गाभा:
अनेकदा काही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला तर्क करावे लागतात. तर्क करुन निर्णय घ्यावे लागतात.
पण दरवेळी हा तर्क बरोबर येईलच असे होत नाही. तर्क न चुकण्याची शक्यता कमीतकमी करण्यासाठी तर्क करण्याच्या क्षमतेत सुधारणा करावी लागेल. त्यासाठीच हा धागा.
तर्क का चुकतात? तो चुकू नये म्हणून काय काय करता येईल? भावनांचा तर्क करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो? तर्क किती ताणावा? किती ताणू नये? तर्क करण्याची क्षमता सुदृढ करण्यासाठी काय करता येईल? सराव कसा करावा?
तुमचा एखादा तर्क चुकला असेल तर तो का चुकला? कोणते मुद्दे निसटले विचारप्रक्रियेतून? सांगण्यासारखे असेल तर जरुर लिहा. _/\_
प्रतिक्रिया
19 Feb 2022 - 6:34 pm | मुक्त विहारि
TIME...
T = TIME, पुरेसा वेळ मिळाला नाही तर... अर्धवट वाचन करून किंवा अर्धवट ऐकून ...
I= Information, पुरेशी माहिती मिळाली नाही तर ...
M = Money, पुरेसा पैसा नसेल तर
E = Employee, ज्याला माहिती गोळा करायला सांगीतली आहे, ती व्यक्तीच फितुर असेल तर ...
अर्थात, हा माझा दृष्टिकोन आहे, इतरांची मते वेगळी असतीलच ...
19 Feb 2022 - 6:35 pm | कंजूस
म्हणून तर्क चुकतात.
19 Feb 2022 - 6:38 pm | मुक्त विहारि
The war between brain and heart, is always dangerous.
स्वतःसाठी आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायची असेल तर, मेंदू
इतर लोकांसाठी, हृदय
19 Feb 2022 - 6:36 pm | मुक्त विहारि
अजून एक म्हणजे, धृतराष्ट्र होऊ नये आणि एकलव्य पण होऊ नये ...
19 Feb 2022 - 6:51 pm | कॉमी
तार्किक चुका (लॉजिकल फॅलसीज) शिकायला हव्यात.
सी एस ल्युईस यांचे "द गेम ऑफ लॉजिक" हे पुस्तक तर्कपूर्ण विचार शिकवण्यासाठी आहे.
19 Feb 2022 - 7:08 pm | मुक्त विहारि
https://en.m.wikipedia.org/wiki/The_Game_of_Logic#:~:text=The%20Game%20o....
19 Feb 2022 - 8:43 pm | कॉमी
हेच हेच. लेखक सी एस ल्युईस नाही, ल्युईस कॅरॉल.
(दोघे लहान मुलांच्या फॅन्टसी कथांचे लेखक {नार्निया आणि ऍलिस इन वंडरलँड} आहेत, कन्फ्युजन झाले.)
19 Feb 2022 - 8:51 pm | मुक्त विहारि
पुस्तकाची तोंड ओळख वाचली
मस्ट रीडच्या बकेट लिस्ट मध्ये Add केले आहे ...
सध्या फुकटचंबू बाबूराव, असल्याने फुकटात PDF मिळाली तर बघतो...
19 Feb 2022 - 9:18 pm | कॉमी
ही घ्या लिंक. लीगल आहे, प्रताधिकारमुक्त पुस्तक आहे.
https://www.gutenberg.org/ebooks/4763
(PDF नाही, EPUB फाईल आहे, ती lithium reader मध्ये उघडू शकाल.)
19 Feb 2022 - 9:38 pm | कर्नलतपस्वी
आम्हाला पण शेअर करा.
19 Feb 2022 - 10:28 pm | उपयोजक
नक्की वाचतो
19 Feb 2022 - 7:50 pm | सर टोबी
सहसा आपण फार मोठ्या यशाची अपेक्षा करतो आणि त्या तुलनेत मिळालेलं कमी यश अथवा अपेक्षा न केलेला धक्कादायक परिणाम याची कारणमीमांसा आपल्याला अपेक्षित असावी. पण या उलट देखील झाल्याची उदाहरणं आहेत.
