तिसऱ्या भागांत आम्ही मुक्त समाज (Free Society) ह्यांच्या बद्दल पाहणार आहोत.
मुक्त समाज म्हणजे नक्की काय ? अमेरिका आणि रशिया/चीन ह्यांत काय मूलभूत फरक आहे ? हाच फरक काही अंशाने युरोप आणि भारताला सुद्धा लागू पडतो.
PJ ओरुरके ह्यांचे कालच निधन झाले. त्यांचे एक व्यक्तव्य ऐकू.
> I had one fundamental question about economics: Why do some places prosper and thrive while others just suck? It’s not a matter of brains. No part of the earth (with the possible exception of Brentwood) is dumber than Beverly Hills, and the residents are wading in gravy. In Russia, meanwhile, where chess is a spectator sport, they’re boiling stones for soup. Nor can education be the reason. Fourth graders in the American school system know what a condom is but aren’t sure about 9 × 7. Natural resources aren’t the answer. Africa has diamonds, gold, uranium, you name it. Scandinavia has little and is frozen besides. Maybe culture is the key, but wealthy regions such as the local mall are famous for lacking it.
> Perhaps the good life’s secret lies in civilization. The Chinese had an ancient and sophisticated civilization when my relatives were hunkering naked in trees. (Admittedly that was last week, but they’d been drinking.) ***In 1000 B.C., when Europeans were barely using metal to hit each other over the head, the Zhou dynasty Chinese were casting ornate wine vessels big enough to take a bath in***—something else no contemporary European had done. Yet, today, China stinks.
भारत, अफगाणिस्तान, चीन, मंगोलिया, इराण, इराक, सीरिया, इजिप्त सारखे देश जे एके काली समृद्ध आणि पुढारलेले होते ते आज इतके अगतिक आणि बास्केट केस कसे आहेत ? हा बदल नक्की का घडला ? असुंसंस्कृत आणि अत्यंत हिंसक असे पाश्चात्य देश अचानक का पुढे गेले आणि आज सुद्धा आहेत ?
युरोपिअन आणि अमेरिकेचा इतिहास रक्तरंजित आहे. वंशभेद, प्रचंड भांडणे, विविध लोकांवर आणि आपल्याच लोकांवर अत्याचार, पराकोटीचा द्वेष आणि इतर अनेक वाईट गोष्टी ह्या पाश्चात्य समाजांत आम्हाला दिसून येतात. पण मागील १००० वर्षांत पाश्चात्य प्रदेशाने प्रचंड प्रगती केली आहे हे दिसून येते. आणि हि प्रगती फक्त आर्थिक नसून बौद्धिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सुद्धा आहे. विविध समस्या हा समाज संथ गतीने का होईना पण सोडवत आला आहे. ह्याचे मूळ कारण हे आधुनिक समाज ज्या तत्वांवर आधारित आहेत ती तत्वे आहेत.
हॉबेस, लोके, ह्यूम, ऍडम स्मिथ, प्लेटो आणि असंख्य विचारवंतांची जी मांदियाळी पाश्चात्य राष्ट्रांत निर्माण झाली त्यांनी ह्या देशांचा पाया घातला. ह्यांच्या जोडीला मार्क्स किंवा अंगेल्स सारखे लोक सुद्धा होते ह्यांचे ह्या लोकांच्या विरोधांत होते पण शेवटी विजय लोके सारख्यांचा झाला. एक गोष्ट इथे लक्षांत घेतली पाहिजे कि राजकारणी मंडळी इथे पूर्णतः अप्रासंगिक ठरली. अमेरिका इथे अपवाद आहे. अमेरिकेचं संस्थापक हे निव्वळ अमेरिकन लोकांच्या भाग्याने अत्यंत उच्च दर्जाचे विचारवंत आणि राजकारणी होते.
ऋग्वेदांतील "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" हि ओळ परवाच मला एका गोऱ्या माणसाने ऐकवली. त्याच्या मते तुमच्या कुठल्या ऋषी मुनींनी स्वतःला "विश्वगुरू" वगैरे म्हटले ? जे लोक सतत चांगल्या विचारांच्या शोधांत राहतात त्यांना स्वतःला विश्वगुरू म्हणून बढाया मारायला वेळ नसतो.
पण "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" हे तत्व पाश्चात्य राष्ट्रांनी अत्यंत चांगल्या प्रकारे रुजवले. १७व्या शतकांतील लोके हा विचारवंत कदाचित जगांतील सर्वांत प्रभावशाली विचारवंत असावा. "खाजगी मालमत्ता" आणि "वैयक्तिक स्वातंत्र्य" ह्या दोन मुल्याना त्यांनीच प्रभावी पणे दोन अत्यावश्यक गोष्टी म्हणून लोकांपुढे ठेवले. ह्या दोन्ही गोष्टींत नावीन्य नव्हते. ह्या गोष्टी विविध रूपांत प्लेटो पासून असंख्य विचारवंतांनी पाश्चात्य देशांत मांडल्या होत्या. चर्च आणि सरकारने वेगळे असावे हा मुद्दा सुद्धा लोके ह्यांनीच प्रभावशाली पद्धतीने मांडला.
पण लोके ह्यांचे सर्वांत प्रभावी लेखन माझ्या मते "मानवी मनाची मर्यादा" ह्या विषयवार होते. मानवी अस्तित्व आणि विचार दोन प्रकारचे आहेत. अनुभव आणि ध्यान.
> Experience is of two kinds, sensation and reflection. One of these—sensation—tells us about things and processes in the external world. The other—reflection—tells us about the operations of our own minds. Reflection is a sort of internal sense that makes us conscious of the mental processes we are engaged in. Some ideas we get only from sensation, some only from reflection and some from both.
( लोके ह्यांचा हा विचार १००% ऋग्वेदांतील दीर्घतमस ह्यांच्याशी मिळता जुळता आहे. दीर्घतमस ह्यांनी माझ्या माहिती प्रमाणे ऋग्वेदांत फक्त ४ ओळी लिहिल्या. एक ओळींत ते दोन पक्ष्याबद्दल बोलतात. "एक पक्षी फळ खात आहे तर दुसरा पक्षी पहिल्या पक्ष्याला फळ खाताना बघत आहे." इतकीच हि ओळ आहे पण ह्याच ओळींतून पतंजली इत्यादींनी योग ची संकल्पना निर्माण केली. पहिला पक्षी जीवनाचा उपभोग घेत आहे, पण दुसरा पक्षी त्या उपभोगावर मनन करत आहे. )
हा विचार लोके ह्यांनीच मांडला असे नाही, लोके ह्यांच्या आधी अनेकांनी हा विचार विविध पद्धतीने मांडला होता. चर्च ची पोथीनिष्ठता, आणि आम्हाला सर्व ठाऊक आहे हा attitude कदाचित विविध लोकांना आवडत नव्हता आणि त्यातूनच मानवी क्षमतेला मर्यादा आहेत हा विचार पाश्चात्य विचारपद्धतीत उदयास आला. लोके नंतर ऍडम स्मिथ ह्यांनी नंतर १८व्य शतकांत "अदृश्य हात" ह्या स्वरूपांत हा विचार मांडला.
( अवांतर : साधारण १७व्या शतकांत अमेरिकेतील प्लायमौथ इथे काही गोरे वसाहतवादी आले. त्यांनी सर्वानी मिळून सामाजिक शेती करायचे ठरवले. मार्क्स च्या आधीच हे कलेक्टिव्ह फार्मिंग चालू झाले होते. सर्वानी मिळून जमीनीत घाम गाळायचा आणि नंतर पीक मात्र गरजेप्रमाणे वाटून घ्यायचे. जमिनीची मालकी सर्वांची राहील. म्हणजे तुम्ही २० वर्षांचे तरुण आहात तर तुम्ही दिवस भर राबायचे. पण तुमचा शेजारी ज्याला १ बायको नि ३ मुले आहेत त्याला मात्र तुमच्या पेक्षा ४ पट जास्त धान्य मिळेल असा हा मॉडेल होता. हा कोसळला. चोरी आणि कामचुकारपणा वाढली. शेवटी उपासमारीची पाळी आली. काही अमेरिकन जमातींनी ह्यांना मदत केली म्हणून हि मंडळी तग धरून राहिली. सुएदॆवाने ह्या गोऱ्या लोकांचा म्होरक्या पोथीनिष्ठ साम्यवादी नव्हता. त्याने निरीक्षण करून आपला मॉडेल चुकीचा आहे हे पहिले आणि दुसऱ्या वर्षी प्रत्येक कुटुंबाला ठराविक जमीन वाटून दिली, आपल्या जमिनीचे वाट्टेल ते करा असे स्वातंत्र्य दिले. त्या वर्षी त्यांना भरगोस पीक आले. त्यातून त्यांनी अमेरिकन जमातींना जी मेजवानी ठेवली त्याला आपण अमेरिकन थॅंक्सगिविंग म्हणून साजरे करतो. )
१७ व्या शतकांत खाजगी मालमत्ता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानवी मनाच्या मर्यादा ह्या तिन्ही संकल्पना सर्वच पाश्चात्य राष्ट्रांनी आत्मसात केल्या. रॉयल सोसायटी जी लोके इत्यादींनी अतिशय अनॊपचारिक रित्या निर्माण केली होती तीला औपचारिक रित्या राजाची मान्यता मिळाली.
