आर्यन खान प्रकरण नक्की काय आहे?

Trump's picture
Trump in राजकारण
28 Oct 2021 - 11:11 pm

आर्यन खान प्रकरण नक्की काय आहे?

गेले काही दिवस सतत बातम्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवत आहेत. नक्की खरे झाले काय हे कळत नाही.

काल क्रांती रेड्कर यांची याचना वाचली आणि वाईट वाटले.

मी वाचलेल्या काही गोष्टी. खर्‍या आणि खोट्या किती हे माहीती नाहीत.

१. वानखेडे आणि एन सी बी मधील काही अधिकार्‍यांनी २५ करोड रुपये शहारुख खानला मागितले. त्याने ते न दिल्याने त्याच्या पोराला पकडेले.

२. नवाब मलिक ह्याचा जावई ह्याच आरोपाखाली आत असल्याने ते वानखेडे यांच्या कुटुंबावर आरोप करत आहे.

३. त्यात आजुन अब्राहमिक जातीची भर पडली आहे.

४. वानखेडे यांना चांगल्या कामाबद्दल बक्षीसही मिळाले आहे.

५. आता वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

नक्की काय चालु आहे?

प्रतिक्रिया

नुसतं लहान पोरा सारखा वागत आहेत ही जबाबदार लोक. खर कधीही बाहेर येणार नाही. पण ह्यात खूप फायदे आहेत

- कोणाला तरी आर्थिक फायदा होईल
- ते शेबड आर्यन ची फुकट publicity zali
- कोणाचा राजकीय फायदा होईल.
- टीआरपी वाढेल
- आपण १ -३ महिन्यात सगळं विसरून जाऊ पण आपले पण चांगले मनोरंजन झाले
पण...

- बाकी खूप महत्वाचे प्रश्न मागे पडतील जसे
- कोरोना
- महागाई
- बेरोजगारी
- शेतकरी प्रश्न

शेवटी सामान्य माणूस YZ च आहे. आपण ह्यांना मत द्यायची. टॅक्स भरायचा. थोडे दिवस इथे बोंबलयच. Whatsapp ani तत्सम मीडिया वर फॉरवर्ड करायचे. सरकारी बाबूंची मनमानी सहन करायची. आणि गप्प बसायचं.

खरंच माझा भारत कितीही महान असला तरी असल्या गोष्टी मुळे खूप वाईट वाटत. कुठे चाललो आहोत आपण तो देवच जाणे.

Reply विषयाला धरून नसेल पण जे वाटलं ते लिहिलं....

king_of_net's picture

29 Oct 2021 - 5:40 pm | king_of_net

++++१

कंजूस's picture

29 Oct 2021 - 3:51 am | कंजूस

हा सध्याचा प्रश्न आहे.
कोठडीत वाढ कशाला तर चौकशीसाठी. त्यानंतर आरोपपत्र दाखल होणार.
-----
मागील काही प्रकरणं पाहता प्रसिद्ध व्यक्ती गुंतलेल्या खटल्यांत लवकर निर्णय होत नाही.
----------
वकील लोक नक्की काय मुद्दे मांडतात? आणि ते अमुक एक वकीलच मांडू शकतात असं काही वाटत नाही. नवीनच पदवी घेतलेले वकीलसुद्धा ते मुद्दे मांडणार नाहीत का?
---------------
हा खटलाही बरेच वर्षे चालेल असं वाटतंय.
प्रथम आरोपपत्र दाखल होण्यास विलंब,
नंतर दोन्हीकडचा युक्तीवाद,
नंतर साक्षीदारांचे जाबजबाब,
तारखा,
तारखा,
निकाल.
.
.
मग वरच्या कोर्टात परत पुन्हा खटला दाखल,
परत तारखा, नवीन साक्षी,
.
.
निकाल.
.
.
.
????
--------------------------------

कधीकधी एखाद्या खटल्यात भक्कम पुरावे असतात तेव्हा रगेच शिक्षा होते आणि प्रकरण संपते.

भारतीय न्यायव्यवस्था ही खुप संथ आहे हे नक्की. कधी कधी (म्हणजे बर्‍याचदा) त्याचा गैरफायदा घेतला जातो. न्यायव्यवस्थवर टीका करणे हा मानहानी चा अपराध असल्यामुळे त्याविषयी मोकळेपणाने जास्त बोलले जात नाही. कुणी उघड्पणे बोलतही नाही.. न जाणो कुणी न्यायाधीश त्यावरुन शिक्षा देवो. त्यामुळे तारीख पे तारीख वगेरे होउन जो न्याय मिळतो त्याचा काहीच अर्थ राहत नाही ...

वरुन न्यायालय सुट्टीवर जाते (उन्हाळा). मला अजुन तरी त्याचे कोडे उलगडले नाही .. इतक्या केसेस पेंडींग असताना त्यावर कुणी न्यायमुर्ती सुट्टी वर न जाता काम का करत नाही? आताच्या काळात उन्हाळी सुट्टी का असावी ?

