आयुर्वेदात विरुद्ध अन्न म्हणजे विरुद्ध 'रस' असलेले असा अर्थ आहे. याचा संदर्भ कोणी organic compounds शी लावला अस्ल्यास रोचक होइल. (विरुद्ध अन्न आपण सद्ध्या तरी सर्रास खातो.)
म्हंजे असे काबिनेशन जे शरिराला खराब असते. मी एैकलय कि चहात चपाती बिस्कित बुडवुन खावु नये, कारण चाहात दुध असते आनि चपाती बिस्किटमधे मीठ. दुध आनि मिठ एकत्त्र झाले कि दुध नास्ते.
लोणचं आणि दूध, मासे व दूध एकत्र खाऊ नये असं म्हणतात. फ्रूट सॅलेड करताना दुधात संत्री, सफरचंद, द्राक्षे यांसारखी फळे टाकू नये असे मी ऐकले आहे.
-ठकू www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
प्रकृतीला बिघडवू शकणारे, निसर्गनियमाविरुद्ध अन्न असा व्यापक अर्थ आहे.
जालावरती वैद्य बालाजी तांबे ह्यांच्या लिखाणाचा काही भाग मिळाला ह्यात त्यांनी विरुद्ध अन्न ह्या विषयी बरीच माहिती दिली आहे. http://abstractindia.blogspot.com/2008/05/blog-post_6935.html
दही + गूळ खाल्याने अंगावर कोड उठते असे आमच्या लहानपणी सांगितले जायचे. त्यामुळे विषाची परीक्षा कशाला, म्हणून मी शेव दहीपुरी खात नाही. कारण त्यात खजुर्+गुळाचे पाणी घातलेले असते. पण बाकी तरुण पिढी सर्रास खात असते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 5:11 am | पक्या
विरुध्द अन्न नक्कि काय ते माहित नाही . काही उदाहरणे माहित आहेत.
दूध आणि मासे , फळे + दूध एकत्र खाऊ नये असे म्हणतात. हे विरुध्द अन्न असल्याने.
25 Apr 2009 - 7:18 am | सुनील
फळे + दूध एकत्र खाऊ नये असे म्हणतात
अरेच्चा! फ्रूट सॅलड, मिल्कशेक वगैरे खायचे नाही म्हणता?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
25 Apr 2009 - 7:21 am | विसोबा खेचर
सुका जवळा आणि साबुदाणा खिचडी. एक उपासाला चालत नाही, एक चालते! :)
25 Apr 2009 - 7:24 am | Nile
आयुर्वेदात विरुद्ध अन्न म्हणजे विरुद्ध 'रस' असलेले असा अर्थ आहे. याचा संदर्भ कोणी organic compounds शी लावला अस्ल्यास रोचक होइल. (विरुद्ध अन्न आपण सद्ध्या तरी सर्रास खातो.)
25 Apr 2009 - 7:25 am | यन्ना _रास्कला
म्हंजे असे काबिनेशन जे शरिराला खराब असते. मी एैकलय कि चहात चपाती बिस्कित बुडवुन खावु नये, कारण चाहात दुध असते आनि चपाती बिस्किटमधे मीठ. दुध आनि मिठ एकत्त्र झाले कि दुध नास्ते.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्या इतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
25 Apr 2009 - 4:45 pm | कपिल काळे
दही + गूळ,
दूध+ फळे
मटन, चिकनच्या जेवणानंतर दूधाचे पदार्थ
25 Apr 2009 - 4:52 pm | अनंता
एखाद्या आहारतज्ञाला वा वैद्याला पुसा रे.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
25 Apr 2009 - 6:28 pm | शक्तिमान
हे मी सुद्धा ऐकले आहे
25 Apr 2009 - 4:49 pm | निशिगंध
सोमरस व त्यानंतर सामिष खाणे..
:))
थोडीशी गम्मत
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
25 Apr 2009 - 5:19 pm | ठकू
लोणचं आणि दूध, मासे व दूध एकत्र खाऊ नये असं म्हणतात. फ्रूट सॅलेड करताना दुधात संत्री, सफरचंद, द्राक्षे यांसारखी फळे टाकू नये असे मी ऐकले आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
25 Apr 2009 - 9:37 pm | देवदत्त
मांस व दूध एकत्र खाऊ नये असे म्हणतात. आणखी आठवत नाहीत.
तुम्ही म्हणता तसे विरुद्ध अन्न नसेल पण एक पाहिलेले उदाहरण म्हणजे, पिझ्झा हट् मध्ये चीझ पिझ्झा सोबत डाएट कोक (की पेप्सी) घेणे. ;)
26 Apr 2009 - 9:32 am | चतुरंग
प्रकृतीला बिघडवू शकणारे, निसर्गनियमाविरुद्ध अन्न असा व्यापक अर्थ आहे.
जालावरती वैद्य बालाजी तांबे ह्यांच्या लिखाणाचा काही भाग मिळाला ह्यात त्यांनी विरुद्ध अन्न ह्या विषयी बरीच माहिती दिली आहे.
http://abstractindia.blogspot.com/2008/05/blog-post_6935.html
चतुरंग
26 Apr 2009 - 10:30 am | तिमा
दही + गूळ खाल्याने अंगावर कोड उठते असे आमच्या लहानपणी सांगितले जायचे. त्यामुळे विषाची परीक्षा कशाला, म्हणून मी शेव दहीपुरी खात नाही. कारण त्यात खजुर्+गुळाचे पाणी घातलेले असते. पण बाकी तरुण पिढी सर्रास खात असते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
26 Apr 2009 - 10:46 am | अभिज्ञ
मासे व दहि एकत्र खाऊ नये असे म्हणतात.त्याने अंगावर पांढरे डाग उठतात म्हणे.
परंतु बंगाल्यांमधे "दोईमाछ" नावाचाच एक प्रकार असतो.
अभिज्ञ.
अवांतर :
ज्यांना बाहेरची परवडत नसेल त्यांनी "ताक व गुळ" एकत्र ट्राय करून पहायला हरकत नाहि.
नशा चांगली चढते.;)
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
26 Apr 2009 - 10:55 am | आंबोळी
ज्यांना बाहेरची परवडत नसेल त्यांनी "ताक व गुळ" एकत्र ट्राय करून पहायला हरकत नाहि.
नशा चांगली चढते.
रेसिपी मिळेल काय?
तोंडाला वास न येता नशा मिळणार असेल तर त्या परते सुख ते कोणते?
प्रो.आंबोळी
26 Apr 2009 - 4:31 pm | दशानन
सहमत, बाकी चर्चा बकवास ! ;)
थोडेसं नवीन !
26 Apr 2009 - 11:34 am | अविनाशकुलकर्णी
व्हिस्किचा पेग व मिठ हे विरुध्ध पेय आहे
26 Apr 2009 - 7:19 pm | काळा डॉन
आयोडेक्स आणि ब्रेडची स्लाइस हे विरुध अन्न आहे.
स्वस्तात नशा करायची असेल तर मात्र चांगली चढते.