व्ययक्तीक स्वातंत्र्य ह्याचा अर्थ लोक अनेकदा स्वैराचार असा घेतात. स्वैराचार ह्यांत अंतर्भूत असला तरी निव्वळ तो एकमेव फायदा नाही. आम्हाला सर्वच प्रश्नाची उत्तरे ठाऊक नाहीत त्यामुळे विविध लोकांनी विविध प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून पहिले आणि त्यांना आम्ही अभय दिले तर काही लोक योग्य मार्ग शोधून काढतील आणि इतर लोक हळू हळू त्याचे अनुकरण करतील आणि त्यामुळे ज्या गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी आहेत त्या काळाच्या ओघांत सिद्ध होत जातील. प्रत्येक व्यक्ती हि शेवटी आपला फायदा पाहते आणि जेंव्हा दोन व्यक्ती निव्वळ आपल्या फायद्यासाठी एकत्र येऊन सहकार करतात तेंव्हा दोघांचाही फायदा होतो आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा फायदा होतो. असा हा विचार होता.
त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मालमत्तेचे स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे ठळक पणे पाश्चात्य मूल्ये म्हणून पुढे आली.
माझ्या मते हि मूल्ये १००% बरोबर होती पण ती अमलांत आणणे हे शेवटी सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून होते. वंशभेद, धर्मभेद आणि अनेक संकटांनी युरोपिअन समाज ग्रासला होता. आजही ग्रासला आहे, पण आपली मूल्ये बरोबर असली कि आपोआप भविष्य सुधारत जाते. तेच ह्या समाजांत घडले. काळाच्या ओघांत हे समाज जास्त प्रगल्भ बनत गेले. ह्याचा अर्थ आज ह्या समाजांत समस्या नाहीत असा कुणीही घेऊ नये. समस्या असंख्य आहेत पण इतर मागासलेल्या देशांत आहेत त्या नाहीत, वेगळ्या पातळीच्या समस्या आहेत.
पाश्चात्य देशांत आज टोकाच्या भूमिका दिसून येतील. ह्या टोकाच्या भूमिका मागील ३०० वर्षांपासून तिथे आहेत, पण मतभेद असताना सुद्धा एकत्र येऊन वाटाघाटी करून, एकमेकांची मनधरणी करून मार्ग काढावा इतपत त्यांनी प्रगती केली आहे. ह्या मुळे विविध विचार, काही विचार टोकाचे वाटले तरी चांगले विचार काय आणि वाईट विचार काय ह्याचे कोडे हळू हळू उलगडत जाते. शॉर्ट टर्म मध्ये देशांत संकटे आहेत असे वाटले तरी लॉन्ग टर्म मध्ये देशाची स्तिथी सुधारत जाते. पाश्चात्य देश बाहेरून असंबद्ध, गोंधळलेले, सतत आंदोलनांनी ग्रासलेले असे दिसतात. सत्तेत कुणीही असो, लोक हे सरकारवर खुश नाहीत असे दिसून येते. पण इतकेही असून सोविएत सारख्या देशांना हे देश पुरून उरले कारण शेवटी ते ज्या तत्वावर आधारित होते ती अत्यंत मजबूत होती.
स्वातंत्र्य मग ते कुठल्याही प्रकारचे असो त्याचा फायदा स्वातंत्र्याच्या आनुपातिक रूपांत मिळतो. म्हणजे एखादा समाज समाज १०% जरी अधिक स्वतंत्र झाला तर त्या समाजाला त्याच प्रमाणात फायदा होतो. ९० मधील भारतातील सुधार हे तसे पाहायला किरकोळ होते कारण आज सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था सरकारी बुटाखाली भरडली जात आहे, पण त्या थोड्याश्याच जास्त आर्थिक स्वातंत्र्याने भारताने प्रचंड प्रगती केली.
ह्याच्या उलट बंदिस्त समाज म्हणजे चीन किंवा रशिया आहेत. एके काळी भारत सुद्धा होता. बंदिस्त समाजांत विचारांचे स्वातंत्र्य नाही त्यामुळे डार्विन चा सिद्धांत इथल्या विचारांवर चालत नाही. फक्त राष्ट्रेच बंदिस्त असतात असे नाही तर धर्म सुद्धा असू शकतो. कॅथॉलिक चर्च सुद्धा एक अत्यंत बंदिस्त विचारसरणी होती. आपण कुठे तरी चुकतो आहोत हा फीडबॅक ह्या समाजांत लोकांना मिळत नाही. त्यामुळे त्या चुका सुधारण्याची क्षमता कमी कमी होत जाते. मग कुठला विचार योग्य आणि कुठला विचार योग्य नाही ह्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी फार कमी लोकांवर येऊन पडते. मानवी मनाच्या मर्यादा तिथे उघड्या पडतात.
सोविएत मधील एक किस्सा आहे. एक जवळ जवळ अडाणी माणूस निव्वळ आपल्या राजकीय क्लुप्त्या वापरून सोविएत मध्ये संशोधक बनला. लेनिन च्या मदतीने त्याने सामाजिक शेती हा उपक्रम राबविला. हा माणूस अत्यंत अवैज्ञानिक अश्या गोष्टींना विज्ञानाच्या नावाखाली पसरवत होता पण आपल्या तथाकथित संशोधनाला तो मार्क्स च्या विचारांशी जोडत होता त्यामुळे त्याला विरोध करणे म्हणजे मार्क्स वर टीका करणे होते. शेवटी ह्याच्या गोधळाने सोविएत मध्ये दुष्काळ पसरला आणि लाखो लोक मेले. [२]
> Lysenko believed that successive generations of crops could be improved by exposing them to the right environment, and so too could successive generations of Soviet citizens be improved by exposing them to the right ideology.
अश्या प्रकारचे विचार काही सोविएत मध्ये होते असे नाही तर अमेरिकेत सुद्धा होते आणि आज सुद्धा आहेत, फक्त त्यांच्यावर टीका करणे अमेरिकेत शक्य होते आणि आहे. ट्रम्प ह्यांची समर्थक इमिग्रंट विरोधी संघटना जश्या CIS, NumbersUSA इत्यादी अमेरिकेत tanton network म्हणून ओळखली जातात. प्रो गर्भपात अश्या ह्या संघटना विचित्र पद्धतीने ट्रम्प समर्थक आहेत. Tanton हे एक नेत्रविशारद होते पण त्यांच्या मते अमेरिकेत गोऱ्या व्यतिरिक्त इतरांना प्रजननाचा अधिकार द्यायलाच नको होता आणि बिगर गोऱ्या लोकांची जबरदस्तीने नसबंदी करायला हवी होती. ह्याला अमेरिकेत eugenics असे संबोधित केले जाते. पण कायदेशीर दृष्टया ते शक्य नसल्याने त्यांनी soft युजेनिकस हि संकल्पना आणली म्हणजे थेट कायदे निर्माण न करता असे वातावरण निर्माण करणे कि बिगर गोऱ्या लोकांना प्रजनन करणे शक्य होऊ नये, शक्य झाले तरी त्या मुलांना योग्य प्रकारे वाढवण्याची संधी मिळू नये इत्यादी. बर्नी सँडर्स ह्यांचे फॅन, climate वॉरिअरर, प्रो गर्भपात आणि इतके असून सुद्धा ट्रम्प चे खंदे समर्थक असे हे विचित्र प्रकरण आहे.
सांगण्याचे प्रयोजन हेच कि मूर्ख लोक सर्वच समाजांत असले तर काही समाजांत मुर्खांना लवकर बाजूला फेकले जाते तर काहींमध्ये तसे शक्य होत नाही. त्यामुळे एक समाज सुधारतो तर दुसरा सुधारत नाही.
माझ्या मते सोविएत चे पडणे हे inevitable होते. ते टाळता येणे शक्य नव्हते कारण मानवी मनाच्या मर्यादा. आपले नेते आणि सेंट्रल प्लँनर कितीही विद्वान असले तरी शेवटी त्यांच्या क्षमतेला मर्यादा आहेत. कधी कधी चुकीचे व्यक्ती ह्या जागी पोचतील. ह्यांनी चुकीचे निर्णय घेतले कि मग त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. व्हायच्या उलट मुक्त समाजांत कुणीही नेता झाला तरी त्याचे प्रखर विरोधक असतीलच त्यामुळे त्या सर्वाना बर्बर घेऊन चालण्याच्या नादात टोकाची भूमिका शक्य होणार नाही. हळू हळू समाज बदलेल आणि नवीन मूल्ये आत्मसात करेल. त्याच कारणासाठी माझ्या मते चीन चे विभाजन हे अटळ आहे. चिनी साम्यवादी पार्टी आज ना उद्या कोसळणार. कम्युनिस्ट पार्टीच्या हातून १-२ चुका जरी झाल्या तरी ते पुरेसे ठरेल.
चीन किंवा रशिया ह्यांची मूल्ये पाश्चात्य समाजापेक्षा पूर्णता वेगळी आहेत. सत्ता हि काही लोकांच्या हाती एकवटायची, ह्या लोकांनी मग इतर सर्वांसाठी निर्णय घ्यायचे आणि लोकांनी निमूट पणे ते केलेले नियम पळून गुपचूप काम करायचे. प्रसंगी सरकार हिंसा सुद्धा वापरून लोकांना रेषेंत ठेवू शकते. इथे वैयक्तिक स्वातंत्र्य नाहीच पण सर्व लोक हे सरकारची मालमत्ता असल्याप्रमाणे वागवले जातात.
माझ्या दृष्टिकोनातून कुठली मूल्ये जगांत रुजणार आणि कुठली मूल्ये नाहीशी होणार हे अत्यंत स्पष्ट आहे.
** भारताची भूमिका **
ह्यावर माझी भूमिका मी भारतीय आणि लिबरटेरिअन असल्याने पूर्वग्रह दूषित असू शकते. माझ्या मते जुनी भारतीय मूल्ये हे बऱ्याच अंशी आधुनिक पाश्चात्य मूल्यांशी मिळती जुळती आहेत तर आधुनिक भारतीय सरकार जे अजूनही जुनाट ब्रिटिश २.० असून सोविएत शी मिळते जुळते आहे. कुठे तरी भारतीयांची आंतरिक स्वातंत्र्याची ओढ आणि जाचक सरकार ह्यांचे सतत भांडण देशांत चालू असते. हळू हळू जुन्या मूल्यांचा ऱ्हास आणि त्याच्या जागी काही तरी आफ्रिकन छाप "whataboutry" ह्यांनी जागा घेतली आहे.
