पुण्याहून शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?

सालोमालो's picture
सालोमालो in काथ्याकूट
22 Apr 2009 - 4:17 pm
गाभा: 

मित्रांनो,

उद्या मतदान झाल्यावर कुठेतरी सुट्टीचा सदूपयोग करायला जावे अशी इच्छा आहे. शक्यतो समर्थांचं ठिकाण असावं असा मानस आहे. मी शिवथरघळ आणि चाफळला जाइन असं म्हणतोय.

ही दोन्ही स्थळ एका दिवसात त्रास न होता होउ शकतील का?
शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?
शिवथरघळीहून चाफळला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?

सालो

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

22 Apr 2009 - 5:10 pm | आंबोळी

शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?
हा मार्ग स्वारगेटवरून निघतो. मधे १-२ घाट लागतील पण बाकी मार्ग एकदम सोप्पा आहे.

प्रो. आंबोळी

विटेकर's picture

22 Apr 2009 - 5:24 pm | विटेकर

पण कोथून ?
मी पुण्याहून असे समजतो.
पुण्याहून भोर मार्गे कोकणात उतरावे.घाट संपल्यावर डाव्या हाताला शिवथर घळ आहे. विचारत -विचारतच जावे हे बरे.
मुंबईहून यायचे असल्यास महाड्ला यावे, तेथून सरळ रस्ता आहे.
घळित उतरणारा रस्ता फारसा चांगला नाहि. संभाळून जावे.
चाफळ हे पुणे- सातारा रस्त्यावरिल उंब्रज पासून अंदाजे १८ किमि , उंब्रज - कोयनानगर रस्त्यावर आहे. रस्ता सुंदर आहे. या कोयना नगर रस्त्यावरुन थोडेसे डावीकडे जावे लागते.विचारत -विचारतच जावे हे बरे.
दोन्हि एका दिवसांत जरा कठिण वाटतय पण अशक्य नाहि. .
त्यापेक्शा मी सज्जन गड - चाफळ असे सुचवीन, सज्जन गड सातार्‍यापासून अगदि जवळ आहे. तसे ही आत्ता घळित पाणी नाही त्यामुळे ' गिरिच्या मस्तकि गंगा धबाबा तोय आद्ळे " पाहता येणार नाहिच.
असो, गेलात तर समर्थाना आमचा दंडवत सांगा.
-विटेकर
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

प्राची's picture

22 Apr 2009 - 5:50 pm | प्राची

या कोयना नगर रस्त्यावरुन थोडेसे डावीकडे जावे लागते.विचारत -विचारतच जावे हे बरे.
विटेकरजी,कोयनानगर रस्त्यावरून जाताना चाफळला जायला उजवीकडे फाटा आहे.
सालोमालो,विटेकरांनी अगदी योग्य सल्ला दिलाय.सज्जनगडला गेलात,तर तिथे प्रसादी करूनच या.तिथली गव्हाची (वरून तूप घातलेली) खीर म्हणजे 8> ...खरच तृप्त होतो आपण.

सालोमालो's picture

22 Apr 2009 - 6:02 pm | सालोमालो

विटेकरजी/प्राची,

मनापासून धन्यवाद! समर्थांना जरूर दंडवत सांगीन.

सालो

विटेकर's picture

22 Apr 2009 - 5:27 pm | विटेकर

मी शीर्षक नीट वाचले नाही, अस्तु.
-विटेकर

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

शैलेन्द्र's picture

22 Apr 2009 - 5:48 pm | शैलेन्द्र

एक दुरुस्ती...

वरंधा घाट संपल्यावर "ऊजव्या" हाताला शिवथर घळ आहे.

शिवाय जर तुम्ही सुमो किंवा तत्सम गाडी नेणार असाल तर घाट संपायच्या आधीच एक ऊजवे वळण आहे, तिथुन अगदी जवळ... तिथे बोर्ड आहे... नाहीतर जर नाजुक गाडी असेल तर घाट ऊतरुन ३-४ कीमी पुढे या, आणि मग फाट्यावरुन ऊजवीकडे....या मार्गने १५-१७ किमी वाढतात...

ज्ञ's picture

22 Apr 2009 - 6:37 pm | ज्ञ

वरंधा घाटातून जो पहिला उजवीकडचा फाटा आहे त्या मार्गाने छोटी गाडी असेल तर मुळीच जाऊ नका.. रस्त्याची अवस्था गंभी र आहे.. तसेच शक्य तितक्या लवकर जा.. ऊन मी म्हणते आहे.. सध्या उन्हाळ्यामुळे तिथे सगळे फारच रुक्ष झालेले आहे..

मिसळभोक्ता's picture

22 Apr 2009 - 10:26 pm | मिसळभोक्ता

त्यापेक्षा घरीच बसून, भगवी लंगोटी नेसून, मनाचे श्लोक म्हणा. आणि घळींचे चिंतन करा. (घळींच्य चिंतनाविषयी विनायक प्रभूंना भेटा अथवा लिहा. ते त्यात एक्सपर्ट आहेत.)

तो सर्वात सोपा मार्ग.

-- मिसळभोक्ता

पिवळा डांबिस's picture

23 Apr 2009 - 10:11 am | पिवळा डांबिस

आम्हाला इथेच मिपावर भेटलेल्या एका जुन्या स्नेह्यांची आठवण झाली...
;)
अगदी तीच शैली.....

सालोमालो's picture

27 Apr 2009 - 11:09 am | सालोमालो

प्रतिसाद जबरा होता. पण अशी आशा करतो की मी मुलगा का मुलगी हे तुम्ही माझ्या profile मध्ये पाहून प्रतिसाद दिलायतं. मी मुलगाच आहे म्हणून तो पचला. जर मुलगी असती तर ठो ठो हसण्यापलीकडे हातात काहीच राहीलं नसत. =))

सालो

अविनाशकुलकर्णी's picture

23 Apr 2009 - 6:27 am | अविनाशकुलकर्णी

रामदास स्वामीच आपणास मार्ग दाखवतिल.....त्याच मार्गाने जा...

=))
=))
=)) =))
=))
=))

अमोल केळकर's picture

23 Apr 2009 - 9:52 am | अमोल केळकर

शिवथर घळ व चाफळ एका दिवसात होणे अवघड

--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा