युक्रेनवरून तणाव

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
12 Feb 2022 - 9:21 am
गाभा: 

सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.

युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.

नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.

नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2022 - 10:14 am | प्रसाद गोडबोले

युध्द व्हायला हवे !

ह्या कोव्हिड मुळे जवळपास सर्वच जगात सर्वच देशांनी एक्स्ट्रा लिक्विडीटी पंप केलेली आहे, अमेरिकेने तर काही ट्रिलियन डॉलर्स स्टिम्युलस चेक्स , पीपीपी अन अन्य सबसीडींच्या माध्यमातुन वाटले आहेत . शिवाय इन्टरेस्ट रेट्स सुध्दा लो लेव्हल ला आहेत अन सर्वच जण घाबरत आहेत की इन्टरेस्ट रेट्स वाढवले तर एकॉनॉमी ढासळेल. अन रेट्स आहेत त्या लेव्हला ठेवले तर लाँगटर्म स्टॅग्फ्लेशन चा धोका आहे. अमेरिकेत आधीच भयंकर इन्फ्लेशन झालेले आहे. त्या तुलनेने भारतात समहाऊ आपण अजुन कुशन्ड आहोत. (तरी रडाणारे राजकीय पक्ष रडत आहेतच ते अलहिदा.)

एकुणच जगाची आर्थिक स्थिती गंभीर आहे. युध्द झाले तर पेट्रोल सह जवळपास सर्वच गोष्टी अचानक वाढतील , काहीकाळ इन्फ्लेशन भयंकर वाढेल, पण युध्दानंतर सर्व नॉर्मल ला आले , सुरळीत झाले की अर्थचक्राला गती मिळेल ह्यात शंका नाही !

Even a broken window creates an employment for glass manufacturing!

त्यामुळे एक व्यवस्थित युध्द व्हायला हवे , व्यवस्थित , शीतयुध्द वगैरे नको , त्याने आर्थिक परिस्थिती अजुन चिघळेल !

नक्की कोठे युध्द व्ह्यायला हवे?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Feb 2022 - 12:22 pm | रावसाहेब चिंगभूतकर

आमच्या बाजूच्या हौसिंग सोसायटीने न्यूक्लियर वेपन्स चा साठा करून ठेवला आहे ही बातमी अमेरिकन अध्यक्षांपर्यंत पोचवता येईल काय? ट्रम्प च्या वेळी सोपं होतं. डायरेक्ट ट्विट करता येत होतं.

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2022 - 1:18 pm | प्रसाद गोडबोले

प्रतिसादावरुन बौध्दिक कुवत दाखवुन दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे =))))

कासव's picture

12 Feb 2022 - 5:57 pm | कासव

नक्कीच. मला तर वाटतं मोठ युद्ध (महायुद्ध) व्हायला हवे.
ह्याने मोठे मासे एकमेकात भांडून मरतील. लहान मासे तसेही मरतील. आपल्यासारख्या मध्यम मस्याचे पण हाल हाल होतील पण शेवटी सगळ्यांना अक्कल तरी येईल.

शाम भागवत's picture

12 Feb 2022 - 6:42 pm | शाम भागवत

या तिसर्‍या युध्दात जर मानवजातच नष्ट झाली तर अक्कल नक्की कुणाला येईल?
:)

कारण आता जर युध्द झाले तर सर्वांची एकच स्लोगन असेल.
मला जिंकता आलं नाही तर मी निदान दुसर्‍या कुणालाही जिंकू देणार नाही.
आणि हाच विचार सर्वनाश घडवून आणू शकतो.
असो.

हे असले वैफल्यग्रस्त बोलणे, ह्याला काहीही अर्थ नाही. काय अक्कल अपेक्षित आहे आणि कशा बद्दल ? सध्याचा मानवजातीचा काळ सर्वांत शांततेचा आहे, अभूतपूर्ण शांतीचा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या सध्या लोकशाहीत आहे, अन्नाची कमतरता नाही इत्यादी इत्यादी इत्यादी. अत्याधिक हिंसा होऊन आलेले शहाणपण काय फायद्याचे आहे ? मेलेले शव पाण्यांत वर येते त्याला पोहणे म्हणत नाहीत आणि त्याचा त्या शवाला काहीही फायदा नाही.

कॉमी's picture

14 Feb 2022 - 5:13 pm | कॉमी

सहमत.

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2022 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले

युध्द व्हायला हवे !

>>>

अब आयेगा मजा !!

मदनबाण's picture

12 Feb 2022 - 11:44 am | मदनबाण

कर्जबाजारी अमेरिका [ ३० ट्रिलियन कर्जाचा बोजा असलेला नवा टप्पा हल्लीच ओलांडला आहे. ] या सगळ्या प्रकरात सारख्या काड्या करत आहे. ब्लुमबर्ग ने ४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केले अशी फेक न्यु़ज त्यांच्या पोर्टलवर बाराच काळ ठेवली होती, नंतर मग मागे घेतली. स्वत:ची अर्थव्यवस्था आणि चलन गाळात जाताना जगाचे लक्ष युद्धाकडेच जावे यासाठी सगळी खटपट.

काळ्या समुद्रात रशियन नेव्ही वॉर ड्रिल्स करणार आहे म्हणे ! तर बेलारुस मध्ये देखील अशीच ड्रील्स होतील.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

वैश्विक चलन म्हणुन असलेली डॉलरला मान्यता जात नाही तोपर्यंत अमेरीकेचा कर्जबाजारीपण वाढतच जाणार.

दुवे:
https://www.thebalance.com/world-currency-3305931
https://www.thebalance.com/dollar-strength-why-is-it-so-strong-right-now...
https://foreignpolicy.com/2021/01/15/rise-fall-united-states-financial-e...

कर्जबाजारी अमेरिका [ ३० ट्रिलियन कर्जाचा बोजा असलेला नवा टप्पा हल्लीच ओलांडला आहे. ]

हे हा वादविवाद वाटतो इतका सरळ नाही.

इथे काही मी दुवे दिले आहेत.
https://misalpav.com/comment/1133244#comment-1133244

रशियाचे आणि युरोपचे वादविवाद होणे, अमेरीकेसाठी चांगले आहे. सध्या कोणत्याही ठिकाणी मोठे युध्द सुरु नसल्याने, शस्रास्त्रे विकणे, रशियाचा गॅस ऐवजी स्वत:चा गॅस विकणे इत्यादीसाठी चांगले आहे.

इतर दुवे:
https://www.vox.com/22881709/nord-stream-2-russia-ukraine-germany-united...
https://www.reuters.com/business/energy/us-european-lawmakers-issue-stat...
https://www.cleanenergywire.org/factsheets/gas-pipeline-nord-stream-2-li...

जेम्स वांड's picture

12 Feb 2022 - 6:58 pm | जेम्स वांड

सो मेनी दत्तोबा कदम्स, इज धिस मिसळपाव ऑर बेनसन अँड जानसन कंपनी ऑफ बॅलार्ड इस्टेट मुंबई

&#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315

त्यांना शहर,गाव विभागून ह्यांची वस्ती वेगळी करावी .
आणि सहा मशीन त्यांच्या वस्ती चा वीज पुरवठा,पाणी पुरवठा,खाद्य पुरवठा,औषध पुरवठा बंद करावा.
त्यांना रोजगार,पगार,बँक सेवा काहीच मिळणार नाही ह्याचा बंदोबस्त करावा.
आणि सीमा बंद कराव्यात.
सहा महिन्यांत तेथील मागणी वाढेल आणि त्या वस्त्या श्रीमंत होईल.
हा प्रयोग करावाच.

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2022 - 11:12 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही नक्की किती आयडी काढुन ठेवलेत हो ? =))))

sunil kachure's picture

16 Feb 2022 - 1:05 pm | sunil kachure

युक्रेन चे जे राजदूत आहेत त्यांनी भारतातील अती शहाण्या मीडिया वर ( आणि ही अती शहाणी मीडिया मध्ये bjp समर्थक च मीडिया आहे)आरोप केला आहे.
ते वेगळे सभ्य भाषेत बोलले पण भारतीय भाषेत.
भारतीय मीडिया नी (bjp समर्थक अविचारी मीडिया) बकवास करू नये मूर्ख सारखे परिस्थिती चे वर्णन करू नये
युक्रेन मधील स्थिती खराब नाही
रशिया शी असलेले आमचे मतभेद आम्ही शांतेत चर्चे नी सोडवू.

राजेश भाऊ, कोणी कोणी काय काय बातमी दिली ते पम सांगा जर एकदा..

आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र .

युक्रेनियन संकटाचा युक्रेनशी काहीही संबंध नाही. हे जर्मनीबद्दल आहे आणि विशेषतः, नॉर्ड स्ट्रीम 2 नावाची जर्मनीला रशियाशी जोडणारी जी पाईपलाईन आहे त्याच्याशी संबंधीत आहे. वॉशिंग्टनला या पाइपलाइन मुळे युरोपमधील आपले प्रभूत्व धोक्यात येईल असे वाटते आणि त्यासाठी जेव्हां संधी मिळेल तेव्हां हा प्रयत्न अयशस्वी व्हावा असं काहीतरी करण्याचा प्रयास करते.

असे असले तरी, नॉर्ड स्ट्रीमची प्रगती चालूच राहीली व आता तर ती पूर्णपणे कार्यरत व्हायला तयार झाली आहे. एकदा जर्मन नियामकांनी अंतिम प्रमाणपत्र प्रदान केले की, गॅस वितरण सुरू होईल. असे झाले तर जर्मन घरमालक आणि व्यवसायांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा विश्वासार्ह स्त्रोत असेल तर रशियाच्या गॅसच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. ही दोन्ही पक्षांसाठी जमेची बाजू आहे.

या घडामोडींबद्दल अमेरिकन परराष्ट्र धोरण अनुकूल नाही. जर्मनीने रशियन गॅसवर अधिक अवलंबून राहावे असे त्यांना वाटत नाही कारण फायदेशीर व्यापार विश्वास निर्माण करतो आणि विश्वासामुळे या व्यापाराचा विस्तार होतो. जसजसे संबंध विश्वासार्ह होत जातात, तसतसे व्यापारातील अडथळे दूर होतात, नियम सुलभ होतात, प्रवास आणि पर्यटन वाढते आणि एक नवीन सुरक्षा संरचना विकसित होते.

जर असे झाले तर, जर्मनी आणि रशिया हे मित्र आणि व्यापारी भागीदार बनतील व मग जर्मनीला अमेरिकेच्या लष्करी तळांची गरज नाही, अमेरिकेने बनवलेल्या महागड्या शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्र यंत्रणेची गरज नाही आणि नाटोचीही गरज नाही.

परकीय चलनातील हिशोब ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी यूएस डॉलरमध्ये व्यवहार करण्याची किंवा यूएस ट्रेझरींचा साठा करण्याची आवश्यकता नाही. व्यावसायिक भागीदारांमधील व्यवहार त्यांच्या स्वतःच्या चलनात केले जाऊ शकतात ज्यामुळे डॉलरच्या मूल्यात तीव्र घट आणि आर्थिक शक्तीमध्ये नाट्यमय बदल घडून येऊ शकतात.

म्हणूनच बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला विरोध करते. ही केवळ पाइपलाइन नाही, तर ती भविष्यात डोकावयाची खिडकी आहे. त्यातून असं भविष्य दिसतंय की, ज्यामध्ये युरोप आणि आशिया एका मोठ्या मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांचे परस्पर सामर्थ्य आणि समृद्धी वाढते आहे आणि यूएस फक्त हे हात चोळत बघत बसली आहे.

अमेरिकेने गेल्या 75 वर्षांपासून जर्मनी व युरोपची देखरेख केली आहे. जर्मन-रशिया युतीने या महासत्तेच्या ऱ्हासाचा जणू संदेश दिला आहे. सध्याच्या अमेरिकेच्या विश्वासाला जो तडा जाऊ पाहतो आहे त्यासाठी हे आणखीनच त्रासाचे आहे.

म्हणूनच नॉर्ड स्ट्रीमची योजना तडीस जाऊ नये आणि जर्मनीला आपल्याच कह्यात ठेवण्यासाठी वॉशिंग्टनने सर्व काही करण्याचा निर्धार केला आहे. हा अमेरिकेच्या जणू काही जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे.

इथे मग युक्रेन चित्रात येते. नॉर्ड स्ट्रीम उधळण्यासाठी, जर्मनी आणि रशिया यांच्यात फूट पाडण्यासाठी युक्रेन हे वॉशिंग्टनचे ‘निवडलेले एक शस्त्र आहे. ही रणनीती यूएस फॉरेन पॉलिसी हँडबुकच्या रुब्रिक अंतर्गत पृष्ठ एकवरून घेतली आहे: फूट पाडा आणि राज्य करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------
ही मात्र मी माझ्या डोक्याने चालवलेली टिपण्णी आहे.
रशिया असो की अमेरिका, दोघेही लबाड आहेत, स्वार्थी आहेत. कोणाचे भले व्हावे म्हणून ते काही करत नाहीत. तर फक्त स्वत:चे हित साधण्यासाठी जगाच्या कल्याणाची भाषा बोलत असतात.

इतकेच नव्हे तर युक्रेनने गॅस पाईपसाठी वाढीव दर मागीतला म्हणूनच ही दुसरी पाइपलाईन टाकायची वेळ आली असे रशिया/जर्मनी म्हणतात. हा दर वाढवणे प्रकार सुध्दा अमेरिकेच्या सुपिक डोक्यातून आलेला असू शकतो.