देशांतील कुठलाही विषय घ्या, राम मंदिर पासून आरक्षण पर्यंत आणि हिजाब पासून शेती कायदा पर्यंत कुठेही देशांतील कुठलीही बाजू आपला प्रिन्सिपल काय हं हे स्पष्ट पाने सांगू शकत नाही. प्रत्येक भूमिका हि शेवटी त्यावेळी फायदा काय आहे हे पाहून घेतली जाते. आणि फक्त राजकीय लोकच नाहीत तर सर्व सामान्य विचारवंत सुद्धा असेच वागतात. शेवटी भारतीय म्हणून आपण कुठल्या मुल्याना उचलून धरू ह्यांत लोकांत कमालीचा संभ्रम आहे.
चीन रशिया, पाशात्य देश हे सर्व सध्या बिग boys क्लब असले आणि भारताला त्यांत विशेष स्थान नसले तरी भारत ह्या समीकरण महत्वाचा देश ठरू शकतो, पण राष्ट्र म्हणून जो पर्यंत आपण आपली मूल्ये व्यवस्थित शोधत नाही तो पर्यंत आम्हाला मागेच राहावे लागेल.
प्रतिक्रिया
17 Feb 2022 - 3:49 pm | Trump
हा भाग छान झाला आहे.
पाठीमागे मी 'कोणाकडुन काय घ्याल?' https://misalpav.com/node/49701 हा लेख इतरांपासुन काय शिकता येईल त्यासाठी लिहिला होता.
अजुन काही फरक
१. भारतात हिदु-मुस्लीम वाद पाचवीला पुजलेला आहे. जेव्हा फाळणी झाली तेव्हा जर लोकसंख्येचे स्थानांतरण झाले असते तर हा प्रश्न केव्हाच मिटला असता. किती उर्जा, वेळ ह्या गोष्टींची चर्चा करण्यात गेला आहे त्याला मर्यादा नाहीत.
२. व्यवहारीकता आणि नातेसंबधः भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडात, चांगले शेजारी, चांगले सहकारी (म्हणजे उत्तम औपचारीक नाते) होण्यापेक्षा अ तिशय जिव्हाळ्याचे नाते (अनोपचारीक नाते) कसे होईल त्याकडे कल असतो. दुर्देवाने ते बरेचदा जमत नाही. अशा लोकांना नाही म्हणणे, कोणतीही चुक दाखवुन देणे, कोणतीही सुधारणा सांगणे म्हणजे जिकीरीचे असते.
३. व्यवहारीक निर्णय न घेणे: सर्वसाधारणपणे भावनेवर आधारीत निर्णय घेणे. तात्कालिन तोटा बघुन भविष्यातील फायदेशीर निर्णय न घेण्याची वृत्ती.
४. व्यक्तीपुजा: अगदी भयंकर. कोणत्याही इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तीच्या चुका दाखवणे म्हणजे माहोळ उठवणे. बर्याचशा महापुरुषांची पराभव त्यांच्या अंधअनुयानीच केला.
५. व्यक्तीसापेक्ष किंवा समाजसापेक्ष कायदा: ज्यांच्याकडे पैसा आणि (स्नायु)बल आहे ते हवे त्या प्रकारे कायदा वापरुन (किंवा वाकवुन) आपला मनसुबा पार पाडतात. सर्वसामान्य जनता म्हणजे विचारी मुकी गाढवे.
६. स्वस्त मुल्ये/ किंमत किंवा जीवः अगदी थोडे पैसे किंवा लालुच दाखवुन सहजपणे लोक आपल्या देशाविरुध्द, समाजाविरुध्द भांडायला, लढायला तयार मिळतील.
७. पोकळापणा: जगामध्ये कोणी विचारत नसताना उगाचच स्वत:ला विश्वगुरु किंवा तत्सम म्हणणे, विनाकारण उदारपणा दाखवणे.
---------------------
बरेचदा इतरासाठी भारत म्हणजे Caste, Cow and Currry इतकेच असतो.
17 Feb 2022 - 4:42 pm | Trump
अजुन शिस्त, एकमेकांविषयी (विशेषतः निम्नस्तरीय मजुर वर्गाविषयी असलेला आदर) इ. अजुन बरेच काही लिहीता येईल.
17 Feb 2022 - 5:51 pm | साहना
> जगामध्ये कोणी विचारत नसताना उगाचच स्वत:ला विश्वगुरु किंवा तत्सम म्हणणे, विनाकारण उदारपणा दाखवणे.
विश्वगुरू शब्दाचा मला कमालीचा संताप वाटतो. घरी साधी प्राथमिक शाळा निर्माण करण्यासाठी साधे कायदे सुद्धा न करू शकणारी मंडळी निर्लज्ज पणे स्वतःला "विश्वगुरू" म्हणून लागतात तेंव्हा किळस वाटते. आमच्या ऋषी मुनींनी स्वतःला "विश्वगुरू" वगैरे म्हणून मिरवले नाही, किंवा कुठल्याच विद्वान पुरुषाने अश्या प्रकारे आपलीच लाल असे म्हटले नाही. स्वतःला विश्वगुरू म्हणणे बौद्धिक दिवाळ खोरी आहे.
18 Feb 2022 - 4:01 am | साहना
फरक मूळ तत्त्वांत आहे. आपण उल्लेख केलेल्या गोष्टी निव्वळ त्याच्या सिम्टम आहेत.
कायदा जर स्पष्ट आणि सर्वाना समान लागू होतो तर हिंदू-मुस्लिम वाद उद्भवण्याचा प्रश्न शक्यतो येत नाही. बहुतेक वाद हे कायद्याच्या चौकटींत राहून सोडवता येऊ शकतात आणि कायद्याची मूळ तत्वे लोकांना मान्य असेल तर लोक सुद्धा कायद्याच्या बाजूने राहतात.
फाळणीत सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते तर हिंदू मुस्लिम वाद राहिला नसता हे बरोबर आहे पण त्याची जागा कदाचित प्रांत भेद, भाषा भेद आणि जात भेद ह्यांनी घेतली असती. मुंबईत इस्लामचा विशेष प्रभाव नव्हता तेंव्हा मराठी विरुद्ध मद्रासी अशी भांडणे होत. हल्ली हल्ली दलित - सवर्ण वगैरे दंगली/बंद घडल्या आहेत. ह्याचे मूळ कारण म्हणजे ज्या मूळ तत्वांवर समाज आधारला आहे तीच मुळांत खराब आहेत. त्यामुळे मुस्लिम नसते तरी हिंदूंनी इतर कारणावरून एकमेकांचे गळे घोटले असतेच.
> व्यक्तीपुजा: अगदी भयंकर. कोणत्याही इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तीच्या चुका दाखवणे म्हणजे माहोळ उठवणे. बर्याचशा महापुरुषांची पराभव त्यांच्या अंधअनुयानीच केला.
हा प्रकार सुद्धा शेवटी मूलभूत तत्वे नाहीत म्हणून होतो.
18 Feb 2022 - 3:23 pm | Trump
मान्य
पण असे का?
माझे उत्तरः कारण पाशात्य जग ते काय आहेत ते स्वतः इतरांना सांगतात. अजुन आपण इतरांच्या (पाशात्यांच्या ) ओंजळीने पाणी पितोय. आपण लोकसंख्येमुळे आणि पुर्वजांच्या पुण्याईमुळे टिकुन राहिलो, नाहीतर त्यांनी इतर खंडा जसे नरसंहार करुन आपल्याला कायमस्वरुपी इतिहासात काळाआड केले असते.
20 Feb 2022 - 1:57 am | Trump
अमान्य. जरी सवर्ण आणि दलित वाद होता, तरी तो एकमेकांना बरबाद करणे किंवा पुर्णपणे वंशनाश करणे असल्या प्रकारच्या विचारसरणीमधुन आलेला नव्हता. जरी जुन्या व्यवस्थेत भेदभाव असले तरी प्रत्येकाला जगायच्या सोयी होती. मराठी विरुद्ध मद्रासी जरी भांडणे असली तरी मराठी लोक मद्रासी लोकांना तिथे (तमिळनाडु) जाऊन त्यांना देशोधडीस लावावे असे म्हणत नव्हते आणि अजुनही नाहीत. तो वाद आधीच तुटपंज्या नोकरी मद्रासी लोक बळकवल्याची भावना असल्याने झाला. तसेही अमेरीका आणि युरोपमध्ये परदेशी लोकांना नोकरी देण्याआधी स्थानिक मनुष्यबळ उपलब्ध आहे ते पहावे लागते, स्थानिक लोक बरेचदा छुपा आणि कधीतरी उघड विरोध करतात.
हिंदु-मुस्लिम वाद हा पुर्णपणे वेगळा आहे. हिंदु-मुस्लिम वाद आणि सवर्ण - दलित वाद ह्यात खुप फरक आहे. कृपया बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन वाचावे. जर भारतामध्ये तत्वे नसती तर भारतात का छळछावण्या (concentration camps) निर्माण झाल्या नाहीत ?
४. जेव्ह्या भारतीय लोक, जिवाच्या आंकाताने मुस्लिम आणि इंग्रज ह्याच्याबरोबर लढत होते तेव्हा युरोपामध्ये जरी युध्दे असली तरी ती भारतातील युध्दाएवढी वाईट नव्हती. त्यामुळे दोन्ही तुलना, कालपरत्वे अप्रस्तुत आहे.
17 Feb 2022 - 6:17 pm | परिंदा
"आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" याचा अर्थ काय?
