चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग ३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
22 Oct 2021 - 10:44 am

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल?

1

आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

28 Oct 2021 - 10:51 pm | कपिलमुनी

अर्णब सुटल्यावर मिरवणूक निघाली होती त्याची आठवण झाली

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Oct 2021 - 7:45 pm | चंद्रसूर्यकुमार

देशातील जनता नरेंद्र मोदींना लवकरच सत्तेबाहेर करेल हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा मोठा गैरसमज आहे- भाजप अजून काही दशके तरी देशाच्या राजकारणातील सध्याच्या मध्यवर्ती स्थानावरून हलणार नाही असे प्रशांत किशोरने म्हटले आहे. प्रशांत किशोर सध्या तृणमूल काँग्रेसबरोबर काम करत आहेत. गोव्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने रस घेतला आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर गोव्यात काही प्रमाणात आपल्याला यश मिळेल असे ममता बॅनर्जींना वाटायला लागले असावे. त्या अंतर्गत प्रशांत किशोर गोव्याला गेलेले असताना त्यांनी हे उद्गार काढले आहेत.

त्यातूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीविरोधी राजकारणाचा केंद्रबिंदू ममतांना बनवायचा प्रयत्न केला जात आहे असे दिसते. २०१९ मध्ये काँग्रेसचा कितीही दारूण पराभव झाला असला तरी पूर्ण देशात १२ कोटी मते काँग्रेसला मिळाली होती. तसेच २०० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी होऊन त्यात काँग्रेस नसेल तर मात्र मोदींना २०२४ मध्ये हरवणे केवळ अशक्य होईल. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला भवितव्य नाही म्हणून अशा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची काही मते तृणमूलकडे गेली तरी सगळी मते जातील ही शक्यता कमी आहे. तेव्हा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचे स्थान अजूनही बर्‍याच अंशी आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस या पक्षाच्या नावावर उमेदवार मते खेचू शकतात- जरी ती मते जिंकायला पुरेशी नसली तरी. तशी स्थिती तृणमूलची नक्कीच नाही. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये ममता आपल्या नावावर मते खेचू शकतील असे आता तरी वाटत नाही. २०१४ मध्ये गुजरातच्या मोदींनी देशभर मते खेचली त्यामागे मोदी गुजरातचे असले तरी पक्षाची संघटना देशातील बर्‍याचशा राज्यात होती आणि संघाच्या स्वयंसेवकांचीही मदत त्यांना झाली हे त्यामागे मोठे कारण होते. तशी कोणतीही संघटना बंगाल, त्रिपुरा, मणिपूर (आणि आता कदाचित गोवा) सोडून इतर राज्यांमध्ये ममतांच्या मागे नाही.

तसेच गोव्याच्या २०२२ मधील विधानसभा निवडणुकांचा विचार करता थोडी गुंतागुंत अधिक वाढली आहे. कोणत्याही राज्यात नवा पक्ष येतो तेव्हा तो अपक्ष/इतर फ्लोटिंग मतांवर पहिला डल्ला मारतो आणि मग आपले स्थान निर्माण करतो. दिल्लीत २००८-२००९ पर्यंत बसपा १५% पर्यंत मते घेणारा बर्‍यापैकी ताकदवान पक्ष होता. आप आल्यावर २०१३ मध्ये त्या पक्षाने बसपा/सपा/अपक्ष-इतरांना मिळणारी मते जवळपास सगळी खाल्ली आणि काँग्रेसविरोधातील अ‍ॅन्टी इन्कबन्सीची बरीचशी मते घेतली. त्यातून झाले असे की दिल्लीत बसपा/सपा वगैरे पक्ष संपलेच. २०१५ मध्ये काँग्रेसलाही संपविण्याइतकी मते आपने घेतली- खरं तर काँग्रेसची जवळपास सगळी मते आपला गेली. या पार्श्वभूमीवर २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये लहान पक्ष/इतर यांची मते आपला खायला मिळाली असती त्यात तृणमूल हा आणखी एक वाटेकरी आला आहे.

