शेवगा !

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
26 Apr 2009 - 7:59 pm
गाभा: 

मंडळी इथे पडणार्‍या व्हेज नॉनव्हेज पाककृत्या आणि त्यावरील उदंड प्रतिसाद पाहीले की (स्वगत :- माझ्या लेखांना का बरं प्रतिसाद मिळत नाहीत ? म्हणून रोज विसेक चपात्या रागाच्या भरात जास्त खातोय, एक तर रेसेशन चालू आहे आणि हे असं भस्म्या झाल्या सारखं खाऊन रेशन पण पटकन संपतंय) कधी कधी उद्भवलेले व्हेज-नॉनव्हेजिटेरियन्स चे वाद लक्षात घेऊन एक सुचना करावीशी वाटते.
चिकन, मटण , मासे , बोंबिल , सुक्कट, प्राँप्लेट इत्यादी भावना भडकवू (काय चाल्लय हे ? सजिवांच्या रक्तपातातून मिळणार्‍या मांसावर आपण माणसे असा "क्रुर इमोसनल अत्याच्यार" करून पाककृती मिपा वर येऊ नये असे काही शुद्ध शाकाहार्‍यांचे म्हणने पडते.) पण मनातल्या नॉन-व्हेज जेवणाच्या इच्छेचा कचरा होऊ नये, आहार-स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून अशा पाककृतींना बंदी असु नये असे मला वाटते.

त्यासाठी 'शेवागा' नावाचा (हेच नाव असावे असे नाही. काही वेगळे नाव सुचवायला हरकत नाही, शेवगा मला बिक्लूल आवडत नाही, तसेच शाकाहार्‍यांना मांस-मच्छी आवडत नसावी म्हणून हे नाव , बाकी काही नाही ... च्यायला नाय तर पब्लिक म्हणायचं शेवगा कुठं नॉनव्हेज असतोय व्हय ? असो .. ) एक वेगळा उपविभाग पाककृती विभागात उघडल्यास त्यात हवे त्या मासकांडांच्या पाककृतींचं लेखन करता येईल (स्वगत : मला सुचना करायला काय जातं ? ते तात्या आणि तो बिचारा निलकांत जाणो, आपल्या लेखाला वाद होऊन का होईना ५० प्रतिसाद आले की ब्लड प्रेशर कमी होईल आणि नॉर्मल जेवण जाईल तरी . आणि पचेलही ) आणि ज्यांना ते वाचायचे आहे तेच वाचतील उगीच कुणालाही ते वाचावे लागणार नाही.

सद्याही मिपावर वेगवेगळे विभाग आहेत पण मिपाच्या मुखपृष्ठावर सर्वसमावेशक पाककृत्या पाहायला मिळतात.
म्हणून मिपाच्या सद्याच्या रचनेत त्यासाठी काही बदल करावे लागतील. ( स्वगत : करा ... अजुन बदल करा , त्याने काही फरक पडो न पडो .. आपण सुचना करणे सोडणार नाय बॉ ) जसे की...सद्या प्रथम उघडणार्‍या सर्वसमावेशक पानांऐवजी प्रथम फक्त विभाग दर्शवणारे पान उघडेल म्हणजे ज्याला जो विभाग उघडायचा असेल तो उघडून त्यातील पाककृती-प्रकार वाचता येईल. ह्यामुळे लिहीणार्‍याला कोणतेही बंधन घालायची जरूर लागणार नाही आणि वाचकही आपापल्या आवडीप्रमाणे आपल्याला हव्या त्याच पाककृती वाचू शकतील.

ता.क. : वरिल सर्व हलकेच घेण्यासाठी आहे !
कळावे,
मांसाहारी टारूदेव प्रसन्न!!

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

26 Apr 2009 - 8:02 pm | विनायक प्रभू

फुलला
शेवगा फुलला.

ऋषिकेश's picture

26 Apr 2009 - 8:04 pm | ऋषिकेश

टारुदेवाचा इजय असो!!!! =)) =)) =))

एक शंका: मासे विकणार्‍या कोळीणींचे फोटु शेवगात जातील का ?

ऋषिकेश

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 8:07 pm | काळा डॉन

खि खि खि...हलकेच घेतले!