18 Feb 2022 - 2:10 am | साहना
'Aano bhadra krtavo yantu vishwatah' (meaning: Let noble thoughts come to me from all directions).
17 Feb 2022 - 8:14 pm | sunil kachure
मुक्त असे काही नसावाच
1) विचार व्यक्त करण्याचा हक्क असावा पण तो इतका पण मुक्त नसावा की समाजात हिंसा होईल,समाजातील विविध घटक एक मेकाचे दुश्मन होतील
२) खासगी संपत्ती चा हक्क असावा पण इतका पण अमर्यादित नसावा की
गैर मार्गाने,चोरी करून,लुबाडून ,घोटाळे करून कमावलेली संपत्ती वैद्य संपत्ती म्हणजे त्या व्यक्ती ची खासगी संपत्ती असेल.
३) व्यापार करण्याचा हक्क असावा पण संपत्ती च्या जोरावर बाकी कोणाला व्यापार करणे शक्य च होणार नाही इतका अमर्यादित नसावा.
४)कोणतेही ही कपडे वापरायचा हक्क असावा पण इतका पण अमर्याद नसावा की लोक हक्क समजून घेणे underpant वर सार्वजनिक ठिकाणी वावरतील
17 Feb 2022 - 8:28 pm | sunil kachure
आता ज्ञान लपवून ठेवले जाते फुकट कोणी वाटत नाही.
विविध औषध,शोध,तंत्र ज्ञान ह्याची माहिती गुप्त ठेवली जाते .
फुकट वाटून कोणाला विश्व गुरू वैगेरे काही होण्यात इंटरेस्ट नसतो
"बुद्धी संपत्ती चा जागतिक कायदा "
ज्ञान बंद कुलुप मध्ये राहील त्याच्या वर कोणाचा फुकट हक्क नसेल ह्या अर्थाचा कायदा करायला लावला आहे.
गुरू लोकांनीं
18 Feb 2022 - 5:59 am | कंजूस
होतो. तो जगाला दाखवायचं टाळतात.
----
चीनची समाजव्यवस्था कशी बिघडेल याकडे अमेरिका लक्ष ठेवून आहे. अजून दहा वर्षे अशीच प्रगती झाली तर अमेरिकेचे औद्योगिक वर्चस्व नष्ट होणार आहे आणि त्याची चिंता आहे.
स्वस्त चांगल्या वस्तू बाजारात आल्या तर जनता विकत घेणारच. पण त्यांना चिनी माल घेऊ नका हे कसं सांगणार? मुक्त अर्थव्यवस्था आहे ना?
चिनी राज्यव्यवस्था आता कॉम्युनिझममधील चुकीची अर्थव्यवस्था गाळून उरली आहे. अधिक बळकट आहे. कार्ल माक्सवाद्यांनी किंवा केरळातील कॉम्युनिस्टांनी तळमळायची गरज नाही. चीनने वेगळीच राज्यव्यवस्था केली आहे .
18 Feb 2022 - 10:09 am | sunil kachure
अमेरिकेत महिला राष्ट्र अध्यक्ष होण्यासाठी
1993 साल उजडावे लागले.
ब्रिटन मध्ये 1979 ल महिला सर्वोच्य स्थानी होती.
जर्मनी मध्ये महिला देशाच्या सर्वोच्च स्थानी येण्यासाठी 2005 साला पर्यंत वाट बघावी लागली.
पण भारत,बांगलादेश,पाकिस्तान मध्ये ह्यांच्या खूप अगोदर देशाची सूत्र महिला सांभाळत होत्या.
मग प्रगत समाज कोणता ?
18 Feb 2022 - 10:23 am | चंद्रसूर्यकुमार
ऑ? खरं की काय?
18 Feb 2022 - 11:38 am | आनन्दा
राजेशभाऊंकडून वाचनाची अपेक्षा कुठे ठेवता?
बाकी, इंग्लंडची राणी वगैरे ते विसरलेले दिसतायत.
अवांतर -
भारतात पाहिला राष्ट्रप्रमुख होणे हे आपल्या व्यक्तिपूजक स्वभावामुळे झाले असावे का? म्हणजे इंदिराजींना दुर्गा किंवा मोदी योगीना सन्यासी म्हटले की मग आपल्याला त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे सोपे पडते.
सोनिया गांधींचा त्याग पण त्यातलाच.
बाकी अंकल सॅम आणि चाचा नेहरू सारखेच वाटते नाय?
18 Feb 2022 - 11:56 am | चंद्रसूर्यकुमार
भारतीय उपखंडामध्ये स्त्री नेतृत्व आले म्हणून त्याचे खूप कौतुक केले जाते. पण त्यापैकी सगळ्या स्त्रिया या घराणेशाहीतून नेतेपदावर पुढे आलेल्या होत्या.
म्हणजे-
१. इंदिरा गांधी: पंडित नेहरूंची कन्या
२. बेनझीर भुत्तो: झुल्फिकार अली भुत्तोंची कन्या
३. सिरिमाओ भंडारनायके: पंतप्रधान सॉलोमन भंडारनायकेंची पत्नी
४. बेगम खालिदा झिया: अध्यक्ष झिया-उर-रेहमानची पत्नी
५. शेख हसिना वाजेदः मुजीब-उर-रेहमानची कन्या
६. सोनिया गांधी: इंदिरा गांधींची सून वगैरे वगैरे
अर्थात इंदिरा किंवा बेनझीर कर्तबगार नव्हत्या असे मला नक्कीच म्हणायचे नाही. मुद्दा हा की तशाच कर्तबगार असलेल्या इतर स्त्रियाही असतात पण त्यांना लगेच पंतप्रधान व्हायची संधी मिळत नाही. ती यांना मिळाली याचे कारण अमुक एका घराण्यात मिळालेला जन्म. इंदिरा या नेहरूकन्या नसत्या तर त्यांना पंतप्रधान व्हायला मिळाले असते का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर भारतीय उपखंडात जेन्युईनली स्त्री नेतृत्व मान्य केले गेले आहे असे म्हणता येणार नाही.
18 Feb 2022 - 12:46 pm | साहना
कर्तृत्वाला लिंग नसते. पाश्चात्य देशांत जॉन ऑफ आर्क पासून मेरी स्कॉट राणी पर्यंत असंख्य महिला नेतृत्वाची उदाहरणे आहेत. ख्रिस्ती प्रभावाने स्त्रियांना पाश्चात्य देशांत अनेक वेळा त्रास भोगावे लागले असले तरी शूर आणि कर्तृत्वान महिलांचा फार मोठा आणि जुना इतिहास पाश्चात्य देशांत आहे. भारतांत सुद्धा असाच इतिहास आहे. जीवशात्रीय कारणांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळत नव्हते पण आता तो फरक मोठा कमी झाला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष महिला झाली नसली तरी महिलांचे योगदान देशांत पावलो पावली आहे आणि रोसा पार्क्स ते हॅरीयेत टॅबमेन पर्यंत आणि रूथ जिन्सबर्ग पासून अयान रेन्ड पर्यंत मोठ्या कर्तृत्वान मंडळींची मांदियाळी आहे.
तस्लिमा नसरीन ह्यांना भारतांत शरण हवी होती तेंव्हा भारतीय सरकारचे आणि समाजाचे शेपूट अचानक खाली गेले. अयान हिसरी अली ह्यांना तर देशांत घुसायला सुद्धा मज्जाव आहे. आत्ताच कुठे आमच्या देशांत महिला साक्षरता वाढत आहे.
टीप : साम्यवादी किंवा प्रखर समाजवादी देशांत महिलांना जास्त किमंत नसते. चिनी राष्ट्राध्यक्ष महिला होणे कठीण आहे. रशियांत तर पुतीन च्या बायकोचे नाव सुद्धा लोकांना ठाऊक नाही.
18 Feb 2022 - 11:41 am | आनन्दा
अवांतर -
इंदिरा गांधी रशियाच्या हातातील बाहुले होत्या असे माझी मत अलीकडील काळात होऊ लागले आहे.
त्यांचे सर्वोच्च स्थानी येणे हे केवळ त्यांचे कर्तृत्व नव्हते, त्यामागे डाव्या एकोसिस्टमचे मोठे योगदान होते..
त्याव्यतिरिक्त इंदिरा गांधींचे अनेक समाजवादी आणि हुकूमशाही निर्णय मला या संबंधांचा विचार करण्यास भाग पाडत आहेत.
अगदी सोनिया गांधींच्या नात्यापर्यंत..
18 Feb 2022 - 12:55 pm | साहना
मनमोहन सिंग हे काँग्रेस मध्ये कसे आले ? दक्षिण अमेरिकेत एक कॉन्फरन्स होती, नक्की देश आठवत नाही. मनमोहन हे त्यावेळी तरुण अर्थतज्ञ् होते. रशियन हस्तक असलेले एक काँग्रेसी मंत्री (कुणी तरी मिश्रा) सुद्धा ह्या कॉन्फरंस ला जाणार होते. आता नक्की हि मंडळी विमानात कधी चढली हे ठाऊक नाही पण मनमोहन आणि सदर मंत्री ह्यांची ओळख एका रशियन राजदूताने विमानात घालून दिली. नंतर परत आल्यावर मनमोहन ह्यांना भारतांत नोकरीची ऑफर मिळाली. कधी वर्षांत बिहार मध्ये एक बॉम्ब विस्फोट होऊन हे मंत्री मेले. आज पर्यंत हा स्फोट कुणी आणि का केला ह्याचा उलगडा झाला नाही. त्यावेळी ह्या मंत्र्यांनी आयात लायसन्स च्या निमित्ताने प्रचंड घोटाळा केला होता.