चौकस२१२'s picture

29 Oct 2021 - 5:38 am | चौकस२१२

१) मीडिया ट्रायल चालली आहे, भारतीय मीडिया काय "दर्जाचा" आहे हे परत यातून दिसते
२) एन सी बी अधिकाऱ्याची वयक्तिक माहिती चा येथे काय संबंध आहे ? तो मुस्लिम आहे कि नाही याचा या केस शी काय संबंध ? मूर्खपणा सगळं
३) कोणत्याही राष्ट्रीय सरकारी विभागाने महाराष्ट्रात कारवाई केली कि लगेच त्याचे रूपांतर "महाराष्ट्र्र विरदुः केंद्रीय सरकार" असे करणे हे तिघाडी सरकारचे राजकीय धोरण लांशांदस्पद आहे .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2021 - 10:18 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्याला बूमरँग म्हणतात. रिया चक्रवर्तीची खाजगी चॅट, मीडियाला कुणी दिली? अनन्या पांडेला "हा स्टुडियो नाही. एन सी बीचे ऑफिस आहे" असे वानखेडे ह्यांनी सांगितले . आता ही माहिती जादूने मीडियला बाहेर मिळाली का? एन सी बी रिया चक्रवर्तीला कोणते प्रश्न विचारणार आहे ह्याचीही माहिती मीडियाला दिली जाते.
https://www.indiatoday.in/movies/story/questions-ncb-ask-rhea-chakrabort...
ईतका बेजबाबदारपणा ? फक्त प्रसिद्धीसाठीच ना ? कॉर्डेलियावर जी पार्टी आयोजित केली होती तिचे आयोजक होते, काशिफ खान. हे फॅशन टी,व्हीचे मुख्य आहेत. हे ड्रग पुरवण्याचे काम करतात हेही अनेकांना माहित आहे. आता ह्यांना अटक व्हायला नको का? मात्र फक्त १३ जणांनाच अटक होते आणि पार्टी आयोजित करणार्यना चौकशीसाठीही बोलावले जात नाही. काशिफ खान व वानखेडे ह्यांची दोस्ती असल्याचे बोलले जाते.

कॉमी's picture

29 Oct 2021 - 10:24 am | कॉमी

अगदी योग्य माई.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2021 - 9:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर


नक्की काय चालु आहे ?


एन सी बी चे समीर वानखेडे ह्यांचे नक्की काय चालले होते ते आधी समजून घेउ. सुशांत प्रकरणातून समीर वानखेडे ह्यांचे नाव पुढे आले. एन सी बीचे विभागीय संचालक आहेत हे. रिया चक्रवर्ती आणि बॉलिवूडच्या अनेकांना कथित चौकशीसाठी बोलावले गेले. बोलवण्याआधी रीतसर जाहिरात मीडियातर्फे करण्यात आली. कोणाला कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत ह्याचीही यादी मीडियातून येऊ लागली. चौकशी झाली. ठीक. पण ह्यातून नक्की काय निष्पन्न झाले? कोणता मोठा ड्रग डीलर पकड्ला गेला? हे वानखेडे ह्यांनी जाहीर केले का? प्रत्येकाकडे काही ग्राम्स ड्रज्स होते. ठीक. वानखेडे पकडतात त्याच्या कित्येक पट ड्रग्ज्/कोकेन एन सी बीच्या भारतातील ईतर शाखा पकडतात पण इथे जाहीराबाजी नसते की कॅमेरे नसतात.
एन सी बी बेंगळुरू (https://www.thenewsminute.com/article/drug-racket-busted-bengaluru-ncb-s...)
एन सी बी हैद्राबाद (https://indianexpress.com/article/cities/bangalore/ncb-3kg-drugs-lehenga... )
एन सी बी कोलकाता (https://www.indiatoday.in/cities/kolkata/story/kolkata-ncb-busts-drug-ra...)
धाड टाकताना संबधित अधिकारीच धाड टाकतात व तेच संशयिताना अटक करतात. इकडे गोसावी नामक पुण्यात टोप्या घालणारा माणूस अटक करतना दिसतो. एवढेच नव्हे तर तो संशयितासोबत सेल्फी काढुन त्याला कोणाबरोबर तरी बोलायलाही सांगतो. नंतर हा गोसावी गायब होतो. वानखेडे ह्यांनी ह्याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. खबर्याचे काम फकत माहिती पुरवणे आहे. संशयितांना पकडणे हे तपास यंत्रणांचे काम आहे.
सेलिब्रिटीजना पकडायचे व गोसावीमार्फत पैशाचे सेटिंग करायचे. ह्या गोसावीसारखाच एक आदिल नावाचा माणूस पंच आहे. हा माणूस चक्क पन्नास केसेसमध्ये पंच आहे! नबाब मलिक ह्यांच्या जावयाला अटक झाल्यावर त्यानाही असाच अनुभव आला असणार म्हणून आर्यन व ईतरांना पकडल्यावर त्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली.

सगळा लक्ष वेधण्यासाठीचा स्टंट आहे.

Rajesh188's picture

29 Oct 2021 - 10:07 am | Rajesh188

ह्यांचा काही संबंध नाही जे संबंध जोडत आहेत त्यांना त्या मध्ये राजकीय लाभ दिसत आहे.
आर्यन खान ल मल्लिक ह्यांचा पाठिंबा नाही.
केंद्रीय संस्था महाराष्ट्र मध्ये नको तेवढं हस्तक्षेप करत आहेत.
Ed असू cbi असू किंवा बाकी सर्व च केंद्रीय संस्था ह्या महाराष्ट्रात हस्तक्षेप करत आहेत अडाणी च्या बंदरावर जे ड्रग सापडले त्याचे मालक सापडला का?
हे प्रामाणिक अधिकारी आहेत ना मग का नाही अजुन सापडला तो?
धक्कादायक बाब तर ही आहे.
झी न्यूज bjp samarthak अगदी खुले आम.
रिपब्लिक भारत न्यूज नेटवर्क.
Bjp समर्धक media आहे.
अगदी ओपनली.
टीव्ही १८, CNBC ही चॅनेल अंबानी च्या मालकीची आहेत.
म्हणजे bjp चीच.
आज तक त्यांचेच.
राहिले nd tv त्या मध्ये अदानी ची गुंतवणूक आहे असे ऐकायला येतेय .
पूर्ण माडिया च सत्ताधारी पक्षाच्या समर्थक लोकांचा आहे.
त्या मुळे अजेंडा चलवल्यासारखा प्रचार होत आहे.
राहिली समाज मध्यम .त्या वर सरकार दबाव आणत असते.
नेहमीच्या खुळचट कारणाने.
देशाची सुरक्षा धोक्यात आणतील समाज मध्यम असा प्रचार करून.
खूप बिकट स्थिती आहे.

दिगोचि's picture

29 Oct 2021 - 10:23 am | दिगोचि

वानखेडे आणि एन सी बी मधील काही अधिकार्‍यांनी २५ करोड रुपये शहारुख खानला मागितले.>>>> ही एक वदन्ता आहे असे मला वाटते कारण ज्याच्याकडे लाच मागितली त्याने, त्याच्या बायकोने किम्वा त्याच्या मुलाने पोलिसाकडे याबाबत तक्रार केलेली नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2021 - 10:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वानखेडे ह्यांच्या कामाची पद्धत पाहिली तर संशय घ्यायला खूप जागा आहे. गोसावी ह्या पंचाचे गायब होणे, आदिल नावाचा पंच चक्क ५० केसेसमध्ये पंच असणे., २/३ ग्रॅम्ससाठी सेलिब्रिटीजना पकडणे मात्र मोठे ड्रग डीलर्सचा पर्दाफाश न होणे..
प्रभाकर साईल हा दुसरा पंच. ह्यानी वानखेडेंना आठ कोटी मिळणार असल्याचे बोलताना ऐकले. खोटेही बोलत असेल पण तो ज्या पद्धतीने माहिती देत आहे, नावे सांगत आहे, त्यानुसार फोन ट्रॅक करून बरीच माहिती मागवता येते. व शहानिशा करता येते.

रात्रीचे चांदणे's picture

29 Oct 2021 - 10:50 am | रात्रीचे चांदणे

उलट आर्यन च्या वकिलांनी तर कोर्टात सांगितलं की बाहेर कोणी वानखेडे विषयी बोलत असेल तर त्याचा आणि माझा काही संबंध नाही. रिया ला जे प्रश्न ncb ला विचारणार होती ते मीडियाला आधीच कळत असतील तर ncb ची चौकशी व्हायला पाहिजे. पण रियाला तेच प्रश्न विचारले कशावरून. रियाच्या केसमध्ये आपल्या मीडियाची वागणूक अतिशय चुकीची होती. मीडियाने आधीच ठरवून टाकले होत की रियानेच सुशांत ला मारलं.

अजूनही काहींना त्याची खात्री असेलच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Oct 2021 - 11:56 am | राजेंद्र मेहेंदळे

मुंबई बॉम्ब स्फोटाच्या वेळी संजय दत्तकडे एके ४७ सापडली होती आणि त्याला अटक झाली होती तेव्हा त्याचे वडील राजकीय पक्ष/शत्रुमित्र वगैरे बजुला ठेवुन ठिकठिकाणी पायधुळ झाडत होते आणि आपल्या मुलाचे निरपराधित्व सिद्ध करु पाहत होते. किंबहुना त्याच्या बाजुने स्टेटमेंट द्यायला सांगत होते, किवा मदतीची याचना करत होते. त्यावेळी सोशल मिडिया नव्हता पण बातम्या आणि पेपरमध्ये रोज अपडेट मिळत होत्या. शिवसेनाप्रमुखांनीही संजय दत्त निर्दोष आहे अशा प्रकारचे विधान केले होते आणि सिने कलाकार "संजु वुइ आर विथ यु" अशा पाट्या घेउन ठाणे जेल समोर एक दिवस उभे राहिले होते.

आता शाहरुखही पोराला वाचविण्यासाठी तेच करतोय. मानेशिंदेना जमले नाही म्हणुन लंडनहुन वकीलांची फौज आणुन एकीकडे न्यायालयीन बाजु आणि दुसरीकडे नवाब मलिकांसारख्या लोकांची मदत घेउन मिडियाची बाजु लढवतोय. बाकी ईडी, सीबीआय,ए सी बी, एनसीबी यांच्या विषयी काय बोलणार? ते बहुतेक वेळा विद्यमान सरकारच्या दावणीला बांधलेले असतात. सुशांत सिंग प्रकरण्,पूजा चव्हाण प्रकरण, राज कुंद्रा प्रकरण, आर्यन खान प्रकरण किती उदाहरणे द्यावीत? नवीन विषय आला की जुना बाजुला पडतो.

पण चिंतेची गोष्ट ही की सगळी हिमनगाची टोके आहेत. या सगळ्यात मोठे मासे कधीच गळाला लागत नाहीत. एकीकडे ग्रॅमचा हिशोब करणार पण मुंबईच्या सीमांवरील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये किती ड्रग्सचे साठे, किती पेडलर्स,किती डिलर्स आहेत, तो माल कुठुन आणि कसा येतो, त्यात कोणाकोणाचे लागेबांधे आहेत ह्याला हात घालायची तयारी आहे का? तेव्हा दोन दिवस मजा बघायचे आणि विसरुन जायचे.

Rajesh188's picture

29 Oct 2021 - 12:30 pm | Rajesh188

लोक आता bjp च्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास ठेवत नाही .
राणे,चंपा,फडणवीस,सोमय्या ह्यांचे नाव जरी दिसले तरी बातमी सरळ skip करतात.
वाचायचे किंवा ऐकायचे पण कष्ट घेत नाहीत.

रात्रीचे चांदणे's picture

29 Oct 2021 - 12:35 pm | रात्रीचे चांदणे

राऊत, नवाब, आव्हाड असल की आवडीने वाचत असतील.

Rajesh188's picture

29 Oct 2021 - 12:48 pm | Rajesh188

किती सरकारी कंपन्या विकल्या.
पेट्रोल ,डिझेल , गॅस किती रुपयांनी वाढला.
कामगार ची पिळवणूक करण्यासाठी सरकार नी कोणते नवीन कायदे आणले.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी काय योजना आहेत.
एटीएम मधून पैसे काढताना किती fine वाढवला आहे.
स्टेटमेंट साठी प्रती पान किती चार्ज बँक लावते.
किती उद्योगपती कर्ज बुडवून देशातून पळून गेले .
किती पाळण्याच्या तयारीत आहेत.
अशा अनेक बातम्या कुठे कोपऱ्यात वाचायला मिळतात का? हे बघत असतात.

मीडिया पण ह्यांची च त्या मुळे वरील विषयातील बातमी पहिल्या पानावर कधीच नसते.
किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये प्राइम न्यूज मध्ये कधीच नसते.
प्राईम न्यूज, फर्स्ट page फक्त शेठ साठी आरक्षित असते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2021 - 1:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

. ह्या वानखेडेचे अनेक प्रोब्लेम आहेत. आधी हिंदू म्हणून सांगणारा हा समीर मुस्लिम असल्याचे सिद्ध झाले. ह्याच्या पहिल्या सासर्याने काल तसे टी.व्ही.वर साण्गितले. लग्न लावणार्या काझीनेही सांगितले की वानखेडे मुस्लिमच आहेत.
ह्या प्रकरणात केंद्र सरकारने वानखेडे ह्यांची चौकशी करावी किंवा आधी सरळ बदली करावी. मात्र आता सोमय्या वगैरे नेत्यांना हाताशी धरून वानखेडे कुटुंब राजकारण करू पाहत आहे. हा मुद्दा खरे तर राजकीय नाहीच. भ्रष्ट अधिकारी जिल्हा-राज्य-केंद्र अशा सगळ्या पातळ्यांवर असतात.आर टी ओ/एक्साईज्/पी डब्ल्यु डी ही खाती ज्यासाठी ओळखली जातात तशीच कस्टम्स्/रेव्हेन्यु इन्टिलिजन्स्/एन सी बी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खाती ओळखली जातात.
नबाब मलिक पूर्ण अभ्यास करूनच ह्यात उतरले आहेत असे दिसत आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 1:29 pm | श्रीगुरुजी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची कोणत्याही पदावर नेमणूक करण्यापूर्वी त्यांचा संपूर्ण इतिहास गुप्तचर खात्याकडून तपासला जातो. त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण, नोंदलेले गुन्हे, अनुभव अशा सर्व गोष्टी तपासून त्यात काहीही आक्षेपार्ह नसेल तरच त्यांची नेमणूक होते.

समीर वागखेडेंनी जात, धर्म वगैरे गोष्टी लपविल्या असत्या तर त्यांच्या नेमणुकीपूर्वीच त्या उघडकीला आल्या असत्या.

मुळात ते हिंदू आहेत की मुस्लिम हा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी केलेली कारवाई कायदेशीर आहे का नाही एवढाच प्रश्न आहे. आर्यनकला जामीन मिळाला म्हणून लगेच तो निर्दोष ठरत नाही. जामीन मिळाला हा जसा आर्यनचा विजय नाही तसाच तो अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचा पराभव नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे व त्यानुसारच जामीन मिळाला आहे.

ज्या पद्धतीने नवाब आणि राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक नेते आर्यनच्या बाजूने व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग व समीर वानखेडेंविरूद्ध कायदेशीर लढाई लढण्याऐवजी अत्यंत आक्रमकतेने व्यक्तिगत हल्ले करीत आहेत, ते पाहता या प्रकरणात अनेक मोठे नेते गुंतलेले आहेत असं दिसतंय. नवाबचा जावई तर या प्रकारात होताच. अजूनही काही जण असणार. समीर वागखेडेंविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत हल्ले करूनही व स्वतः मंत्री असूनही एकाही आरोपासाठी पोलिस किंवा संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याची नवाबची हिंमत नाही, कारण आपले आरोप पूर्ण खोटे आहेत हे त्याला माहिती आहे.

सातत्याने व्यक्तिगत आरोप करून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाविरूद्ध संशय निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत या भ्रमात नवाब आहे. वस्तुस्थिती ही आहे की राष्ट्रवादीचे काही कट्टर भक्त वगळता इतर सर्वांचा समीर वानखेडेंना पाठिंबा आहे.

जात धर्माबद्दल सहमत आहे.

बाकी काय ?

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 1:59 pm | श्रीगुरुजी

काय बाकी आहे?

एक पंच पन्नास ठिकाणी वापरणे, लाच खाणे, आपल्या ओळखीच्या व्यक्तीला/कार्यक्रमाच्या आयोजकाला सध्या चौकशीसाठी सुद्धा न बोलावणे ईई. सुद्धा आरोप मलिक यांनी केले आहेत.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 2:15 pm | श्रीगुरुजी

जो आरोप करतो त्याने आरोप सिद्ध करणारे पुरावे द्यायचे असतात. उद्या मलिकने आरोप केला की समीर वानखेडे पहिलीत नापास झाले होते, तर त्यानेच हे सिद्ध करणारी वानखेडेंची पहिलीची गुणपत्रिका देणे बंधनकारक आहे. अन्यथा असले आरोप कचरापेटीत फेकून द्यायच्या लायकीचे असतात.

सुरिया's picture

29 Oct 2021 - 1:40 pm | सुरिया

सोमय्या वगैरे नेत्यांना हाताशी धरून वानखेडे कुटुंब राजकारण करू पाहत आहे.

ज्यावेळी सुशांत प्रकरण जोशात होते, सगळ्या हिरॉइनी अगदी लाईनीने एनसीबीच्या दफ्तरी हजेरी लावत होत्या त्यावेळी समीर वानखेडे अगदी प्रकाशझोतात होते. ते कोण आहेत ह्यापेक्षा अभिनेत्री क्रांती रेडकरचे ते पती आहेत अशा सोशल मिडीयावर पोस्टस त्यांच्या एकत्र फोटोसह फिरत होत्या. तेंव्हाचा लाईमलाईट रेडकरताईंना आवडत होत्ता वाटते. कारण तेंव्हा काही तक्रार झाली नव्हती. झाली तर निदान एनसीबीवर झालेली. नंतर एकेक हिरॉइनी (रेहा चक्रवर्ती सोडून)अगदी आरामात सुटल्या. कुणावरच सध्या तरी कोणती केस चालु नाहीये. ज्या व्हाटसप चॅटमध्ये माल असा उल्लेख असलेने त्याना बोलावण्यात आले त्याचा अर्थ सिगारेट असा होतो असे दिपिका पदुकोन ने सांगताच एनसीबीने त्यावर विश्वास ठेवला आणि केस थंड्या बस्त्यात गेल्या. आता आर्यन प्रकरणात नबाब मलिकांनी उडी घेतली की समीर वानखेडे कसे कर्तव्यदक्ष ऑफीसर आहेत आणि ते हिंदू असलेने व आर्यन खान व नबाब मलिक मुस्लीम असा रंग देण्यात आला. त्याच्या व्हाटसप पोस्ट अगदी जोरात फिरल्या. हाही लाईमलाईट क्रांतीताईनी एंजॉय करत दोन चार पत्रकार परिषदा घेतल्या. सुरुवातीला माझा पती कर्तव्यपती असे सांगत नंतर नंतर एकेक गोष्टी उघड होऊ लागताच मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असे रडगाणे सुरु केले. केंद्र सरकारच्या एका गुन्हे संबधित खात्याच्या रिजनल डायरेक्टरला जीवे मारण्याच्या धमक्या. काय विनोद आहे हा. उद्या ब्लॅक कॅट कमांडो पण संरक्षण मागतील. जेंव्हा नबाब मलिकांनी वानखेडे हे मुस्लीम आहेत असा दावा करताच वानखेडेचे वडील (तेही पोलीसात अधिकारी होते बरं का) पुढे येऊन आम्ही हिंदूच. असा दावा करु लागले. त्यासाठी त्यांनी त्यांचे कास्ट सर्टिफिकेट दिले. धर्माने मुस्लीम असलेली त्यांची बायको त्यांना प्रेमाने दाऊद म्हणते असाही व्यक्तीगत पण हास्यास्पद खुलासा केला. समीरचे पहिल्या लग्नातले डोक्युमेंट्स येताच ते लग्न मुस्लीम पध्दतीने मुस्लीम मुलीशी झाले कारण त्यांच्या आईची इच्छा होती असे ते म्हणतात. (क्रांतीशी झालेले लग्न मात्र हिंदू पध्दतीने झाले. इथे आईची इच्छा नव्हती बरं का) समीरचे लग्न लावणारा काझी म्हणतोय लग्न मुस्लीम पध्दतीने झोकात दोन हजार लोकासमक्ष झाले पण इथेही समीरचे वडील सांगतात तरीही आम्ही हिंदूच. समीरचे सासरे म्हणतात वानखेडे मुस्लीमच. नाहीतर आम्ही हिंदूंना मुलगी दिलीच नसती. सासरेही चांगले डॉक्टर वगैरे आहेत. मुलगी हि. तिच्यासोबत दहा वर्षे संसार करुन घटस्फोट झाला तो तलाक तलाक ने झाला की स्पेशल अ‍ॅक्ट ने झाला तेही येईल आता. पण इतके सगळे झाल्यावर (आणि पतिदेवांचा हा इतिहास माहिती असणारच) क्रांतीताई आता मुख्यमंत्र्यांना बहिणीच्या नात्याने आळवित आहेत. सगळेच अगदी अचंबित करणारे.
अगदी थोडी उलट कहाणी मानली तर हे तथाकथित लव्ह जिहाद चेच प्रकरण नाही का? हिंदू आहे असे भासवून मुस्लीम मुले उच्च शिक्षित हिंदू मुलींना जाळ्यात अडकवतात, लग्न करतात व नंतर सोडून देतात अशा कहाण्यात हा रोल रिव्हर्सिबल किती फिट बसतोय.
.
कदाचित आर्यनच्या जन्माला कारणीभूत असणारा २५ वर्षापूर्वीचा लव्ह जिहाद एका दुसर्‍या लव्ह जिहादपाशी येऊन थांबलाय.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 2:02 pm | श्रीगुरुजी

