कॅलिफोर्निया स्पेशल!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
20 Feb 2008 - 9:23 am
गाभा: 

आपली स्वतःची ओळख करून देणार्‍या धाग्यामध्ये आम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्याचे म्हटल्यावर आम्हाला नंदन आणि बेसनलाडू यांचे उत्तर आले की ते सुद्धा तिथेच रहातात. तेंव्हा एक कल्पना सुचली की कॅलिफोर्नियात रहाणारे किती मि.पा मेंबर आहेत त्याचा अंदाज घ्यावा...

तर मि. पा. करांनो, जर तुम्ही सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्य करीत असाल तर कृपया प्रतिसाद द्या...
पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा. ची कॅलिफोर्निया शाखा सुरु करूयात....

ही मुंबई-पुण्याची मेंबरं, च्यायला, एकत्र येवून पार्ट्या झोडायच्या गोष्टी करून आपल्याला जळवतात, आपणही इथे पार्ट्या करू....
मिसळ-पाव तर ठेवूच पण कायतरी कोंबडं-बकरं ही मारू की...
शाकाहारी लोकांसाठी काहीतरी श्रीखंड-पुरी वगैरे...
ड्रिंक्स वगैरे सुद्धा (आमच्या बायकोची फुल परमिशन हाय वो!)...

मुख्य म्हणजे एकत्र येऊन गप्पा-टप्पा करूयात की....

काय, पटते का आयडिया?

तुमचा,
डांबिसकाका.

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 9:32 am | सृष्टीलावण्या

तेव्हढं जरा कोकणचा कॅलिफोर्निया करायचं मनावर घ्या की राव..

म्हंजे आमी बी तुमच्यात येऊ...

तेच्यासाठी तुमकां मनोहरपंत जोशी होये!
आमकां आमच्यो मर्यादो ठावंक आसंत....
आपलो,
पिवळो डांबिस

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 10:13 am | सृष्टीलावण्या

देवचाराला कुठली आलीयां मर्यादा...

तेचा असां आसां, लावण्यलतिकाबाय,
आमच्यातसुद्धा साधां भूत, संमंध (खविस), देवचार आणि वेतोबा अशी चातुर्वर्ण व्यवस्था आसां. तुम्ही सांगलेला काम आमच्या ताकदीबाहेरचा आसां. कोकणाक (आणि कोकणी लोकांक!) सुधारूक वेतोबाच व्हयो.:)
म्हणान तर तुमका मनोहरपंतांकडे धाडलंय! :))))))
आपलो,
पिवळो डांबिस

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 10:50 am | विसोबा खेचर

पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा. ची कॅलिफोर्निया शाखा सुरु करूयात....

अरे वा! मिपाच्या कॅलिफोर्निया शाखेला आमच्याही शुभेच्छा बरं का! :)

मिसळ-पाव तर ठेवूच पण कायतरी कोंबडं-बकरं ही मारू की...

अरे डांबिसा, शिंच्या तू भट ना?? :) कोंबड्या-बकर्‍या कसल्या रे मारून खातोस फोकलिच्या?! :)

शाकाहारी लोकांसाठी काहीतरी श्रीखंड-पुरी वगैरे...

हे काही ठीक नाही बरं का बॉस! श्रीखंडपुरी हा पदार्थ एवढा काही खालच्या पातळीचा नाही की तू त्याची 'वगैरे..' या शब्दाने संभावना करावीस! अरे बाबा, श्रीखंडपुरीची तुलना कशाशीच होऊ शकत नाही रे! श्रीखंडपुरीवर जर थोडीफार मात करायचीच असेल तर साक्षात आमरसपुरीलाच मैदानात उतरवावे लागेल! पण तुमच्या कोंबड्या-बकर्‍यांना श्रीखंडपुरीला मात देणं जन्मात जमणार नाही! :)

मागे एकदा मी 'त्या तिथे पलिकडे, तिकडे....' आमच्या पहिल्या प्रेमावर पक्वांन्नांच्या स्पर्धा घेतल्या होत्या, तेव्हा पुरणपोळी जिंकली होती आणि आमच्या श्रीखंडपुरीचा दुसरा नंबर आला होता! :) असो.. गेले ते तिकडचे दिवस! :)

ड्रिंक्स वगैरे सुद्धा (आमच्या बायकोची फुल परमिशन हाय वो!)...