१९७० च्या दशकांत मनमोहन हे आर्थिक सल्लागार होते. ह्याच काळांत भारताने अत्यंत जाचक आणि मूर्खपणाचे आर्थिक नियम केले ज्यातून भारताची प्रचंड आर्थिक अधोगती झाली. ह्यांतील सर्वांत मोठा गाढवपणाचा नियम म्हणजे फेरा हा होता. आता कुणाला सांगावे तरी शरम वाटेल असा तद्दन मूर्खपणाचा कायदा होता जो ह्यांच्याच नेतृत्वाखाली आला होता. ह्या कायद्यामुळे शेवटी भोपाळ गॅस दुर्घटना, अन्न तुटवडा अश्या अनेक गोष्टीची पायाभरणी झाली.
18 Feb 2022 - 3:51 pm | चंद्रसूर्यकुमार
त्या मंत्र्यांचे नाव होते ललित नारायण मिश्रा. ते आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री होते. त्यांनीच मनमोहनसिंगांची व्यापार मंत्रालयात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करून सरकारमध्ये आणले होते. पण त्यामागे हा रशियन अँगल आहे हे माहित नव्हते.
बिहारमधील अररियाचे काँग्रेस खासदार तुलमोहन राम अचानक दक्षिणेतील पाँडेचेरीमधील काही कंपन्यांचे प्रोमोटर म्हणून दाखविले गेले. या सगळ्या कंपन्या शेल कंपन्या होत्या आणि खासदार प्रोमोटर म्हणून (आणि म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर) असल्याने त्याकाळी असलेल्या जाचक सरकारी नियमांपासून बरीच सुटका झाली. या कंपन्यांनाच काही आयात-निर्यातीची कंत्राटे मिळाली होती. स्वतः आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री ललितनारायण मिश्रांनी तुलमोहन राम यांच्यासह या कंपन्या स्थापन केल्या आणि त्या कंपन्यांना परवाने देऊन मंत्रालयाची कंत्राटे आपल्यालाच घेतली. आपले नाव पुढे यायला नको म्हणून मिश्रांनी तुलमोहन रामांना पुढे केले. या प्रकाराविरोधात विरोधकांनी लोकसभेत बराच गोंधळ घातला आणि इंदिरा सरकारला सीबीआय चौकशीचे आदेश द्यावे लागले. हा अहवाल इंदिरांच्या सरकारने शेवटपर्यंत जाहीर केला नाही.
१९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणून भारताला आर्थिक संकटातून बाहेर आणले याचे श्रेय मनमोहनसिंगांना दिले जाते. पण त्यापूर्वीच्या २० वर्षात मनमोहनसिंगांनी कधीही उजव्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार केला नव्हता आणि कधीही लायसेन्स राजविरोधात आवाज उठवला नव्हता याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होते. तीच गोष्ट नरसिंहरावांची सुध्दा. ते पण केंद्रात मोठ्या मंत्रीपदावर होते पण त्यांनीही कधी अशा धोरणांचा पुरस्कार त्यावेळी केला होता असे ऐकिवात नाही. म्हणजे १९९१ मध्ये परिस्थितीच इतकी बिकट झाली होती त्यातून असे काही निर्णय घ्यायला भाग पडले असे म्हणावे का?
20 Feb 2022 - 8:34 am | sunil kachure
इंदिरा गांधी ह्या रशिया च्या प्रभाव खाली होत्या हे अंशत सत्य असावे.
पण त्या रशिया चे बाहुले बनल्या होत्या असे नाही म्हणता येणार
देश स्वतंत्र होवून काहीच वर्ष झाली होती
गरिबी,फाळणी,जातीय व्यवस्था,शिक्षण ,शेती ची वाईट अवस्था .
अनेक प्रश्न देशासमोर होते.
तेव्हा कोणाचा आधार तर घ्यावा लागणार पण त्याची मोठी किंमत पण द्यावी लागेल असे पण धोरण नसावे
म्हणून रशिया मित्र
रशिया ला भारताचा भू भाग हडप करायचा नव्हता किंवा भारताला आर्थिक गुलाम करायचे नव्हते..ना भारतावर सत्ता गाजवण्याची रशिया च हेतू होता(गुप्त किंवा उघड)
त्यांना फक्त साम्यवादी विचार भारतात पेरायचा होता.
तो पण ब्लॅक मेल किंवा जोर जबरदस्ती करून नाही.
रशिया च्या मैत्री मुळे भारताला लष्करी संरक्षण मिळलचे आणि भारताच्या प्रगतीत त्यांनी हातभार पण लावला
जागतिक स्तरावर भारताला पाठिंबा देवून मदत पण केली.
देशातील नेत्यांनी भ्रष्ट कारभार केला, लायसेन्स च्या नावाखाली लूट केली ही काही रशिया ची चूक नाहीं
18 Feb 2022 - 3:34 pm | sunil kachure
साम्यवाद
थोडक्यात सर्व संपत्ती ही समाजाची असावी ,त्याचे योग्य सामान वाटप करावे आणि योग्यतेनुसार योग्य मोबदला द्यावा
वरून ही व्याख्या सुंदर ,आदर्श वाटत असली तरी .
ती राबवायची कशी ही मोठी समस्या आहे.
मग त्या साठी सर्व सर्व संपत्ती वर ,उद्योगावर,सरकारी नियंत्रण आणून ती राबवावी.
म्हणजे समाजवाद (चुकत नसेन तर)
ह्याचा दुष्परिणाम म्हणून अमानुष सत्ता सरकार कडे आली आणि त्या भ्रष्ट सत्ताधारी लोकांनी अत्याचार चालू केले.
स्व गुणांना वाव च नसेल.खासगी संपती च हक्क च नसेल तर माणूस कष्ट का करेल,.
हा धोका जसा साम्यवाद मध्ये होता तसाच धोका भांडवलवादी विचारात पण आहे.
भांडवल वादी व्यवस्थेत आर्थिक विषमता खूप येते .
गरीब गरीब राहतात आणि श्रीमंत श्रीमंत होतात.
गरीब लोकांवर अत्याचार होण्याचे प्रमाण पण वाढू शकते.
भांडवल च्या जोरावर साम्यवाद सारखेच अत्याचार करणाऱ्या संस्था उभ्या राहतात.
म्हणजे मोठ मोठ्या कंपन्या त सर्व संपत्ती गिळंकृत करू शकतात.
भारतील संपत्ती वर फक्त मोजक्याच लोकांनी कब्जा केलेला आहे.
मुंबई मधील शेकडो एकर जमीन मोजक्याच दहा बारा लोकांच्या ताब्यात आहे.
हे भांडवल शाही चे दुष्परिणाम च आहेत
आणि अशी वेळ येवू नये म्हणून भांडवल वादी,समाज वादी ,साम्यवादी ह्या सर्व पद्धतीचे मिश्रण असावेच लागते
20 Feb 2022 - 5:58 am | चौकस२१२
अशी वेळ येवू नये म्हणून भांडवल वादी,समाज वादी ,साम्यवादी ह्या सर्व पद्धतीचे मिश्रण असावेच लागते
" समाजवादाचे अंश असलेली जबाबदार भांडवलशाही" हि काही युरपिया देशात , न्यू झीलंड , ऑस्ट्रेलिया , कानडा सारखया देशात राबवली जाते अर्थात अश्या भेसळीच्या सुद्धा प्रश्न हे असतातच
जर्मनीत वार्षिक सुट्टी ६ आठवडे = कामगार धार्जिणे पण त्याच बरोबर उद्योगांना निर्याती साठी , मूलभूत संशोधनासाठी सरकार तर्फे मदत
ऑस्ट्रेल्यात प्रौढ वव्यक्तीला कमीत कमी ताशी वेतन = $१९. ८४ x ५२ = १०३१ रुपये ताशी , उद्योगांना निर्याती साठी , मूलभूत संशोधनासाठी सरकार तर्फे मदत = भांडवलशाही पूरक
सिंगापोर हे अजून एक मिश्र उद्धरण , खूप कमी उद्योग आयकर = भांडवलशाही ला पोषक , पण त्याच बरोबर ७०% जनतेला बऱ्यापैकी दर्जाचे "सार्वजनिक घरे " पुरवणे हे समाजवादाचे लक्षण
जगातील विविध अर्थ/ सामाजिक व्यवस्था पाहणे हि रोचक गोष्ट आहे
20 Feb 2022 - 12:15 pm | साहना
आहे आणि असावेच लागते ह्यांत प्रचंड फरक आहे. राष्ट्र किंवा समाज हा "युनिटरी ऍक्टर" नाही म्हणजे राष्ट्र किंवा समाजाला आपले असे मन नाही. असंख्य लोक विविध कारणांनी एकत्र येऊन वाटाघाटी करून आपापले हित साध्य करतात. काय बरोबर आणि काय वाईट ह्यांची चर्चा होते आणि कुणी तरी जिंकतो. शेवटी कुणाची बाजू बरोबर हे काळ ठरवतो. त्यातून त्या समाजाला आणि इतरांना धडा मिळतो, तो ते घेतात कि नाही हे पुन्हा असंख्य लोक आणि त्यांच्यातील डायनॅमिक्स वर अवलंबून आहे.
आर्थिक व्यवस्था किंवा समाज व्यवस्थेचे तेच आहे. काही ठिकाणी लेबर मार्केट प्रचंड प्रमाणात रेग्युलेटेड आहे तर काही ठिकाणी आरोग्यव्यवस्था. हि सर्व सांगड कुणी विचारपूर्वक नाही घातली, मुक्त समाजांत विविध विचारांचे भांडण होऊन ती निर्माण झाली. ती तशी असायलाच हवी असे नाही.
बंदिस्त समाजांत ह्या गोष्टी शक्य नाही कारण इथे २-३ लोक मिळून काय आणि कसे असायला पाहिजे असे ठरवतात. इथे चुका मेनी केल्या जात नाहीत आणि सुधारल्या जात नाहीत. नवीन विचार येऊ दिले जात नाहीत. क्वचित ली क्वान यु सारखा माणूस सतत प्रयोगशील राहून चुका सुधारू शकतो.
