अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत.
फलज्योतिष हे भारतात विकसित झाले असले तरी त्याचे मूळ भारतीय नाही. इजिप्त,बॅबिलोनिया या प्रदेशात जन्मलेली ही विद्या आहे.हिचा संबंध आकाशस्थ ग्रह, उपग्रह, छायाग्रह आणि नक्षत्रे यांच्याशी आहे. म्हणजे निर्जीव ,भटक्या आकाशस्थ वस्तूंशी फलज्योतिषविद्येचा संबंध आहे. हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह हे मानव पृथ्वीवर निर्माण होण्याआधीपासून आकाशात आहेत. याचाच अर्थ असा की विशिष्ट ग्रह, तारे यांचा पृथ्वीवरील देवी देवतांशी काहीच संबंध नाहीये. माणसाने तो ओढूनताणून लावला आहे. म्हणजे आकाशस्थ ग्रह,तारे मानवावर करत असलेले परिणाम सततच्या निरीक्षणाने तपासून पाहिले तर ग्रह, तारे बर्याच प्रमाणात मानवावर परिणाम करत असावेत,त्याच्या स्वभावाशी ग्रह,तार्यांचा संबंध असावा असे म्हणता येऊ शकते. पण मानवाला सतत सुख, पैसा, आरामदायी , आनंदी जीवन हवे असते. त्यामुळे हे मिळण्यात अडथळे फार येऊ लागले आणि बरेच प्रयत्न करुनही त्या हव्याशा गोष्टी मिळणे अवघड झाले की तो फलज्योतिषविद्या जाणणार्या अभ्यासकाची मदत घेऊन त्या गोष्टी मिळवू पाहतो. सगळेच नव्हे पण बरेच फलज्योतिषी जातकाला काही धार्मिक विधी,दैवी उपासना , अध्याय वाचन इ. सुचवतात आणि इच्छित पूर्ण होण्याची आशा दाखवतात.
वर सांगितल्याप्रमाणे ग्रह , तारे यांचे नियंत्रण पृथ्वीवरील कोणत्याच देवाकडे, देवीकडे नाही. ते माणसाने ओढूनताणून जोडले आहे. मग असे असताना या धार्मिक विधी, उपासनांचा निव्वळ जातकाचे मनोबल वाढणे यासाठीच फारच थोडा उपयोग होतो (ते सुद्धा जातक आस्तिक असेल तरच) पण मूळ समस्या तशीच राहते. विशिष्ट समस्येसाठी विशिष्ट धार्मिक विधी किंवा विशिष्ट उपासना केली तर ती विशिष्ट समस्या सुटलेली आहे असे किमान १०० जातकही मिळायचे नाहीत. केवळ आशावाद!
मग प्रश्न असा पडतो की फलज्योतिषाला जोडून ठेवलेल्या या धार्मिक विधी, उपासनांचा उपयोग काय? कारण जातकाची वैयक्तिक समस्या सुटणे किंवा ती बरीच सौम्य होणे , कुवतीपेक्षा जास्तीच्या अपेक्षा पूर्ण होणे यातले काहीच धार्मिक विधी, उपासनांमुळे बदलू शकत नसेल तर त्या फलज्योतिषविद्येशी जोडणे साफ चुकीचे आहे. फलज्योतिषविद्येत अचूकता आणण्याच्या प्रयत्नांमधली धोंड आहे असे वाटते.
याला जोडून उपप्रश्न: माझा रत्ने आणि वास्तुशास्त्र यांचा अजिबात अभ्यास नाही. पण वरील प्रकार हातात धारण करायच्या रत्नांबाबतसुद्धा लागू होतो का? विशिष्ट रत्न धारण केलं तर विशिष्ट असं चांगलं फलित मिळेल यात काही अर्थ असावा का? वास्तुरचनेत काही बदल केले तर हवे तसे चांगले परिणाम दरवेळी मिळतात का? तुमचे अनुभव काय आहेत?
प्रतिक्रिया
5 Nov 2021 - 8:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
पण ज्याला अनुभव येतात, तो ते नाकारू शकत नाहीत अन हे उपाय व्यक्तिसापेक्ष असल्याने त्यांची प्रचिती कधी दुसऱ्याला येईल अशी आशाही नाही.
5 Nov 2021 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फलज्योतिष, ग्रह तारे, वास्तुशास्त्र त्या रचना रत्ने आणि रत्नांचा माणसांच्या आयुष्यावर होणारे परिणाम हे सर्व थोतांड आहे, एकदा की तुम्ही या व्यसनांच्या आहारी गेलात त्यातून बाहेर पडणे मग कठीण होऊन जाते. असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे मन समाधानासाठी थोडा चान्स घ्यायचा आणि सोडून द्यायचं. फार मनावर घ्यायचं नाही. आणि फार तानही घ्यायचा नाही. असं असलं तरी चर्चा प्रस्तावाला न्याय दिला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्यासाठी आणि आपले उपयोजक चांगले गृहस्थ आहेत असे समजून काही एक प्रयत्न करतो.