या सर्व गोष्टींचा (अगदी खऱ्या आहेत असं क्षणभर गृहीत धरलं तरी) आणि आर्यनवरील कारवाईचा काही संबंध आहे का?

सुरिया's picture

29 Oct 2021 - 2:25 pm | सुरिया

अगदी अगदी.
एक क्षणभर आम्हीही आर्यन खान हा ड्रग्जचा फार मोठा स्मगलर आहे आणि तो आपल्या बापाच्याच आशिर्वादाने सगळे बॉलीवूड, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, भारतवर्ष आणि त्यातील तरुणाई उध्ध्वस्त करायला निघालाय आणि कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, इमानदार, धर्मनिरपेक्ष, धडाडीचे सच्चे अधिकारी समीर वानखेडे सर काहीही राजकारण मध्ये न आणता, कुणाचाही आशिर्वाद न घेता, काहीही पैश्याचा मॅटर मध्ये न आण्ता केवळ आर्यनला रोखण्यासाठी आणि तमाम भारतवर्षाच्या तरुणाईला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत असे गृहीत धरले तर हे विदारक (आणि अद्याप अपुरे) चित्र दिसले.
आता सांगा काय करायचं?

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 2:30 pm | श्रीगुरुजी

नक्की काय म्हणायचं आहे?

कॉमी's picture

29 Oct 2021 - 2:45 pm | कॉमी

चपखल.

Rajesh188's picture

29 Oct 2021 - 2:52 pm | Rajesh188

अतिशय योग्य प्रतिसाद.
आर्यन भोवतीच लक्ष केंद्रित करून लोकांना वेडे बनवायचे हाच हेतू
खरे ड्रग चे व्यापारी मित्र च असतील.
अदानी बंदरावर ड्रग सापडले आहे ते मित्रंचेच असेल

बबन ताम्बे's picture

29 Oct 2021 - 2:09 pm | बबन ताम्बे

मंत्र्यांची कामे काय असतात? ती सोडुन हे मंत्री चोविस तास यातच गुरफटले आहेत. यांच्या टेबलावर जनतेच्या कामांच्या फायली वगैरे येतात की नाही ?

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 2:32 pm | चंद्रसूर्यकुमार

भलत्याच अपेक्षा तुमच्या. आर्यनच्या केसपुढे इतर सगळ्या गोष्टी नगण्य नाहीत का?

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 2:34 pm | श्रीगुरुजी

भंगारवाला फक्त भंगार कामच करणार.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 1:07 pm | चंद्रसूर्यकुमार

किरण गोसावीबरोबर भाजप नेत्याची पार्टनरशीप आहे याबाबतचा गौप्यस्फोट हिवाळी अधिवेशनात आपण विधानसभेत करणार आहोत असे नबाब मलिकांनी म्हटले आहे.एक गोष्ट समजत नाही. जर नबाब मलिककडे भाजप नेते आणि ड्रग पेडलर्स किंवा किरण गोसावी किंवा अन्य कोणी यांच्यातील साटेलोट्याचे पुरावे आहेत तर तो हिवाळी अधिवेशनापर्यंत का थांबणार आहे? आता लोखंड गरम असतानाच हातोडा घालायचा ना? की त्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत त्यामुळे आता बाहेर काही बोलल्यास संबंधित लोक त्याला कोर्टात खेचू शकतील ही भिती आहे पण हिवाळी अधिवेशनात विधानसभेत काहीही वाटेल ते बोलले तरी त्याला राज्यघटनेचे संरक्षण असल्यामुळे त्याच्याविरोधात काहीही करता येणार नाही म्हणून अधिवेशनापर्यंत थांबणार आहेत?