किंबहुना त्या समाजातील चर्चेवर बारीक पणे लक्ष दिले असता त्या व्यवस्थेवर प्रचंड टीका करणारे लोक आणि त्याला बदलण्यासाठी झटणारे लोक त्या त्या समाजांत आहेत हे दिसून येईल. उदाहरणार्थ जर्मनी मधील लेबर कायदे, इटली मधील लेबर कायदे ह्यामुळे देशाचे किती नुकसान झाले आहे ह्यावर प्रचंड विपुल लेखन उपलब्ध आहे. लेबर कायद्यामुळे वोल्कस्वगोन इलेक्ट्रिक कार्स साठी गुंतवणूक करू शकत नाही आणि त्यामुळे मागे पडत आहे, उलट टेस्ला ने प्रचंड वेगाने भरारी मारली आहे. इत्यादी.
बहुतांशी समाज जितका मुक्त (कुठलेही क्षेत्र असे ना) तिथे प्रगती जास्त, जास्त नैतिकता आणि जास्त ग्राहक समाधान दिसून येते.
20 Feb 2022 - 2:18 am | Trump
श्री साहना यांनी युरोपियन लोकांचे जे गुलाबी गुलाबी चित्र आणि सगळे युरोपियन कसे एकाच प्रकारे विचार करतात ते बघुन मौज वाटली.
माझ्या अनुभवातुन युरोपियन लोक फारसा भेदभावाला थारा देत नाहीत जोपर्यंत कोणीही त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत नाही. सदर लेख बरेचसे सर्वसाधारीकरण केल्यासारखे वाटते.
खालील मुद्दे दुर्लक्षित केले आहेत.
१. जेव्हा साम्यवाद (communism) आला तेव्हा कामगारांची, समाजातील तळातील लोकांची स्थिती काय होती? त्यांना सध्यांचे हक्क, सोयी आणि संधी उपलब्ध होत्या का?
२. युरोपियन लोक, त्यांनी केलेल्या ज्यु हत्यांकाडाविषयी नेहेमी बोलतात. पण त्याच हत्याकांडातील रोमी आणि इतर लोकांना विषयी का बोलत नाहीत?
३. युरोपियन लोकांनी जी जगाची गेली ५०० वर्षे लुटालुट केली. करोडो लोकांची हत्याकांडे केली त्याबंद्दल का बोलत नाहीत? जर ज्युंना भरपाई दिली तशी अयुरोपियन लोकांना का नाही दिली? अजुन माफी का नाही मागितली?
४. जेव्ह्या भारतीय लोक, जिवाच्या आंकाताने मुस्लिम आणि इंग्रज ह्याच्याबरोबर लढत होते तेव्हा युरोपामध्ये जरी युध्दे असली तरी ती भारतातील युध्दाएवढी वाईट नव्हती. त्यामुळे दोन्ही तुलना, असमान आणि कालपरत्वे अप्रस्तुत आहे.
५. आजची गोष्ट ही कधीही कालच्या गोष्टीपेक्षा चांगलीच असते किंवा असावीच लागते, तरच टिकाव होतो. त्यामुळे तुम्ही भारतीय जुना काळ आणि युरोपियन यांचा आताचा काळ यांची तुलना करताय. जर नवीन तत्वज्ञान आधीच्या तत्वज्ञानांचा (अयुरोपियन सुध्दा) अभ्यास करुन केले असेल तर ते चांगले असण्याची शक्यता आहे.
६. आता युरोपियन लोकांचा चढतीचा काळ संपुन, जवळपास उतरणीचा काळ सुरु झाला आहे. इतर देशांकडुन (भारत, चीन इ.) आव्हाने चालु झाली आहेत. जेव्हा युरोपियन देश तुलनात्मक दृष्ट्या कमजोर होतील. तेव्हाही हीच तत्वे असतील कि जुनी भेदभावयुक्त आणि लुटालूट पुन्हा चालु होईल? जर तसे होणार असेल किंवा होईल असे वाटते तर एवढ्या तत्वज्ञानाच्या गप्पाचा उपयोग काय?
--
माझ्या अनुभवातील युरोपियन जीवनसरणीचे साधारण तीन समुह बनतात.
१. सर्वसामान्य लोकः सर्वसामान्य लोक फारसा भेदभावाला थारा देत नाहीत जोपर्यंत कोणीही त्यांना आव्हान देत नाही. खुप कमी लोक तोंडावर भेदभावाचे गोष्टी बोलुन दाखवतात. पण जेव्हा युरोपियन आणि अयुरोपियन यात निवड करायची वेळ आली असेल, एकच जागा असेल आणि दोन्ही (युरोपियन आणि अयुरोपियन) एकसमान असतील तर तर ती जागा ९९% युरोपियनला मिळते. जर त्यांच्या वागण्याचा थोडा सखोल विचार केला तर त्यांचे वागणे बरेचदा गोरे मदतगार (white saviour) प्रकारे इतरांवर बिंबवण्यासाठी असते.
२. कायदा आणि सुव्यवस्था: यात पोलिस, न्यायालये, शहरी व्यवस्थापण इत्यादी. यात फारसा भेदभाव होत नाही जर स्थानिक नियम आणि कायदे माहिती असतील तर.
३. सरकारे: सरकारे युरोपियन लोकांचे कसे जगातील वर्चस्व अबाधित राहील ह्याकडे लक्ष असते. त्यांना मुंल्ये वैगरे असल्या गोष्टीमध्ये एक बोलबच्चनगिरी ह्यापलिकडे काही अर्थ नसतो. त्याला फक्त भोळी-भाबडी लोक बळी पडतात. स्वत:च्या देशासाठी वेगळी मुल्ये आणि इतरांसाठी वेगळी मुल्ये, उदा. युरोपियन लोकशाहीचा उदो उदो करतात, पण दक्षिण अमेरीकीत, आखातात निवडुन आलेली सरकारे पाडण्याचे काम, किंवा त्यांना पाठिंबा देण्याचे काम अगदी बिनदिक्कतपणे करतात.
हे तिघेही समुह एकमेकांना साथ देतात, बहुधा अळि-मिळी-गुप-चिळी असला व्यवहार असतो.
20 Feb 2022 - 5:48 am | चौकस२१२
त्यांना मुंल्ये वैगरे असल्या गोष्टीमध्ये एक बोलबच्चनगिरी ह्यापलिकडे काही अर्थ नसतो.
अमेरिकेला लागू होते ,, हुकूमशाही नको म्हणून सद्दाम ला उडवला आणि धार्मिक वादि इराक मध्ये जोपासले जायला मदत झाली
20 Feb 2022 - 12:04 pm | साहना
> श्री साहना यांनी युरोपियन लोकांचे जे गुलाबी गुलाबी चित्र आणि सगळे युरोपियन कसे एकाच प्रकारे विचार करतात ते बघुन मौज वाटली.
माझ्या अनुभवातुन युरोपियन लोक फारसा भेदभावाला थारा देत नाहीत जोपर्यंत कोणीही त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत नाही. सदर लेख बरेचसे सर्वसाधारीकरण केल्यासारखे वाटते.
स्ट्रॉमॅन वाद !
मी ह्यापैकी काहीही म्हटलेले नाही. आपण आपला काही तरी पूर्वग्रह माझ्या लेखनावर प्रोजेक्ट केला आहे आणि त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करत आहात.
> खालील मुद्दे दुर्लक्षित केले आहेत.
हे मुद्दे लेखाचे नव्हतेच त्यामुळे त्यांच्यावर लेखन करण्याची गरज नव्हती. चीन आणि रशिया ह्यांची मूलभूत विचारसरणी आणि पाश्चात्य विचारसरणी ह्यांच्यांत प्रचंड विरोधाभास आहे आणि माझ्या मते ह्यांत पाश्चात्य विचारसरणी नैतिक दृष्ट्या बरोबर आहेच तसेच त्यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे इतकाच मुद्दा होता.
सध्यातरी ह्या टेबल वर भारताला विशेष स्थान नाही. त्यामुळे भारताची तुलना इथे करण्याचा माझा प्रयत्न सुद्धा नव्हता.
टीप : युरोपिअन लोक वंशभेदी आहेत, युरो सेण्ट्रिक आहेत वगैरे सर्व मुद्दे मला बहुतांशी मान्य आहेत पण त्यांचा माझ्या लेखाशी काहीही संबंध नाही.
20 Feb 2022 - 12:28 pm | Trump
सुप्रभात..
मी भारताचा उल्लेख फक्त समजण्यास सोपे जावे म्हणुन केला होता. मी शक्यतो अयुरोपियन (म्हणजे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरीका, वसाहतीखालील प्रदेश) असा उल्लेख करतो.
तुम्हाला असे म्हणायचे आहे का ? जी तत्वे तुम्ही उल्लेख केली आहेत त्यांचा युरोपियन समाजजीवन (आणि वर्तन) व मी मांडलेले मुद्दे ह्याच्याशी संबध नाही ?
आणि जर दोन्ही विचारसरणीची तुलना, त्यांच्या परिनामावरुन करायची तर जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हाची परिस्थिती ती एकच असायला नको का?
हे मुद्दे लेखाचे नव्हतेच त्यामुळे त्यांच्यावर लेखन करण्याची गरज नव्हती. चीन आणि रशिया ह्यांची मूलभूत विचारसरणी आणि पाश्चात्य विचारसरणी ह्यांच्यांत प्रचंड विरोधाभास आहे आणि माझ्या मते ह्यांत पाश्चात्य विचारसरणी नैतिक दृष्ट्या बरोबर आहेच तसेच त्यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे इतकाच मुद्दा होता.