माझा अभ्यास नाही, पण मी कधीकाळी अनेक ज्योतिषांना कुंडल्या दाखवल्या. अनेक जालज्योतिषी मित्रही आहेत ते अनेक सल्ले देत असतात. पण कधी कोणी काही सांगितलं आणि तंतोतंत खरं ठरलं असं कधीही झालं नाही. मग मीच अभ्यास करायचा म्हणून चान्स घेतो. पुस्तकं चाळतो आणि समजून घ्यायचं म्हणून ज्योतिष अभ्यास करु पाहतो. पण सालं ना अभ्यास ना काही निष्कर्ष. सगळं अंदाजपंचे. एकदा मला ते कर्णपिशाच्च या विषयावर मिपावर लिहायचं आहे, राहून जातं. माणूस बघीतला की त्याची होल हिष्ट्री त्या माणसांना कळते. आणि इतिहास तंतोतंत सांगतात वगैरे. त्यावर नवीन धागा काढेन. (कधी ते माहिती नाही)
एखाद्या बाबाने दिलेला अंगारा, एखाद्या बाबाच्या पडेलेले पाय. त्यांना घातलेलं लोटांगन. एखाद्या जागृत ठिकाणी केलेले दर्शन. कोणी केलेले मार्गदर्शन, कोणी दिलेले गंडे-ताडे- याचा इफेक्ट हा केवळ प्लासिबो इफेक्ट असे समजून चाललं की सगळे प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि सर्व मार्ग मोकळे होतात.
आता रत्नाकडे वळुया. चंद्रग्रहाचे रत्न मोती. कोणत्याही कन्फ़्युज असलेल्या माणसाला म्हणायचं की मोती हे रत्न चांदीच्या अंगठीत करंगळीत घाला. तुमचं मन चंचल आहे, ते एकाग्र होईल. (मुळात माणसाचं मन चंचलच आहे) तटस्थपणे निर्णय घेवू शकाल. योग्य निर्णय घ्याल. दररोज कामाच्या तानतनावात अजिबात चूक होणार नाही. संयमी, शांत राहण्यासाठी आपणास मी मोती देत आहे, आपलं कल्याण होईल. मोतीची अंगठी घातली की आपल्यासोबत कोणीतरी आहे, असे समजून त्याचा आत्मविश्वास वाढत असावा. आणि तो म्हणतो मोतीइफ़ेक्ट झाला.
दोन हजार वर्षापूर्वी राशीचक्राच्या ज्या भागामधे उदा. वृषभ राशी होती त्या भागात आता राशीचक्राच्या गतीमुळे सध्या असलेल्या त्या विशिष्ट राशीच्या जागी सींह अथवा मीन राशी आल्या आहेत ( असे वाटते) तेव्हा दोन हजार वर्षापूर्वी त्या विशिष्ट राशीत जन्म झालेल्या व्यक्तीचं इतिहास भूगोल आणि आजच्या काळात जन्मलेल्या व्यक्तीच्या इतिहास भुगोल कसा जुळून येणार असे वाटायला लागते.
आता वास्तूशास्त्राकडे वळतो. घर बांधणे आणि घरात प्रवेश करणे याबाबतीत शास्त्रात फ़ार महत्व आहे. गृह्य आणि आणि धर्म शास्त्रात मत्स्य, रत्नमाला, हेमाद्री या ग्रंथात अनेक नियम सांगितले आहेत. ( मी एकही वाचलेलं नाही) त्यामुळे आपण नादी लागलो की खपलो. याचा मला काही विशेष अनुभव नाही. पण घर बांधतांना पायाभरणीत नारळ वगैरे टाकतात. ( मी म्हणतो म्हणून टाकू नका नुकसान व्हायचे उगाच) त्याने काय होते ते माहिती नाही.
घर असो की माणसे, काहीही अशुभ नसते. सर्व शुभच आहे, असे समजून चालले की आयुष्यात यश मिळते. मनात संशय निर्माण झाली की तुम्ही लटकलेच समजा. तेव्हा असं आयुष्यात व्हायचंच म्हणून समजायचं आणि पुढे मार्गक्रमण करायचे. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. (चुभुदेघे)
-दिलीप बिरुटे
5 Nov 2021 - 9:57 pm | गवि
सरांशी सहमत.
सरांनी नेहमीप्रमाणे डबल ब्यारल न चालवता अधेमधे मवाळ पक्ष स्वीकारला असे व्यक्तिगत मत. बाकी ज्योतिष, भविष्य याबद्दल म्हणाल तर "दिल के बहेलाने के लिये ए गालिब..."
5 Nov 2021 - 9:50 pm | अनन्त्_यात्री
हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह हे मानव पृथ्वीवर निर्माण होण्याआधीपासून आकाशात आहेत. मग विशिष्ट ग्रह, तारे यांचा पृथ्वीवरील "मानवाशी "काहीच संबंध नाहीये व माणसाने तो ओढूनताणून लावला आहे असे का म्हणू नये?
6 Nov 2021 - 7:40 am | उपयोजक
ग्रह,तारे यांचा पृथ्वीवरील मानवावर बर्यापैकी प्रभाव पडतो. आता ही प्रक्रिया नक्की कशी होते हे मला माहित नाही.पण परिणाम घडतात इतके नक्की
6 Nov 2021 - 8:15 am | श्रीगुरुजी
राशी, ग्रह आणि माणसाचा स्वभाव/वागणूक यांचा घनिष्ट संबंध आहे.
6 Nov 2021 - 9:30 am | गवि
हो. पडतो. गुरुत्वाकर्षण या दृष्टीने म्हणत असाल तर पडतो. पण...
तो जितक्या बलाचा असतो त्याहून कित्येक कित्येक पट जास्त बलाचा परिणाम खुद्द पृथ्वी करत असते. आसपासची माणसे करत असतात. म्हणजे शनी ग्रहाचा तुमच्यावर जितका फोर्स आहे त्याहून जास्त फोर्स नजिकच्या व्यक्तीपासून आहे. तरीही हे दोन्ही फोर्स फार कमीच इतका फोर्स खुद्द पृथ्वीचा आहे.