हं! भेंXX, पण बदनाम मात्र एकटा तात्याच होतो! :)

मुख्य म्हणजे एकत्र येऊन गप्पा-टप्पा करूयात की....

वा वा! जरूर एकत्र या, गप्पा टप्पा गाणी गोष्टी करा आणि आम्हालाही फोटू पाठवा!

बाय द वे, तुमच्या कॅलिफोर्नियापासून विल्मिंगटन किती दूर आहे हो?! :) जमल्यास आमच्या काकाकूंनाही बोलवा हो संमेलनाला! :)

आपला,
(श्रीखंडपुरीप्रेमी!) तात्या.

बेसनलाडू's picture

20 Feb 2008 - 11:06 am | बेसनलाडू

मी सॅन होजे मध्ये असतो - बे एरियात.
सर्किटरावही सॅन होजेतच असतात. 'एक'सुद्धा येथेच आहे, असे समजते.
नंदनपंत सॅन डिएगोस.
पिडांकाका लॉस एन्जेलेसमध्ये.
पाच मेंबरं इथेच झाली.
आणखी कोणी?
(सदस्यशोधक)बेसनलाडू
अवांतर - पिडांकाका, मागच्या लॉस एन्जेलिस भेटीदरम्यान सॅन्ता मॉनिका बीच, मॅलिबू आणि सनसेट बुलवा राहून गेलं राव :( काही जमत असल्यास बघा, फिरवून वगैरे आणायचं या पोरांना ;)
(भटका)बेसनलाडू
अतिअवांतर - सॅन होजे, कॅलिफोर्निया ते विल्मिंग्टन, नॉर्थ कॅरोलायना अंतर = सुमारे २,८६७ मैल (अंदाजे ४,५८७ किमी) आहे.
(गूगल्या)बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2008 - 12:22 am | llपुण्याचे पेशवेll

च्यामारी *****!
कोन न्यू यॉर्क किवा न्यू जरशी ला न्हाई कां? आपन पन करू की वो पार्टी बिर्टी कायतरी....
पुण्याचे पेशवे

आपापली खरी नावं सागायची आहेत का? ;)

नंदन's picture

20 Feb 2008 - 11:57 am | नंदन

उत्तम बेत आहे. मात्र सध्या दोघेजण द. कॅलिफोर्नियात आणि तिघे उत्तरेत अशी स्थिती आहे. तेव्हा जरा मधली जागा शोधा की, राव. अर्थात पि. डां. काका मिसळ-पाव, कोंबडं-बकरं, श्रीखंड-पुरी असा जंगी बेत ठेवणार असतील तर अगदी ईशान्य कॅलिफोर्निया देखील चालेल :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2008 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॅलिफोर्नियात असलेली मंडळीची नावे समजली आणि आनंद वाटला. मिपाचा तिकडे एक कट्टा जमतोय,मैफिली आणि इतर कार्यक्रम होणार आहेत त्याचाही आनंद वाटला. त्यासाठी आमच्याही शुभेच्छा !!!!!
पण, आमचे एक मित्र त्या कार्यक्रमात सहभागी होणार असेल तर तो कार्यक्रम यशस्वी होईल का याबद्दल शंका आहे ? आणि त्यांना कामातुन वेळ मिळालाच  तर, मराठी संकेतस्थळावरील मोकाट "वळू '' म्हणुन आमच्यातर्फे त्यांना एक मानपत्रही   द्या !!!! :) ( ह. घ्या )

आपला
कधी-कधी कै च्या कै प्रतिसाद लिहिणारा
प्रा.डॉ.... ......

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर

ही अमेरिकन मंडळी पार्ट्या वगैरे झोडून मजा मारणार आणि आम्ही काय नुसते कळफलक बडवायचे? रविवारी येतो आहे मुंबईत. ठरवायचा का 'बेत'?

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 3:10 pm | विसोबा खेचर

रविवारी येतो आहे मुंबईत. ठरवायचा का 'बेत'?

Done!

नक्की या. साक्षीलाही विचारतो आणि मालवण हॉटेलची 'बैठक' बुक करतो. नीलकांतराव बहुतेक गावी जाणार आहेत, परंतु येताना तुमच्यासोबत त्या लबाड, चावट आणि फाजील नीलहंसालाही घेऊन या! :)

नीलहंसाला किंवा साक्षिला वेळ नसेल तर आपण दोघे समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४ येथे जेवायला जाऊ! अहो काय झकास जेवण असतं! :)

त्या आधी गिरगावातच कुठेतरी बसून दोन दोन पेग मारू! :)

तुम्ही याच तिच्यायला, वाट बघतो..!..:)

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 3:12 pm | प्रभाकर पेठकर

ठरलं तर मग! येतोच. माझ्या जवळ 'स्टॉक' ही पडून आहे. खणखणीत धमाल करू.

अवलिया's picture

20 Feb 2008 - 5:24 pm | अवलिया

ठरलं तर मग! येतोच

तात्या हे तुमचे प्लान जगजाहिर करु नका त्रास होतोः)

आणि हे काय नीळ नीळ केले भक्त प्रल्हाद पिक्चर पाहिल्यासारखे वाटतेः)

नाना

सुनील's picture

21 Feb 2008 - 12:12 am | सुनील

अगदी खरेच डांबिस आहात हो! आता पुढच्या आठवड्यात मी जातोय भारतात आणि तुम्ही खुशाल (मला टाकून) मिसळपाव, कोंबडं-बकरं, श्रिखंड पुरी (आणि मुख्य म्हणजे सोमरस!) घेणार?????

(नाराज) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2008 - 3:12 am | पिवळा डांबिस

सध्या दोघेजण द. कॅलिफोर्नियात आणि तिघे उत्तरेत अशी स्थिती आहे. तेव्हा जरा मधली जागा शोधा की, राव.

असं दिसतंय खरं! यावर दोन उपाय सुचतातः

१. मी मध्येच आहे, तेंव्हा माझ्याकडे जमायचं. नंदनला काही प्रॉब्लेम येवू नये पण सान होजेवाल्यांना ड्राईव्ह करायला लागेल जरा...

किंवा,

२. तीन लोकं सान होजे मध्ये आहेत तेंव्हा तिथे जमायचं. मला काही प्रॉब्लेम नाही ड्राईव्ह करायला... माझा एक नातेवाईक जवळच (कुपर्टिनोमध्ये) रहातो. तेंव्हा मी तिथे येत असतो. नंदनला जरा लांब पडेल पण तो आधल्या संध्याकाळी निघून माझ्याकडे रात्री राहू शकतो आणि दुसर्‍या दिवशी सान होजेत येऊ शकतो. काय रे बाबा, नंदन? चालेल का?

काय वाटतं तुम्हाला ते सांगा...

-पिवळा डांबिस

बेसनलाडू's picture

21 Feb 2008 - 3:46 am | बेसनलाडू

(स्वागतोत्सुक)बेसनलाडू

नंदन's picture

21 Feb 2008 - 7:12 am | नंदन

म्हणजे एल ए मध्येच जमूया का? अगदीच मध्यवर्ती नसले तरी त्यातल्या त्यात जवळ पडेल. नाहीतर सॅन डिएगो - सॅन होजे म्हणजे यायचे ९-१० तास, जायचे ९-१० तास व्हायचे. ह्या थँक्सगिव्हिंगला एकूण १४ तास लागले होते, तो अनुभव अजून ताजा आहे :(

