"सिंहगड" (भाग-१)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
17 Dec 2021 - 10:46 pm

अलीकडेच मी मुंबईहून पुण्याला येताना सिंहगड पकडण्यासाठी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहचलो. आगाऊ आरक्षण केलेले होतेच. तिकडे 9 नंबरवर कल्याणच्या कार्यअश्वाची (लोको) दख्खनच्या राणीशी जोडणी सुरू झालेली होतीच, तोपर्यंत सिंहगड विशेष शेजारच्या 10 नंबर ढकलत आणली जात होती. सिंहगड विशेष फलाटावर येत असताना तिचे नवेकोरे आकाशी रंगाचे एलएचबी डबे नजर वेधून घेऊ लागले. मला वाटलं की, कल्याणचे WDS-6S कार्यअश्वच (लोको) त्याला ढकलत असेल. पण सिंहगडला गाडी समोर थांबत असताना कल्याणचाच डब्ल्यूएपी-7 कार्यअश्व दिसला. फलाटावर आल्यावर सिंहगडच्या लोको पायलटने पुढच्या केबिनमध्ये जाऊन लोको पुन्हा सुरू केले. आता लोकोमधली HOG यंत्रणा कार्यान्वित झाली आणि त्याचा विशिष्ट आवाजही ऐकू येऊ लागला होता. इकडे हे सगळं सुरू असतानाच आता घड्याळात ठीक 17:10 झालेले असल्याने दख्खनची राणी पुण्याच्या दिशेने निघून गेली.

आज सिंहगडने प्रवास करण्याचा निर्णय घेऊन तिचे आरक्षण केलेले असल्यामुळे शेजारच्या 9 क्रमांकाच्या फलाटावरून जाणाऱ्या दख्खनच्या राणीला बायबाय केले. सिंहगड सुटायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे फलाटाच्या शेवटीच अजून थोडा वेळ थांबलो होतो. आता आमच्या लोको पायलटकडे पॉईंस्टमनने ब्रेक पॉवर सर्टिफिकेट बुक आणले. लोको पायलटने त्यात ब्रेक पॉवरची नोंदणी करून सही केली आणि त्या पॉईंस्टमनने त्याची एक प्रत लोको पायलटकडे परत केली.
दरम्यान, दख्खनच्या राणीनं दिवा जंक्शन गाठलेलं होतं. आता सिंहगड विशेष सुटण्याची वेळ होत आली होती. मी आता माझ्या सीटवर जाऊन बसलो होतो. तोवर CSMT च्या असिस्टंट स्टेशन मास्टरने सेक्शन कंट्रोलरकडून सिंहगड विशेष सोडण्यासाठीची परवानगी घेतली होती. त्यामुळे घड्याळात 17:49 होऊन गेल्यावर फलाट क्रमांक 10 चा स्टार्टर सिग्नल पिवळा झाला. त्याचा संकेत मागे गार्डलाही मिळत होता. ठीक 17:50 वाजता सिंहगड विशेषने दीर्घ गर्जनेसह पुण्याच्या दिशेने कूच केले. पूर्वी यावेळी CSMT वरून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री सुटत होती. पण लॉकडाऊननंतर ती गाडी पुन्हा सुरू न करता तिच्या जागी सिंहगड एक्सप्रेस सोडली जात आहे.

आज सिंहगड विशेष सुटली, तेव्हा बऱ्यापैकी मोकळी होती. हळुहळू वेग घेत सिंहगड 18:04 ला दादरमध्ये पोहोचली. गाडी थांबल्याबरोबर थोडीफार गर्दी आत चढली. सगळे आपापल्या जागेवर विसावत असतानाच तिथला दोन मिनिटांचा मुक्काम आवरून सिंहगड पुढे निघाली. सिंहगड अत्याधुनिक एलएचबी डब्यांची झालेली असली तरी या डब्यांमधील एक दोष जाणवू लागला होता. तो म्हणजे jerks! गाडीचा वेग कमी होताना हे jerks विशेषकरून जाणवत होते. आता देशातील कोविड-19 ची परिस्थिती सुधारू लागली होती. त्यामुळे मुंबईत रेल्वेगाड्यांची वाहतूक वाढू लागली होती. कुर्ल्यानंतर 28 किलोमीटरपासून ठाण्यापर्यंतच्या फास्ट मार्गावर वेगमर्यादा असल्यामुळे सिंहगड हळुहळू धावत गेली आणि 18:33 ला ठाण्यात जाऊन उभी राहिली. त्याआधी आठ मिनिटांपूर्वी पुण्याहून आलेली 01008 डेक्कन विशेष अप फास्टवरून दादरकडे निघून गेली होती. ठाण्यातही गाडीत थोडी गर्दी चढली.

Link
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/1.html

(क्रमश:)

(ठाण्यापासून पुढचा प्रवास पुढच्या भागात)

प्रतिक्रिया

पराग१२२६३'s picture

19 Dec 2021 - 3:26 pm | पराग१२२६३

"सिंहगड" (भाग-2) ची लिंक

https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/2.html?m=1

सिरुसेरि's picture

21 Dec 2021 - 9:51 am | सिरुसेरि

रेल्वे यंत्रणेचे सुरेख डिटेलिंग दिले आहे .

जेम्स वांड's picture

21 Dec 2021 - 10:03 am | जेम्स वांड

लेखकाने इन्स्टिट्यूट ऑफ रेल ट्रान्सपोर्ट, दिल्ली इथून रेल ट्रान्सपोर्ट अँड मॅनेजमेंट (आरटीएम) ह्या विषयात डिप्लोमा केला आहे दूरस्थ शिक्षण पद्धतीने.

पराग ह्यांचे असेच कैक डिटेल असणारे विविध रेल्वे प्रवासाचे धागे मायबोलीवर वाचले होते. ते एक कट्टर रेलफॅन असल्याचे सहज लक्षात येते, डिस्टन्ट - डबल डिस्टन्ट सिग्नल्स, पिट लाईन वॉश लाईन इत्यादी तांत्रिक बाबींचे ज्ञान, ब्रेक पॉवर सर्टिफिकेट, ट्राफिक कंट्रोलिंग इत्यादींचे त्यांचे ज्ञान वादातीत आहे.

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2021 - 5:58 pm | चौथा कोनाडा

मस्त तपशील.

मागच्या आठवड्यात चेन्नई एक्स्प्रेसने पुणे सोलापूर असा प्रवास केला. ट्रेन ३० मि उशीरा म्हणजे दु. ४:२० ऐवजी ४:५० ला आली व ५:०० वा. सुटली. सोलापूर स्टेशनला पोहोचायला अर्धा तास उशीर झाला, रा. ९:०० नंतर पोहोचली. येताना हुतात्माने स. ६:३० ला सुटून पुणे स्थानकावर बरोबर १०:३० पोह्चली. परफेक्ट प्रवास !
भारतीय रेल्वे जिंदाबाद !

पराग१२२६३'s picture

21 Dec 2021 - 7:58 pm | पराग१२२६३

धन्यवाद जेम्स बॉण्ड आणि चौथा कोनाडा.

पराग१२२६३'s picture

21 Dec 2021 - 8:00 pm | पराग१२२६३

धन्यवाद जेम्स वांड आणि चौथा कोनाडा.