पुन्हा या फोर्समुळे आयुष्यातील दीर्घकालीन रोडमैप किंवा घटनांची दिशा ठरावी अशा प्रकारचे ते फोर्स नाहीत.
यू सेड इट. मग नक्की कशी होते हे माहीत आहे असा दावा तुम्ही मान्य करता का?
थोड्कयात बोलावे तर.. परिणाम होतो.. पण त्याचा तुमच्या भूत भविष्याशी संबंध जोडण्यात असंख्य तार्किक अडचणी येतात. अमुक शास्त्राचा अभ्यास आहे की नाही एवढ्या युक्तिवादावर हे अडसर पार करता येत नाहीत.
भविष्य ही उपयुक्त चीज आहे. जर कोणाला चांगले भविष्य ऐकून समाधान किंवा मानसिक बळ मिळत असेल तर वापरावी. मात्र भविष्य जाणून हतबल होणे, आता प्रयत्न करण्यात अर्थच नाही- ग्रहच ठरवून बसलेत माझे नशीब.. असा विचार कोणी करत असेल तर ते नुकसानकारक आहे.
याउपर महत्वाचे. कशावर विश्वास ठेवायचा किंवा कशावर नाही हा पूर्ण व्यक्तिगत चॉइस आणि स्वातंत्र्य. आपण मतप्रदर्शन करुन कोण स्वत:चे मत बदलतो?
6 Nov 2021 - 1:27 pm | उपयोजक
मग
हे का लिहिलेत? ;)
6 Nov 2021 - 1:33 pm | गवि
मत आहे म्हणून लिहीले बोलण्याच्या ओघात.
म्हणून त्यामुळे कोणाचे मत बदलेल अशी अपेक्षा नाहीच.
हे जाणवले असल्याने फार बोलायला जात नाहीच. पण चुकून बोलून गेलो झालं.. :-)
6 Nov 2021 - 8:57 am | कॉमी
हाच प्रश्न आहे. उत्तर सुस्पष्ट आहे.
6 Nov 2021 - 12:33 am | पाषाणभेद
देवा, तुमचे मन स्थिर नाही देवा. चंचल असून भटकत आहे देवा. तुम्ही मनाचे खंबीर आहात देवा पण तुम्हाला कुणाची साथ नाही देवा. घरचे तुमचे ऐकत नाही देवा. कामाच्या ठिकाणी त्रास आहे देवा. पैसा टिकत नाही देवा. कष्टाने शिक्षण घेतले देवा. सरस्वती प्रसन्न आहे देवा पण लक्ष्मीचे वरदान नाही देवा. तुम्ही धाग्यांचे काम करता देवा. खोर्याने प्रतिसाद पाहिजे देवा. मग उपाय करा देवा. रोज सकाळी हा अंगारा लावून कॉम्पूटर समोर बसा देवा. हा पोवळा चांदीच्या अंगठीत डाव्या हाताच्या मधल्या बोटात घाला देवा. काम होईल देवा.
शुन्य उपयोग. पूर्णविराम.
पैसे, वेळ वाया घालवायचे धंदे आहेत सगळे.
धार्मिक ग्रंथांचे वाचन करा, हा श्लोक म्हणा, ते पठण करा, हा खडा ह्या बोटात वापरा! अरे समस्या काय अन त्यावर उतारे काय! मुळात त्या व्यक्तीने मनाने खंबीर असले की काही होत नाही. हे तोडगे, गंडे दोरे, उपाय, पठण, हा यज्ञ, तो पुजापाठ हे सगळे थोतांड आहे. ते उपाय सांगणार्या व्यक्तीच्या अर्थाजनाचा एक भाग आहे. अशा व्यक्ती एका विशिष्ठ जातीच्या असल्या की मग अधीकच धार्मिकता जन्माला घातली जाते. मग त्या व्यक्तीने जे जे सांगितले आहे ते ते डोळे झाकून पाळले जात.
वास्तविक पाहता धार्मिक ग्रंथ हे साहित्य म्हणून वाचायला अगदी योग्य आहेत. मस्त कुरमुरे खात खात वाचावे. पण नेमकी आपली श्रद्धा, कोप होईल वगैरे प्रकार आडवे येतात. धार्मिक असणे वेगळे व इतर अंधश्रद्धेतून बळजबरी करणे वेगळे.
6 Nov 2021 - 10:31 am | अनन्त्_यात्री
१००% सहमत!
6 Nov 2021 - 12:45 am | कंजूस
अमूक तमूक रत्न ( म्हजे खडा) बाजारातून विकत घेऊन वापरायचं नाही. ते गायत्री {मंत्र} उपासक ज्योतिषाने त्या रत्नावर गायत्री मंत्राचे संस्कार ( म्हणजे रत्न समोर ठेवून अमूक लाख जप ) करून 'सिद्ध' केलेले वापरायचे मग गूण येतो.
त्यांंच्याच शास्त्राप्रमाणे ग्रहांनी ठरवलेले प्राक्तन बदलत नाही तरीही "ही उपासना, हे रत्न वापरून पाहा" हा सुटकेचा मार्ग आणि आशा दाखवतात.
Paris राजकुमाराच्या जन्मावेळी भाकित सांगितले होते की हा या देशाचा ( शहर) सर्वनाश करायला कारण होणार. मग काय नेलं त्यास दूर जंगलात नेऊन सोडलं. आणि मग काय . . . आला तो परत सर्वनाश करायला.
तर वाचकहो विश्वासाने श्रद्धेने कामं करा मग ज्योतिष बदलतं असं आमचे 'हे' म्हणतात.
सर्व वाईट कारस्थानांच्या मागे शनि,मंगळ आणि गुरु असतात. त्यांची करतूतं फोल करायला दैवतंही उपयोगी पडत नाहीत.