बेला, तुला ग्रेहाऊंडन किंवा एक रावांबरोबर यायला जमेल का? पाचवा मेम्बर बहुतेक मार्चपर्यंत बिझी आहे. तेव्हा सध्या तरी आपण चौघेच असू असं दिसतंय.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू's picture

21 Feb 2008 - 7:55 am | बेसनलाडू

हवं तर 'एका'बरोबर गाडीने जमल्यास बघू. नाहीतर सध्या पिडांकाकांना विमानाचे तिकीट पाठवायला सांगून तो खर्च कट्ट्याबद्दल मिसळपावच्या तिजोरीतून वळता करून घेऊ. तुलाही हा उपाय करायला हरकत नाही खरी ;)
(मारवाडी)बेसनलाडू

चायला. सध्या घरातल्या परिस्थीतिनुसार गोल्फचे ३ तास काढणं मुष्किल झालं आहे..
एल ए साठी परवानगी मिळणं अशक्य आहे.

बेसनलाडू's picture

21 Feb 2008 - 8:54 am | बेसनलाडू

परवानगी????? काय राव, तुम्ही 'फ्यामिलीवाले' वाटतं :)))) (हलकेच घ्या)
(फाजील)बेसनलाडू

एक's picture

21 Feb 2008 - 11:37 pm | एक

आतातर एक मेंबर वाढला आहे..

(गेले ते दिन गेले.. जेव्हा परवानगी हा शब्द कोशात नव्हता)

प्राजु's picture

21 Feb 2008 - 3:40 am | प्राजु

मी कनेक्टीकट मध्ये म्हणजे न्यूयोर्क्-न्यूजर्सी च्या जवळच राहते आहे. सांगा कधी करूया इथला कट्टा??

- प्राजु

पिवळा डांबिस's picture

24 Feb 2008 - 11:27 am | पिवळा डांबिस

श्रीखंडपुरीची तुलना कशाशीच होऊ शकत नाही रे! तुमच्या कोंबड्या-बकर्‍यांना श्रीखंडपुरीला मात देणं जन्मात जमणार नाही!
अरे अरे तात्या, असं मोठ्यानं चारचौघात बोलू नकोस, लोकं हसतील!!! :)))))

आमच्या पहिल्या प्रेमावर पक्वांन्नांच्या स्पर्धा घेतल्या होत्या, तेव्हा पुरणपोळी जिंकली होती
पुरणपोळी नंबर १ हे मान्य! पण फक्त तेलपोळी! पीठपोळी नाही!

ड्रिंक्स वगैरे सुद्धा (आमच्या बायकोची फुल परमिशन हाय वो!)...
हं! भेंXX, पण बदनाम मात्र एकटा तात्याच होतो! :)

आता असतं एकेकाचं नशीब!:)))
बघ एखाद्या ज्योतिष्याला कुंडली दाखवून काय ग्रहांची उलटापालट करता येतेय का! :)

जमल्यास आमच्या काकाकाकूंनाही बोलवा हो संमेलनाला! :)
जरूर! बोलवायला आमची ना नाही, पण प्रवासखर्चाचा विचार केला तर वाचवलेल्या डॉलर्समध्ये काका-काकू जन्मभर विल्मिंग्टनमध्ये मिसळ्पाव खाऊ शकतील! :))
हा देशच असा काहिच्याकाही अफाट आहे बघ!

पिडांकाका, मागच्या लॉस एन्जेलिस भेटीदरम्यान सॅन्ता मॉनिका बीच, मॅलिबू आणि सनसेट बुलवा राहून गेलं राव
अरे मग ये की! माझ्या घरापासून मालीबू बीच फक्त १५ मिनिटांवर आहे आणि सान्ता मोनिका २० मिनिटांवर!!