काहीही असले तरी नबाब मलिकांच्या आक्रमकपणाबद्दल मानले. असा आक्रमकपणा भाजपने शिकून घ्यायला हवा.

दलित हिंदू म्हणून आरक्षणाचा लाभ घेवून सरकारी नोकरी मिळवली.
मुस्लिम स्वीकारला आहे असे सांगून उच्च शिक्षित डॉक्टर असलेल्या मुस्लिम मुली शी पाहिले लग्न केले.
हिंदू आहे असे सांगून क्रांती शी लग्न केले.
हा माणूस नक्की च झोलर आणि भ्रष्ट असला पाहिजे .
शाहरुख कडे पण ह्यांनी लाच मागितली असणार.
त्याला बदली नाही नोकरी मधून बरखास्त करून चोकशी केली पाहिजे.
अगदी किती संपत्ती चा मालक आहे तो ह्याची पण.

सर टोबी's picture

29 Oct 2021 - 1:45 pm | सर टोबी

नियंत्रण कायदा हा अमेरिकन सरकारशी सहकार्य करण्याच्या हेतूने मूर्त स्वरूपात आला. अमेरिकेला जे काळजी करण्याचे कारण वाटते तसेच इतरांना पण वाटावे अशी अमेरिकेची ईच्छा असते. यातील तरतुदी तर फाशीच्या शिक्षा देण्यापर्यंत कठोर होत्या ज्या काही वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आली.

जगात बरेच देश अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या लोकांच्या बाबतीत आता सहनभुतीचे धोरण अवलंबतात.

वानखेडे यांच्या बाबतीत आर्यन हा तस्करीशी संबंधित होता असे दाखवण्याचा मनस्थितीत होते. एका अर्थानं अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करताना तारतम्य दाखवावे या अपेक्षेला ते उतरले नाही असे वाटते. माझी ही भूमिका देशप्रेमी मंडळींना आवडणार नाही पण या धाग्यावर राळ उडू नये असे वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2021 - 1:54 pm | प्रकाश घाटपांडे

एखादा धर्मांतरीत मुस्लीम असेल तर त्याची सुंता करावी लागते का? म्हणजे सुंता केल्याशिवाय तो मुस्लिम होउ शकत नाही असे काही "शास्त्र "आहे का?

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2021 - 2:56 pm | चौथा कोनाडा

कॉलिंग मदनबाण !
त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये नंतर धागा काढून विविध लिंक्स पोस्ट केल्या होत्या. वेळोवेळी अपडेट्स देत मिपाकरांना चांगलेच व्यग्र ठेवले होते !
या चर्चेत त्यांच्या सारख्या हरहुन्नरी माणसानी सहभागी होण्याची गरज आहे !

कॉमी's picture

29 Oct 2021 - 3:09 pm | कॉमी

LOL

एखादा धर्मांतरीत मुस्लीम असेल तर त्याची सुंता करावी लागते का?
हो.

म्हणजे सुंता केल्याशिवाय तो मुस्लिम होउ शकत नाही असे काही "शास्त्र "आहे का?
शास्त्र नाही पण प्रथा म्हणता येइल बहुतेक. जसे हिंदू कान टोचतात तसे लांडे सुंता करतात. दिन ए इस्लाम ची ती निशाणी आहे असं म्हणा हव तर.

कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥

छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर किती अगणित उपकार आहेत याची जाणिव वरील २ ओळीतुन लगेच होते.

सुंता या शब्द प्रयोगा बरोबरच सुन्नत,खतना हे शब्द प्रचलित आहेत. पुरुषांची खतना केली जाते त्याच प्रमाणे स्त्रियांची देखील केली जाते. पुरुषाच्या खतन्यामुळे त्याच्या काम इच्छेत,संवेदनेत काहीही फरक पडत नाही, पण स्त्रियांची मात्र फार वाईट स्थिती होते. स्त्रिने व्यभिचार करुन नये हे या मागचे मुख्य कारण !

@ चौको

या चर्चेत त्यांच्या सारख्या हरहुन्नरी माणसानी सहभागी होण्याची गरज आहे !
कुठे हरभर्‍यांच झाडं मोठ झालयं काय ? :)))

जाता जाता :- भंगारवाल्याचा जावई जामिनावर सुटला आहे म्हणजे तो निर्दोष सुटला असा त्याचा अर्थ होत नाही, हेच आर्यन खान बाबत देखील आहे.
मग भंगारवाला उगाच कावकाव करत का सुटले आहेत ? तर याला २ कारणं असावीतः-
१] भंगालवाल्याच्या साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या परिवारावरील धाड सत्राची माहिती महाराष्ट्राच्या जनते समोर जास्त उघड होऊ देऊ नये आणि माध्यम दुसर्‍याच कुठल्या विषयात गुंतुन पडलेली रहावीत म्हणुन यांना छु केले असावे.
२] “Sameer Wankhede also asked (the Mumbai Police) for the call data records of my daughter. Mumbai Police said we can’t give information about her private life to you,” he added.