उत्तर गोव्यात पेडणे आणि मडकई हे मगोपचे बालेकिल्ले आहेत. इतर मतदारसंघातही- प्रियोळ, म्हापसा, दाबोळी वगैरे ठिकाणी मगोपची ताकद आहे. २०१७ मध्ये ४ मतदारसंघात मगोपचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. तेव्हा ६-७ मतदारसंघांमध्ये मगोप लढण्याच्या स्थितीत आहे. इतरही ५-७ मतदारसंघात १५-२०% मते पक्ष घेतो. त्याप्रमाणेच गोवा फॉरवर्ड या पक्षाची पण ३-४ मतदारसंघात ताकद आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मगोप किंवा गोवा फॉरवर्डचे उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत नसतील तिथे तिसर्‍या पक्षाने जोर लावल्यास या पक्षांची बरीच मते त्या तिसर्‍या पक्षाकडे जाऊ शकतील. निवडणुकांच्या निकालांच्या आकडेवारीचा जो काही थोडाफार अभ्यास मी केला आहे त्यावरून हे अनुमान मी काढले आहे. पण आता यात तिसरा नाही तर चौथा पक्षही आला आहे त्यामुळे गुंतागुंत अधिक वाढली आहे. आपकडे गोव्यात कोणताही बडा चेहरा नाही पण तृणमूलकडे लुईझिनो फालेरोंच्या रूपात तो मिळाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बाणावलीचे चर्चिल आलेमाव तृणमूलचे उमेदवार म्हणून दक्षिण गोव्यातून निवडणुक लढले होते. सध्या ते राष्ट्रवादीत आहेत. ते पण परत तृणमूलमध्ये गेल्यास दक्षिण गोव्यातील ३-४ जागांवर तृणमूल लढण्यासारख्या स्थितीत येईल. आपकडे मात्र तसा कोणताही चेहरा याक्षणी नाही.

Rajesh188's picture

28 Oct 2021 - 9:49 pm | Rajesh188

निवडणुका जिंकायच्या असतील तर संघटन मजबुत असायला हवं.
काँग्रेस कडे ती यंत्रणा आज पण आहे फक्त अशक्त झाली आहे .त्या मध्ये जोश निर्माण करणे महत्वाचे आहे तसे नेतृत्व काँग्रेस मध्ये असणे गरजेचे आहे.
सत्ता असेल तर च पक्ष तग धरतील.सत्ता खूप वर्ष मिळाली नाही तर कार्यकर्ते टिकत नाहीत.
काँग्रेस कडे काही राज्यात अजुन पण सत्ता आहे.काही स्वराज्य संस्था आज पण काँग्रेस च्या ताब्यात आहेत.
त्या मुळे काँग्रेस संपली असे म्हणता येणार नाही.
तुम्ही मान्य करालच.
विविध संस्था,विविध योजने द्वारे काँग्रेस पक्षाची पायमुळ खोलवर रुजली होती जेव्हा काँग्रस यशाच्या शिखरावर होती.
राष्ट्रवादी नी पण तोच फॉर्म्युला वापरून पक्ष तळागाळात पोचवलं आहे.
पण मनसे आणि सेना ह्यांना हे काही जमले नाही त्यांना मतदान च भावनिक मुद्द्यावर होते .
आणि अशा मतदानाचा कशी भरवसा नाही.
Bjp नी काँग्रेस चा तो गुण आत्मसात केला पाहिजे.
Bjp चे तळागाळात आज पण काम नाही.
फक्त हिंदुत्वाच्या इंधनावर त्यांचा वारू उधळला आहे..
इंधन संपले की यश पण इतिहास जमा होईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Oct 2021 - 7:58 pm | चंद्रसूर्यकुमार

एका तमिळ राजकारण्याने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असलेल्या मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याविरोधात आता संजय राऊत काय बोलणार?

