गाभा:
या रविवारच्या लोकसत्ता मध्ये चतुरन्ग पुरवणीतील दोन फुल एक हाफ वाचला. लेख मराठी अस्मितेचे राजकारण करणारया राजकीय पक्षाविषयी असुन फारच मार्मीक आहे.
मिपा करासाठी त्याची URL येथे देत आहे. (http://www.loksatta.com/daily/20080217/lr05.htm)
जरूर आस्वाद घ्यावा व प्रतिक्रिया नोन्दवाव्यात.
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
प्रतिक्रिया
20 Feb 2008 - 6:00 pm | विसोबा खेचर
च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा...
तात्या.
21 Feb 2008 - 8:51 am | तात्या विन्चू
लोकसत्ता इन्टर् नेट वर वाचण्याकरीता Dynamic Font ActiveX Control Install करावा लागतो. टो लोकसत्ता च्या साईट वरतीच मिळतो.
20 Feb 2008 - 7:11 pm | शरुबाबा
च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा...
शरद
20 Feb 2008 - 9:22 pm | ऋषिकेश
लेख मस्त.. मजा आली.. दुव्या बद्दल आभार
फक्त एक चुक खटकली
बी.इ.एस्.टी. मधला बी हा बाँम्बेसाठी नसून बृहन्मुंबईसाठी आहे
(मुंबईकर) ऋषिकेश
21 Feb 2008 - 8:54 am | तात्या विन्चू
बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity Supply & Transport इन्ग्रजीत्......हेही थोड अतर्क्य वाटत.
21 Feb 2008 - 10:06 pm | ऋषिकेश
बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity .....
माझ्या बस पासावर तरी तसं (बृहन्मुंबई/bruhanmumbai) लिहिलं होतं बॉ!
कदाचित "बेस्ट" नावात बदल करावा लागु नये म्हणून केलेली युक्ती असावी. तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय?
ऋषिकेश
21 Feb 2008 - 10:10 pm | llपुण्याचे पेशवेll
तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय?
कधीही.
पुण्याचे पेशवे
21 Feb 2008 - 8:58 am | बेसनलाडू
अ. आय ई मध्ये लोकसत्ता नीट दिसतो. विशेष काही करायची गरज नाही. अडचण असल्यास लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करून पहा.
ब. मॉझिला फायरफॉक्समध्ये पाहताना -
१. लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करा.
२. साइट पाहताना : व्यू > कॅरॅक्टर एन्कोडिंग > वेस्टर्न (आय एस् ओ - ८८५९ - १) सिलेक्ट करा.
साइट नीट दिसेल (दिसायला हवी)
(उपायसूचक)बेसनलाडू
21 Feb 2008 - 10:15 am | तात्या विंचू
फायरफॉक्सचे IE-tab म्हणून एक प्लग-इन मिळते....
ते इन्स्टाल करुन बघा
21 Feb 2008 - 10:21 am | प्रकाश घाटपांडे
लोकसत्ताचे युनिकोड कन्व्हर्जन कसे करायचे? चांगले लेख कसे सेव्ह करायचे?
प्रकाश घाटपांडे