धन्यवाद
20 Feb 2022 - 5:45 am | चौकस२१२
कार्ल माक्सवाद्यांनी किंवा केरळातील कॉम्युनिस्टांनी तळमळायची गरज नाही. चीनने वेगळीच राज्यव्यवस्था केली आहे .
अगदी बरोबर
बनिया + चाणक्य + बाहुबली = सध्याचा चीन
भारतीय कम्युनिष्टांनी चीन च्या १/१००० तरी उद्योग आपापल्या राज्यात उभारून दाखवावेत ( कि ज्यातून कामगार वर्गबंधूंचा काहीतरी फायदा होईल !)
क्रांती नको कृती
20 Feb 2022 - 10:46 am | कॉमी
व्ययक्तीक स्वातंत्र्य ह्याचा अर्थ लोक अनेकदा स्वैराचार असा घेतात. स्वैराचार ह्यांत अंतर्भूत असला तरी निव्वळ तो एकमेव फायदा नाही.
हे शब्दांकन अगदी आवडले. 'स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे' पेक्षा नवीन आणि सत्याच्या जास्त जवळ जाणारे.
20 Feb 2022 - 2:41 pm | Trump
सहज बातमी वाचता वाचता येथे लक्ष गेले.
20 Feb 2022 - 3:54 pm | आनन्दा
इथे बरेच लोकं ट्रम्प ला मूर्ख आणि रेसिस्ट वगैरे अनेक शिव्या घालतात.. पण माझ्या निरीक्षणानुसार ट्रम्प फक्त बोलत असे, अनेक वेळा धमकी देऊन काम करून घ्यायचा त्याचा स्वभाव होता.
ओबामा गॉड बोलून ज्या पाचरि मारून ठेवत असे ते फार भयंकर होते.
ओबामा आणि त्याचे प्रशासन पक्के भारतद्वेष्टे होते, पण ओबामांच्या काळात झालेले अनेक निर्णय हे भारतीयांची चूक झाल्यामुळे आम्हाला घ्यावे लागले असे भासवले गेले, जसे की B1 घोटाळा.
ओबामाने ना बोलता बऱ्याच ठिकाणी असे घोळ घातले होते असे माझे मत आहे.
मोदींना व्हिसा नाकारण्याचा प्रकार पण बहुधा त्याच्याच काळात झाला होता.
मूह मे राम बगल मे छुरी
20 Feb 2022 - 4:04 pm | Trump
ट्रम्प ला मूर्ख आणि वंशभेदी म्हणणार्या लोकांना बरेचदा सरकार कसे चालते, ट्रंप म्हणजे काय, पाश्चात्य जग म्हणजे काय ते समजलेलेच नसते.
20 Feb 2022 - 5:12 pm | चंद्रसूर्यकुमार
नाही. तो प्रकार बुशबाबाच्या काळातील.
+१००. ओबामा हा एक अत्यंत ओव्हररेटेड अध्यक्ष होता असे मलाही वाटते. बुशबाबाला इराक युध्दावरून शिव्या घालत सत्तेवर आला तेव्हा इतर देशांमध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये असे जोरजोराने बोलत होता. तसे असेल तर मग सिरीया आणि लिबियामध्ये अमेरिकेने नक्की काय केले?रॉनाल्ड रेगननी अफगाणिस्तानातील मुजाहिदींना मदत करून पुढे तालिबानचा भस्मासूर उभा केला त्याप्रमाणे आयसिसचा भस्मासूर कोणी उभा केला? रेगननी मुजाहिदीनना मदत केली तेव्हा निदान रशिया अफगाणिस्तानात घुसला होता आणि व्हिएटनाममध्ये रशियाने अमेरिकन सैन्याचे केले तेच अफगाणिस्तानात रशियन सैन्याचे करावे हा तरी उद्देश होता. तसेच त्यापूर्वीच्या काळात इस्लामी दहशतवाद काय असतो याचा चटका अमेरिकेला बसलाही नव्हता. त्यामुळे आपण करत आहोत त्याचे नक्की काय परिणाम होतील याची १००% कल्पना रेगनना कदाचित नसावी हा बेनेफिट ऑफ डाऊट तरी त्यांना देता येईल. यापैकी सिरीयात काहीही नव्हते. बुशबाबाच्या काळातच सिरीयात रेजिम चेंजचे प्रयत्न चालू होते ते ओबामाने नुसते चालूच ठेवले नाही तर वाढवले. त्याविषयी काय? अल कायदा असादच्या सरकारविरोधात होता म्हणून त्याला विरोध म्हणून आयसिसला पाठबळ त्याच बोलबच्चन ओबामाने दिले होते. आणि हे सगळे शांततेचे नोबेल जिंकल्यावर. म्हणजे रेगन आणि बुश या दोघांनीही केलेल्या चुका ओबामाने अधिक प्रमाणात केल्या- असे केल्याने नक्की काय होते हे समोर दिसत असूनही.
20 Feb 2022 - 5:15 pm | Trump
ओबामाला पहिल्या वर्षी शांततेचे नोबेल मिळाले. त्यावरुनच त्याचा भाकडपणा सिध्द होतो.
https://en.wikipedia.org/wiki/2009_Nobel_Peace_Prize
20 Feb 2022 - 5:18 pm | चंद्रसूर्यकुमार
सुधारणा-- अल कायदा असादच्या सरकारबरोबर होता
21 Feb 2022 - 1:28 am | साहना
ओबामा विषयावर थॉमस सोवेल ह्यांचे मत अगदी चपखल आहे. ह्या माणसाने बोलबच्चन पणा शिवाय आयुष्यांत काहीच केले नाही. वक्तृत्वकलेच्या जोरावर हा माणूस सर्वांत मोठ्या पदावर पोचला.
ओबामा IL चे सिनेटर होते ते आणि अत्यंत भारत द्वेष्टे दुसरे सिनेटर डर्बीन (दोन्ही IL) ह्यांनी भल्या मोठ्या क्लुप्त्या आणि प्रसंगी धांदात वचनभंग करून बुश ह्यांचे भारतीय हिताचे इमिग्रेशन धोरण हाणून पाडले. त्याशिवाय आपल्या शेवटच्या आठवड्यांत ओबामा ह्यांनी भरती विद्यार्थ्यांना नुकसान होईन असा धांदात बेकायदेशीर निर्णय घेतला. निर्णय शेवटी कोर्ट बदलणार हे त्यांना ठाऊक होते पण शिक्षण व्यवस्थेंत अकॅडेमिक वर्ष वाया गेल्यावर मग कोर्ट काही करू शकत नाही हे त्यांना ठाऊक होते.
20 Feb 2022 - 4:47 pm | शाम भागवत
गुगलचे मराठीत भाषांतर करण्याचे कौशल्या खूपच वाढले आहे. एखादा इंग्रजी पॅरा इथे चिकटवायच्या अगोदर तो गुगल ट्रान्सलेटरमधे चिकटवून बघा आणि आपला संदेश मराठीत आणा.
उदा.
यूएस सरकारने परदेशी नेत्यांचे डीएनए गोळा करण्यात हात आखडता घेतल्याचा आरोप आहे. विकिलीक्सने उघड केलेल्या ओबामा-युगातील राजनयिक केबल्सने निवडक आफ्रिकन देशांतील यूएस राजनैतिक अधिकाऱ्यांना धार्मिक आणि व्यावसायिक नेत्यांसह "मुख्य आणि उदयोन्मुख" अधिकाऱ्यांकडून "फिंगरप्रिंट्स, चेहर्यावरील प्रतिमा, DNA आणि बुबुळ स्कॅन" गोळा करण्याचे निर्देश दिले.
20 Feb 2022 - 4:53 pm | Trump
श्री शाम भागवत, तुमचा सांगण्यचा उद्देश समजला. पण मी शक्यतो मुळचा मजकुर देतो. त्याला मुख्यत्वे दोन कारणे आहेत.
१. निर्देशित ( कोट ) जसाचा तसा द्यावा लागतो.
२. अधिक अभ्यासु लोक मुळ ठिकाणी जाऊन वाचु शकतात.
जर त्याचे मराठी भाषांतर केले तर उद्देश १ पुर्ण होत नाही आणि उद्देश २ पुर्ण करायला अडचणी येऊ शकतात. धन्यवाद.
20 Feb 2022 - 11:40 pm | शाम भागवत
तोही द्या. भाषांतरही द्या. तसेही चालू शकते.
बरेच जणं इंग्रजीतलं वाचायचंच सोडून देतात. लिंक बघणं लांबच राहतं. म्हणजे मीच बर्याच वेळेस पहिलं वाक्य वाचतं असताना असं करतो.
पण थोडसा गोषवारा मराठीत लिहिलेला असला तर महत्वाचा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचतो. ज्यांना जास्त उत्सुकता असते ते मात्र लिंक उघडून बघतात.
अर्थात, आपण जे लिहितो आहोत, सांगतो आहोत, ते महत्वाचे आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचावे, निदान मुख्य मुद्दा तरी सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे वाटत असेल तरच हा उद्योग करायचा.
अन्यथा तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे.
असो.
21 Feb 2022 - 12:07 am | Trump
सल्ला स्तुत्य आहे. पुढ्च्या वेळी अमलात आणण्याचा प्रयत्न करतो.
20 Feb 2022 - 6:15 pm | sunil kachure
DNA मिळवण्याची अमेरिकेचा अध्यक्ष आदेश देतो.
म्हणजे ह्या DNA सँपल चा वापर करून खूप काही माहीत पडत असणार आणि ती माहिती वेगळ्या प्रकारच्या युद्ध निती मध्ये वापरली जाणार..
अमेरिका चे अध्यक्ष covid काळात swab पण दुसऱ्या देशांना देत नव्हते.असे पण त्या मध्ये lihale आहे.
आधार कार्ड बनवताना हातचे ठसे, डोळ्यांचे ठसे(दुसरा शब्द आठवला नाही) घेतले गेले.