कलेच्या क्षेत्रात तर अशी बक्कळ उदाहरणं आहेत. जेमतेम कर्जफेड व्हावी म्हणून काढलेला सीआयडी हा गुरुदत्तचा सिनेमा, वॉल्ट डिस्ने ची कार्टून्स यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं आहे.
औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत कधी कधी एखादं बाय प्रॉडक्ट मुळ उत्पादनापेक्षा जास्त यशस्वी होतं तर बऱ्याच वेळेला एखादं उत्पादन काळाच्या बरेच पुढे असते. याचे उदाहरण म्हणजे सॅमसंग चा फार वर्षापूर्वी आलेला एक मायक्रोवेव्ह अवन. त्यामध्ये सेल्फ डाग्नोसिस ची फीचर होती ज्या द्वारे तो सर्व्हिस रिक्वेस्ट तयार करून कस्टमर केअरला पाठवू शकायचा असे काहीसं वाचलेलं आठवतं. मोबाईल नियंत्रित घरगुती उपकरणे असलेली घरे काही वर्षापूर्वी गेरा वगैरे विकसक पुण्यात विकत होती. आता ती वैशिष्ठ्य एकतर सर्वसाधारण झाली असावी किंवा फार लोकप्रिय नसावी.
निसर्गात कोणतीही मानवनिर्मित गोष्ट जशी न तशी पुनः निर्मित होत नाही. यालाच गुणवत्ता नियंत्रण पद्धतीत एक विशिष्ठ संज्ञा आहे. तात्पर्य म्हणजे आडाखे चुकणे हे नैसर्गिकच आहे असे वाटते. कल्पणांचं व्यावसायिक यश कसे असू शकेल याचं आपण थोडे फार विश्लेषण करू शकतो एवढाच काय तो आपला कंट्रोल.
19 Feb 2022 - 8:12 pm | मुक्त विहारि
सोनीने मार्व्हलचे फक्त स्पायडर मॅन, हेच कॅरेक्टर खरेदी केले.
आज Avengers धुमाकुळ घालत आहे आणि पुढील किमान 20-25 वर्षे तरी Avengers धुमाकुळ घालतील
अशीच गोष्ट, हॅरी पाॅटर बाबतीत...
मनोरंजनाचा धंदा करतांना, लहान मुलांना काय आवडते? ही बाब लक्षांत घेतली की, धंदा बुडीत खात्यात जात नाही
पाॅपीन्स, जेम्स, लिची, बबलगम, खेळणी, ह्यांना मरण नाही
ठकी ते बार्बी आणि लाकडी बस ते रिमोटची गाडी, ही उदाहरणे पुरेशी आहेत
19 Feb 2022 - 10:31 pm | उपयोजक
छान प्रतिसाद
20 Feb 2022 - 11:19 am | साहना
स्टीफन पिंकर ह्यांचे रॅशनॅलिटी हे पुस्तक पाहावे, वेळ नसल्यास त्यांचे व्याख्यान ऐकले तरी पुरेसे आहे.
20 Feb 2022 - 12:54 pm | उपयोजक
नक्की वाचतो
20 Feb 2022 - 12:45 pm | चौथा कोनाडा
तर्क चुकण्यासाठीच असतात !
तर्काचे परिणाम, तर्क करताना किती चुकीची माहिती गृहीत धरलीय, त्यानुसार चुकांचे परिमाण असते !
20 Feb 2022 - 1:17 pm | Trump
संगणकाने तर्क करण्याच्या पध्द्दतीमध्ये बरीच प्रगती झाली. शक्य तेवढे मानवी वर्तणुक संगणकामध्ये कशी आणतात येईल आणि तर्क / अंदाज कसे मांडता येतील, यासाठी machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प्रतिशब्द?) बघुया घ्या. त्यात पुर्ण प्रक्रिया लिहीली आहे.
20 Feb 2022 - 3:32 pm | सर टोबी
तर्काची मीमांसा करताना अनिश्चितता, परिस्थितीचे पूर्ण आकलन नसणे आणि आयत्या वेळेस होणारे आणि आपल्या तर्काची पूर्ण वाट लावणारे घटक कारणीभूत असतात. अनिश्चित घटकांची प्रॉबेबिलिटी आणि पोस्ट मोर्टेम पध्द्तीने नव्याने आकलन झालेले घटक यांना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा पुढच्या अंदाज वर्तवण्याच्या वेळेस वापरता येऊ शकते. परंतु तिसरा घटक हा सर्वांना भारी पडतो आणि किती आकलन झालेले घटक विचारात घ्यायचे हा सर्वस्वी मानवाचा निर्णय असतो. त्यामुळे ज्ञात असणाऱ्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता फारशी उपयोगी नाही असे वाटते.