6 Nov 2021 - 10:52 am | मदनबाण
चंद्राने पृथ्वीवर भरती ओहटी येते. समुद्र म्हणजे पाणी, म्हणजे पृथ्वीवर जिथे जिथे पाणी आहे त्यावर चंद्राचा प्रभाव होतो. मनुष्याच्या शरीरात साधारण ६०-७० % पाणी असते त्यामुळे त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव हा होतोच. मनोरुग्ण / फिट येणारी मंडळी पोर्णिमेस अधिक प्रभावित दिसतात. माझ्या कुठे तरी ऐकण्यात किंवा वाचनात आलं होत की काही शास्त्रज्ञांनी गुन्हेगारांवर शोध केला होता ज्यात असे आढळुन आले होते की बलात्कार, खुन करण्याचे प्रमाण हे पोर्णिमेस अधिक होते.ज्योतिष शास्त्रानुसार देखील चंद्र मनाचा कारक आहे,म्हणुन समुद्रातील मोती रत्न चंद्र प्रभाव संतुलीत करण्यासाठी सुचवले जाते.
सूर्यामुळेच आपल्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे हे आपल्या सगळ्यांना उत्तमपणे ठावुक आहेच... त्यामुळे ग्रहतार्यांचा आपल्यावर प्रभाव होत नाही असे म्हणणारे लोक"वैशाखनंदन" आहेत असे समजावे.
माणसाने तो ओढूनताणून लावला आहे.
माणसांचे ठावुक नाही पण हिंदूंची कालगणना आणि ग्रह नक्षत्रांचा अभ्यास हा अत्यंत प्राचीन आणि उच्चकिर्तीमान असलेला आहे. देवता हे अनेक ठिकाणी रुपक म्हणुन देखील वापरले गेलेले आहे, आपण क्षणभर असे म्हणु शकतो की अमुक एक फ्रिक्वेन्सी ही अमुक एक देवता म्हणुन ओळखली जाते. नादब्रह्म, अनाहतनाद इ इ इ हेच विविध प्रकारे दर्शवतात. शब्द =स्वर =ध्वनी = देवता. देवळात घंटा वाजवुन ध्वनी उत्पन्न करुन त्या भागात विशिष्ठ फ्रिकव्हेन्सी निर्माण केली जाते.
असो... एकादा तुमच्या मनाने घेतले ना की सगळं थोतांड आहे तर उध्या साक्षात समोर ब्रह्मदेव जरी उभा राहिला तरी हे काय नविन थोतांड चालवलं आहे ? असा प्रश्न त्यालाच विचारायला देखील मनुष्य प्राणी कमी करणार नाही ! :)))
जाता जाता :- सौरव गांगुली २० लाखाचे रोलेक्स चे मुनफेज वॉच वापरतो, हे तुम्हाला माहित आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masala
6 Nov 2021 - 11:01 am | प्रचेतस
फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, ग्रह ताऱ्यांचे मानवी मनावर होणारे परिणाम हे पूर्णपणे थोतांड आहे.
6 Nov 2021 - 11:14 am | गवि
वैशाखनंदन म्हणजे काय ते शोधतोय. प्रचु डार्लिँग अर्थ प्लीज..
6 Nov 2021 - 11:31 am | प्रचेतस
वैशाखनंदन म्हणजे गाढव.
# जपा निरागसता
6 Nov 2021 - 11:40 am | गवि
हे राम.
तरी मी परिणाम होतो इतपत मान्य केले होते म्हणून कदाचित पदवीस मुकेन..
6 Nov 2021 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण आपल्या जालमित्रास प्रश्न विचारलेला असला तरी मिपाकर म्हणून कोणत्याही विषयावर दळन दळायचा अधिकार म्हणून आपणास सांगू इच्छितो की एक संस्कृत अर्थ प्रत्येक काळात आनंदात असलेला या अर्थानेही तो शब्द वापरला जातो. आपण चांगली माणसं, तेव्हा चांगलाच अर्थ घ्यावा.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2021 - 11:49 am | गवि
सर्वत्र चांगले शोधण्यासाठी वेगळे अर्थ काढण्याचा हा तुमचा स्वभाव आपल्याला फार आवडतो. बाकी कसे का असेनात.
बाकी प्रचुसारखे तुम्ही (आणि मबाशेठही) आमचे जालीय मित्रच आहात.
6 Nov 2021 - 11:51 am | प्रचेतस
म्हणजे ते कसेही आहेत असे तुम्हाला म्हणावयाचे आहे काय?
6 Nov 2021 - 11:54 am | गवि
आता मनुष्य म्हटला की उन्नीस बीस अधिक उणे आलेच. पण मित्र मानले की पदरी पडले, पवित्र झाले या नात्याने आपण गोड मानून घ्यायचे.
6 Nov 2021 - 12:05 pm | प्रचेतस
ते बाकी खरं तुमचं
6 Nov 2021 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रचेतस सर..आपल्या मताशी १००० वेळा सहमती आहे. शिकलेल्यांना सुशिक्षित करणे महाकठीण काम असतं असं कायद्याचे बोला या सिनेमात एक संवाद होता त्याची आठवण झाली.
बाकी सुशांतसिंगचा राहिलेला तपास ग्रहता-यावरुन करता येईल का ? आणु का एखादे दोन व्हीडीयो. कोणते केतू त्याच्या आयुष्यावर परिणाम करणारे होते ते...