लोकांची सर्व माहिती घेतली गेली.
हा डाटा सरकार नी जमा करून ठेवला म्हणजे नक्कीच कधी वेळ आली तर लोकांचे स्वतंत्र वर नियंत्रण आणण्यासाठी पण त्याचा वापर होवू शकतो
मी असे वाचले आहे.जेव्हा महत्वाचे कार्यक्रम किंवा महत्वाच्या व्यक्ती च्या सभा असतात.
तेव्हा face डिटेक्टर वापरले जातात.
तेव्हा हा आधार कार्ड चा प्रचंड डाटा नक्कीच वापरला जात असावा.
21 Feb 2022 - 8:46 am | रावसाहेब चिंगभूतकर
तुमच्या लिहिण्यावर मी शक्यतो प्रतिसाद देत नाही. पण इथे technology चा संबंध असल्याने विचारतो की रेटिना स्कॅन फेस detecting साठी कसा वापरायचा.
21 Feb 2022 - 11:19 pm | शाम भागवत
सोप्पं आहे.
सुनिल सरांना बोलवतात.
ते सगळं करून देतात.
:)
22 Feb 2022 - 12:52 am | साहना
एक मोठा गौप्यस्फोट ह्या अमेरिकन मुलाने केला आहे : https://www.jackcentral.org/news/nau-birds-aren-t-real-club-insists-bird...
पक्षी हे पक्षी नसून अमेरिकन सरकारचे ड्रोन आहेत. ते आमच्यावर बारीक नजर ठेवून आहेत. कबुतरे नेहमी विजेच्या तारांवर का बसतात ठाऊक आहे ? ते आपली बॅटरी चार्ज करतात.
कुठलीच मीडिया हि वार्ता दाखवत नाहीत कारण त्यांना CIA ची भीती वाटते.
22 Feb 2022 - 1:11 am | Trump
संपादकाची टीप: हा उपहासात्मक वृत्तलेखनाचा भाग आहे. या लिखित लेखातील कोणतीही माहिती सिद्ध तथ्य म्हणून स्वीकारू नये.
Editor’s note: This is a piece of satirical newswriting. No information in this written article should be accepted as proven fact.
22 Feb 2022 - 2:48 am | साहना
कशाला उगाच रसभंग केलात ?
22 Feb 2022 - 4:52 pm | चौकस२१२
हा डाटा सरकार नी जमा करून ठेवला म्हणजे नक्कीच कधी वेळ आली तर लोकांचे स्वतंत्र वर नियंत्रण आणण्यासाठी पण त्याचा वापर होवू शकतो
हा आरोप आपण "कोणत्याही" पक्षाचे असले तरी कराल, अशी अपेक्षा ठेउयात
22 Feb 2022 - 5:05 pm | चौकस२१२
डेटा हे नवीन शस्त्र आहे हे सर्वांना माहिती असावेच
ज्या देशात शेतीसाठी आधुनिक सामग्री वापरली जाते ( विशेष करून पेरणी आणि तोडणी ) अश्या देशात हे शस्त्र काही उद्योग कसे वापरीत आहे यावर बघा : ४००० हेक्टर चा शेतकरी काय बघा
https://www.youtube.com/watch?v=N9f-L5tPsfs
23 Feb 2022 - 11:44 am | Trump
तथाकथित मुक्त समाजाचे थडगे - लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण
------
ट्रम्प यांनी पुतीन यांच्या धोरणात्मक कुशाग्रतेबद्दल वारंवार उच्चारले, "रशियन साम्राज्याची पुनर्बांधणी" करण्याचा बलवानाचा हेतू लक्षात घेतला आणि असंतुष्ट आणि पत्रकारांना मारण्याच्या पुतीनच्या सवयीचा बचाव केला, युनायटेड स्टेट्स देखील असेच करते असा युक्तिवाद केला.
Trump repeatedly spoke highly of Putin's strategic acumen, noted the strongman's intention to "re-build the Russian Empire" and defended Putin's habit of killing dissidents and journalists, arguing that the United States does the same thing.
https://news.yahoo.com/trump-praises-putins-genius-incursion-into-ukrain...
------------------
"आम्ही यूएस सरकारला सरकारचे विरोधक म्हणून खुलेपणाने काम करणार्या गटांना निधी देणे थांबवण्यास सांगत आहोत ... आमच्या बाबतीत, कायदेशीर आणि कायदेशीररित्या स्थापन केलेल्या सरकारच्या," त्यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
"दुसऱ्या देशाच्या अंतर्गत जीवनात गुंतणे हे जगातील कोणत्याही सरकारसाठी लाजिरवाणे आहे ... शिवाय, पैसे हस्तांतरित करणे."
"We are asking the U.S. government to stop funding groups that openly act as opponents of governments ... in our case, of a legally and legitimately constituted government," he told his morning news conference.
"It is a shame for any government in the world to get involved in the internal life of another country ... plus, handing over money."
https://news.yahoo.com/mexican-president-urges-u-end-162311196.html
5 Mar 2022 - 1:33 pm | Trump
शेवटी स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी दुसर्यांची हत्या केली तरी चालते. मुक्ततेच्या गप्पा मारणे वेगळे आणि आचरणे वेगळे.
5 Mar 2022 - 2:04 pm | Trump
हे घ्या. अमेरीकन कोर्टानेच सांगितले की तंत्रकंपन्या त्यांना नको त्या गोष्टी काढु शकतात. प्रकरण बहुतेक वरच्या न्यायालयात जाणार..
26 Feb 2022 - 1:19 pm | Trump
श्री साहना यांची युरोपियन देशांमधील दांभिकपणा, वंशश्रेष्ठत्वाची, स्वता:साठी आणि इतरांसाठी वेगळी मुल्ये / मापदंड, स्वत:च्या फायद्यासाठी ईतरांना लढवत राहणे , इतरांना का राग / उद्वेग आहे, ह्याबद्दल विचारमंथन करावे. जी मुक्त विचारप्रणाली तिथे आहे, त्यातुनच सगळे हे दोष आले आहेत. तर मग त्या मुक्त विचारपध्दतीमध्येच दोष नाही का?
ह्यासगळ्यांची उदाहरणे अगणित आहेत. अभ्यासु लोकांना माहिती असतीलच.
श्री साहना यांच्या युक्तीवादमध्ये युरोपियन लोकांना उक्रांतीयुक्त काळानुसार बदलणार्या विचारसरणीच्या विभागात तर इतरांना पोथीनिष्ठ, थिजलेल्या विचारसरणीच्या विभागात टाकले आहे. ते चुकीचे आहे.
26 Feb 2022 - 1:48 pm | साहना
> जी मुक्त विचारप्रणाली तिथे आहे, त्यातुनच सगळे हे दोष आले आहेत. तर मग त्या मुक्त विचारपध्दतीमध्येच दोष नाही का?
मुक्त विचारप्रणाली जिथे नाही तिथे असे कुठलेच दोष नाही आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? किंबहुना जिथे मुक्त विचार प्रणाली नाही तिथे किमान माझ्या दुर्ष्टीकोनातून तर अधिकच आणि फारच गंभीर समस्या दिसून येतात.
> तर इतरांना पोथीनिष्ठ, थिजलेल्या विचारसरणीच्या विभागात टाकले आहे.
मी असे काहीहि लिहिलेले नाही. कृपया माझ्या लेखनाला असे विनाकारण मिसरेप्रेझेन्ट करू नये.
26 Feb 2022 - 1:59 pm | Trump
प्रथम मी तुम्हाला जे 'मी तुमचे लेखनविपर्यास (misrepresent) केला' अशी छाप दिली त्याबद्दल खेद व्यक्त करतो.
मी फक्त तुमच्या विचार करण्याच्या पध्दतीमधील दोष दाखवुन देत होत. तुलना हि नेहमी बरोबरीच्या गोष्टींची आणि समानतेने करायची असते. दुर्देवाने ते तुमच्या लेखनात दिसत नाही. जसे तुम्ही तुमचे मत सांगितले तसे मी माझे मत सांगितले.
असे कधीच म्हटले नाही. माझे जर बाकीचे प्रतिसाद बघितले तर त्यांनी भरपुर दोष दाखवुन दिले आहे.
26 Feb 2022 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले.
''ऋग्वेदांतील "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" हि ओळ परवाच मला एका गोऱ्या माणसाने ऐकवली. त्याच्या मते तुमच्या कुठल्या ऋषी मुनींनी स्वतःला "विश्वगुरू" वगैरे म्हटले ? जे लोक सतत चांगल्या विचारांच्या शोधांत राहतात त्यांना स्वतःला विश्वगुरू म्हणून बढाया मारायला वेळ नसतो''
हे खासच.
-दिलीप बिरुटे
27 Feb 2022 - 2:04 am | Trump
श्री साधना मी लिहीले होते येथे. बघा कसे सगळे अमेरीकन, खंडीय युरोपियन, ऑस्टेलियन आणि इतर देश कसे एकत्र आले.
त्यांची स्वत:साठीची मुल्ये वेगळी आणि इतरांसाठीची वेगळी.
https://www.aljazeera.com/news/2022/2/25/list-of-sanctions-on-russia-aft...
युध्द जितके पेटेल तितके युरोपियन लोकांना चांगलेच आहे.
27 Feb 2022 - 1:39 pm | Trump
संबधित लेखः युक्रेनवरून तणाव
http://www.misalpav.com/node/49878
13 Mar 2022 - 6:53 pm | Trump
3 Oct 2022 - 11:05 pm | Trump
युरोपियन लोकांची दाखवायची मुल्ये आणि प्रत्यक्षातील मुल्ये याचे डोळे उघडणारे दर्शन.
तथाकथित मुक्त समाज उघड उघड चोर्या करतो आणि सगळे लोक त्याचे समर्थन करतात, हे बघुन शिसारी येते.