खूप किचकट परीक्षण जसे कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही ते तपासणे आणि खूप माहितीचे परीक्षण जसे संशयास्पद आर्थिक देवाण घेवाण होत आहे का ते तपासणे या कामात आपण म्हणता त्या तंत्राचा वापर योग्य आणि खात्रीशीर आहे.
20 Feb 2022 - 3:57 pm | Trump
हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence चा भाग झाला.
https://machinelearningmastery.com/different-results-each-time-in-machin...
machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प्रतिशब्द?) मध्ये आलेली नवीन माहिती वापरुन तर्क बदलतो.
https://machinelearningmastery.com/different-results-each-time-in-machin...
https://towardsdatascience.com/how-to-apply-continual-learning-to-your-m...
20 Feb 2022 - 2:14 pm | मदनबाण
सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत असे वाटले तरी तर्क करताना काही गृहीतक करणे राहणे. भावना, अहं इं इं इं यांचा तर्क करताना मानवी मनावर असलेला प्रभाव. अश्या अनेक गोष्टी असतात ज्यावर मनुष्य प्राण्याचे कधीच नियंत्रण नसते त्या तर्क करताना विचारात घेतल्या जात नाहीत.
जाता जाता :- एक तर्क करुन पाहतो... रशिया आणि युक्रेन यांच्यात जर युद्ध झाले तर फ्लॅश पॉइंट Donbass असेल. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jawan Hai | Vaishali Samant | Sagarika Music
20 Feb 2022 - 6:30 pm | बाजीगर
जर कुणाला आपण फार तर्क महापंडित आहोत वाटत असेल तर पुन्हा विचार करा, जेव्हा अनंत शक्यता आणि प्रत्येक शक्यतेची पुन्हा अनेक शक्यता असल्या तर मानवी मेंदूचा 'दही काला ' होणार ना राव.
तळाची लिंक बघावी.
शतरंज खेळण्याचा कार्यक्रम सी मध्ये लिहिलेला होता आणि एआयएक्स ऑपरेटिंग सिस्टम अंतर्गत चालविला जात होता. हे प्रति सेकंद 200 दशलक्ष पोझिशन्सचे मूल्यांकन करण्यास सक्षम होते, जे 1996 च्या आवृत्तीपेक्षा दुप्पट होते. 1997 मध्ये डीप ब्लू पुन्हा श्रेणीसुधारित केले. जून 1997 मध्ये, टॉप 500 च्या यादीनुसार डिप ब्लू 259 वा सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर होता, त्याने हाय-परफॉरमेंस लाइनपॅक बेंचमार्कवर 11.38 जीएफएलओपीएस प्राप्त केले. - https://mr.atlantida-pedia.org/804152-deep-blue-chess-computer-FZYZGK
20 Feb 2022 - 7:29 pm | sunil kachure
कारण तर्क तुमचे असले तरी ते विविध घटक,विविध स्थित्यंतर,परिस्थिती ह्या वर अवलंबून असतात
तुमचे काय कोणाचेच त्या वर नियंत्रण नसते.
ते तुमच्या तर्काला अनुकल राहतीलच ह्याची झीरो शास्वती असते .अगदी सुपर कॉम्प्युटर वापरला तरी हीच स्थिती असणार.
म्हणून तर्क चुकतं
20 Feb 2022 - 9:48 pm | चित्रगुप्त
....... उगाच काहीतरी तर्कटे रचित बसू नये. धीराने वाट बघत बसावे. योग्य वेळ आली की काय ते कळतेच.
धीर धरारे धीरापोटी
फळे रसाळ गोमटी.
मात्र धीराने वाट बघत बसायला, रसाळ गोमटी फळे चाखत बसायला एक खाटले तेवढे हवेच ... "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी".
तस्मात एका खाटल्याची सोय करून ठेवावी म्हणजे झाले. हाकानाका.
20 Feb 2022 - 11:44 pm | मुक्त विहारि
भारी प्रतिसाद