेदवाराला मतदान करणे योग्य नाही...

एक वैयक्तिक उदाहरण देतो.. सध्या मी जिथे राहतो, तिथला शिवसेनेचा नेता अतिशय उत्तम काम करतो. प्रत्येक घरी त्याचे अतिशय उत्तम संबंध आहेत आणि वैयक्तिक पातळीवर, कधीही फोन करा. कायदेशीर मार्गाने अडचण सोडवायचा, तो प्रयत्न करतोच. शिवाय कट्टर हिंदू आणि मराठी बाणा पण आहेच. त्यामुळे, आमचे मत त्यालाच ...

पण, उद्या जर तो एखाद्या अनैतिक व्यवसायात गुंतला तर, खटला दाखल होवो की न होवो, आमच्या कुटुंबातील सदस्य, त्याला मतदान करणार नाहीत...

उपेक्षित's picture

9 Mar 2022 - 1:05 pm | उपेक्षित
गावठी फिलॉसॉफर's picture

8 Mar 2022 - 8:08 pm | गावठी फिलॉसॉफर

मुवि आपण ज्यांना मतदान करतो ते आपल्या पाहण्यातील किंवा ओळखीत असतात. काही गुन्हे हे घेणं देणं नसताना दाखल होतात. उदा आमच्या दादांनी निवेदन देवूनही सरकारी डॉक्टर वेळेवर येत नाहीत किंवा य म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळा लावला होता. बातमी दिली. प्रशासन जागे झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते त्यातून निर्दोष निघाले. डॉक्टर निलंबित झाले. ते त्यावेळी पंचायत समिती ला उभे होते. माज्या मते त्यांना मतदान करण्यात काही गैर नाही.

आमचे zp सदस्य, आमदार, खासदार यांना जवळून ओळखतो. किती कांड करतात. त्यांचे कार्यकर्ते तर सरेआम गुन्हे करतात. त्याची नोंद सुद्धा होत नाही. निर्दोष नावाला असतात फक्त. मग अशांना मतदान करायचे का??

मुक्त विहारि's picture

9 Mar 2022 - 5:04 am | मुक्त विहारि

एक मूठ मीठ देखील, सत्ता पालट करू शकते

आपण सुरूवात तर नक्कीच करू शकतो

थोडा वेळ लागेल, पण एक ना एक दिवस, उत्तम उमेदवार नक्कीच येतील

आपल्या मतदारसंघातील गरीब , अडलेल्या लोकांची वैयक्तिक कामे करुन त्याबदल्यात मते पक्की करुन ठेवतात.

१) शेतीसाठी , घरासाठी कर्ज मंजूर करुन देणे
२) नोकरीला चिकटवून देणे
३) विहीर खोदायला अनुदान
४) पैसे उधार देणे
५) भांडणे मिटवणे/(मांडवली)
६) मंदिर किंवा सार्वजनिक वास्तू बांधायला अनुदान मिळवून देणे

जो नेता हे जास्तीतजास्त करेल तो जिंकतो.

या अडलेल्या लोकांना नेत्यावर गुन्हे किती याचे काही पडलेले नसते. असे लोक खास करुन ग्रामीण भागात फार. अपना काम बनता तो भाड़ में जाए जनता। , मी माझं कुटूंब. देश बिश नंतर अशी वृत्ती असते.

समजवणार तरी कुणाला?

मुक्त विहारि's picture

9 Mar 2022 - 5:05 am | मुक्त विहारि

सहमत आहे...

सध्या तरी हीच परिस्थिति आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Mar 2022 - 12:19 pm | प्रसाद गोडबोले
sunil kachure's picture

9 Mar 2022 - 1:23 pm | sunil kachure

आताची अवस्था बघून ,आणि देशावर बोजा असणाऱ्या यूपी,बिहार मधील आता पर्यंत चे यादव राज बघून.
हे तर स्पष्ट आहे भारतीय जनता सरकार निवडण्याच्या लायकीची नाही.
सर्व लोकांना मतदान हक्क देण्या पेक्षा काही अट घालून काहीच लोकांस तो हक्क असावा.
एक तर एका राज्यातील व्यक्ती लं दुसऱ्या राज्यात मतदान करता येणार नाही.
हा बदल करावा.
आणि व्यक्ती कोणत्या राज्याचा मुल रहिवासी आहे.
हे ठरवताना त्याचे आडनाव आणि पाठी मागच्या १०० वर्षाचा इतिहास ग्राह्य मानवा.
भारतील अर्धे प्रश्न संपतील.

कॉमी's picture

11 Mar 2022 - 11:22 am | कॉमी

दुतोंडी कसा बरे ? कचुरे१८८ यांनी तार्किक दृष्ट्या एकसंध प्रतिसादच दिला आहे. आता त्यांचे म्हणणे बाष्कळ आणि दुर्लक्षण्याजोगे आहे हे बरोबर, पण दुतोंडी नाहीये, लॉजिकली कनसिस्टंट आहे.