-दिलीप बिरुटे
6 Nov 2021 - 11:33 am | प्रचेतस
शेवटी आपण ताऱ्यांपासून बनलेल्या धुळीचे उत्पादन :)
6 Nov 2021 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन ग्रहांची टक्कर झाली. एक अतिउष्ण जळता गोळा ती महिला असावी. दुसरा ग्रह थंड मेल. सिनेमात नै का. नायिकेला नायकाचा अचानक धक्का लागतो. मग तीची पडलेली पुस्तके नायक उचलून देतो. मग 'आखोही ही आंखोमें इशारा हो गया' आणि मग पुढे सृष्टीची उत्पत्ती.
असं व्हायला, बुध-शुक्राची युती व्हावी लागते. कुंडलीचे पंचम भाव पाहावे लागेल. जी दोन ग्रहे एकमेकांना भिडली तेव्हा त्यांची ग्रहदशा काय असेल प्रचेतस सर. एनी आइडिया...?
-दिलीप बिरुटे
6 Nov 2021 - 12:07 pm | प्रचेतस
त्यांच्या वक्री शनी असावा असे वाटते. शिवाय एकाच वेळी आकाशात दोन दोन ग्रहणे दिसू लागली असे म्हणतात.
7 Nov 2021 - 9:22 am | कंजूस
ही एक करमणूक असते. परग्रहांवरचे हल्ले आणि त्यांवरचे शिनुमे ही आगामी काळाची चाहुल आहे.
6 Nov 2021 - 11:11 am | आग्या१९९०
सूर्यामुळेच आपल्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे हे आपल्या सगळ्यांना उत्तमपणे ठावुक आहेच...
बरोबर. मग बाकी ग्रहांवर किंवा चंद्रावर का , सूर्यप्रकाश तेथेही पोचतोच की?
6 Nov 2021 - 11:12 am | आग्या१९९०
मग बाकी ग्रहांवर किंवा चंद्रावर का नाही?
6 Nov 2021 - 11:20 am | आग्या१९९०
माझ्या कुठे तरी ऐकण्यात किंवा वाचनात आलं होत की काही शास्त्रज्ञांनी गुन्हेगारांवर शोध केला होता ज्यात असे आढळुन आले होते की बलात्कार, खुन करण्याचे प्रमाण हे पोर्णिमेस अधिक होते
ह्याला शास्त्रज्ञ कशाला हवे. पोलिस स्टेशन मधील रेकॉर्ड गोळा करून खात्री करून घेणे अधिक सोपे आहे. असे कोणी केले असेल आणि त्यात तथ्य असेल तर दर पौर्णिमेला पोलिस अशा घटना घडू नये म्हणून विशेष काळजी घेतात का? किंवा लोक ह्या दिवशी अधिक सावध असतात का?
6 Nov 2021 - 11:46 am | कॉमी
तसही एक शिंगल निरीक्षण खरे आहे म्हणजे त्यावर बांधलेले महाल खरे आहेत असे नसते.
6 Nov 2021 - 11:46 am | मदनबाण
बरोबर. मग बाकी ग्रहांवर किंवा चंद्रावर का , सूर्यप्रकाश तेथेही पोचतोच की?
आग्या मी जे सांगितले आहे ते परत नीट वाच, सूर्य प्रकाश आणि आपल्या पृथ्वीवरील जीव सृष्टीचा संबंध आहे की नाही ? हे तपासा. उत्तर काय आहे ? ते माहित असेल तर मग चंद्रावर जायची गरज उरत नाही.
जाता जाता :- नक्षत्र आणि पाऊस यांचा संदर्भ अगदी शेतकर्यांना देखील ठावूक असतो. :) मध्यंतरी कोकणात जेव्हा पुराने थैमान घातले होते तेव्हा कोणते नक्षत्र होते हे कोणी सांगु शकेल काय ? आजही हिंदूस्थानातले हिंदू लोक गुरुपुष्य / गुरुपुष्यामृत योगावरच सोने खरेदी करतात... हे सगळे वैशाखनंदन की याचे अर्थ न समजणारे वैशाखनंदन ? :)))
असो... टिंगल करायला अक्कल लागत नाही हे आमचे कुठले तरी शात्री कुठे तरी सांगुन गेलेत. :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masala
6 Nov 2021 - 1:06 pm | सर टोबी
करावे लागणारे पाप क्षालन याची कुणाला झळ पोहोचली आहे का?
एकणच आयुर्मान वाढल्यामुळे वृद्धांचं एकाकीपण आणि त्यातुन येणारे नैराष्य हा, म्हणलं तर, मद्धम वर्गातील वृद्धांचं एक लक्षण होऊ लागलय असे वाटते. काल परवापर्यंत व्यवस्थित वाटणारं म्हातारं माणूस एकाएकी असंबंद्ध वागायला लागतो आणि काही कळायच्या आत स्वमग्णतेच्या गर्तेत जातं. त्या भांबावलेल्या अवस्थेत आपण ज्योतिषाचा सल्ला घेतला की हमखास पितृदोषाचे निदान होते असा अनुभव आहे.
6 Nov 2021 - 4:30 pm | अनिरुद्ध.वैद्य
अन जालीय चर्चांमध्ये कोणी नक्कीच सांगणार नाहीत, कारण त्याला मूर्खांत काढणारेच मिळतील ;-)
बाकी वृद्धांच्या समस्या अन पितृदोषांचा संबंध नाही. पितृदोष असला तर परिणाम तारुण्यात दिसायला लागतो.
त्रंबकेश्वरला नारायण नागबळी करतात.
पितृदोष पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीत नाही तर तिसऱ्या पिढीत दिसायला लागतो. आधीच्या पिढ्या श्राद्धादी कर्मे बंद किंवा कमी करत आल्याने त्याचे प्रमाण हल्ली वाढल्यासारखे दिसते. बाकी काही नाही.
6 Nov 2021 - 1:18 pm | आग्या१९९०
आग्या मी जे सांगितले आहे ते परत नीट वाच,
सूर्यामुळेच आपल्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे हे आपल्या सगळ्यांना उत्तमपणे ठावुक आहेच...
सूर्यप्रकाशाशिवाय जगणारे जीवजंतू आहेत पृथ्वीवर हे तुम्हाला माहित आहे का? अनुकूल वातावरणामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली जी बाकीच्या ग्रहांवर नसल्याने सूर्यप्रकाश असूनही होऊ शकली नाही.
बाकी तुम्ही ऐकीव गोष्टींवर भरोसा ठेवत असल्याने पौर्णिमेच्या घटना तुम्हाला खऱ्या वाटत असल्याने तुमच्याकडून शास्त्रीय माहितीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
6 Nov 2021 - 2:23 pm | मदनबाण
आग्या कशाला शब्दछल करत बसायचे ? सूर्य तारा आहे त्याचा प्रकाश पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आवष्यक आहे, सूर्य प्रकाशामुळेच आपल्या शरीरात डी-जीवनसत्व तयार होण्यास मदत होते याचा अर्थ या तार्याचा आपल्या ग्रहासकट आपल्यावरही परिणाम होतोच. ग्रहतार्याच्या तुमच्या आयुष्यवर परिणाम होतात याचे हे शास्त्रीय कसोटीला सत्यात उतरणारे विधान आहे. उगा कशाला इतर बडबड करायची ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masala
6 Nov 2021 - 3:00 pm | कॉमी
"सुर्यामुळे आपल्याला काही आवश्यक गोष्टी मिळतात" ह्यावरून फक्त सुर्याबद्दल निष्कर्ष निघतो, आणि तो पण फक्त ड जीवनसत्व आणि इतर फायद्यांपुरताच. इतर ग्रहताऱ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो असा नाही निघत.
6 Nov 2021 - 1:45 pm | Rajesh188
पृथ्वी वरील सजीव ,निर्जीव सर्व घटकांवर परिणाम होतो.माहीत असलेल्या शक्ती आणि माहीत नसलेल्या शक्ती अनेक गोष्टी मानवी वर्तनावर परिणाम करू शकतात.
ह्या मध्ये अंध विश्वास बिलकुल नाही.
पण त्या वर काही उपाय आहेत ह्या बाबत सांशक आहे.
ग्रह,तारे ,पक्षांचे वर्तन , किड्या चे वर्तन ह्याचा अभ्यास करून पावसाचा अंदाज जुनी लोक लावत आणि तो खराच निघे.
अनेक वर्षाच्या अनुभवातून आलेले ते ज्ञान आहे त्याला निरीक्षण ,निष्कर्ष,परिणाम ह्याचा आधार आहे.
फक्त शास्त्रीय भाषेत त्याचे वर्णन करण्याची कुवत नाही.
6 Nov 2021 - 1:49 pm | उपयोजक
१) जो आहे त्या परिस्थितीत (मग ती अतिउत्तम असो, चांगली,असो,बेताची असो की बेकार असो) नेहमीच समाधानाने राहतो आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांनाही नेहमीच स्वकर्तृत्वाने समाधानात ठेवतो.
२) ज्याला एखादी गोष्ट सहजासहजी किंवा अगदी जरासेच कष्ट करुन मिळायला हवी आहे. ती मिळवण्यासाठी 'भगीरथ प्रयत्न' करायचे नाहीयेत.
३) ज्याला विशिष्ट कालावधीतच एखादी इच्छा फलद्रुप नाही झाली तरी चालणार आहे. घाई नाहीये. घडेल तेव्हा घडू दे हे चालणार आहे.
४) आपल्या आयुष्याचा सोबती किंवा व्यवसायातील पार्टनर हा भविष्यात त्रासदायक ठरेल का याची भिती नसलेला. वैवाहिक किंवा व्यावसायिक जीवनाचे मातेरे झाले तरी न घाबरणारा किंवा फरक न पडणारा.
५) शरीरात एखादे वैगुण्य असल्याने समाजातल्या काही घटकांकडून त्रास,टिंगलटवाळी झाली तरी समाजाला न घाबरणारा, फाट्यावर मारणारा.
६) भविष्यकाळात आपली अवस्था चांगलीच असणार, त्याकाळी आपली मायेनं काळजी घेणारं जगात कोणीतरी असणारच याची ठाम खात्री असलेला.
6 Nov 2021 - 2:09 pm | अनन्त्_यात्री
काडीमात्र विश्वास नसलेली व्यक्ती.
6 Nov 2021 - 1:55 pm | Rajesh188
तुमचे मत साफ चुकीचे आहे.
यशस्वी उद्योगपती,यशस्वी सरकारी अधिकारी, सिने कलाकार,राजकीय नेते.
हे फलज्योतिष वर विशवस ठेवून सर्व कर्मकांड पण करतात.
त्यांचे गुरू पण खूप महागडे असतात.
सेकंद वर ते उपाय सांगण्याचे पैसे घेतात .ते लाखो मध्ये असतात.
6 Nov 2021 - 8:25 pm | पाषाणभेद
मूळ प्रश्न असा की,
फलज्योतिष व धार्मिक कार्ये यांची सांगड का घातली जाते?
तसे करायला लावणार्यांचा त्यात स्वार्थ नसतो का?
फलज्योतिष जर भारतातले नाही तर मग अशी धार्मिक जोडी का लावली जाते?
मानसिक आधार जरी मिळत असेल तरी असे धार्मिक विधी करून मुळ समस्येपासून पिडीत व्यक्ती स्व:ताला लपवते असे नाही का होत? समस्येची तात्विक, वैज्ञानिक दृष्टीने उकल करून जर समस्या मार्गी लागत असेल तरच समस्याग्रस्त व्यक्तीचा त्यात मानसिक, शारिरीक व आर्थिक फायदा असतो.
असल्या समस्यांवर धार्मिक तोडगे प्रत्येक धर्माप्रमाणे मा बदलतात? म्हणजे असे की, एका धर्मातील माणसाला इतर धर्माचा तोडगा का चालत नाही?
दुसरे असे की, माणूस हा जर फिजीकल एंटीटी मानला तर मग अन्य फिजीक एंटीटी, जसे हवा, पाणी, प्रकाश यांचा त्यावर परिणाम होईलच आणि ग्रह तारे हे देखील फिजीकल एंटीटी आहेत. पण मग अशा ग्रह तार्यांच्या अस्तित्वाने होणारा परिणाम हा संपूर्ण मानव समाजावर एकाच वेळी होईल.
उदा. जर सूर्यावर काळे डाग वाढतात तेव्हा पृथ्वीवर उलथापालथ होते. चंद्रामुळे भरती ओहोटी येते. या भौतिकांचे अस्तित्व इतके प्रचंड आहे की संपूर्ण मानवजात त्यांचेपुढे नगण्य आहे.
मानवाचे मनच हे फलज्योतिष साठी एक नाट्यमंच आहे अन त्यावर फलज्योतिषातील नाटके चालतात.
6 Nov 2021 - 10:58 pm | शशिकांत ओक
मुहुरत पाहून विवाह किंवा सिनेमा यशस्वी होताना दिसत नाही... हे खरे
चांगला या शब्दाने जरा घोळ होतोय असे मानले तर?
पुढील घटनांच्या वाईट परिणामांचा प्रादुर्भाव कमी व्हावा असे वाटून त्यातल्या त्यात कमी नुकसान दायक असा 'चांगला' मुहुर्त पकडणे अभिप्रेत असू शकते.
काळ सदा समान आहे. परंतु प्रत्येका गोष्टीला एक विशिष्ठ समय येतो. मुहुर्त फार चांगला म्हणून कोणी विवाहयोग्य वय नसेल तर लग्नाचा घाट घालत नाही. बहार ही निसर्गतः विशिष्ठ त्या हंगामात येते.
मानवी जीवनात काही आडाखे रचून त्यानुसार काही केले तर कमी धोका किंवा नुकसान होईल असा ही विचार त्यामागे असावा.
गुरूपुष्ययोगावर सोने किवा तत्सम मालमत्ता घरात आणून व्यक्तीची वा प्रतिष्ठेची शोभा वाढावी म्हणून खरेदी केली जाते. विविध सण वा जत्रा, किंवा मेळावे भरवताना सिंक्रॉनिसिटीचे कारण असावे. एकाच कामासाठी अनेकांच्या मानसिक लहरी एकत्र आल्याने एक वेगळे प्रभाववलय तयार होते. दिंडीतून वा जत्रातून विशिष्ठ धार्मिक स्थळांना जाताना केला जाणारा नाम घोष वा करबल्याच्या भीषण कत्तलीची आठवण म्हणून छातीवर हातानी आघात करून केली जाणारी सांघिक साश्रु आठवण यातून एक मानसिक एकात्मता निर्माण होते. ती व्यक्तीच्या प्रभाव वलयातून झटपट कार्य करते असे वाटून प्राचीनकाळापासून कुंभ वा हज सारख्या यात्रा विशिष्ठ तास, दिवस, महिन्यांच्या मुहुर्तावर साकारल्या जातात असे ही विचार करता वाटते. अशा घटनांचा मानसिक प्रभाव मोजायचे एखादे यंत्र वा परिमाण प्रगत झाले तर या प्रभावाला पुरावा मिळेल तोवर याकडे समजून घ्यायच्या गोष्टी असे मानावे लागेल.
7 Nov 2021 - 2:50 am | विकास...
नवग्रह शांती
काही वर्षांपूर्वी मुलगा खूप त्रास देतो म्हणून मुलाची नवग्रह शांती एका काकांनी केली. पाच हजार च्या आसपास खर्च झाला होता (सासरे यांनी सुचविले होते)
पण
हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत नुसता गोंधळ घालत असतोय, शांत थोडाच होणार आहे
साधारण तो पाच वर्षाचा असताना आम्ही नवीन घरात राहायला गेलो. दुसरा मजला
आणि आणि ... आता मुलगा हॉल मध्ये नाचतो, सायकल आपटतो पण आमच्या फ्लॅट च्या खालचे काही बोलू शकत नाहीत
का ते सांगा ?
7 Nov 2021 - 9:25 am | कंजूस
नवग्रह शांती ज्यांनी केली/सुचवली तेच खाली राहतात.
7 Nov 2021 - 1:13 pm | रावसाहेब चिंगभूतकर
शेतकऱ्याचा मुलगा हा रेफरन्स कळला नाही
7 Nov 2021 - 10:53 pm | सरिता बांदेकर
हा एक खूप गहन विषय आहे. मी दोन ज्योतिषी बघितले आहेत.
एक आहेत त्यांच्याकडे आपण गेलो आणि त्यांनी सांगितलं की मला थोड्या दिवसांनी भेटा मग सांगतो.
तेव्हा समजून जायचं कठीण काळ आहे.त्यांचा ती रत्नं वापरणं किंवा उपास तापास कशावर विश्वास नाही. ते सांगतात नामस्मरण करा,शांत रहा आणि संकटाला धीराने सामोरा जा.