किंवा युक्रेनला वाढीव दर दिला तर सर्व अर्थकारणच बिनसू शकते. शिवाय दर वाढवणे हा युक्रेनचा हक्कच आहे असा काहीसा अर्थ यातून काढला जाऊन, भविष्यात युक्रेन दर आणखीही वाढवू शकते. ही नवीनच टांगती तलवार स्वतःवर स्वतःहून कोण लादून घेणार? त्यासाठीही हे सगळं चालू असेल.
सगळं स्वार्थी जगाचे खेळ आहेत.
काय खरं काय खोटं कसं ओळखणार?
असो.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

17 Feb 2022 - 12:07 am | ॲबसेंट माइंडेड ...

प्रतिसाद आवडला.

इरसाल's picture

18 Feb 2022 - 1:57 pm | इरसाल

या वरच्या गडबडीत माझ्या वनप्लसच्या "नॉर्ड २ " या मोबाईलला काही धोका नाही नां?
इति. श्री. श्री. श्री. १८८ (२०१६ रा. रा. रा. )

सध्या रशिया विरुद्ध नाटो जो तणाव आहे त्याला नॉर्दस्ट्रीम २ कारणीभूत नाही. नॉर्दस्ट्रीम २ ला विरोध हा २०११ पासून आहे आणि जर्मनीने अमेरिकेला इथे न जुमानता प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी युद्धाचे बिगुल अमेरिका वाजवू पाहत आहे असे अजिबात नाही.

१. रशियाने युक्रेन सीमेवर प्रचंड सैन्य आणून ठेवले आहे. साधारण १४०,००० सैनिक ह्या सीमेवर सध्या तैनात आहे. नवीन पूल, टँक्स वगैरे सर्वत्र आहेत हे उपग्रहावरील चित्रांतून स्पष्ट दिसत आहे.

२. रशियन सैनिकांची जमवा जमव हि खूप आधीपासून सुरु होती आणि कदाचित त्याचाच वास लागून बायडन ह्यांनी घाई घाईने अफगाणिस्तानातील आपली मोहीम बंद केली असावी असा कयास आहे.

३. रशियाचे ६०% निर्यात उत्पन्न हे शेवटी फॉसिल ऊर्जास्रोतातून येते. हे ऊर्जास्रोत हळू हळू गायब होत जाणार आहेत आणि त्यांची जागा नवीन स्रोत घेणार आहेत. रशियाची खेळी हि दूरगामी फायद्याची नसून त्याचा फायदा फार तर २०-३० वर्षेच त्यांना होईल. जर्मनीलाही हे ठाऊक आहे आणि अमेरिकेलाही.

४. युरोप रशियावर अवलंबून नाही तर रशिया युरोप च्या आयातीवर अवलंबून आहे. रशियन आर्थिक व्यवस्थेतील हि एक महत्वाची कमजोरी आहे आणि ती दूर होणे शक्य नाही. नॉर्दस्ट्रीम २ बंद झाली तरी युरोप ला खूप त्रास होतील हे खरे असले तरी, तो त्रास कमी करण्यासाठी नॉर्वे, टर्की, ऑस्ट्रेलिया, कतार इत्यादींनी कंबर कसली आहे. "वातावरण बदल" ह्या ढोंगाच्या खाली नॉर्वे, जर्मनीने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली म्हणून हा प्रसंग त्याच्यावर ओढवला आहे.

५. पुतीन सध्या काही तरी प्लॅन करत आहेत हे १००% खरे आहे. बायडन ह्यांची लोकप्रियता अमेरिकेत खूपच खालावली आहे त्याशिवाय त्यांची मती ठीक नाही असे आरोप केले जातात. कमला ह्यांच्यावर कुणाचाच विश्वास नाही. आधी ट्रम्प आणि आता अफगाणिस्तान ह्यांच्यामुळे नॅटो संबंध ताणले गेले आहेत. ह्या सर्वांचा फायदा घेऊन युक्रेन वर आक्रमण नाही तर किमान युक्रेन ला अस्थिर करणे हा पुतीन ह्यांचा डाव असू शकतो.

६. बायडन ह्यांनी पाठीचा कणा दाखवून रशियाविरोधांत युद्धाची तयारी सुरु केली, त्यांच्या राजकीय विरोधकांनी सुद्धा त्यांत खो घातला नाही उलट बायडन हे गरजेपेक्षा मऊ आहेत असे म्हटले. जर्मनी आणि uk ने अमेरिकेच्या री मध्ये री ओढत युद्धाची तयारी केली.

अनेकदा गॅस किंवा तेल वगैरे साठी अमेरिका युद्धाची आखणी अमेरिका करते असे म्हटले जाते पण त्यांत तथ्य नाही. बहुतांशी युद्धाची आखणी अनेक विविध कारणांनी केली जाते आणि तेल कंपन्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. तो निव्वळ एक छोटासा घटक आहे. रशिया चे एकूण गॅस एक्स्पोर्ट बिल आहे २५-३० बिलियन. असले शुल्लक आकडे अमेरिकेच्या खिजगणतीत सुद्धा नाही. फक्त काही रणगाडे इकडून तितके न्यायला अमेरिकेला तितका खर्च येईल. त्यामुळे २५-५० बिलियन साठी युद्ध बायडन करतील शक्य नाही. डॉलर चलन म्हणून बदलण्याची लायकी रुबल ची नाही त्यामुळे तोही अँगल इथे नाही.

पुतीन ह्यांना वेळीच काबूत आणणे हा नाटो चा हेतू वाटतो.

पुढे काय होते हे पाहणे मनोरंजक ठरेल ! भारताने ह्यांत तटस्थ भूमिका घेणेच युक्तीचे ठरेल.

Trump's picture

19 Feb 2022 - 10:34 am | Trump

संदर्भ द्या

"वातावरण बदल" ह्या ढोंगाच्या खाली नॉर्वे, जर्मनीने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली म्हणून हा प्रसंग त्याच्यावर ओढवला आहे.

रशियन नैसर्गिक वायु निर्यातीची मुल्य ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर आहे.
४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर https://tradingeconomics.com/russia/exports-of-natural-gas
५४.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर https://www.reuters.com/markets/europe/russias-oil-gas-revenue-windfall-...

कृपया तुमचे संदर्भ द्या.

रशिया चे एकूण गॅस एक्स्पोर्ट बिल आहे २५-३० बिलियन. असले शुल्लक आकडे अमेरिकेच्या खिजगणतीत सुद्धा नाही. फक्त काही रणगाडे इकडून तितके न्यायला अमेरिकेला तितका खर्च येईल. त्यामुळे २५-५० बिलियन साठी युद्ध बायडन करतील शक्य नाही. डॉलर चलन म्हणून बदलण्याची लायकी रुबल ची नाही त्यामुळे तोही अँगल इथे नाही.

असे श्री पुतीन का करतील? त्यातुन त्यांना काय मिळेल?

ह्या सर्वांचा फायदा घेऊन युक्रेन वर आक्रमण नाही तर किमान युक्रेन ला अस्थिर करणे हा पुतीन ह्यांचा डाव असू शकतो.

साहना's picture

22 Feb 2022 - 3:07 am | साहना

> संदर्भ द्या?

का ? त्यातून काय साध्य होणार आहे ? तुम्हाला आक्षेप असल्यास तुम्ही प्रतिवाद लिहू शकता !

> ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर आहे.

मूळ मुद्दा तोच आहे. युद्ध करण्याच्या कारणासाठी हि किमंत फारच शुल्लक आहे ! आणि हि फक्त आय आहे, नफा सुद्धा नाही. नफा आणखीन कमी असेल.

दुसरी गोष्ट म्हणजे लॉन्ग टर्म च्या दृष्टिकोनातून नैसर्गिक वायूचे महत्व दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. इथे कुठलेही राष्ट्र जास्त रिस्क घेणार नाही.

> असे श्री पुतीन का करतील? त्यातुन त्यांना काय मिळेल?

https://youtu.be/xmqVfiFGpOA?t=853

ह्या काही मुलाखती आहेत त्या पहा. "पुतीन ला काय पाहिजे ?" ह्या विषयावर Nick Clegg ह्यांचे स्पष्टीकरण एका.

निनाद's picture

22 Feb 2022 - 9:16 am | निनाद

शुल्लक? क्षुल्लक असा शब्द अपेक्षित आहे का?
शुल्लक म्हणजे काय याची कल्पना नाही.

क्षुल्लक म्हणजे नगण्य अशा अर्थाचा हा शब्द आहे.

शब्दकौमुदी प्रमाणे याचा अर्थः

टीचभर, गुंजभर, चिमूटभर, सूक्ष्म, इवलासा, बिंदुसमान, नखाएवढा, अल्प, लहान, कमी, एवढासाच, उगीच नांवाला, जवळ जवळ नाहींच, एवढातेवढा, तुटके तोटके, अगण्य, क्षुद्र, तुच्छ, नीच, फडतूस, भिक्कार, ऐरेगैरे, फालतू, यःकत्रित, गण्यागंपू, कोणत्या झाडाचा पाला? कवडी किंमतीची, एक नया पैसा किंमत होणार नाहीं, फुटकी कवडी कोणी देणार नाहीं, चार चव्वल किंमत नाहीं, दीड दमडीची सस्ती चीज.

साहना's picture

25 Feb 2022 - 1:34 am | साहना

क्षुल्लक

मी वातावरण बदल नाकारणार्‍यांबद्दल प्रतिवाद करणार नाही. बरेचसे लिहिले गेले आहे.

का ? त्यातून काय साध्य होणार आहे ? तुम्हाला आक्षेप असल्यास तुम्ही प्रतिवाद लिहू शकता !

धन्यवाद. वायुवाहिनी हे तात्कालीक कारण आहे. मुळ कारण श्री पुतीन आणि चीन यांच्या भविष्यातील महत्वाकांक्षांना प्रतिबंध घालणे हे आहे.
जे निक केग्ग यांनी सांगितले त्यात तथ्य आहे.
टिप: जे कोणी यजमान (host) (नाव विसरलो मी आता) आहेत, ते कमालीचे वंशभेदी आणि white saviour प्रकारचे आहेत.

ह्या काही मुलाखती आहेत त्या पहा. "पुतीन ला काय पाहिजे ?" ह्या विषयावर Nick Clegg ह्यांचे स्पष्टीकरण एका.

कॉमी's picture

24 Feb 2022 - 5:46 pm | कॉमी

ट्रम्पजी, प्लिज कोटेशन वर आणि तुमचे मत/प्रतिवाद खाली देत जावा. आधी तुमची टिप्पणी वाचून काही अर्थ लागत नाही.

शाम भागवत's picture

24 Feb 2022 - 6:27 pm | शाम भागवत

:)
खरंय.
जर तुम्ही गुगल भाषांतरावर एक हात फिरवणार नसाल तर इंग्रजी क्वोट प्रथम द्या.

मराठीत लिहिलेलं कुठेही असलं तर मलातरी काही फरक पडत नाहीत. माझे डोळे प्रथम मराठीतलंच प्रथम शोधून काढतात व प्रथम तेच वाचलं जातं. गुगल भाषांतराची मला सवय आहे व मी नेहमीच त्यावर शेवटचा हात फिरवून मग पुढे पाठवत असल्याने मला अर्थही चटकन कळतो. :)

नगरी's picture

6 Mar 2022 - 3:52 pm | नगरी
सुबोध खरे's picture

17 Feb 2022 - 10:42 am | सुबोध खरे

रशिया असो की अमेरिका, दोघेही लबाड आहेत, स्वार्थी आहेत. कोणाचे भले व्हावे म्हणून ते काही करत नाहीत. तर फक्त स्वत:चे हित साधण्यासाठी जगाच्या कल्याणाची भाषा बोलत असतात.

जगात सर्वच देश तसे आहेत. त्यात कोणीही शुद्ध परमार्थ शोधू नये.

तसे कशाला सर्व माणसे आणि प्राणी सुद्धा.

बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला विरोध करते.

बिडेनच नव्हे तर कोणतेही अमेरिकी प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला विरोध करते.

कारण साधे आहे जर जर्मनीने रशिया सोबतचा तेल/ गॅसचा व्यापार युरो किंवा रुबल्स मध्ये सुरु केला आणि त्याचे इतर देशांनी अनुकरण केले तर अमेरिकी डॉलर्स ची किंमत कागदाच्या कपट्यासारखी होईल.

आणि कर्जावर दिवाळी करणारी अमेरिका दिवाळ्यात निघेल. अर्थात असे काही न होऊ देण्यात अमेरिका कोणतीही कासार सोडणार नाही हे उघडच आहे.

मुळात पेट्रोलियम उत्पादने डॉलर्स देऊन का विकत घ्यायची हा मूलभूत प्रश्न आहे?

हि अमेरिकेची दंडेली च आहे

मुळ येथे आहे. फियाट चलन.

The Bretton Woods agreement of 1944 established a new international monetary system. It replaced the gold standard with the U.S. dollar as the global currency. By so doing, it established America as the dominant power in the world economy. After the agreement was signed, America was the only country with the ability to print dollars.
https://www.thebalance.com/bretton-woods-system-and-1944-agreement-3306133
https://en.wikipedia.org/wiki/Bretton_Woods_system

----

Fiat money became the norm after U.S. President Richard Nixon decided to abandon the gold standard in 1971. By doing so, he announced that the dollar was no longer convertible into gold.

https://www.investopedia.com/ask/answers/041615/what-difference-between-...

मुळात पेट्रोलियम उत्पादने डॉलर्स देऊन का विकत घ्यायची हा मूलभूत प्रश्न आहे?

सुबोध खरे's picture

17 Feb 2022 - 12:20 pm | सुबोध खरे

हि अमेरिकेची दंडेली च आहे

आता मुक्त जग आणि Leader of the free world वाले लपुन बसतील.

sunil kachure's picture

17 Feb 2022 - 1:40 pm | sunil kachure

Trump तुमचे मत आवडले एकदम स्पष्ट आहे
किंवा कोणत्या ही विचारधारेचे आंधळे हमाल तुम्ही नाही आहात.
मुक्त व्यापार,मुक्त अर्थ व्यवस्था ह्यांची वकिली करणारे .
अमेरिका च नाही तर देश खऱ्या रुपात त्याच्या मध्ये अडथळा आणू स्वतःचा फायदा होण्यासाठी कोणी कोणाला काय विकावे,कोणी काय कर लावावेत.कोणी कशावर सबसिडी द्यावी हे ठरवता त.
आणि मुक्त अर्थ व्यवस्थेचे भोई , हमाल इथे मात्र तोंड बंद करून असतात.
कोणाला पटले नाही तर चालेल पण सत्य व्यक्त करण्याची हिंमत स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या जीवात असलीच पाहिजे.

अजि मी ब्रह्म पाहिले...

चक्क श्री सुबोध खरे, श्री ट्रंप, श्री sunil kachure यांचे एकमत झाले.

Trump's picture

19 Feb 2022 - 10:37 am | Trump

Here’s How Reserve Currencies Have Evolved Over 120 Years
https://www.visualcapitalist.com/cp/how-reserve-currencies-evolved-over-...

Trump's picture

6 Mar 2022 - 8:03 pm | Trump
sunil kachure's picture

17 Feb 2022 - 12:35 pm | sunil kachure

मुक्त व्यापार , खुला व्यापार ह्याचे महत्व अमेरिका पाठीराखे भारताला सांगत असतात.
स्वतः अमेरिका सर्व उपाय करून,दमदाटी करून मुक्त व्यापार होवू देत नाही.
असे युक्रेन,अमेरिका,रशिया ,जर्मनी ह्यांच्या उदाहरण वरून वाटत.

टर्मीनेटर's picture

17 Feb 2022 - 5:39 pm | टर्मीनेटर

चांगला लेख आणि काही चांगले प्रतिसाद.

तपशीलात थोडा बदल सुचवतो. लेखात म्हंटले आहे कि

युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे.

नॉर्ड स्ट्रीम-1 (आणि नॉर्ड स्ट्रीम-२) पाईपलाईन युक्रेन मार्गे जात नसून बाल्टिक समुद्रातून जाते.

नॉर्ड स्ट्रीम map

युक्रेन मधून युरोपला होणारा गॅस पुरवठा अन्य पाईपलाईन्स मधून होतो. EU साठी पाठवण्यात येणाऱ्या गॅस मध्ये युक्रेन हेराफेरी करत असल्याची रशियाची तक्रारही तशी जुनी आहे. जवळपास दोन दशकांपासून त्यांच्यात अनेक कारणांवरून कुरबुरी सुरु आहेत.
युक्रेन कडून मागितले जाणारे वाढीव ट्रांझिट शुल्क हा मुद्दाही महत्वाचा आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये काम पूर्ण झालेल्या नॉर्ड स्ट्रीम २ पाईपलाईनचा वापर लवकरात लवकर सुरु करून युरोपला युक्रेनमार्गे होणारा गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे, पण अमेरिका त्यात काड्या घालत आहे.

सध्या युक्रेन सीमेवरची तणावसदृश्य परिस्थिती ही नाटो मध्ये युक्रेनचा समावेश होऊ नये ह्यासाठी पुतीन ह्यांच्या दबावतंत्राचा भाग असून त्या आडून नॉर्ड स्ट्रीम २ चा वापर सुरु करण्याच्या दृष्टीने असलेले अडथळे दूर करणे हा उद्देशही असू शकतो.
सध्या युरोपात प्रचंड वाढलेल्या नैसर्गिक वायुच्या किमती बघितल्यावर युरोपीयन देशही ही पाईपलाईन लवकरात लवकर सुरु व्हावी ह्यासाठी प्रयत्न करतील, त्यासाठी रशियाची बाजू घेतील असे माझे वैयक्तिक मत!

पराग१२२६३'s picture

17 Feb 2022 - 9:23 pm | पराग१२२६३

धन्यवाद टर्मीनेटर, अभिप्रायाबद्दल आणि लेखात झालेल्या चुकीच्या उल्लेखाकडे लक्ष वेधल्याबद्दल.

sunil kachure's picture

19 Feb 2022 - 11:49 am | sunil kachure

दोन्ही सांड अमेरिका आणि रशिया स्वार्थ साधण्यासाठी च युद्ध करण्या पर्यंत जात आहेत.
अमेरिकेचा इतिहास बघितला तर अमेरिका एशियन देशात खूप हस्तक्षेप करते.
मग तो इराण,इराक,अफगाण, रशिया, व्हिएतनाम,भारत,पाकिस्तान.
अशी खूप मोठी देशांची लिस्ट आहे.
युक्रेन वादात युरोपियन राष्ट्र ना विरोध करण्यात अशियन देशांनी एकजूट दाखवावी.
स्वार्थ शेवटी सर्व च बघणार
त्या साठी चीन शी हात मिळवणी करायला लागली तरी काही हरकत नसावी.

सुबोध खरे's picture

19 Feb 2022 - 11:56 am | सुबोध खरे

युक्रेन वादात युरोपियन राष्ट्र ना विरोध करण्यात अशियन देशांनी एकजूट दाखवावी.

म्हणजे काय काय आणि कसं कसं ते डिटेलवार मध्ये सांगा बघू

sunil kachure's picture

19 Feb 2022 - 12:23 pm | sunil kachure

आशिया खंडातील देशांनी इतकेच करावे की हे सर्व देश युरोपियन देशांची बाजारपेठ बनू नयेत..
अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्र आशिया खंडात सैनिकी हस्तक शेप करत असते त्याचा मूळ हेतू बाजार पेठ वाढवणे हाच असतो.
त्या मुळावर च घाव घातला पाहिजे.
व्यापारी संबंध आशिया खंडातील देशांनी मजबूत करावेत.

सुबोध खरे's picture

19 Feb 2022 - 6:18 pm | सुबोध खरे

आशिया खंडातील देशांनी इतकेच करावे की हे सर्व देश युरोपियन देशांची बाजारपेठ बनू नयेत.

म्हणजे काय काय आणि कसं कसं ते डिटेलवार मध्ये सांगा बघू

sunil kachure's picture

19 Feb 2022 - 12:02 pm | sunil kachure

जसा नेहमीच अमेरिकेची पाठराखण करत असतो मग तिथे त्याचा संबंध असो किंवा नसो.
युरोपियन राष्ट्र एकमेका विरुद्ध कधी उभी राहत नाहीत पण आशिया,आफ्रिका,ह्या भागातील देशांना आपले मंडलिक बनवण्यासाठी मात्र एकत्र येतात.
नेहमी युद्ध ची स्थिती च ह्या भागात राहावी म्हणून शस्त्र अस्त्र ह्या देशात विकणे,नेहमीच ह्यांच्यात वाद निर्माण होईल अशीच भूमिका घेणे.
हे सर्व प्रकार ते करत असतात.
रशिया ही लष्करी महासत्ता म्हणून टिकलीच पाहिजे ,त्या मुळे समतोल राहील.

कॉमी's picture

22 Feb 2022 - 8:59 am | कॉमी

तथ्य- युक्रेनमधले रशियन भाषिक लोक युक्रेन सोडून रशियात जात आहेत.

रशियन अर्थ- "रेफ्युजी लोक युक्रेनमधून रशियात येतायत तरी पाश्चिमात्य मिडियानुसार रशियाच आक्रमक आहे!"

अमेरिकन/युक्रेनियन अर्थ- "इथून निघून जाण्यासाठी रशियन सरकारकडून काहीतरी संदेश आल्याशिवाय ही लोकं गेलीच नसती. ही लोकं निघातायत ही पुढील आक्रमणाची धोक्याची घंटा आहे."

पुतीनने युक्रेनच्या डोनेस्क आणि लुहान या रशियन वर्चस्ववादी भागांना स्वतंत्र म्हणून रेकग्नाइझ केले आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

22 Feb 2022 - 10:38 am | रावसाहेब चिंगभूतकर

रशियावर आर्थिक निर्बंध लावण्याची तयारी अमेरिका आणि युरोपकडून सुरू झाली आहे. माझी काळजी फक्त S400 ताब्यात येण्याबद्दल आणि सुपर सुखोई अपग्रेड वेळेत होण्याबद्दल आहे. भारताचा विचार सुपर सुखोई घेऊन रफाले ची संख्या मर्यादित ठेवण्याचा होता, पण रशिया वर निर्बंध लागणार असतील तर आपण पुन्हा कदाचित रफाले कडे वळू शकतो.

भाऊ, नुसते ताब्यात येऊन काय होणार आहे!!!

देखभाल, दुरुस्ती, सुटे भाग यांचीही चिंता करायला हवी.

माझी काळजी फक्त S400 ताब्यात येण्याबद्दल आणि सुपर सुखोई अपग्रेड वेळेत होण्याबद्दल आहे.

मदनबाण's picture

22 Feb 2022 - 10:15 am | मदनबाण

एक तर्क करुन पाहतो... रशिया आणि युक्रेन यांच्यात जर युद्ध झाले तर फ्लॅश पॉइंट Donbass असेल. :)
फ्लॅश पॉइंट क्रिएट करण्यात आला.

जाता जाता :- U.S. officials prep big banks for potential Russian cyberattacks as Ukraine crisis deepens

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark Twain

फ्लॅश पॉइंट क्रिएट करण्यात आला.
Putin seeks permission from lawmakers to use troops abroad
Russia’s parliament approves Vladimir Putin request to use armed forces abroad
पुतीन ने त्याची चाल आत्ता पर्यंत व्यवस्थित खेळली आहे.आता हाणामारी कशी वाढत जाते ते पाहुया.

जाता जाता :- आधी अमेरिका मग त्याच्या मागे त्याचे शेपुट ब्रिटन !
Britain warns of cyberattacks as Russia-Ukraine crisis escalates

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark Twain

रावसाहेब चिंगभूतकर's picture

22 Feb 2022 - 10:30 am | रावसाहेब चिंगभूतकर

अमेरिकेने युनायटेड नेशन्सला कळवले आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या विश्वासार्ह माहिती नुसार लष्करी कब्जानंतर ठार मारण्या साठी किंवा छळ छावण्यांमध्ये पाठवण्यासाठी मॉस्को युक्रेनियन लोकांच्या याद्या संकलित करत आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबतीत बातमी दिली आहे.

कंजूस's picture

22 Feb 2022 - 12:40 pm | कंजूस

जे सोविअत संघ विभागल्याने आताच्या रशियाला मिळत नाही?/ वंचित राहिले?
१) तेल ,
२) इतर खनिज द्रव्ये,
३) मासे आणि इतर अन्नधान्य,
४) फिलोसोफर हुशार लोकं,
५) वैज्ञानिक
---------
इतर कारणे - भडास काढणे आणि शस्त्रास्त्रे जाळणे. हा हेतू अमेरिकेचाही आहेच.

Trump's picture

22 Feb 2022 - 12:53 pm | Trump

भरपुर आहेत.

पुढील निर्यात उत्पादन गट 2020 मध्ये रशियन जागतिक शिपमेंटमध्ये सर्वोच्च डॉलर मूल्याचे प्रतिनिधित्व करतात. तसेच रशियाकडून एकूण निर्यातीच्या संदर्भात प्रत्येक निर्यात श्रेणीचा टक्केवारी हिस्सा दर्शविला जातो.

तेलासह खनिज इंधन: US$141.3 अब्ज (एकूण निर्यातीच्या 42.1%)
हिरे, मौल्यवान धातू: $३०.४ अब्ज (९%)
लोह, पोलाद: $16 अब्ज (4.8%)
तृणधान्ये: $9.5 अब्ज (2.8%)
संगणकासह यंत्रसामग्री: $8.3 अब्ज (2.5%)
लाकूड: $8.2 अब्ज (2.5%)
खते: $7 अब्ज (2.1%)
तांबे: $5.6 अब्ज (1.7%)
अॅल्युमिनियम: $5.5 अब्ज (1.6%)
मासे: $4.6 अब्ज (1.4%)
The following export product groups represent the highest dollar value in Russian global shipments during 2020. Also shown is the percentage share each export category represents in terms of overall exports from Russia.

Mineral fuels including oil: US$141.3 billion (42.1% of total exports)
Gems, precious metals: $30.4 billion (9%)
Iron, steel: $16 billion (4.8%)
Cereals: $9.5 billion (2.8%)
Machinery including computers: $8.3 billion (2.5%)
Wood: $8.2 billion (2.5%)
Fertilizers: $7 billion (2.1%)
Copper: $5.6 billion (1.7%)
Aluminum: $5.5 billion (1.6%)
Fish: $4.6 billion (1.4%)
https://www.worldstopexports.com/russias-top-10-exports/
------------------------------------------------

नुसताच कच्चा माल किंवा मनुष्यबळ असुन चालत नाही. बाजार, भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान इ. पण लागते.

पुतीन ह्यांनी काल जे भाषण केले त्यातील एक मुद्दा म्हणे ( मी UN च्या प्रतिनिधींची भाषणे ऐकताना अमेरिकन आणि ब्रिटिश प्रतिनिधींनी हा उल्लेख केला) हा होता कि रशियन साम्राज्याच्या सर्व जागांवर रशियाचा अधिकार आहे असे वक्तव्य पुतीन ह्यांनी केले. ह्यांत गॉर्जिया, फिनलंड वगैरे प्रदेश सुद्धा अंतर्भूत होतात. मी हाच मुद्दा माझ्या रशियावरील लेखांत मांडला होता.

युक्रेन का पाहिजे ह्याचे उत्तर युक्रेन मध्ये काय आहे ह्यावर नसून, तो एके काळी रशियन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे आता सुद्धा आम्हाला तो पाहिजे अशी पुतीन ह्यांची उघड भूमिका आहे. काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तान चा जो मार्ग आहे तोच मार्ग पुतीन ह्यांनी चोखाळला आहे. अस्थिरता निर्माण करून रशियन धार्जिण्या लोकांचे बहुमत सीमेलगत भागांत करायचे आणि नंतर हळूच त्याला ताब्यांत घ्यायचे.

युक्रेन मध्ये काही रशियन धार्जिणे असले तरी बहुतेक लोकांना रशिया विषयी प्रेम नाही. आणि युद्ध सुरु झाल्यास सुशिक्षित आणि श्रीमत लोक युरोप मध्ये निर्वासित म्हणून जातील. इतर देश जे निर्बंध टाकतील त्यामुळे जो फायदा होणार होता तो होणार नाही.

चौकस२१२'s picture

22 Feb 2022 - 1:43 pm | चौकस२१२

युक्रेन मध्ये काही रशियन धार्जिणे असले तरी बहुतेक लोकांना रशिया विषयी प्रेम नाही.
काही वर्षांपूर्वी चा अनुभव ( रशियन साम्राज्य तुटल्या नंतर )
कामाच्या ठिकाणी दोन व्यक्ती रशियन होते .. ओळख वाढली आणि नंतर कळले कि त्यातील एक रशियन आणि एक युक्रेनिय होती
फरक काय म्हणून विचारल्याचे आठवते उत्तर मिळाले होते तसा काही फारसा नाही म्हणजे जणू मलेशिया आणि इंडोनेशिया यातील जसा फरक तसा !
रेस ( वर्ण ) या दृष्टीने बघतले तर साम्य दिसत होते
मग गाडी पुढे गाडी का घसरली ?

मी पहिला जॉब करत होते तिथे रशियन एक मुलगा माझा चांगला मित्र होता आणि दुसरा युक्रेनियन. युक्रेनियन आर्मी मध्ये कॅप्टन होता आणि नंतर अमेरिका सोडून आता युक्रेन मध्ये आहे. युक्रेन आणि रशिया ह्यांचा संबंध किमान माझ्या समजुती प्रमाणे गोवा आणि महाराष्ट्र (किंवा नेपाळ आणि भारत) प्रमाणे आहे. दोन्हीत सांस्कृतिक, भाषिक आणि वांशिक साम्य असले तरी थोडे फार बदल सुद्धा आहेत आणि युक्रेनियन लोकांना रशियन लोकांशी भांडण नको असले तरी रशियन राज्यव्यवस्थेखाली राहणे मान्य नाही. रशिया जास्त जाचक आहे, क्लेप्टोक्रसी असल्याने फक्त काही लोक चांगले जीवन जगू शकतात , विविध प्रकारच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होते इत्यादी त्यांची कारणे होती. त्याशिवाय भविष्यांत युक्रेन EU चा भाग बानू शकतो आणि त्यामुळे त्यांना प्रचंड फायदा होऊ शकतो असे युक्रेनियन लोकांचे म्हणजे होते. त्यामुळे माझ्या ओळखीच्या त्या युक्रेनियन मंडळींना कुठल्याही परिस्थितींत रशियाचा भाग बनणे मंजूर नव्हते.

कंजूस's picture

22 Feb 2022 - 2:36 pm | कंजूस

भूभाग ताब्यात ठेवणे.

रात्रीचे चांदणे's picture

22 Feb 2022 - 1:07 pm | रात्रीचे चांदणे

क्रिमिया मुख्य राशियनभूमी बरोबर जोडलेला नाही, अत्ता पुतीन ने ज्या प्रदेशाला स्वतंत्र republic म्हणून मान्यता दिली त्यामुळे रशिया क्रिमिया बरोबर भविष्यात जोडला जाऊ शकेल. महत्त्वाचे म्हणजे त्या प्रदेशातील ukraniyan जनता जी वंशाने रशियन आहे त्यांचा रशियाला पाठिंबा आहे.

त्याने काय भूमिका घेतली असती हा विचार येऊन गेला.

sunil kachure's picture

22 Feb 2022 - 3:47 pm | sunil kachure

युक्रेन नी अमेरिकेची मदत मागितली आहे का?
मागितली नसेल तर अमेरिकेचा काय संबंध युक्रेन ची वकिली करायची.
लोकांच्या स्वतंत्र ची जर खूप काळजी असेल अमेरिका नी बाकी मुक्त वादी लोकांना तर हे उत्तर कोरिया ची सत्ता का उलटून टाकतं नाहीत.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

22 Feb 2022 - 6:39 pm | रावसाहेब चिंगभूतकर

बाकीचे ग्रॅज्युएशन लेव्हल चं लिहीत असताना तुम्ही तिसरी (ब) मध्ये लिहिल्यासारखे निबंध का लिहिता?

sunil kachure's picture

22 Feb 2022 - 6:46 pm | sunil kachure

युक्रेन वर रशिया ची लष्करी कारवाई चे कारण अमेरिका चा नको तितका युक्रेन मधील इंटरेस्ट,हस्तक शेप .
वाघांनी शिकार केली कोल्हे कुत्रे राहिलेले जेवण मिळावे म्हणून आशा ठेवून असतात तसे युरोपियन देश.
म्हणून शिकार कोण होते काही देणे घेणे नाही वाघा नी शिकार केलीच पाहिजे ही इच्छा.
असे उत्तर कोणी तरी देईल प्रामाणिक पने .
म्हणून तसे lihale होते.

चौकस२१२'s picture

23 Feb 2022 - 9:17 am | चौकस२१२

साम्राज विस्तार ... ४थी ता शिकवलं होतं
चीन उत्तर कोरिया चा मित्र का?
चीन , तैवान ला कोणी इतर देशांनी मान्यता दिली तर खपवून घेत नाही का?

अर्थात हे मान्य कि अमेरिका कधी कधी हा हस्तक्षेप करताना इतकी ढोंगी वागते कि शेम्बड्या पोराला पण कळेल कि खरा हेतू वेगळाच आहे

sunil kachure's picture

22 Feb 2022 - 7:04 pm | sunil kachure

ह्या युरोपियन ,गोऱ्या लोकांच्या हव्यास मुळे जगात पाहिले,दुसरे महा युद्ध झाले .
जागाच खूप मोठे नुकसान झाले तरी हे नालायक त्यांचा नालायक पना सोडत नाहीत
युक्रेन वर रशिया का आक्रमक झाला?
जगातील सर्वात जास्त भू भाग असणारा रशिया आहे.
विपुल खनिज संपत्ती त्यांच्या भूमीत आहे.
खरे युद्ध खोर हे युरोपियन देश आणि अमेरिका चा आहे.

sunil kachure's picture

22 Feb 2022 - 7:07 pm | sunil kachure

दयावान सारखी खूप गुन्हे करा आणि थोडे से दान करा,जगासमोर नम्र बना.
आतून खुंकार ,आक्रमक,लबाड ,.
असे ह्या देशांचे वर्णन करता येईल.

1.168 / 5.000
Übersetzungsergebnisse
मेक्सिको सिटी (रॉयटर्स) - मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सोमवारी अमेरिकन सरकारला मेक्सिकोमधील त्यांच्या प्रशासनावर टीका करणार्‍या गटांना निधी देणे थांबविण्याचे आवाहन केले आणि आर्थिक मदतीला “लज्जा” आणि मेक्सिकोच्या सार्वभौमत्वाचा भंग असल्याचे म्हटले.

लोपेझ ओब्राडोरने पॉवर मार्केटवरील राज्य नियंत्रण बळकट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या सुधारणेवरून युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको यांच्यातील घर्षणाच्या वेळी हा फटकार आला आहे, ज्याला यूएस अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने चेतावणी दिली आहे की अक्षय ऊर्जेतील गुंतवणूक मर्यादित करू शकते.

लोपेझ ओब्राडोर यांनी मे महिन्यात यूएस सरकारला एक डिप्लोमॅटिक नोट पाठवली होती ज्यामध्ये मेक्सिकोमधील राजकीय गटांसाठी यूएस फंडिंगबद्दल चिंता व्यक्त केली होती.

सोमवारी त्यांनी युनायटेड स्टेट्सला विरोधी गट म्हणून वर्णन केलेल्या निधीवर अंकुश ठेवण्याचे आवाहन नूतनीकरण केले, कोणतेही नाव न घेता.

"आम्ही यूएस सरकारला सरकारचे विरोधक म्हणून खुलेपणाने काम करणार्‍या गटांना निधी देणे थांबवण्यास सांगत आहोत ... आमच्या बाबतीत, कायदेशीर आणि कायदेशीररित्या स्थापन केलेल्या सरकारच्या," त्यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

"दुसऱ्या देशाच्या अंतर्गत जीवनात गुंतणे हे जगातील कोणत्याही सरकारसाठी लाजिरवाणे आहे ... शिवाय, पैसे हस्तांतरित करणे."

MEXICO CITY (Reuters) - Mexican President Andres Manuel Lopez Obrador on Monday urged the U.S. government to stop funding groups in Mexico that are critical of his administration, calling the financial support a "shame" and a breach of Mexico's sovereignty.

The rebuke comes at a time of friction between the United States and Mexico over a reform proposed by Lopez Obrador to strengthen state control of the power market, which the administration of U.S. President Joe Biden has warned could limit investment in renewable energy.

Lopez Obrador also sent a diplomatic note to the U.S. government in May expressing concerns over U.S. funding for political groups in Mexico.

On Monday he renewed his calls for the United States to curb funding against what he described as opposition groups, without stating any by name.

"We are asking the U.S. government to stop funding groups that openly act as opponents of governments ... in our case, of a legally and legitimately constituted government," he told his morning news conference.

"It is a shame for any government in the world to get involved in the internal life of another country ... plus, handing over money."

https://news.yahoo.com/mexican-president-urges-u-end-162311196.html

श्री पुतीन आणि रशियन गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखाचे संभाषण

'Speak directly!': Putin has tense exchange with his chief spy

Trump's picture

24 Feb 2022 - 1:24 am | Trump

Imran speaks to Russian TV as US-China-Russia geopolitics turns full circle in 50 years

वामन देशमुख's picture

24 Feb 2022 - 11:16 am | वामन देशमुख

इंडियन एक्सप्रेसची बातमी

याच पानावरचा नकाशा: रशिया ने हल्ला केलेली ठिकाणे -
Russia attacks Ukraine

धन्यवाद. लवकर संपले तर बरे होईल. सध्या नैसगिक वायु आणि कच्चे तेल खुप महाग झाले आहे.

sunil kachure's picture

24 Feb 2022 - 12:29 pm | sunil kachure

युक्रेन का युरोपियन आणि अमेरिकन प्रभावातून मुक्त करणे हा आहे
हा हेतू लवकर साध्य होणार नाही.
युक्रेन नी युद्ध टाळायचा प्रयत्न केला तरी मित्र मोठे कुटील आहेत.
ते युद्ध लवकर संपू देणार नाहीत.

युक्रेन मधील माझ्या मित्रांशी माझा संपर्क तुटला आहे. काल पर्यंत त्यांच्या कडून स्टेटस वगैरे दिसत होते. युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे. नवमाता असलेली माझी मैत्रीण काल पोलंड सीमेच्या दिशेने प्रवास करती झाली तिच्या सोबत तिचे वृद्ध आई वडील आणि ३ लहान मुले होती. तिचा पती युक्रेन आर्मीत असल्यायन तो युद्धभूमीवर गेला आहे. इतर पुरुषांनी बंदुका वगैरे घेऊन मोक्याच्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. सध्यातरी इंटरनेट बंद पडला आहे असे वाटत आहे. मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?

युक्रेनचे सैन्य देशभक्त आणि सशस्त्र नाही, असा अर्थ निघतो यातुन.

युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे.

माल्दोवाला कशाला घेताय ह्यामध्ये?
ते तर कायमस्वरुपी तटस्थ आहेत.
संदर्भः
मोल्दोव्हाच्या संविधानाच्या अनुच्छेद 11 मध्ये असे म्हटले आहे: "मोल्दोव्हा प्रजासत्ताक त्याच्या कायमस्वरूपी तटस्थतेची घोषणा करते. मोल्दोव्हा प्रजासत्ताक इतर राज्यांच्या सशस्त्र दलांना त्याच्या प्रदेशावर तैनात करण्याची परवानगी देत ​​नाही."

अशाप्रकारे, मोल्दोव्हाची तटस्थता त्याच्या घटनेत निहित असल्याने, देशाची नाटो किंवा सीएसटीओमध्ये सामील होण्याची कोणतीही योजना नाही.
Article 11 of the Constitution of Moldova states: "The Republic of Moldova proclaims its permanent neutrality. The Republic of Moldova does not allow the deployment of armed forces of other states on its territory."

Thus, since Moldova's neutrality is enshrined in its constitution, the country has no plans to join either NATO or CSTO.
https://en.wikipedia.org/wiki/Moldova%E2%80%93NATO_relations

मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.

जनता देश भक्त आहे युक्रेन. ची.
म्हणजे नक्की काय आहे.
रशिया ची जनता ,बाकी देशाची जनता देश विरोधी आहे का?
जनता सशस्त्र आहे.
ह्या वाक्याचा पण अर्थ नाही समजलं.
बंदूक,पिस्तूल ह्यांनी युद्ध होतात का हल्ली.?
मग ती आधुनिक शस्त्र फक्त शो रूम मध्येच असतात का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2022 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युक्रेनने अमेरिकेस मदत मागितली आहे. अमेरिका काय भूमिका घेते ते बघीतले पाहिजे.

-दिलीप बिरुटे

भारताचे बरेच विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. त्यांच्या साठीचे कीव बाऊंड एअर इंडिया विमान युक्रेनची एअरस्पेस बंद असल्याने दिल्लीत परतले.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Feb 2022 - 2:42 pm | अमरेंद्र बाहुबली

हे नेहमी तहान लागलियावर विहीर का खंदतात? कोरोना वेळीही असेच अडकून पडले होते

साहना's picture

24 Feb 2022 - 4:47 pm | साहना

काही निर्ल्लज भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.