भंगारवाल्याच्या भावाचे हात पैर काट डालुंगा हे डायलॉग जनता विसरली नाही बरं का !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitne Bhi Tu Karle Sitam... :- Sanam Teri Kasam [ Soundtrack Version ]

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Oct 2021 - 5:17 pm | चंद्रसूर्यकुमार

आर्यनला जामिन देताना उच्च न्यायालयाने घातलेल्या अटींमध्ये एक अट आहे- मुंबईबाहेर जाताना एन.सी.बी च्या अधिकार्‍याला आपण कुठे जाणार आहोत, किती दिवसांसाठी, कुठे राहणार आहोत हा तपशील देणे गरजेचे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करत आहेत. म्हणजे परत त्याच समीर वानखेडेंना ही माहिती द्यावी असे उच्च न्यायालयाने सांगितले असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2021 - 5:40 pm | श्रीगुरुजी

नशीब न्यायालयाने जामीन दिला. नाही तर आजपासून न्यायाधीशांच्या लग्नाचे फोटो, लहानपणी त्यांना घरात कोणत्या नावाने हाक मारली जात होती, त्यांना पहिलीपासून दहावीपर्यंत किती गुण मिळाले होते इ. चा गौप्यस्फोट पत्रकार परिषदेत सुरू झाला असता.

धर्मराजमुटके's picture

29 Oct 2021 - 10:04 pm | धर्मराजमुटके

नक्की काय चालु आहे? माहित नाही पण शाहरुख खान आणि गौरी खान यांनी तोंडाला कुलूप लावले ती अतिशय चांगली गोष्ट आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2021 - 10:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नबाब मलिक रोज नविन गौप्यस्फोट करत आहेत. फॅशन टी.व्ही.चे मुख्य काशीफ खान ह्यानी ती पार्टी आयोजित केली होती. हे काशीफ ड्रगचा व्यापार करतातच शिवाय मोठे सेक्स रॅकेटही चालवतात असा गंभीर आरोप नबाब ह्यानी केला आहे.
फॅशनशी संबंधीत लोक जे आहेत त्यांना ह्यात आश्चर्य वाटणार नाही कारण बहुतांशी लोक ह्यात गुंतलेले असतात.
क्रूझवरील ईतर लोकांची वानखेडे ह्यानी तपासणी का केली नाही ? आणि काशीफ खान ह्यांना ताब्यात का घेतले नाही ? हयचे स्पष्टीकरण वानखेडे व एन सी बी ने अजूनही दिलेले नाही.

रात्रीचे चांदणे's picture

29 Oct 2021 - 10:32 pm | रात्रीचे चांदणे

तो काशीफ खान drugs चा व्यापार आणि सेक्स रॅकेट चालवत असेल आणि हे नवाब मालिकांना माहितीही आहे तर पोलीस नक्की कोणाची वाट बघत आहेत? Drugs चोरट्यांना ncb नेच पकडावे असा काही नियम आहे का? नवाब मलिक रोज न्युज चॅनल्स ला माहिती पुरवत आहेत पण FIR नोंदवून पोलिसांना महिती का देत नाहीत. दुसरीकडे आव्हाड ही क्रांती रेडकरला तोंड बंद ठेव म्हणून धमक्या देत आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2021 - 10:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कारण ते राजकारणीही आहेत. एवढे गंभीर आरोप करत आहेत म्हणजे त्यांच्याकडे पुरावे असावेत असे मानायला जागा आहे. अजूनतरी ते जे बोलतात ते पटते आहे. प्रामाणिक तपास अधिकारी असता तर रेव्ह पार्टी आयोजकाला आधी पकडले असते. क्रूझ वरील सर्व लोकांची तपासणी केली असती आणि मगच क्रूझला पुढे जाउ दिले असते. मात्र ह्यातील काही झाले नाही. ते का झाले नाही ह्याचे स्पष्टीकरण एन सी बी ने दिलेले नाही. ईथेच गोम आहे.
आर्यन खान व त्याच्या मित्रांना पकडायचे आणि मग पैशाची मागणी करायची..
बाय द वे, सुशांतचा खूनच झाला व दिशा सालियन हिला वरून ढकलून देण्यात आले..ह्याचे पुरावे राणे पिता-पुत्रांकडे होते असे ते चॅनलवर येऊन सांगयचे. ते त्यांनी सी बी आय ला दिले का ? रिया चक्रवर्ती ड्रजचा व्यापारातही गुण्तलेली आहे असे अर्णब अनेकवेळा म्हणाला. दिले का त्याने पुरावे.?
नबाब ह्यांनी देखील असेच केले तर मग नबाबही त्यांच्याच माळेचे मणी आहेत असे म्हणता येइल. थोडी वाट पाहूया.

जेपी's picture

29 Oct 2021 - 11:16 pm | जेपी

अर्ध शतक निमित सर्वांना अर्धा किलो सायट्रिक चूर्ण देऊन सत्कार करण्यात येत आहे.
शुभेच्छा - जेपी आणी तमाम नशेडी कार्यकर्ते

इरसाल's picture

30 Oct 2021 - 9:42 am | इरसाल

फायनली भारताला ४९ वे "रत्न" सापडले आज घरी येणार तर वृत्तमाध्यामांना मायेचा हुंदका फुटलाय.