श्रीगुरुजी's picture

28 Oct 2021 - 10:34 pm | श्रीगुरुजी

उद्या संध्याकाळी आर्यन तुरूंगातून बाहेर आला तर सकाळपासून तुरूंगाबाहेर उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींचे श्रम व वेळ सार्थकी लागतील व नंतर तुरूंगापासून तो घरी पोहोचेपर्यंत धावते वर्णन सुरू ठेवून ते त्याचा पाठलाग करतील. त्याने कोणत्या रंगाची विजार व सदरा परीधान केलाय, बाहेर आल्यावर त्याने कोणाबरोबर हात मिळविला, घराच्या दारात त्याच्या स्वागतासाठी कोण कोण उभे आहेत याचा इत्यंभूत वृत्तांत आपल्याला सांगत व दाखवित राहतील.

आग्या१९९०'s picture

28 Oct 2021 - 11:17 pm | आग्या१९९०

मिडिया काय करेल ते सांगता येत नाही, परंतु मिपावर फालतू गोष्टींकडे लक्ष देणारे रिकामटेकडे बरेच आहे. मिडीयाला असेच ग्राहक हवे असतात.

श्रीगुरुजी's picture

28 Oct 2021 - 11:21 pm | श्रीगुरुजी

लगेच प्रत्यंतर आलं.

तस्सेच मोदीजींबाबत सातत्याने, पुन्हा पुन्हा दिसत असते. मोदीजी उठले, मोराशी खेळले "इतनी एनर्जी लागते काहासें है ?" वैगेरे.

Rajesh188's picture

29 Oct 2021 - 9:22 am | Rajesh188

सर्व राजकीय पक्षात सडक छाप लोक असतात च .
सडक छाप,बेकार, काहीच काम नसणारी लोक ही तर राजकीय पक्षांची कार्यकर्ते असतात.
निवडणुकीत फुकटच्या हजमाती हीच लोक करत असतात.
काहीच संबंध नसलेल्या राजकीय पक्षाच्या मोर्च्यात हेच असतात,दगडफेक,दंगल मजवण्यात हीच लोक असतात
Bjp कडे सुद्धा अशा लोकांची फौज आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 9:34 am | चंद्रसूर्यकुमार

आताच अबप माझावर सांगत होते- आर्यन तुरूंगात असताना शाहरूखखान आर्थर रोड तुरूंगात त्याला भेटायला गेला पण शाहरूखखानचे दर्शन त्यावेळी कोणाला झाले नाही....

बोंबला. दर्शन व्हायला शाहरूखखान काय भगवंत आहे का? ते ऐकताच चॅनेल ताबडतोब बंद केला. अनेक वर्षांची सवय असल्याने वाचायला कितीही त्रासदायक असला तरी ऑनलाईन महाराष्ट्र टाईम्स वाचणे आणि अबप माझा बघणे या गोष्टी नकळत होतातच. :( जाणीवपूर्वक ती सवय बदलायला हवी.

इस्त्राएलचे राजदूत नाओर गिल्सन म्हणाले- NSO हि एक खाजगी संस्था असली तरी प्रत्येक (पेगॅसस सॉफ्टवेअरच्या) निर्यातीसाठी त्यांना इस्त्राएल सरकारकडून परवाना लागतो. हा परवाना तेव्हाच मिळतो जेव्हा आयात करणारा सरकार संबंधित संस्था अथवा सरकारच असते. त्यापुढे काही बोलण्यास त्यांनी नकार दिला- हा भारताचा अंतर्गत मामला आहे म्हणून.

https://indianexpress.com/article/india/pegasus-snoop-affair-israeli-env...

(अर्थात मिपावरच्या धुरंधरांना पत्रकार, अर्थतज्ञ, विद्यार्थी, राजकीय विरोधक यांच्यावर कोणत्याही एक्सप्लेनेशन शिवाय आणि कोणत्याही बँकिंग शिवाय पाळत ठेवण्यास काहीच हरकत वाटत नाही. शेवटी वॉटरगेट वैगेरे चघळायलाच फक्त छान. त्याचा खऱ्या जीवनाशी आजिबात संबंध नसतो.)

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 10:11 am | चंद्रसूर्यकुमार

हे खरोखरच झाले होते असे गृहित धरले तरी कॉमी विचारांच्या लोकांना यात आक्षेपार्ह वाटण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. त्यांची राजवट जिथे सत्तेत होती तिथे कॉमी मंडळी हेच तर करत होती. इतकेच नव्हे तर विरोधकांना फायरींग स्क्वाडमध्ये पाठवे, गुलागमध्ये पाठवे, देशातून हद्दपार करे किंवा विद्यार्थ्यांचेच म्हणाल तर त्यांच्या अंगावर रणगाडे घाले. खरं तर भारतात तसे केले तरच कॉमी लोकांना आपल्या विचारांप्रमाणे गोष्टी होत आहेत याचा आनंद व्हायला हवा.

की आपलं ते नेहमीचे पालुपद--- it was not real communism?

ख्या ख्या ख्या

फुटकी रेकॉर्ड स्राईक्स अगेन

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 10:14 am | चंद्रसूर्यकुमार

फुटकी रेकॉर्ड ची फुटकी रेकॉर्ड स्ट्राईक्स अगेन.

खरी गोष्ट बोलली की अशीच झोंबते. कम्युनिझम हा मानवजातीला लागलेला कलंकच आहे.

कॉमी's picture

29 Oct 2021 - 10:15 am | कॉमी

straw man
noun
noun: strawman
1.
an intentionally misrepresented proposition that is set up because it is easier to defeat than an opponent's real argument.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 10:16 am | चंद्रसूर्यकुमार

खरी गोष्ट बोलली की अशीच झोंबते. कम्युनिझम हा मानवजातीला लागलेला कलंकच आहे.

पोलिटिकल कम्पस टेस्ट मध्ये माझ्या आठ्वणीप्रमाणे तुम्हीच जास्त authoritarian side कडे झुकत होता की खरं.

मी तर पूर्ण लिबरटेरियन बाजूने होतो !

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 10:25 am | चंद्रसूर्यकुमार

:)

compass

मग , तेच तर. गुलाग, जेनोसाईड या गोष्टी डाव्या उजव्या स्पेक्ट्रमच्या वरच्या पट्टीतले (authoritarian) करतात. मी कुठे आहे हे न समजण्याइतके दुधखुळे तुम्ही नक्कीच नाही. तरी वारंवार strawman करताच कि नाही?

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 10:41 am | चंद्रसूर्यकुमार

बोंबला. याला म्हणतात दिशाभूल करणे. वरच्या बाजूचे लोक ते करतात पण वरच्या डाव्या कोपर्‍यातले लोक ते करतात हे सांगायचे विसरलात.

आजिबात नाही. वरचे उजवे पण करतात. मारणे कापणे जेलमध्ये टाकणे=authoritarianism. Y axis हा authoritarian आणि libertarian असा आहे.

असो, चालू घडामोडींमध्ये गतकाळाचा कडबा चावत बसायला तुम्हाला आवडते. पण मला बोर होते. बाय.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 11:01 am | चंद्रसूर्यकुमार

एकंदरीत कॉमी राजवटीमध्ये विरोधकांवर नुसती पाळतच नाही तर इतर अनेक प्रकार केले जात आले आहेत हे उल्लेख भलताच झोम्बलेला दिसतो. चालायचंच. सत्य नेहमी कटू असते.

बाय बाय.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 10:07 am | चंद्रसूर्यकुमार

आणखी एका एस.टी. कर्मचार्‍याने आत्महत्या केली आहे. यावेळी कोल्हापूरमध्ये. अखिल ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या सरकारला आर्यनचा जामीन, समीर वानखेडेंचा धर्म, त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांचा निकाह झाला की विवाह झाला वगैरे महत्वाच्या गोष्टींचा प्राधान्याने विचार करण्यासारखे काम आहे. त्या कामातून वेळ मिळाला तर मग आतापर्यंत किती एस.टी. कर्मचार्‍यांनी पगार वेळेवर न मिळाल्याने आत्महत्या केली आहे वगैरे गोष्टींचा विचार करायला सवड मिळेल अशी अपेक्षा करू.

केंद्र सरकार नी महाराष्ट्र मध्ये कारवाई करण्यास मनाई हुकूम जारी करावा.
सर्व गोंधळ थांबेल.

सुक्या's picture

29 Oct 2021 - 10:44 am | सुक्या

महाराष्ट्राने आता सरळ सरळ स्वतंत्र देश म्हणुन जाहीर करायला हवे ...
सर्व गोंधळ थांबेल.

पाच मंत्री हे विरोधी पक्षातील होते असे वाचले आहे.
Pv नरसिंह राव ह्यांनी पण वाजपेयी जी वर महत्वाची जबाबदारी सोपवली होती.
असे पण वाचले आहे.
ह्याला म्हणतात mature विचाराचे नेतृत्व.
ह्यांना कुठे आता पूर्ण बहुमत मिळाले आहे तर ह्यांनी हडकंप माजवला आहे.

बी. आर. आंबेडकर हे 1930-40 पासून काँग्रेसचे कडवे विरोधक राहिलेले होते. त्याचदरम्यान 1946 मध्ये What Gandhi and the Congress have done to the Untouchables?'’ (गांधी आणि काँग्रेसने अस्पृशां-बाबत काय केले) या पुस्तकाच्या रूपाने काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर आंबेडकरांनी तीक्ष्ण हल्ला केला होता. तरीही विविध तुकड्यांमध्ये विभागल्या गेलेल्या आपल्या देशाने एकत्र यावे, म्हणून काँग्रेसने आंबेडकरांसमोर कायदामंत्र्याचे पद स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. आंबेडकरांकडून होकार आल्यानंतर, नेहरू आता राजगोपालचारींना त्यांचे तमिळी मित्र आर. के. षण्मुख चेट्टी यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्याविषयी सांगत होते. ‘जस्टिस’ पक्षाचे नेते चेट्टी हे काँग्रेसचे मोठेच टीकाकार होते. त्याचबरोबर ते भारतातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ होते (जसे आंबेडकर हे भारतातील सर्वोत्तम कायदेतज्ज्ञ होते). पूर्वीचे वैर बाजूला ठेवून शेवटी चेट्टी भारताचे पहिले अर्थमंत्री झाले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याला कडवा विरोध करणारे हिंदू महासभेचे एस. पी. मुखर्जी आणि अकाली दलाचे बलदेवसिंग असे नेतेदेखील स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे भाग होते. मंत्रिमंडळातील इतर जागांसाठी उद्योगपती सी. एच. भाभा आणि प्रशासक एन. गोपालस्वामी अय्यंगार यांच्यासारख्या, पक्षाशी पूर्वीचे लागेबांधे नसणाऱ्या व्यक्तींना विचारणा करण्यात आली होती.
भारत सरकार चे मंत्रिमंडळ हे.
ज्ञानी,विचारवंत,तज्ञ लोकांचेच असले पाहिजे हे नेहरू ना समजत होते.
कारण युग पुरुष होते.
मोदी ना पूर्ण बहुमत आहे...भारत सरकार मध्ये हे मंत्री आहेत त्यांची लायकी तरी आहे का मंत्री होण्याची.
पक्ष भेद विसरून फक्त अतिशय हुशार,तज्ञ, विचारवंत च मंत्री मंडलात पाहिजेत.
अशी पण लोक मोदी ह्यांच्या नावावर च मत देतात.
राजकीय नुकसान काही होणार नाही.
पण देश उत्तम प्रगती करेल.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 2:05 pm | श्रीगुरुजी

इतिहासाचे शून्य ज्ञान असले की असे भास होतात. १९४७ चे मंत्रीमंडळ कसे व का स्थापन झाले हा इतिहास वाचणे आवश्यक आहे. नाहीतर असेच अज्ञान प्रकट होत राहील.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 2:23 pm | चंद्रसूर्यकुमार

नेहरू इतकेच परमतसहिष्णू होते तर जरा दोन प्रश्नांची उत्तरे शोधून बघा. तुम्ही उत्तरे देणार नाही याची खात्री आहे पण जमल्यास ती शोधा तरी.

१. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंच्या मंत्रीमंडळात इतर पक्षांचे नेते होते. त्याची परिस्थिती वेगळी होती. पण पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर तसे किती वेळा झाले होते?
२. रोमेश थापर केस काय होती? जमल्यास त्या केसनंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर कोणते नियम बदलले गेले होते हे पण शोधून काढा.

आता अभिव्यक्तीस्वातंत्र्याची पोपटपंची करणार्‍या विचारवंतांना हा सगळा प्रकार माहित असतो की नाही याची कल्पना नाही. अन्यथा नेहरू आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य अगदी एकाच दमात ते बोलले नसते. दुसरे म्हणजे रोमेश थापर कम्युनिस्ट होते आणि त्यांच्यावर कारवाई केली गेली असली तरी सध्याचे कम्युनिस्ट लोक नेहरू कित्ती कित्ती चांगले होते असेच म्हणतात. काय करणार. चालायचेच.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 2:33 pm | श्रीगुरुजी

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात सर्वपक्षीय मंत्री का होते हे ज्याला माहिती नाही त्याला इतर गोष्टी काय समजणार?

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 3:00 pm | चंद्रसूर्यकुमार

तरीही राजेशरावांच कौतुक वाटते. काहीही माहित नसताना ज्या आत्मविश्वासाने ते काहीही लिहित असतात त्याचे कौतुक वाटते.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 2:56 pm | चंद्रसूर्यकुमार

मजरूह सुलतानपुरींना नेहरूंवर टीका करणारी कविता लिहिली म्हणून एक वर्ष तुरूंगात जावे लागले होते हे विसरलोच.

रात्रीचे चांदणे's picture

29 Oct 2021 - 3:07 pm | रात्रीचे चांदणे

राजेश भाऊ कडून उत्तराची अपेक्षा ठेऊ नका, नेहमीप्रमाणे पळ काढणार ते. पण त्यांच्यामुळेच बऱ्याचदा अशी माहिती मिळते ती एरव्ही तुम्ही हिथे पोस्ट केली नसती.

देशाला द्वेष निर्माण करणारे नकोत.सर्वांना बरोबर घेवून.देशासाठी योग्य असतील तेच निर्णय घेवून देशाला एक प्रगत राष्ट्र बनविणारे हवे आहेत.

मदनबाण's picture

30 Oct 2021 - 12:15 pm | मदनबाण

गेल्या काही दिवसां पासुन माझ्या वाचनात सोलार स्टॉर्म्स, सोलार फ्लेअर्स च्या बातम्या सातत्याने आल्या आहेत, त्या संबंधीचे २ सुंदर व्हिडियो इथे देऊन ठेवतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui

कॉमी's picture

30 Oct 2021 - 12:34 pm | कॉमी
मदनबाण's picture

30 Oct 2021 - 6:26 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui

सुरिया's picture

30 Oct 2021 - 8:08 pm | सुरिया

कित्येक खोटे ट्वीटस, मॉर्फड इमेज टाकून नंतर उघडकीस आल्यावर त्या काढून टाकून परत नवीन काड्या करत राहणार्‍या ह्या स्वयंघोषित डेटा सायंटिस्ट, डिजिटल स्ट्रॅटजिस्टचे इंटर्व्ह्यु तुम्हाला बघावे वाटतात आणि मुख्य म्हणजे ते शेअर करावे वाटतात ह्याच्यावरुनच अंदाज आला की तुमचा प्रचार काय पध्दतीने चाललाय.
धन्य ते व्हीडीओ, धन्य ती मुक्ताफळे.
आहे कोण हा माणूस? काय पद आहे त्याचे? काय क्रेडेबिलिटी त्याची?
माझी संपादक मंडळाला नम्र विनंती आहे की असे व्हिडिओ शेअर करताना ते सदर आयडीचे प्रकाशन आहे असे गृहीत धरुन ह्या एकतर्फी प्रचाराला आळा घालावा.
धन्यवाद

कॉमी's picture

30 Oct 2021 - 11:33 pm | कॉमी

विभोर आनंद या व्यक्तीचे कित्येक व्हिडीओ सुशांत सिंह धाग्यात दिले होते.

कित्येक खोटे ट्वीटस, मॉर्फड इमेज टाकून नंतर उघडकीस आल्यावर त्या काढून टाकून परत नवीन काड्या करत राहणार्‍या ह्या स्वयंघोषित डेटा सायंटिस्ट, डिजिटल स्ट्रॅटजिस्टचे इंटर्व्ह्यु तुम्हाला बघावे वाटतात आणि मुख्य म्हणजे ते शेअर करावे वाटतात ह्याच्यावरुनच अंदाज आला की तुमचा प्रचार काय पध्दतीने चाललाय.
@ बाळ सुरिया, तू जो माझ्यावर व्यक्तिगत आरोप करतो आहेस तो पूर्णपणे चुकीचा असुन फक्त एका प्रतिसादा वरुन तू असे आरोप करत आहेस त्यावरुन तुला काय प्रचार करायचा आहे ते मात्र नक्की सांग. बादवे... संपादक मंडळाला माझ्या आयडीची तक्रार करणारा व्यनी देखील कर, त्यांच्या नजरेत हा धागा आला नाही तरी तुझा प्रयत्न विफळ जायला नको. तुझ्या ८ महिने वय असलेल्या आयडीला दिर्घायु लाभो ही प्रार्थना माझ्याकडुन मात्र नक्की करतो. :)

माझी संपादक मंडळाला नम्र विनंती आहे की असे व्हिडिओ शेअर करताना ते सदर आयडीचे प्रकाशन आहे असे गृहीत धरुन ह्या एकतर्फी प्रचाराला आळा घालावा.
हा.हा.हा... हास्यास्पद इतकेच म्हणीन. :)

विभोर आनंद या व्यक्तीचे कित्येक व्हिडीओ सुशांत सिंह धाग्यात दिले होते.
हो दिले होते, नंतर त्याच व्यक्तिचे किती व्हिडीयो मी परत पोस्ट केले ? जर दिले नसतील तर त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही असं मला अजिबात वाटतं नाही.
---
--
-
असो... चालु ध्या.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India’s 1st long-range 1 ton guided bomb test-fired, hits target 100 km away

सुरिया's picture

31 Oct 2021 - 12:25 am | सुरिया

आपले पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी आज व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस ह्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत गरीबी आणि पर्यावरण वातावरण बदलाविषयी चर्चा केली. त्यांना भारताला भेट द्यायचे आमंत्रण ही दिले.
स्व. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना १९९९ मध्ये तत्कालीन पोप ह्यांनी भारताला भेट दिलेली होती. त्यानंतर २२ वर्षाने सद्य पोप भारतास भेट देतील अशी आशा आहे.
भारतातील सर्व धर्मांना सन्मानाने वागवले जाते हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दर्शवण्यासाठी मा. पंतप्रधान मोदीजी ह्यांचे हार्दिक अभिनंदन.