-*-*-*

देवकाकांच्या निदान वयाचा तरी माण ठेवुण टारूणे त्याणा टार्गेट करायला णको होते.

कुठल्याही व्यक्तीला टारेगेट करणारे धागे काढणे मला बरोबर वाटत नाही. हजारो विषय आहेत , लेखनप्रकार आहेत , त्याबद्दल लिहीण्याची मुभा आहे. असे असताना एका व्यक्तीला अनुलक्षून नवा धागा उघडणे कशाकरता ?
प्रतिसाद पूर्ण. याविषयावर याहून जास्त मी बोलू इच्छित नाही.

टारझन's picture

26 Apr 2009 - 8:11 pm | टारझन

आयला स्वता देवांला काही ओब्जेक्शन नाही. आणि तुम्हाला का त्रास होतोय? आणि हो , चल्गेल्च बोल्तोय ना आपण?
;)

प्रमोद देव's picture

26 Apr 2009 - 8:16 pm | प्रमोद देव

मानलं टारूशेठ!
हा बाकी चक्क षटकार आहे बरं का! :)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 8:17 pm | काळा डॉन

टार्या....बाझवला तिच्यायला..मानलं =))

ऋषिकेश's picture

26 Apr 2009 - 8:26 pm | ऋषिकेश

हा हा.. टारोबा!!! मानलं तुला.. =)) =))
ऋषिकेश

अवलिया's picture

26 Apr 2009 - 8:28 pm | अवलिया

लै भारी रे टार्राबाप्पा

--अवलिया

घाटावरचे भट's picture

26 Apr 2009 - 8:43 pm | घाटावरचे भट

टार्‍या....म हा न!!!!
=)) =)) =))

दशानन's picture

26 Apr 2009 - 8:49 pm | दशानन

=))

सरळ स्टेडियमच्या बाहेर बॉल !

;)

ते काय तरी दुनिया झुकती है................... असं काहि वाचलं होतं बॉ आम्ही.. त्याचा प्रत्येक्ष अनुभव आला =))

थोडेसं नवीन !

ऍडीजोशी's picture

27 Apr 2009 - 2:37 am | ऍडीजोशी (not verified)

दुनिया झुकती है....

टार्‍या समोर न झुकून ही दुनिया तिच्यायला सांगते कोणाला??? बारीक झालोय असं म्हणूनही अजून हत्ती एव्हढ्या बेडक्या आहेत दंडात त्याच्या :)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2009 - 10:34 am | परिकथेतील राजकुमार

हेहेहे च्यायला टार्‍या तुला शेवगा नाव सुचाव हे जरा आक्रीतच बर का ! मला किंवा धम्मुला सुचले असते तर ठिक होते ;) तुला लेका सुरण, बटाटा, भोपळा असले नाव सुचायला पाहिजे होते.
बाकी सुचना फर्मासच आहेत हो. भाजीवालीचे फोटुही डकवायची सुचना करायला हवी होती असे वाटते,

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

27 Apr 2009 - 11:55 am | पर्नल नेने मराठे

चुचु

पर्नल नेने मराठे's picture

27 Apr 2009 - 11:56 am | पर्नल नेने मराठे

चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2009 - 6:36 pm | परिकथेतील राजकुमार

चुचु किती वाळलीस ग :(

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

27 Apr 2009 - 6:40 pm | पर्नल नेने मराठे

:O :|
चुचु

बाकरवडी's picture

28 Apr 2009 - 5:59 pm | बाकरवडी

आज पहील्यांदा चुचुताईंना (आजींना) पाहीले. :H :H

ईते फोतू ताकतान थोदेशे तू खल्ले तली चलेल गं चुचु आजी !!!! =)) =)) =))

दात नसल्याने असं बोबले बोलते चुचुताई ! तेही आजच कळलं.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 11:34 am | विसोबा खेचर

छान लेख. आता बरेच लोक यावर प्रतिसादतील आणि टारूला समाधान भेटेल! :)

(प्रतिसादणारा) तात्या.

टारझन's picture

27 Apr 2009 - 7:57 pm | टारझन

अर्रे वा !! तात्यांनी माझ्या लेखाला चांगला लेख म्हंटलं दिन बन गया !!

- पुदा

दवबिन्दु's picture

27 Apr 2009 - 3:45 pm | दवबिन्दु