येथेही काही युध्द होणार म्हणुन आंनद साजरा करणारे निर्लज्ज (मनोरुग्ण?) आहेतच की.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Feb 2022 - 7:14 pm | अमरेंद्र बाहुबली

पाकिस्तान ने सैनिक मारले चिनने जमीन बळकावली तरी भारताने शांतता बाळगावी म्हणणारे जास्त मनोरूग्न म्हणावे लागतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2022 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.

ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच आपल्या विद्यापीठाकडे अर्ज केला होता कि आम्हाला जाऊ द्या आम्ही नंतर येऊन कार्यक्रम कम्प्लिट करू. वैद्यकीय शिक्षण असल्याने रिमोट शिकणे किंवा परीक्षा शक्य नव्हत्या. विद्यापीठाने त्यांचा अर्ज नामंजूर केला त्यामुळे एक तर संपुन डिग्री सोडणे कदाचित त्यांना शक्य झाले नसावे.

विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.

Trump's picture

24 Feb 2022 - 5:27 pm | Trump

तुमचा विश्वगुरू शब्दावर भलताच राग आहे. :)

विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.

चौकस२१२'s picture

25 Feb 2022 - 6:33 am | चौकस२१२

विश्वगुरू मोदींनी स्वतःला उद्देशून म्हणले कि भारत देशाला ?
भारत देशाला उद्देशून म्हणले असले तर असे स्वतःचं देशाचे ब्रॅण्डिंग करणे काय चुकीचे आहे ?
नाहीतरी "गुरु " बिझिनेस मध्ये तरी भारताची मक्तेदारी आहेच कि .... कोणत्या रंगाचे आणि कोणत्या "थेअरी" चे पाहिजेत सांगा
स पासून स कडे नेनारे, कि प्राणायाम शिकवणारे , कि शून्यातून विभूती निर्माण करणारे ! ..... !

सुबोध खरे's picture

24 Feb 2022 - 8:05 pm | सुबोध खरे

२०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात

The cost of studying MBBS in Ukraine is very less compared with private medical colleges in India.

The total cost of MBBS education for six years in Ukraine is about 16.25 Lacs.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2022 - 1:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

photo_2022-02-24_13-43-08

-दिलीप बिरुटे

sunil kachure's picture

24 Feb 2022 - 2:58 pm | sunil kachure

रशिया ची बाजू ही इथे तरी न्यायाची आहे.रशिया च्या सीमेवर अमेरिका सारखा देश युक्रेन चा वापर करून प्रभाव निर्माण करत असेल रशिया सहन करूच शकतं नाही.
भारत अमेरिका जवळ जातोय असे वाटले की चीन आक्रमक होतो .
असे खूप प्रसंग आहेत.
रशिया आक्रमक का झाला?
अमेरिका त्याच्या वेशीवर आली

sunil kachure's picture

24 Feb 2022 - 3:17 pm | sunil kachure

जगात कुठे ही युद्ध..
देशप्रेमी,मानव प्रेमी तर कुठे दिसत नाहीत.
पण
साठेबाज लबाड.
वस्तू बाजारातून गायब करून त्याचा तुटवडा निर्माण करतात ..आणि प्रचंड महाग विकतात.

कारण युद्ध फायदा देश प्रेमी साठे बाज.
पेट्रोल , डिझेल महाग.
युद्ध ज्या देशात होत आहे ते देश आणि इंधन वाढ ह्यांचा काही दुरून पण संबंध नसला तरी इंधन वाढ होते.
लाभर्ती
देश प्रेमी ऑईल कंपन्या ,त्यांचे मालक.
सोने मात्र स्वस्त होत नाही सोन्यावर युध्दाचा परिणाम होत नाही.
अजब आहे
युद्ध होणे म्हणजे दिखाव करणारे देश प्रेमी ह्यांची चांदी.
युद्ध ची स्थिती मी अनुभवली नाही
पण मुंबई मध्ये ,दंगल,पूर ह्या मुळे निर्माण झालेली स्थिती बघितली आहे ..
खूप कमी अगदी पॉइंट मध्येच percent काढावे लागतील अशी लोक मदत करणारी होती ..बाकी स्थिती चा फायदा उचलून स्वतःचा फायदा कसा होईल हे बघणारेच होते.
खूप मोठ्या प्रमाणात देश प्रेमी संकट काळात कधीच दिसले नाहीत.

टर्मीनेटर's picture

24 Feb 2022 - 4:20 pm | टर्मीनेटर

मला युरोपीयन युनियन (EU) काय भूमिका घेते त्यात जास्त स्वारस्य आहे!

BREXIT नंतर युरोपीयन युनियनचे नेतृत्व करण्याची संधी फ्रान्स आणि जर्मनीला मिळाली आहे आणि आता त्यांना अमेरिकेच्या सुरात सूर मिसळणाऱ्या ब्रिटनची भूमिका विचारात घ्यायची आवश्यकता राहिली नाहीये.

गेल्या दोन-तीन वर्षातल्या घडामोडींवर सोशल मिडियावर झालेल्या चर्चा वाचताना आणि तिथल्या मित्रमंडळींकडून ऐकलेल्या गोष्टींतुन युरोपीयन युनियनच्या सहभागी देशांतील नागरिक ज्या प्रकारे ब्रिटनची निर्भत्सना करताना दिसतात त्यावरून लोकमताचा अंदाज येतोय.

आता फ्रान्स आणि जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनची तळी उचलतात, की कठोर शब्दात (कोरडा) निषेध नोंदवत अलिप्त रहात युरोपचे स्वतंत्र हितसंबंध निर्माण करण्याला प्राधान्य देतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.

तसेही अमेरिकेच्या निर्बंधाना हल्ली इराण पण जुमानत नाही तर रशिया त्यांना फार गांभीर्याने घेईल असे वाटत नाही.

जाता जाता : अमेरिका आणि युकेने त्यांच्या सोयीसाठी जगभरातल्या अनेक देशांत हस्तक्षेप करून बरेच शत्रू निर्माण केले आहेत. ह्या युद्धाच्या निमित्ताने त्या देशांमध्ये अराजकता माजून तिथेही विद्यमान सरकार उलथवण्यासाठी उठाव / क्रांती वगैरे होते का हे पाहणेही औत्सुक्याचे असेल.

साहना's picture

24 Feb 2022 - 4:55 pm | साहना

काही भाकिते. कुठल्याही पुराव्यावर आधारित नसून निव्वळ वैयक्तिक मते आहेत. नंतर किती खरी ठरतील पाहूया. मार्च २५ मध्ये पुन्हा इथे व्हिसिट करेन.

- रशियन सैनिक हे अप्रशिक्षित, लढण्यास उत्सुक नाहीत असे असतील.
- रशियन सैनिक अपेक्षेपेक्षा बराच मार खातील आणि ह्या युद्धांतून रशियन सैन्य अत्यंत ढिसाळ आहे असे दिसून येतील.
- युक्रेन चे राष्ट्रपती वोलडोमीर ह्यांतून चांगले तावून सुलाखून प्रसिद्ध होतील.
- क्यिव मध्ये रशियन सैन्य पोचण्यासाठी साधारण ७२ तास तरी लागतील.
- पुतीन काही दिवसांत माघार घेतील पण कदाचित युक्रेन चा बऱ्यापैकी भाग आपल्या हाताखाली ठेवतील.
- रशियन अर्थव्यवस्था बराच काळ कोलमडेल.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Feb 2022 - 6:13 pm | रावसाहेब चिंगभूतकर

रशिया वर अत्यंत कडक प्रतिबंध लावले जातील. रशियन अर्थव्यवस्था कोसळेल आणि पुतीन सत्तेवर असेपर्यंत ती कोसळलेली राहील. या सगळ्यामुळे रशिया स्वतः च तुटला नाही म्हणजे मिळवली. युक्रेनियन्स किती तीव्र विरोध करतात यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून राहील. पुतीन आपले पपेट सरकार सत्तेवर बसवेल, पण जर देशात अंतर्गत यादवी सुरू झाली तर ती रोखणे नवीन सरकारला शक्य नाही. पुतीन ला याची फारशी काळजी दिसत नाही. आर्थिक निर्बंध किती भयंकर असतात त्याची पुतीन ला कल्पना दिसत नाही.

शाम भागवत's picture

24 Feb 2022 - 6:34 pm | शाम भागवत

मग रशिया चीनकडे झुकणार. तैवान हा चीनचा प्रदेश आहे हे जाहीर करूनच मग पुतीनने युध्दाला सुरवात केली आहे. चीन रशिया युती भयंकर असेल.
मला तरी यावरून इंदिरा गांधींची आठवण आली. रशियाशी करार करून मग बांगला देश युध्द छेडलं.
असो. उंदीर मारणाऱ्यांनी किती तो विचार करायचा?
;)

Trump's picture

24 Feb 2022 - 7:22 pm | Trump

- युक्रेन चे राष्ट्रपती वोलडोमीर ह्यांतून चांगले तावून सुलाखून प्रसिद्ध होतील.

आणि देशही सोडतील

चेहरा रडवेला झाला आहे. सामान्य नागरीकांचे वाईट वाटते.

कॉमी's picture

24 Feb 2022 - 6:07 pm | कॉमी

युद्धसदृश्य परिस्थितीत ट्विटरवर शिटपोस्टिंग करणारा इतिहासातला पहिला देश:

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Feb 2022 - 6:21 pm | रावसाहेब चिंगभूतकर

मला तर ही शिटपोस्टिंग वाटली नाही. तुम्हाला असं का वाटलं हे ऐकायला आवडेल.

शिटपोस्टिंग हे वाईट अर्थाने नाही म्हणलं. गंभीरतेचा अभाव, अश्या अर्थाने. जनरली देशांचे ऑफिशियल ट्विटर हँडल अश्या इन्फॉर्मल गोष्टी पोस्ट करत नाहीत, युक्रेन पूर्वीपासूनच त्याबाबत वेगळे आहे. रशियाबद्दल हमखास मिम्स टाकले जायचे त्यांच्याकडून.

Trump's picture

25 Feb 2022 - 11:17 am | Trump

U.S. Embassy Kyiv

शेखर गुप्तांनी गिडिओ राष्मान या पुलित्झरधारी ब्रिटिश पत्रकाराचा हा लेख रेकमंड केला आहे. हा लेखक अनेक वर्षांच्या अनुभवातून लिहितोय असे दिसते.

काही टेकअवेज:

  • रशिया युक्रेनमधली केंद्रीय आणि स्थानिक- संपूर्ण शासनव्यवस्था बदलेल. लिस्टमधल्या युक्रेनियन्सचे जीव जातील.रशियन सैन्यासमोर युक्रेन सैन्याचा फार काळ टिकाव लागणार नाही.
  • पाश्चिमात्य देशांनी या वादात येऊ नये असे पुतीनने धमकावले आहे, आणि छुप्या शब्दात अनुवस्त्रांची धमकी दिली आहे.
  • नाटो सध्यातरी यात पडणार नाहीये. मात्र हवाई युद्धात जर रशियन विमान पोलंडची हवाई सीमा ओलांडतील तर पोलंड (नाटो सदस्य देश) कदाचित प्रत्युत्तर देऊ शकते.
  • युक्रेनमध्ये असलेल्या अमेरिकन अथवा युरोपियन नागरिकांची जीवितहानी झाल्यास त्या देशांवर नागरिकांचा दबाव वाढू शकतो.
  • युक्रेन युद्धाचा वापर करून पुतीन रशियामध्ये संपूर्ण हुकूमशाही स्थापित करेल.
  • रशियन उर्जास्रोतावर अवलंबून असलेल्या जर्मनी आणि इटलीच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतात.
  • रशियावरचे निर्बंध रशियाबाहेर संपत्ती असणाऱ्या रशियन नागरिकांसाठी वाईट असतील.

शेखर गुप्ता हा एकदम चालू माणूस आहे. याला सोनिया गांधीने २००७ मध्ये पद्म पुरस्कार दिला होता हे ध्यानात ठेवा!
धंदे के लिए कुछ भी!
दिल्लीमध्ये असलेली अमाप संपत्ती कशी अचानक वाढली याचे अनेक सुरस किस्से हलक्या आवाजात पसरलेले आहेत.

+ पुलित्झरधारी किंवा मॅगेसेसे वगैरे मिळालेले/मिळवलेले लेखक म्हणजे अजेंडाधारी पत्रकारिता असणार याची खात्री बाळगता येते!
तेव्हा यांचे लेख वाचतांना याने नक्की काय खेळी केली म्हणून याला पुरस्कार का मिळाला असावा असा प्रश्न नेहमी डोक्यात ठेवावा!

कॉमी's picture

25 Feb 2022 - 7:42 am | कॉमी

खिक्क

साहना's picture

25 Feb 2022 - 11:50 am | साहना

> + पुलित्झरधारी किंवा मॅगेसेसे वगैरे मिळालेले/मिळवलेले लेखक म्हणजे अजेंडाधारी पत्रकारिता असणार याची खात्री बाळगता येते!

१००%

जेंव्हा हिटलर ने "स्वरक्षण" म्हणून पोलंड वर आक्रमण केले तेंव्हा न्यू यॉर्क टाईम्स मधील दोन वार्ताहरांनी भाला मोठा लेख लिहून ह्यांत पोलंडचीच चूक कशी होती असा युक्तिवाद केला होता आणि त्यांना त्या लेखासाठी पुलित्झर कि काय तो पुरस्कार मिळाला होता. आपल्या केजरीवाल ला मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे हे पुरस्कार कशाचेही द्योतक नाहीत.

गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये.

