बेसनाचे लाडु

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in पाककृती
19 Oct 2009 - 11:52 am

२ वाट्या बेसन
२ वाट्या पिठी साखर
पाव वाटी दुध
दिड वाटी तुप
वेलची पावडर्+बेदाणे

*
गॅसवर भान्डे ठेवुन तुप वितळु दया.

*
मग त्यात बेसन घाला.

*
ढवळ्त राहा, भान्ड्याला तळाशी लागता कामा नये. चान्गले खमन्ग होइपर्यन्त भाजा. सुगन्ध दरवळला व रन्ग गुलाबी झाला कि
गॅस बन्द करा. भान्डे खाली उतरवुन घ्या. त्यात दुध घाला. परत ढ्वळा.

*
वरील मिश्रण थन्ड झाले कि त्यात पिठी साखर +वेलची पावडर्+बेदाणे घाला. मी बेदाणे आतच घालते. वरुन टोचुन ठेवायला आवडत नाही.

*
हाताने चान्गले मिक्स करा.

आणी लाडु वळायला घ्या.

लाडु वळुन झाले कि देवासमोर ठेवा न मग एक एक मटकवा.

प्रतिक्रिया

दशानन's picture

19 Oct 2009 - 11:53 am | दशानन

गचकलो !!!

ठार झालो....

मेलो मेलो.... :)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

प्रभो's picture

20 Oct 2009 - 5:25 pm | प्रभो

गचकलो !!!

ठार झालो....

मेलो मेलो....

--प्रभो

अवलिया's picture

19 Oct 2009 - 11:54 am | अवलिया

लाडु वळुन झाले कि देवासमोर ठेवा न मग एक एक मटकवा.

खोटं बोलु नका.... X(

माझ्यासमोर एक पण लाडु ठेवला नाही. ~X(

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रमोद देव's picture

19 Oct 2009 - 2:50 pm | प्रमोद देव

लाडु वळुन झाले कि देवासमोर ठेवा न मग एक एक मटकवा.

म्हणजे देवाला 'टुकटुक माकड' करत स्वतःच खायचे काय? ;)
हल्ली देवाचेही वाईट दिवस आलेत. :)

सहज's picture

19 Oct 2009 - 12:18 pm | सहज

बघा मिपामुळे (पांथस्थामुळे) सवय लागली की नाही? स्वयंपाकघरात प्रथम कॅमेरा व बॅटरी तयार ठेवा ही पहीली स्टेप आहे की नाही खरे तर :-)

मस्तच!!

गणपा's picture

19 Oct 2009 - 12:50 pm | गणपा

हे मात्र एकदम खर. नाही तरी बायको म्हणतेच की एक वेळ साहित्य नसल तरी चालेल पण ह्याला कॅमेरा मात्र पहिला हवा. त्याशिवाय हल्ली एकही पदार्थ बनत नाही घरी.. ;)

आवांतर : बाकी चुचु, लाडु एकदम ब्येश्टेट्ट. :)
बेसनाचे लाडु विक पॉइंट.

रामदास's picture

19 Oct 2009 - 12:23 pm | रामदास

ते प्लॅस्टीकच्या डब्यातले आणि काचेच्या वाडग्यातले वेगळे का दिसत आहेत.?
बेदाणे टोचूनच लावावेत.जितके लाडू तितकेच लागतात.

पर्नल नेने मराठे's picture

19 Oct 2009 - 12:25 pm | पर्नल नेने मराठे

वेगळे कुठेत :o कॅमेराचे सेटिन्ग बदलले जरा फक्त .....
चुचु

बाकरवडी's picture

19 Oct 2009 - 12:36 pm | बाकरवडी

प्लॅस्टीकच्या डब्यातले जास्त आहेत अन् काचेच्या वाडग्यातले कमी असे का ?

मटकवले का ?

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

विनायक प्रभू's picture

19 Oct 2009 - 2:01 pm | विनायक प्रभू

अगदी महत्वाचा मुद्दा

संजीव नाईक's picture

19 Oct 2009 - 1:35 pm | संजीव नाईक

पर्नल नेने मराठे
बायको गेली तीच्या आईकडे, आपण दिलेली पाककृती घरी करुन बघतो लाडवा ऐवजी केकेच्या साच्यामध्ये मिश्रण भरुन आकार देतो व तुम्हाला त्याचे चित्र व बायकोला नैवद्य दाखवतो . शाब्दिक मार दिल्यास तुमचे नाव पुढे करतो .
धन्यवाद,
पुढील पाक कृती समस्त महिला मंडळा ऐवजी आम्हा पुरुष मंडळी साठी सुध्दा लिहा जेने करुन आम्हाला सोप्या रितीने करुन मित्र मंडळीना तसेच घरच्या लोकांना करुन घालता येईल.
खवैया संजीव

किट्टु's picture

19 Oct 2009 - 1:58 pm | किट्टु

चुचु,

लाडु एकदम 'यम्मी' =P~ दिसत आहे..... मी पण फोटो पाहुन करुन पाहायचा विचार करते आहे... ;;)

स्वाती२'s picture

19 Oct 2009 - 6:31 pm | स्वाती२

छान दिसतायत लाडू. मी पण बेदाणे आतच घालते. इथले बेदाणे मोठे असतात. नीट टोचले नाही जात.

गणपा's picture

19 Oct 2009 - 6:51 pm | गणपा

एकदम करेक्ट बोललीस, मेले ते भले मोठ्ठे बेदाणे टोचायला गेलो की त्या लाडुचा पेढा होतो.

मसक्कली's picture

20 Oct 2009 - 12:44 pm | मसक्कली

वन्टास....!!

झ्याक दिसत हाय.. =P~

नेहमी आनंदी's picture

26 Oct 2009 - 2:53 pm | नेहमी आनंदी

<:P
लाडू काय तुम्ही एकट्याच खाणार का?
इकडे आणा आपण सगळे खाऊ बर कां... :))

यन्ना _रास्कला's picture

26 Oct 2009 - 5:40 pm | यन्ना _रास्कला

सब्द मिसळ्पावावर वाच्ला आनी जोराचा ठस्का लाग्ला. वायच ऊच्की लागुन र्‍हायाली. ;)

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

माहितगार's picture

17 Nov 2021 - 1:04 pm | माहितगार

गोड कढीचे बेसनाच्या लाडूत परिवर्तन शक्य असू शकेल का? माफ करा, एक तर एवढ्या प्रश्नासाठी नवा धागा उघडणे शक्य नाही त्यामुळे गुगल्याच्या साहाय्याने हा धागा प्रश्न विचारण्यासाठी निवडला. प्रश्न उपहासाने विचारत नाहीए . कुटूंबीय गावी गेले असताना मदतनीसास सांगून बनवून घेतलेल्या कढीत साखर खरेच खूप झालीए आणि ओळखीच्या शेजारच्यांना बेसनाचा उपवास असतो, लस्सीची गोड कढी खाणे शक्य नाही काय करावे कळत नाही :( :)

सरिता बांदेकर's picture

17 Nov 2021 - 5:36 pm | सरिता बांदेकर

माहितगार नमस्कार,
बेसनाचे लाडू होणार नाहीत पण थोड्या कढीत गव्हाचं पीठ आणि थोडा खायचा सोडा घाला.
त्याचे मालपुवे बनवा. गोड कमी असेल तर गुळ घाला.
किंवा बेसन घालून ढोकळा करता येईल.
पण मालपुवे छान लागतील.