मी त्यांना गेली पन्नास वर्ष ओळखतेय.माझं वय आता ६२ आहे.
दुसरे आता हयात नाहीत पण ते वाईट वेळ तरून जाण्यासाठी रत्नं वापरायला सांगतात.
पण ते हे पण सांगायचे जर तुमची पैशाची अडचण असेल तर तुम्ही नवग्रह स्त्रोत्रं म्हणा. अशा ठिकाणी बसून जिकडे तुमच्या वर सूर्यकिरणं पडतील. आणि नवग्रह स्रोत्र हे सुर्योदयानंतर आणि सुर्यास्तापू्वी म्हणा.
मला या दोघांचा खूप चांगला अनुभव आहे.
त्यामुळे ज्योतिषशास्रावर पण विश्वास आहे. मी एके काळी अभ्यास करत होते. पण सासरकडच्या लोकांना आवडत नाही म्हणून अभ्यास बंद केला.
भविष्य सांगताना ते फक्त पत्रिका किंवा हात बघून नाही तर खूप वेगवेगळे अभ्यास करून सांगता येतात.
आपल्या पायावर रेषा असतात.
आपलं हस्ताक्शर बघून पण सांगता येतं.
त्यावर मी सही नांवाची कथा लिहीली आहे ती थोडी काल्पनिक असली तरी त्यावरची पुस्तकं मी वाचली आहेत. मला त्या लेखकाचं नांव आठवत नाहीय.
कुणाला माहित असेल तर कृ पया सांगावे.
हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे जरा लांबलचक लिहीलं.
11 Nov 2021 - 7:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
विद्वान लोकांनी आपापली मते वर दिलीच आहेत, पण माझ्यामते जसे आपण एक्स रे काढुन , ईतर चाचण्या करुन तब्येतीबद्दल मार्गदर्शन घेतो तसे कोणी जाणकार भेटल्यास समस्येबद्दल घेण्यात काय हरकत आहे? विशेषतः दहापैकी ८-९ वेळा चांगला अनुभव येत असेल तर?
सामान्य माणुस आयुष्यातील महत्वाच्या निर्णयात --जसे शिक्षण्,लग्न,परदेशवारी,घरखरेदी-- कधी कधी चुकतो आणि मग ते निस्तरण्यात महत्वाची वर्षे निघुन जातात. म्हणुन मिळत असेल तर असे मार्गदर्शन जरुर घ्यावे. सुदैवाने माझ्या आयुष्यात २१ व्या वर्षापासुन मला असे मार्गदर्शक भेटले आणि मी वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेउन्,किवा सांगितलेल्या उपासना करुन अनुभव घेतला. पण शेवटी प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे.
11 Nov 2021 - 7:16 pm | बोलघेवडा
स्वतः याचा अनुभव घेतला आहे. काही कारणाने लहानपणी शांत करायची राहून गेली. ती नंतर वयाच्या 22 व्या वर्षी केली. त्यानंतर लक्षणीय फरक पडला.
12 Nov 2021 - 2:00 pm | उपयोजक
एखाददुसर्या अनुभवावरुन सार्वत्रिक मत बनवणे योग्य नव्हे. ज्यांची शांती केली गेली अशा किमान १ हजार माणसांना विचारुन पहा. त्यात किमान २०० सुद्धा असे मिळणार नाहीत ज्यांची समस्या शांती केल्यावर दूर झाली.
12 Nov 2021 - 12:16 pm | इरसाल कार्टं
मी लग्नाच्या फोटोग्राफीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. विधीमध्ये थोडा निवांत वेळ होता तेव्हा गुरुजींशी गप्पा चालू होत्या(बऱ्याचदा गुरुजी आणि फोटोग्राफर्सचे वाकडे असते, हे गुरुजी त्याला अपवाद होते). त्यांनी सहज माझा तळहात पाहून माझ्याबद्दल माहिती सांगितली होती जी तंतोतंत खरी होती.
12 Nov 2021 - 12:58 pm | बोलघेवडा
माझ्या अल्प अभ्यासावरून ग्रहांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो अस म्हणण्यापेक्षा ग्रह हे आपल्या आयुष्यातील बदलांचे निदर्शक आहेत.
तुमची कुंडली म्हणजे तुमच्या जन्मवेळेला आकाशातील ग्रह कोठे होते याचा स्थिर फोटो आहे.
संतती साठी 5 वे स्थान बघितले जाते.
उदाहरण म्हणून
पाचव्या भावातील ग्रह, राशी, नक्षत्र हे तुम्हाला मुलं कधी होईल याचे निदर्शक आहेत. 5 व्या पासून 12 वे म्हणजे 4 थे स्थान. जर 4 थे स्थान बलवान असेल तर ते 5 व्या स्थानाला अडथळा निर्माण करते. असेच इतर सर्व स्थानांसाठी समजा.
म्हणजे एकतर 4 थे स्थान कमजोर करावे लागेल किंवा 5 वे स्थान 4 पेक्षा बलवान करावे लागेल. ते कमजोर करण्यासाठी मग त्या स्थानाविषयक दानकर्मे सुचविली जातात. दान म्हणजे शक्ती कमी करणे. तर पूजापाठ, जाप यांनी एखाद्या स्थानाची शक्ती वाढवणे. कुंडली बघून ह्या प्रकारे उपाय सुचवले जातात. थियरी अशी आहे.
आता लुबाडणारे लोक सर्व धंद्यात क्षेत्रात आहेत. त्यामुळे संपूर्ण शास्त्रच बोगस ठरवणे बरोबर नाही.