Trump's picture

25 Feb 2022 - 11:56 am | Trump

गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये.

त्यांचे कट द क्लटर, नॅशनल इंटेरेस्ट उत्तम असतात.
https://www.youtube.com/hashtag/cuttheclutter
https://www.youtube.com/results?search_query=National+Interest+with+Shek...

कृपया तुमचे अभ्यासु समत्युल्य स्त्रौत द्यावेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Feb 2022 - 7:00 pm | अमरेंद्र बाहुबली

पुढच्या वर्षी ह्या वेळेपर्यंत तिसर्या महायुध्दाने सर्वोच्च बिंदू गाठलेला असेल. चिनी सैन्य कलकत्ता नी दिल्ली वर बोम्बवर्षाव करत असेल भारतीय सैन्याने लाहोर नी ईस्लामाबाद नष्ट केलेलं असेल. चिन एकाच वेळी भारत नी जपानात घुसलेला असेल. भारत चिनच्या हल्ल्यानंतर युध्दात ऊतरेल. चिन - रशिया- पाकिस्तान नी अरब राष्ट्रे विरूध्द युरोप- अमेरीका- भारत असे युध्द पेटलेले असेल.

मी असाच अंदाज चिन मध्ये कोरोना पिक वर होता तेव्हा बांधला होता तर माझ्यावर लोक फिदी फिदी हसत होते. नंतर माझा अंदाज खरा ठरला.

तिसरे महा युद्ध होणार नाही
अतिशय घातक असणाऱ्या शस्त्र चा वापर होणार नाही.
अणू बॉम्ब,हायड्रोजन बॉम्ब ,जैविक हत्यार ही वापरली जाणार नाहीत
अमेरिका,युरोप असू किंवा रशिया.
त्यांचा मेंदू शाबूत आहे.
घातक शस्त्रांचा वापर म्हणजे .
युद्धात सहभागी असो किंवा नसो सर्व जगाचा विनाश.
आज खूप भयंकर हत्यार अस्तित्वात आहेत

त्या मुळे तिसरे महायुद्ध हे हत्यार नी लढले जाणार नाही
आर्थिक क्षेत्रात लढल जाईल.
रशिया लं आर्थिक क्षेत्रात कमजोर केले जाईल.
पण हत्यार वापरून विनाश नाही.
तेच रशिया मित्रांशी मिळून युरोप ,अमेरिका ह्यांची आर्थिक कोंडी करेल पण

घातक शस्त्र वापरणार नाही.

गावठी फिलॉसॉफर's picture

27 Feb 2022 - 9:01 am | गावठी फिलॉसॉफर

रशियाला आर्थिक कमजोर करण्याचं काम अगदी जोरदार चालू आहे.

Trump's picture

24 Feb 2022 - 7:01 pm | Trump

युक्रेनने शरणागती पत्करली तर शहाणपणाचे होईल. तेवढीच जिवीत आणि वित्तहानी टळेल.

कॉमी's picture

24 Feb 2022 - 7:18 pm | कॉमी

बॉल युक्रेनच्या कोर्टातून गेला आहे. त्यांनी शरणागती पत्करली काय आणि नाही काय, रशियन वर्चस्व ठरल्यातच जमा आहे असे आत्तातरी वाटते.
युक्रेन काय करते यापेक्षा अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र काय करणार त्यावर जास्त दिशा ठरेल. अमेरिकी निर्बंधांचे काय परिणाम होतील आणि त्यावर रशिया काय प्रत्युत्तर देईल, चायना काय करेल हे सगळे जास्त महत्वाचे वाटते.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Feb 2022 - 7:24 pm | रावसाहेब चिंगभूतकर

नाटो वर प्रचंड दबाव आहे. पुढचे काही तास महत्वाचे आहेत. जर नाटो काही करणार असेल तर त्याचा निर्णय उद्या होईल. तो होईपर्यंत युक्रेन शस्त्रे खाली ठेवणार नाही.

सुबोध खरे's picture

24 Feb 2022 - 8:13 pm | सुबोध खरे

नाटो काहीही करू शकणार नाही. एकतर युक्रेन नाटोचा सदस्य नाही.

त्यातून रशियाशी दोन हात करायला आपले सैनिक कोणता देश पाठवणार आहे?

फार तर युक्रेनला आर्थिक/ शस्त्रास्त्रांची मदत पाठवू शकतील पण ती तेथे पोचवायची कशी हा एक मोठा प्रश्न आहे.

रशियन पाणबुड्या एकही जहाज तेथे नेऊ देणार नाहीत.

पुतीन हे स्वतः के जि बी चे माजी अध्यक्ष असल्याने त्यांना आपल्या आणि इतर देशांची गुप्त बातमी कशी वापरायची याचे उत्तम ज्ञान आहे.

जो बिडेन सारखा विसराळू अध्यक्ष कुठे आणि पुतीन कुठे

बाकी कुंपणाच्या आडून भुंकणारे कुत्रे भरपूर असतात.

sunil kachure's picture

24 Feb 2022 - 8:15 pm | sunil kachure

खरे ह्यांच्या ह्या पोस्ट शी सहमत.

तुमची आणि खरे साहेबांची वाढते मित्रत्व बघुन कौतुक वाटले. काळाचा महिमा अगाध आहे.

sunil kachure's picture

24 Feb 2022 - 8:55 pm | sunil kachure

ते agenda चालवत नाहीत .खरे तेच व्यक्त होतात.
खूप आयडी एजेंडा चालवतात.खऱ्या स्थिती शी त्यांचे वाकडे असते.
आणि मी पण जे वाटतं तेच लिहत असतो.
तळी उचलत नाही.

सुखीमाणूस's picture

24 Feb 2022 - 9:27 pm | सुखीमाणूस

अमेरिका जरी भान्ड्वलदार असली तरी एक अनारक्शित जातीतला भारतीय म्हणुन मी अमेरिकेचे खुप उपकार मानते.
जर computer industry आणि त्यामुळे आलेले jobs नसते तर आज माझ्या सारख्या मध्यम वर्गाची परिस्थिती खुप वाइट असती.
आरक्शणामुळे सरकारी नोकर्या मिळाल्या नसत्या. मध्यम हुशारीमुळे choice limited होते. अश्यावेळी कुठल्यातरी भारतीय manufacturing industry
मधे खितपत पडावे लागले असते. अमेरिकेच्या computer industry मुळे भारतीय अर्थव्यवस्था पण जोमाने वाढली.
अमेरिका आणि dollar माझ्यासारख्या भारतीय लोकान्साठी तरी महत्वाचे आहेत.
communist/socialist देश फक्त गरिबी आणि छुपा साम्राज्यवाद पसरवतात. चीन अपवाद पण तो communist भान्ड्वलदार आहे.
भारतासारख्या विविध धर्म्/जाती/देश असलेल्या देशात चीन सारखे model चालणे अशक्य आहे.
हे युध्द लवकर सम्पु दे

sunil kachure's picture

24 Feb 2022 - 9:39 pm | sunil kachure

नुकतेच आयटी क्षेत्र निर्माण झाले होते,कॉम्प्युटर चा वापर वाढत होता.
पुढची अर्थ व्यवस्था कॉम्प्युटर विषयातील ज्ञान वर अवलंबून होती.
भारत अडखळत होता.
पण पुढची स्थिती ओळखून भारतात कॉम्प्युटर चे शिक्षण सुरू झाले होते
सरकारी संस्था आयआयटी,किंवा बाकी संस्था ते अभ्यासक्रम शिकवत होते.
ही आयती शिक्षित लोकांची फौज अमेरिका नी आपल्या देशात स्थलांतरित केली.
मार्केट पेक्षा जास्त पगार देवून ..
भारतात हुशार लोक राहिली च नाहीत.
देशाचे नुकसान झाले
ही लोक इथेच राहिली असतो ब्रेन ड्रेन झालं नसते तर भारताने उत्तुंग भरारी मारली असती...
ही दुसरी बाजू पण विचारात घ्या..स्पष्ट लिहल्या बद्धल क्षमस्व

चौकस२१२'s picture

25 Feb 2022 - 6:26 am | चौकस२१२

भारतात हुशार लोक राहिली च नाहीत.
सुरवातीला वाटले असेल तसे.... पण एकूण लोकसंख्याच एवढी प्रचंड आहे कि भारतात पुरेसे हुशार लोक आहेत ( हे मी भारतात राहत नसताना म्हणतोय हे लक्षात घ्या )
आणि आता तर भारतातततच एवध्या सुविधा आणि पैसे आहेत कि "स्थलांतर " करण्यामागची करणे कमी होत आहे ,, भारतासाठी चांगलेच आहे
भारताचे कौतुक हे कि नुसतेच संगणक माहिती क्षेत्रात नाही तर उत्पादन क्षेत्रात पण भारत निर्यात करीत आहे .. त्यःचे विपणन नीट होत नाही कारण ते बरेचदा सरकारी बाबू लोकांच्या हातात असते म्हणून इंजिनीरिंग एक्स्पोर्ट प्रोमोशन कौंसिल चा गोंधळ पाहिला आहे

Trump's picture

25 Feb 2022 - 11:11 am | Trump

त्यःचे विपणन नीट होत नाही कारण ते बरेचदा सरकारी बाबू लोकांच्या हातात असते म्हणून इंजिनीरिंग एक्स्पोर्ट प्रोमोशन कौंसिल चा गोंधळ पाहिला आहे

मी बरेचदा भारतीय वस्तु परदेशामध्ये बघ्यातल्या आहेत. त्यांचे आवरण आणि चिनी वस्तुंचे आवरण ह्यात खुप फरक असतो. चिनी वस्तुचे आवरण, माहितीपत्रक खुपच आकर्षित असते.

sunil kachure's picture

25 Feb 2022 - 2:17 pm | sunil kachure

त्या वेळी .
जी आयटी किंवा कॉम्प्युटर मधील थोडे ज्ञन बाळगून होते त्यांना पण अमेरिका नी खूप मोठा पगार दिला
जी खरोखर देण्याची गरज नव्हती
येथील सर्व च भारताच्या साधन संपत्ती वर
शिक्षण घेतलेले तिकडे गेले.
आज तिचं लोक अमेरिकेचे पाठी रखे आहेत.
आज स्थिती बदलली आहे
त्यांना भारतीय लोकांची गरज नाही..म्हणून migration कायद्यात बदल करून शक्य होईल तितके नियंत्रण भारतीय नागरिक वर आणले जाईल
भारताने ती बाब गंभीर पने घेण्याचं आज तरी काहीच कारण नाही.

जेनेटिक अभियांत्रिकी,मायक्रो बायोलॉजी,कृत्रिम बुध्दी मत्ता,ऑटोमेशन.
हा क्षेत्रात भारत कुठेच नाही.
ना भारतात ह्याचे शिक्षण देण्याची कुवत आहे.
भारताची गरज संपलेली आहे.

साहना's picture

25 Feb 2022 - 7:35 am | साहना

+१

कॉमी's picture

25 Feb 2022 - 12:36 am | कॉमी

https://youtu.be/gSQ6-14FEoQ

जो बायडन चा पत्रकारांशी थेट संवाद, बरेच प्रश्न आव्हानात्मक होते, तरीही व्यवस्थित उत्तर दिलीत.
त्याची झोपाळू, विसराळू म्हणून संभावना करायच्या आधी भक्तांनी आपले प्रधानमंत्री प्रेस शी काय आणि कसे बोलतात हे पाहावे.

रशियावरील सर्वांत गंभीर निर्बंध म्हणजे SWIFT वरील बंधन. SWIFT सिस्टम द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे फिरतात. पण जर्मनी आणि इटली ने ह्या निर्बंधाला विरोध केला आहे आणि त्यामुळे हा निर्बंध अजून टाकला गेला नाही.

इथे जर्मन भूमिका आणि त्यांचे भ्रष्ट नेतृत्व लक्षांत घेतले पाहिजे. मर्कल काकूंच्या आधी त्यांचे नेते होते गैरहड दादा. १९९८ ते २००५ पर्यंत हे जर्मनीचे नेते होते. हे पुतीन ह्यांचे घनिष्ट मित्र. इतके घनिष्ट कि सध्या बहुतेक रशियन कंपनीच्या बोर्डवर आहेत. रॉसनेफ्ट हि रशियाची सर्वांत मोठी तेल कंपनी ज्यावर अजून निर्बंध लादले नाहीत त्याच्या बोर्ड वर हे आहेत. नॉर्दस्ट्रीम च्या समभाग धारकांचे हे प्रमुख आहेत. https://www.linkedin.com/in/gerhard-schroeder/. थोडक्यांत काय तर उद्या भारताने सुद्धा हाच मॉडेल राबवून इम्रान खान ह्यांना BSNL च्या बोर्डवर किंवा विजय सुपर स्कुटर कंपनीच्या बोर्डचे चेअरमेन नेमावे.

रशियन ऊर्जा कंपनीवर आपण बंधन टाकणार नाही हे अमेरिकेने आज वारंवार स्पष्ट केले आहे. त्याशिवाय जोपर्यंत नाटो मेम्बर्स वर हल्ला होत नाही तो पर्यंत आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार असे सुद्धा अमेरिकेने स्पष्ट केले.

थोडक्यांत काय तर युक्रेन सध्या एकाकी पडलेला आहे. निर्बंधांनी सामान्य रशियन लोकांचे तसेच अतिशय श्रीमंत लोकांचे हाल झाले तरी पुतीन ह्यांना वैयक्तिक फरक पडणार नाही. मॉस्को मध्ये रशियन लोकांनी पुतीन विरोधांत निदर्शने केली. रशियन उद्योगपती च्या शिष्टमंडळाने पुतीन ह्यांची भेट घेऊन युद्ध थांबवण्याची विनंती केली असे वाचनात आहे. डब्लिन मध्ये लोकांनी रशियन दूतावासाच्या पुढे घोषणा दिल्या आणि त्यांना लाल रंग फासला.

युक्रेन च्या भारतातील राजदूतांनी मोदी ह्यांनी ह्या युद्धांत लक्ष घालून पुतीन ह्यांचे मन वळवावे अशी विनंती केली. युक्रेन ने ह्या आधी भारताच्या विरोधांत UN मध्ये भूमिका घेतली होती आणि पाकिस्तान ला T८० रणगाडे विकले होते, भारताच्या अणू चाचण्यांचा विरोध करून भारतावर निर्बंधांना युक्रेन ने पाठिंबा दिला होता. इत्यादी कारणांनी युक्रेन च्या बाजूने ठाम भूमिका भारत तरी घेईल असे वाटत नाही आणि माझ्या मते ते शहाणपणाचे आहे.

युक्रेन शरणागती पत्करणार नाही आणि युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष देश सोडून जाणार नाहीत अशी लक्षणे आहेत. रशियन सैन्यापुढे युक्रेनियन सैन्याचा निभाव लागणार नाही ह्याची सर्वानाच जाणीव आहे. त्यामुळे शत्रूवर जास्ती जास्त नुकसान निर्माण करावे अशी युक्रेनियन सैन्याची भूमिका आहे. युक्रेनियन आर्मीच्या मते १२ तासांत खालील नुकसान रशियन सैन्याला झाले आहे.

- 30 Russian tanks
- 130 armored fighting vehicles
- 5 aircraft
- 6 helicopters
- 200+ Military personnel

ह्यातील साधारण ६ रशियन रणगाड्यांचे फोटो, अनेक ट्रक्स चे फोटो आणि २ जेट्स आणि ३ हेलिकॉप्टर्स चे फोटो व्हिडीओ इत्यादी उपलब्ध आहेत. २ रशियन सैनिकांना जिवंत पकडले गेले. त्याशिवाय ६ रशियन धार्जिण्या आतंकवादी सैनिकांना युक्रेनियन सैनिकांनी पकडले. एका जखमी रशियन सैनिकाला सुश्रुषा करतानाचे व्हिडीओ सुद्धा समोर आले.[२]

युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. सार्वजनिक रिकॉर्डिंग वरून दिसून आले कि रशियन नेव्हीने एक युक्रेनियन बेटावर हल्ला करून त्यांच्या सर्व सैनिकांना मारले. त्या सैनिकांनी रशियन नौदलाला "fu*k y*u" शिवी दिली हे त्यांचे शेवटचे शब्द. [६]

चेर्नोबिल येथील अपघातग्रस्त आण्विक प्रकल्पवर सुद्धा रशियाने हल्ला केला. ह्या प्रकल्पाची सुरक्षा ज्या युक्रेनियन राष्ट्रीय दलावर होती त्यांनी बराच वेळ चकमक केली पण शेवटी रशियन जिंकले. सध्या तो पूर्णपणे त्यांच्या ताब्यांत आहे. ह्या शिवाय सीमेलगत ची काही शहरे रशियाने जास्त लढाई न करता ताब्यांत घेतली आहेत. कीव मधील दोन विमानतळ रशियाने जाळले असले तरी १००% त्यांच्या ताब्यांत आले नाहीत. ह्या भानगडीत रशियाची काही विमाने पाडण्यात आली. रशियाने इतर काही शहरांचे वीजपुरवठे, पाणी पुरवणे इत्यादी तोडले.

अमेरिकन जावेलीन रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र युक्रेन ने अत्यंत प्रभावी पणे वापरले आहे असे दिसून येत आहे[३]. तरी सुद्धा रशिया कडे १५,००० पेक्षा जास्त रणगाडे असल्याने त्यांना विशेष फरक पडणार नाही. टर्की देशाचे ड्रोन वापरून किमान ३ तरी रणगाडे युक्रेन ने नष्ट केले [१] पण रशियाने आपल्या SAM क्षेपणास्त्राने ह्या ड्रोन्स ना पूर्णपणे उध्वस्त केले आहे.

जावेलीन क्षेपणास्त्रे युक्रेन अनेक वर्षांपासून मागत होता आणि ओबामा ह्यांनी ते त्यांना देण्यास नकार दिला होता पण ट्रम्प ह्यांनी युक्रेन ला जावेलीन देण्यासाठी परवानगी दिली आणि त्यामुळे सध्या युक्रेन मध्ये हि पोचली. फेब्रुवारी ८ ला सुद्दा ह्या क्षेपणास्त्रांचा एक साठा युक्रेन ला पाठवला होता.

सध्या सुमी ह्या शहरांत धुमश्चक्री सुरु आहे. युक्रेनियन सैनिक आणि नागरिक हे इमारतींचा आधार घेत रशियन सैन्यावर आघात करत आहेत तर रशियन सैनिक रणगाडे घेऊन पुढे सरकत आहेत अशी दृशे नजरेस येत आहे.[५]

सध्याचा नकाशा :

https://static01.nyt.com/newsgraphics/2022/02/18/russia-ukraine-livepage...

प्रमुख युद्ध क्षेत्रे :

राजधानी कीव वर प्रचंड हल्ला सुरु आहे. अमेरिकन माहिती प्रमाणे सर्वप्रथम युक्रेन चे वायुदल नष्ट करणे, त्यानंतर विमानतळांचा ताबा घेऊन किंव मध्ये सैन्य उतरवणे, युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांना ठार मारून किंवा पायउतार करून त्याजागी आपले लोक नेमणे आणि त्यांच्या द्वारे मिलिटरीला शरणागती पत्करण्यास लावणे अशी भूमिका पुतीन ह्यांची आहे. ह्याला "शिरच्छेद" धोरण म्हटले जाते.

ह्याला छेद देण्यासाठी युक्रेनियन आर्मीने विविध विभागांतील कमांडर्स ना कमीत कमी आदेश दिले आहेत आणि विपुल प्रमाणात शस्त्रास्त्रे सर्व भागांत पोचवली आहेत त्यामुळे कीव रशियन ताब्यांत गेले तरीसुद्धा युक्रेनियन नागरिक आणि सैनिक रशियन सैन्यावर आपण हून आघात करू शकतील. आता हे कितपत होईल ते वेळच सांगेल.

ओडेसा आणि खेरसोन

ओडेसा हे शहर रशियाने ताब्यांत घेतले असले तरी तिथे त्यांना काबू ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे शहरांत रशियन सैन्य असले तरी ते पुढे सरकत नाही. ओडेसा हे एक बंदर आहे त्याच्या नौदलावर रशियाने हल्ला करून त्यांना पूर्णपणे नष्ट केले आणि आकाशांतून पॅराशूट घेऊन सैनिक उतरवले. त्याच्या बाजूलाच खेरसोन शहर आहे. ह्या दोघांवर ताबा लवकारांत लवकर मिळवावा ह्यासाठी रशिया प्रयत्नशील होती. ओडेसा मध्ये निऑन गॅस निर्मिती होते जी संगणक चिप्स च्या लेसर साठी वापरली जाते. जंगातील साधारण ७०% गॅस इथून येतो. पुतीन ह्यांना निऑन चा पुरवठा बंद करून युरोप ला जेरीस आणायचे आहे आणि चीन ला जवळ आणायचे आहे.

खेरोशन शहरांतून एक इन्स्टा मुलगी सतत लाईव्ह अपडेट्स देत होती. तिच्या मते शेकडो रशियन आणि युक्रेनियन सैनिकांच्या शरीराचा खच पडला होता. तिच्या स्वतःचा घरावर रशियन शेल्स पडले होते आणि ती नंतर आपल्या गाडीने दुसऱ्या भागांत गेली. जाताना आजूबाजूला नष्ट झालेले रशियन रणगाडे, इतर वाहने दिसत होती.

कीव

हि राजधानी आहे आणि बेलारुसला अत्यंत जवळ आहे. रशियाने बेलारूस मधून युक्रेन मध्ये आक्रमण केले आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे बेलारूस मध्ये असलेल्या रशियन सैनिकांनी बेलारूस मध्ये खूप धुडगूस घातला आणि खूप घाण केली असते बेलारूसी जनतेचे म्हणणे आहे. अर्थांत बेलारूस चा हुकूमशाह हा पुतीन च्या हातातील बाहुले असल्याने बेलारूस मधील लोकांना काय पाहिजे ह्याला कुत्रे विचारत नाही.

अमेरिकन माहिती प्रमाणे बेलारूस मधील रशियन सैन्य अत्यंत ढिसाळ होते. इतके कि काही शेकडो सैनिकांना रेल्वे स्टेशन वर सोडण्यात आले पण पुढे काय ह्याची काहीच माहिती देण्यात आली नाही. म्हणजे आपले सैनिक इथे आहेत हेच मुले रशियन नेतृत्वाला ठाऊक नव्हते. त्यामुळे ह्या सैनिकांना खायला प्यायला सुद्धा नव्हते त्यामुळे पदरमोड करत हि मंडळी आजू बाजूच्या गावांत अन्न शोधत फिरत होती. त्यासाठी त्यांनी आपले डिझेल सुद्धा लोकांना गुपचूप विकले.[७] [११]

किव वर ताबा मिळवायचा असेल तर पुतीन ह्यांना ते ताबडतोब करावे लागेल कारण खराब हवामान आणि रसद ह्या दोन गोष्टीमुळे रशियन सैनिक ह्या भागांत जास्त काळ लढू शकणार नाहीत. किव मधील हल्ले हे पुतीन ह्यांना बेलारूस मधून करावे लागतात आणि त्यासाठी बेलारूस ला पैसे आणि इतर गोष्टी द्याव्या लागतात. बेलारूस मधील जनता ह्या सर्वाला विटली आहेच. त्यामुळे जास्त काळ त्यांना इथे राहणे महागात पडेल.

ह्या २४ तासांत रशियन सैन्याने किव च्या चारीबाजुना घेरून हल्ले सुरु केले असले तरी हवाई हल्ल्याना युक्रेन ने चांगले प्रत्युत्तर दिले आहे. किव मधील विमानतळांवर १००% ताबा अजून मिळवणे त्यांना शक्य झाले नाही त्यामुळे पायदळ अजून कीव मध्ये पोचले नाही. रणगाडे तिथे पोचण्यास बराच वेळ लागेल. Hostomel ह्या विमानतळावर रशियाने काही काळ ताबा मिळवला होता पण मागील ३ तासांत युक्रेनियन सैनिकांनी पुन्हा ताबा मिळवला आहे. ह्या चकमकीत एक रशियन विमान आणि साधारण ५० सैनिक मारले गेले. [८] काही रशियन सैनिक पळून आजू बाजूच्या जंगलांत वाट चुकून भटकत होते. [९] [१०]

सुमी आणि खारकीव

किव शहरापासून जवळ असलेले हे दुसरे शहर. खारकीव हे युक्रेन मधील दुसऱ्या नंबरचे शहर हे सुमी ला फारच जवळ आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथून रशियन सीमा फारच जवळ आहे. ह्या दोन शहराचा संपूर्ण ताबा घेतल्यास रशिया इथे रसद पुरवठा आपल्या देशांतून करू शकते. बेलारूस ची गरज नाही.

रशियन सैन्याने इथे प्रचंड मार खाल्ला. आधी युक्रेनचे साधारण १५ रणगाडे विमान हल्ल्यांत रशियाने इथे उध्वस्त केले पण युक्रेन ने सुद्धा इथे अनेक रशियन रणगाडे आणि सैनिकांना कंठस्नान घेतले. [१२] इथे रस्त्यांवर शरीरांचा खच पडला आहे. लोकांनी सबवे स्टेशन मध्ये आसरा घेतला आहे. रशियन सैनिकांनी इथे सामान्य लोकांना ठार मारले. एका तरुण मुलीच्या आईची हत्या तिच्या डोळ्यापुढे केली गेली. तिचा व्हिडीओ वायरल झाला. त्याची लिंक मी इथे देणार नाही.

युक्रेनियन सैन्याने येथिल मोक्याचे पूल इत्यादी आधीच उडवून लावले आहेत. [१३] येथील एका सरकारी इमारतीवर रशियन झेंडा दिसत आहे असा एक व्हिडीओ प्रकाशित झाला होता पण हि इमारत नक्की कुठली हे अजून समजले नाही. [१३]

NPR च्या मते ह्या शहराच्या बाहेर रशियाने शेकडो रणगाडे , आणि एक हजार पेक्षा जास्त ट्रक्स आणले आहेत त्यामुळे पुढील २४ तासांत इथे रशिया आपला जम बसवेल.

सुमी शहर लहान असले तरी युक्रेनियन सैन्याने इथे मोठा तळ जमवला आहे. अनेक रशियन सैनिक इथून आपली वाहने सोडून जंगलांत पळून गेले. [ १४]

---
TLDR
१. रशियन सैन्य ह्या आक्रमणात प्रगती करत आहे आणि अपेक्षेप्रमाणे वरचढ दिसत आहे तरी सुद्धा पहिल्या २४ तासांत त्यांना जी अपेक्षा होती त्यापेक्षा त्यांनी खूप कमी प्रगती केली आहे. फक्त दक्षिण युक्रेन मधील त्यांची प्रगती त्यांच्या अपेक्षे इतकी आहे.
२. युक्रेनियन सैन्याने अपेक्षेपेक्षा जास्त चांगले प्रत्युत्तर दिले आहे आणि रशियाला प्रत्येक शहर जास्त काळ ताब्यांत ठेवणे शक्य असेल असे वाटत नाही.
३. पुढील २४ तासांत रशिया १००% कीव घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे झाले कि युद्धाचे संपूर्ण चित्र बदलेल.
४. नाटो वगैरे लोकांनी अजून पर्यंत काहीही महत्वाचे निर्णय घेतले नाहीत. रशियावरील निर्बंध सुद्धा बहुतांशी फुसके आहेत.