अगदी खरेच डांबिस आहात हो! आता पुढच्या आठवड्यात मी जातोय भारतात आणि तुम्ही खुशाल (मला टाकून) मिसळपाव, कोंबडं-बकरं, श्रिखंड पुरी (आणि मुख्य म्हणजे सोमरस!) घेणार?????
(नाराज) सुनील
अरे बाबा, तू कशाला नाराज होतोस? तू तर माहेरी चाललास! जा की तिथे जाऊन तात्याच्या खनपटीला बस! म्हणावं पार्टी करूया!! :))

मुक्तसुनीत's picture

21 Feb 2008 - 3:48 am | मुक्तसुनीत

च्यामारी हा म्हन्जे आता इस्ट कोस्टच्या इभ्रतीचा प्रश्न झाला. कुठे गेले ते एडिसन्-ओक ट्री रोड वरचे मराठी मावळे ? मुंग्यानी मेरुपर्वत तर गिळला नाही ना ? मग इस्ट कोस्टवरच्या मिपाकरांचा कसलाच प्रतिसाद नाही ! (एकदम ह. घ्या. !)

चतुरंग's picture

21 Feb 2008 - 3:56 am | चतुरंग

म्हणजे १.३० तास कनेटिकट आणि ४.३० तास जर्सी ड्रायव्हिंगने.
इस्ट्-कोस्ट्ला किती मेंबरं आहेत?

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

21 Feb 2008 - 4:04 am | मुक्तसुनीत

मी डीसी मधे ....
जर्सी = ४ तास
कनेटीकट : ७ तास
मॅस : ८-९ तास

आणि हो , विल्मिंग्टन : जेमतेम अडीच तास ;-)

क्यारोलिना, जॉर्ज्या , फ्लोरिडा वाले कुणी ?

कोलबेर's picture

21 Feb 2008 - 6:37 am | कोलबेर

अहो फ्लोरिडातल्या मेंबरालापण मॅसेच्युसेट्सला यायचे म्हणजे आयुष्यभर मिसळ खायला पुरेल इतका खर्च केला पाहिजे!! :)

मानस's picture

21 Feb 2008 - 6:42 am | मानस

मी आलो, डि सी च्या बाजुलाच आहे की आपण दोघं

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2008 - 4:07 am | पिवळा डांबिस

जरा नवीन धागा सुरु करा....
नवीन धागा सुरू करा..
:))
-डांबिसकाका

कोलबेर's picture

21 Feb 2008 - 6:38 am | कोलबेर

वेस्ट कोस्ट = निळा रंग
इस्ट कोस्ट = लाल रंग?

एकलव्य's picture

21 Feb 2008 - 6:49 am | एकलव्य

वेस्ट कोस्ट = लाल रंग
इस्ट कोस्ट = निळा रंग?

कोलबेर's picture

21 Feb 2008 - 6:53 am | कोलबेर

तसं बघीतलं तर इस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट दोन्हीही = निळा रंग, आमचा साऊथ= लाल रंग
(लाल डांबीस) कोलबेर

मानस's picture

21 Feb 2008 - 6:53 am | मानस

च्यामारी म्हणजे 'मकेन' आणि 'ओबामा' का?

ऋषिकेश's picture

21 Feb 2008 - 4:08 am | ऋषिकेश

मी केवळ हा विकेंड आहे जर्सी मध्ये पुढच्या विकेंडला भारतात परततोय (वन वे तिकिट) :) तेव्हा हा विकांत सामानाच्या बांधाबांधीत जाईल .. तेव्हा मुंबईत कट्टा जमेल तेव्हा मला काउंट करायला विसरू नका :)

-ऋषिकेश

लंबूटांग's picture

22 Feb 2008 - 11:05 am | लंबूटांग

मी बॉस्टन ला आहे. संगणक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतोय University of Massachusetts - Boston मध्ये. शिकत असल्यामुळे ४ चाकी नाही आहे अजून.

इस्ट कोस्ट चा कट्टा कुठे जमवता आहात? न्युयॉर्क ला असेल तर सोपे आणि स्वस्त दोन्हीही पडेल. (काय करणार हो शेवटी कितीही प्रयत्न केला तरी कोकणस्थी बाणा डोके वर काढतोच).