[१] https://twitter.com/PuskasTrumpets/status/1496976399554523141
[२] https://twitter.com/GoodestBoyJon/status/1496940271271133190
[३] https://twitter.com/ThomasVLinge/status/1496856989682573322
[४] https://twitter.com/olex_scherba/status/1496850538478153736
[५] https://twitter.com/BNONews/status/1497008145893400577
[६] https://twitter.com/aletweetsnews/status/1497008826201124870
[७] https://www.theguardian.com/world/2022/feb/23/harsh-conditions-mean-russ...
[८] https://twitter.com/DAlperovitch/status/1496960079114952706, https://twitter.com/KyivIndependent/status/1496950008339484672,
https://twitter.com/Militarylandnet/status/1496805284068700161
[९] https://twitter.com/JaminLiouFu/status/1496963061353263116
[१०] https://twitter.com/NJExecutive/status/1496966840832061463
[११] https://twitter.com/NJExecutive/status/1496966840832061463
[१२] https://twitter.com/ThomasVLinge/status/1496810342038622210
[१३] https://twitter.com/OSINT_Ukraine/status/1496947184159399940
[१४] https://twitter.com/worldonalert/status/1497020907549868037, https://twitter.com/michaelh992/status/1496962758641922048

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2022 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपशीलवार वार्तांकनामुळे सर्व परिस्थितीचा अंदाज येत आहे.

-दिलीप बिरुटे

सुखीमाणूस's picture

25 Feb 2022 - 8:10 am | सुखीमाणूस

चान्गले वार्तन्कन असे म्हणवत नाही पण खरच पुर्ण माहीती मिळाली.

Trump's picture

25 Feb 2022 - 11:11 am | Trump

+१

सुबोध खरे's picture

25 Feb 2022 - 10:14 am | सुबोध खरे

रशिया बहुधा युक्रेन वर संपूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु तेथील पाश्चात्य धार्जिणे सरकार उलथून आपले बाहुले सरकार बसवण्याचा प्रयत्न करेल. त्यांची मूळ मागणी हीच आहे कि युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळू नये.

युक्रेन ताब्यात ठेवून तेथे कायम आपले सैनिक तैनात करून ठेवणे हे रशियाला फार महागात पडेल हे इतर देशांना चांगलेच माहिती आहे त्यामुळे युक्रेनच्या लष्कराला केवळ शस्त्रास्त्रे पुरवण्यापेक्षा जास्त अमेरिका( आणि नाटो) काहीच करणार नाही. पैसे फेकणे हे अमेरिकी सरकारला नवे नाही पण आपले सैनिक उतरवायला सज्जड कारण पाहिजे आणि तिसऱ्या देशासाठी आपले सैनिक रशियन लष्कराकडून मारवून घेणे हे कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाला परवडणारे नाही. शिवाय अमेरिकी सैनिक ( यदाकदाचित) आलेच तर रशियन सैनिक त्यांना दुप्पट उत्साहाने मारण्यास पुढे येतील.

युक्रेन मध्ये कुणाचेही सरकार आले तरी अमेरिक आणि त्यांच्या मांडलिक युरोपी सत्ताना काहीच फरक पडणार नाही.

Ukraine exports mainly steel, coal, fuel and petroleum products, chemicals, machinery and transport equipment and grains like barley, corm and wheat. More than 60% of the exports goes to other former Soviet Republics countries with Russia, Kazkhstan and Belarus being the most important. Others include Turkey and China.

यात असं कोणतंही अत्यंत महत्त्वाचं उत्पादन नाही ज्यावाचून पाश्चात्य देशांचे काही अडेल.

उगाच यामुळे तिसरे महायुद्ध होईल म्हणून जगबुडी आली असा आव आणणारे तोंडावर पडतील हे नक्की.

तिसऱ्या महायुद्धाची शक्यता कमीच आहे. अमेरिकन निर्बंध सुद्धा पूर्णपणे फुसके निघाले त्यामुळे उद्या रशियन मार्केट सुद्धा साधारण १०-२०% वर येईल असे वाटते. पुतीन वर वैयक्तिक निर्बंध टाकले जातील का ह्या प्रश्नाला बायडन ह्यांनी उत्तर नाही दिले. त्याशिवाय रशियन ऊर्जा आयातीवर परिणाम होईल असे कुठलेही निर्बंध टाकले जाणार नाहीत असे ढळढळीत स्पष्ट केले. ह्यावरून अमेरिकन आणि मित्र देशांनी युक्रेन ला write off केले आहे असे स्पष्ट होते.

NATO देशांनी अक्षरशः हिजड्यांची फौज निर्माण केली आहे. gender ट्रेनिंग, क्लीन फ्युएल, सोलर असल्या थेरांवर पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे युद्ध झाले तरी अमेरिकन सोडल्यास इतर देशांकडे युद्ध करण्याची कुवत सुद्धा आहे असे वाटत नाही.

जर्मन general ने खालील स्पष्टवक्तेपणा दाखवला.

"In my 41th year of peace-time service, I would not have thought that I would have to experience a war," Lieutenant General Alfons Mais said on LinkedIn on Thursday.

"And the Bundeswehr, the army which I have the honour to command, is standing there more or less empty-handed. The options we can offer the government in support of the alliance are extremely limited."

---

खंडीय युरोपियन देशांनी अमेरीकी तैनाती फौज स्विकारली आहे. दुसर्‍या महायुध्द्दानंतर जर्मनी आणि जपान यांनी मोठ्या फौजा घेऊन, लष्करी ताकद होऊ नये अशी विजेत्यांची इच्छा होती. त्यामुळे जर्मनीच्या सैन्याधिकार्‍याचे बोलणे गैरलागु आहे.
जर्मनी पुन्हा लष्करीकरणाकडे जाईल असे वाटत नाही. त्यासाठी पुन्हा राष्ट्रवादाचे आवाहन करावे लागेल. सध्या तरी त्याला कोणी तयार होईल असे वाटत नाही. जर्मनीची आणि युरोपची अर्थव्यवस्था उत्तम , लोकांना सुबत्तेची सवय आहे. कोणी युक्रेनमध्ये लढायला जाणार नाही.

sunil kachure's picture

25 Feb 2022 - 10:37 am | sunil kachure

रशिया
1) जगातील सर्वात मोठा आकार असलेला देश.
२) लोकसंख्या खूप कमी.
३) बहुसंख्य ख्रिस्त धर्मीय,
त्या मुळे धार्मिक संघर्ष होण्याची शक्यता कमी.
४) तंत्र आणि विज्ञान ह्या मध्ये आघाडीवर.

अवकाश मोहिमा आणि अण्वस्त्र बनवण्यात आघाडीवर होता.
सीमा वाद कोणत्याच देशाशी नाही.
विपुल जमीन म्हणजे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती
बलदंड लष्करी takat.
इतके सर्व ज्या देशांकडे आहे तो देश जगात सर्व च बाबतीत आघाडी असण्याला काहीच अडचण असण्याचे कारण नव्हत.
भारत नी धार्मिक संघर्ष,जातीय वाद,गरिबी, सीमेवर तणाव , तंत्र आणि विज्ञान ह्या मध्ये खूप उशिरा कार्य चालू केले तरी प्रगती केली.
मग रशिया कडे सर्वच बाबी अनुकूल आहेत.
त्यांनी अमेरिका काय एकत्र पूर्ण जगाला मागे टाकून खूप प्रगती करायला हवी होती.

sunil kachure's picture

25 Feb 2022 - 10:38 am | sunil kachure

फक्त माती विकली तरी खूप श्रीमंत होईल इतकी माती पण त्यांच्या कडे आहे.

साहेब, तुम्ही कोणत्या काळात राहता? तुमचे बरेचसे प्रतिसाद चहा पित पीत मारलेल्या गप्पा वाटतात.

sunil kachure's picture

25 Feb 2022 - 2:32 pm | sunil kachure

मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची खरी उत्तर द्यायची झाली तर हजार पान पण पुरणार नाहीत.
खूप गंभीर प्रश्न मी उपस्थितीत केलेले आहेत.

युक्रेन युध्दाचा अजुन एक युरोपियन लोकांना फायदा, चांगले शिकलेले आणि हुशार लोक युरोपमध्ये येतील, त्यामुळे युरोपमधील उद्योगांना स्वस्त मजुर मिळतील.
सध्या पाश्चात्य देशांना चांगल्या मजुरांची चणचण आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी मजुर येत राहीले तर उद्योगांना नक्कीच फायदा होईल.

हेच तैवान, गिल्गिट - बाल्टीस्तान आणि काश्मिरला लागु आहे.

The world can’t afford a war over Ukraine. Both sides must return to negotiating table
https://indianexpress.com/article/opinion/editorials/world-cannot-afford...

आपल्या विरोधकांचे कौतुक करण्याइतपत मनाचा उदारपण नक्कीच श्री टंपमध्ये आहे.

विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी यार असल्यासारखं आहे दोघांचं वागणं. आत्ता रशियन मीडिया सातत्याने ट्रम्प पुतीनचे कसे कौतुक करतोय हे दाखवतीये.
https://www.google.com/amp/s/www.rt.com/russia/550312-trump-putin-savvy-...

विरोधकांचे मन जिंकुन त्यांना आपलेसे करण्यातच खरे गम्य आहे.

हाहा
चांगला जोक केला बघा.

माझ्या वक्तव्याने तुम्हाला आंनद झाला हे पाहुन छान वाटले.

sunil kachure's picture

25 Feb 2022 - 1:16 pm | sunil kachure

आताच सहज म्हणून नजर टाकली.
आज तक च्या महान न्यूज वाचायला मिळाली
१)आखिर क्यू चाहिए रशिया को युक्रेन की जमीन.
२) बचाव मोदी जी.
युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी ची हाक.

रशिया जगातील सर्वात मोठा देश आहे त्याला युक्रेन ची जमीन ची काही गरज नाही.
युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी kg मध्ये शिकत नाहीत
त्यांनी स्वतः च देश का नाही सोडला.
आज तक च्या वरील दोन्ही हेड लाईन म्हणजे मूर्ख पणाच कळस आहे.
सरकार नी न्यूज चॅनेल चालवण्यासाठी परवानगी देताना न्यूज च दर्जा काय असावा ह्याची अट ठेवलीच पाहिजे.

नाही तर भारतीय मीडिया देशाला जगात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीं

क्रिमिया: एक रशियन दृष्टीकोन.

How Crimea became part of Russia and why it was gifted to Ukraine
Jewish enclave, home of a deported nation, a present for the Ukrainians: The difficult history of Russian Crimea
https://www.rt.com/russia/549962-peninsulas-complex-fate-how-crimea/

शाम भागवत's picture

25 Feb 2022 - 2:31 pm | शाम भागवत

रशिया व अमेरिका हे स्वार्थी आहेत व ते फक्त त्यांचे उद्दीष्ट्य पूर्ण करत आहेत असे वाटते.

मला वाटते की युक्रेनच्या शरणागतीनंतर अमेरिका व रशिया दोधेही विनविन सिच्युएशन मधे असणार आहेत.

युक्रेनचं काहीही होवो. नविन पाईपलाईन सुरू झाली नाही पाहिजे हे उद्दीष्ट आहे अमेरिकेचे. ते साध्य झालंय. जर्मनीने नविन पाईपलाईनचा वापर सुरू करण्याची वेळ बेमुदत पुढे ठकललीय.
पुतिनला पूर्विचा रशिया परत उभा करायचाय. तो एकेक प्रांत परत मिळवतोय.

अमेरिका व रशिया दोघेही खूष. अमेरिका जरा जास्तच खूष. एवितेवी युक्रेन रशियाच्या घशात जाणारच होता. तर मग चांगल्या स्थितील युक्रेन ऐवजी खराब स्थितीतला युक्रेन गेला तर आणखीन बरं. त्यासाठी त्याच्या मागे असल्याचे दाखवून त्याला लढाईला प्रवृत्त करणे आवश्क होते. ते अमेरिकेला नक्की जमलेलं आहे. शिवाय युक्रेनिअन लोकं रशियनांविरूध्द आता आणखीनच संतापलेली असणार. त्यामुळे युक्रेन ताब्यात ठेवण्याची रशियाची किंमतही जास्त असणार. युध्दात जेवढी रशियाची हानी होईल तो अमेरिकेचा बोनस. ;)

मधल्यामधे पाकिस्तानचा मामा बनणार आहे. रशियाचा भेटीची जबरदस्त किंमत अमेरिका पाकिस्तानकडून वळती करणार असं दिसतंय. ग्रे लिस्टमधे जातोय की काय? दोन बैलांच्या झुंझीत हे बारकूस पिल्लू कशाला मधे गेलं कुणास ठाऊक? तैवान बाबतचा रशियाचा पाठिंबा ही एक खेळी आहे हे न कळण्या इतपत चीन मूर्ख नक्कीच नाही. पण या गुगलीला इम्रानसाहेब गंडले की काय? :)

रात्रीचे चांदणे's picture

25 Feb 2022 - 2:49 pm | रात्रीचे चांदणे

आज भारताचीही परीक्षा असणार आहे, UN मध्ये आज राशियाविरुद्ध अमेरिका ठराव आणण्याची शक्यता आहे. अर्थातच रशिया आणि चीन त्याला विरोध करणार. आपण काय करणार हे आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. यापूर्वी रशियाने प्रत्येक वेळी आपल्याला मदत केली आहे.

शाम भागवत's picture

25 Feb 2022 - 3:07 pm | शाम भागवत

तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी करून प्रश्न सोडवा असं काहीसं म्हणत राहणे.
अमेरिका व रशिया दोघांनाही हेच अपेक्षीत असणार आहे.
:))